कैरी-आंब्याच्या गुजगोष्टी / आम्रचर्चा

Submitted by अनिंद्य on 10 April, 2025 - 06:57

कैरी-आंब्याच्या गुजगोष्टी आणि आम्रचर्चा

भारतीयांचे आंबाप्रेम जगप्रसिद्धच आहे. त्यातही आंब्याचे प्रचंड कौतुक करण्यात आणि चवीने आस्वाद घेण्यात महाराष्ट्राचा नंबर पहिला. गुजरात आणि उत्तर प्रदेश नंतर येतात मागोमाग.

आंबा कोणताही आणि कसाही खाल्ला तरी आवडणारे कोट्यावधी लोक आपल्या देशात आहेत. आंब्याची फुले-आम्रमंजिरी, कैरी, पिकलेला आंबा तर आहेच, त्यातली कोय सुद्धा चवीने खाणारी लोकं आपण.

617389ef-2ed4-409d-9c77-679aaddec669.jpegपन्हे, नानाविध लोणची, चटण्या, सलाद, कैरीयुक्त भेळ, कैरी-कांद्या सारखी तोंडी लावण्याची सुखे, चैत्र स्पेशल वाटली डाळ, चित्रान्न, आमरस, आंबा बर्फ़ी - आम्रखंड सारख्या मिठाया, मँगो लस्सी- आईसक्रीम, मँगो मिल्कशेक, मँगो मस्तानी, आंबा पोळी/ आम पापड, मँगो कँडी, सॉस, अमचूर, टिटोरा, रॉ मँगो स्लाइस चूरणगोली … एक ना हजार प्रकारे आंबा आणि कैरी आपले खाद्यजगत समृद्ध आणि चवदार करत आहेत, पिढ्यानपिढ्या. अविरत.

e06f854a-ccc5-48f2-b10e-37ed0beafb74.jpeg

देशातल्या जवळपास सर्व प्रमुख भाषांमधे आपल्या आम्रप्रेमाची स्तवने आहेत, कालिदास आंब्याला कामवल्लभा म्हणतो तर वात्स्यायनाचा कामदेव आम्रमंजिरींच्या प्रेमात. आम्रवृक्ष-वाटिका-फल याबद्दलच्या गीत-कवितांची ओसंडून वाहणारी समृद्धी म्हणजे आपले सामायिक वैभव.

8557ffd6-bc55-4a19-bdb9-663450d5f197.jpeg

तर मंडळी, आता कैऱ्या आणि आंबे सीझन सुरु झालाय. कैरी- आंब्याच्या पाककृती, फोटो, तुमच्या आवडीचे आंबे, आठवणी, आंबा खादाडी, त्याचे केलेले विक्रम असे सर्व celebrate करण्यासाठी माबोकर भरत, ऋतुराज आणि सिमरन यांच्या सल्ल्यावरून हा “आम्रमहोत्सव” धागा.

भरभरून कैरी-आंबे खा, जुन्या- नवीन पाककृती करुन बघा, कैरी-आंब्याबद्दलच्या कथा - कविता -क़िस्से -फोटो आणि अनुभव इथे शेयर करा. सबकुछ मँगो असा हा धागा होऊ द्या !

a123d0e0-8fb6-408e-87e0-575c581b70b5.jpeg

चला तर मंडळी, सब्ज़ और सुर्ख आमों से आमनोशी करें …

Man, go, get a Mango !!

* * *

(वरील सर्व फोटो माझेच. जुन्या मोबाइलने काढलेले.. Picture quality अगदीच बेसिक असली तरी कैरी-आंबाप्रेम कमअस्सल नाहीए, तेव्हढे समजून घ्या)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अंजली, भारी एकदम.
एक लेख लिहा ना त्यांच्या अनुभवावर.
Inspiring...

मस्तच!!
एक लेख लिहा ना त्यांच्या अनुभवावर.>>+१

मला वाटतं सांदणचा कोकणीतला उच्चार आहे तो.... हो कोकणी शब्द आहे.तसे आप्प्याला एलाप्पे म्हणतात.

अंजली,बाबांचे खरंच कौतुक आहे.
आज पायरी आंबे खाल्ले.देवाचे आभार मानले. असं फळ निर्माण केले आणि त्याहीपेक्षा ते खायला मिळाले.

Mango Passion fruit dessert
कॉस्टको मध्ये मिळालं. मात्र यात मँगो अजून जास्त असता तर जास्त आवडलं असतं

IMG-20250420-WA0030.jpg

Screenshot_20250419-164526_Gallery.jpg

पायरी!
अर्धे संपलेत, पुढचा लॉट आणायला पाहिजे लवकरच...

झाली ओपन!
एबीपी माझा वर अशोक हांडे चांगल्या आंब्याची लक्षणं सांगतायत. तो आंबा आमचा आहे.>>> सहीच की!

@ अंजली,

सेंद्रिय पद्धतीने आंब्याची बाग !! हे किती अवघड असेल याची कल्पना आहे. तुमच्या बाबांचा पंच्याहत्तरीतला उत्साह फार प्रेरणादायी आहे.

झाडांना लगडलेली फळे = 😍

... Mango Passion fruit डेसर्ट...

फोटो सुंदर आहे. चवीचा (मनातच) अदमास घेत आहे पण कसे लागेल हे काही इमॅजिन होत नाही Happy

नुकतेच अमूलच्या लाउंजमध्ये मँगो + काहीतरी जमैकन फ्रूट असे आईस्क्रीम मागवले होते ते कैच्या कै चवीचे निघाले.

@ पायरी आंबा - तुमच्या भागात याचा भाव काय आहे सध्या ?

झाली ओपन! >> बघितली ना प्रज्ञा... अग मला वाटलं काहीतरी झोल झालाय म्हणजे माझे सगळे फोटो दिसतायत असं वाटलं म्हणून काढून टाकली होती ,
अशोक ने आमचा आंबा कौतुकाने दाखवला ते बघताना किती छान वाटलं .. काल मुलाचा मुलगा आंब्याचा रस आवडीने खात होता तेव्हा ही खापर पणजोबानी लावलेले आंबे ह्याला मिळतायत म्हणून अगदी कृतकृत्य झाल्या सारखं वाटलं. ह्या मागे सर्व कुटुंबाचे अनेक पिढ्यांचे कष्ट आहेत म्हणून जास्तच कौतुक. असो.

… सर्व कुटुंबाचे अनेक पिढ्यांचे कष्ट आहेत ..

अनुमोदन मनीमोहोर. ती लिंक काही दिसली नाही पण तुमच्या इथल्या पोस्ट्स आणि फोटोंवरून अंदाज येतो.

स्वाती,

आंब्याच्या कढी रेसिपीबद्दल आणि कैरी भेळेतल्या कोथिंबिरीचे मार्क्स देण्याबद्दल थँक्यू 😀

पायरी बाबांच्या (सासरे) मित्राच्या बागेतला, 500/- डझन...... मी खल्लास!मित्राच्या बागेतला मग बरोबर आहे.इथे मला 900/- ने मिळाला.स्वर्गीय आहे.

स्वर्गीय आहे.>> सेम पिंच. गिट्ट गोड आवडणारी मंडळीपण साखर नसलेला पायरीचा रस साखर आहे असं समजून खातायत इतका मस्त आहे!

फोटो सुंदर आहे. चवीचा (मनातच) अदमास घेत आहे पण कसे लागेल हे काही इमॅजिन होत नाही
>>>
चव पण छान आहे. साधारण पायरी टाईप आंबा + पॅशनफ्रूट + क्रीम ही चव जशी लागेल तसं आहे. Happy

हेमाताई मस्तच.

मला आठवतंय अशोक हांडे यांनी अतिपूर्वी म टा मध्येही सविस्तर लेख लिहिलेला आणि नाडणचे वेलणकर आणि अनंत आणि प्रकाश वेलणकर यांचाही उल्लेख केलेला.

Pages