Submitted by हस्तर on 15 October, 2024 - 16:44
चला विधान सभा पड्घम वाजले
मि कोण त्याही पक्षा चा प्रवक्ता नाही
पण विरोधकान् कडे महाराष्ट्र व्यापी अस मुद्दा नाहिये
पोर्षे , बदलापुर ,शिवपुतळा एवढी धग नाही राहीली
स्पर्धा परिक्शे चे घोटाळी पण जुने झाले
लाडकी बहीण जोरात चाललैये
विरोधी पक्ष जिन्कणार तर कसे?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
दोन्ही राष्ट्रवादी
दोन्ही राष्ट्रवादी निवडणुकीनंतर एकत्र येतील असे सर्वसाधारण मत आहे. बिल्डर लॉबीत तर हे नाटक असल्याचे ठाम मत आहे.
कदाचित यामुळेच दादांच्या तिकीटावर भाजपने आपले उमेदवार उभे केले असावेत. कारण निवडणुकीनंतर पक्ष एकत्र करून काका पुतणे कुणालाही सोबत घेऊन सरकार बनवू शकतात.
शिंदे + दोन्ही पवार किंवा दोन्ही पवार + भाजप युती होऊ शकेल.
पवारांसोबत उबाठा सेनेची शर्यत असेल. त्यामुळे बार्गेनिंग पावर दोघांकडेही नसेल.
आमदारांच्या अपात्रतेबद्दल आता
आमदारांच्या अपात्रतेबद्दल आता निर्णय घेण्याची गरज रहाणार नाही.>> निर्णय विरोधात गेला तर आजपर्यंत घेतलेले सरकारी निर्णय बदलणार आहे का?
राजेहो परतेक उमेदवारांची
राजेहो परतेक उमेदवारांची घोषित संपत्ती वाचूनच छाती दबती नी ह्ये करोडपतीच गरीब जनतेच प्रतीनिधी म्हनून लोकसभा आसो कि ईधानसभा आसो तिथ बसत्यात नी खोक देन्याची ऐपत असली त मुख्यमंत्री बनत्यातजनतेच देशाच भल.करायच सोडून सोताची संपत्ती पाचसालात चौपट करत्यात मंग जनतेच भल करायले निवडणूक आली की याद करुन राज्यावर कर्जाचा डोंगर उभा करत जनतेच्याम्होर कल्यानकारी रोजनांच तुकड फेकत्यात तवर यायले जनतेची याद येत नाय कशाले यायच्या म़ाग फिरायच ?
देवाभाऊ गुजरात ला राहायला
.
देवाभाऊ गुजरात ला राहायला
माननीय देवेंद्र फडणवीस (उर्फ देवाभाऊ) गुजरात ला राहायला गेले का?
प्रचाराचे फोन करतायेत ते
लोकेशन गुजरात च दिसतंय
राज्याच्या पोलिस महसंचालक
राज्याच्या पोलिस महसंचालक रश्मी शुक्ला ह्यांची बदली. फोन टॅपिंग करत असल्याचा विरोधकानी केला होता आरोप.
मला वाटते की, हरियानासारखेच
मला वाटते की, हरियानासारखेच धृवीकरण होईल. मोदी विरोधक व मोदी समर्थक असे दोन गट शिल्लक राहतील.
स्वत:ची विचारधारा सोडणारे म्हणजे उबाठा व अजीत पवार गट नामशेष व्हायला सुरवात होईल.
बाकी इतरांचे मतदार मोदी विरोधी अथवा मोदी समर्थकांत विलीन होतील.
हिंदू एकीकरणात वाढ होत जाण्याचा ४० वर्षांचा कल चालूच राहील.
मात्र
बांगला देशांच्या घडामोडींचा मोठा परिणाम मतदानावर दिसून येईल. जो जम्मू व हरियाणात दिसून आलाय.
पंडितांना काश्मीर खोऱ्यातून हाकलून लावल्यावर देखील जम्मूत २०२४ अगोदरपर्यंत कॉंग्रेस ११-१२ जागा मिळवत असे. पण बांगला देश परिणाम एवढा तीव्र होता की कॉंग्रेस जम्मूतून संपून गेली.
तसेच हरियानामधे कॉंग्रेसने लोकसभेपेक्षा जास्त मते मिळवूनही ती हरली. कारण हिंदू व्होट बँकेत नव्याने भर पडली आहे. ती आणखीन मोठी झाली आहे.
२०१४ ला मोदींनी विकासावर मत मागितली होती. तसेच मोदी मुस्लिम विरोधी असल्याची टेप खूपच जुनी झाल्याने ती नीट वाजत नव्हती. परिणामकारक होत नव्हती. त्यामुळे मुस्लीम व्होटबँक विस्कळीत झाली होती. तर हिंदू व्होट बँक संघटीत झाली होती.
२०१४ ते २०१९ या कालावधीत हिंदू मुस्लीम वगैरे बाबत मोदींनी काहीच केले नसल्याने २०१९ ला मुस्लीम व्होटबँकेचा प्रभाव आणखी कमी झाला व मोदींचे यश आणखी वाढले.
मात्र त्यानंतर ३७०, ३५ए, तीन तलाक यामुळे मुस्लीम व्होटबँक परत पुनरूजीवीत झाली व २०२४ पर्यंत पूर्ण ताकदीने निवडणूकीत उतरली.
मात्र लोकसभेत ५६ खासदार पाठवायचा करिश्मा ती दाखवू शकली नाही. असा काही चमत्कार होईल अशा अपेक्षेत विरोधी पक्ष व काही परदेशी होते. पण तसे होऊ शकले नाही. कारण मुस्लीम व्होटबँकेचे महत्व मोठ्या प्रमाणांत कमी करण्या इतपत हिंदू व्होटबँकने मजल मारलेली होती. त्यामुळे २००४ प्रमाणे भाजपला १८० च्या खाली खेचण्याच्या कल्पना साकार झाल्या नाहीत. ते एक स्वप्नच ठरले.
आज हिंदू व्होट बँकेला अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. ब्रीटन , जर्मनी सारखे देशही मुस्लीम अतिरेकाबद्दल बोलायला व हालचाल करायला लागले आहेत व या देशांची संख्या वाढत चालली आहे. हिंदू कम्युनिटी सौहृदाने जगणारी संस्कृती असल्याचे जगांत मानले जायला लागले आहे. बांगलादेशामुळे तर फारच मोठी वातावरण निर्मीती झाली आहे.
वरचे विवेचन खरे असेल तर
लोकसभेपेक्षा विधानसभेला मतदान वाढायला पाहिजे. लोकसभेला मुस्लीम व्होट बँकेने पूर्ण ताकदीने मोदी विरोधात मतदान केलेले असल्याने ती ताकद आता आणखी वाढण्याची शक्यता नाही. मात्र हिंदू व्होट बँकेला वाढण्याला मात्र अजून भरपूर वाव आहे.
कोण कुठे उभे आहे, बंडखोरांचा परिणाम वगैरेकडे मी फारसे लक्ष देत नाही. कारण हिंदू संघटन वाढत जाण्याचा दार्घकालीन कल अबाधीत राहण्यासाठी योग्य माणसांना योग्य बुध्दी नियती देत असते यावर माझा विश्वास आहे. त्यामुळे राजकारणी डावपेचांना मी फारसे महत्व न देता ते डावपेच नियतीनेच तिच्या मनातले घडवण्यासाठी तयार केले आहेत असे मी मानतो. त्यामुळे मतदान टक्केवारीवरून दीर्घकालीन कल शोधणे महत्वाचे मानतो.
माझ्या हिदू मुस्लीम मतांवरून मी मुस्लीम विरोधी आहे की काय असे वाटेल. पण प्रत्यक्षात तसे नाही.
जगातल्या सर्व संस्कृती आचार विचार व धर्म गुण्यागोविंदानी एकत्र राहण्यासाठी सर्वसमावेशक व सर्व विचारांचा आदर करणारी हिंदू संस्कृती टिकली पाहिजे, वाढली पाहिजे या मताचा मी आहे.
हरयाणात बांगला देशांच्या
हरयाणात बांगला देशांच्या घडामोडींचा परिणाम झाला अस वाटत नाही. काँग्रेस जाट मतांवर जास्त अवलंबून राहिली त्यामुळे इतर समाज भाजपा कडे गेला अस मला तरी वाटतयं. महाराष्ट्रातही बांगला देशांच्या घडामोडींचा परिणाम होण्याची शक्यता वाटत नाही, झाला तरी पुणे मुंबई सारख्या शहरात थोड्याफार प्रमाणात असेल. गावा कडे आणि लहान शहरात याचा मागमूसही दिसत नाही.
शेतकरी वर्ग भाजपला वैतागला आहे, त्यात जरांगेमुळे मराठा समाजही भाजपच्या विरोधात आहे. तसच सर्वपक्षीय राजकारणामुळे यंदा राज्यात मतदान कमी प्रमाणत होण्याची शक्यता आहे. एकंदरीत ही निवडणूक महायुतीला अवघड आहे. तरी नशीब मोदी जास्त सभा घेणार नाहीत. मोदींनी ग्रामीण भागात सभा न घेतलेल्याच भाजपसाठी फायद्याचं आहे.
जरांगे पाटलांच्या माघारीने
जरांगे पाटलांच्या माघारीने महाविकास आघाडीला संधी प्राप्त झाली. जरांगे हे शिंदे आणि पवारांचे मॅनेज्ड पाटील आहेत या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले. पण यामुळे शिंदेंचे आमदार मराठवाड्यात जास्त संखेयेने निवडून येतील हे पण पक्के झाले. मविआला सुद्धा फायदा होईल हे पक्के. हरियाणासारखे होणार नाही पण पाडापाडीचे राजकारण जर सुरू झाले तर मविआचा कडेलोट होऊ शकतो.
राजू परूळेकरांची मतं वास्तववादी आहेत. सध्या ते कुठल्याच प़क्षाकडून नसल्याचा परिणाम असावा. नाहीतर पत्रकार नव्हे प्रवक्ता अशीच स्थिती अन्य पत्रकारांची आहे. किमान भाऊ तोरसेकर उघड उघड भाजपचे आहेत असे म्हणवून घेत असतात. बाकीच्यांमधे ती हिंमत नाही.
मी पुन्हा सांगतो आहे. ह्या
मी पुन्हा सांगतो आहे. ह्या निवडणुकीला काही अर्थ नाही. "लाडकी बहिण" योजनेने सगळे पब्लिक आधीच विकले गेले आहे. शिंदे सरकार निवडणूक जाहीर व्हायच्या आधीच जिंकले आहे.
लक्षात ठेवा, Money is a great leveler!
बाकी चालू द्या.
"....पण आपण आता काय करतोय तर
"....पण आपण आता काय करतोय तर अर्थव्यवस्थेला एक व्हेंटिलेटर लावलं आहे. लोक यात खूश होतात. राजकारणी सुद्धा यात खूश होतात. मग हे राज्य असं सातत्याने व्हेंटिलेटवर सुरू राहिल. शिक्षण, आरोग्य, शेती यावर खर्च करता येणार नाही,” हातेकर सांगतात.
लाडकी बहिण हि एकाच योजना नाहीये. सर्व योजनांची एकत्रित माहिती आपल्याला https://www.bbc.com/marathi/articles/c33vv585kyro इथे मिळेल. खास दिवाळी बोनसही मिळणार आहे!
<जगातल्या सर्व संस्कृती आचार
<जगातल्या सर्व संस्कृती आचार विचार व धर्म गुण्यागोविंदानी एकत्र राहण्यासाठी सर्वसमावेशक व सर्व विचारांचा आदर करणारी हिंदू संस्कृती टिकली पाहिजे, वाढली पाहिजे या मताचा मी आहे.> हो. हिंदू संस्कृती अशीच आहे. पण सध्या फोफावते आहे ती हिंदुत्ववादी संस्कृती. यात बीफ बाळगल्याच्या , खाल्ल्याच्या संशयावरून मारहाण ते जिवे मारण्यापर्यंतचे प्रकार , हिंदू सणांच्या निमित्ताने सशस्त्र मिरवणुका काढून मशिदींसमोर अश्लाघ्य गाणी वाजवणे , घोषणा देणे, हावभाव करणे ; आणखीही आहेत.) सर्रास आणि नेमाने होतात. भाजप , संघ परिवार या संस्कृतीच्या मुळाशी आहेत.
एकमेकांकडे संशयाने बघणे
एकमेकांकडे संशयाने बघणे ह्याला संस्कृती म्हणत असतील तर आग लागो अशा संस्कृतीला.
https://www.facebook.com
https://www.facebook.com/avanish.mane/posts/pfbid0xhzvh4WG47T761dXUq6DQT...
अजितदादादा कालच्या तासगावमधल्या भाषणात असे म्हणाले की आर.आर.आबांनी गृहमंत्री असताना ७०,००० कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याची चौकशी सुरु करण्यासाठीच्या फाईल वर सही केली होती आणि हे त्यांना देवेंद्र फडणवीसांनी स्वतः मुख्यमंत्री झाल्यावर ती फाईल दाखवून सांगितलं होतं.
यावरून दोन गोष्टी स्पष्ट होतात:
१.आर. आर. पाटलांनी (आणि तत्कालीन सरकारने) भ्रष्टाचार निर्मूलनासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. आपल्या ‘राजकीय गॉडफादर’ चा पुतण्या समोर असूनही त्यांच्याविरोधात चौकशी लावण्यापासून ते डगमगले नाहीत. आर. आर. पाटील हे महाराष्ट्राच्या जनतेशी सर्व आघाड्यांवर प्रामाणिक राहिले.
२.देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी अजित पवारांवरील आरोपांची फाईल त्यांना दाखवून मुख्यमंत्रीपदाच्या गोपनीयतेचा भंग केला. खाली दाखविलेल्या फोटोमध्ये हेच देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना या सिंचन घोटाळ्याचे बैलगाडीभरून पुरावे घेऊन महाराष्ट्राच्या विधानभवनात गेले होते. पुढं याच भाजप सरकारनं अजित दादांना सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट दिली.
याचे सुद्धा दोन अर्थ होतात एक तर सिंचन घोटाळा झालाच नाही किंवा भाजपानं स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी सिंचन घोटाळाच दाबला… (भाजपाला 'वॉशिंग मशीन पार्टी' उगाच म्हणत नाहीत)
देवाभाऊंचं कौतुक करण्याच्या नादात दादांनी या भाषणात देवाभाऊ आणि भाजपालाच Expose केलंय ..आणि हे करत असताना त्यांनी भाजपाचा गमछा गळयात घातलाय हेही विशेष.
निकाल काहीही येवो, ही गंमत बघायला मजा येते आहे.
भरत + १.
भरत याच्या आधीच्या पोस्टला + १.
हिंदु व्होट बँकेने मत द्यायचे कुणाला आणि कुठल्या निकषावर?
हिंदु विरुद्ध अहिंदु अशी निवडणुक केव्हा आहे? त्यात हिंदुंचे प्रतिनिधित्व कोण करणार आहे?
हिंदुत्ववादी म्हणजेच हिंदु आणि हिंदु म्हणजेच हिंदुत्ववादी ही व्याख्या सगळ्या अथवा बहुसंख्या हिंदुंना मान्य आहे का?
हिंदुत्ववाद्यांनी (धर्माचे पाईक/रक्षक या अर्थाने) स्वातंत्र्यपूर्व तसेच स्वातंत्र्योत्तर काळात केलेल्या सामाजिक व धार्मिक सुधारणा कोणत्या? किंवा इतरांनी केल्या तेव्हा त्यांना केलेले सहकार्य कोणते?
झारखंडमध्ये प्रचारसभेत
झारखंडमध्ये प्रचारसभेत आदर्णीय मोदींनी ये लोग आपसे आपकी बेटी छीन लेंगे अशी भीती घातली. मंगळसूत्र, म्हैस आता मुलगी.
यावरून भाजप आमदार राम कदम आठवले. - कोणतंही काम असेल तर मला भेटा. अगदी एखाद्या मुलीला प्रपोझ केलं असेल आणि ती नाही म्हणत असेल तरी माझ्याकडं या. मी १०० टक्के मदत करेन. तुमच्यासाठी त्या मुलीला पळवूनही आणेन.
३७० कलम रद्द झाल्यावर आता तुम्हांला काश्मिरी मुलींशी लग्न करता येईल अशी लालूच एका भाजप नेत्याने प्रचारसभेत दाखवली होती.
लाडकी बहीण#, बेटी बचाव#
मोदींनी सेल्फ गोल केलाय.
मोदींनी सेल्फ गोल केलाय.
लोकसभेत भाजपला पूर्ण बहुमत न
लोकसभेत भाजपला पूर्ण बहुमत न मिळाल्याने, नितीश-नायडुंचा आधार घ्यावा लागल्याने, मोदी सरकारवर वचक रहाणार होता म्हणे.
रासमुसेन पोलने ट्रम्पच्या
रासमुसेन पोलने ट्रम्पच्या छप्परफाड विजयाची भविष्यवाणी केली
त्यांच्या अंदाजाचे विश्लेषण
* ट्रम्प यांना 297 इलेक्टोरल मते
* हॅरिस 241 इलेक्टोरल मते
जॉर्जिया - ट्रम्प 51-46%
उत्तर कॅरोलिना - ट्रम्प 50-47%
विस्कॉन्सिन - ट्रम्प ५०-४७%
नेवाडा - ट्रम्प 49-47%
पेनसिल्व्हेनिया - ट्रम्प 49-47%
ऍरिझोना - ट्रम्प 48-46%
मिशिगन - हॅरिस 49-48%
असं काही झालं व खरंच ट्रंपसाहेब जिंकले तर त्याचा परिणाम जॉन सोरेसच्या फंडींगवर होऊ शकेल काय?
जॉन सोरेसने लाडकी बहिण फंड
जॉन सोरेसने लाडकी बहिण फंड केली आहे का?
रच्याकने जॉर्ज सोरोसला शिव्या घालायची पद्ध्त होती ना? जॉन कौन है? कौन है जॉन?
अरे विधानसभेच्या धाग्यावर
अरे विधानसभेच्या धाग्यावर एकदम हे काय आले
मोदी नॉन बायॉलॉजिक आहेत ,
मोदी नॉन बायॉलॉजिक आहेत , त्यांना देवानेच पाठवलंय, शिवाय सरन्यायाधीशांचं पण देवाशी डायरेक्ट कनेक्शन आहे या सगळ्याशी वरच्या पोस्टमधल्या हिंदू आणि नियती या गोष्टी सुसंगत आहेत.
नावं बदलली आहेत मतदारसंघांची
नावं बदलली आहेत मतदारसंघांची
उदाहरणार्थ कसबा विधानसभा - जॉर्जिया
ट्रंप भाजपच्या तिकीटावर नालासोपारामधून उभे आहेत.
ट्रंप आला निवडून.
ट्रंप आला निवडून.


आता जॉर्ज सोरेस, महंमद युनूस व चीन मोदींना कसे काय त्रास देणार ते पाहिले पाहिजे.
मस्कचं चीन प्रेम आणखी कमी होईल. टेस्ला भारतात आली तर ती महाराष्ट्रात आली पाहिजे. महाराष्टांत एफडीआय ओढायला एकच हुषार माणूस आहे. तो सत्तेत असला की झालं.
टेस्ला भारतात आली तर ती
टेस्ला भारतात आली तर ती गुजरात मधे जाणार! ते FDI ओढणारे जे कोण आहेत त्या भावलीच्या दोऱ्या ओढणारे कोण आहेत ते आधी समजून घ्या.
३७० प्रकरणानंतर,काश्मीरी लोक
३७० प्रकरणानंतर,

काश्मीरी लोक त्यांच्या 'लढ्यात' एकटे नाहीत
हे कमलाबाई बोलल्याने कित्येकांना किती हायसं वाटलं होतं. त्यांचं आता काय होणार कळेना?
चला आता रजा घेतो.
सोनं घसरलं.
चांदी घसरली.
तेल लवकरच घसरेल.
युध्दाचे ढग निवळले म्हणायला हरकत नाही.
हे दिवस युध्दाचे नाहीत असं कोणितरी म्हणत होतं म्हणे.
पण त्याचं नाव घ्यायचं नसतं. तसं करणं पोलिटीकली करेक्ट नसतं म्हणे.
चला आता रजा घेतो.
२३ तारखेला भेटूया.
_/\_
ट्रंप = मोदी
ट्रंप = मोदी
जॉर्ज सोरेस = जरांगे पाटील, महंमद युनूस = राहुल गांधी , चीन = शिंदे
मस्क = अदानी
टेस्ला = तट्टाणी
मस्कने टेस्ला कारखाना नाही
मस्कने टेस्ला कारखाना नाही आणला भारतात.
हुशार आहे. बुलडोझर्सचा कारखाना आणणार आता.
मागणी बघुन कारखाने पसरावे हे ठाउक असते त्यांना.
महाराष्ट्राच्या निवडणुकीत
महाराष्ट्राच्या निवडणुकीत अमेरिकन अर्थव्यवस्था हा कळीचा मुद्दा आहे.
लाकडी बहीण साठी ट्रंप निधी मिळणार आहे.
टेस्ला कार पेक्षा भारतात बुलडोझर जास्त खपतील.
बंगलोर मधे कारसाठी होम लोन मिळतंय. ती तिकडे इम्मूव्हेबल प्रॉपर्टी मधे येते.
Pages