मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का?

Submitted by ऋन्मेऽऽष on 22 April, 2025 - 14:06

मराठीच्या मुद्द्यावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का?

हो, जोरदार चर्चा चालू आहे
बातम्या बघत असाल तर कल्पना असेलच.

१) असे झाल्यास सर्वसामान्य जनता ज्यांना राजकारणात फारसा रस नसतो त्यांचे मत काय असेल हे जाणून घ्यायला कुठल्या बातम्या बघायची किंवा सर्व्हे करायची गरज नाही.
पण तरी या व्हिडिओ मधील मतेच कानावर पडतील याची खात्री आहे.

https://youtu.be/rtSd_uMpi1I?si=tSmz4uAb7xdlO5hD

२) राज ठाकरे, उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे अशा दोन-तीन गटात विखुरले गेलेल्या जुन्या शिवसैनिकांना, बाळासाहेबांना मानणाऱ्या जुन्या मतदारांना, त्यांच्या घरातील नव्या पिढीला सुद्धा या दोन भावांनी एकत्र यावे असे आतून कुठेतरी वाटत असावे हे खात्रीने सांगू शकतो.

३) इकडचे तिकडचे फुटलेले सारे मावळे शिंदे ठाकरे एकत्र होण्याची शक्यता आहे. कारण भाजपला घेऊन सध्या सारेच नाराज आहेत.

४) गेले काही वर्षे आपण महाराष्ट्रात अगदी कोणाचीही… कोणाशीही आणि केव्हाही युती झालेली बघितली आहे. त्यामुळे या दोघांना एकत्र यायला लाजायची बिलकुल गरज पडणार नाही.

५) सध्या मराठी विरुद्ध हिंदी मुद्दा जोरदार चालू आहे. अशा पार्श्वभूमीवर हे मराठीचा मुद्दा घेऊन एकत्र आले तर नक्कीच भरघोस पाठिंबा मिळणार याची खात्री वाटते. कारण आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात शिकायला पाठवणाऱ्या मराठी माणसांकडे तसाही दुसरा कुठला पर्याय दिसत नाही. राजकीय इच्छाशक्ती शिवाय आपली मराठी वाचू शकत नाही हे वास्तव आहे. त्यामुळे यांनी ही वेळ साधली तर तो मास्टरस्ट्रोक ठरेल.

काय बोलता?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पण ते बरळले ना? त्याचं काय? समोरचे पक्ष काही तुम्हांला आपले वाटत नाहीत. ते तुमच्या पक्षाचे आहेत. आता निशिकांत दुबेही नेहमीप्रमाणे बरळले आहेत. हे देशपातळीवरचे पॉलिश्ड आणि आणखी meaner version of नितीश राणे.

आपल्या पक्षातील सर्व पटत कुठे मला, त्यामुळे माझ्यापुरते मी काय करायचं voting देताना ते कधीच लिहिलं, उलट मी भाजपची असून माझ्याच पक्षावर, मला चुकीचं वाटतं त्यावर टीका करते की.

असो राजकारणावर जास्त अभ्यासपूर्ण लिहिता येत नाही मला, म्हणून मी इथे थांबते.

परप्रांतीय व्यावसायिकांनी महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असल्यास मराठीच बोलावे ही इच्छा, अपेक्षा, आग्रह हे चुकीचे आहेत. देशातील कोणीही कोठेही व्यवसाय करू शकतो व जरूरीनुसार थोडीफार स्थानिक भाषा समजून घेण्याचे काम त्याला करावे लागेल. साधारणपणे हिंदी व इंग्रजी सर्वत्र थोड्याफार तरी कळतात त्यामुळे लोक त्या भाषांचा आधार घेऊन एकमेकांशी संवाद साधतात. घटनेतही 'ज्या प्रांतात जाता तेथील भाषा येत नसेल तर तेथे जायचे नाही' असे काही कलम नसेल.

शिवसेना (उद्धव ठाकरे) व मनसे यांना ज्या भाषिक कट्टरतेच्या भूमिकेवर आणून सोडण्यात आले आहे तो त्या दोन पक्षांच्या अंताचा आरंभ दिसत आहे.

खरोखरच महाराष्ट्रात एखाद्या व्यावसायिकाला किंवा सदनिका धारकाला मराठी बोलता आले नाही किंवा मराठी बोलण्याची इच्छा नसली तर कोणी त्याला मारहाण करू शकतो? करू शकत असेल तर कोणत्या कायद्यानुसार करू शकतो हे माहीत नाही.

राणे, दुबे असे लोक प्रत्येकच पक्षाला पाळावे लागतात. याचे कारण, इतर काही पक्षातील नेत्यांना ती भाषा पटकन समजते. असे लोक पाळले म्हणून भाजप एकदम खालच्या लेव्हलला आलेला पक्ष आहे हे सिद्ध झाल्याचा आनंद व्यक्त करण्याआधी, आपण निवडूनच का येत नाही यावर मंथन करणे सहाय्यकारक ठरेल बहुतेक.

<दोघांच्या भेटीवरून मला इतकंच वाटलं की मनसेला मराठीवरून चांगली मतं मिळाली तर भाजपसोबत जाण्याचे चान्स आहेत,>
भाजपचा स्टँड सरळ सरळ मराठीच्या विरोधात आहे. मनसेने मराठीच्या मुद्द्यावरून मते मिळवून भाजपसोबत जाणे हा मतदारांचा विश्वासघात नाही का?

यापेक्षा भाजप आणि मनसे हे दोघेच हिंदुत्ववादी आहेत म्हणून त्यांनी एकत्र यावं असं म्हटलं तर स्वतःलाच पटेल.
इतर सगळे मुद्दे - भ्रष्टाचार वा अन्य आरोप, राज्यकारभार, प्रशासन हे गौण आहेत.

राज ठाकरेंनीही उद्धव ठाकरे महाविकासमध्ये जाताच हिंदुत्ववाद स्वीकारला. चक्क पक्षाचा झेंडा बदलला. हे त्यांचं हिंदुत्व.

सत्तेसाठी फडणवीसांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडल्या. ज्यांच्यावर आरोप केले, त्यांनाच पक्षात घेतलं.

पण शिवसेना, मनसे मात्र मराठी हिंदीचा मुद्दा घेतात , तो मतांसाठी आणि मनपा निवडणुकांसाठी.

https://x.com/Dev_Fadnavis/status/412489104798916608
I voted for Separate #Vidarbha,DID YOU?
Voting available at more than 600 public places at #Nagpur.
Vote NOW !

वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी करणारे आणि त्यासाठी स्वतंत्रपणे मतदान घेणारे देवाभाऊ नक्कीच महाराष्ट्रहितैषी असणार.

बेफिकीर महाराष्ट्रात रहायचं असेल उद्योगधंदे करायचे असतील, तर मराठी यायला हवं, शिकायला हवं, योग्य आदर सन्मान मराठी भाषेचा करायला हवा, असं मला पर्सनली वाटतं. मारहाण, मारामारी, तोडफोड कोणीही, कुठल्याही कारणांसाठी करू नये असंही मला वाटतं, पक्ष कुठलाही असो.

भरत हो तसं झालं तर विश्वासघात होईल. विश्वासघात कोणीही करू नये ही अपेक्षा असतेच वोटिंग करताना मतदारांना पण पुढे आपला विश्वासघात झाला म्हणून आपण त्यावेळी तरी काहीही करू शकत नाही. 2019 ला आमच्याकडे शिवसेनेला मत, भाजप युतीमुळेच तर दिलं होतं मी.

देवेंद्र फडणवीस वेगळा विदर्भ मागत असताना हे मुख्यमंत्री म्हणून आम्हाला नकोत, आमचा वेगळ्या विदर्भाला विरोध आहे हे तेव्हा 2014 साली शिवसेनेने (उद्धव ठाकरे) यांनी बोलायला हवं होतं, त्यांनी पाठिंबा दिला की तेव्हा आणि सरकारमध्ये सामीलही झाले. दुसऱ्यांना करा मुख्यमंत्री मग आम्ही देतो पाठिंबा असं कुठे सांगितलं.

त्यामुळे राजकारणात काय घडेल काय नाही, हे वोट दिल्यावर आपल्या हातात नसतं हेच सत्य.

>>> महाराष्ट्रात रहायचं असेल उद्योगधंदे करायचे असतील, तर मराठी यायला हवं, शिकायला हवं, योग्य आदर सन्मान मराठी भाषेचा करायला हवा, असं मला पर्सनली वाटतं.

हे तमिळनाडू, तेलंगणा, केरळ, आंध्र, कर्नाटक, ओरिसा, पश्चिम बंगाल यांनीही ठरवले तर?

आपण त्या तिथे रहाणार असू तर आपल्याला यायला हवी ना तिथली भाषा, शिकायला हवं.

आमचे नातेवाईक गुजरातमध्ये आहेत, ते करतात तिथे त्या भाषेचा आदर, आई बडोद्याची तर मराठी शाळेत शिकून उत्तम गुजराथी बोलायची. मध्यप्रदेशात रहाणारे हिंदीचा योग्य आदर करतात.

बेफिकीर, तुमचा मेन मुद्दा कळत नाही मला. महाराष्ट्रात मराठी नका बोलू, मग जर मी युपी मध्ये जाऊन मला मराठीच बोलायची आहे आणि मी असाच बिझनेस करणार असे म्हणालो तर चालेल का? जिथे आहात तिथली भाषा निदान तोडकी मोडकी शिकून घेणे हे बरोबर की माझीच भाषा मी तुमच्यावर लादणार आणि मीच अरेरावी करणार हे बरोबर? Uhoh

मराठी, हिंदी यात अधिक साम्य आहे. गुजराती फार अवघड नाही.

वर उल्लेखलेल्या राज्यांमधील भाषा तुलनेने बऱ्याच अवघड जातात शिकायला. लिपीही खूप वेगळीच असते, विशेषतः दाक्षिणात्य भाषांची.

बेफिकीर, तुमचा मेन मुद्दा कळत नाही मला.>>>
मेन मुद्दा म्हणजे भाजप चे लोक जे करतील फक्त ते बरोबर आहे बाकी सगळे पक्ष आणि त्यांना मत देणारी लोक नालायक आहेत.

काळजी करू नका मुंबई पालिकेवर लवकरच कमळ राज्य करणार आहे. २५ टक्के हिंदी भाषिक, ११ टक्के गुजराथी आणि मराठी असूनही ज्यांना गुजराथ्यांचं कौतुक आहे असे सगळे मिळून ही कमाल करणार आहेत.

मराठी , हिंदी यांत साम्य आहे तरी मराठी भाषकांनीच हिंदी शिकायची. हिंदी भाषकांनी मराठी शिकायची नाही. Wink
--

२०१९ , २०२३ असं दो दा फडणवीसांसोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन अजित पवारांनी आपल्या मतदारांचा विश्वासघात केला. भाजपच्या मतदारांच्या विश्वासघाताचा प्रश्न येतच नाही कारण त्यांना भाजप सत्तेसाठी का ही ही करू शकतो, हे माहीत आहे आणि मान्य आहे.

--
अंजू, तुम्ही भाजपच्या निष्ठावान मतदार असून तुमच्या सगळ्या अपेक्षा इतर पक्षांकडून असतात , असं आजच्या प्रतिसादांवरून तरी वाटतंय.

जवळ जवळ सगळा महाराष्ट्र आताही हिंदी शिकतोच पाचवी पासून. पर्यायी भाषा संस्कृत ही आठवी पासून येते.

धनि,

■ मराठी बोलत नाही म्हणून मारहाण करणे, नासधूस करणे हे कायद्यात बसत नाही

■ मराठी भाषेवर मुळातच हिंदी, उर्दू भाषांचा प्रभाव आहे. मराठवाडा, खानदेश, विदर्भ येथील दैनंदिन मराठीवर हिंदीचा प्रभाव आहे. मराठी माणसे हिंदी सहज बोलू व समजू शकतात. हिंदी ही भारतातील सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. हिंदी चित्रपट व चित्रपट गीते ही मराठी रसिक दशकानुदशके पाहत, ऐकत आला आहे. हिंदी भाषिक राज्यात जाऊन हिंदी बोलणे हे मराठी माणसाला सहज शक्य आहे व तो ते करतो. मराठी आणि हिंदी भाषा यापैकी एका भाषेचा आग्रह धरणे हे महाराष्ट्रात मराठी सारख्या स्थानिक भाषेबाबत शक्य आहे. हिंदीबाबत ते फारसे शक्य नाही कारण हिंदी बहुतेकजण सहज बोलू शकतात, बोलतात. महाराष्ट्रात हिंदी शाळेतच शिकवतात. तशी मराठी तिकडे शिकवत नाहीत. या सर्व कारणांमुळे मराठी माणूस हिंदीभाषिक प्रदेशातच नाही तर अगदी पुण्या-मुंबईतसुद्धा बोलत असतो. यामुळे, येथे आलेले व्यावसायिक सहज हिंदीतून संवाद साधत. त्यांना मराठी बऱ्यापैकी कळते व बऱ्यापैकी बोलताही येते. पण ते मराठी बोलले नाहीत म्हणून चोप देणे यामुळे इगो इश्यू निर्माण होतो

■ तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम या भाषिकांनी मराठी भाषिकांना चोप दिलेला आपल्याला चालणार नाही

■ आग्रही राहणे, विनंती करणे, व्यवसायिकांशी स्वतः मराठीतच बोलणे हे मार्ग जवळपास कायदेशीर म्हणता येतील. मारहाण, नासधूस हे मार्ग योग्य नाहीत.

■ तेव्हा, हिंदी भाषिक त्यांची भाषा आपल्यावर लादत नाहीत. आपल्याला हिंदी समजते म्हणून ते सोयीने हिंदी बोलतात इतकेच. पण त्यांना अनेक वर्षे मारहाण केली, व्हिडीओ काढले ते ते कधीतरी एकवटणार व त्यांना हिंदी भाषिक राज्ये सपोर्ट करणार

■ बहुतांशी व्यवसाय शेट्टी, गुजराती, मारवाडी यांनी जोपासले आहेत. असे का झाले याचा मात्र मराठी माणूस फारसा विचार करताना दिसत नाही. (हे बोलणारा मी तरी कोण म्हणा!)

■ इथे मराठीच बोला ही भूमिका संविधानाशी सुसंगत नाही

मराठवाडा, खानदेश, विदर्भ येथील दैनंदिन मराठीवर हिंदीचा प्रभाव आहे>>> हे खानदेश साठी खरनाही. खानदेशात अहिराणी बोली बोलली जाते. तिथल्या मराठीवर अहिराणीचा प्रभाव आहे, हिंदीचा नाही.

भाजपकडून स्वच्छ राजकारणाची अपेक्षा तुम्हांलाही नाही. मग त्यांचा राज्यकारभार स्वच्छ आहे, अशी खात्री कशी देता येईल? >>> माझ्या युजर नेम मधेच सर्व दडलेले आहे.

जसे गरीबांना, अडाणी लोकांना, मागास घटकवर्गाला, वंचितांना, उपेक्षीतांना, नाडलेल्यांना या प्रत्येकाला मुर्ख बनविण्यासाठी राजकारण्यांकडे वेगेवेगळे हातखंडे असतात, त्याच प्रकारे सुशिक्षित, सुखवस्तु, आणि स्वतःला विवेकवादी सुजाण, जागरुक आणि पांढरपेशा नागरिक समजणाऱ्या वर्गाला मुर्ख बनवण्यासाठीही त्यांच्याकडे काहीसे वेगळे सोफेस्टीकेटेड मार्ग असतात. फरक इतकाच असतो की पहिल्या वर्गांत नमूद केलेल्यांची फसगत झाली की त्यांना लगेच समजून ते हताश होतात, कारण त्याचे गोल्स शॉर्ट टर्म्ड असतात, आणि दुसऱ्या वर्गात असणाऱ्यांचा स्वतःच्या विवेकवादी निर्णय क्षमतेवर (कदाचीत शैक्षणिक सफलतेमुळे) इतका फाजील विश्वास असतो की त्यांची वारंवार फसवणूक झाली तरीही ते त्यांना दाखवलेल्या लॉंगटर्म्ड ध्येयांच्या गाजरांवर भूलून आजूबाजूचे वास्तव न पाहाता तसेच धावत रहातात. Biggrin
IMG-20250708-WA0024.jpg

भरत अहो तसं नाहीये, आता जसं शरद पवार यांनी ठामपणे मागे सांगितलं आम्हाला मुख्यमंत्री वेगळा द्या तर भाजपबरोबर येऊ, तसं त्यावेळी सेनेला करता आलं असतं की. तुम्ही विदर्भ मुद्दा काढलात त्यावर. भाजप जेव्हा दुसऱ्यावर अवलंबून असतो तेव्हा समोरून चान्स असतो ना.

मला तेव्हाही गडकरी मुख्यमंत्री झाले असते तर आवडलं असतं, मी फडणवीस यांना कधीतरी tv वर प्रवक्ता म्हणून यायचे असं ओळखायचे. आता कोकणात आमच्या भागात माधव भंडारी याना तिकीट द्यावं भाजपने आमदारकीसाठी असं मला वाटत होतं, त्यांनी नाही दिलं ना. तिथे मी मतदार असते तर नोटा वापरला असता.

विश्वासघाताचा काढलात त्यावर तुमचं बरोबर पण मतदार म्हणून आपण काय करू शकतो, हेच म्हणणं. तोच मीही सहन केला की एक मतदार म्हणून. तरीही उद्धव ठाकरे यांचे आवडलं तेव्हा कौतुक आणि पटलं नाही तिथे टीकाही केली, मुख्यमंत्री झाल्यावर मनापासून अभिनंदनही केलं.

एक अतिसामान्य मतदार म्हणून मला वाटतं ते मी लिहिते. अभ्यासू वृत्ती नाही माझी.

बरं चोप देणे चुकीचे असले तरी पण आग्रह धरणे चुकीचे आहे का?

मला हिंदी येते पण मी माझ्या भाषेची गळचेपी करून हिंदीच बोलत राहणार हे चुकीचे नाही का? मग त्या अभिजात भाषा ज्या मृतवत झाल्या आहेत त्यात मराठी पण बसेल

दोन्ही सेनांना मिळून मराठी भाषा या विषयावर राजकारण करायचे असेल तर त्या विषयाची व्याप्ती बरीच मोठी होईल.

हिंदी चित्रपट उद्योग - या मुंबईत असलेल्या उद्योगाचे काय करायचे असाही विषय निघू शकतो. अब्जावधी रुपयांचे अर्थकारण त्यात समाविष्ट आहे

शाळेत हिंदी शिकवायचेच नाही अशाही वळणावर ही भूमिका आणावी की काय असा प्रश्न निर्माण होईल

हिंदी भाषेच्या प्रभावाखालील मराठी बोलणाऱ्यांची दैनंदिन बोली भाषा अमान्य आहे अशी भूमिका घेणार की कसे!

एवढी व्याप्ती आवाक्याबाहेर आहे

हो. मान्य आहे. फक्त मला काय जाणवतं ते लिहिलं. आता बघा, भाजपने वेगळा विदर्भ हवा म्हणणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या डोक्यावर बसवला , म्हणून किंवा ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, राकॉसोबत युती त्रिवार नाही, असं सांगितलं त्या अजित पवारांना सोबत घेतलं, हे आवडलं नाही, तरी तुम्ही भाजपला मत द्यायचं थांबवणार नाही. उलट तेव्हा शिवसेना आणि आता मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही सेनांनी असं करायला हवं असं तुम्ही म्हणता.
म्हणून मी म्हटलं की तुमच्या अपेक्षा इतर पक्षाकडून आहेत आणि भाजप काहीही करू शकतो हे तुम्ही स्वीकारलेलं आहे.

धनि,

मराठी भाषिक मराठी बोलतातच. हिंदी व्यावसायिक मराठी भाषिकांशी मराठी बोलत नाहीत हा दोन्ही सेनांचा विषय आहे.

भाजपकडून मला चुकीचा वाटलेला उमेदवार लादला तर नोटा वापरणार, उमेदवार इथला योग्य काम करणारा असेल तर देणार मत.

आता इथे दोन्ही वेळेला सेनाच असते श्रीकांत शिंदे किंवा आत्ता निवडून आलेले राजेश मोरे, इव्हन आधी निवडून आलेले मनसे चे राजू पाटील काम करणारी माणसे आहेत. रवींद्र चव्हाण निवडून येतात त्या डोंबिवली मतदारसंघात आम्ही नाही.

अहो पण हे भाषावार प्रांतरचनेनुसार आहे ना. जर भाषावार राज्य झाले तर त्या राज्यात भाषेचा आग्रह का धरू नये? मारहाण करणे मला पण आवडत नाही पण मग बाहेरचे येऊन तुम्ही काहीही करा मी ऐकणार नाही असं म्हणतात ना.

समजा विरोधी पक्षाने बीजेपीच्या उमेदवरापेक्षा चांगला उमेदवार दिला तर तुम्ही कुणाला मत द्याल हा खरा कळीचा मुद्दा आहे.

शाळेत हिंदी शिकवायचेच नाही अशाही वळणावर ही भूमिका आणावी की काय असा प्रश्न निर्माण होईल>>>> एवढा त्रागा करायची गरज काय आहे?
मराठी सक्ती करू नये, मराठीचा आग्रह धरताना मारहाण किंवा दुकान फोडणे हे करू नये. एवढे पुरेस आहे.

शिवसेना, राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे हे जितके वर्षे राजकारणात आहेत त्याच्या कितीतरी आधीपासून महाराष्ट्रात पाचवीपासून हिंदी शिकवली जाते ना.

इकडे कितीतरी गुजराथी किंवा उत्तर भारतीय भेटतात त्याचा जन्म मुंबईत झालेला असतो पण मराठी येत नाही, कळत नाही. ह्या मुलांना एक additional भाषा मराठी शिकायला त्रास होतो. पण मराठी मुलांना खेळाचा तासाच्या ऐवजी हिंदी शिकवायचा घाट घातला गेला. का?
त्याला विरोध केला तर काय बिघडलं.

हो आलं लक्षात केशवकुल.

2019 ला तेव्हा सेना एकच होती, सेनेपेक्षा मनसे उमेदवार चांगला होता पण मी युतीधर्म पाळला. माझे बाबा आर एस एस चे असूनही त्यांनी आम्हाला तुम्हाला योग्य वाटेल त्याला मत द्या पण मतदान करा असं सांगितलं आहे, पण मी युती धर्म पाळायचा नसेल तेव्हा नोटा वापरेन असं मला वाटतंय, विरोधी पक्षाला नाही देणार.

धनी भाषेच्या मुद्यावरून चांगलं लिहिताय.

माझी हिंदीची बोलू कौतुके
परी फडणीस ही इलेक्शन जिंके
ऐसी अक्षरे रसिके….मेळवीन
अशा शब्दात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी हिंदीचा गौरव केला आहे हे तुम्हाला माहित नाही काय ?

Pages