Submitted by हस्तर on 15 October, 2024 - 16:44
चला विधान सभा पड्घम वाजले
मि कोण त्याही पक्षा चा प्रवक्ता नाही
पण विरोधकान् कडे महाराष्ट्र व्यापी अस मुद्दा नाहिये
पोर्षे , बदलापुर ,शिवपुतळा एवढी धग नाही राहीली
स्पर्धा परिक्शे चे घोटाळी पण जुने झाले
लाडकी बहीण जोरात चाललैये
विरोधी पक्ष जिन्कणार तर कसे?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
एखादा उमेदवार आमच्याकडे आला
एखादा उमेदवार आमच्याकडे आला कि पवित्र तुमच्याकडे गेला कि बिघडला हे दोन्हीकडून आता अजीर्ण होण्याच्या पातळीवर गेलेले आहे. हे सगळे इकडून तिकडे आणि तिकडून इकडे अगदी बागेत फिरल्यासारखे फिरताहेत. निवेदिता माने यांचे नावही वर आले आहे. त्या ही शिवसेना, एन सी पी पुन्हा शिवसेना अशा फिरस्तीवर आहेत.
त्यामुळं एखाद्या नेत्यावर ७० हजार कोटीचे आरोप भाजपाने करायचे आणि आपल्याकडे आला कि गप्प बसायचे, तेच तो नेता आपल्यातून उठून तिकडे गेला कि भाजपचेच आरोप करायला सुरूवात करायची हे म्हणजे आपण त्या आरोपांची पुष्टी करत आहोत याचं भान सुटल्याचं किंवा जनता खूपच मूर्ख आहे याचे निदर्शक आहे.
महाडि़कांची वक्तव्ये निषेधार्ह आहेतच, पण काँग्रेसने कथुआ कांडातल्या असिफा या पाच वर्षीय निष्पाप बालिकेवर function at() { [native code] }याचार करून खून करणार्या बलात्कार्यांच्या समर्थनार्थ तिरंगा रॅली काढणार्या भाजपच्या माजी आमदाराला उमेदवारी दिली. तो निवडूनही आला. या कांडाबद्दल आणि त्या रॅलीबद्दल इथे खूप जणांनी निषेध व्यक्त केला, जे योग्यच होते. पण काँग्रेसमधे आल्यावर तो पवित्र कसा काय झाला ? कुणी बोलेनाच !
हे नेमके काय आहे ? गुन्हेगारी किंवा सभ्यतेबाबत लेक्चर झाडणे कि पक्षप्रेम ?
लाडकी बहीण योजनेमुळे एक गोष्ट
लाडकी बहीण योजनेमुळे एक गोष्ट चांगली झाली.
मध्यंतरी काँग्रेसच्या काळात मिळालेल्या बापाच्या पेन्शनवर आपली मुलं शिकवणारा जेव्हां अमूक तमूक करतो अशा पोस्टींचा पूर आला होता. किमान आता ते लोक हे पैसे पक्षाचे नसून जनतेचे असतात हे लोकांना सांगत आहेत हे काही थोडके नाही.
पुस्तकाच्या मुखपृष्ठाचा रंग
पुस्तकाच्या मुखपृष्ठाचा रंग महत्वाचा आहे का आंत लिहीलेले संविधान ? अर्थात प्रश्न कुणाला विचारला आहे यावर उत्तर अवलंबून आहे.
रामनाथ कोविंद यांची भारताच्या राष्ट्रपती पदावर नियुक्ती झाल्यावर, आपले सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना EBC प्रकाशीत कोट पॉकेट आवृत्तीची प्रत भेट दिली होती. देवेंद्र फडणवीसांना हे माहित नसावे.
https://ebc.co.in/ebcs-constitution-of-india-coat-pocket.../
हिंदू अब जाग उठा है. अखंड
हिंदू अब जाग उठा है. अखंड भारत का नवनिर्माण होने को है. जैसे ब्रम्हा विष्णू महेश वैसे मोदी,योगी देवेंद्रजी.
मुंबई तकच्या चावडीवर शिवसेना
मुंबई तकच्या चावडीवर शिवसेना उबाठा गटाचे वरुण सरदेसाई यांची मुलाखत
खंजीर, कोथळा, मर्द यापेक्षा वेगळी भाषा शिवसेनेच्या नेत्याच्या तोंडी ऐकून बरं वाटलं. ( भाजप समर्थकांना उबाठा आणि संजय राउत आठवतील. पण ही भाषा शिवसेना संस्थापकांपासून चालत आली आहे)
आमच्या भागात शिवसेना उबाठा गटाचा उमेदवार आहे. त्या च्या प्रचारफेरीत मराठी, हिंदी, इंग्रजी अशा तिन्ही भाषांत घोषणा होत्या. आमचा भाग अर्थात बहुभाषक आहे.
लाडकी बहिण वरून स्फूर्ती
लाडकी बहिण वरून स्फूर्ती घेऊन EC ने मुंबईत जे मतदान करतील त्यांना २०% discount देण्याची योजना राबवायचे ठरवले आहे. हे "लोकशाही" साठी असल्याने त्याला प्रलोभन नाही म्हणायचे.
एक तरफ़ देश सुरक्षित हाथों
एक तरफ़ देश सुरक्षित हाथों में है दूसरी तरफ़ हिंदू खतरे में है.. है ना अच्छा मज़ाक़़
कॉपी पेस्ट.
(घाबरून लिहीत आहे की) पूर्ण
(घाबरून लिहीत आहे की) पूर्ण आदरासहित असे म्हणावेसे वाटते की मुळात महाराष्ट्रातील राजकारणाला 'जाहीर अर्वाच्यता' ही भेट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी फार आधीच दिली आहे.
'घाबरून' हे यासाठी, की काही व्यक्तिमत्वांमधील माणूसपण बाजूला ठेवून त्यांना देवत्व प्रदान करण्याची, त्या गोष्टीशी (एरवी, अनुयायांच्या स्वतःच्या वर्तनात कुठेही न आढळणारी) अस्मिता निगडित करण्याची सामुहिक प्रवृत्ती ही आता इतकी स्थिरावली आहे की लोकशाहीची क्षणार्धात ठोकशाही होऊ शकते.
=====
दुसरे एक निरीक्षण!
मोदींना यानंतर टर्म मिळणार नाही (संभाव्य कारणे - वय, संघाची भूमिका, प्रक्षोभ, त्या वकुबाचा वारसदार नसणे वगैरे) हे जणू माहीतच असल्याप्रमाणे सुस्पष्ट धार्मिक तेढ निर्माण करणे या दिशेला भाजपचा प्रचार अलीकडे झुकला आहे. हे योग्य / अयोग्य / काही प्रमाणात अयोग्य वगैरे गोष्टींवर गदारोळ होऊ शकेल. आधी हे जरा किंचित संदिग्धता ठेवून केले जायचे.
महाराष्ट्रातील ही निवडणूक जवळपास सर्वच महत्वाच्या राजकीय पक्षांचा पुढील वर्षांतील आवाका व संभाव्य यशापयश ठरवेल असे वाटते.
<< मोदींना यानंतर टर्म मिळणार
<< मोदींना यानंतर टर्म मिळणार नाही (संभाव्य कारणे - वय, संघाची भूमिका, प्रक्षोभ, त्या वकुबाचा वारसदार नसणे वगैरे) हे जणू माहीतच असल्याप्रमाणे सुस्पष्ट धार्मिक तेढ निर्माण करणे या दिशेला भाजपचा प्रचार अलीकडे झुकला आहे. >>
------ अलीकडे म्हणजे नक्की कधी पासून धार्मिक तेढ निर्माण करणे या दिशेला प्रचार झुकला आहे? देशांत धार्मिक सौहार्दाचे वातावरण असावे असा काही प्रयत्न २०१४ नंतर किंवा आधी झाला आहे का?
अडवाणी यांच्या रथयात्रेचा उद्देश रामाला कायमचे घर मिळवून देणे होते का धार्मिक तेढ वाढविणे ? ज्या ज्या शहरातून यात्रा गेल्या त्या मार्गांवर दंगली झाल्या आणि शेकडो निरपराध नागरिक मारले गेले.
आज अडवाणींना पश्चाताप होत असेल आपण किती विद्वेष पेरणी केली याचा. मोदी हे चार पावले पुढे आहेत.
२००२ गोध्रा घटनेनंतर मुस्लीमांचे शिरकाण झाले होते. निमीत्त होते रेल्वे गाडीचा डब्बा जाळला, निरपराध कारसेवक मारले गेले. मृत लोकांची प्रेतयात्रा अहमदाबाद शहरातून नेण्याच्या निर्णयावर राज्याचे गृहमंत्री, सचिव आणि पोलिस अधिकार्यांचा विरोध होता. मिरवणूकीला विरोधाचे कारण राज्याची कायदा सुव्यावस्था बिघडली असती. त्यांचा विरोध डावलून सर्व गोष्टी झाल्या कारण धार्मिक तेढ निर्माण करणे हाच तर उद्देश होता. गोध्राने केवळ निमीत्त दिले. गोध्रा घडविले नसते तर अजून काही तरी निमीत्त शोधलेच असते.
कारसेवकांची प्रेतयात्रा न काढताही रेल्वे मधे आग लावणार्यांचा छडा लावता आला असता. पण मग आरोपींना अटक करणे, पुरावे गोळा करणे, कोर्ट कचेरी हे सर्व वेळकाढणारे सोपस्कार करावे लागले असते. आणि तथाकथित मानवतावादी अशा आरोपींसाठी गळा काढतात. आपल्याला झडपट न्याय हवा असतो ( बदलापूर, हैद्राबाद प्रकरण किती पटकन सोडविले).
महाराष्ट्र विधानसभेच्या
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूका जवळ येत आहे. राज्यभर रोख पैसा विनासायास प्रवास करत असतो पण क्वचित कधीतरी अपघाताने नजरेत भरतो.
डिजीटल economy चे नगारे पिटतांना पाच कोटीची कॅश कोण घेऊन का फिरावे लागते?
https://youtu.be/UKtrCQdkrHA?si=IB_OcHqeO0-2ih5S
धार्मिक तेढ वाढवण्याचं काहीही
धार्मिक तेढ वाढवण्याचं काहीही तात्कालिक कारण नाही. तो संघाचा मूळ अजेंडा आहे. हिंदुराष्ट्र. त्यात धार्मिक अल्पसंख्यांकांना दुय्यम स्थान.
गुजरात २००२ दंग्यांनंतर तिथे हिंदू मुस्लिमांच्या वस्त्या पुरत्या वेगळ्या झाल्या. मुस्लिम वस्त्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था नागरी सुविधा पुरवत नाहीत.
एन आर सी मागे पडलं. त्या आडून मुस्लिमांचं नागरिकत्व काढून घ्यायचं आणि त्यांना कँप्समध्ये डांबायचं ; मुस्लिमांच्या व्यवसायांवर गदा आणायची किंवा हिंदूंनी त्या सेवा हिंदूंकडूनच घ्याव्यात , दंग्याचं निमित्त करून फक्त मुस्लिमांची घरे पाडायची , या त्याच्या पायर्या.
राजकीय नेत्यांनी या पक्षातून
राजकीय नेत्यांनी या पक्षातून त्या पक्षात उडी मारल्यानंतर किंवा पूर्ण वेगळी धोरणे असणाऱ्या पक्षाशी युती केल्यानंतर स्वतःच्या राजकीय व समाजविषयक भूमिका बदलल्याचे नेहमी दिसून येते.
उदा. अशोक चव्हाण, अजित पवार, उद्धव ठाकरे
याचा परिणाम म्हणून त्यांचे निकटवर्तीय नेते, काही अनुयायी / कार्यकर्ते हेही पटकन भूमिका बदलून नवीन रस्ता स्वीकारतात. ही गोष्ट ग्रास रूट पातळीच्या कार्यकर्त्यांना मात्र खरे तर तितकीशी झेपत नाही. ते संभ्रमित होतात, बंडखोरी करतात वगैरे!
मात्र, जे सामान्य मतदार असतात त्यांची मते (म्हणजे मत कोणाला द्यायचे याबाबतचे मत) कधीही बदलताना दिसत नाहीत. येथे व इतर सो मि स्तरावर ज्या चर्चा होत असतात त्यातून एखाद्याचे मतपरिवर्तन झाले अशी उदाहरणे विरळा! शिवाय, या चर्चा टोमणे, आक्रमक भाषा, वैयक्तिक आकस (जो अश्या चर्चांमुळेच कदाचित निर्माण झालेला असू शकतो) यांनी भरलेल्या असल्याने 'दुसरी बाजू विचारात घेणे' वगैरे बाबी तर दुरापास्तच ठरतात. त्यामुळे या चर्चा एक प्रकारे निष्फळ ठरतात व अजेंडा रेटणे व खास कमावलेले संवादकौशल्य दर्शवणे इतपत मर्यादित ठरतात. त्यामुळे व तसेच एकूणच इतिहास, राजकारण याचा अभ्यास फारच कमी असल्याने अश्या चर्चेत पडणे बंद केले होते.
'कोणाचा मूळ अजेंडा काय' यावर दोन्ही बाजूंची मते ठाम असतात एवढे नक्की!
आप क्रोनोलॉजी समझिए. पहले सी
आप क्रोनोलॉजी समझिए. पहले सी ए ए आएगा. फिर एन आर सी आएगा. - आधुनिक चाणक्य - अमितभाई शहा.
बेफिकीर छान लिहिताय.
बेफिकीर छान लिहिताय.
महाराष्ट्रात ग्रामीण भागात विचारधारा, हिंदुत्व, धर्मनिरपेक्षता हे मुद्दे खूप प्रभावी नसतात. तालुक्याचा नेता, भाग्यविधाता ज्या बाजूला ती विचारसरणी.
जेव्हा भाग्यविधाता घडत असतो, त्या आधी वडलांच्या, चुलत्याच्या पैशावर पनवेलला जाऊन विकासाचे धडे घेतो. त्या वेळी या ध्येयाने भारलेले सहपाठी पुढे राजकीय सहकारी बनत असतात.
विखे पाटील विरोधी पक्षनेते असताना मतदार कॉंग्रेसला मत देतो, ते भाजपत गेले कि भाजपला. हर्षवर्धन पाटील, मोहिते पाटील, निंबाळकर, महाडिक, वळसे असे अनेक लोक दोन्ही कडे निवडून येतात.
मी काल दीपक शर्माचा चानेल बघत
मी काल दीपक शर्माचा चानेल बघत होतो. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी बद्दल चा. फार ग्लूमी वाटलं.
कोण किती पैसे वाटणार "यावर दोन्ही बाजूंची मते ठाम असतात एवढे नक्की!"
कार्यकर्त्यांची व्यथा, मुरारी
कार्यकर्त्यांची व्यथा, मुरारी देशपांडे
https://youtu.be/9tQAzGzp-Yc?si=4s0EONLC9ukFL7UH
"Three main diseases in the
"Three main diseases in the country,- typhoid, cholera, and election fever. The last one is the worst; it makes people talk and talk about things that they have no say in."
-quote from 'The white tiger'
चर्चेचा एकूण रोख असा होता कि
चर्चेचा एकूण रोख असा होता कि मिळतोय तो पैसा घ्या, मत मात्र आपल्या पसंतीच्या उमेदवाराला द्या. पूर्वी केजरीवाल असे बोलला होता तेव्हा ECने त्यांच्या वर खटला भरला होता. का? असो.
मी ज्या ठिकाणी रहातो तिथले लोक त्यांच्या बालपाणीच विकले गेले आहेत. त्यामुळे माझा मात्र कमाईचा चान्स हुकला आहे.
बाजार मस्त खाली आलाय. उद्या
बाजार मस्त खाली आलाय. उद्या आणखी खाली येण्यासाठी मोदींविरूध्दचा गदारोळ अजून वाढायला हवाय.

लाडकी बहिण वरून स्फूर्ती घेऊन
लाडकी बहिण वरून स्फूर्ती घेऊन EC ने मुंबईत जे मतदान करतील त्यांना २०% discount देण्याची योजना राबवायचे ठरवले आहे. हे "लोकशाही" साठी असल्याने त्याला प्रलोभन नाही म्हणायचे.>>> डिस्काउंट कशात ते ही नमूद केलं असतं तर बरं झालं असतं
https://www.lokmattimes.com
हं, हा घ्या discount
https://www.lokmattimes.com/mumbai/mumbai-voters-to-get-20-discount-at-r...
माझ्या बहिणीच्या घरी
माझ्या बहिणीच्या घरी शिंदेसेनेचा उमेदवार मलाच मत द्या म्हणून सांगायला आला. लाडकी बहीण योजनेत नाव नोंदवले की नाही, हे विचारले. मुलगा आणि सून दोघे कमावते आणि वार्षिक उत्पन्न २.५ लाखाखाली नाही, म्हणून नाही केले असे सांगितले
करा हो. काही होत नाही. आता डिसेंबरमध्ये पुन्हा सुरू होईल, तेव्हा करा.
लाल तांबूस कतारवेळ.
लाल तांबूस कतारवेळ. हेलिकॉप्टरमधून मोदींजी उतरतात आणि शांत पावलं टाकत पुढे येतात त्याचवेळी कांधे पे सूरज टिकाके चला तू आंखो मे भरके चला बिजलिया गाणं लागतं. अहाहा काय तो प्रसंग वर्णावा. सगळे श्रम दुःख कुठच्या कुठे नाहीसे होतात. धन्यवाद मोदीजी आम्ही सगळे मायबोलीकर तुमचे फॅन आहोत.
बॅटमॅन सारखे ग्लाईड करत उतरले
बॅटमॅन सारखे ग्लाईड करत उतरले तर चार चांद लग जायेंगे.

लाल तांबूस कतारवेळ
लाल तांबूस कतारवेळ
>>>> निवडणुका सोडून कतारला जायचं कशाला म्हणते मी. फार फार तर आयसीआयसीआय किंवा स्टेट बॅंकेच्या कस्टमर केअरला फोन करायचा. ते लोक ‘आप कतारमें है’ चा अनुभव घरबसल्या देतात.
निवडणुका सोडून कतारला जायचं
निवडणुका सोडून कतारला जायचं कशाला म्हणते मी. फार फार तर आयसीआयसीआय किंवा स्टेट बॅंकेच्या कस्टमर केअरला फोन करायचा. ते लोक ‘आप कतारमें है’ चा अनुभव घरबसल्या देतात.>>>>
आपण लिहिलेला प्रतिसाद
आपण लिहिलेला प्रतिसाद आपल्याला स्वतःला समजला पाहिजे अशी अट मायबोलीच्या 'वावराचे नियम' या धाग्यात नाही. याचा प्रचंड उपभोग घेणारे काही सदस्य वरच्या वीस-एक पोस्ट्समध्ये आढळून आले.
मीही त्यात काही पोस्ट्स लिहिल्या आहेत व त्यामुळे इच्छुक माझाही समावेश त्यात करतील याची खात्री वाटते.
अरे चुकून टायपो मिस्टेक झाली.
अरे चुकून टायपो मिस्टेक झाली. अजून संपादन करायला एक मिनिट शिल्लक आहे पण करणार नाही कारण सुटलेला बाण आणि बोकलतच्या मोबाईलमधून सुटलेले शब्द कधीच परत येत नाहीत.
ओ बोकलत,
ओ बोकलत,
तुम्हाला उद्देशून काही नाही लिहिले. तुमच्या प्रतिसादांचा फॅन आहे मी!
मी पण तुमचा प्रतिसाद वाचून
मी पण तुमचा प्रतिसाद वाचून पोस्ट नाही टाकली. मी पोस्ट केलं तेव्हा तुमची कमेंट ऑलरेडी आली होती. मी पण तुमच्या कथांचा आणि कवितांचा फॅन आहे.
Pages