विधान सभा निवड्णुक २०२४

Submitted by हस्तर on 15 October, 2024 - 16:44

चला विधान सभा पड्घम वाजले
मि कोण त्याही पक्षा चा प्रवक्ता नाही

पण विरोधकान् कडे महाराष्ट्र व्यापी अस मुद्दा नाहिये

पोर्षे , बदलापुर ,शिवपुतळा एवढी धग नाही राहीली

स्पर्धा परिक्शे चे घोटाळी पण जुने झाले

लाडकी बहीण जोरात चाललैये

विरोधी पक्ष जिन्कणार तर कसे?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अभ्यासू फडणवीस या निवडणुकीला धर्मयुद्ध म्हणताहेत. उलेमांनी मविआकडे २०१२ पासूनच्या दंग्यां संबंधीच्या केसेस मागे घेण्याची मागणी केली आहे असा दावा. बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है हा ऐक्यासाठीचा प्रयत्न पण भारत जोडो विघातक,

कर्जत जामखेड येथील प्रचारसभेत भाजप नेता पाशा पटेल यांनी अभिजात मराठी भाषेचा आणि माताभगिनींचा आदर करणार्‍या महाराष्ट्रीय संस्कृतीचा सुंदर नमुना पेश केला आहे. जोडीला रोमहर्षक हातवारे .इच्छुकांनी फक्त पाशा पटेल गुगल करा. व्हिडियो मिळतील.

मुस्लिम धर्मगुरूंनी फतवा काढलेला आहे, सकाळचा नमाज झाल्यानंतर मतदानाला रांगेत उभारायचं.गर्दी प्रचंड प्रमाणात दिसली पाहिजे, त्यामुळे हिंदू गर्दीत उभे राहणार नाहीत.
मतदान झाल्यानंतर देखील गर्दी करून थांबायचे, म्हणजे हिंदूंना अजूनही गर्दी आहे असे वाटेल आणि ते मतदानाला येणार नाही.त्यामुळे, वेळ लागला तरी चालेल; पण न चुकता मतदान करा.

असे भरपूर बालिश फॉरवर्ड येत आहेत Lol

कर्जत जामखेड येथील प्रचारसभेत भाजप नेता पाशा पटेल यांनी अभिजात मराठी भाषेचा आणि माताभगिनींचा आदर करणार्‍या महाराष्ट्रीय संस्कृतीचा सुंदर नमुना पेश केला आहे. जोडीला रोमहर्षक हातवारे .इच्छुकांनी फक्त पाशा पटेल गुगल करा. व्हिडियो मिळतील. >>>> कशाला उगाच गळे काढतायं? 'मुसलमानांबद्दल आणि त्यांचं लांगुलचालन करणाऱ्या काँग्रेस बद्दलच बोलले ना? आम्ही सुद्धा घरात मुसलमानांबद्दल  बोलताना असेच हातवारे करतो, हिंदू संस्कृती आहे ती' असे ठणकवणारे समर्थक यत्र-तत्र सर्वत्र सापडतील तुम्हाला, उगाच माबो वर या विषाची परीक्षा घेऊ नका, २०४७ च्या हिंदुस्थानाचा रोडमॅप ठरलेला आहे, तुम्ही झारीतले शुक्राचार्य बनू नका. 

जे जे चांगले ते ते सगळं ओरबाडून गुजरातला न्यायचं.
आता सर्वसामान्यांच्या दृष्टीने अतिशय दुय्यम मुद्दा असला तरी..
अप्रोच, ऍटिट्यूड , पद्धत दर्शवण्यासाठी महत्वाचा आहे.
इंटरनॅशन बँड 'कोल्डप्ले' चे मुंबई मध्ये दोन शो होणार होते. जे काही मिनिटातच फुल्ल झाले.
त्यानंतर तिकिटं ब्लॅक वगैरे करण्याचे आरोप झाले.
नंतर चौकशी सुरु, ईडी आली,बुकमायशो ची चौकशी वगैरे... आणि आता कोल्डप्ले चा अजून एक शो अनांउन्स झाला आहे. कुठे ?
अहमदाबाद.
कोल्डप्ले च्या शो साठी दिल्ली, चेन्नई, बंगलोर, कोलकाता, कोची, हैदराबाद, गोवा, पुणे, सिक्कीम, शिलॉंग, चंदीगड वगैरे सारखी सगळी शहरं सोडून,
अहमदाबाद ?
अमेरिकेत लपून छपून पळून जाणे, आणि परदेशात मेट्रो मध्ये दांडिया खेळणे म्हणजे इंग्रजी संगीताची आवड वा समज असणे... असे नसते.
त्यांना समजलं की गर्दी होणार,
म्हणून arm twisting करत शो गुजरातला नेला.
म्हणजे विमानाची तिकिटं विकता येतील, हॉटेल वाल्याना फायदा वगैरे.
मुद्दा समजून घ्या,
भारतभरात आणि विशेषतः महाराष्ट्रात जे जे चांगलं, फायद्याचं दिसतं.....ते ते ओरबाडायचं.
बस्स!
एकच संधी आहे महाराष्ट्राकडे.
Sooraj Samant
https://www.facebook.com/share/p/1F1L199T21/

ही निवडणूक सुरुवातीला भाजपच्या बाजूने वाटत होती . पण गेल्या दोन दिवसात पूर्णतः मविआच्या बाजुने सरकलीय. संविधानाचा मुद्दा काढून त्याला लाल कव्हर वरुण कम्युनिस्ट वगैरे बोलल्यामुळे दलित मते निर्णायकरित्या मविआ कडे वळले आहेत.
मोदींच्या सभा निष्प्रभ ठरत आहेत, भाजपने काय विकास केला ह्याऐवजी ते एक है तो सेफ है सारख्या घोषणा देत आहे ज्या महाराष्ट्रात चालणार नाहीयेत. विशेषत ग्रामीण भागात. मी मोदींचे भाषणं कधी ऐकत नाही कारण त्यांचा आवाज फारच ईरीटेटिंग आहे. आणी महाराष्ट्राच्या प्रश्नावर मोदी कधीही बोलत नाहीत. पण बातम्यातून कळतय की ते शरद पवार नी उद्धव ठाकरेंवर थेट किंवा अप्रत्यक्ष टीका करत नाहियेत. ह्यामागे परत मातोश्रीवर जाऊन माफी मागायचा प्लान असावा असे वाटतेय. मोदींच्या सभांना गर्दी आटत चाललीय, ह्याउलट उद्धव ठाकरे नी शरद पवारांच्या सभाना प्रचंड गर्दी होतेय. राज्य पातळीवर ह्या दोघांना टक्कर देईल अश्या फक्त एकनाथ शिंदेंच्या सभा होताहेत अन ते ह्या दोहोंपुढे फिके पडताहेत. ह्या निवडणुकीत मविआ च्या महापुरात भाजप नावाचं झाड उन्मळून पडेल नी शिंदेसेना नावाचं लव्हाळ वाचेल. भविष्यात एकनाथ शिंदे नी शिंदेसेना महाराष्ट्रात प्रमुख विरोधी पक्ष म्हणून उभारेल अस वाटतय. मविआ २०० क्रॉस करुन राक्षसी बहुमत मिळवेल की काय अशीही शंका येतेय.

अजुन दहा वर्षे तरी राज्यात भाजप आणि केंद्रात मोदी शहा सरकार राहो. रामराज्य बघायला मिळो. आणी ह्या रामराज्यात आपण महाराष्ट्रातील प्रकल्प श्रीकृष्णाची भूमी द्वारकाला दान करूयात. म्हणजे प्रभू राम आणी भगवान श्रीकृष्ण ह्यांची सेवा केल्याच पुण्य आपल्याला मिळेल. आयेम सो एक्साईटेड टू रामराज्य. इइइव

२३ तारखेला पॉपकॉर्न आणि कोक किती लागतील याचा विचार करतोय. >>>>
ईव्हीएम कृपा झाली नी भाजप पक्ष जिंकला तर तो संघाने जिंकवला असे म्हणायचे, भाजप पक्ष हरला तर संघ मैदानात का उतरला नाही अशी पोस्ट वाचायची मनाची तयारी ठेवायची. संघ म्हणजे माझीच लाल.

अमरेंद्र बाहुबली,

सहमत आहे. लोकसभेपासूनच मोदी व शहा हे चुकीच्या ट्रॅक वर आहेत प्रचारात! (असे माझे मत).

370 कलम या विषयाशी महाराष्ट्राला काहीही सोयरसुतक नाही. त्याचा प्रचारात उल्लेख निव्वळ अस्थानी वाटू लागला आहे.

दुसरे म्हणजे, "ये मोदी की गॅरंटी है" हे अति अहंकारयुक्त विधान लोक स्वीकारत नाहीत हे लक्षात घेतले जात नाहीये.

आता तर उघडउघड धार्मिक फूट पडेल अशी वक्तव्ये होत आहेत.

या वक्तव्यांचा एक तर तुफान फायदा होईल किंवा प्रचंड नुकसान होईल. त्यात जरांगे पाटील हा एक घटक आहे जो प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी काय भूमिका घेतो यावर काहीतरी ठरेल.

तरीही, अजूनही काँग्रेस दुबळीच आहे, राष्ट्रवादी (SP) व उबाठा सेना यांना सहानुभूती आहेच. मात्र उबाठाची भाषणेही नकोशी वाटू लागली आहेत.

शिवाय, मोदी व शहा अजूनही जुन्या काँग्रेस सरकारवर टीका करत आहेत हे आता संदर्भहीन वाटू लागले आहे.

मात्र, फडणवीसांनी गेल्या दोन, अडीच वर्षात जे केले (असे मानले जातेच) ते पाहता या निवडणुकीत ते काय करून दाखवतील याबाबत उत्सुकता आहे.

ही एक अशी निवडणूक आहे ज्यात चार प्रमुख पक्षांपैकी दोन फुटले आहेत आणि अनपेक्षित राजकीय समीकरणे सध्या अस्तित्वात आहेत. त्यामुळे, पारंपरिक सामान्य मतदार जरी त्या त्या पक्षाला साथ देणार असला तरी प्रत्यक्ष कार्यकर्ते मात्र काहीही करतील.

कदाचित नंतरची समीकरणे आणखी निराळीच असतील.

मागे येथे कोणीतरी म्हंटले होते की शिंदेंनी फडणवीस व दादा यांची माकडे केली आहेत.;प्रत्यक्षात फडणवीस यांनी दोन पक्षांची माकडे करून निवांत उपमुख्यमंत्री पद स्वीकारले आहे हे आता स्पष्ट दिसत आहे.

सत्तापिपासमुळे एक पक्ष मूळ धोरणांशी फटकून आघाडी करून बसला आहे आणि पुढच्या पिढीच्या हातात सूत्रे सोपवण्याची दिलदारी नसल्याने एक पक्ष तुतारी वाजवत आहे.

सामान्य माणसाच्या आयुष्यात फारसा फरक पडत नाही हे एक बरे आहे.

आज बारामतीत आहे
परत निघालो आहे. उभ्या उभ्या अंदाज येत नाही. पण अजित पवार निवडून येतील असं वाटतंय. युगेंद्र पवार यांच्या रिक्षा निदान मला तरी दिसल्या नाहीत.

अजितदादांच्या प्रचारासाठी रोजचे पाचशे रूपये रोज आहे.

जमिनीवरील परिस्थितीची कल्पना नाही, पण शाळेच्या व्हॉअ‍ॅ ग्रुप मध्ये इतके वाईट थराचे हिंदू मुस्लिम मेसेजेस व्हिडिओ गेल्या दोन दिवसांत बघितले की शिसारी आली. अनेक आले असतील मी फक्त दोन बघितले.
लोक बिन्डोक आहेतच, असं इतकं वाईट रेडरिक पसरवायची राजकीय पक्षंंवर का वेळ आली? यक्क!

ही निवडणूक दुसऱ्या फळीतील नेत्यांसाठी सुवर्णसंधी आहे. असे नेते शिवसेना- मशाल नो तुतारीत भरपूर आहेत. ते ह्यावेळेस चमत्कार दाखवतील.

अमित +१

इतक्या खालचे स्तराचे मेसेज येत आहेत की फॉरवेड करणाऱ्याला मेंदू नावाचा अवयव आहे की नाही ही शंका आहे

कटवा, भxx, मुल्ला आतंकवादी इत्यादी विशेषणांचा वापर एका बीजेपी खासदारकडून संसदेत झाला. काहीच कारवाई न झाल्याने भीड चेपली. आता प्रचारात लाजच सोडली.

भाजपाने सोशल इंजिनिअरिंगची इमॅजीन्ड् नेव्हर बिफोर लेवल गाठली आहे, पण भक्तांना हे कधीच उमजणार नाही, आणि त्यांच्या प्लानची ग्राउंडवर अंमलबजावणी करायला रास्वसं सारखी राष्ट्रव्यापी संघटना बॅकग्राऊंडमधे अहोरात्र काम करतेय.

विकु तुम्ही इतक्यात भारतात आला असाल तर हे बटेंगे तो कटेंगे चे लोण कुठे आणि कितपत रुजले आहे त्याची कल्पना येईल तुम्हाला. सदसद्विवेकबुद्धी सारासार विचार असे लोक काही करत नाहीत. ओळखीतले काही लोक आताशा नाव बघून ओला उबर बुक करतात / किंवा रद्द करतात. फळ, भाज्या इ वेष / दाढी बघून खरेदी करतात. पुण्यात मध्ये दिवाळी वेळेला लक्ष्मी रोड वरच्या साडी दुकानाच्या मालकांची नावांची लिस्ट फिरत होती kayappa वर. लोक कुठे चालले आहेत. ह्यांची अंध भक्ती आणि हे असले बावळे विचार सगळ्यांना डुबवणार आहे. आणि कोणी वाद घातला की लिब्रांडू Happy लव्ह जिहाद राहिला वरच्या लिस्ट मध्ये. एकंदरीत अवघड आहे.

मला कल्पना आहे. ही गटारगंगा फॅमिली ग्रूप्स मध्येही येते.
महामहिम 'मंगलसूत्र छीन लेंगे' पासून 'बेटी छीन लेंगे' पर्यंत घसले आहेतच.
ही सारे सर्व नव्हे तर फक्त एक राजकिय पक्ष पसरवत आहे हे अधोरेखित करायचे होते.

पवारांच्या सभेत पाऊस पडलाय. पवारांनी पावसात भाषण केलंय, आता काय होणार हे वेगळं सांगायला हवं का? Happy

ईव्हीएम कृपा झाली नी भाजप पक्ष जिंकला

निवडणूक चर्चेत evm हा विषय आला नाही तर -- जग सूना सूना लागे/काही तरी मिसिंग वाटते/ या शिवाय चर्चा पूर्ण होत नाही/ इत्यादी /इत्यादी

https://www.indiatoday.in/elections/assembly/story/india-today-expose-ev...

Just days before the November 20 Maharashtra Assembly polls, India Today TV's special investigation team got in touch with Syed Shuja, a self-proclaimed cyber expert, who on multiple occasions has claimed that the EVMs were hacked. Notably, he had also alleged that voting machines were rigged in favour of the BJP in the 2014 Lok Sabha polls.

Shuja had claimed he could help the alliance win the elections by hacking EVMs using technology from the US Department of Defence, where he claimed he worked as a contractor. This time, he has claimed to have contacted a senior leader from the Maha Vikas Aghadi (MVA), the Opposition alliance in Maharashtra.

Listen to Story

Live TV
Share
Advertisement

EVM 'whistleblower' Syed Shuja made false claims to India Today's special investigation team on hacking of EVMs during Maharashtra Assembly polls. (Photo: India Today TV)
Divyesh Singh
Divyesh Singh
Dipesh D. Tripathi
Dipesh D. Tripathi
New Delhi,UPDATED: Nov 15, 2024 13:59 IST
Edited By: Prateek Chakraborty
In Short
Syed Shuja claims he contacted MVA leader ahead of Maharashtra polls
He offers to hack EVMs for Rs 52-53 crore
Election Commission says EVMs are tamper-proof, junks Shuja's claims
Just days before the November 20 Maharashtra Assembly polls, India Today TV's special investigation team got in touch with Syed Shuja, a self-proclaimed cyber expert, who on multiple occasions has claimed that the EVMs were hacked. Notably, he had also alleged that voting machines were rigged in favour of the BJP in the 2014 Lok Sabha polls.

Shuja had claimed he could help the alliance win the elections by hacking EVMs using technology from the US Department of Defence, where he claimed he worked as a contractor. This time, he has claimed to have contacted a senior leader from the Maha Vikas Aghadi (MVA), the Opposition alliance in Maharashtra.

advertisement

India Today's special investigation team, with one of them posing as the personal assistant of an MP, got in touch with Shuja through a video call to probe his claims of getting the EVMs hacked. It must be noted that the EVMs are tamper-proof, and this has been clarified by the Election Commission multiple times. Here is an excerpt from the conversation:

Suriya's
Must Read
Kanguva: Latest product of Tamil cinema's FOMO that disrespects audience

TRENDING TOPICS:
Elections 2024
Border-Gavaskar Trophy
India-China LAC Deal
Reporter 1: As I told you, one of our most important allies is convinced and wants to get this job done. Can I connect through video call?

Syed Shuja: Give me one minute.

Reporter 1: I’m introducing you to Alpesh ji. They (MVA) are contesting on 102 seats and want to get this done on 75 seats.

Reporter 2: The number is between 63 and 75.

Syed Shuja: It can be done for 63 seats.

Reporter 1: 63 seats for those of which we will give you names, right?

Syed Shuja: You give me the names, I have access to 63 out of 105 seats, but I will need access to VVPAT details.

Reporter 1: Which 63 seats can you give us?

Shuja: I have access to 281 out of 288 seats. There is frequency isolation in some areas, so it will be impossible.

Shuja, who claims to have a PhD minor in Mathematics, demanded USD 6 million (approximately Rs 52-53 crore) for his services and explained a convoluted process involving frequency isolation and using specific applications to scan areas and manipulate EVM signals. However, these claims were found to be entirely false and lacking any technical basis.

यातील 2 गोष्टी लक्षात घेण्यासारखा वाटल्या
1) 2014 ला मोदी लाट नव्हती (जी विपक्ष आणि इतरांनी मान्य केली होती), पण तेव्हा evm हॅक झाले होते
2) यावेळी युतीने नाही तर मविआने हॅक करण्यासाठी अप्रोच केले

बस हे वाचले आणि माझा या जगवरून विश्वास उडाला. पूर्वी लोक नासाचे नाव चालवायचे आता त्यात अमेरिकेच्या संरक्षण विभागाने पण उडी मारली आहे. तिकडे ट्रम्प निवडून आलेत.

अजितदादांच्या प्रचारासाठी रोजचे पाचशे रूपये रोज आहे.
>>>>>
५०० रुपये, बिर्याणीचं पाकिट व बिसलेरी बॉटल नी न्यायला आणायला बस हा बायकांसाठी निवडणूक काळातला कमाईचा सोर्स आहे. इथे लोअर इकॉनॉमिक स्ट्राटामधल्या युपी, बिहारवाल्या बायका भरपूर प्रमाणात दिसतात कारण त्या वर्किंग नसतात. मग शेजारचीच्या, नातेवाईक स्त्रीच्या सोबतीने हे आऊटींग + पॉकेटमनी होऊन जाते. सोबत बारकं पोरगं असेल तर त्यालाही बिर्याणी मिळते.

अहो नरकचतुर्दशी 31 ऑक्टोबर ला नव्हती.

ती आहे 20नोव्हेंबरला यंदा.

इथे एक नाही अनेक नरकासूर आहेत.

उत्तम संधी आहे

वध करा सगळ्यांचा.

पहाटे उठा जा मतदान करा.

घरी येऊन अभ्यंगस्नान करा

आणि

ह्या नरकासूरांना मारल्याचा आनंद

गोड शिरा करून साजरा करा.

या पेक्षा कोण चांगले तुम्हाला सांगू शकेल की, हिंदु नो एकजुटाने मतदान करा

आपल्या स्वतः च्या, शहराच्या, राज्याच्या प्रगतीला मतदान करा

राजकारणा पेक्षा समाजकारण करणाऱ्या नां मतं देऊया

उद्याचा नवीन महाराष्ट्र
आपणच घडवूया

सध्या ममव ने मतदान केलेच पाहिजे याच्या व्हॉट्सऍपवर मोहिमाच सुरू आहेत जणु. यात खालीची सिग्नेचर पहाता, आणि ज्या समुहांत मी आहे त्यात ज्यांनी पाठवले ते पहाता भाजप समर्थकच आहेत बहुतेक. सर्वच.
मतदानाची टक्केवारी वाढली तर भाजपची मते वाढतात असा त्या मागे अंदाज आहे, मागील एक दोन (की जास्त? निवडणुकींचे स्टॅटिस्टिक्सवरून तसे दिसते असे कळले.

यात कितपत तथ्य आहे.
आणी त्यात १) मतदान १ -५% वाढले, २) ५ ते १०% वाढले.
दोन्ही केस मध्ये फायदा एकाच पक्षाला / पक्ष समुहाला होईल का?

(५ टक्क्यांची स्टेप अशीच रँडमली घेतली.)

ब्रिटानिया, डाबर, नेस्ले सारख्या FMCG क्षेत्रातील कंपन्यांचा नफा कमी होत आहे आणि महत्वाचं म्हणजे शहरी भागामध्ये त्यांची विक्री कमी झालेली आहे.
कारण ? आक्रसत असलेला मध्यम वर्ग.
१० लाख पेक्षा कमी किंमत असलेल्या गाड्यांच्या (Cars) विक्रीमध्ये घट झाली आहे (negative growth) फक्त १० लाखांच्यापेक्षा जास्त किमतीच्या गाड्यांची विक्री वाढली आहे. परंतु १० लाखाहून कमी किमतीच्या गाड्या एकूण विक्रीच्या अंदाजे ६६% आहेत. त्यामुळे अंदाजे ७३००० कोटींचा माल पडून आहे.
१८ ते ३५ वयोगटातील १२ कोटी तरुण शिक्षणही घेत नाही आहेत आणि नोकरी देखील शोधत नाही आहेत.
कृषी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांची संख्या विक्रमी वाढली आहे. उत्पादनक्षेत्राचा जीडीपी मधला वाटा गेल्या ३० वर्षात सर्वात कमी आहे.
२०१४ नंतर लेबर 'रिअल वेजेस' मध्ये वाढ झाली नाही किंवा उलट घट झाली आहे. कृषी क्षेत्रामध्ये UPA काळात 'रिअल वेजेस' सरासरी वार्षिक ६.८% ने वाढत होते, मोदीकाळात त्यात सरासरी १.३ टक्क्यांची घट झाली. एकंदरीत....
कठीण परिस्थती अजून कठीण होताना दिसते आहे.
आणि अशा रीतीने जगातील किमान ९०% हिंदू खतऱ्यात आलेले आहेत. आता गटार गॅस वाल्याकडून ... तोंडातून गॅस सोडण्याव्यतिरिक्त काय अपेक्षा ठेवणार म्हणा.

Sooraj Samant
https://www.facebook.com/share/p/15B57FGMPf/

<< कटवा, भxx, मुल्ला आतंकवादी इत्यादी विशेषणांचा वापर एका बीजेपी खासदारकडून संसदेत झाला. काहीच कारवाई न झाल्याने भीड चेपली. आता प्रचारात लाजच सोडली. >>

----- लाज आधीच सोडली आहे. आधी खाजगीत बोलायचे , आता मोकळेपणाने बोलतात. भिड चेपली आहे, आणि जो पर्यंत भाजपाचे सरकार आहे तोपर्यंत आपले काही वाकडे होणार नाही हा विश्वास.

बिल्किस बानोच्या बलात्कार्‍यांचे तुरुंगातून बाहेर आल्यावर हारतुरे, आरती असे जल्लेषात स्वागत झाले. सुटकाही बेकायदेशीर होती हा भाग वेगळा. एका महिलेचा बलात्कार केला, अनेकांचे खून केले असे मानवतेला काळिमा फासणारे कृत्य या गुन्हेगारांनी केले होते. लाज कुठे शिल्लक आहे?

पोलीस अधिकारी सुबोध कुमार किंवा गौरी लंकेश यांची हत्या करण्याचा आरोप असणार्‍यांची तुरुंगातून जामिनावर सुटका झाल्यावर हारतुरे आणि भारत माता की जयच्या घोषात स्वागत होते.

हे दोन मुद्दे सुटले होते.

गुजरात्यांचं अमेरिकेचं फॅड. आदर्णीय मोदी त्यांच्या लहानपणापासून अशाच लोकांना बघत आले , त्यामुळे ते परदेशात जाऊन " भारतीयांना वाटे - आपलं नशीब फुटकं म्हणून भारतात जन्म झाला, "असं सांगत तात. पण ते म्हणाले की ही २०१४ च्या आधीची गोष्ट. आता त्यांच्या मातृ आणि कर्मभूमी गुजरातेतील असं वाटणार्‍या लोकांची संख्या तर २०१४ नंतर सुद्धा वाढतीच आहे. हे त्यांना माहीत नसेल का?

दुसरं. एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या कामावर टीका करतात. पण ते स्वतः त्याच मंत्रीमंडळात होते. तर ही गोष्ट त्यांच्या लक्षात राहात नाही , की जसं अभ्यासू देवाभाऊंना चक्की पिसिंग लक्षात राहिलं नाही, तसं यांचं झालं. गौहाटीला त्यांनी काय खाल्लं प्यालं त्यावर संशोधन व्हायला हवं.

गुजरात्यांच्या अमेरिकन फॅड बद्दल - अमेरिकेत बेकायदा प्रवेश घेणार्‍यात गुजराती लोकांचे प्रमाण जास्त आहेत. उर्वरित भारताच्या हक्काचा तोंडचा घास, विविध विकास योजना सर्व काही गुजरातलाच पळवून नेत आहेत, मग गुजराती लोकांचे अमेरिकन फॅड आधी होते त्यापेक्षा जास्त का वाढले आहे ? ते या विकास भुमीचा त्याग का करत आहेत ?

आता काही लोक परत पाठविले आहेत. ट्रम्प सोबत मोदी यांचा स्पेशल याराना असल्यामुळे तो भारतीयांना परत असे पाठविणार नाही अशी अपेक्षा आहे.
https://timesofindia.indiatimes.com/india/us-sends-back-a-planeload-of-i...

Pages