मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 April, 2025 - 14:06

मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का?

हो, जोरदार चर्चा चालू आहे
बातम्या बघत असाल तर कल्पना असेलच.

१) असे झाल्यास सर्वसामान्य जनता ज्यांना राजकारणात फारसा रस नसतो त्यांचे मत काय असेल हे जाणून घ्यायला कुठल्या बातम्या बघायची किंवा सर्व्हे करायची गरज नाही.
पण तरी या व्हिडिओ मधील मतेच कानावर पडतील याची खात्री आहे.

https://youtu.be/rtSd_uMpi1I?si=tSmz4uAb7xdlO5hD

२) राज ठाकरे, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे अशा दोन-तीन गटात विखुरले गेलेल्या जुन्या शिवसैनिकांना, बाळासाहेबांना मानणाऱ्या जुन्या मतदारांना, त्यांच्या घरातील नव्या पिढीला सुद्धा या दोन भावांनी एकत्र यावे असे आतून कुठेतरी वाटत असावे हे खात्रीने सांगू शकतो.

३) इकडचे तिकडचे फुटलेले सारे मावळे शिंदे ठाकरे एकत्र होण्याची शक्यता आहे. कारण भाजपला घेऊन सध्या सारेच नाराज आहेत.

४) गेले काही वर्षे आपण महाराष्ट्रात अगदी कोणाचीही… कोणाशीही आणि केव्हाही युती झालेली बघितली आहे. त्यामुळे या दोघांना एकत्र यायला लाजायची बिलकुल गरज पडणार नाही.

५) सध्या मराठी विरुद्ध हिंदी मुद्दा जोरदार चालू आहे. अशा पार्श्वभूमीवर हे मराठीचा मुद्दा घेऊन एकत्र आले तर नक्कीच भरघोस पाठिंबा मिळणार याची खात्री वाटते. कारण आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात शिकायला पाठवणाऱ्या मराठी माणसांकडे तसाही दुसरा कुठला पर्याय दिसत नाही. राजकीय इच्छाशक्ती शिवाय आपली मराठी वाचू शकत नाही हे वास्तव आहे. त्यामुळे यांनी ही वेळ साधली तर तो मास्टरस्ट्रोक ठरेल.

काय बोलता?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाकी पुढे काय होईल माहिती नाही पण माहोल जबरदस्त होता, लोकांनी गर्दी केलेली. नंतर आमचे लाईट्स गेले त्यामुळे भाषणे बघितली नाहीत. तसंही त्याच्या क्लिप्स बघता येतील नंतर. भाऊ भाऊ स्टेजवर आलेले बघितलं, पुढे नाही.

गर्दीची मात्र एकीकडे काळजी वाटत होती, सर्व नीट पार पडलं हे बरं झालं.

राज ठाकरेंचे नियोजन शिस्तबद्ध असते. बंद सभागृहात त्यात थोडे बंधन पडते,परंतु खुल्या मैदानात अगदी आखीवरेखीव व्यवस्था असते.

सामान्य लोकांपेक्षा चॅनेल वाल्यांनाच भलता आनंद जाहलेला !
काळजाचा ठोका चुकवणारा क्षण म्हणे !!
मला तर काहीच असे वाटले नाही.
राज हातचं अंतर राखून होता, उद्धव जास्ती उत्सुक वाटला.
भाषणात तो च तो पणा होता. गर्दी होती. पूर्ण फॅमिली होती तिघांचीही. चॅनेल वाले सारखे तिकडे कॅमेरा वळवित होते.

मी म्हणते, ठीके ना तीन भाषा शिकल्या तर. त्यात काय एव्हढे?
आपण तर सरसकट तीन तीन भाषा शिकायचोच आधी...!
हिंदी शिकली तर काही वाया जात नाही....

आपण तर सरसकट तीन तीन भाषा शिकायचोच पहिले...!
>>>>

मला तर चार शिकवल्या
पाचवी ते सातवी हिंदी
आठवी ते दहावी संस्कृत
आणि संस्कृत तर वाया गेली.. म्हणजे माझी तरी
इंग्लिश मिडीयम मुलांना फ्रेंच सुद्धा शिकवली.
सगळा येड्याचा बाजार होता.

पाचवीपासून होतीच आम्हाला हिंदी भाषा, पहीलीपासून लादू नका, असं म्हणणं होतं बहुसंख्य लोकांचे, ते चुकीचे नव्हतं. मलाही पहिलीपासून हिंदी नको हेच वाटत होतं.

पुस्तकी हिंदी शिकून काय फायदा होतो आणि ती कोण कुठे वापरते याची कल्पना नाही.
मला शाळेत हिंदी नसली तरी मुंबईत राहून आणि पिक्चर बघून मी माझी हिंदी शिकलोच असतो. आणि तिथूनच शिकलो. शाळेत काय वेगळे शिकलो हे आता आठवत सुद्धा नाही. शब्दसंग्रह म्हणाल तर हल्ली आपण इंग्रजी शब्दच जास्त वापरतो

आले एकत्र. खुश.
वीस टक्के मराठी मुंबईत विरुद्ध ऐंशी टक्के अमराठी. आणखी राडा करणार रस्त्यावर हा संदेश दिला.

सर
चांगला प्रतिसाद दिला आहे. पूर्ण सहमत.

माझ्या अंदाजाने हिंदीचे पिल्लू मुद्दाम सोडले असावे. भाजप व मनसे आतून एक असावेत. दोघा भावांच्या आनंदात व देहबोलीत बऱ्यापैकी फरक दिसत होता. मविआलाही यातून एक सौम्य हादरा बसला. महापालिका निवडणुका त्यांच्यापैकी कोण कोणासोबत लढणार असा एक विषय आता निर्माण झाला आहे. दुसरे म्हणजे 'मराठीबाबतची कट्टर भूमिका घेणे' हे काहीवेळा हिंदुत्वापासून दूर जायला लावणार. याचे कारण, मराठी बोलायला ठाम विरोध करणाऱ्या हिंदूंना चोप बसू शकेल.

राज्यातील अनेक जिल्ह्यातील बोली मराठीवर हिंदीचा जबरदस्त प्रभाव आहे जो उखडणे या दोन पक्षांना सोपे नाही. हिंदी ही कैक मराठी नागरिकांची, महाराष्ट्रातच, दैनंदिन बोली भाषा असल्यासारखेही आहे.

हिंदीची सक्ती व्हावी ही इच्छा मुळात सरकारची नसेलच असे वाटते, पण ती आहे असे दाखवले गेले असावे.

व्यावसायिकांना बडवून काढायला सुरुवात केली तर ते एक लॉबी तयार करतील (परवा एक लहानसे आंदोलन झालेही). अश्या चळवळींना बाहेरील राज्यांमधून पैसे मिळतील.

मराठी व इतर भाषिक असे तुकडे पाडायचे आहेत का अश्या एखाद्या प्रश्नाचे उत्तर कोर्टात देण्याची वेळही येऊ शकेल.

सामान्य कार्यकर्ते टाळ्या, शिट्ट्या यात सुखी होतात.

मी काय म्हणतो तीनच भाषा का रे बाबा? चार किंवा पाच का नाहीत? कुणी काही शास्त्रीय विश्लेषण केले आहे. आणि आपल्याला काय करायचे आहे. जे काय करायचे आहे ते मुलांना, त्यांचे ते बघून घेतील. आपण कधी मुलांना विचारले आहे? सध्या काय आहे की औरंगजेब म्हणतो तीन भाषा तर तीन भाषा, खाविंदचरणारविंडीमिलीन्दायमान होत्साते आपण वागणार .
मी लहान होतो तेव्हापासून शिक्षणावर प्रयोग चालू आहेत. ते सगळे लिहिले तर एक विनोदी लेख होईल. आमच्या वेळी इंग्रजी डायरेक्ट मेथडणे शिकवायचे एक फ्याड होते. म्हणजे इंग्रजी इंग्रजीमधून शिकवायचे! ते कसे? म्हणजे Sleep म्हणजे झोपणे असे मुलांना सांगायचे नाही तर आमचे गुरुजी अक्चुअलि झोपायचे प्रात्यक्षित करून दाखवायचे. असे आम्ही इंग्रजी शिकलो.

आता या ज्या नॉन सरकारी शाळा आहेत त्यात मराठी हिंदी इंग्रजी तर शिकवतातच वर जोडीला फ्रेंच नाहीतर जर्मन यापैकी पण एक शिकवतात.

संस्कृत, फ्रेंच आणि जर्मन शिकण्याचा मूळ उद्देश म्हणजे जास्त मार्क मिळवणे, भाषेचे प्रेम हा दुय्यम उद्देश. ताकाला जाऊन भांडे कशाला लपवायचे?

संस्कृत, फ्रेंच आणि जर्मन शिकण्याचा मूळ उद्देश म्हणजे जास्त मार्क मिळवणे,
>>>>>

शिकण्याचा नाही तर शिकवण्याचा उद्देश काय हा मुद्दा आहे इथे असे मला वाटते.

शिकण्याचा नाही तर शिकवण्याचा उद्देश काय हा मुद्दा आहे इथे असे मला वाटते. >>> +१०० आईशपथ पोस्टच्या खालचं नाव दोन तिनदा तपासून पाहीलं.. Biggrin

जर्मन आणि जपानीज भाषा शिकल्या की आपल्या भारतीय लोकांना लगेच चांगला पगार देऊन तिकडे बोलावतात. भाषा शिकून बाहेर देशात सेटल व्हायला पाहिजे. बाहेरच्या देशात लाइफस्टाईल चांगली आहे. भारतातल्या लोकात ईगो ठासून भरलाय. खालच्या लेव्हलचा वर्कर कंपनीत जरा काय ईकडचा तिकडे होईल यांची पोटदुखी सुरू होते. कंपन्या बांधतात कोटीच्या पण मानसिकता दहा रुपयांची असते.

एका सेवाभावी संस्थेच्या -बहुतेक प्रथम चू भु माफ- केलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की इयत्ता चौथीच्या मुलांना हच्चा घेऊन दोन आकडी संखेंची बेरीज करता येत नाहीये. तिकडे आधी लक्ष द्यायचे का त्रिभाषा सूत्राकडे?

मुलाना चॉइस नसतोच मुळी. सांगाल ते शिकावे लागतेच त्यांना. पालकांना काय वाटते हा खरा प्रश्न आहे.

बेफिकीर तुम्ही म्हणता तसं भाजप मनसे आतून एक असावेत असं एकीकडे मलाही वाटतंय, मध्ये मुख्यमंत्री आणि रा ठा भेट झालेली तेव्हापासून. खरं तर दोघांनी सर्वच वेगळ्या पक्षांची साथ सोडून निवडणूक एकत्र लढायला हवी आणि जरी यश मिळालं किंवा नाही तरी एकत्र रहायला हवं, इतर कोणाही बरोबर युती आघाडी नको, असं झालं तरच त्यांच्यासाठी जल्लोष करणाऱ्या लोकांना समाधान वाटेल.

अंजू,

पक्षाचे मूळ उद्दिष्ट काय याबाबत प्रदीर्घ कालावधीत घेतली गेलेली वळणे व वेगवेगळ्या आदर्शवादाच्या पक्षांशी केलेल्या युती हे अंगाशी येऊ शकते असे मला वाटते.

काँग्रेस , भाजप तसेच काही इतर स्थानिक पक्षांनी आपापली मूळ भूमिका कधी सोडली नाही. काँग्रेस व भाजप यांनी काही स्थानिक व काहीश्या वेगळ्या विचारधारेच्या पक्षांशी वेळोवेळी युती नक्की केली, पण स्वतःची भूमिका ठाम ठेवली. परिणामतः, राष्ट्रवादी (अजितदादा) आज भाजपसोबत असूनही भाजपच्या मूळ विचारसरणीला विरोध करत नाही.

आता सेना (उद्धव ठाकरे) व मनसे यांच्यासमोर प्रश्न असा उभा राहिला असणार की मराठी माणूस की हिंदुत्ववाद! हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकावा यासाठी (कुठेच काही गरज नसताना) हिंदी सक्ती हा विषय मधेच आणला गेला असू शकेल. त्या विषयावरून एक व्हा, असे भाजपनेच कदाचित राज ठाकरे यांना सुचवले असेल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सेना (उद्धव) व मनसे यांच्यातील जागावाटप, आपले मतदार नक्की कोणाला मतदान करतील याची खात्री नसणे या निकषांवर या दोन पक्षांना हादरा देता येईल. या गोष्टीचे बक्षीस राज ठाकरे यांना वेगळ्या प्रकारे दिले जाऊ शकेल. जर या दोन्ही सेनांना मिळून बहुमत किंवा बऱ्यापैकी जागा मिळाल्या तर त्या दोन सेनांचे फावेल. मात्र त्यानंतर कौटुंबिक धुसफूस सुरू होऊ शकेलही. विधानसभा व लोकसभा भाजपच्या हातात आहेतच. काँग्रेस मराठी या मुद्यावर सोबत देत नाहीये. मविआ चे इतर मित्रपक्षही बहुधा साथ देणार नाहीतच.

हे सगळे आपले माझे हवेतले अंदाज Proud

हे पूर्णतः चुकीचे असेल किंवा चुकीचे ठरू शकेल

पण 'मराठी माणूस की हिंदुत्व' यातील एक निवडण्याची वेळ आलीच तर पक्षांची एकूण व्याप्ती आटू लागेल. हिंदुत्व धरले आणि व्यावसायिकांना हिंदी बोलू दिले तर मराठी माणसाचा विश्वासघात आणि मराठी नाही बोललात तर चोप बसेल अशी भूमिका घेतली तर परप्रांतीय हिंदू दुरावणार.

पक्षाच्या / युतीच्या धोरणांसंदर्भात (म्हणजे मराठीसाठी एकत्र आलो) जर कार्यकर्त्यांचा विश्वासघात झाला तर फार मोठा झटका बसेल.

आणि मुख्य म्हणजे, राज ठाकरे हॅज नथींग टू लूज!

ध्रुवीकरणाच्या खेळात भाजप माहीर आहे. 100% मराठी काही उठा-राठा समर्थक नाहीयेत. भाजपचा आपला वोंट बेस मराठीच्या मुद्द्यावर राठा-उठा कडे जाणार नाही. पण जे काही गुजराती आणि इतर हिन्दी भाषिक आहेत ते मात्र भाजपकडे वळू शकतात. मुंबई महापालिकेसाठीच केलेली ही खेळी असावी.

ध्रुवीकरणाच्या खेळात भाजप माहीर आहे.>>> अगदी बरोबर...आणि त्यांचे ध्रूवीकरणाचे आडाखे हे डिप स्टॅटिस्टीक्सच्या आधारावर असतात त्याला झटका फक्त सामान्य माणसाच्या मनात निर्माण झालेला अनपेक्षित संभ्रमच देऊ शकतो, जे लोकसभा निवडणुकीत घटना बदलण्याच्या मुद्द्यावर झाले. पण महाराष्ट्रात एकूणच पक्ष संघटनेवर फडणवीस यांची मांड राष्ट्रीय पातळीवरील मोदी- शहां पेक्षा अधिक पक्की आहे आणि ध्येयाचा स्कोप व त्या अंतर्गत येणारी मांडणी, सर्वांची कामे , नेमून दिलेली वक्तव्ये या गोष्टी तुलनेत अधिक आखीव व सुस्पष्ट आहेत.

राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना असे आदेश दिले आहेत की त्यांच्या परवानगीशिवाय युतीबद्दल कोणीही जाहीर वक्तव्य करू नये.

माध्यमे विषय जेवढा पेटवतात तितका तो कदाचित महत्वाचा नसू शकतो अश्या प्रकारचे हे उदाहरण वाटते.

महाराष्ट्राने एवढ्या युती आणि आघाड्या बघून झाल्या आहेत की जनतेला काही विशेष वाटत नसेल..
मतदार हल्ली कुठल्या आधारावर मत देतात याचा एक सर्व्हे घ्यायला हवा.
उदाहरणार्थ मी सध्या माझे आईवडील जिथे मत देतात त्यांना देऊन मोकळा होतो. आधी असे नव्हते.

राडे करवण्यात यशस्वी होतील. आता लोकल ट्रेनमध्ये मुलाखती देत आहेत चानेलवाल्यांना...भाइंदरच्या पुढे.
मुंबई महापालिका सत्ता मिळेल या आशेवर आहेत.

< भाजप मनसे आतून एक असावेत असं एकीकडे मलाही वाटतंय, मध्ये मुख्यमंत्री आणि रा ठा भेट झालेली तेव्हापासून.> सगळ्यांचे लाडके देवाभाऊ कपटी, पाताळयंत्री आणि कारस्थानी आहेत, असं कट्टर भाजप समर्थकांनाही वाटतंय, हे वाचून वाईट वाटलं. Sad

दोन सेनांनी हिंदी भाषकांना तसंच सोडून दिलं तर ज्या मराठी लोकांचा विश्वासघात होणार आहे, त्या मराठी लोकांना शालेय शिक्षणात पहिलीपासून सक्तीची हिंदी याबद्दल काहीच वाटत नसेल, कारण ही सुद्धा देवाभाऊंची सत्तेसाठी आणि इतर पक्ष संपवण्यासाठी कुटिलनीती आहे, याची त्यांना खात्री आहे. बरोबर? Wink

बाकी ज्यांच्या लाडक्या पक्षाचा पोस्टरबॉय नितीश राणे आहे, त्यांनी इतरांच्या राड्यांना नाकं मुरडणं अपेक्षितच आहे.

मागच्या बिहार विधानसभा निवडणुकींत सुशांतसिंह राजपूतचं भूत नाचवलं. आता हिंदी / मराठी सक्ती. वा देवाभाऊ ! मान गए आपको!

नाही नाही मला मुख्यमंत्र्यांबाबत तसं वाटत नाहीये पण राजकारणात जो धूर्तपणा लागतो तो त्यांच्याकडे नक्कीच आहे.

बाकी ना रा फॅमिली ज्या पक्षात जाते त्यांची लाडकी कशी होते हे मलाही समजत नाही, शिवसेनेची लाडकी होती, नंतर काँग्रेस, आता भाजप (एकजण दुसरीकडे आहे सध्या), सगळे उचलून धरण्याइतकी हुशारी त्यांच्याकडे आहे असं पर्सनली मला वाटत नाही. त्यांना भाजपमध्ये घेतलेले मला आवडलं नाही, अर्थात ज्यांना ज्यांना घेतलेले आवडलं नाही ती यादी मोठी आहे माझी. जोपर्यंत मला न पटलेले माझ्या एरियातून उभे राहणार नाहीत तोपर्यंत मी भाजपला मत देणार, त्यापैकी कोणी उभं राहिलं तर नोटा.

पण फडणवीसांना हे उद्योग का करावे लागतात? मोदी, फडणवीसांचा चेहरा, भाजपने केलेला अभूतपूर्व विकास, हिंदुत्व इतके मुद्दे मते मिळवायला पुरेसे नाहीत का? दुसरे पक्ष फोडा, तिथले राणे आणि आणखी कोण कोण लोक आपल्या पक्षात आणा, दुसर्‍या पक्षांमध्ये आपली माणसे ठेवून कारस्थाने करा, हे उद्योग का करावे लागतात?

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज ठाकरेंनी मशिदींवरच्या भोंग्याचा मुद्दा फडणवीसांच्या सांगण्यावरून घेतला, असं म्हटलं जात होतं. आता परराज्यातून आलेल्यांना मराठीत बोलायला लावण्याच्या त्यांच्या आंदोलनामागेही फडणवीसच आहेत, असं तुम्हांला वाटतंय. याला कोणी धूर्तपणा म्हणतील, कोणी कारस्थान. भाजपकडून स्वच्छ राजकारणाची अपेक्षा तुम्हांलाही नाही. मग त्यांचा राज्यकारभार स्वच्छ आहे, अशी खात्री कशी देता येईल?
शालेय शिक्षणात हिंदीच्या सक्तीवरून त्यांनी जे केलं तेही स्वच्छपणे केलं नाही. वर निर्णय मागे घ्यायला लागला तेव्हा तो उद्धव ठाकरेंचाच होता, अश्या पुड्या सोडल्या.

आता आशिष शेलार यांनी मरा ठीचा आग्रह धरणार्‍यांची तुलना पहलगामच्या दहशतवाद्यांशी केली आहे.

मीरा भाइंदरमधल्या मारवाडी गुजराती दुकानदारांच्या मोर्चाला परवानगी दिली, पण मराठी लोकांना नाही, असं का? म्हणजे मराठीचा आग्रह धरणारे सगळे दहशतवादीच झाले.

दोघांच्या भेटीवरून मला इतकंच वाटलं की मनसेला मराठीवरून चांगली मतं मिळाली तर भाजपसोबत जाण्याचे चान्स आहेत, त्यांनी तसं करू नये. मराठी मुद्यावरून जर दोन भाऊ एकत्र आले तर यश किंवा अपयश आलं तरी एकत्र रहावं, इतर म्हणजे इतर कोणत्याही पक्षाबरोबर जाऊ नये. अर्थात दोघे एकत्र लढले निवडणूका तरच, अजून त्याबद्दल काही माहिती नाहीये.

मीरा भाईंदर वरून मनसे मोर्च्याला विरोध आणि अविनाश जाधव यांना पकडणे, हे भाजपचे रडीचे डाव वाटले. बाकी त्यांना मनसेचे नेते योग्य reply देतायेत यावरून.

शेलार वगैरे बरळले त्यांनाही समोरून दोन्ही पक्षांनी योग्य उत्तर दिलं.

आपण इथे कोणाच्या बाजूने बोललं किंवा नाही उद्या राजकारणी लोकं कशी वागतील, कोण एकत्र येईल, कोण नाही, कशी समीकरणे बदलतील, हे एक मत देण्यापलीकडे आपल्या हातात नसतं.

Pages