विधान सभा निवड्णुक २०२४

Submitted by हस्तर on 15 October, 2024 - 16:44

चला विधान सभा पड्घम वाजले
मि कोण त्याही पक्षा चा प्रवक्ता नाही

पण विरोधकान् कडे महाराष्ट्र व्यापी अस मुद्दा नाहिये

पोर्षे , बदलापुर ,शिवपुतळा एवढी धग नाही राहीली

स्पर्धा परिक्शे चे घोटाळी पण जुने झाले

लाडकी बहीण जोरात चाललैये

विरोधी पक्ष जिन्कणार तर कसे?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

शाम भागवत सर, मला एखादा खोका पाठवा मी बोकलत सरांच्या सेबीतील मित्राला गुहाटी तिथून सूरत मग गोवा मग महाराष्ट्रात आणतो.

महायुतीला बहुमत मिळेल आणि विनोद तावडे मुख्यमंत्री होतील असं वाटतंय. >>> विनोद तावडे झाले तर आवडेल, पंकजा मुंडे झाली तरी आवडेल (दोघांच्यात तावडे जास्त आवडतात). होऊ देतील असं वाटत नाही. फडणवीस होतील असं जास्त वाटतंय (राणे नकोत ते ओरीजनल नाहीत) .

मी पण अपक्ष उभा राहणार आहे. कदाचित पुढचा मुख्यमंत्री मी असेन. >>> डोंबिवलीतून उभे राहणार का, भेटायला या सर्वाना. सोसायटीत तरी सांगेन तुम्हाला वोटिंग करा. मी नक्की देईन.

फडणवीस होतील असं जास्त का वाटतंय. एकतर मी पुन्हा येईन शब्द खरा करायचा असेल त्यांना परत राजही सगळीकडे म्हणतायेत ना ते होतील म्हणून. त्यामुळे मनसे च्या जास्त जागा आल्या तर ते आग्रह धरतील त्यांना करा आणि कोणीही होऊदे पण यावेळी अमित ठाकरे नक्की मंत्री होईल, असं वाटतंय.

बाहुबलीजी खोक्यात पॅक करून पाठवाल काय? खी खी खी. pj मारला मी.
अंजूजी मी रिक्षात बसून सगळीकडे मत मागणार आहे. खी खी खी परत एक pj

अमित ठाकरे नक्की मंत्री होईल, असं वाटतंय. गुजरातच्या मंत्रिमंडळात घ्यावं लागेल, कारण मविआ त्यांना मंत्रिमंडळात घेणार नाहीत. Happy
जलेबी ने फाफडा अमित ठाकरे आपडा

शरद पवारांना महाराष्ट्रांत गुंतवून ठेवले की देशातल्या राजकारणांत लुडबूड करायला त्यांना वेळ देता येत नाही. राजकारणांत असे देण्याघेण्याचेच व्यवहार असतात. अकेला देवेंद्र विरोधी पक्ष नेता म्हणूनही शरद पवारांना महाराष्ट्रांत गुंतवून ठेवायला पुरेसा ठरला. ही तर फडणवीसांची सर्वोच्च कामगिरी आहे >> फडणवीसांचेही भक्त तयार होऊ लागले आहेत. देवेंद्र फडणवीस हे २०१४ च्या आधी खिजगिणतीतही नव्हते. राज ठाकरेंच्या भाषेत "बसवलेला" माणूस. त्यांच्याकडे ना वक्तृत्वकला आहे, ना राजकीय चातुर्य. त्यांच्यामागे आहे ती मोदींची अमर्यादीत ताकद. या ताकदीच्या जोरावर ते महाराष्ट्रात काहीही करू शकतात. उद्या मोदी शहांची त्यांच्यावर खप्पामर्जी झाली तर ?

त्यांचा एक फॅन क्लब आहे. या क्लबतर्फे काही वर्षांपूर्वी शरद पवारांची जी इमेज होती तशी फ२० यांची बनवण्याचे प्रयत्न चालू असतात. पवारांबद्दल पत्रकार एक वाक्य नेहमी पेरायचे कि "पवारांच्या मनात काय चाललेय हे कुणालाही कळत नाही". हेच वाक्य आता काही फुटकळ पत्रकारांना हाताशी धरून फ२० यांच्याबद्दल प्रचारात आणण्याचा प्रयत्न झाला होता. या उत्साही फॅन क्लबने नंतर देवेंद्र फॉर पीएम अशी पवारांच्या धर्तीवर लाइन घेतल्यावर वरून कानपिचक्या आल्या आणि हे उद्योग थांबले.

खरं तर पवारांच्याच काय कुणाच्याही मनात काय चाललंय हे कुणीही सांगू शकत नाही. तसेच पवार ज्याच्या खांद्यावर हात ठेवतात त्याचा बाजार उठला असे समजायचे असे एक विधान प्रचलित झाले होते. यात कौतुक करण्यासारखे काहीही नाही. पवार बोलतात एक करतात भलतेच हा खरे तर गुण नाही. पण तो गुण असल्याप्रमाणे पेश केला गेला. हेच दुसर्‍या कुठल्याही नेत्याने केले तर त्याची विश्वासार्हता संपली आहे असे पत्रकार म्हणतात.

शेवटी राजकारण हा प्रचाराचा खेळ आहे. प्रचाराच्या खे़ळात माध्यमे हे महत्वाचे हत्यार आहे. त्यांना खूष ठेवण्यासाठी पवारांनी काही कसर ठेवली नाही. आजही १०% कोट्यातून मिळालेला फ्लॅट, महामंडळं, नेमणुका आणि असेच अन्य लाभ पदरात पडलेले वयस्कर पत्रक्कार पवारांचे कौतुक करताना थकत नाहीत.

विलासराव देशमुख यांनाही ही मॅनेजमेंट जमली होती. आर आर पाटील यांना पवारांनीच प्रमोट केलेले असल्याने त्यांच्याबद्दल चांगले लिहीले जाई. फ २० यांचे स्वतःचे असे काहीही नाही. उद्या भाजपमधे ते अल्पमतात आले तर पवारांसारखा पुलोद आघाडीचा धमाका ते करू शकतात का ? त्यांच्यात तेव्हढी हिंमत आहे का ? पवारांचे उपद्रवमूल्य आहे त्या जोरावर ते टिकून आहेत. भाजप उद्या फ२० यांना कधीही कचर्‍यात फेकून देऊ शकेल , त्या वेळी फ२० यांच्यासोबत एकही भाजपाई नसेल.

उत्तम प्रतिसाद रघु आचार्य. खरं तर फडणवीसांच्या जागी दुसरा नेता असता तर आता पुन्हा दुसऱ्यांदा मामू असता नी तिसऱ्यांदा ही बनला असता.

मला फडणविस अभ्यासू, व्हिजन असलेले व चांगले ॲडमिनीस्ट्रेटर नेता वाटतात. आणि खडसे व मुंडे या दोन्ही गटातर्फे सहमतीचा उमेदवार म्हणून त्यांना प्रदेशाध्यक्ष केले होते हा इतिहास लक्षात घेता त्यांच्यात स्पार्क आहे हे निश्चित. मुंडेच्या अकाली निधनानंतरच त्यांचा राजकिय उत्कर्ष झपाट्याने झाला हेही नाकारता येणार नाही.
त्यांनी त्यांच्या कॉंपिटीटर्सना एलिएनेट केले. अर्थात कॉंपिटीटर्सनी स्वतःच्या वागणूकीने त्यात मोलाची भर घातली. खडसेंकडे उत्तम पोर्टफोलिओज् असून आपले राजकिय वैषम्य चुकीच्या ठिकाणी वारंवार प्रोजेक्ट करून वैराला हातभार लावला. पंकजा मुंडेनी वडीलांचे नाव यापलिकडे अजून काहीही प्रुव्ह केलेले नाही ना राज्यपातळीवर ना राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्या म्हणून. विनोद तावडे यांना दिल्लीवरून तिकीट नाकारण्यामागे फार सुरस व सोमिवर न लिहीण्यासारखी कथा ऐकली आहे. पण त्यांनी स्वतःला सांभाळले व उत्तरांचलच्या निवडणूकीतून जोरदार कमबॅक केले. ते महाराष्ट्रात दिसत नसले तरी राष्ट्रीय पातळीवर विनोद तावडे व्हिजीबल आहेत व गरज पडल्यास त्यांचे महाराष्ट्रात सन्माननीय पुर्नवसन केले जाईल. चंद्रकांत पाटील उत्तम संघटक म्हणून ओळखले गेले असले तरी सत्ताकारणात त्यांची छाप दिसली नाही.
फडणविसांच्या प्रगतीतला मुख्य अडथळा मला वाटतो ते म्हणजे सत्ता उत्तम राबवून त्याचा राजकिय फायदा स्वतःला व फडणविसांना करून देतील असे विश्वासू सहकारी (गिरीश महाजन सोडल्यास). टीम फडणवीस मधले आत्ताचे बरेचसे नेते सत्तेच्या आशेने तिथे आहेत. सत्ता गेल्यास किती काळ ते तिथे राहतील हे सांगणे कठीण.
इतर पक्षात शिंदे हे मोलाचे सहकारी होते, अजूनही राहतील. पण त्यांनी मुमंपदाची चव चाखलेली आहे. ते आता अधीन राहणार नाहीत.
अजित पवार यांच्याबरोबर फडणविसांचे वैयक्तिक संबंध उत्तम आहेत. सौ. फडणविसांच्या एका केससंदर्भात विधानसभेत अजितदादांच्या पुढाकाराने झालेली चर्चा हे उत्तम उदाहरण. पण अजितदादा स्वतः राजकियदृष्ट्या स्ट्रॉंग झाल्यावर फडणविसांना निर्वेध मुमपद उपभोगू देतील ही शक्यता शुन्य कारण अजितदादांची महत्वाकांक्षा महाराष्ट्राला ठाऊक आहे.
उत्तम काम करणारे डेडीकेटेड सहकारी ही महाराष्ट्रात फडणविसांची कमकुवत बाजू आहे. ती कशी सावरून घेतात वा दिल्लीला जाऊन नवा डाव मांडतात हे पहाणे इंटरेस्टींग असेल. फक्त त्यांचे पृथ्वीराज चव्हाण किंवा निर्मला सितारामन नको व्हायला.

माझे मन.

माझा मुद्दा फ२० यांची तुलना पवारांशी करण्याबद्दल आहे. मी कुठेही काँग्रेसची भलावण केलेली नाही. भाजपत गडकरी होते कि सक्षम. भाजप वाढवण्यात सुद्धा फ२० यांचे पूर्वसुरींइतके योगदान नाही. ते रेशीमबागेच्या जवळचे आहेत. माजी डाळमंत्री शोभना फ२० यांचे पुतणे आहेत.

त्यांची तुलना बाबासाहेब भोसले, निलंगेकर अशा कर्तृत्व नसलेल्या "बसवलेल्या" मुख्यमंत्र्यांशी करता येईल. मोदी देखील इंदिरा गांधींचे राजकारण कॉपी करतात. इंदिरा गांधी मास्टरस्ट्रोक मारायच्या म्हणून यांच्या काळात मास्टरस्ट्रोकचं उधाण आलं. राज्यात आपल्याला डोईजड होणारं नेतृत्व नको हे काँग्रेसचं राजकारण मोदींनी तंतोतंत अंमलात आणलं म्हणून सक्षम नेत्यांना मुमपद मिळालं नाही. नाहीतर अनेक राज्यात घोटाळे बाज मुम आहेत कि. पण ते मोदींपेक्षा इतके वरचढ आहेत कि मोदी त्यांना हटवू शकत नाहीत. कर्नाटकात येदुयेरप्पा या भ्रष्ट माणसाला सीएम बनवलं होतं. अजित पवार चाललेच.

काँग्रेसच्या याच राजकारणामुळे पवारांसारखे नेते बाहेर पडले. भाजप त्याच मार्गावर आहे.

रआ तुम्ही कॉंग्रेसची भलामण करता असं मी म्हटलं नाही. गैरसमज नको. मी फक्त फ२० विषयी माझं मत लिहिले.

पवारांशी तुलना मी व्हिजन व ॲडमिनीस्ट्रेशनच्या बाबतीत करीन.
पवारांचा मोठा ॲडव्हांटेज की त्यांनी जागोजागी त्यांचे विश्वासू सरदार उभे केले व सत्तेचे सर्व लाभ त्यांच्या कार्यकर्त्यांकडे पोहोचवले. हे सरदार बरेचदा पवारांच्या पासंगाला पुरणारे नव्हते त्यामुळे कॉंपिटि़शनचा सवाल नव्हता. पण आपल्यापेक्षा मोठा होऊ पहाणाऱ्या नेत्यांचे पंख पवारांनी शिताफीने छाटले. म्हणून जिंकून येणाऱ्या नेत्यांचं कोंडाळं असा आरोप राष्ट्रवादीवर झाला तरी पवारांचे स्टॅचर बराच काळ अबाधित होते. पवार मास लीडर आहेत त्यामुळे पवारांचे साहित्यिक, उद्योजक इ. वर्तुळात समर्थक आहेत. सत्तेच्या वळचणीचा लाभ त्यांना झाला असेलच. पवारांना त्यांच्या ऍडव्हांटेजेसचा योग्य उपयोग करता आला का याबद्दल शंका आहेत.
मोदी-शहा सेकंड रंग लीडरशिप निर्माण करण्यात कमजोर ठरलेत. पण संघ अचानक सरप्राईज देण्यात अजून तरी यशस्वी ठरतेय असं वाटतं. खुद्द मोदी हे संघाचं सरप्राईज होतं.
साधनशुचितेचा आग्रह धरत सत्ता मिळवणारा भजप मागे पडलाय आणि कुठल्याही प्रकारे सत्ता याबाबतीत भाजपची कॉंग्रेस झालीय. हे बदलत्या सामाजिक वर्तमानाचं रिफ्लेक्शन आहे की केडरपर्यंत पोहोचलेली सत्तालोलुपता हे सांगता येणार नाही.

<मला फडणविस अभ्यासू, व्हिजन असलेले व चांगले ॲडमिनीस्ट्रेटर नेता वाटतात> तिम्ही बाबतीत ओव्हरहाइप आहे. अभ्यासू विरोधी पक्षात असताना दिसले तसे सत्तेत आल्यावर दिसले नाहीत.
यांची (एकंदरित राइट विंगर्सचीच ) विकासाची व्हिजन भव्य दिव्य चकचकीत आधुनिक करण्यावर आणि करून दाखवण्यावर जोर देते. तिथे लोकांचा आणि पर्यावरणाचा विचार नसतो. याची फळं पुढे जाऊन भोगावी लागतात.
आता पुणे पोर्शे प्रकरण आणि डोंबिवली बालवाडी अत्याचार प्रकरणात प्रशासनावरची पकड दिसली नाही म्हणायचं की पकड तिथे मुद्दाम सैल केली? फडणवीस सत्तेत नसतानाही प्रशासन आणि विशेषतः पोलिस खात्यातील लोक त्यांच्या संपर्कात होते, असं मानायला जागा आहे. मनसुख हिरेन खून आणि रश्मी शुक्ला. उद्धव ठाकरे याबाबत सपशेल फेल झाले.

बाकी फडणवीसांची विश्वासार्हता शरद पवारांपेक्षा ही कमी आहे. अजित पवार चक्की पिसिंग, राकॉ शी युती त्रिवार नाही नाही नाही, हे शब्द त्यांचा जन्मभर पिच्छा पुरवतील. अमित शहांचं त्यांचं फार बरं नाही. महाराष्ट्राची सत्ता मिळवण्यासाठी त्यांच्याकडून डर्टी जॉब करून घेतला. मग त्यांना गप उपमुख्यमंत्री व्हा म्हणून सांगितलं. एकनाथ शिंदे त्यांच्या अपेक्षेपेक्षा बरेच हुशार निघाले किंवा ऑन द जॉब त्यांच्याकडून त्यांना नकळत शिकले. तोच दुसरे अजित पवार डोक्यावर बसवून घ्यावे लागले.

पृथ्वीराज चव्हाणांना पुन्हा पदं मिळाली नाहीत तरी त्यांना कोणी केरात टाकलंय असं झालं नाही. काँग्रेसकडे तेव्हा सत्ता नव्हती. आणि एकदा मुख्यमंत्री झाल्यावर दुसर्‍याच्या हाताखाली मंत्रीपद हा अपमान ठरला असता. फडणवीसांचं भविष्य फार उज्ज्वल वाटत नाही. त्यांनी इतरांचे पंख कापले. त्यांचे पंख कापणारे त्यांच्या वर आहेत. मोदीशहांना महत्त्वाकांक्षी , आपल्यापेक्षा हुशार (वाटणारे ) आणि लोकप्रिय होणारे नेते चालणार नाहीत.

पृथ्वीराज चव्हाण हे दरबारी राजकारणी असले तरी ते कॉंग्रेसचे नेते म्हणून स्विकारले जाऊ शकतात. फ20 पेक्षा ते ही काकणभर वजनदार म्हणता येतील.

वर्गात एक हुषार मुलगा असतो जो शिक्षकांच्या खूप जवळ असतो. वर्गातील मुलांमधे तो मिक्स होत नाही. सतत शिक्षकांच्या कौतुकाला, शाबासकीला आसुसलेला असतो, इतर मुलांच्या तक्रारी करून "बघा मी कसा सर्वगुणसंपन्न आहे" हे ठसवायला बघतो, परीक्षेत कुणाला उत्तर सांगत नाही, लगेच नाव सांगतो... तो विद्यार्थी म्हणजे फ20.
थोडक्यात सायलेन्सर.

आणि जो वर्षभर टवाळक्या करतो, मित्र जमवतो, परीक्षेत कॉपी मारतो, प्रसंगी फ 20 च्या तक्रारीवरून अडचणीत येतो पण माफी मागून प्रकरण मिटवतो.. असा मुलगा पुढे राजकारणात खूप पुढे जातो. त्याला फ20 भेटला तर मागचं लक्षात न ठेवता एखाद्या पेपर मधे चिकटवून देतो आणि त्याच्या अभ्यासू वृत्तीचा फायदा राजकारणात करून घेतो..
तो अजित पवार किंवा शरद पवार.

निव्वळ अभ्यासू असणाऱ्यांना राजकारणात पैकीच्यापैकी गुण मिळत नाहीत. त्यासाठी विद्वान उपलब्ध असतात. आयोग कशासाठी नेमतात?

मग नक्की काय ठरलं?
मविआ येणार की नाही?
Happy
सध्यातरी मविआ येणार असं बाजार म्हणतोय.
संध्याकाळी युती आली तर बाजार वर जाईल.
मस्त डे ट्रेड होईल.
Happy

महाराष्ट्राचा मुख््यमंत्री कोण होणार यात अदाणीला रस असणे समजू शकतो. पण त्यावर अख्खा शेअरबाजार हेलकावे खातो हे जरा जास्तच कल्पना रंजन होतं.
शाम भागवत, याआधी तुम्ही इतरांना उद्देशून कधी काही लिहीत नसा. फक्त स्वतः:चे म्हणणे मांडायचात. त्यात conviction दिसायचं.
त्याबद्दल तुमचं कौतुक व्हायचं. आता काय झालं?

शाभा, गुंतवणूक विभागात तुमच्या कामाचा धागा असेल. बघा शोधून.
अहो, मी चेष्टा करत नाहीये. खरचं मी निवडणूक हेलकावे व शेअरबाजार याचा अभ्यास करतोय.
या हेलकाव्यांचा अंदाद घेण्यासाठी इतर साईट बरोबरच इथले व मिपावरचे धागे बघतोय.
यांतही कुणी सवंगडी मिळतोय का ते बघतोय.

पहिला विद्यार्थी फ२० बरोबर. दुसरा विद्यार्थी शरद पवार बरोबर. अजित पवार नाही. ते मला एक घाव दोन तुकडे प्रकारातले वाटतात. किंवा पृथ्वीराज चव्हाणांच्या शब्दात फारच मनमोकळे.
पृथ्वीराज चव्हाणांना काँग्रेसचा नेता म्हणून विशेषतः मुम म्हणून अंतर्गत मान्यता मिळेल असे मला वाटत नाही. वरून थोपवल्यास ठीक आहे. पण आता वर मनमोहन सिंग नाहीत, राहुल गांधी आहेत. ते बाळासाहेब थोरात प्रिफर करतील. नाना पटोलेंचा दोघांनाही विरोध असेल. नाना धाडसी असावेत पण धोरणी नाहीत, लूज कॅनन वाटतात. आघाडी आलीच तर मुम शरद पवारांच्या मर्जीचा असेल आणि तो पृथ्वीराज चव्हाण नक्कीच नसेल.

अजित पवार गटाला घड्याळ हे चिन्ह वापर ण्यापासून रोखण्यासाठी शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात.

ती नुसती स्मोकिंग इज इन्ज्युरियस सारखी वॉर्निंग हा विनोद आहे. चंद्रचुडांच्या लेगसीत पक्षफुटीचे अनिर्णित खटले सगळ्यात वर.

आता काय झालं?>>

माझा अजूनही मतदान टक्केवारीवरून अभ्यास चालूच आहे. त्याच्या जोडीला शेअरबाजार काही सुचवतो आहे का याचाही अभ्यास करतोय. सर्व्हे येतात. त्यावर आधारित काहीतरी जास्त शिकायला या इथल्या निवडणूकींच्या धाग्यावरच मिळतं. कारण सगळ्यांचं वाचन व डोळे उघडे ठेऊन आजूबाजूला बघण्याचं कसब खरोखरच वाखाणण्यासारखं आहे.
फक्त सगळ्यात पक्षानिभेष व व्यक्तिप्रेम बाजूला करता आलं की झालं.
_/\_
फक्त एकच मोठा फरक आहे. यावेळच्या अभ्यासात थोडेफार पैसे सुटताहेत. Happy
_/\_

मी पण चेष्टेत नाही सांगितले.
गुंतवणूक विभागात शेअरबाजार वर खाली जाण्याची कारणे म्हणून निवडणूकांकडे पाहत असाल तर वेगळा धागा काढा. हा तुम्हाला शेवटचा प्रतिसाद

अजित पवार गटाला घड्याळ हे चिन्ह वापर ण्यापासून रोखण्यासाठी शरद पवार गट सर्वोच्च न्यायालयात.
>>>>
आता प्रचाराला सुरुवात झाल्यावर निवडणूक चिन्ह बदलणे शक्य आहे का? मला वाटलेले आतापर्यंत तुतारी सर्वत्र पोहोचलीय. लोकसभेला जसा डिसऍडवान्टेज होता तसा आता राहिलेला नाही. हे कदाचित कुंपणावरल्या नेत्यांना डिस्करेज करण्यासाठी केलेले असेल.

रोज किंवा तासाला तासाला सर्व्हे काय म्हणतोय हे पाहुन शेअर बाजार खालीवर होतोय?
करा अभ्यास पण गुंतवणूक जपून करा. लॉस होऊ देऊ नका. चांगल्या नफ्यासाठी शुभेच्छा.

मग गुंतवणूक विभागात लिहिणंच योग्य नाही का?
तिथे फंडामेंटल व टेक्निकल ॲनॅलिसिसच्या सहाय्याने चर्चा चालतात. त्या वेगळ्या.
तुम्हाला त्रास होत असेल तर तसं सांगा.
मला कोणाला त्रास देऊन पैसे मिळवायचे नाही आहेत. Wink

पण असेही पैसे मिळवता येऊ शकतात असा वेगळा विचार मांडायचा होता.
असो.

Pages