Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53
चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...
चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
इन्कार बघायला हवा परत. शाळेत
इन्कार बघायला हवा परत. शाळेत असताना टीव्हीवर बघितलेला. विनोद खन्ना जबरदस्त. इफतिकार पण होता ना त्यात. विद्या सिन्हा आवडायची मला तेव्हा.
लव आज कल - सारा अली खान आणि
लव आज कल - सारा अली खान आणि कार्तिक आर्यन - मस्त आहे. त्यातली काही गाणी आवडायची तरी इतके दिवस का पाहिला नव्हता असा प्रश्न पडला..
manoj bajpayee
<मला त्यात अमजद उजव्या हाताने डावीकडच्या हिप पॉकेटमधलं वॉलेट काढायची झटापट करत असल्यामुळे पकडला जातो हे आठवतंय.> हो. हे आठवलं.
manoj bajpayee
@BajpayeeManoj
See you in theatres again with a film which changed our life and the industry forever!! Come join us in theatres on 17th January!!! #SATYA #Mumbaikaking
लव आज कल - सारा अली खान आणि
लव आज कल - सारा अली खान आणि कार्तिक आर्यन - मस्त आहे. >>> लव आज कल २ आहे ना तो? मला मुळीच आवडला नाही. अ त्यंत बालीश अभिनय, मला रंदीप हूडा आवडतो पण ह्यात त्याने पण माती खाल्ली. सारा तर असह्य चेहरे करते.
पार्ट १ मस्त होता. पार्ट २ भ्रष्ट कॉपी
मी पण बघतेय इंकार. छान आहे,
मी पण बघतेय इंकार. छान आहे, विनोद खन्ना काय राजबिंडा दिसतोय
विद्या सिंहा & तिची वहिनी जेन्युईनली काळजी ने ड्रायव्हर च्या मुला साठी पैसे द्यायला डॉ.लागू ला विनवतात, ते पाहून गहीवरून आले. आजकाल इतकी मायाळू माणसं कुठे असतात. प्रत्यक्षात ही आणि स्क्रीन वर ही.
इन्कार नेटफ्लिक्स आणि
इन्कार नेटफ्लिक्स आणि युट्यूबवर दोन्ही कडे आहे.
अमजद खानचा शोले नंतरचा हा टेरर रोल असेल. इतक्यातच मुकद्दर का सिकंदर पाहिला त्यात सुरूवातीला त्याचा दिलावर टेरर आहे, नंतर अचानक मारखाऊ आणि आशिक बनतो.
व्हिलन जबरी तो पिक्चर खंग्री!
आशू,
आशू,
मी पार्ट १ नाही पाहिला. सेम कन्सेप्ट होते का?
कदाचित त्यात आजवाल्या लव्हस्टोरी मागचा विचार थोडा तेव्हाच्या काळानुसार असेल. आणि यात जरा बदलत्या काळानुसार असेल. मला तो विचार फार आवडला. म्हणून चित्रपट आवडला
डेटिंग प्रेम करीअर लग्न.. यात बॅलन्स साधताना किंवा नेमके आपल्याला काय हवे आहे ते निवडताना आतला आवाज प्रामाणिकपणे ऐकायची आणि त्यानुसार वागायची हिम्मत हवी. नाहीतर आयुष्य फसते. असे चित्रपट मला नेहमीच रीलेट होतात.
सारा अली खान सुद्धा मला फार आवडते. वेगळाच चेहरा आहे. एकाच वेळी क्यूट सेक्सी हॉट गोड सारेच वाटते. केदारनाथची गाणी तिच्यासाठी पुन्हा पुन्हा बघतो. नुसते ऐकून मन नाही भरत.
कार्तिक आर्यन देखील अर्थात आवडतोच. त्या दोघांना बघूनच अचानक क्लिक झाले की अरे हा आपण एकदा बघायला तरी हवा. शून्य अपेक्षेने बघितला पण संपता संपता अजून तासभर वाढवला असता तरी बघायला आवडला असता असे झाले
मी पार्ट १ नाही पाहिला.
मी पार्ट १ नाही पाहिला.

>>
ऋषी कपूर, सैफ अन् दीपिका आहेत...
इम्तियाज अली नी च डिरेक्ट केलाय
Love aaj kal 2 अतिशय वाईट
Love aaj kal 2 अतिशय वाईट चित्रपट आहे, असे ऐकले आहे की सारा अली खान चा अभिनय हा अभिनय कसा करू नये म्हणून ॲक्टिंग स्कूल मध्ये दाखवतात
अँकी नं.१ ते डिटेल माहीत आहे
अँकी नं.१ ते डिटेल माहीत आहे मला. त्याची सुद्धा एक दोन गाणी आवडतात. पण पाहिला नाही. सैफ चे सोलो पिक्चर बरेचदा बोर होतात. पण आता बघेन. कारण हा आवडला.
सारा अली खान चा अभिनय हा
सारा अली खान चा अभिनय हा
>>>>
अभिनयाला खूप ओवर हाईप करू नका..
जसे क्रिकेटमध्ये तंत्राइतकेच किंवा किंचित जास्त महत्वाचे टेंपरामेंट असते तसे चित्रपटात स्क्रीन प्रेझेंस असतो..
आय वाँट टू टॉक - अभिषेक
आय वाँट टू टॉक - अभिषेक बच्चनचा हा सिनेमा आयपीटीव्हीवर पाहिला. बॉक्स ऑफिस हिट नसण्याचीच शक्यता आहे कारण काहीच या सिनेमाबद्दल फारसं काही ऐकलं नाही.
अर्जुन सेन या ग्लोबली रिक्ग्नाईज्ड इन्सिप्रेशनल स्पिकर चा हा बायोपिक (मला माहित नव्हतं अशी कोणी व्यक्ती आहे). बेस्ड ऑन ट्रू स्टोरी आहे म्हणून विश्वास ठेवला नाहीतर केवळ अशक्य कॅटेगरीतला चमत्कार आहे. एखाद्या माणसावर कॅन्सरमुळे वेगवेगळ्या प्रकारच्या १५-२० सर्जरी होऊन डॉ. ने केवळ १०० दिवस जगेल असं सांगितल्यावरही मरणाला हरवणारा अर्जुन सेन खरोखर अस्तित्वात आहे यावर विश्वास बसत नाही. एखाद्याची विल पॉवर असावी म्हणजे किती.
कॅन्सर शरीरात पसरल्यामुळे घशापासून ते प्रोस्टेट पर्यंत कराव्या लागणार्या अनेक सर्जरी, पर्सनल लेवल वर मुलीला सिंगल पॅरेंट म्हणून सांभाळत होत असलेली तारांबळ त्यातून तिच्याशी होत असलेले मतभेद, स्वतःची तब्ब्येत, सतत होणार्या हॉस्पिटलच्या वार्या या सगळ्यातून मात करून बाहेर पडलेला अर्जुन सेन अभिषेकने केलाय खरा. पण अजून थोडी मेहेनत घ्यायला हवी होती दिसण्यावर. आता हा लुक, आता तो लुक असं ट्राय करताहेत वाटलंय. कंटीन्यूटी नाही वाटली. अमिर खान जसा दंगल मधे शेवटपर्यंत महावीर फोगटच वाटत राहतो तसं इथे नाही जाणवलंय. अभिषेक मधेच बच्चन वाटायला लागतो. काम चांगलं करायचा प्रयत्न केला आहे त्याने पण ओके वाटला मुव्ही. मुलीचं कॅरेक्टर पण अजून चांगलं फुलवायला हवं होतं.
अंजली_१२ शी पूर्ण पणे सहमत.
अंजली_१२ शी पूर्णपणे सहमत. बॉडी लँग्वेज, लुक्स, शरीरयष्टी .. म्हणजे नुसते ढगळ शर्ट घालून वजन कमी झालेलं दाखवणे नाही रुचत. कॅमेरातून काही करा किंवा इतर मेकप वगैरे करा... माहित नाही. पण अनेकदा तो अभिषेकच वाटतो. मुलीच्या कॅरेक्टरला पण +१.
मला कितीतरी वेळ त्याला दोन मुली आहेत असं वाटत होतं. ती लहान मुलगी मोठी झाली हा प्रकाश डोक्यात पडायला फार वेळ गेला.
ती लहान मुलगी मोठी झाली हा
ती लहान मुलगी मोठी झाली हा प्रकाश डोक्यात पडायला फार वेळ गेला. Lol>>> हाहा बरोबर कारण तो अजून लहान दिसायला लागला तेव्हा.
लव आज कल पार्ट १ देखील
लव आज कल पार्ट १ देखील हातासरशी बघून घेतला.
हा सुद्धा छान होता.
फक्त सेम प्लॉट असल्याने सरप्राईज एलिमेंट निघून गेला इतकेच.
पण दीपिकाला तोड नाही !
मला कितीतरी वेळ त्याला दोन
मला कितीतरी वेळ त्याला दोन मुली आहेत असं वाटत होतं. ती लहान मुलगी मोठी झाली हा प्रकाश डोक्यात पडायला फार वेळ गेला >>
तिला टिपिकल बॉलीवूडीय पळता पळता मोठी होताना नाही दाखवलं का? तरीच
बरोब्बर! तरीच म्हणतोय काहीतरी
(No subject)
तिला टिपिकल बॉलीवूडीय पळता
तिला टिपिकल बॉलीवूडीय पळता पळता मोठी होताना नाही दाखवलं का? तरीच>>> हपा
अभिनयाला खूप ओवर हाईप करू नका..
जसे क्रिकेटमध्ये तंत्राइतकेच किंवा किंचित जास्त महत्वाचे टेंपरामेंट असते तसे चित्रपटात स्क्रीन प्रेझेंस असतो..>>> हे फक्त तुझं मत आहे. अभिनेता- नावातच अभिनय आहे आणि तो असायला ही हवा. बाकी सेकंडरी.
सारा मला आवडते, क्लासी वाटते, दिसायला आलिया पेक्षा चांगली आहे पण डायरेक्टर चांगला असला तरच नीट अभिनय करऊन घेतो तिच्या कडून. इम्तियाज अली सारख्याला ते जमलं नाही लव आज कल २ मधे.
केदारनाथ मधे मला आवडली ती.
Kuttrame Thandanai कुणी
Kuttrame Thandanai कुणी पाहिला आहे का ?
(हिंदी डब्डचे नाव लायन शिवा आहे)
साधना,
साधना,
आता माझाही गोंधळ व्हायला लागला, इन्कार की अचानक?
आठाच्या आकड्यात पळण्याची
आठाच्या आकड्यात पळण्याची ट्रिक अचानक मध्ये आहे. इन्कार मध्ये अमजद खान त्याच्या मागावर असलेल्या कुत्र्यांना देखील यमसदनाला पाठवतो, तो काही कुठल्याही आकड्याच्या शेपमध्ये पळण्याच्या भानगडीत पडत नाही.
#सीधीबातनोबकवास (अमजदचा हॅशटॅग)
रानभुली, नेटफ्लिक्सवरचा इन्कार वेगळा. तो चित्रांगदा सिंग, अर्जुन रामपालवाला इन्कार आहे.
नेटफ्लिक्सवरचा इन्कार वेगळा.
नेटफ्लिक्सवरचा इन्कार वेगळा. तो चित्रांगदा सिंग, अर्जुन रामपालवाला इन्कार आहे.>> इन्कार सुद्धा नवीन
जुना आधी पाहीन. सलग नव्हता पाहिला आणि आता इथे वाचून temptation होतंय.
अरा बराचसा विख सारखा वाटतो. हुबेहुब नाही पण बॉडी टाईप हाईट, चेहरेपट्टी इ.
अभिनय केला असता तर!
जुना इन्कार पाहिला. सरळसोट
जुना इन्कार पाहिला. सरळसोट सिनेमा आहे. काही विशेष नाही वाटला. मुळात मला त्याच्या टायटलचा आणि कथेचा संबंधच नाही समजला. बहुदा श्रीराम लागू हीरो आणि अमजदखान व्हिलन होते (जे संपूर्ण सिनेमात एकदाही भेटत नाहीत). विद्या सिन्हाला भिजवण्यात अर्थ नसल्यामुळे शेवटच्या मारामारीत विनोद खन्नालाच भिजवलाय.
४२० आय पी सी - या धाग्यावर
४२० आय पी सी - या धाग्यावर येऊन गेलाय का ?
आवडला. विनय पाठक, विनय शौरी, गुल पनाग आणि ऑफ बीट मूवीज मधले अनेक कलाकार आहेत. एंगेजिंग मूवी आहे.
वरच्या कमेण्ट मधे चुकून विनय
वरच्या कमेण्ट मधे चुकून विनय शौरी झाले आहे. तो माझ्या फोनचा प्रताप आहे.
रणवीर शौरी पहिल्यांदाच आवडला. मस्त काम केले आहे त्याने. जज्ज झालेले सीनीयर अभिनेते आता चेहर्याने ओळखीचे झाले आहेत. नाव माहिती नाही. शेवट लक्षात आला होता पण उगीच आपला आता हा दाखवलाय म्हणजे तोच असेल असं. गेसिंग गेम.
सकाळी पाहिलेला मराठी लघुपट आणि रात्री पाहिलेला हा दोन्ही छान निघाले.
प्राईमवर "झिग्वाटो" लावला
प्राईमवर "झिग्वाटो" लावला होता.
थोडा बघून मला काही कामाला बाहेर जावे लागले.
घरी आले तर नवरा भयंकर वैतागला होता.
काही कथाच नाही चित्रपटाला.
झिग्वाटो ला थोडी नाट्यमय
झिग्वाटो ला थोडी नाट्यमय स्टोरी हवी होती अभिनयाच्या बाबतीत मात्र कपिल शर्मा ला फुल्ल मार्क्स
कपिल शर्मा हा कॉमेडी वाला कपिल शर्मा वाटतच नाही सिरियस रोलही करू शकतो आणि अभिनयाचा खूप चांगला प्रयत्न केलाय .शहाना गोस्वामी चाही अभिनय छान आहे. कपिल शर्मा ऐवजी दुसरा नवोदित ॲक्टर असता तर डॉक्युमेंट्री सारखा वाटला असता .शेवट अगदी ना काही नाट्य होता पटकन संपून जातो. डिलिव्हरी बॉय ची डे टू डे लाईफ आणि स्ट्रगल म्हणून कोणी इतका बघितला नसता.कपिल शर्मा मुळे बऱ्याच लोकांनी पाहिला तरी .मात्र चित्रपटात भुवनेश्वर परिसर आणि तिथली भाषा बघायला मिळाली.
न वाचलेल्या सव्वाशे पोस्ट्स
न वाचलेल्या सव्वाशे पोस्ट्स होत्या, त्या न वाचताच लिहितोय.
प्राईमवर दादा कोंडकेंचा 'एकटा जीव सदाशिव' पाहिला. ठीक ठीक वाटला. गोविंदाने दादांची चांगलीच कॉपी केलीय असे. लक्षात आले. दादांनी अनेक ठिकाणी छान अभिनय केला आहे.
न वाचलेल्या सव्वाशे पोस्ट्स
न वाचलेल्या सव्वाशे पोस्ट्स होत्या, त्या न वाचताच लिहितोय.
>>>>
वाचल्यावर तुम्ही लिहिलेल्या पोस्टमध्ये काही फरक पडला असता का
Pages