विधान सभा निवड्णुक २०२४

Submitted by हस्तर on 15 October, 2024 - 16:44

चला विधान सभा पड्घम वाजले
मि कोण त्याही पक्षा चा प्रवक्ता नाही

पण विरोधकान् कडे महाराष्ट्र व्यापी अस मुद्दा नाहिये

पोर्षे , बदलापुर ,शिवपुतळा एवढी धग नाही राहीली

स्पर्धा परिक्शे चे घोटाळी पण जुने झाले

लाडकी बहीण जोरात चाललैये

विरोधी पक्ष जिन्कणार तर कसे?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

असै पैसे मिळवता येतात हे माहीत आहे. मिळवलेही आहेत.
पण हा धागा राजकारण ग्रुपात आहे. तुम्ही ज्यांच्यासाठी लिहितिय ते गुंतवणूक विभाग जास्त वाचतात.

करा अभ्यास पण गुंतवणूक जपून करा. लॉस होऊ देऊ नका. चांगल्या नफ्यासाठी शुभेच्छा. >>

धन्यवाद.
खरोखरच पैसे सुटताहेत.
हरियणाच्या निवडणूकीची मतदान टक्केवारीचा अभ्यास करून झाल्यावर, युती जिंकेल असं लक्षात आलं. तेच गृहीतक धरून सहळं चाललंय.

ते गृहितक चुकलं तर पैसे जरा जास्तवेळ अडकतील एवढाच धोका असेल. कारण कंपन्या चांगल्या आहेत. त्यामुळे कोणीही सत्तेवर आल्यास त्यातून मार्ग काढण्याचं त्या कंपन्यांचं कसब अफलातून असतं.
पण जर गृहितक बरोबर आल्यास रिवॉर्ड खूपच चांगले असेल.
सगळं रिस्क रिवॉर्ड रेशोवर चाललंय.

निवडणुकांत रस असणाऱ्या एखाद्या मराठी माणसाला उपयोग झाला तर तेवढीच समाजसेवा. Wink

शरद पवार गटाचं चिन्ह तुतारी वाजविणारा माणूस आहे. तुतारी नव्हे. लोकसभेत अपक्ष, इतर पक्षांना तुतारी चिन्ह देऊन यांची मतं फोडली होती.

भागवतजी जे काही शेअर मार्केटबद्दल लिहिताहेत ते अचूक आहे आणि राजकारणाला धरूनच आहे त्यामुळे भगवतजी तुम्ही इथेच लिहिलेलं बरं आहे जेणेकरून नवख्या माणसांना शेअर मार्केटमध्ये कसे ट्रेड करायचे ते कळेल. तुम्ही क्लास केला होता का भागवतजी की अनुभव आहे हा तुमचा?

सगळं अनुभवावर आधारित आहे. पैसे मिळवणे यापेक्षा थोडे पैसे मिळवत शिकायला आवडते.

निवडणुकांत पैशाचा महापूर वाहात असतो. पण सामान्य माणसाला त्यात काहीही मिळत नाही.
पण ज्याला शिकायची इच्छा आहे. थोडीफार शिल्लक आहे. तो पैसा मिळवू शकतो. जर असं व्हायला लागलं तर बरीच अभ्यासू माणसं सकारात्मक पध्दतीने निवडणूकांकडे पहायला लागतील. येनकेन प्रकारेण चांगली माणसं निवडणूकांकडे डोळसपणे पहायला लागली तर ते चांगलं लक्षण असेलं असं वाटतं.

गृहिणींना तर ही सुवर्णसंधी असू शकते. घरची गृहीणीला राजकारण समजायला लागलंय ही कल्पनाच मला आनंददायी वाटते.

अभ्यासू लोकं निवडणूका कधी येताहेत याची वाट पहायला लागतील.

आणि हो. असं झालं की वन नेशन वन इलेक्शन बोंबलंचकी. जाता जाता बऱ्याच जणांना एक मुद्दा देऊन गेलोय बरका.
Wink

https://x.com/Dev_Fadnavis/status/1856028158077923479

अहाहा ! काय भाषा!
राणे आणि सन्सची शिकवणी लावलेली दिसते.
यांच्या निम्म्या ट्वीट्स हिंदीत आहेत. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला. अभिजात भाषा सध्या प्रचलित असायलाच हवी, असं नाही म्हणजे चलनातून कमी करत चला का?

ग्रेट शामजी. इथे पोस्ट टाकत जा. तुमचे अनुभव वाचून आम्हाला पण शेअर मार्केट कुठे कुठल्या बातमीला रिएक्ट होईल ते कळतय__/\__

मायबोलीवर पक्षांच्या जाहिराती दिसू लागल्या. भाजप वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत देणार. अमित शहाजी आले असते तर गणपती, दिवाळी आणि होळी- गुढीपाडव्याला मोफत म्हणाले असते. म्हणजे आपण गॅस सिलिंडरवरची सबसिडी पूर्ण रद्द केली हे चुकले हे भाजपला उमगले का? काँग्रेसने राज्यात सरकार आले तर गॅस सिलिंडर स्वस्त असे याआधी काही राज्यांत जाहिरनाम्यात सांगितले होते. आताच्या केंद्रीय बजेट मधल्या आणि शिंदेंनी आणलेल्या अनेक योजना या काँग्रेसच्या न्यायपत्रात होत्या. अगदी शेतकरी सम्मान निधी ही काँग्रेसच्या न्यूनतम आय गॅरंटी योजनेच्या घोषणेनंतर आली होती.

भाजपला आपल्या विकासाच्या प्रारूप आणि व्हिजनवर विश्वास राहिला नाही. एकीकडे बटोगे तो कटेंगे आणि दुसरीकडे भाजप- आदर्णीय मोदीजींच्या शब्दांत रेवडी.

!अजित पवारांनी जगप्रसिद्ध भारतीय लोकशाहीची लक्तरे लॉन्ड्रीत धुवायला टाकली. मजा आया. अजून येउ द्या.पुभाप्रा! Proud

Biggrin हे पाकिस्तानात निवडणूक प्रचार करताहेत का? Rofl कमाल मनोरंजनाची गॅरेंटी लोक आहेत.

शाम भागवत, चांगल्या कंपन्या असल्या तर मार्केट खाली गेल्यावर गुंतवणुक करा सांगायला कोणी कशाला हवंय? सरकारच्या काही पॉलिसीज त्या इंडस्ट्रीला फायदेशीर/ हानिकारक असू शकतात पण असं स्पेसिफिक सोडलं तर चांगल्या कंपन्यात डिप वर गुंतवणुक करा हे अंतिम सत्यच आहे की!

शाम भागवत, तुम्ही इतका वेळ काड्यालावुन मजा घेताय वाटलेलं. मजा घ्यायला अजिबातच ना नाही. पण सिरियस गुंतवणुक सल्ले आणि अभ्यास करत असाल तर 'डे ट्रेडिंग' करा हे का कोणी सांगेल ते कळेना. तुम्ही खरंच डे ट्रेडिंग करता? तुमच्या पोस्ट फिअरमॉंगरिंग करणार्‍या वाटल्या. असो.

अरेरे पुन्हा येईन पूर्णच बिथरला आहे. पूर्ण वाट लावली ह्या माणसाने महाराष्ट्राच्या राजकारणाची. आणि एवढे करून अडीच वर्षे उप मुम च राहिला. ह्यांची सत्ता आली तर हा माणूस मुम झालेला पाहायला अजीबात आवडणार नाही. हा खरेच लोकनेता आणि जनाधार वाला नेता असता तर अजून काय काय केले असते ह्याचा विचार पण करवत नाही.

लंपन +१
केवळ ह्याच एका माणसामुळे भाजपची सत्ता येणार नाहीये.

भागवतजी तुमच्या पोस्ट वाचून खरोखरच पैसे सुटायला मदत होते. उद्या मार्केट काय असेल असं वाटतं तुम्हाला? आणि आजच्या मार्केटवर काय बोलाल?

शरद पवारांच्या घरी फडणवीस, अदानी, अजित पवार, अमितशाह अशी बैठक झाली होती २०१९ ला सरकार बनवण्यासाठी अस अजितदादांनी सांगितलं. कुणी कुणाल फसवले हे आता स्पष्ट झाले आहे. शिवसेनेने भाजपला फसवले असे तोंडावर आपटले आहेत.

पोस्ट फिअरमॉंगरिंग करणार्‍या वाटल्या तेच आहे हो. मविआ आली तर मार्केट पडणार म्हणून भाजपला मत द्या असा ते इथे प्रचार करताहेत. शेअर मार्केटचा काहीही संबंध नाही. वक्फ ला घबरा नी भाजपला मत द्या, इथे माबोवर चालणार नाही म्हणून नवीन टेक्निक. ( जसं काही माबोवाचून लाख दोन लाख लोकांच्क मतदान फिरणार आहे) खो खो.

शाम भागवत यांच्या पोस्टस पाहून त्यांना शेअरबाजारात पैसे लावायचेत कि कल्याण मटक्यावर ?
कि कुठल्या बेटिंग अ‍ॅपला ते शेअर बाजार समजलेत ?

आणि तिकडे पटाईत काका म्हणत आहेत. मतदान करा. कशाला? आपण रांगेत उभे राहून मतदान करावे आणि तिकडे अडाणी सरकार तोडणार जोडणार. वाहा रे लोकशाही.

भागवतजी तुमच्या पोस्ट वाचून खरोखरच पैसे सुटायला मदत होते. >>
माझ्या खात्यात असलेल्या शेअरमधे १ टक्का भाव खाली आला की. मी थोडे घेत राहतो. कोणताही नविन घेत नाही. जेंव्हां १ टक्का फायदा हेतोय असं वाटत तेव्हां काढून टाकतो. अन्यथा ते बाय ऑन डीप समजायचे. २० किंवा २३ ला विकून फायदा मिळवण्याचा प्रयत्न करायचा. आज निम्या पोझिशन स्क्रेअर ऑफ झाल्या. डे ट्रेडमधून आजचा एसटीटी + ब्रोकरेज वगैरेचे सगळे खर्च निघाले पाहिजेत हे धेय्य असते. जास्त मिळाले तर कोण नको म्हणतंय. Happy

उद्या मार्केट काय असेल असं वाटतं तुम्हाला >>
मी असली प्रीडीक्शन्स करत बसत नाही. भाव ही भगवान. उद्या जो खाली येईल तो आपला. सगळं बाजारावर सोपवायचं. तोच भगवान. _/\_
तसेच मागे घेतलेले जास्तीचे बाय ऑन डीप ४-५ टक्के जरी मिळत असतील तरी काढून टाकायचे. जास्ती प्रेमात पडत नाही. प्रेमात पडण्यासाठी मूळचे घेतलेले शेअर असतात ते कवटाळत बसायचे. Wink
हेच जर परत त्याच दिवशी खाली आले तर त्यात डे ट्रेड करायचा. त्यामुळे मी डे ट्रेड करतच नाही तर बाजाराच्या इच्छेने ते होत राहातात.

या सगळ्या धडपडी मागे एकच धेय्य असते की, माझी जी मूळ गुंतवणूक आहे ती बाहेर निघाली पाहिजे.

उदा. केआयसीएल नावाचा एक शेअर आहे. ते माझ्याकडे समजा १० आहेत. तर त्याची कॉस्ट सतत कमी झाली पाहिजे. म्हणजेच सतत गुंतवलेले भांडवल काढून घेत रहावयाचे. असो.

ही माझी बाजारावर सगळं सोपवायची पध्दत आहे. त्यामुळे टेन्शन नसते. घाई नसते. भाव खाली जाण्याची किंवा वर जाण्याची मी वाटही बघत बसत नाही. तर भावाप्रमाणे मी कृती करत जातो. अगदी निवांत आयुष्य जगतोय.
_/\_

शाम भागवत यांच्या पोस्टस पाहून त्यांना शेअरबाजारात पैसे लावायचेत कि कल्याण मटक्यावर ?
कि कुठल्या बेटिंग अ‍ॅपला ते शेअर बाजार समजलेत ?
>>
Happy

त्यावेळेस फक्त मतदान टक्केवारीवरून ट्रेंड शोधायचा प्रयत्न करत होतो. टक्केवारीच्या अभ्यासावरून निवडणूकीतली बराच गदारोळ बाजूला करून काही अंदाज बांधता येतात का ते शिकत होतो.

जर असे अंदाज बांधता येत असतील तर त्याचा उपयोग करून शेअरबाजारातून पैसे मिळवता येतील का ? ते आता तपासतोय.

इथे कुणालाही शेअरबाजारात पैसे गुंतवण्यात रस नाही. बोकलत आणि तुम्ही तुमच्या घरात जाऊन सागरगोट्या खेळत पैसे लावा.
खूप पैसे कमावले तर मायबोलीवर एखादे ड्युप्लेक्स विकत घ्या. विमानं घ्या. रेडे, हत्ती घ्या. एका धाग्यावरून दुसर्‍या धाग्यावर जायला उपयोगी होईल.
तुम्ही धार्मिक धागे पण काढलेत. त्यावर असाच वेगळ्या विषयाचा अभ्यास करूयात का ?

सहमत. सॅम भागवत ह्या धाग्यावर लईच पांचट प्रतिसाद देताहेत. बोर मारताहेत.

श्यामजी तुमचं भाव ही भगवान है हे वाचून हर्षद मेहता यांची आठवण आली बघा. बाकी तुमची मेंटलिटी एकदम मुरलेल्या ट्रेडरसारखी वाटते. तुमच्याकडून अजून शेअर मार्केटबद्दल जाणून घ्यायला आवडेल. शक्यतो तुम्ही लिहिता त्याला राजकारणाची जोड द्या म्हणजे या धाग्याचा उद्देश पण सफल होईल आणि हसत खेळत धनलाभ ही उक्ती पण सफल होईल.

Pages