कशाला काय म्हणायचं?

Submitted by वामन राव on 15 July, 2025 - 10:15

महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात, महाराष्ट्राबाहेरही जिथे जिथे मराठी बोलली जाते त्या त्या प्रांतात एकाच वस्तूला वेगवेगळी नावे, वेगवेगळे शब्दप्रयोग असतात. भिन्न प्रांतातील लोक अशा एकाच वस्तूबद्धल किंवा एकाच वस्तूच्या काही उपप्रकारांबद्दल बोलत असतील तर अनेकदा गोंधळ उडतो. फळे-फुले-भाज्या यांबद्दल तर हा प्रकार अनेकदा घडलेला आढळून येतो. कित्येक जणींच्या माहेरी एक आणि सासरी दुसराच शब्दप्रयोग असतो. संयुक्त कुटुंबात अशा स्त्रियांची अनेकदा धांदल उडते.‌

उदाहरणार्थ, इंग्लिश मधील bottle gourd किंवा हिंदीमधील लौकी या भाजीला मराठीत दुधी, दुधी भोपळा, कद्दू अशी वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावे आहेत. सर्वपरिचित टोमॅटोला ईशान्य विदर्भात भेदरे म्हणतात!

फळे, फुले, भाज्या यांची नावे आणि सामान्यतः आढळून येणाऱ्या इतर वस्तूंची नावे यांना आपापल्या भागात काय म्हणतात याची चर्चा करण्यासाठी हा धागा आहे.

एखाद्या वस्तूला आपल्या भागात काय म्हणतात, त्या वस्तूचे संक्षिप्त वर्णन आणि शक्य असल्यास फोटो, माहित असल्यास इतर भागात काय म्हणतात, असे प्रतिसाद द्यावेत.

- वामन राव

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मूकनायक, तुमची पोस्ट आवडली. काल रात्री उशिरा वाचली होती आणि ताबडतोब उत्तर द्यावेसे वाटले होते. पण आता. Happy
हे असं होऊ शकतं ते मीही थोड्याफार अनुभवाने समजू शकते. लिहिताना प्रमाण मराठीत लिहिले जात असले तरी प्रत्यक्षात प्रमाण मराठी फार कमी जण बोलतात. बोलीभाषा प्रत्येक घरातली वेगवेगळीच असते. तुम्हाला लेखन आवडत असेल तर त्या अनुषंगाने काहीही शिकण्याची तयारी ठेवा. तुमची बोलीभाषा इतरांना शिकवा, इतरांची तुम्ही आपलीशी करा. अशानेच माबो आणि माबोकर समृद्ध होतील. चूक- बरोबर काही नसते यात, आपणच आपला दृष्टीकोन मोठा करायचा. अहंगड आणि न्यूनगंड दोन्ही अयोग्यच आहेत. दोन्हीतही अडकून पडणाऱ्याची प्रगती होत नाही. मी लहान वयातच वेगवेगळ्या प्रकारची खूप माणसं पाहिली-अनुभवली आहेत. बरेचदा मोठे- मोठे शब्द, प्रमाण भाषा, वाचन- लेखन हे सगळं पोकळ पांडित्य असू शकते. कॅरेक्टर रिक्तच राहिलेले असते. त्यामुळे त्याची भीडभाड बाळगायचे कारणच नाही. पुस्तकं वाचून आपण तेवढं शिकत नाही जेवढं आपण माणसं वाचून शिकतो असं माझं ठाम मत आहे. लिहीत राहा, तुम्हाला शुभेच्छा. Happy

मूकनायक, हीच अडचण उलट बाजूने शहरी मुलांनाही येते. आम्हीही एडका पाहिलेला नसतो, आम्हीही उदाहरणार्थ पुण्यात असू तर समुद्र अजून बघितलेला नसतो, आम्ही तांबू/कपिला गायी पाहिलेल्या नसतात, आम्हालाही 'हिरवे हिरवेगार गालिचे' मुद्दाम सहलीला नेऊन दाखवले गेले तर दिसतात. आम्ही पाडाला आलेली फळझाडं पाहिलेली नसतात. काळ्या मातीत तिफन म्हणजे काय चालतं याची चित्र बघूनच आम्हाला कल्पना करावी लागते.

या सगळ्याकडे एका वेगळ्या जगाची माहिती करून घेण्याची संधी म्हणून पाहता येऊ शकतं का?

फारएण्ड आधीची पोस्ट आवडली.
न्यूनगंड वाल्या पोस्ट बाबत एक सांगावेसे वाटते कि काकाफॉ वरच्या पोस्टस वाचून ही बतावणी केली जात आहे असा माझा समज झाला आहे. अशा पोस्टसना उत्तर देणे हे त्यांच्या लक्ष वेधून घेण्याच्या कृतीला बळ देणारे असेल.
मी चूक असेन तर छान होईल.

पातेल - तसराळ >>> पातेल्याला काहीजण टोप पण म्हणतात. आम्ही विग ला टोप म्हणतो. तसराळं म्हणजे लंगडी सारखं थोडं उथळ आणि आडवं भांडं असावं.

आपण जी फोडणीची पोळी करतो तिला काही भागात माणिकपैंजण म्हणतात . >>>> हे म्हणजे मढ्याला साजशृंगार केल्यासारखं वाटतंय.

फोडणीच्या पोळीचा आणि पैंजणात माणिक बसवण्याचा काय संबंध असेल हाच विचार हा शब्द ऐकल्यापासून पायात रुंजी घालतोय.

ए पासून एक्का! इस्पिकचा एक्केवाला झब्बूची उतारी करतो असा वाक्यात उपयोग.
मला ही काकाफॉ डीप सर्च केला तर शाहु महाराज फॉरवर्ड त्यांनी तिकडे टाकलेले दिसले. आता ते काकाफॉ आहे वाटून ते तसं (म्हणजे काकाफॉ) आहे वाटलं म्हणजे ते (लेखक) ... ब्ला ब्ला ब्ल्ला.. असा काही बादरायण संबंध आहे की काय? Lol

. ब्ला ब्ला ब्ल्ला.. असा काही बादरायण संबंध आहे की काय? >> बरोबर. कुणाला कशाला काय कळतंय Lol
एकाच फॉरवर्डवरूनच अंदाज बांधला असेल नाही का अमितव ? तुम्ही तर कधी चुकतच नाही Lol

मूकनायक , तुमचा मुद्दा पोचला.

गेल्या काही वर्षांत पाठ्य पुस्तकांत , बोलीभाषेचाही मोजका का होईना, समावेश झाला आहे.
दहावीच्या पुस्तकात बंजारा भाषेतील एक कविता आहे.
नववीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात मालवणी भाषेतली म्हणून एक कथा आहे. कथेतलं निवेदन प्रमाण भाषेत आहे, पण संवाद बोली भाषेत आहेत. मला काही ती मालवणी वाटली नाही, हा भाग वेगळा.

"त्यांचीच पुण्यायी यी बावडी नय् नदी हय् नदी. कोणाया कामात खोडा घटला ते तुमश्या नशिबाई वाळू जाल्याशिवाय रेल का?

लेखकाचं नाव स्टॅन्ली गोन्सालविस. बहुतेक वसई भागातील ख्रिस्ती लोकांची भाषा आहे.

इंग्रजी माध्यमाच्या पुस्तकात काया मातीत मातीत ही विठ्ठल वाघांची कविता आहे.

पुस्तकांच्या प्रस्तावनेत परिसरात बोलल्या जाणार्‍या विविध बोलीभाषा ऐकून त्यांच्या वैशिष्ट्यानुसार तुलना करता येणे ही एक भाषा विषयक क्षमता नोंदवली आहे.

बिहार मध्ये सरकारी शाळांत प्राथमिक शिक्षण बोली भाषांत मिळावं अशी तरतूद आहे.
महाराष्ट्रातही असं व्हावं असं शिक्षणतज्ज्ञांचं म्हणणं आहे.

>>> आपण जी फोडणीची पोळी करतो तिला काही भागात माणिकपैंजण म्हणतात . >>>> हे म्हणजे मढ्याला साजशृंगार केल्यासारखं वाटतंय.

असं म्हणू नका हो प्लीज ! आमच्या घरी मी सोडून इतर सर्वांना पोळ्यांचा कुस्करा आवडतो. आणि मला वाळलेल्या पोळ्यांचे तुकडे अतिऽशय आवडतात.

रत्नागिरीत पर्‍याचा उल्लेख ऐकला आहे. >>> माहेरी हा शब्द वापरतात कारण आमचा रत्नागिरी जिल्हा, त्यालाच सासरी देवगडकडे वहाळ म्हणतात. तळकोकणात अजून काय म्हणतात माहीती नाही. देवगड अगदीच तळकोकणात वाटत नाही मला.

>>> आपण जी फोडणीची पोळी करतो तिला काही भागात माणिकपैंजण म्हणतात
मायबोलीवरच ‘मनोहर’ हे नावही वाचलंय.

आम्ही फोडणीच्या पोळीला 'तुकडे' म्हणतो. बरेचदा रविवारी सकाळी 'तुकडे' करायचे. Happy माणिकपैंजण एका नातलगांच्या घरी ऐकलं आहे. फक्त नावामुळे ताज्या पोळ्यांचेच तळून वगैरे वाटले एकदम, तेच कुस्करा उगाच जास्त शिळ्या पोळ्यांचा वाटतो. मैत्रिणीकडे कुस्करा म्हणायचे. हे सगळे एकाच गावात राहणारे लोक. 'तुकडे' हिट आयटम होता सगळीकडेच.

>>> आहे मनोहर तरी वाटते फोडणीचे?
लोल हो!
'मनहर उधास' हे नाव मुळात 'मनोहर उदास'च आहे असंही सांगून द्यायला हरकत नाही लगे हाथों! Proud

आम्हीही फक्त 'तुकडे' म्हणतो, त्या पार्श्वभूमीवर माणिकपैंजण म्हणजे अगदी उच्च वाटले. Proud
चपातीच्या तुकड्यांपेक्षाही शिळ्या भाकरीच्या तुकड्यांना जास्त मागणी असते.

आहे मनोहर तरी वाटते फोडणीचे? <<< Lol

>>> आम्हीही फक्त 'तुकडे' म्हणतो, त्या पार्श्वभूमीवर माणिकपैंजण म्हणजे अगदी
अगदी 'शाही तुकडा'च म्हणा ना! Proud

Pages