
भाग ३ :
https://www.maayboli.com/node/84791
* * * * * * * * * * * * *
तीन वर्षांपूर्वी चालू केलेला हा धागा आता चौथ्या भागात पदार्पण करतो आहे. त्यानिमित्त इथे चर्चेस नियमित येणाऱ्या सर्व माबो परिवाराचे मनापासून आभार !
विविध शब्दांची रोचक माहिती, व्युत्पत्ती आणि अर्थपूर्ण व मजेदार चर्चेमुळे शब्दांच्या विश्वातली ही सफर नक्कीच रंगतदार होते.
धागा संयोजनात एक सुसूत्रता असावी म्हणून पूर्वी केलेल्या काही सूचना पुन्हा एकदा :
१. हा मराठी भाषा विभागातील धागा असल्याने इथे फक्त मराठी शब्दच चर्चेला घ्यावेत. अर्थात अशा शब्दाच्या व्युत्पत्तीच्या चर्चेमध्ये आंतरभाषिकता येईलच; त्याचे स्वागत आहे.
( सर्व बिगर मराठी भाषांमधील शब्दचर्चेसाठी अन्य धागे उपलब्ध आहेत )
२. एखाद्या सभासदांनी नवा शब्द चर्चेस घेतल्यानंतर पुढील २० तास त्या शब्दासाठी राखून ठेवूयात. त्या दरम्यान पुढचा शब्द घेऊ नये. ही मुदत संपल्यानंतर त्यावर कोणतीही चर्चा झाली नसेल तरी नवा शब्द जरूर घ्यावा.
सहकार्याबद्दल धन्यवाद आणि चौथ्या भागात सहर्ष स्वागत . . .
करतो !
अवांतर संपादित
छान चर्चा ज्ञानकण वेचतेय
छान चर्चा
ज्ञानकण वेचतेय
खद्योत : छान अर्थ लावला.
खद्योत : छान अर्थ लावला.
केकू, रामरक्षा म्हटली असेलच तुम्ही.
त्यात "रामो राजमणिः सदा विजयते" पासून "भो राम मामुद्धर" पर्यंत राम शब्दाच्या सगळ्या एकवचनी विभक्ती क्रमाने आहेत.
(तुम्ही पूषणं बद्दल विचारले म्हणुन सहज सांगितले.)
स्वाती सूर्याची सगळी नावे असलेला एकत्र श्लोक माहीत नव्हता. नमः, व स्वाहा साठी चतुर्थी विभक्ती वापरतात.
(नमामि (किंवा क्रियापदाची इतर पुरुषी रूपे) म्हणायचे असेल तर द्वितीया. सूर्याय नमः, सूर्यं नमामि.) तेव्हा पूष्णे नमः हे बरोबर आहे.
तुम्ही दिलेल्या पहिल्या ओळीत पूष वगळता इतर सर्व संबोधन वाटतात. पूषन् चे संबोधन पूषन् असेच होते, तेव्हा इथे पूष कसे कळले नाही.
मानव, त्या श्लोकात संबोधन
मानव, त्या श्लोकात संबोधन नाही, एक मोठा समास आहे.. मित्र-रवि-सूर्य-..... इत्यादी नावे असलेल्या भास्कराला किंवा इत्यादी नावे असणाऱ्याला नमस्कार. मध्ये मध्ये "-" पाहिजे.
अच्छा! आता अर्थ लागतो. (आणि
अच्छा! आता अर्थ लागतो. (आणि भानुचे संबोधनही भानो होते हे नंतर शोधुन पाहिले)
तरी पूष कसे इथे?
@ सूर्याची बारा नावं एके
@ सूर्याची बारा नावं एके ठिकाणी अशी वाचली आहेत (बहुदा आदित्यस्तोत्रात) त्यात पूषन आहेच. :
धातु, मित्र, अर्यमन्, रुद्र, वरुण, सूर्य, भग, विवस्वत्, पूषन्, सवितु, त्वष्टु आणि विष्णु !
बहुत कन्फ्यूजन है रे बाबा
अनुराधा नक्षत्राची देवता
अनुराधा नक्षत्राची देवता मित्र आहे बहुतेक.
अर्यमन ह पितरांचा देव आहे ना?
वरुण ही पाण्याची/जलाची देवता आहे, तो सूर्य नाही असे वाटते.
शब्दार्थावरून आपण बरेच खोलात
शब्दार्थावरून आपण बरेच खोलात गेलो आहोत. त्यामुळे या विषयावर मी हा प्रतिसाद देऊन थांबतो (मागे स्वातीशी याच विषयावर चर्चा झाली होती, तिथला माझा प्रतिसाद चिकटवतो आहे).
नक्की कुणाला उद्देशून हा श्लोक आहे सांगा बरं -
ध्येयः सदा सवितृमंडलमध्यवर्ती नारायणः सरसिजासनसन्निविष्टः ।
केयूरवान् मकरकुण्डलवान् किरीटी हारी हिरण्मयवपुर्धृतशङ्खचक्रः ॥
आता ह्यात 'सवितृमंडलमध्यवर्ती' म्हणजे सूर्यमंडळाच्या मध्यभागी (सौरमंडल में टिम टिम आठवलं) सूर्यच असणार ना? तोच नारायण, तोच सरसिज म्हणजे कमळाच्या आसनावर बसलेला आहे. त्याला 'मकरकुंडले तळपती श्रवणी' आहेत. त्याची कांती सोन्यासारखी आहे (हिरण्मयवपु:) आणि हातात शंख-चक्र धरलेलं आहे.
अदितीच्या १२ही पुत्रांना वेदकाळात आदित्यच म्हणत. त्यात विवस्वान, सविता (सवितृ), पूषा (पूषन्) ही वेगवेगळी भावंडं आहेत. आपला आजचा सूर्य (म्हणजे सूर्यदेवता या अर्थाने) हा त्या सर्वांचा मिलाफ आहे.
बाकी नावांमध्ये जे बरेच गोंधळ आहेत, त्यासाठी पूर्वी निरनिराळ्या काळात कुठल्या देवता कशा स्वरूपात पूजल्या जायच्या, त्यांचं स्वरूप कसं बदलत गेलं हे पाहिल्यास थोडा उलगडा होतो.
आजच वाचनात आल.
आजच वाचनात आल.
ग्रीक सूर्य देवाला हेलिओस असे नाव आहे.
संस्कृतमध्ये सुद्धा सूर्याचं एक नाव हेली.
१. घरासाठी पागडी आली कोठून?
१. घरासाठी पागडी आली कोठून? >>> वाचले. रोचक !
. . .
२. संस्कृतमध्ये सुद्धा सूर्याचं एक नाव हेली.>>> रोचक !
PIE root *sawel = सूर्य
>>> helium चा शोध 18 ऑगस्ट 1868 च्या सूर्यग्रहणादरम्यानच लागलेला आहे ; म्हणून त्याचे हे नाव
https://www.etymonline.com/search?q=helium
heliumचा भारताशी संबंध!
heliumचा भारताशी संबंध!
Helium also has the distinction of being the first element discovered outside of earth before it was found on earth, being first seen by astronomer Jules Janssen as a line in the spectra of the sun during the solar eclipse in 1868 in India. Later that year, Norman Lockyer also observed the same spectral line and postulated that it was a new element. Lockyer evidently proposed the name helium, from the Greek ἥλιος (helios, meaning sun) + -ium, but did not include the name in any of his published papers.
हेलियम माहिती रोचक.
हेलियम माहिती रोचक.
धम्मिल / धम्मिल्ल
धम्मिल / धम्मिल्ल
सामो यांनी काही काव्यपंक्ती शेयर केल्या होत्या त्यातल्या या शब्दाने लक्ष वेधून घेतले.
संस्कृत आणि मराठीत अर्थ :
अलंकार/ फुले गुंफून घातलेली वेणी !
आहाहा मला तेच कळत नव्हतं.
आहाहा मला तेच कळत नव्हतं. धम्मिल्लकायै म्हणजे काय
पार्वतीने केसांची फुले माळलेली वेणी घातली आहे.
धम्मिल्लकायै च जटाधराय
नमः शिवायै च नमः शिवाय.
पार्वती व शंकर यांचे एकत्र वर्णन येत जाते अर्धनारिश्वराष्टकात
अतिसुंदर.
अनिंद्य अर्थाकरता, धन्यवाद.
धम्मिलका म्हणजे जिने फुले
धम्मिलका म्हणजे जिने फुले गुंफून वेणी घातली ती असा अर्थ असावा. तिला नमः यासाठी चतुर्थी विभक्ती धम्मिलकायै.
माझ्या माहिती प्रमाणे धम्मिल
माझ्या माहिती प्रमाणे धम्मिल चा अर्थ केसांचा बुचडा असा आहे. फुले माळलेली वेणी असा संदर्भ नाही मिळाला.
मराठी शब्दकोश (महाराष्ट्र
मराठी शब्दकोश (महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ) संदर्भ :
धम्मिल
पु. अलंकार, फुले इ. गुंफून घातलेली वेणी : ‘जाणो कृष्णपक्षाची निशा । धम्मिल्ल माथा ।’ – कथा ४·७·४४. [सं.]
धम्मिल्ल
पु. अलंकार, फुलें इ॰ गुंफून घातलेली वेणी. 'जाणो कृष्णपक्षाची निशा । धम्मिल माथा ।' -कथा ४.७.४४. [सं.]
ओके आभार.
ओके आभार. मी इथे वाचले.
धम्मिल (पु)
बांधलेले मस्तकाचे केस , बुचडा,
from
संस्कृत व प्राकृत कोश.
by
नारो आपाजी गोडबोले.
आणि
गोपाल जिवाजी केळकर.
सन १८७२.
पुल्लिंग हा क्लू असेल काय?
अजून
अजून
मी हलायुधकोश मध्ये क्रॉसचेक केले. तिथे दोनही अर्थ दिले आहेत. संयताः कचाः, आणि अनेक प्रकारची फुले आणि मोती ह्यानी सजवलेले ....
sorry मी व्यवस्थित लिहू शकत नाही. हा गीतगोविंद मधला रेफ आहे. Sorry. Very difficult for me to quote from the book.
छानच.
छानच.
हलायुधकोश मध्ये दोनही अर्थ दिले आहेत ….
Context मध्ये बरोबर अर्थ लागतोय. अनन्य सुंदरी पार्वती केसांचा बुचडा बांधण्याऐवजी फुला-मण्यांची वेणी घालण्याची शक्यता जास्त आहे
छान चर्चा.
छान चर्चा.
>>>>>अनन्य सुंदरी पार्वती
>>>>>अनन्य सुंदरी पार्वती केसांचा बुचडा बांधण्याऐवजी फुला-मण्यांची वेणी घालण्याची शक्यता जास्त आहे Happy
नारी मायेचे रुप हे प्रसिद्ध
सोस लेण्यांचा त्यास जन्मसिद्ध
तोच बीजांकुर धरी तुझा हेतू
विलासाची होशील मोगरी तू
आठवले.
सोस लेण्यांचा त्यास जन्मसिद्ध
सोस लेण्यांचा त्यास जन्मसिद्ध …
सुंदर !
वरचे शब्दकोषातले उदाहरण सुद्धा फार सुंदर वाटले :
'जाणो कृष्णपक्षाची निशा । धम्मिल माथा ।
कृष्णपक्षातल्या रात्रीला आकाशात तारे जास्त चमकतात, तो reference आहे.
छान चर्चा वाचतोय.
छान चर्चा वाचतोय.
मस्त चर्चा… एकेक सुंदर
मस्त चर्चा… एकेक सुंदर रेफेरेन्स मिळताहेत.
(No subject)
धम्मिल्ल
स्रोत : संस्कृत
धम्मिल्ल
शब्दभेद : संज्ञा, पुल्लिंग
धम्मिल्ल का हिंदी अर्थ
लपेटकर बाँधे हुए बाल, बँधी चोटी, जूड़ा,
मोतियों, फूलों आदि से सजाया हुआ जूड़ा या केशकलाप
हे सरळ सरळ हलायुध कोशातील entry चे भाषांतर आहे.
मुळात हलायुध कोश म्हणजे काय?
मुळात हलायुध कोश म्हणजे काय?
या नवाचाच अर्थ मला कळत नाहीये..
https://en.wikipedia.org/wiki
https://en.wikipedia.org/wiki/Halayudha
हलायुध स्वामी यांच्या बद्दल Wiki
केशव, तुमच्या प्रतिसादात
केशव, तुमच्या प्रतिसादात आलेला सौंदर्यपूर्ण शब्द केशकलाप !
Actually, कलाप म्हणजे समूह. Group. “कळप” ?
क्रियाकलाप आणि केशकलाप हिंदीत जास्त येतात. मराठीत तितकेसे नाही. अर्थ सेम टू सेम
BTW, “कलाप” येणारे अन्य अप्रचलित शब्द :
मुद्राकलाप
पल्लवकलाप
तंतुकलाप
कारणकलाप
‘पंचानन’चा अर्थ ‘सिंह’ आहे
‘पंचानन’चा अर्थ ‘सिंह’ आहे असं वाचलं. हे कसं काय?
Pages