चित्रपट कसा वाटला- भाग १०

Submitted by mrunali.samad on 5 July, 2024 - 10:53

चित्रपट कसा वाटला- ९ धागा २००० पार...
नवे,जुने,देशी,परदेशी सिनेमे कसे वाटले लिहिण्यासाठी नवा धागा तयार...

चित्रपट कसा वाटला - ९
https://www.maayboli.com/node/84513

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

वावे Lol
अस्मिता, आता आजच्या आज एक उथळ अभिरुचीवाला सिनेमाचं परीक्षण लिहावं लागणार Lol

ऋतुराज, नक्की. Happy
रमडने 'प्रेम रतन' ची सुपारी पूर्ण केली की मीही सुरु करेन. प्रतिक्षा कुठस्तोवर ओ तै Wink

वावे Lol चपखल मीम आहे एकदम Happy

आता कळाले 'रेको घ्या रेको' म्हटलं तरी सगळे दूर का पळून जातात >>> Lol एक उच्च रेको वापरलेत तरच एक उथळ मिळेल अशी कंडिशन घाल.

बास आज - उद्या पाहायला घेतेच आहे >>> हे मला "बस खानदानका पता चलतेही हम आपको खबर कर देंगे" इतकेच रिलायेबल वाटत आहे Wink

Reko Diq Mine या पाकिस्तानी प्रोजेक्टवर मी सध्या काम करत आहे. बोलताना शॉर्टमध्ये Reko (रेको) असेच म्हटले जाते. दिवसातून पन्नास वेळा हा शब्द तोंडात येतो. पण आता अचानक हे क्लिक झाले की हा शब्द अजून कुठे ऐकला वाचला जातो Happy

फा Lol
एक उच्च रेको वापरलेत तरच एक उथळ मिळेल>>>>>> हे तर एका साबणाच्या वडीवर पाच किलो तेल फुकट मिळणार असं वाटतंय.

बास आज - उद्या पाहायला घेतेच आहे>>>> पंचांग पाहिजे असल्यास सांग.

एक उच्च रेको वापरलेत तरच एक उथळ मिळेल अशी कंडिशन घाल. >>>> Lol आता हेच करावे लागणार आहे. रेकोज 'पाहवून' घ्यावे लागणार आहेत.‌

पोहर्‍याचा 'अण्णू गोगट्या होणे' तसा चित्रपटाचा 'अमलताश' होणे या वळणावर गेलंय आता हे Proud

(जाताजाता सांगते - मला आवडला अमलताश. )

'गोल्डफिश'चा रेको मला आहे का? नसला तरी घेईन, कारण मी वीकेन्डात 'संगीत मानापमान' न झोपता (as far as I remember, at least! Proud ) बघून उथळचा कोटा कम्प्लीट केला आहे. Proud
कुठे बघायचा हा?

केक्लां/फेक्लां Lol

रेको 'कोणाला' असा दिलेला नसतो. तो 'कोणी' दिलाय यावरुन आपल्याला आवडून का नावडून घ्यायचा ते ठरवून त्याच्याशी आजन्म एकनिष्ठ रहायचं असतं. आणि जीवनाशी ही!
अरे सॉरी! परत जाऊन मागे वाचलं तर तुलाच रेको दिलेला आहे. Lol

न झोपता 'मानापमान' पाहिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन. अतिशय हृद्य प्रतिसाद Proud

ज्यांचा अनुल्लेख केला आहे त्यांनी अमितचा फ्लोचार्ट वापरावा. ज्यांचा उल्लेख केला आहे, त्यांनी हे उपकार आजन्म लक्षात ठेवावेत. आमच्याकडेही काही करण्यासारखे नसल्याने उपकारांची आठवण करून देतच राहू.

तुमच्या आवडलेल्या सिनेमांच्या पाऊलखुणा बघता तुम्हाला हा आवडेल असे वाटते आहे. असेही भाजी न विकल्या जाणाऱ्या भाजीवालीसारखी मी 'रेको घ्या रेको' करत फिरत असते. कशाला कोणतं गिऱ्हाईक आहे कळलंय आता. मी हा आयपीटिव्हीवर पाहिला. पण यूट्यूबवर दिसतोय अव्हेलेबल.

'पापी गुडिया' नोटेड आशु.

हो Happy भाजी ऑरगॅनिक आहे, लोकली ग्रोन आहे की कोठून कोठून आलेली आहे ते सांगावे. साल्मन्/सामन फार्म्ड आहे की तिकडून बीबीसीचे शूटिंग सुरू असताना अगदी तो डेव्हिड अ‍ॅटनबरो बोलत असताना ग्रिझलीच्या तोंडचा घास काढून आणलेला आहे ही माहिती लोकांना हवीच Happy

Lol फा, डेव्हिड ॲटनबरोएवढीच चिकित्सा करून डेव्हिड धवनकडे जाता तुम्ही. स्वतःचे बघणेबलही पाणीपुरीसारखे विकल्या जातात तुमचे, भाजीवालीचे दुःख तुम्हाला कळणार नाही.

आता ऑरगॅनिक आणि फ्रीरेजचे दिवस गेले. आता सुवर्णयुग आलंय सुवर्णयुग. एक नाही चार आयपी टीव्हीवर बघा. येकदम बिंदास घे श्वास!

A Quiet Place - Part 2 पाहिला (नेफि). चांगला ग्रिपिंग आहे. ज्यांनी पहिला भाग पाहिला आहे त्यांना साधारण अंदाज येईल आणि आवडेलही.

दावत-ए-इश्क (अ‍ॅमेझॉन प्राइम) - हा अस्मिताच्या रेकोने पाहिला (खरे तर फ्लाइटमधे काहीतरी उथळ लाइट पाहावे म्हणून लावला होता पण एंगेजिंग वाटल्याने तेथे बंद करून नंतर नीट पाहिला ). थीम अशी आहे की हुंडा मागणार्‍यांचा बदला घ्यायला त्यांनाच गंडवून त्यांच्याकडून पैसे उकळायचे असा परिणिती व तिचे वडील अनुपम खेर यांचा प्लॅन असतो. पहिला अर्धा भाग - त्यांचे हैदराबादमधले लग्नाच्या प्रयत्नांचे, हुंडा मागणार्‍यांचे अनुभव - तो भाग सर्वात मस्त आहे. परिणिती चोप्राचे काम सुंदर आहेच पण तिचे व्यक्तिमत्त्वही फार छान उभे केले आहे. अनुपम खेर नेहमीप्रमाणे मस्तच. त्यांचा हैदराबादी अ‍ॅक्सेण्ट व बोलणे किती ऑथेंटिक आहे माहीत नाही पण वरवर माहीत असलेल्या माझ्यासारख्याला ते ऐकायला धमाल वाटले. नंतर हे लोक लखनौला जातात तेथून पिक्चर इतका काही खास नाही. आदित्य रॉय कपूर काकणभर ओव्हर द टॉप आहे पण तितका ठीक आहे. ओव्हरऑल बघणेबल.

परिणिती यात अधूनमधून इंग्रजी बोलते. तिचे कॅरेक्टर तसेच दाखवले आहे. तिचे उच्चशिक्षित इंग्रजी इतर चित्रपटांत इतर कलाकार फिल्मी इंग्रजी बोलतात त्यापेक्षा वेगळे लगेच जाणवते. इव्हन थोडे मॅनरिजम्स.

स्वतःचे बघणेबलही पाणीपुरीसारखे विकल्या जातात तुमचे, भाजीवालीचे दुःख तुम्हाला कळणार नाही. >>> Lol हे लिहीपर्यंत माझ्या वरच्या पोस्टमधे अजून एक बघणेबल आला Happy पण हा तुझाच रेको होता.

हायला ! चक्क नावानिशी रेको ! आता मला समजत नाहीये की 'तू असलेच सिनेमे बघतोस' म्हणून माझे पॅकेज काढले आहेस की खरच मला आवडण्यासारखा आहे. Rofl कुठे बघायचा तो सिनेमा? युट्यूबवर कुठला तरी साउथी गोल्ड फिश दिसतोय. तू म्हणते आहेस त्याचे फक्त ट्रेलर्सच आहेत.

दावत-ए-इश्क >> जेव्हा आला तेव्हाच पाहिला होता. फारच पाकाऊ वाटला होता. परिणीतीला अजिबात अभिनय जमत नाही. आदित्य रॉय कपूर तर का आहे असा प्रश्न पडतो. सगळे खूप फेक फेक वाटत राहते. काहीच कनेक्ट होत नाही. चांगल्या स्टोरीचा वाईट अभिनेते घेऊन खून पाडल्यासारखा वाटतो

नेफि वर "रोशन्स" - म्हणजे सन्गीतकार रोशन, राजेश आणी राकेश रोशन आणि ह्र्त्विक रोशन यान्च्यावर आधारीत सिरिझ पाहिली. सन्गीतकार रोशन यान्ची अनेक गाणी ऐकली आणि आवडली पण ही रोशन यानी सन्गीत दिले आहे हे नव्हते माहित. त्यामानाने प्रसिढी कमी मिळाली त्यान्ना.
चार भागात आहे. आवडली.

माधव, नाही नाही पॅकेज काढले नाही, उलट सन्मान दिला आहे. भारतात कुठल्या प्लॅटफॉर्म वर आहे कल्पना नाही पण आवर्जून बघा. Happy नावानिशी रेको दिला आहे कारण तुम्ही याचे परफेक्ट गिऱ्हाईक वाटलात. Wink

खरे तर फ्लाइटमधे काहीतरी उथळ लाइट >>> Lol उथळ नाही, हलकाफुलका मात्र आहे.

मला तर 'दावत ए इश्क' हा संपूर्ण सिनेमाच आवडला होता. परिणिती चोप्रा व अनुपम खेरचे काम व केमिस्ट्री जबरदस्त आवडली होती. नेहमीपेक्षा जरा वेगळी धमाल आहे. हैद्राबादी भाषा लहेजा, खाणंपिणं, लखनौचे पदार्थ वगैरे पाहायला आवडले होते.

परिणिती यात अधूनमधून इंग्रजी बोलते. तिचे कॅरेक्टर तसेच दाखवले आहे. तिचे उच्चशिक्षित इंग्रजी इतर चित्रपटांत इतर कलाकार फिल्मी इंग्रजी बोलतात त्यापेक्षा वेगळे लगेच जाणवते. इव्हन थोडे मॅनरिजम्स. >>> चपखल निरीक्षण आहे.

मला पण आवडला होता, परिणीती बबली भुमिकात नेहमिच चान्गली वाटलिये..त्याशिवाय सन्दिप और पिकी मधे पण आवडली होती...

सन्गीतकार रोशन यान्ची अनेक गाणी ऐकली आणि आवडली पण ही रोशन यानी सन्गीत दिले आहे हे नव्हते माहित. >>> बब्बन - हे समजले नाही. रोशन व राजेश रोशन व्यतिरिक्त आणखी कोणी संगीत दिले आहे का?

उथळ नाही, हलकाफुलका मात्र आहे. >>> यस यस ते बरोबरच आहे. मी लावताना लाइट काहीतरी बघू म्हणून लावला, अशा अर्थाने लिहीले आहे.

मला त्यातला एक सर्वात आवडलेला संवाद म्हणजे त्या तारीक च्या घरासमोर गाडीत बसून निर्विकार चेहर्‍याने परिणिती व अनुपम खेर "लोकांवर विश्वास ठेवण्यासारखी परिस्थिती नाही" टाइप काहीतरी गंभीरपणे म्हणतात तो. प्रत्यक्षात त्या वेळेस हे लोकच बनाव रचून लखनौला आपण स्वतः दुबईहून आलो आहोत असे दाखवत आलेले असतात व तेथे स्वतः त्या तारीकच्या फॅमिलीला कसे गंडवायचे याचा प्लॅन करत असतात Happy

त्या भोचक शेजारणींना अजून फुटेज द्यायला हवे होते. सुरूवातीलाच "लोणच्याच्या बरणीसारखी माणसे कोंबून आणली आहेत" वगैरे गप्पा भारी होत्या Happy

महिलाप्रधान पिक्चर्स करता जशी बेख्डेल टेस्ट आहे तशी लीड कॅरेक्टर्स मुस्लिम असलेल्या पिक्चर्सकरता एक असायला हवी. म्हणजे धर्माने मुस्लिम असलेले भारतीय लीड्स आहेत पण कथेत, सीन्स मधे, संवादांत त्यांचे मुस्लिम असणे हे सतत आपल्यावर मारले जात नाही. उलट त्यांच्या सोशल लेव्हलचे इतर भारतीय असतात तसेच त्यांचे प्रश्न, वागणे वगैरे दाखवले आहे - असे पिक्चर्स कमी आहेत. भिंतीवर मक्का की कोणतेतरी चित्र, अधूनमधून नमाज पढताना दाखवणे, अतिरेकी संदर्भ किंवा मग एकदम खानचाचा टाइप दयाळू व्यक्तिमत्त्व यातील कोणतेही स्टीरीओटाइप नसलेले लोक यात आहेत तसे क्वचितच सापडतात.

(बाय द वे, मराठी "लाइक आणि सबस्क्राईब" बेख्डेल टेस्ट मधे पास होईल)

Pages