मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
हो, जोरदार चर्चा चालू आहे
बातम्या बघत असाल तर कल्पना असेलच.
१) असे झाल्यास सर्वसामान्य जनता ज्यांना राजकारणात फारसा रस नसतो त्यांचे मत काय असेल हे जाणून घ्यायला कुठल्या बातम्या बघायची किंवा सर्व्हे करायची गरज नाही.
पण तरी या व्हिडिओ मधील मतेच कानावर पडतील याची खात्री आहे.
https://youtu.be/rtSd_uMpi1I?si=tSmz4uAb7xdlO5hD
२) राज ठाकरे, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे अशा दोन-तीन गटात विखुरले गेलेल्या जुन्या शिवसैनिकांना, बाळासाहेबांना मानणाऱ्या जुन्या मतदारांना, त्यांच्या घरातील नव्या पिढीला सुद्धा या दोन भावांनी एकत्र यावे असे आतून कुठेतरी वाटत असावे हे खात्रीने सांगू शकतो.
३) इकडचे तिकडचे फुटलेले सारे मावळे शिंदे ठाकरे एकत्र होण्याची शक्यता आहे. कारण भाजपला घेऊन सध्या सारेच नाराज आहेत.
४) गेले काही वर्षे आपण महाराष्ट्रात अगदी कोणाचीही… कोणाशीही आणि केव्हाही युती झालेली बघितली आहे. त्यामुळे या दोघांना एकत्र यायला लाजायची बिलकुल गरज पडणार नाही.
५) सध्या मराठी विरुद्ध हिंदी मुद्दा जोरदार चालू आहे. अशा पार्श्वभूमीवर हे मराठीचा मुद्दा घेऊन एकत्र आले तर नक्कीच भरघोस पाठिंबा मिळणार याची खात्री वाटते. कारण आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात शिकायला पाठवणाऱ्या मराठी माणसांकडे तसाही दुसरा कुठला पर्याय दिसत नाही. राजकीय इच्छाशक्ती शिवाय आपली मराठी वाचू शकत नाही हे वास्तव आहे. त्यामुळे यांनी ही वेळ साधली तर तो मास्टरस्ट्रोक ठरेल.
काय बोलता?
माझ्या आंबोली गावात प्राथमिक
माझ्या आंबोली गावात प्राथमिक शिक्षण देणार्या (१ ली ते चौथी) तिन सरकारी शाळा आहेत. मुख्य गावठण वाडीतल्या शाळेत माझ्या एका चुलत भावाचा मुलगा चौथीत आहे, वर्गात ७ मुले आहेत. दुसर्या भावाचा मुलगा दुसरीत आहे, वर्गात ५ मुले आहेत. तिसरीच्या वर्गात एकच मुलगा होता, आज अजुन एक मुलगी दाखल झाली, त्यामुळे पटसंख्या २ झाली. पहिलीत यंदा पाच जणांनी प्रवेश घेतलाय. पुढच्या वर्षी पहिलीत प्रवेश घेणारे एकही मुल नसणार कारण मोठ्या शिशुवर्गात यंदा कोणीही नाही.
बारा वाड्या असलेल्या गावात सातवीपर्यंत एक शाळा आहे व दहावीपर्यत आंबोली व गेळे गाव मिळुन एकच शाळा आंबोलीत आहे. सातवीपर्यंतच्या शाळेतल्या मुलांना पुढील तिन वर्षे बाजारवाडीतल्या शाळेत यावे लागते. दोन शाळांतले अंतर ८ किमी आहे. आंबोली खुप मोठे गाव आहे.
गेळे गावातल्या मुलांना शाळेसाठी आंण्बोलीत यावे लागते. निवासी एस्टी आहे जी राती गेळ्यात मुक्काम करुन सकाळी शाळेच्या वेळेत आंबोलीत येते. दोन गावांची मुले येत असुनही पाचवी ते दहावीपर्यण्तची एकुण पटसंख्या १५४ आहे. ३०-३५ ही प्रत्येक वर्गाची सरासरी पटसंख्या आहे.
गावात एक खासगी मिलिटरी शाळा आहे जी पुर्ण निवासी आहे. एक निवासी+डे स्कुलर आहे आणि एक फक्त डे स्कुलर आहे. या खासगी शाळा आहेत. या शाळांमध्ये व्यवस्थित पटसंख्या आहे आणि गावाबाहेरील मुलेही शिकायला येतात. ह्या तिनही शाळा एंग्रजी माध्यमाच्या आहेत.
मराठी माध्यम + लक्ष न देणारे शिक्षक ह्यामुळे लोक मुलांना सरकारी शाळेत घालु इच्छीत नाहीत. ज्यांना खासगी फी परवडत नाही तेच सरकारीत आहेत.
मराठीसाठी गळा काढणारे सरकार व पक्ष अशा सरकारी शाळांसाठी काय करणार आहे???
साधना,
साधना,
बारमधील बेवडा, सोसायटीचा मराठी भाषिक गुरखा येथपासून ते मोठमोठ्या कंपन्यांमधील अधिकारी, छोटे व्यावसायिक हे सगळे हिंदी, इंग्रजी बोलतात. लोक पाळीव कुत्र्यांची नावे इंग्रजी ठेवतात, पाळीव कुत्र्यांशी इंग्रजी बोलतात. मुळंबाळांचे तर बोलायलाच नको. "मी एक्सट्रीम कोशीष केली मम्मा, पण पेपर वेळेत नाही फिनिश झाला" हे वाक्य ऐकले आहे.
प्रकरण इतके पुढचे आहे की हा जवळपास विषयच होऊ शकत नाही. निव्वळ मराठी बोलून बहुसंख्य व्यवसायांमध्ये यश मिळवणे अशक्य झाले आहे.
मराठी माणूस आणि मराठी भाषा याची दोन्ही सेना गफलत / गल्लत करत आहेत. मराठी माणसाचा फायदा मराठी भाषा जिवंत व वाहती राहण्याशी निगडित नाहीच आहे (काही विशिष्ट भाषाविषयक व्यवसाय सोडून). मराठी माणसाच्या फायद्यासाठी काही करायचे असल्यास मराठी भाषेची सक्ती करणे हा उपायच नाही. त्यासाठी खास मराठी माणसांनाच काम देणारे व्यवसाय निर्माण करायला हवेत. (हे भाजप करते असे मुळीच म्हणत नाहीये).
उठा पक्षाच्या प्रवक्त्या आणी
उठा पक्षाच्या प्रवक्त्या आणी खासदार चतुर्वेदी ताई म्हणतात मला लॅन्गेवेज शिकायचाच प्रॉब्लेम आहे त्यामूळे मला मराठी येते पण निट बोलता येत नाही मग पत्रकार त्या केडीयाला कशाला फैलावर घेत होते? तोही अगदी तेच बोलत होता की मला मराठी येत पण मला चुकिच मराठी बोलायच नाही.
मनसे एका हिन्दी भाषिक व्यावसियाकाला थोबडवल तेच त्याच्याच मचावर पुर्ण भाषण हिन्दित करणार्या जावेद अख्तरला मात्र पायघड्या घातल्या? का? जावेद अख्तर स्क्रिप्ट रायटिन्गचा व्यवसायच करतात ना?
काही तर आपल उगाच खळखट्ट्याक करायच आणी स्वत्;च नसलेल महत्व वाढुन घ्यायच.
जावेद अख्तरना बोलवून मनसेने
जावेद अख्तरना बोलवून मनसेने खूप पोक्तपणा दाखवला आहे. त्यांचं भाषण ऐकलं आहेस का?
मनसे हे करत असेल तर त्यांना किमान प्रश्न समजतोय, आणि खुल्याविचारांनी ते त्याकडे बघत आहेत. मला जावेद अख्तर त्यांचं हिंदी/ उर्दु मधुन मराठी व्यासपीठावरील भाषण ऐकुन फार आनंद झालेला. मनसे आवडत नाही, राज ठाकर्यांचे राजकीय विचार आवडत नाहीत, पण हुषार माणुस आहे.
फडणवीसांचे विचार बेगडी आणि माणूस म्हणून कोते आणि फक्त पाताळयंत्री इतकंच मला अद्याप दिसलेलं आहे.
फडणवीसांचे विचार बेगडी आणि
फडणवीसांचे विचार बेगडी आणि माणूस म्हणून कोते आणि फक्त पाताळयंत्री इतकंच मला अद्याप दिसलेलं आहे.>>>> तु जे फडवणिसाबद्दल बोलतोय ते मला दोन्ही ठाकरेबद्दल वाटत...राज याना निदान थोडाफार तरी वैचारिक वारसा बाळासाहेबाची भाषणशैली आहे, कलेवर प्रेम आहे.बाकी ते वोट्स मधे का ट्रान्सपायर होत नाही ह्याच आत्मपरिक्षण ते कधिच करत नाहीत.
उद्धव याना वाटत की टोमणे मारले , ट ला फ जोडल की झाल भाषण...आपण अगदी बाळासाहेबासारखच बोलतोय पण वास्तव वेगळच आहे.
खरतर मुबै बाहेर त्याना कुणीही विचारत नाही...ही फॅक्ट ना ते स्विकारतायत ना त्याचे चाहते मराठी मिडिया.
एवढ मराठी मराठी करतात काय केलय यानी मराठीसाठी किवा मुबैच्या विकासासाठी? स्वतःचा विकास मात्र उत्तम करुन घेतला..एकाच्या दोन मातोश्री झाल्या. दुसर्याने पण स्वत;साठी दोन दोन निवासी सन्कुल बान्धले.
जावेद अख्तर उत्तम वक्ते आहेत हे अनेक वेळा सिद्ध झालय पण मुद्दा तो नाहिच आहे..
उद्धव, राज आणि बाळ ठाकरे
उद्धव, राज आणि बाळ ठाकरे तिघेही भ्रष्टाचारी आणि दूरदृष्टी नसलेले होते/ आहेत.
>>महाराष्ट्रात हिंदीला पंजाबी
>>महाराष्ट्रात हिंदीला पंजाबी, बंगाली वगैरे इतर भारतीय भाषांपैकी एक असेच वागवले पाहिजे. इतर काही खास स्टेटस द्यायची गरज नाही. पाचवीपासून सुद्धा हिंदी शिकवायला नको. आठवीपासून तिसरी भाषा म्हणून, संस्कृत, फ्रेंच वगैरेंसारखाच एक ऑप्शन म्हणून ठेवले पाहिजे. महाराष्ट्रात सगळ्यांना हिंदी येतेच किंवा यायला पाहिजे अशी जी इमेज केली जात्येय तिला तडा दिला पाहिजे.इतर काही नाही तरी मराठी लोकांनी "हिंदी येत नाही. मराठीत बोला" असं न लाजता ठणकावून बोललं पाहिजे. << +१
मूळात त्रिभाषा सूत्र देशभरात अंमलात आणायचं असेल तर महाराष्ट्रात फक्त हिंदीच का म्हणुन गळी उतरवली जातेय हा प्रश्न विचारला गेला पाहिजे. महाराष्ट्राच्या बाबतीत तर हिंदीची सक्ती अजिबात नको, कारण ती इथे तशीहि बोलली जाते. परंतु सक्तीच करायची असेल तर उत्तरेकडुन ज्या राज्यांतुन महाराष्ट्रात लोंढे येत आहेत त्या राज्यांमधे त्रिभाषा सूत्रांतर्गत मराठी सक्तीची करा असा आग्रह महाराष्ट्रातल्या नेत्यांनी करण्याची वेळ आलेली आहे..
हे असं केंद्र सरकारला ठणकाउन सांगण्याची हिंम्मत फडणविसांकडे नाहि. मोदि-शहांनी यांना "जंप" म्हटलं कि हे हात जोडुन विचारणार "हौ हाय". यामुळे सध्या सगळी मदार ठाकरे बंधुंवर आहे...
आपण मायबोलीवर चर्चा का करतो
आपण मायबोलीवर चर्चा का करतो त्यामागचा हेतू काय असतो ?
म्हणजे इथल्या चर्चा वाचून समाजात बदल व्हावेत हा हेतू असतो कि आपले कन्सेप्ट्स क्लिअर व्हावेत हा असतो ?
सिरीयसली विचारलंय. कसलाही सार्कजम नाही यात.
एखादं लहान मूल किती भाषा शिकू शकतं याबद्दलचं शास्त्रीय संशोधन उपलब्ध आहे का ?
एकमेकांशी सारखेपणा असलेल्या दोन भाषा कधी शिकाव्यात ? अनेक भाषा शिकण्यासाठी काय अटी असल्या पाहीजेत ?
मातृभाषेव्यतिरिक्त अन्य भाषा शिकण्यामागचा उद्देश काय (असायला हवा) याबद्दल सरकारने काही अभ्यास केला आहे का ?
नरेंद्र जाधवांच्या
नरेंद्र जाधवांच्या नेतृत्वाखाली नविन समिती गठीत केली आहे, असं वाचनांत आलं. जाधव योग्य माणुस आहे, या समितीवर दीपक पवारांना सामिल करुन घेण्याची मागणी केली जावी असं मला वाटतं...
मध्यंतरी दाक्षिणात्य
राज सर, नरेंद्र जाधव अर्थतज्ञ आहेत ना ? भाषा विषयात त्यांचा अधिकार आहे का ? भाषा सोडा, शिक्षण या विषयातले ते तज्ञ आहेत का ?
एका ठिकाणी ऐकलं कि सारख्या भाषा असल्या तर गोंधळ उडू शकतो मुलांचा. हिंदी आणि मराठीत अनेक शब्द सारखे आहेत पण अर्थ वेगळे आहेत.उदा शिक्षा, चेष्टा. त्यामुळं मूल एका भाषेत प्राविण्य मिळवायच्या ऐवजी गोंधळलेलं राहू शकतं.
मध्यंतरी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीबद्दल चर्चा चालू असताना अर्थकारणाचा मुद्दा काही जणांनी मांडला होता. मला ते पटलं.
राज ठाकरे अनेकदा निसरड्या आणि भ्रामक भूमिका घेतात, पण म्हणून ते एकदम रद्दबातल होत नाहीत. काही प्रमाणात त्यांची मतं योग्य असतात.
सक्ती नसतानाही महाराष्ट्रातली मुलं आता हान आणि मांदरीन भाषा शिकताहेत. या चिनी भाषा आहेत. कोरियन भाषेचे वर्ग आहेत. या देशात इंग्रजी कमी बोलली जाते. चिनी सरकारने पूर्वी कट्टरतावादी भूमिका घेतल्याने भारतातल्या इंग्रजी येणार्यांना जगभरात पसंती मिळाली. हे लक्षात आल्यावर आता चीनने इंग्रजी भाषा शिकवण्याचा धडाका लावला आहे.
पण मधल्या काळात चीनने एव्हढी प्रगती केली कि जगभरातले निम्म्याहून जास्त उत्पादन चीनमधे किंवा चिनी बोलल्या जाणार्या देशात होते. अजूनही इथे इंग्रजीचा प्रसार नसल्याने जर करीयर करायची तर चिनी शिकण्याची गरज निर्माण झाली आहे.
भाषा शिकण्याचा एक उद्देश गरज आहे.
दुसरा स्वान्तसुखाय. काही जणांना जिवंत असेपर्यंत जास्तीत जास्त भाषा शिकाव्या असे वाटते. यामागे व्यापक विचार आहे. पर्यटनाची आवड असलेल्यांना अनेक भाषा येणे वरदान असते.
भाषांचा अभ्यास इतिहास सांगतो म्हणूनही काही जण भाषा शिकतात.
आजच्या काळात गरज असेल तर लोक भाषा शिकतातच. मग सक्ती का करावी ? भारत स्वतंत्र होताना यावर साधकबाधक चर्चा झाली असेल. ती काय आहे हे जाणून घ्यायची इच्छा आहे.
>>एखादं लहान मूल किती भाषा
>>एखादं लहान मूल किती भाषा शिकू शकतं याबद्दलचं शास्त्रीय संशोधन उपलब्ध आहे का ?<<
व्हाय रिइन्वेंट द व्हिल? किंवा आमच्या भाषेत, डोंट ट्राय टु बॉय्ल द ओशन..
मी दहावी पर्यंत मराठी माध्यमातुन शिकलो. हिंदि, इंग्रजी बहुतेक पाचवी पासुन. पुढे काहिहि अडलं नाहि. फक्त ११-१२वीत सगळे विषय धाडकन इंग्रजीतुन आल्याने थोडा झटका बसला पण निभावुन नेलं. इवन आत्ताची नेतेमंडळीहि यातुनच गेलेली आहेत. असं असतानाहि केवळ नॅशनल इंटिग्रेशनच्या नांवाखाली राजकिय पोळी भाजुन घेणार्यांना धडा शिकवायची वेळ आलेली आहे..
बाय्दवे, त्रिभाषा सूत्रांतर्गत महाराष्ट्रात हिंदि सक्ती करायची सुचना रघुनाथ मशेलकर यांच्या समितीने दिली होती, असं वाचलं. सिरियस्ली? मशेलकर आणि कंपनी यांचं या सुचने मागचं रॅशनाल काय असेल याची उत्सुकता लागली आहे...
>>भाषा विषयात त्यांचा अधिकार
>>भाषा विषयात त्यांचा अधिकार आहे का ? भाषा सोडा, शिक्षण या विषयातले ते तज्ञ आहेत का ?<<
समितीचा अध्यक्ष सब्जेक्ट मॅटर एक्स्पर्ट असण्याची गरज/आवश्यकता नाहि. ऑल हि हॅज टु डु इज सर्कल द वॅगन. दिपक पवारांसारखे भाषातज्ञ समितीत असावे हे याकरताच लिहिलं आहे...
>>भाषा विषयात त्यांचा अधिकार
डपो
व्हाय रिइन्वेंट द व्हिल?
व्हाय रिइन्वेंट द व्हिल? किंवा आमच्या भाषेत, डोंट ट्राय टु बॉय्ल द ओशन.. >>> काही कळलं नाही. मला माहिती हवी म्हणून विचारलं. यात रिन्व्हेन्शनचा संबंध नाही. तसं तर मग त्रिभाषा सूत्रावर आधीच ( स्वातंत्र्य मिळाल्यावर) चर्चा झालेली असताना आता ही उठाठेव का ?
राज,
राज,
हिंदीची सक्ती मागे घेतल्याचे काही दिवसांपूर्वी फडणवीसांनी सांगितल्याचे टीव्हीवर बघितले
The two government
The two government resolutions on the three-language policy were withdrawn to avoid law and order problems in Maharashtra as Shiv Sena (UBT) and MNS had threatened an agitation on July 5, state BJP president Ravindra Chavan said on Wednesday. >> अधिवेशन होतं म्हणून हा निर्णय घेतला असेही चव्हाण म्हणाले. म्हणजेच मनापासून हा निर्णय घेतलेला नाहीचे. मागल्या दाराने तो नरेंद्र नाहीतर हा नरेंद्र (जाधव), हिन्दी घुसवणार ही नक्की.
भ्रमर, हीच बातमी द्यायला आलो
भ्रमर, हीच बातमी द्यायला आलो होतो.
.
.
ह्या वग नाट्यामागचा हेतू
ह्या वग नाट्यामागचा हेतू साध्य झाल्याने जास्त खेचण्यात अर्थ नव्हता. म्हणून रद्द केला.
प्रा. दीपक पवार यांची ४
प्रा. दीपक पवार यांची ४ जुलैची फेसबुक पोस्ट
मराठीजनहो,
नरेंद्र जाधवांशी चर्चा,त्यांचं मतपरिवर्तन,त्यांच्याशी सुसंवाद,प्राथमिक शिक्षणाच्या मूलतत्वांबद्दल त्यांच्याशी चर्चा या गोष्टी अशक्य कोटीतल्या आहेत.
त्यांनी जी सुपारी घेतली आहे ती त्यांना वाजवावीच लागेल.
त्यामुळे त्यांच्या समितीला चुकूनही मान्यता देणं म्हणजे आजचं मरण उद्यावर ढकलणं आहे.
त्यामुळे त्यांच्या समितीत कोण असेल यावर विचार करून कालापव्यय करू नका.
हे बाबासाहेबांचं नाव घेणारे आत्मरत अभिजनांचे प्रवक्ते आहेत.
ते ज्याला गरज आहे आणि ज्याचा धंदा नीट चाललाय अशांच्या तैनाती फौजेत असतात.
बाबासाहेबांचं नाव घेतल्याशिवाय अधिमान्यता मिळत नाही म्हणून ते वापरतात इतकंच.
अशा व्यावसायिक अभिजनांचं कठोर मूल्यमापन करणं हे साचलेल्या दलित चळवळीला मोकळा श्वास घेता यावं यासाठीही गरजेचं आहे.
जाधवांची नेमणूकच पुढे मागे गरज पडली तर जातीचं कार्ड खेळण्यासाठी आहे.
त्यामुळे अशा अस्तनीतल्या निखाऱ्यांपासून सावध राहा.
मराठीची जी चळवळ आपण सारे उभी करू पाहतोय,ती सध्याच्या मराठीवाद्यांप्रमाणे प्रतीकात्मक आणि प्रतिक्रियात्मक नाही.
आंबेडकरी मराठी समाजाच्या आकांक्षा हा या मराठीकारणाचा अविभाज्य भाग आहे.
ही दीर्घकालीन लढाई आहे.
त्यात जाधव समितीसारखे छोटेमोठे अडथळे आणले जातीलच.आपण सावध राहूया.
एक प्रगल्भ भाषिक समाज म्हणून ओळख प्रस्थापित होण्याच्या काळात शांतपणे,ठामपणे मार्गक्रमणा करूया.
आपापल्या समाजमाध्यमांवरून मुख्यमंत्र्यांना,नरेंद्र जाधवांना टॅग करून ' आम्हाला ही समिती नको आहे' असं स्पष्टपणे लिहा.
उद्याच्या विजयी मेळाव्यातही जाधव समितीवर बहिष्काराचा निर्णय घ्यावा अशी विनंती आम्ही राजकीय पक्षांना करणार आहोत.
अशा भातुकलीच्या समित्या हे काही जणांच्या वैयक्तिक उत्कर्षाचं साधन होऊ शकेल,पण त्यात महाराष्ट्राचं दीर्घकालीन अहित दडवलं गेलं आहे.
त्यामुळे जाधवांच्या कमावलेल्या वक्तृत्वगुणांवर न भाळता त्यांना टोकदार प्रश्न विचारा.
त्यांच्यात अजूनही थोडं शहाणपण,सद्सद्विवेक शिल्लक असेल)ज्याबद्दल मला शंकाच आहे) तर ते स्वत:च राजीनामा देतील.पण त्यांची गणितं बिघडतील वैयक्तिक उत्कर्षाची.
मराठी भाषा,मराठी शाळा,महाराष्ट्र या गोष्टी जाधव आणि त्यांच्या सध्याच्या बॉसेसपेक्षा जास्त महत्त्वाच्या आहेत.
जाधवांनी किंवा परिवारातल्या लोकांनी त्यांच्या जातीचं कार्ड वापरलं तर त्यांना फक्त एवढंच सांगा- बाबासाहेबांचा शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन पक्ष संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात दिल्लीश्वरांच्या विरोधात जाऊन उतरला होता आणि बाबासाहेबांनी स्पष्टपणे मुंबई महाराष्ट्राचीच आहे असं साधार प्रतिपादन केलं होतं.
तुम्ही याबाबतीत बाबासाहेबांचे वारसदार आहात का एवढ्या एकाच प्रश्नाचं उत्तर जाधवांना मागूया म्हणजे खरंखोटं आपोआप होऊन जाईल.
७ जुलैला सकाळी १० वाजल्यापासून आझाद मैदानातल्या धरणे आंदोलनात भेटूया.
या म्हणजे याच.
आपण एका राक्षसी ताकदीच्या वाळवीच्या बहराशी लढतो आहोत.
पानिपताची पुनरावृत्ती होऊ द्यायची नाही एवढं स्वत:ला,एकमेकांना बजावूया.
नव्या मराठीकारणाची मुहूर्तमेढ रोवूया.
जय मराठी ! जय महाराष्ट्र !
काल थिंक बँक या यु ट्यूब
काल थिंक बँक या यु ट्यूब चॅनेलवर शैलेंद्र परांजपे या ज्येष्ठ पत्रकाराची मुलाखत होती. मी त्यांचं नाव पहिल्यांदाच ऐकलं. आपल्याला कधी कोणी बोलवत नाही , आज बोलवलंय तर किती बोलू किती नको, असं झाल्यासारखे बोलत सुटले होते.
त्यांचे सगळेच मुद्दे पटले असं नाही. पण त्यातले जे इंटरेस्टिंग वाटले ते इथे लिहितो.
बेफिकीर यांनी इथे मांडलेलीच थियरी त्यांनी सांगितली. फडणवीसांना आता राज ठाकरेंना हवा द्यायची आहे. मराठी हिंदीचा मुद्दा बरंच नियोजन आणि विचार करून आणलेला आहे. कार्यालयांत, व्यवसायाच्या ठिकाणी मराठी बोलायला नकार देणार्यांचं मनसे आंदोलन जानेवारीत सुरू झालं. फेब्रुवारीत राज ठाकरेंनी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला. राज ठाकरे - फडणवीस दोघांची भेट झाली.
पहिलीपासून हिंदी सक्तीचे निर्णय घेतले तरी त्यासाठी पाठ्यपुस्तकच तयार केलं नाही. यावरून हा निर्णय मागे घेण्यासाठीच घेतला होता, असं त्यांचं म्हणणं आहे.
ते खरं मानलं तर फडणवीस किती पाताळयंत्री आणि कपटी आहे, तेच सिद्ध होतं. खोटं मानलं तर फडणवीस .३ सरकारचा कारभार किती भोंगळ आहे, ते दिसून येतं आणि त्यात काही नवल आहे. तो इतर बाबतींतही दिसलाच आहे.
पण परांजप्यांच्या मते राज ठाकरेंना हवा देण्याचं कारण एकनाथ शिंदेंंचं महत्त्व कमी करणे हे आहे. भाजपची स्पर्धा आता मित्रपक्षांशी आहे, असं रवींद्र चव्हाण म्हणाल्याचं ते सांगतात. ठाकरे बंधू एकत्र आले, तरी मुंबई व इतर मनपा जिंकणे भाजपला कठीण नाही.
अंजू - हे तुमच्यासाठी - भाजप मनसे शी कधीही युती करणार नाही. कारण यांचे बिहार , युपीवाल्यांच्या विरोधात केलेले उद्योग. त्यामुळेच राज ठाकरेंनी विधानसभेला बिनशर्त पाठिंबा देऊनही भाजपने त्यावर काहीच सकारात्मक संकेत दिले नाहीत.
ठाकरे बंधू एकत्र आले, तर महाविकास आघाडीतून शिवसेना तरी कमी होईल किंवा काँग्रेस तरी. हिंदुत्ववादी आणि परप्रांतीयांना मारहाण करणारे म्हणून मनसेला काँग्रेस कधीही जवळ करणार नाही. २०१९ सालीही उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्ववादामुळे काँग्रेसने महा आघाडी करायला भरपूर वेळ घेतला होता.
>>> बेफिकीर यांनी इथे
>>> बेफिकीर यांनी इथे मांडलेलीच थियरी त्यांनी सांगितली.
मानधन मिळायला हवे मला!
>>> कपटी, पाताळयंत्री
राजकारण आहे. सोयरीक जमवण्याची बैठक नव्हे. मोठ्या पवारांना उद्देशून ही विशेषणे यापुढे वापरली जावीत अशी फक्त नम्र विनंती! हुषारी आणि विश्वासघात, हुषारी आणि तोडफोड, नासधूस, मारहाण यातील फरक पवारांना व दोन्ही सेनांना कळला आहे. येथील काहींना हे वास्तव मान्य करायचे नाही. तरीही, दोन्ही सेना जिंकल्या तर मराठी माणसाने मान ठेवला असे म्हणता येईल.
>>> ठाकरे बंधू एकत्र आले, तर महाविकास आघाडीतून शिवसेना तरी कमी होईल किंवा काँग्रेस तरी
हे एक नवीनच, जे मी गेले दोन तीन दिवस लिहीत आहे.
The Supreme Court on Friday
The Supreme Court on Friday dismissed a plea seeking directions to the governments of Tamil Nadu, Kerala and West Bengal to implement the National Education Policy (NEP), 2020, including its three-language formula, stating that it cannot compel states to adopt a particular policy.
१२ मे २०२५ ची बातमी
राज ठाकरे यांची अफाट राजकीय
राज ठाकरे यांची अफाट राजकीय ताकद ही पत्रकारांच्या कल्पनाशक्तीतून आली आहे असे वाटते. पक्ष स्थापन झाल्यापासून त्यांना मिळणारे यश हे उत्तरोत्तर घटत आहे. सध्या शून्य ह्या आकड्यावर त्यांच्या जागा येऊन थांबलेल्या आहेत. त्याच्या खाली जाणे शक्य नाही म्हणून!
बाकी त्यांचे शिवाजी पार्कवरील मेळाव्यात होणारे नकला, टिंगल वगैरे मनोरंजक कार्यक्रम बघायला गर्दी होते. हशा टाळ्या भरपूर मिळतात. पण लोकप्रतिनिधी म्हणून मनसेचे लोक मत मिळवू शकत नाहीत.
त्यामुळे खरोखर भाजप राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना शह द्यायला उपयोग करत आहे वगैरे भाजप द्वेष्ट्या पत्रकारांचे तुणतुणे कितपत मनावर घ्यायचे हा प्रश्न आहे.
गावातल्या मराठी शाळेबद्दलचा
गावातल्या मराठी शाळेबद्दलचा प्रतिसाद वाचला. हे सगळं देवाभाऊंना माहीत नसावं. नाहीतर ही परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी नक्की काही तरी केलं असतं. आणि पहिलीपासून तिसर्या भाषेचं ओझं त्या शिक्षकांच्या आणि मुलांच्या डोक्यावर टाकलं नसतं.
कशा कशावरून आपण वाटून घ्यायचं
कशा कशावरून आपण वाटून घ्यायचं स्वत:ला
हा प्रांत तुमचा,हा आमचा
ही भाषा तुमची, ही आमची
हा धर्म तुमचा, हा आमचा
असं करता करता
आपण सगळंच वाटून घेऊ
नदी तुमची पाणी आमचं
आकाश तुमचं , सूर्य आमचा
धरा तुमची, पीक आमचं
भाषा, तुमची, राज्य आमचं
शहर तुमचं, पेठ आमची
चला हे ही नको तर
सगळं तुमचंच
फक्त तुम्ही आमचे
नाही तर सगळं आमचं
आम्ही तुमचे...
हिंदी हमारी राष्ट्रभाषा है -
हिंदी हमारी राष्ट्रभाषा है - नितीन गडकरी
हे अडाणी आहेत की खोटारडे?
समस्त मराठी पत्रकार (काही
समस्त मराठी पत्रकार (काही मोजके अपवाद वगळता) मोर जसा ढग दाटून आल्यावर पिसारा फिरवून बेभान होऊन नाचू लागतात तसे आनंंदाने नाचत होते. आशिष जाधव, प्रसन्न जोशी, मुंबई तक वरील पत्रकार, विविध भाजप द्वेष्टे विचारवंत हे सगळे "किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला" प्रकारचे राग आळवत होते. कारण काय तर राज उधोबा यांची संभाव्य युती!
पण राज ठाकरे (शून्य सीट पदरी असतानाही) आम्ही फक्त मराठीसाठी एकत्र आलो होतो. आमची राजकीय हातमिळवणी होणार नाही असे स्पष्ट सांगत आहेत. आमची याबद्दल कुठलीही बोलणी चालू नाहीत असे राज ठाकरे म्हणाले. एकंदरीत हर्षभरित पत्रकारांना आपल्या बुडाला चिकटवलेले पिसारे उतरवावे लागणार अशी दुर्दैवी शक्यता निर्माण झाली आहे!
उबाठा सेनेसाठी गाढव गेले आणि ब्रह्मचर्यही गेले अशी अवस्था आहे.
"On 14th and 15th July 2025,
"On 14th and 15th July 2025, the Maharashtra Navnirman Sena had organised a camp at Igatpuri for select office-bearers. During that camp, I had an informal conversation with journalists. During this, I was asked about the victory rally on 5th July. I responded that the rally was not political but a celebration of the Marathi people's victory. Then, I was asked, 'What about the alliance?' To which I replied, "Should I discuss alliance matters with you now?" Thackeray wrote in a social media post in Marathi. "Words, which I did not utter, were put in my mouth, claiming that the decision on the alliance would be taken after assessing the situation before the municipal elections," he said, adding that informal talks should remain informal in nature.
वरील मजकूर खास अमेरिकन गाढवांसाठी
ठाकरे बंधू एकत्र येण्याची
ठाकरे बंधू एकत्र येण्याची भाजप समर्थकांनी चांगलीच धास्ती घेतलेली दिसते.
महाराष्ट्रातल्या भाजप समर्थकांना मराठी भय्ये असं एक विशेषण लॉकडाउनच्या काळात लागलं होतं. ते आता अगदीच सार्थ करीत आहेत.
>>> किती सांगू मी सांगू
>>> किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला
Pages