मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 April, 2025 - 14:06

मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का?

हो, जोरदार चर्चा चालू आहे
बातम्या बघत असाल तर कल्पना असेलच.

१) असे झाल्यास सर्वसामान्य जनता ज्यांना राजकारणात फारसा रस नसतो त्यांचे मत काय असेल हे जाणून घ्यायला कुठल्या बातम्या बघायची किंवा सर्व्हे करायची गरज नाही.
पण तरी या व्हिडिओ मधील मतेच कानावर पडतील याची खात्री आहे.

https://youtu.be/rtSd_uMpi1I?si=tSmz4uAb7xdlO5hD

२) राज ठाकरे, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे अशा दोन-तीन गटात विखुरले गेलेल्या जुन्या शिवसैनिकांना, बाळासाहेबांना मानणाऱ्या जुन्या मतदारांना, त्यांच्या घरातील नव्या पिढीला सुद्धा या दोन भावांनी एकत्र यावे असे आतून कुठेतरी वाटत असावे हे खात्रीने सांगू शकतो.

३) इकडचे तिकडचे फुटलेले सारे मावळे शिंदे ठाकरे एकत्र होण्याची शक्यता आहे. कारण भाजपला घेऊन सध्या सारेच नाराज आहेत.

४) गेले काही वर्षे आपण महाराष्ट्रात अगदी कोणाचीही… कोणाशीही आणि केव्हाही युती झालेली बघितली आहे. त्यामुळे या दोघांना एकत्र यायला लाजायची बिलकुल गरज पडणार नाही.

५) सध्या मराठी विरुद्ध हिंदी मुद्दा जोरदार चालू आहे. अशा पार्श्वभूमीवर हे मराठीचा मुद्दा घेऊन एकत्र आले तर नक्कीच भरघोस पाठिंबा मिळणार याची खात्री वाटते. कारण आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात शिकायला पाठवणाऱ्या मराठी माणसांकडे तसाही दुसरा कुठला पर्याय दिसत नाही. राजकीय इच्छाशक्ती शिवाय आपली मराठी वाचू शकत नाही हे वास्तव आहे. त्यामुळे यांनी ही वेळ साधली तर तो मास्टरस्ट्रोक ठरेल.

काय बोलता?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उधोबा हा एक विश्वासघातकी माणूस आहे ह्याचा पुरेपूर अनुभव असलेल्या राज ठाकरेने आम्ही राजकीय दृष्ट्या एकत्र येणार नाही असे वारंवार स्पष्ट करूनही ते एकत्र येणारच या आशेवर जगणार्या लोकांना शुभेच्छा.
आणि मुंबईचे दुर्योधन दु:शासन एकत्र येणार म्हणून आनंदी आनंद गडे म्हणत नाचणारे हे "तटस्थ" पत्रकार होते. जरी ह्या दुक्कलीने आमचे राजकीय सख्य होणार नाही असे सांगितले तरी ते होणार म्हणून अनेक पत्रकार उल्हासित झालेले होते हे दाखवून देत आहे.
मुंबई महापालिका जिंकायची असेल तर हिंदीला शिव्या घालणे, भय्या, गुजराथी लोकांना (शाब्दिक आणि खर्‍या) लाथा घालणे हे महाग पडणार आहे.
मुंबईत बिगर मराठी लोकांची संख्या प्रचंड आहे. कितीही मराठी प्रेमाचे कढ आणले तरी ही वस्तुस्थिती लपणार नाही.

Pages