गंमतखेळः सवालजवाब

Submitted by संयोजक on 12 August, 2025 - 11:25

नमस्कार मायबोलीकरांनो,

मजेत आहात ना सगळे?

कसे काय गेले तुम्हाला हे वर्ष?

या वर्षी मायबोलीवर शब्दकोडी, शब्दखेळ, कोडी यांचे धागे बरेच प्रसिद्ध झाले नाही?
आपले आणि विविध प्रकरच्या कोड्यांचे नाते आजचे नाही. लहानपणी, कॉलेजात असताना वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याकडे आलेली कोडी सोडवायला, नंतर तीच कोडी मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना घालायला मजा यायची नाही?

यावर्षी परत जरा ती मजा अनुभवू या का? पण ती मजा मायाबोलीकरांसोबतच घेऊ या.

या वर्षी आपण गंमतखेळ म्हणून सवाल-जवाब घेत आहोत. पुर्वीच्या काळी मराठी चित्रपटात असत ना तसेच.

खेळ अगदी साधा आहे.

आम्ही पहिले कोडे म्हणजेच सवाल देऊ. जो कोणी पहिले उत्तर देईल तो पुढचे कोडे देईल आणि मग हा खेळ असाच पुढे चालू राहील.

तर हे आहे तुमचे पहिले कोडे....

नाही मी पक्षी, तरी उडते,
नाही मी पाणी, तरी वाहते ,
नाही मी हात, तरी स्पर्श करते,
कधी थंड कधी गरम,
कधी शांत कधी वादळासारखी,
घरातही असते, बाहेरही,
ओळखा पाहू, कोण मी?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पतंग?
चतुर (dragonfly)?

बरोब्बर.
पतंग उडतो आकाशी
त्या शेपुट , शिंगे दोन
हवेत जातो सरसर
सांगे आणिक दुसरे कोण.

इतर सवालजवाब आध्यात्मिक, पौराणिक किंवा साहित्यिक आहेत. काही फारच ओपन एंडेड. त्यामुळे ते देत नाही.
रसास्वादासाठी सवाल आणि जवाब दोन्ही इथे लिहून काढेन.
तोवर खेळ पुढे चालवा.

पतंग उडवणारा/री गाणे गातो/ते. हा पतंग की पाखरू म्हणे मज आभाळी चल फिरू... अशी एक शाळेत कविता होती. Lol ती गात असेल. Lol
लिंग निरपेक्ष केलं. नाही तर भजी तळायला लावशील Wink

काल बायकोने नवर्‍याला खाल्लं, का नवर्‍याने बायकोला, का नवर्‍याने चिप्सला.. असा कर्ता बदलला तसा इथे पण. थोडं रेड हेरिंग, संदिग्ध हवंच ना.

Lol

भरत, पौराणिक अध्यात्मिक ओपन एंडेड असतील तरी द्या. मजा येते. तुम्ही थोडी मदत करा, गूगल पण आहे थोडीफार आणखी मदत करायला.

मजा येतेय भरत, त्या सवाल जबाबात.

बरं वेळ मिळाला तर माझे कोडे सोडवा. ( सवाल जबाब आले तर माझे नंतर सोडवा.)

दोन कवाडां मध्ये एक कर्ण, काही घ्यायला गेल्यास म्हणे पैसे काढ नं. (५)

अक्षर छल कोडे आहे. charade + container clue.

एटीएम मशीन/ डेबिट कार्डचा पिन Lol
कार्डवर एनएफसी असेल तर कॉसन्ट्रिक वर्तुळांचे आर्क असतात ते कानातील आवाजासारखे दिसतात. अगदीच फारफेच्ड आहे, पण काही तरी चर्चा चालू करू Lol

वा मानव आणि विकु!

यात एका सवालात चार वेगवेगळे प्रश्न आहेत. उत्तरेही चार.
कोण तपस्वी तपास करितो ?
अखंड स्नाना करितो कोण?
सर्व रसांना कोण ओकितो?
प्राशन करिते त्यांचे कोण?

बरोबर उकल भरत.
दोन = दु
दु दार आणि त्यामध्ये कान.
Proud

ओह ओके, धन्यवाद. Happy

>>>
कोण तपस्वी तपास करितो ?
अखंड स्नाना करितो कोण?
सर्व रसांना कोण ओकितो?
प्राशन करिते त्यांचे कोण?
<<<

ब्रह्माच्या मुखांतून वेद निर्माण झाले असं पुराणं म्हणतात - सर्व रसांना ओकणारा ब्रह्मदेव असेल का?
की व्यासोच्छिष्टं जगत्सर्वं म्हणून व्यास?
प्राशन करिते आपण सगळेच मग.
तपस्वी 'तपास' करितो हा श्लेष आहे का? तपासकाम करतो की तपाला करितो? Happy
शंकर हा तपस्वी?
द्वारका पाण्याखाली गेल्यामुळे कृष्ण (विष्णू?) अखंड स्नान करतो आहे?

सर्व रसांना ओकणारा सूर्य(देव)
प्राशन करणारी पृथ्वी (आणि इतर सूर्य मालेतील ग्रह)
तपस्वी: धृव तारा?
अखंड स्नाना: आकाश गंगा? (हा उगाच त्यात गंगा आहे म्हणुन टोला)

Pages