विधान सभा निवड्णुक २०२४

Submitted by हस्तर on 15 October, 2024 - 16:44

चला विधान सभा पड्घम वाजले
मि कोण त्याही पक्षा चा प्रवक्ता नाही

पण विरोधकान् कडे महाराष्ट्र व्यापी अस मुद्दा नाहिये

पोर्षे , बदलापुर ,शिवपुतळा एवढी धग नाही राहीली

स्पर्धा परिक्शे चे घोटाळी पण जुने झाले

लाडकी बहीण जोरात चाललैये

विरोधी पक्ष जिन्कणार तर कसे?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

https://x.com/PTI_News/status/1855899698399478146

If BJP forms govt in Jharkhand, no youth will migrate to other states: Amit Shah in Seraikela rally

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये भाजपचं सरकार कधी बनेल?

ऑक्टोबर २०२३ ते सप्टेंबर २०२४ या काळात ९०४१५ भारतीय अवैध मार्गाने अमेरिकेत प्रवेश करताना पकडले गेले. यातले निम्मे गुजरात या राज्यातून आले होते.

गुजरात हे नाव या आधी कुठे बरं ऐकलंय? अरे ! २०१४ मध्ये गुजरात मॉडेलच्या जाहिरातीवरच तर आदर्णीय मोदीजी पंतप्रधान झाले.

अमेरिकेत बेकायदेशीरित्या प्रवेश घेणार्‍यांमधे ५० % गुजरातचे आहेत. तिथे भाजपाचे सरकार कधी येणार ?

https://timesofindia.indiatimes.com/india/10-indians-per-hour-tried-to-e...

TOI च्या बातमीमधे ऑक्टोबर २०२३ - सप्टेबर २०२४ या वर्षभरांत ९०, ४१५ भारतीयांना बेकायदेशीर पणे अमेरिकेत प्रवेश करतांना अटक झाली. यापैकी ५० % गुजरात राज्यातून आहेत.

एकाच राज्यातून एव्हढा मोठा लोंढा देशातून बाहेर का पडत आहे? दुखरी बाजू समजण्याचा प्रयत्न.

आदर्णीय मोदींची गुजरात व्हिजन
हे वरचे अवैध रीत्या अमेरिकेत प्रवेश करताना पकडले गेलेत. मेल्याच्याही बातम्या होत्या. आता जे पकडले गेले नाहीत, ते किती असतील? तसंच इतर देशांत घुसपैठ करणारे किती असतील?
भारताचे नाकरिकत्व सोडणार्‍या गुजरात्यांची संख्या एका वर्षात दुप्पट
निर्वासित म्हणून अमेरिकेकडे शरण मागणार्‍या भारतीयांची संख्या एका वर्षात ४३०० वरून ४१३०० झाली. यातही निम्मे गुजरातचे.

मला तर वाटलं होतं आदर्णीय मोदीजी पंतप्रधान झाल्यावर परदेशातून भारतात परतोनि पाहणार्‍यांची रीघ लागेल. पण चित्र तर उलटच आहे. Lol

गुजरातमध्ये एकंदरीत परदेशाची आणि विशेषतः अम्रिकेची प्रचंड क्रेझ आहे. खोटं वाटेल पण आमच्या दूरच्या नातेवाईकांपैकी एका उच्चविद्याविभूषित मुलाची सुशिक्षित ममव आई सुमारे 30 वर्षांपूर्वी अवैध मार्गाने यू एसला गेली होती. बरं मुलगा इतका व्यवस्थित सेटल होत होता की काही महिन्यांनी/वर्षांनी त्यांना विजा मिळालाच असता.
दादर + पार्ले + पुण्यापेक्षा जास्त माणसे एकट्या बडोद्यातून गेली असतील. आणि गुजराती एकमेका साह्य करत कुटुंबच्या कुटुंब परदेशात नेतात. आमच्या गुजराती इलेक्ट्रिशिअनचा भाऊ त्याच्या मेव्हण्याला भेटायला दरवर्षी ६ महिने इंग्लंडला जातो आणि तिथे चक्क काम करतो. वर्क विजा नाही की कसले सर्टिफिकेशन नाही. सहा महिन्यांनी परत मुंबईला. आणि या कामाच्या जोरावर त्याने वापी का सुरतला दुमजली बंगला बांधलाय.

मोदीच काय ब्रह्मदेवसुद्धा हे बदलेल असं वाटत नाही. मोदींची भलामण नाही पण ही एवढी क्रेझ मला मजेशीर वाटते म्हणून लिहिलेय.

आजपण शेअर बाजार मस्त खाली आलाय. पण सटकन खाली येत नाहीये. बळजबरी केल्यासारखा खाली येतोय. २३ तारखेपर्यंत तरी मविआ जिंकायलाच पाहिजे.

फोटो से दूर रखने के लिए बीजेपी नेता और पूर्व केंद्रीय मंत्री राव साहेब दानवे ने कार्यकर्ता को मारी लात

बिचारे भाजप कार्यकर्ते. सोशल मीडियावर भाजपसाठी लढणार्‍या स्वयंसेवकांना भाजप सोशल मीडिया पदाधिकारी लिगल नोटिसा पाठवतात. प्रत्यक्षात प्रचार करणार्‍यांना भाजप नेतेच लाथा घालतात.

त्या कार्यकर्त्याने "मी त्यांच्या कानात शर्ट मागुन अडकलाय असं त्यांना सांगितलं, त्यासाठी त्यांनी पाय हलवला. त्यावरुन लाथ मारली असा चुकीचा व्हिडिओ विरोधक व्हायरल करत आहेत." असे स्पष्टीकरण दिले आहे.

शेअर बाजार माहित नाही. पण तुमचा आवडतीचा जगदगुरु रुपया त्याची घसरण चालू आहेच. मला वाटत हे सगळे त्या सोरोसचे कारस्थान असणार.
पण एक लक्षात असूद्या
चढ़ता सूरज धीरे धीरे ढलता है ढल जायेगा

यावेळी मविआ येईल असं वाटत तरी नाहीये. पर्सनली मला भाजपचा मुख्यमंत्री बघायला आवडेल. फक्त भाजप ओरिजनल व्हावा, गेली अनेक वर्ष आयात केलेल्यांपैकी नको. गडकरीना पंतप्रधान नाही करत तर मुख्यमंत्री तरी करा. त्यांना पूर्वीच बघायला आवडलं असतं. करणार नाहीत हे महितेय मला. मोस्टली फडणवीस होतील भाजपचा झाला तर, तेही आवडतात पण गडकरी झाले तर जास्त आनंद होईल.

फडणवीस, शिंदे, पवार, ठाकरे यापेक्षा वेगळं कोणी झालं तर उत्तमच आहे. विनोद तावडे जे काही पूर्वी बातम्यात वाचलंय त्यावरुन मनात चांगली प्रतिमा आहे. अर्थात मोदीशा काय गोंधळ घालायला लागतील तावड्यांना त्यातुन भजं व्हायचं ते होईलच.
बाकी महाराष्ट्रात पक्ष बिक्ष काही नसतोच. उमेदवार कुठुनही कुठे जातात. ह्या वरच्या चार लोकांना घरी बसवलं तर भारीच की.

ओपिनियन पोलचे निक्काल आले. महायुती सरकार पक्के.
https://ianslive.in/maha-opinion-polls-bjp-led-alliance-seen-overpowerin...
मुख्यमंत्री म्हणून ४०% लोकांची पहिली पसंती एकनाथ शिंदेंना, २१% लोकांना उद्धव ठाकरे आवडतात आणि १९% लोकांना फडणवीस आवडतात.

यावेळी मविआ येईल असं वाटत तरी नाहीये. >> असं काही नाही. अनप्रेडीक्टेबल निवडणूक आहे इतकंच. फक्त डायहार्ड समर्थकच पक्षाच्या मागे आहेत. सामान्य मतदार एकूण एक पक्षाला शिव्या देत आहे.
ध्रुवीकरण कोण काटेकोरपणे करतंय यावर निकाल लागेल. माझ्या मते भाजपला स्वतःला बहुमत मिळणार नाही याची संपूर्ण खात्री असेल. निकालानंतर जोडतोड हेच त्यांचे ध्येय दिसतेय. ५ - १० जागा मिळवणारे पक्ष, गट, अपक्ष यांना प्रचंड महत्व येईल.

गडकरीना पंतप्रधान नाही करत तर मुख्यमंत्री तरी करा. >>

जो पर्यंत शरद पवार महाराष्ट्रात आहेत तो पर्यंत महाराष्ट्राची सूत्र फडणवीसांकडेच राहणार. शरद पवारांशी पंगा घ्यायला बाकी कुणी तयार नसल्याने फडणवीसांना स्पर्धाही नाहीये. Happy

शरद पवारांना महाराष्ट्रांत गुंतवून ठेवले की देशातल्या राजकारणांत लुडबूड करायला त्यांना वेळ देता येत नाही. राजकारणांत असे देण्याघेण्याचेच व्यवहार असतात. अकेला देवेंद्र विरोधी पक्ष नेता म्हणूनही शरद पवारांना महाराष्ट्रांत गुंतवून ठेवायला पुरेसा ठरला. ही तर फडणवीसांची सर्वोच्च कामगिरी आहे.
Happy

पवारांच्या पश्चात फडणवीस केंद्रांत अर्थमंत्री होतील असं वाटतंय. कारण वय ही फडणवीसांची जमेची बाजू आहे.

आदरणीय मोदींची प्रचार सभा आहे पुण्यात ट्रॅफिक मध्ये अडकलोय सध्या....आज भाग्याचा दिवस. वाहतूक दुसरीकडे वळवली....त्यांच्यामुळे आज पुणे फिरायला मिळतंय.नवीन रोड बघायला मिळत आहेत.

पराभव दिसू लागल्याने भाजपेयी बिथरलेत. शेवटचा डाव म्हणून खोट्याचा आधार घेऊ लागलेत. शेफाळी नामक चेपू वर भक्तांचा प्रचंड फैन फॉलोअर्स असणाऱ्या बाईंनी लोकरंग की कुठल्यातरी उद्धव ठाकरेंच्या नावाची पेपरची खोटी बातमी आपल्या चेपू भिंतीवर पोस्टवली होती. त्या खाली तुषार दामगुडेंची कमेंट होती की ही बातमी खोटीय. दोन दिवस ती कमेंटच डीलीट करुन ठेवली, आता पोस्टच डीलीट केलेली दिसत आहे. Happy

२०२९ साली अमित शहा ह्यांना पंतप्रधान बनायचं आहे. त्यासाठी पायात येऊ शकणारे अडथळे ते हळूहळू बाजूला करत आहेत. महाराष्ट्र जिंकला तर जातीचा मुख्यमंत्री करा असे संघाचे जातपात आजीबात न मानणारे लोक रेटा लावतील. संघी लोकांच्या जातीचा मामू बनला आणी ५ वर्षे काढली तर २०२९ ला तेच संघांचे जातपात न मानणारे लोक पंतप्रधान पदाचा उमेदवार करा म्हणून पुन्हा धोषा लावतील. हे न कळायला अमित शहा दूधखुळे नाहीत. लोकसभेला यूपी आणी महाराष्ट्रात पराभव करुन घेऊन त्या योगी अणि ह्यांचे अनुक्रमे काटे काढले आहेत. ही कसर आपण बंगाल, हरियाणा नी इतर राज्यातून भरून काढू असा शहांचा अंदाज असावा पण ममताने भाजप्यांच्या तंगड्या हातात धरून त्यांना उलथवून दिले. आता मुद्दाम एकाच टप्प्यात निवडणूक घेऊन चटकन भाजपचा पराभव करवून घेऊन अमित शहा नी मोदी ५ वर्षे भाजपला विरोधात बसवतील. ठरवलं असतं तर राज्य जिंकण्यासाठी खिशातल्या निवडणूक आयोगाला ५ ते ७ टप्प्यात निवडणुका घेऊन मोदीना राज्यभर खेळू बागडू दिलं असत. अगदी २८८ मतदार संघातही मोदींच्या सभा होऊ दिल्या असत्या.

अमित शहा अडवाणी आहेत. मोदींनंतर राहुल गांधी, त्यानंतर केजरीवाल.
भविष्यवाणी नाही, अंदाज.

येऊ द्या अजून.
उद्या बाजार अजून पडायला हवा.
Happy

आदरणीय मोदींची प्रचार सभा आहे पुण्यात ट्रॅफिक मध्ये अडकलोय सध्या....आज भाग्याचा दिवस. तिकडे सैनिक बॉर्डर वर उभे राहून देशसेवा करताहेत नी तुम्ही देशासाठी साधे ट्रॅफिक मध्ये अडकू शकत नाहीत? पाकिस्तानात चालते व्हा. जयतू हिंदुराष्ट्रम. जय मोदी शहा फडणवीस.

शास्त्री रोडवरूनच आलो. साडेपाच वाजता रस्ते मोकळे होते.
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अडवले होते. पोलीस फौजफाटा मोठा असल्याने मी अडकलो नाही.
राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या इकडून तिकडे रस्ता ओलांडत होत्या.
तोपर्यंत वाहने थांबत होती. पण गर्दीच नसल्याने या उपद्व्यापाचा हेतू समजला नाही.

तट्टाणी न्यूज नाहीत. अंदाज. येऊ द्या काय त्यात ?

मोदी १००० वर्षे जगणार आहेत असे काही अंदाज असतील तर आम्हाला कळवा. Happy

Pages