आपल्या इच्छांवर नियंत्रण कोणाचं?

Submitted by केअशु on 27 November, 2025 - 20:23
इच्छा

जास्त काही लिहिण्याच्या पद्धत पडत नाही कारण मुळातच माहिती हवी आहे म्हणून विचारतो आहे आता वरील कोड जो आहे तो आईन्स्टाईन या महान शास्त्रज्ञाचा आहे त्यामुळे त्याला तोतांड म्हणून वगैरे चुकीचे आहे आणि तसेच असेल तर मग खरंच आपल्या मनात तुझ्या इच्छा निर्माण होतात त्यांचा उगम कुठे असतो कुठे असतो म्हणून यापेक्षाही त्यांवर नियंत्रण कोणाचा असतो कोण ह्या इच्छा आपल्या मनात आणतो आणि आपल्या आकाश शरीर त्याप्रमाणे त्यामागे काम करण्यासाठी झटत राहत?

Group content visibility: 
Use group defaults

रानभुली
जर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकलात तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल, जे तुम्ही इतरांना सांगावं ही अपे़क्षा आहे.

बर मी माझ्याबद्दलच सांगतो की मी पोटापाण्यासाठी काहीतरी न आवडणारे काम करतो. पण माझी चित्रकला चांगली आहे. मला चित्र छान काढता येतात. मला यात काही बक्षीसही मिळालेली आहेत. म्हणजे मी खूप मोठा चित्रकार वगैरे आहे असं नव्हे पण हात सहज वळतो. आणि त्यामुळे चित्रकला सहज जमते. रंगसंगती समजतात. दोन किंवा अधिक रंग मिक्स करून हवा तो रंग बनवता येतो. आणि हे मी खूप लहानपणापासून करतो आहे. आमच्या इथे एक 21 फुटी गणपतीची मूर्ती ही बनवली जायची ती जाग्यावरच बनवली जायची. कुठून आणून बनवली जायची नाही. मी लहान असताना ती कशी बनवतात तेही बघायला जायचो. आता मी वर लिहिलं की मला चित्रकलेमध्ये गती आहे तर मला आठवते त्याप्रमाणे मी साधारणपणे इयत्ता पहिलीत असताना मला वडिलांनी पाटीवर एका मुलाचे चित्र काढून दिलं होतं. त्यांनी एकदा चित्र काढून दिल्यानंतर मी ते परत परत त्यांना काढायला लावायचं. ही माझी चित्रकलेबद्दलची आत्तापर्यंतची ज्ञात असलेली सर्वात जुनी आठवण. आता त्यावेळी माझ्या अवतीभोवती बऱ्याचशा गोष्टी होत्याच की. कुठेतरी टीव्हीवर किंवा रेडिओवर गाणं ऐकू यायचं , कोणीतरी बागकाम करत होता , कोणी व्यायाम करत असेल , कोणी वाद्य वादक असेल पण या सगळ्यांमध्ये ज्या गोष्टी नजरेला आकर्षण घेतात अशा गोष्टींकडे माझं लक्ष द्यायचं. त्यामुळे मला चित्रकला , शिल्पकला रंगसंगती या गोष्टींचं आकर्षण आहे. आणि त्या मला जमतात. आताही माझा हाच प्रश्न आहे की बऱ्याचशा गोष्टी आजूबाजूला असून सुद्धा मलाही चित्रकला किंवा शिल्पकला यांचेच आवड का निर्माण व्हावी? मला प्राणी , पक्षी यांच्या बद्दल कुतूहल नाही , आकाशात विमान कसे उडतं , याबद्दल त्यावेळी व आजही कुतूहल वाटलं नाही , रस्त्यावरून वाहन कसं चालतं याबद्दल कधी कुतुहल वाटलं नाही. मला कायम कुतूहल वाटत आलेल आहे ते चित्रकला , शिल्पकला , रंग किंवा पेन्सिल आणि रंगांचा वापर करून एखादे चित्र काढणे बद्दल मला आकर्षण वाटत आलेल आहे. तेच का या मागचं कारण मला आजही माहीत नाही.

"कुठल्याही व्यक्तीच्या नशीबात तिला ज्यात आवड आहे हे लिहिलं असतं त्यातच तिला आवड निर्माण होते, इतर कशात नाही, मग कुणी तिला इतर कशात आवड निर्माण करण्याचा कितीही प्रयत्न करो.

कुठलीही गोष्ट जेव्हा व्हायची असते तेव्हाच होते, त्या आधी नाही की नंतरही नाही, मग कुणी ती आधीच व्हाही यासाठी किती का प्रयत्न करो."

वरील विधाने सिद्ध करण्यासाठी लोक हजारो, लाखो उदाहरणे देउ शकतील आणि ती चुकीची आहेत हे सिद्ध करणारे एकही उदाहरण कोणी देउ शकणार नाही.
पण नीट बघीतले तर वरील विधाने , युक्तीवाद "चित भी मेरी, पट भी मेरी, नाणे उभे राहीले तरीही मेरी, नाणे वरच्यावर एखाद्या पक्षाने पायात धरुन तो दुर निघुन गेला तरी पण मेरी" प्रकारची आहेत. यात तुम्ही कुठलेही उदाहरण घेतले तरी शेवटी आपण" बघा, शेवटी त्याच्या नशीबात जे लिहिलं होतं त्यातच आवड निर्माण झाली" असे म्हणु शकतो. कारण नशीबात काय लिहिले आहे हे कोणीच पडताळुन पाहु शकत नाही. शेवटी जे झाले ते त्या व्यक्तीच्या नशीबात लिहिले होते असे समजायचे.
एखादी गोष्ट - त्याला/तिला नोकरी कधी मिळणार, बढती केव्हा मिळणार, अमक्यात यश केव्हा मिळणार, केसचा निकाल केव्हा लागणार इत्यादि - ती केव्हाही घडो, कुणाच्या अंदाजापेक्षा बर्‍याच आधी किंवा नंतर, दुसर्‍या कुण्याचा अंदाज उलट असेल, ती जेव्हा केव्हा घडेल तेव्हाच घडायची होती हाच आपला दावा आहे.
असे युक्तीवाद बरोबर की चुकीचे हे पडताळुन पहाण्यास कसले मापदंडच करता येत नाहीत. ते चूकीचे आहेत हे दाखवण्यास शून्य वाव आहे. जेव्हा केव्हा घडली तेव्हा 'बघा म्हटलं नव्हतं? घडायची तेव्हाच घडली. झाले की नाही सिध्द!' म्हणणार. म्हणुन बरेच लोक अशा युक्तीवादांकडे आकर्षीत होतात. पण त्यात काहीही तथ्य नाही.

केअशु, तुम्ही कच्चा खेळाडू हेरून प्रश्न विचारताय असे वाटले म्हणून तुम्हाला विचारले होते. अमूक एकच का या प्रश्नाला मी मागच्याच प्रतिसादात उत्तर दिले आहे. त्यामुळे पुन्हा पुन्हा भोपळे चौकात यायला काहीच गंमत वाटत नाही. तुम्हाला जाणूनच घ्यायचे असेल तर एखाद्या गोष्टीकडे कल कसा असतो याचे गुगळून तुम्हाला उत्तर मिळेल. गुगल करून इथे उत्तर छापणे पटत नाही. हवं तर ए आय ला विचारा.

भविष्यशास्त्राच्या समर्थनाच्या हेतूने हा बाफ आहे हे माहिती असतं तर मी वेळ घालवला नसता. माझा या शास्त्राचा अजिबात अभ्यास नाही. ज्याचा अभ्यास नाही ते मला धुडकावून लावणे योग्य वाटत नाही आणि त्याचे समर्थन तर मुळीच नाही. पण या शास्त्राचे अभ्यासक अनमानधपक्याने ज्योतिष सांगतात हे मला मान्य नाही. पण तुमचा अधिकार मी हिरावून घेऊ शकत नाही. तुमचे आयुष्य आहे, कसे जगावे हा तुमचा प्रश्न आहे. या विषयावर वादविवाद करूनही ज्याला जे करायचे तेच तो करणार. त्यामुळे या चर्चा अर्थहीन आहेत. हे माझे मत आहे.

मला सायंटिफिक दृष्टीकोण ठेवून भविष्याकडे पहायला आवडेल. हा माझा चॉईस आहे.

मला कायम कुतूहल वाटत आलेल आहे ते चित्रकला , शिल्पकला , रंग किंवा पेन्सिल आणि रंगांचा वापर करून एखादे चित्र काढणे बद्दल मला आकर्षण वाटत आलेल आहे. तेच का या मागचं कारण मला आजही माहीत नाही. >>>>>> केअशु , तुम्ही दिलेल्या माहितीवरून असे वाटते आहे कि तुमची हि आवड हि कदाचित प्रामुख्याने तुमच्या जनुकांमधून आली असावी. व ती घरातील व आजूबाजूच्या वातावरणामुळे बहरली असावी. अर्थात हा फक्त अंदाज आहे.

मानव

नशीबात काय लिहिले आहे हे कोणीच पडताळुन पाहु शकत नाही.

येतो की ज्योतिष शास्त्र कशासाठी आहे मग?

ज्योतिष वापरून क्रिकेट सामन्यांचे निकाल कळले तर बेटिंगवर पैसे कमावता येतील.
फार डिटेल गरजेचे नाही कोण हरणार कोण जिंकणार इतके खात्रीपूर्वक कळले तरी पुरेसे आहे.

भविष्यात काय होणार ते ठरलेले आहे. फक्त ते ओब्झरवरने बघितल्यावर प्रत्ययास येते. याचा अर्थ ओब्झरवरचा त्यात काही हाय नसतो, पण ते काय ते अनुभवल्याशिवाय उजेडात येत नाही. आईनस्टाईनने हेच तर सांगितले होते.

मला जोतिषशास्त्राने कथेचा पुढचा भाग दिसतो. मग तो मी पोस्ट करतो.
गेले काही दिवस ज्योतिषशास्त्राने कीबोर्डला पुरळ येऊन टायपिंग बंद पडेल असा इशारा दिला होता. त्यामुळे शेरूचे पुढचे भाग राहून गेले.

ज्योतिषशास्त्राने हेडरमधल्या प्रश्नाचे उत्तर सुद्धा मिळाले असते. इथे काथ्याकूट वाचला असता.

>>>>>>>>>>पण नीट बघीतले तर वरील विधाने , युक्तीवाद "चित भी मेरी, पट भी मेरी, नाणे उभे राहीले तरीही मेरी, नाणे वरच्यावर एखाद्या पक्षाने पायात धरुन तो दुर निघुन गेला तरी पण मेरी" प्रकारची आहेत.
मानव आवरा!! Lol Lol Lol

माबो वाचक

माझ्या घरात मी वगळता कोणालाही चित्रकला या गोष्टीत स्वारस्य नाही किंवा गतीही नाही.

माझ्या घरात मी वगळता कोणालाही चित्रकला या गोष्टीत स्वारस्य नाही किंवा गतीही नाही. >>>>
१) असायलाच हवी असे नाही. काही वेळेस ती जनुके सुप्त स्वरूपात राहतात, व काही पिढ्यांनंतर प्रकट होतात. (नुकतेच एका चिनी जोडप्याला झालेल्या सोनेरी केसांच्या व निळ्या डोळ्यांच्या अपत्याबद्दल बातमी वाचली. तर त्या अपत्याचे आजोबा कि पणजोबा गोऱ्या वंशाचे होते. त्यांचे सोनेरी केसांची जनुके दोन पिढ्या सुप्त राहून प्रकटली. )
२) आवड असून ती परिस्थितीमुळे दाबली गेली असेल किंवा आजूबाजूला पोषक वातावरण नसल्यामुळे ती प्रकट झाली नसेल किंवा आवडीची तीव्रता दिसून येण्याइतपत नसेल या शक्यता सुद्धा आहेत. असे काही असेल तर ते त्या व्यक्तीला स्वतःला ही समजणार नाही. (उदा. सचिन तेंडुलकर यांना पोषक वातावरण मिळाले नसते तर ते चांगले क्रिकेट खेळू शकतात हे कोणालाही समजले नसते, अगदी त्यांनाही. किंवा लता मंगेशकर यांचा जन्म गाण्याची बंदी असलेल्या देशात झाला असता तर?)
३) जनुकांमध्ये रँडम मुटेशन होऊन काही गुण नव्याने निर्माण होतात. तसेही झाले असण्याची शक्यता असेल.

टीप - मी या शास्त्रातील तज्ञ नाही. आवड म्हणून काही वाचन केले आहे त्यातून मिळालेली माहिती आहे.

हे सुप्त रहाणे आणि प्रकट होणे, उपजत गुणांची मशागत होणे, रँडम म्युटेशन ... हे सगळं आपल्याला अगम्य, रँडम वाटत असेल तरी ते करणारा कर्ता करविता वर बसलेला आहे. त्याच्या मनात असतं म्हणुन तर तो ह्या सगळ्या लीला करतोय. तुम्ही, मी आणि माझं म्हणत रहा. तुमची इच्छा! न्हवे!!! ती पण त्याचीच इच्छा!

ते करणारा कर्ता करविता वर बसलेला आहे. त्याच्या मनात असतं म्हणुन तर तो ह्या सगळ्या लीला करतोय. >>>> याला काही शास्त्रीय आधार / पुरावा नाही.

शास्त्रीय आधार सध्या अनेक गोष्टींना नाही. पण विविध तत्त्वज्ञानातल्या अनेक गोष्टी नंतर शास्त्राने सिद्ध केल्या- असं झालं आहे. २०२२ (की २३?) सालचं क्वांटम एन्टँगलमेंटबद्दलचं नोबेल पारितोषिक मिळालेल्यांचे शोध, जे थेट आईन्स्टाईनच्या शोधांना काऊंटर करतात, आणि अद्वैतवादातल्या (आदि शंकराचार्य) काही गोष्टींना (जवळजवळ) सिद्ध करतात - हे लेटेस्ट उदाहरण. अशी अनेक सापडतील.

शिवाय तत्त्वज्ञान (किंवा विविध तत्त्वज्ञानं) वेगवेगळी उत्तरं शोधते. त्यातलं कुठचं स्वीकारलं पाहिजे असं नाही. कोण आणि कोणती शाखा कशाबद्दल काय म्हणतं हे समजणं, आणि आपल्याला संपूर्ण अशी काहीच माहिती नाही, ज्ञानही नाही, अजून बरंच बाकी आहे- हे नीट माहिती होणं आणि कन्फर्म होणं- हे फार महत्वाचं आहे. 'आय नो दॅट आय नो नथिंग'- ही एनलायट्न्ड इग्नोरंसची सुरुवात असते. मानवजात यामुळेच तर इथवर आली.

साजिरा, द्वैत अद्वैत सिद्धांताला क्वांटम एटॅंगलमेंट सिद्ध झाल्याने पुष्टी कशी मिळते हे मला कळले नाही. हे मी आधीही ऐकले आहे आणि तेव्हाही हा प्रश्न पडलेला.
आईनस्टाईन spooky action at distance असे क्वांटम एटॅंगलमेंटबद्दल म्हणाला होता, कारण प्रकाशाच्या वेगापेक्षा अधिक वेगाने दोन कणांमध्ये माहितीची देवाण घेवाण होऊ शकते असे त्याला शक्य वाटले नाही. क्वांटम एटॅंगलमेंट मुळे त्याला छेद गेला आणि प्रकाशाच्या वेगाच्या तुलनेतही अगदी एकाच क्षणी दोन क्वार्क्स मध्ये माहितीची देवाणघेवाण होते हे आता सिद्ध झाले. कितीही लांब असले तरी सुद्धा होते, हे सिद्ध झालेय असे मानू .

अद्वैत सिद्धांत: ब्रह्म निराकार निर्गुण आहे, जग भोवती जे दिसते ते (ग्रह, तारे, तारकापुंजही? कृष्णविवरही?) मिथ्या आहे, आपण (म्हणजे आपला आत्मा) आणि ब्रह्म एकच, याची अनुभूती होणे म्हणजे अंतिम सत्याची ज्ञानप्राप्ती होणे म्हणजे मुक्ती.
द्वैत: परमेश्वर-परमात्मा, आपण (आपला आत्मा), आणि हे जग तीनही वेगवेगळे आहेत (की पहिले दोनच वेगळे आणि जग मिथ्या?)
(द्वैताद्वैत बद्दल थोडेफार वाचूनही अनेक वर्षे झालीत तेव्हा त्याबद्दल वर लिहिलेले कंसातील प्रश्नांव्यतिरिक्तही चूक असु शकते. चुकले असेल ते कृपया करेक्ट करा.)

समजा आईन्स्टाईन बरोबर असता आणि प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने माहितीची देवाणघेवाण होऊ शकत नसती, तर द्वैताद्वैत सिद्धांताला छेद गेला असता का? का? आणि आता
एटॅंगलमेंट सिद्ध झाल्याने त्याला पुष्टी कशी मिळते?

वरती 'एनलायट्न्ड इग्नोरंस' अशी दुरुस्ती केली आहे. मघाशी ते एक्झॅक्टली विरुद्ध झालं होतं.

मानव जमेल तसं, आणि जमेल तर उत्तर देतो आहे..

तत्वज्ञान, अध्यात्म यातील काही गोष्टी जरी नंतर विज्ञानाने सिद्ध झाल्या असल्या तरी सगळ्याच झाल्या नाहीत. सायन्स फिक्शन मधील पण काही गोष्टी नंतर प्रत्यक्षात येतात, पण सगळ्याच नाही. म्हणून तत्वज्ञान, अध्यात्म, सायन्स फिक्शन म्हणजे विज्ञान नव्हे. त्या विज्ञानाने गोष्टी सिद्ध होण्याची वाट पाहावी, असे मी मानतो. तोपर्यंत त्या सत्य आहेत असे मानून चालू नये.
उदा. महर्षी कनाद यांनी हे विश्व सूक्ष्म कणांनी बनले आहे, असे सांगितले, असे मी ऐकून आहे. जेंव्हा अणू चा शोध लागला तेंव्हा बरीच भारतीय आम्हाला हे अगोदर माहित होते असे म्हणतात. पण हे खरे नाही. विज्ञानाने त्याची पूर्ण सिद्धता, पुरावे दिले, ते कसे काम करतात ते सांगितले. आणि पुढे जाऊन अणूंच्या आतील कणाचा शोध लावला.

तत्वज्ञानातील गोष्टी हायपोथिसिस म्हणून ठीक आहेत. पण जोवर विज्ञानाला पुरावे मिळत नाहीत तोवर त्या गोष्टी खऱ्या आहेत असे मानू नये.

तुम्ही म्हणताय, तेच जवळजवळ मी दुसर्‍या परिच्छेदात म्हटलं आहे.

या सार्‍याचं मूळ 'मी कोण आहे, हे विश्व काय आणि कसं आहे, या सार्‍याचं प्रयोजन काय आहे?' हा प्रश्न. जगातला सगळ्यात महत्वाचा, आदिम आणि अंतिम प्रश्न. 'धर्म', 'तत्त्वज्ञान' आणि 'विज्ञान' या तीन मुख्य शाखांनी आपापल्या पद्धतीने त्याची उत्तरं शोधली. 'धर्म' या गोष्टीने कितीही अन्याय, जुलूम आणि घोडचुका केलेल्या असल्या तरी शतकानुशतकं (बरंवाईट) जगण्यासाठी एक आश्वासक आणि दीर्घकाळ टिकणारी, सर्वमान्य 'व्यवस्था' तयार केली, हे नाकारता येत नाही. तत्त्वज्ञानाने आत्मोन्नती, एनलायटन्मेंट, आध्यात्मिक विकास यासाठी मदत केली नसती तर सेपियन्सपासून इथवर आपण आलो असतो का हा प्रश्नच आहे. तत्त्वज्ञानाने फक्त हायपोथेसिसच मांडली असती तर इतकी शतकं त्याचा विचार जिवंत राहिला नसता. आपल्या विज्ञानाने पुराव्यांवर निष्ठा ठेऊन, बदलायची आणि चुकीचे सिद्ध होण्याची तयारी ठेऊन हजारो गोष्टी सिद्ध होण्याची धीराने वाट पाहिली, म्हणूनच या ग्रहावरची सर्वात प्रगत जीव आपण आहोत.

कोणती उत्तरं स्वीकारायची, मानायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मानवजातीचा इतिहास सांगतो, की फायदेशीर आणि सोयीस्कर पडतील ती उत्तरं स्वीकारली गेली. अनेक तत्त्वज्ञानांनी स्वतःच्याच उपशाखांत परस्परविरोधी असे सिद्धांत कधीकधी मांडले. धर्माने लढाया, युद्धं घडवली. विज्ञानाने युद्ध करा म्हणून सांगितलं नसलं तरी त्याला हाताशी धरून युद्धं घडवली गेली. ज्या गोष्टीसाठी आईनस्टाईनना नोबेल मिळालं, तीच चुकीची ठरवण्याबद्दल बरोबर शंभर वर्षांनी शास्त्रज्ञांना नोबेल मिळालं. कुठचीही उत्तरं परिपूर्ण अशी कधीच नव्हती आणि नसणार आहेत.

साजिरा, सुंदर प्रतिसाद.

तत्वज्ञान हा बौद्धिक प्रगतीचा पाया राहिलेला आहे नाकारता येत नाही. झापडबंद पद्धतीने पाहू नये. पूर्वी तत्वज्ञांच्या बैठकी होत, त्यात जिंकलेल्या टीमचे तत्वज्ञान स्विकारले जाई. पण आजच्या वैज्ञानिक मेथडॉलॉजीचा अभाव, सँपल - सर्व्हे - निरीक्षणे - डाटा यांचा अभाव असताना कोण जिंकले हे ठरवणे सुद्धा अवघडच होते. पृथ्वी गोल आहे हे अमान्य झाले कारण तत्वज्ञानावर धार्मिक सत्तेचा अंमल होता आणि त्या सत्तेला जे पटले नाही ते त्यांनी नाकारले. पृथ्वी गोल आहे हे आजच्या वैज्ञानिक प्रगतीमुळे आपण रोज बघू शकतो. पण जेव्हां अशी साधने नव्हती, तेव्हां पूथ्वी चपटी आहे हेच मान्य असणे यात नवल वाटत नाही.

मानव यांचा कन्सर्न पण महत्वाचा आहे. ही निसरडी वाट आहे. साजिरा कुठेही धार्मिक मान्यतांची भलावण करत नाहीयेत. तर उत्क्रांती मधे या घडामोडींचे महत्व विषद करत आहेत. पण त्याचा आधार घेऊन झापडबंद लोक "बघा, आम्ही म्हणत होतो ते सगळे मान्य करताहेत" असे म्हणतील. यामुळे कदाचित मानव यांना धोक्याची लाल रेषा आखाविशी वाटत असेल.

कणादचा पॅरा वाचला. मायबोलीवर हे झालेले आहे पूर्वी. देजावू.

कोणती उत्तरं स्वीकारायची, मानायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.>>>माझ्या मते कोणती उत्तरं स्वीकारायची, मानायची हा ज्याचा त्याचा आणि कालसुसंगत प्रश्न असायला हवा. बाकी प्रतिसादाशी सहमत.

कालसुसंगत >> राईट. म्हणूनच पुढल्याच वाक्यात 'फायदेशीर आणि सोयीस्कर पडतील ती उत्तरं स्वीकारली गेली' असं लिहिलं..

>>>>>>>> सायन्स फिक्शन मधील पण काही गोष्टी नंतर प्रत्यक्षात येतात, पण सगळ्याच नाही. म्हणून तत्वज्ञान, अध्यात्म, सायन्स फिक्शन म्हणजे विज्ञान नव्हे. त्या विज्ञानाने गोष्टी सिद्ध होण्याची वाट पाहावी, असे मी मानतो.
+१

साजिरा वरील प्रतिसादातील बर्‍याच गोष्टीं बाबत सहमत.
आईन्स्टाईनला नोबेल पुरस्कार फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट साठी मिळाले. त्यातुन प्रकाशाची कण प्रवृत्ती (particle nature) पुढे आली आणि तिथुन क्वांटम मेकॅनिक्सची सुरवात झाली. आईन्स्टाइनची थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी सुद्धा अद्याप चूक ठरलेली नाही. क्वांटम एटॅंगलमेंटबद्दल त्याने अविश्वास दर्शविला होता. त्यासाठी श्रॉडिंजर व्हेव आणि इतर जी समिकरणे होती ( मला त्या समिकरणांबद्दल माहीती नाही) त्यात काहीतरी इतर माहित नसलेली व्हेरीएबल्स असतील, प्रकाशाच्या वेगापेक्षा अधिक गतीने काही असणे शक्य नाही असे त्याला वाटले. ते चुकीचे ठरले.

मी वाचले आहे की मानवाच्या उत्क्रांतीत श्रद्धेचा मोठा वाटा आहे. असे मानतात की एखाद्या फार मोठ्या संकटातून (भूकंप, ज्वालामुखी, वणवा अश्या नैसर्गीक आपत्ती किंवा वन्य प्राण्यांचा, मोठा हल्ला वगैरे) मानव बालबाल बचावला जे त्याला जवळ जवळ अशक्य वाटत होते, तेव्हा त्याला कुणाचे तरी आभार मानावे असे वाटले, असेल, काहीतरी आहे ज्यामुळे आपला बचाव झाला असेल असे वाटले असेल. ही श्रद्धेची सुरवात.
धोक्याची चाहुल, काहीतरी सापडलंय त्यासासाठी इतरांना बोलवा, पुढे जाउ नका थांबा, प्रंचड घोका जीव वाचवायला पळा अशा साठी प्राणी जसे वेगवेगळे आवाज काढुन त्यांच्या इतर बांधवांना कळवतात तसे मानवही करत असेल. पण ही जी श्रद्धेची भावना उत्पन्न झाली ज्यामुळे त्याला दिलासाही मिळु लागला त्याबद्दल आपल्या इतर बांधवांना कशी कळवणार? ती कळवली पाहिजे या तीव्र इच्छे पोटी मग पुढे जाऊन त्याला वाणी फुटली असावी असेही मानतात. हे शक्य असेल.
इतरांचा आपल्या स्वार्थासाठी वापर (exploitation) हे प्राण्यांतही असते तसे मानवातही त्या अवस्थेपासुन असावे तसे या श्रद्धेचा गैर वापरही पुढे लौकरच सुरु झाला असावा पण त्यामुळे टोळी मोठी करणे, झुंड तयार करणे त्याचा स्वरंक्षणासाठी तसेच पुढे नविन काय आहे याचा शोध घेत जाणे इत्यादि साठी उपयोग झाला असावा. त्याही पुढे जाउन प्रश्न पडत रहाणे आणि त्याचे उत्तर शोधत रहाणे यावरुन बुद्धीचा विकास होत गेला असावा तत्वज्ञानाने त्यात नक्कीच मोलाची भर घातली असेल.

Pages