कैरी-आंब्याच्या गुजगोष्टी / आम्रचर्चा

Submitted by अनिंद्य on 10 April, 2025 - 06:57

कैरी-आंब्याच्या गुजगोष्टी आणि आम्रचर्चा

भारतीयांचे आंबाप्रेम जगप्रसिद्धच आहे. त्यातही आंब्याचे प्रचंड कौतुक करण्यात आणि चवीने आस्वाद घेण्यात महाराष्ट्राचा नंबर पहिला. गुजरात आणि उत्तर प्रदेश नंतर येतात मागोमाग.

आंबा कोणताही आणि कसाही खाल्ला तरी आवडणारे कोट्यावधी लोक आपल्या देशात आहेत. आंब्याची फुले-आम्रमंजिरी, कैरी, पिकलेला आंबा तर आहेच, त्यातली कोय सुद्धा चवीने खाणारी लोकं आपण.

617389ef-2ed4-409d-9c77-679aaddec669.jpegपन्हे, नानाविध लोणची, चटण्या, सलाद, कैरीयुक्त भेळ, कैरी-कांद्या सारखी तोंडी लावण्याची सुखे, चैत्र स्पेशल वाटली डाळ, चित्रान्न, आमरस, आंबा बर्फ़ी - आम्रखंड सारख्या मिठाया, मँगो लस्सी- आईसक्रीम, मँगो मिल्कशेक, मँगो मस्तानी, आंबा पोळी/ आम पापड, मँगो कँडी, सॉस, अमचूर, टिटोरा, रॉ मँगो स्लाइस चूरणगोली … एक ना हजार प्रकारे आंबा आणि कैरी आपले खाद्यजगत समृद्ध आणि चवदार करत आहेत, पिढ्यानपिढ्या. अविरत.

e06f854a-ccc5-48f2-b10e-37ed0beafb74.jpeg

देशातल्या जवळपास सर्व प्रमुख भाषांमधे आपल्या आम्रप्रेमाची स्तवने आहेत, कालिदास आंब्याला कामवल्लभा म्हणतो तर वात्स्यायनाचा कामदेव आम्रमंजिरींच्या प्रेमात. आम्रवृक्ष-वाटिका-फल याबद्दलच्या गीत-कवितांची ओसंडून वाहणारी समृद्धी म्हणजे आपले सामायिक वैभव.

8557ffd6-bc55-4a19-bdb9-663450d5f197.jpeg

तर मंडळी, आता कैऱ्या आणि आंबे सीझन सुरु झालाय. कैरी- आंब्याच्या पाककृती, फोटो, तुमच्या आवडीचे आंबे, आठवणी, आंबा खादाडी, त्याचे केलेले विक्रम असे सर्व celebrate करण्यासाठी माबोकर भरत, ऋतुराज आणि सिमरन यांच्या सल्ल्यावरून हा “आम्रमहोत्सव” धागा.

भरभरून कैरी-आंबे खा, जुन्या- नवीन पाककृती करुन बघा, कैरी-आंब्याबद्दलच्या कथा - कविता -क़िस्से -फोटो आणि अनुभव इथे शेयर करा. सबकुछ मँगो असा हा धागा होऊ द्या !

a123d0e0-8fb6-408e-87e0-575c581b70b5.jpeg

चला तर मंडळी, सब्ज़ और सुर्ख आमों से आमनोशी करें …

Man, go, get a Mango !!

* * *

(वरील सर्व फोटो माझेच. जुन्या मोबाइलने काढलेले.. Picture quality अगदीच बेसिक असली तरी कैरी-आंबाप्रेम कमअस्सल नाहीए, तेव्हढे समजून घ्या)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डोन्ट इव्हन स्टार्ट मी ऑन तूळ - Happy

तूळ - सोशल ग्रेस व गोड पण १००% आयर्न फिस्ट ईन वेल्व्हेट ग्लव्ह Happy युअर सानुलि शी इज व्हेरी केपेबल ऑफ वाईंडींग यु अराउंड हर पिंकी फिंगर.

आपण म्हणतो मेष ना फार हेडस्ट्राँग. त्यांच्या मनाचेच्च करतात. पण मेषच्या १८० अंश विरुद्ध तूळ डिट्टो हेच्च करतात परंतु त्यांच्या व्हिक्टिम्स्ना पत्ताही लागत नाही Happy
तूळ इज मेष इन डिसगाइस.

नवरा तूळ ( चित्रा)

हो हे वाचल आहे, पण सामोने एकदम अ‍ॅस्ट्रो डीटिकेटिव्ह पद्धतिने लिहलय ते वाचुन मजा वाटली..तुळ राशिचे लोक भाग्यवान असतात...आयुष्यात स्ट्रगल, सन्कट कमी असतात..बहुधा गोष्टी मनासारख्या घडतात किवा तशी अनुकुल परिस्थिती असते..साडेसातित सगळ्यात कमी सतावते.
असो! विषयाला धरुन बोलते.. फोटो फार सुरेख आहेत.

या आपल्या खास आवडत्या धाग्यासाठी
हे घ्या लंडनचे आंबे....Screenshot_20260622_074120_Gallery.jpg
हे नक्की केशर आंबे होते का याबाबत साशंकता...

Screenshot_20260622_074129_Gallery.jpg

दोन्ही आंबे विकत घेऊन खायचे धैर्य मात्र झाले नाही:)

लंडनचे आंबे..…

वा, देशी विदेशी आंबे. 👍

आता इकडे पावसापाण्याचे दिवस येऊ घातलेत. आता महाराष्टातला आंबा सरत-संपत आला.

दिसतात अजून बाजारात इथे बरेच. वटपौर्णिमेपर्यंत तरी असतील आंबे. येत्या सोमवारी आहे.

लंडन आंबे भारीच.

आता इकडे पावसापाण्याचे दिवस येऊ घातलेत. आता महाराष्टातला आंबा सरत-संपत आला.

आत्ता गुजरातेत कच्छी केसर सीझन सुरू होईल, मी बघितलेल्या सगळ्यात वेगळ्या आंब्यापैकी एक, हा आंबा खायला सुरुवातच होते पहिल्या पावसानंतर, जवळपास आठवडा दहा दिवसच असतो बाजारात नंतर गडप. जुनागड/ गीर केसर सीझन पावसासोबत संपतो आणि कच्छी केसर सुरू होतो.

images (24).jpeg

कच्छी केसर

कच्छी केसर = नवीन माहिती. ✔

इथे स्वत: आंबा बागाईतदार असलेल्यांनी लिहिलयं तसे भारतात, विशेषत: पश्चिम किनारपट्टीवर आंब्याचा सीझन मान्सूनचाच general pattern फॉलो करत असावा. कर्नाटक कोकणचे हापुस संपले की वलसाडचे हापुस येतात, तसेच काहीसे ह्या केसर आंब्यांबद्दल होत असेल - गीर केसर संपला की कच्छी केसर.

उर्वरित भारतात आता खरा आंबा सीझन सुरु झालाय त्यात यंदा पूर्वेकडचे आंबे लाभण्याचे योग आहेत. इंशागोविंदा.

पूर्वेकडच्या आंब्याचे वेगळे गोड प्रस्थ आहे बघा ! मँगो टाऊन ऑफ इंडिया म्हणून नावारूपाला आलेले पश्चिम बंगाल मधील मालदा आणि तिथले लक्ष्मणभोग (विशेष प्रसिद्ध), हिमसागर, लंगडा आणि फझली जातीचे आंबे किंवा अतिशय नजाकतीचे लखनौ जवळील मलिहाबाद येथील मलिहाबादी दशहरी आंबे प्रचंड प्रसिद्ध. १५००-२००० रुपये डझन असणारे हापूस परवडत नाहीत म्हणून खायचे नाही तर आंब्याच्या व्हरायटी चाखायच्या म्हणून खायचे तुफान आंबे आहेत ह्यातील लक्ष्मणभोग आणि मलिहाबादी दशहरी चाखलेले आहेत. १००-२०० रूपये/ किलो . प्रचंड रसरशीत आणि प्रत्येकाची गोडी वेगळी जाणवेल असे हे आंबे मस्त लागतात. एकंदरीत उत्तर प्रदेशात आंब्याचा सीझन आला की रोज किलो किलो दशहरी आंबे आणून पाण्यात भिजत घालणं आणि जेवायला बसलं का आंबा चिरून सोबत एक चमचा घेऊन मधेच त्याने आंबा स्कूप करत खाणं एक सांस्कृतिक सोहळा आहे यूपीच्या खाद्यजत्रेतला.

आंब्याच्या व्हरायटी मधे बदाम ह्या प्रकारासोबत कधी सुत जुळले नाही माझे तरी, कितीही रंग चढलेला अन् वरकरणी सुगंधी दिसणारा साधारणतः पाऊणकिलोच्या आसपास वजन असणारा बदाम दिसायला आकर्षक दिसतो पण गर खाताना एक स्पेसिफिक आंबुसपणा जाणवतोच ती आंबूस चव कलर आणि फ्रेग्रन्स प्रोफाइल सोबत मॅच होत नाही अन् माझी वैयक्तिक बेरीज हुकते. दशहरी मात्र बरा आवडतो गोडमिट्ट नाही तो आंबाच कसला ह्या काहीशा वैयक्तिक गृहितकामुळे

आमरस करताना कोयी दुधात धुणे + त्यात साखर घालणं स्ट्रिक्टली नो नो आमचा. आमच्या लेखी आमरस म्हणजे जर्द गडद केशरी रंग असावा, थोडा खडा (तोंडात दशा चावण्यालायक) त्यात थोडी कच्ची बडीशेप + काळी मिरी ओबडधोबड कुटून + हलकी चव जाणवेल इतकी मिठाची कणी ! सोबत सध्या गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या आणि भात (होय आमरस भात खायला मला तरी आवडतो) नंतर निजधामी गेल्यागत ३ तासाची झोप.

पाऊणकिलोच्या आसपास वजन असणारा बदाम दिसायला आकर्षक दिसतो पण गर खाताना एक स्पेसिफिक आंबुसपणा......... अय्यो नाही जाणवला कधी. याच वर्षी बदामी आंब्याची ओळख झाली आणि त्याच्या प्रेमात पडले.
आईच्या caretaker ne तिला वाढदिवसाची भेट म्हणून हे आंबे दिले. तेव्हापासून आमच्याकडे याचा रतीब सुरू झाला. मध्यंतरी केशर आणले गेले. पण त्याला एक वेगळाच वास आल्यामुळे परत बदामीकडे वळले. हापूसची शेवटची पेटी जरा सपक निघाल्यामुळे तर अगदीच.
रत्ना जातीचा आंबा खाल्ला. ठीक होता.
आता महिन्याभराने आंबा संपेल.

पूर्वेच्या आंब्यांबद्दल सहमती.

लक्ष्मणभोग, चंपा, हिमसागर आणि लज्जतबक्क्ष हे पूरबी/ बंगाली आंबे चाखले आहेत, पण त्याला खूप दिवस झाले,आता चवी नीट आठवेना झाल्यात.

बंगालच्या एकट्या मुर्शिदाबाद जिल्ह्यातच १२४ वेगवेगळ्या जातीच्या आंब्यांचे commercial cultivation करतात असे ऐकले आहे, प्रत्यक्ष बघण्याचे योग आले नाहीत.

यंदा “अनारस” ह्या मुर्शिदाबाद स्पेशल आंब्याकडे खास लक्ष लागून आहे - त्याला म्हणे आंबा + अननस असा दोन फळांचा मिश्र सुगंध आणि स्वाद असतो. हा आंबा लाभला तर डॉक्यूमेंट करीन; इथे फोटो डकवीन.

@ दशहरी

मुंबई-पुण्यात चांगले दशहरा गेले २-३ वर्ष नाहीच मिळाले कुठे. एकजात पचपचीत फळे, मग नाद सोडला.

@ जेम्स,

आमरसात भरडलेले काळे मिरे+ कणभर मीठ हे आमच्या आजोळी सुद्धा सेम टू सेम, त्याने जास्त खाल्ला तरी बाधत नाही अशी समजूत होती.

@ देवकी,

आता सीझनच्या शेवटला येणाऱ्या हापुसची चव उतरली आहे असे माझेही मत. केसर मात्र खूपच छान मिळाले यंदा, farm fresh, naturally ripened. मनसोक्त खाल्ले - इथे फोटो डकवले आहेत.

Mango milkshake.
Any fans here ?.... No.
ज्या नजाकतीने ग्लासाचा फोटो काढला आहे तो मस्त आहे.

देवकी+१

सहसा फळे आणि दूध एकत्र करणे आवडतच नाही पण तुमचे प्रेझेंटेशन आणि ते ग्लास दोन्ही गोष्टींना १०/१० मार्क्स.

Mango milkshake - प्रचंड आवडतो. फोटो आणि ग्लास दोन्ही मस्तच.

आज या सिझनचा शेवटचा आंबा खाल्ला - आता "शाम-ए-गम की कसम" मनात घोळतंय.

फोटो ग्लास, हात सगळच मस्त
फक्त मँगो मिल्क शेक ला बिग नो..
आमच्या मुलांचा मात्र खूप आवडता होता ती लहान असताना.

… आता "शाम-ए-गम की कसम" …. 😀

आंबाच काय कोणत्याच फळाच्या मिल्क शेक शी माझे सख्य नाही. मँगो मिल्क शेक घरातल्या जेन झी पब्लिकच्या आवडीचा आहे. म्हणून होतो अधून- मधून.

आता पावसाचे चार शिंतोडे पडले आहेत. अहो आईंना कैऱ्या पसंत पडल्या की साठवणीच्या लोणच्यांचा महोत्सव सुरु होईल. Waiting to sample a few spicy treats.

आता "शाम-ए-गम की कसम" मनात घोळतंय..... ..काल आमचेही आंबे संपले. आज जाऊन आणेन तर धोधो पाऊस आहे. नाही म्हणायला आंब्याची सान्न (सांदण) आहेत. जास्त केली गेल्याने उद्याही खाल्ली जातील. जरा घट्ट आणि थोडे अगोड झाल्याने गुळाचे पाणी करून सान्नावर घालून मावेतून काढावे लागत आहे. यासाठी अख्खा आंबा वाया न घालवता बसायचा रस किंवा जरासा आंबट, अगोड आंबा रस काढून फ्रीझरमध्ये ठेवते. मग तो डबा भरला की अशा गोष्टींसाठी वापरला जातो.

अनिंद्य फोटो सहीच एकदम.

गावचा बाटली आमरस आहे थोडा आणि लोणचं आहे.

गावाला चुलत जावेने मोठ्या दिरांना कैरीचं लोणचं दिलेलं. ते पावसाळ्यात कोकणात रहात नाहीत, पुण्या मुंबईत येतात. ते लोणचं येताना पुण्यात घेऊन आले आणि इथे येताना थोडं आमच्यासाठी घेऊन आले.

कोकणात लोणचं साधारणपणे एप्रिलमध्ये करतात. इथे पहिला पाऊस पडल्यावर करतात.

अहो आईंचा मागच्या विकांतीचा खटाटोप - वार्षिक कैरी लोणच्यासाठीचा पायलट प्रोजेक्ट 👇

af8166c2-9536-4681-99fe-25f0ad5aabe0.jpeg

यंदा अहो आई - त्यांची कन्या आणि कन्येची कन्या असा तीन पिढ्यांचा skill development project आहे.

पण यावर्षी या पायलट प्रोजेक्टवरच थांबावे लागेल असे दिसतेय. ४ दिवसांपासून धो धो पाऊस, आता योग्य spec च्या कैऱ्या मिळतील आणि त्यांचे काही घडेल असे वाटत नाही.

आजच्या Indian Express eye पुरवणीत भारतीय आंब्यावर लेख आहे.
https://indianexpress.com/article/express-sunday-eye/indias-mango-story-...

वाचायला सब्स्क्रिप्शन लागतंय. वेळ मिळाला की त्यातले रोचक मुद्दे इथे लिहेन.

Pages