मराठी चित्रपट कसा वाटला - २

Submitted by ऋन्मेऽऽष on 13 May, 2025 - 13:06

आपल्या मराठी चित्रपटांवर चर्चा करायला हा मराठमोळा धागा

आधीचा धागा इथे बघू शकता
https://www.maayboli.com/node/74623

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी ही कथा/ कादंबरी बर्‍याच वर्षांपूर्वी वाचली होती. त्यामुळे चित्रपट बघताना कथानक माहीती होतं. सुदैवाने कथानकाला धरून केलेला चित्रपट आहे.

खुप सुंदर चित्रपट आहे. शेवटी आई जे बोलते ते विचार करण्याजोगे अहे. आज सगळ्याच नात्यांमध्ये तीच परिस्थिती आहे. सगळे कोरडे आणि सोपे.

@ माझे मन हो बरोबर तोच चित्रपट.

@ शर्मिला, अगदी बरोबर मलाही ते वातावरण भावलं. मी स्वतः नागपुरात राहायचे, ते कर्मठ वातावरण आणि विलक्षण पीळ असणारी माणसं आणि त्यांच्या मानापमाच्या कल्पना हे अगदी जवळुन बघितले आहे. ते अगदी हुबेहूब उतरले आहे. पण शब्दांचे उच्चार मात्र खटकले. हिक् बसणे हा शब्द प्रयोग मी ही ऐकला/वापरला आहे. पण आपण हिक् म्हणतो त्याऐवजी आंद्याची आई हिक्क म्हणते. बाप्पा ऐवजी बापा म्हणते. एकंदरच नागपुरातील बोलीला जो एक विशिष्ट हेल असतो तो कुणालाच पकडता आलेला नाही.
@अनया, कुठल्या कादंबरीवर आधारित आहे हा चित्रपट?

@ साधना, हो मला पण विचार करण्याजोगा वाटला तो मुद्दा.

'भेट' माझा अतिशय आवडता चित्रपट आहे Happy
सगळे संवाद अगदी सहज आहेत. अतुल कुलकर्णीची दुसरी बायको (तिचं नाव विसरले) सावत्र मुलाशी सहजतेने वागते-बोलते. उगाचच अति प्रेमळपणाही नाही आणि कठोरही नाही. सख्खी आई जशी वागेल तशीच वागते. आजीचं काम तर किती छान केलं आहे दीपा श्रीराम यांनी. आजी अशीच असते.
उन्हाळ्याची सुट्टी दाखवली आहे तेव्हा रस्त्यावर माठ विकणारी हातगाडी दिसते. तेही सहज दृश्य आहे. 'बघा, बघा, माठ विकतायत' असं बटबटीतपणे दाखवलेलं नाही.
नागपुरी बोलीतले बारकावे अर्थात मला कळले नाहीत, पण ऐकायला छान वाटले होते संवाद.

स्वतःला डान्सर म्हणवते खरी पण तिच्या नाचण्यात कुठेही नजाकत नाही. तिला नाचता येतं ह्यावरही विश्वास ठेववत नाही.>>
फुलवन्ती मधले डान्स चान्गले आहेत पण प्रांमाच्या लावणीच्या अदा, नजाकत हे सगळ क्रुत्रीम वाटत..समरसुन केलय अस वाटत नाही..८ बिटवर स्टेप केल्यासारख.. तीला अभिनय अजिबातच जमत नाही.. लावणीबाबत अम्रुता अनबीटेबल आहे, सोनाली ने पण "अप्सरा "छान केली आहे.

बोलीबाबत माहित नाही कारण मुळ बोलीशी परिचय नाही. वरवर सगळे गुडीगुडी दिसत असताना हिला बरी नवर्‍याने परवानगी दिली हा दोन्ही भावांचा सुर बरेच काही सांगतो.

मुलगा व नवरा चक्का म्हणतात, आईच्या तोंडी प्रत्येक वेळेस मला छक्का ऐकु आले Happy

इथे एका लिंकवर क्लिक केल्याने हा खेळ सावल्यांचा फीड मधे आला. लहान असताना प्रचंड भीती वाटलेली म्हणून बघायला सुरूवात केली तर...

आशा काळे!
काय ते लाजणं, काय ते लाडात येणं, काय ते गावरान दिसणं.
अरारारा.

काशिनाथ घाणेकरांचं कौतुक एव्हढं ऐकलेलं. पण एखादा म्हातारा बोलतो तसे संवाद. मजा आणली ती राजा गोसावींनी.
पुढे आशा काळेच्या अवीट अभिनयाचा वीट येऊन बंद केला.
अवीट = वीट नसलेला = दगड.

@साधना,
बोलीबाबत माहित नाही कारण मुळ बोलीशी परिचय नाही>> .
लग्न चित्रपट बघितला आहेस का?
त्यात वऱ्हाडी ग्रामीण बोलीभाषा , टोन आहे.
नागपूर शहर असले तरी त्यांच्या भाषेत पण ती लकब असते.
माझ्या माहेरचे पश्चिम महाराष्ट्रात स्थाईक होऊन दोन दशके उलटली, तरी त्याच टोन मधे बोलतात. (भावजय पुणेरी बोलते कारण ती ह्या भागातली आहे)
भेट सिनेमात निदान पुरुषांच्या बोलण्यात तरी ती लकब असायला हवी होती.

' भेट' चित्रपट पाहिला. आवडला .. छान चित्रपट सुचवल्याबद्दल धन्यवाद पर्णिका.!

अस्मिता, तू पाहिलास का ' ध्यानीमनी' चित्रपट..? तू बंद केलास चित्रपट आणि मी सुरू करून पाहिला . छान आहे .. कदाचित आवडेल तुला..! सायको- थ्रिलर सोबत हदयस्पर्शी कथानक आहे .. सगळ्या कलाकारांचा अभिनय सुंदर आहे. विशेषतः अश्विनी भावे आणि महेश मांजरेकर ह्यांचा अभिनय..!

पहिल्याच प्रसंगात अश्विनी भावे नवऱ्याला ( महेश मांजरेकर) इतक्या सूचना करते आणि इतकी बडबड करते की, मला ऐकून कंटाळा आला होता.. बिचारा नवरा शांत ऐकून घेतो.. चित्रपट पुढे सरकत जातो तसं तिच्या बडबडीचा अर्थ लागत जातो.

कुलकर्णी चौकातला देशपांडे सिनेमा काल पाहिला. १ सीन रिक्षाचा (कंजूस नवरा २ रुपये रिक्षवाल्याकडे सुटे नाहीत तर २ रुपयाची रिक्षा अशीच फिरवायला सांगतो) पाहूनच उत्सुकता वाटल्याने सिनेमा शोधून पाहिला. हातळणी & विषय चांगले आहेत. काम पण छान झालेय सर्वांचे, विशेष सई च्या मुलाचे. त्याला पाहून भरून येते, शेवट फार आवडला.

रूपाली, "ध्यानीमनी" नंतर बघू म्हणत राहून गेला होता, आता तूही चांगला म्हंटल्याने बघेन. Happy विसरून गेले होते.

... सासूबाई ... सुनबाई हा निर्मिती सावंत आणि प्रार्थना बेहरे यांची भूमीका असलेला चित्रपट पाहिला. खूप आवडला. दोघींचा अभिनय, केदार शिंदे यांचे दिग्दर्शन छान जमले आहे. कथाही मला खूप आवडली, पण शेवट सुखांत नसल्यामुळे कदाचित काहींना आवडणार नाही.

कुठे बघायला मिळेल?>>> भारतातल्या प्राईम वर आहे.

ईथे वाचून युट्युब वर ध्यानी मनी पाहिला. खूप छान आहे, शेवटाला चुटपूट लागली. मला फार वाटत होते की १ १० वर्षांचा मुलगा दत्तक घेऊन रिप्लेस करून तिला बरे करावे.

आधी तुंबाड आला. मग तुंबाडची मंजुळा.
तुंबाड नावाने तुंबड्या भरतात हे सिद्ध झाले की तुंबाडपटांंची रांग लागेल.

तुंबाडची मैना
तुंबाडचा बापू
तुंबाडची भावजय
तुंबाडची सासू
तुंबाडचा भाऊ
तुंबाडची सूनबाई
तुंबाडचा जावई
.,
,
,
,
आपला नंबर कधी याची वाट बघत बसलेले खोत.

तुंबाड २ सुद्धा शुद्ध कॅश ग्रॅब असेल अशी शंका येत आहे. राही अनिल बर्वे ह्या सिनेमाशी संबंधित नाही हे समजले. प्रोजेक्ट सोहम शाह म्हणजे त्यातल्या ॲक्टरचा आहे.

निर्माता पण होता तो. त्याने पैसा ओतला. फ्लॉप गेला. पण प्रसिद्धी मिळाली. आता त्याला नुकसान भरपाई मिळावी ही अपेक्षा असणार.
दिग्दर्शकाला काय होतंय नको म्हणायला.

सोहम शहा ची मुलाखत मध्यंतरी बघितलेली. पॅशनेट आणि छान बोललेला. तुंबाड मला प्रचंड आवडलेला, त्यामुळे पुढे काही आला तर बघेनच.

Pages