लोकसभा -२०२४ चर्चा धागा.

Submitted by चद्रनाद नादीचार्य. on 7 April, 2024 - 15:36

लोकसभा २०२४, चर्चा

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

तेव्हा महाराष्ट्र काँग्रेस मध्ये असंख्य ब्राह्मण मोठमोठ्या पदांवर होते. त्यानी हया सर्व गोष्टी पाहूनही काहीही केले नाही असे म्हणतात.
त्यांनी महात्मा गांधींच्या मारेकऱ्यांचे समर्थन केले नाही आणि उदात्तीकरणही केले नाही. जे अधिक धोकादायक होते आणि आहे.

शेंड्या ने नेहेमीप्रमाणे अर्धवट लिहिलं अन पब्लिकला फक्त गांधीवधाच्या दंगली इतकंच माहिती असल्याने ते धकवलं जात आहे.

त्याने एका कवितेत नेहरूंना "हिटलर का चेला" असे संबोधले होते. अभिव्यक्तीची कित्ती काळजी होती नेहरुजींना! >>>

नुसते हिटलर का चेला होते की "मार ले साथी, जाने ना पाये" हे ही होते? ती सुद्धा एक कविता लिहीली आहे आणि कवितासंग्रहात प्रकाशित केली आहे असे नाही, तर कामगार संघटनेसमोर हे सादर करणे - हे सगळे हिंसाचाराच्या "चिथावणी" च्या ग्रे एरिया मधे जाऊ शकते. ही जर चिथावणी नसेल तर त्यांना त्याचा खुलासा करण्याची/माफी मागण्याची संधीसुद्धा दिली गेली होती. ती ही नाकारल्यावर मग अटक झाली.

एका कवितेकरता अटक व दोन वर्षे तुरूंगवास ही ओव्हररिअ‍ॅक्शन वाटेल पण मार ले साथी जाने ना पाये भर सभेत म्हणणे - इथे विचारस्वातंत्र्याची लाइन क्रॉस होते. ते ही असे ऐकले आहे की कम्युनिस्ट पक्ष तेव्हा सरकारविरूद्ध बंड करू पाहात होते आणि त्यांच्याच तर्फे आयोजित केलेल्या सभेत हे सादर केले होते मजरूहने.

बाय द वे, कॉमनवेल्थ मधे सामील होण्यात कम्युनिस्टांना काय प्रॉब्लेम होता कळत नाही - हा सगळा विरोध त्याकरता होता. उलट राणीचे अधिपत्य मान्य न करता, एक सार्वभौम राष्ट्र म्हणून त्यात सामील होउन ब्रिटिश कॉमनवेल्थचे फायदे मिळवणे, व त्याकरता ब्रिटिशांनाच कॉमनवेल्थची व्याख्या बदलायला लावणे हा नेहरूंचा एक मास्टरस्ट्रोक होता. तोपर्यंत तुम्ही जर ब्रिटिश "क्राउन" चे अधिपत्य मानलेत तरच कॉमनवेल्थ मधे सामील होता/राहता येत असे. भारताला सामील होता यावे म्हणून ब्रिटिशांनी ती अट काढली.

नेहरूंचे मूल्यमापन करायचे तर २५-३० वर्षांचा स्पॅन घेऊन करायला हवे. काही घटनांतून नव्हे. मुळात अशा बहुतांश घटना म्हणजे राजापेक्षा राजनिष्ठ लोकांचे अतिउत्साही उद्योग असतात. मजरूहच्या बाबतीतही अटक मोरारजींनी केली होती.

>>
तेव्हा महाराष्ट्र काँग्रेस मध्ये असंख्य ब्राह्मण मोठमोठ्या पदांवर होते. त्यानी हया सर्व गोष्टी पाहूनही काहीही केले नाही असे म्हणतात.
ते आपले राजकीय वजन वापरून गुन्हेगाराना सहज शिक्षा घडवून आणू शकत होते. पण जेव्हा ब्राह्मण नेतेच हया बाबतीत उदासीन होते तर इतराना दोष देण्यात काय अर्थ?
<<
असंख्य बामण नेते काँग्रेसमधे मोठ्या पदांवर होते? हो का? असंख्य? अतर्क्य वाटते! अल्पसंख्य असतील. आणि बामणांचा वाली हा केवळ दुसरा बामणच असू शकतो, थोडक्यात क्ष जातीवर संकट आले तर क्ष जातीची व्यक्तीच त्याचे निर्दालन करू शकते ही काँग्रेसची शिकवण आहे का? तसे असेल तर समाजात कायम मूठभर असणार्या बामण जातीला कुणी त्राता नसेल असेच दिसते.
मला वाटते काँग्रेसी बामण केवळ भीतीपोटी गप्प होते. आपण ब्र देखील काढला तर आपलीही अशीच वाट लावली जाईल ह्याची मनोमन खात्री असल्यामुळे जे कोणी गाडगीळ, टिळक काँग्रेसमधे होते ते गप्प राहिले.

>>
नुसते हिटलर का चेला होते की "मार ले साथी, जाने ना पाये" हे ही होते? ती सुद्धा एक कविता लिहीली आहे आणि कवितासंग्रहात प्रकाशित केली आहे असे नाही, तर कामगार संघटनेसमोर हे सादर करणे - हे सगळे हिंसाचाराच्या "चिथावणी" च्या ग्रे एरिया मधे जाऊ शकते. ही जर चिथावणी नसेल तर त्यांना त्याचा खुलासा करण्याची/माफी मागण्याची संधीसुद्धा दिली गेली होती. ती ही नाकारल्यावर मग अटक झाली.
<<
एक नेहरुभक्त म्हणून त्यांच्या प्रत्येक कृत्याचे लंगडे समर्थन करणे ही हतबलता/मजबूरी समजू शकतो. पण निदान ह्याला लोकशाहीचे गोल्ड स्टँडर्ड असे म्हणण्याचा निर्लज्ज प्रकार तरी करू नका!
वोल्टेअर ह्या फ्रेन्च विचारवंताचे एक विधान आहे. "तू जे बोलतो आहेस त्याच्याशी मी मरेपर्यंत असहमत असेन. पण तुला ते म्हणणे व्यक्त करण्याचा अधिकार असावा म्हणून मी मरेपर्यंत प्रयत्नशील राहीन." ह्याला लोकशाहीचे गोल्ड स्टँडर्ड म्हणता येईल.
नेहरूंनी जे काही केले त्याला तसे म्हणणे म्हणजे एक ढोंगीपणा आहे.
एका कवितेसाठी दोन वर्षे तुरुंगात खितपत टाकणे हा हुकुमशाहीत, इंग्रजांच्या वसाहतवादी शासनात योग्य दंड म्हणता येईल. पण लोकशाही आणि व्यक्तीस्वातंत्र्याची ध्वजा खांद्यावर घेतलेल्या कर्मयोग्याने दिला असेल तर हा कमालीचा अतिरेकी दंड आहे.

पुन्हा एकदा लांब रहायचे हे ठरवूनही प्रतिसाद देत आहे.

तेव्हा महाराष्ट्र काँग्रेस मध्ये असंख्य ब्राह्मण मोठमोठ्या पदांवर होते. त्यानी हया सर्व गोष्टी पाहूनही काहीही केले नाही असे म्हणतात. पण जेव्हा ब्राह्मण नेतेच हया बाबतीत उदासीन होते तर इतराना दोष देण्यात काय अर्थ? >> यातले बोल्ड केलेले शब्द सोडून हे खरेच आहे असे समजतो. त्याचे संदर्भ मागत नाही.

गुजरात दंगल झाली त्या काळात केंद्रातल्या भाजपच्या मंत्रीमंडळात मुस्लीम मंत्री होते, एक मुस्लीम उपाध्यक्ष होऊन गेलेले होते. त्यांनी या दंगलीवर काहीच आवाज उठवला नाही मग इतरांना का दोष द्यायचा ?

याच छापाचे हे विधान नाही का ?
ब्राह्मणांच्या जागी मुस्लीम, शीख, दलित असे कुणीही असतील. जे जे अल्पसंख्य असतील त्यांचे त्या त्या पक्षातले प्रतिनिधी आवाज उठवण्याइतके स्वतंत्र आणि सक्षम असतात का ? कि यासाठीच त्यांना घेतात ?

>नेहरूंचे मूल्यमापन करायचे तर २५-३० वर्षांचा स्पॅन घेऊन करायला हवे. काही घटनांतून नव्हे.
+१
स्वातंत्र्या नंतर नेहेरुंची कॉलर पकडून एका महिलेने विचारले की देश को आझादी मिली , मुझे क्या मिला ! त्यावर नेहेरू म्हणाले की तुमे प्रधानमंत्री की कॉलर पकडने की आझादी. शंकर्स वीकली मध्ये वगैरे नेहेरूंची कार्टून येत असत, त्यांना नेहेरू दादच देत, उलट मला सोडू नका माझ्यावर ही कार्टून करा असेही बजावत. कवितेत असे शब्द असतील तर अटक करणे योग्यच आहे. Your freedom ends where my nose begins असेही वाक्य आहे. मी मोदीभक्त नाही पण अशी चिथावणीखोर कविता मोदींबद्दल कुणी लिहिली व व त्याला अटक झाली तर ती योग्यच होती म्हणेन.

> एक नेहरुभक्त म्हणून त्यांच्या प्रत्येक कृत्याचे लंगडे समर्थन करणे ही हतबलता/मजबूरी समजू शकतो.
projection much ? साक्षात बलात्कार्‍यांना सोडून त्यांचा सत्कार करणार्‍या मोदीजींबद्दल अवाक्षरही न काढणार्‍यांनी हे लिहावे ? हा हंत हंत नलिनी !

<< शेंड्या ने नेहेमीप्रमाणे अर्धवट लिहिलं अन पब्लिकला फक्त गांधीवधाच्या दंगली इतकंच माहिती असल्याने ते धकवलं जात आहे. >>

----- गांधीवध ?? Sad

निशस्त्र वृद्धाची हत्या केली होती. आणि या हत्येचा मास्टर माईंड माफीवीर पुराव्या अभावी मोकळा सोडला होता.

१९८४ दिल्ली दंगल ( हजारो शिखांची हत्या), २००० तसेच २००२ गुजरात दंगल या मधे हजारो निरपराधी मारल्या गेलेत. १९८४ शिख आणि गुजरात मधे मुस्लीम. स्वातंत्र भारताच्या इतिहासांत या माणुसकीला काळिमा फासणार्‍या घटना आहेत. अनेक सरकारे आली - गेली पण अपराध्यांना शिक्षा झाली नाही. सर्व प्रकारच्या हिंसाचाराचा सर्व काळांत निषेध करायला हवा.

साक्षात बलात्कार्‍यांना सोडून त्यांचा सत्कार करणार्‍या मोदीजींबद्दल अवाक्षरही न काढणार्‍यांनी हे लिहावे ? >>> सिरीयसली! आणि एकाच परिछेदात दुसर्‍याच्या मुद्द्याला मुद्द्याने प्रतिवाद न करता "निर्लज्ज" वगैरे म्हणणे, आणि तेथेच व्होल्टेअर काढणे यासारखा विनोद नाही.

मी नेहरूभक्त १००% आहे. पण माझी भक्तपणाची व्याख्या सध्या मोदीभक्त आहेत त्यांना झेपणारी नाही.

कविता लिहीणे आणि जाहीर सभेत "मार ले साथी जाने ना पाये" आवाहन करणे यात किंचित फरक आहे. उद्या मोदींबद्दल कोणी असे म्हंटले तर त्या व्यक्तीलाही अटक होणे साहजिक आहे. वस्तुनिष्ठ विचार करा. नेहरू मोदी बाजूला ठेवून.

बाकी गोल्ड स्टॅण्डर्ड हे माझे वाक्य नाही. पण गेल्या ७० वर्षांतील पॅटर्न्स पाहता लोकशाहीतील लोकांचे हक्क व विविध स्वातंत्र्ये, तसेच सरकारी संस्थांमधे होणारा हस्तक्षेप वगैरे बघितले तर नेहरूंच्या काळापेक्षा चांगल्या रीतीने नंतर कोणी राबवल्याचे उदाहरण नाही. उत्तरोत्तर हे कमीच होत गेले.

लोकशाही ही भारतात स्वाभाविकरीत्या आलेली नाही. स्वातंत्र्य मिळाल्यावरसुद्धा ब्रिटिशांच्या थेट अंमलाखालचा भाग सोडला तर ५००+ संस्थाने होती. आपला बराचसा इतिहास हा राजेशाहीचा आहे. अजूनही अनेकदा लोक एखादा राजा निवडल्यासारखे करतात. आपला प्रतिनिधी नव्हे. आपल्याला न आवडणार्‍या, अपमानास्पद वाटणार्‍या गोष्टींवर बंदी हवी असे बहुतांश पब्लिकला वाटत असते. अनेकदा तर अशा गोष्टींवरच्या सरकारबाह्य हल्ल्यांचेही समर्थन केले जाते ("विचारस्वातंत्र्य वगैरे सगळे ठीक आहे पण..." हे फार कॉमन वाक्य आहे). लोक जर असे असतील तर लोकांचे प्रतिनिधीही अनेकदा तसे वागतील यात काही आश्चर्य नाही.

या गोष्टी जगातील प्रत्येक सिस्टीममधे असतातच. पण लोकशाही व राज्यघटनेतून विविध घटकांना जे हक्क दिले जातात त्यातून याविरूद्ध दाद मागता येते. हे फक्त लोकशाहीतच होऊ शकते. या सगळ्या संस्था वगैरे आयत्या तयार करून वरती नेहरूंना बसवले गेले नव्हते. या संस्था, हे हक्क व ही स्वातंत्र्ये आस्तित्त्वात येण्यात नेहरूंचे मोठे श्रेय आहे. त्याची अंमलबजावणी १००% परफेक्ट त्या काळातही झाली नसेल. पण त्यानंतरचा काळ बघितला तर एकूण आत्तापर्यंत तीच सर्वात चांगली होती असेच म्हणावे लागेल.

लोकशाही ही भारतात स्वाभाविकरीत्या आलेली नाही. स्वातंत्र्य मिळाल्यावरसुद्धा ब्रिटिशांच्या थेट अंमलाखालचा भाग सोडला तर ५००+ संस्थाने होती. आपला बराचसा इतिहास हा राजेशाहीचा आहे. अजूनही अनेकदा लोक एखादा राजा निवडल्यासारखे करतात. आपला प्रतिनिधी नव्हे. >> मला तर खात्री आहे अजूनही भारतीय संस्थानिक मानसिकतेतून बाहेर आले नाही आहेत. राज्या-राज्यांमध्ये आणि पक्षांमध्ये ज्याप्रकारे परिवारवाद दिसतो, त्यावरून खात्री पटते की लोकांना पण अजून त्याप्रकारची व्यवस्था अपेक्षित आहे. आधी वाटायचे हे फक्त ग्रामीण भागात होते, पण नाही शहरी भागात पण थोड्याफार प्रमाणात हे पाहायला मिळते.

आजही एखादा लोकप्रिय आमदार वा खासदार अचानक गेला तर त्याच्या पत्नीला वा मुलाला (अजिबात अनुभव नसताना) तिकिट द्यायची मागणी होते, बरेचदा दिलेही जाते, बरेचदा निवडणूक बिनविरोध व्हावी अशीही मागणी होते.

१९५२ साली जी लोकसंख्या होती त्या प्रमाणात जेव्हढे खासदार होते त्यांची संख्या तितकीच राहिली पण लोकसंख्या चार पटीने वाढली. एका खासदारामागे असलेले मतदारांचे गुणोत्तर वाढत जाऊन मतदारसंघही विस्तारले. यामुळे सर्वसामान्य मनुष्य जो पूर्वी निवडणुकीला उभा राहू शकत होता तो आता उभा राहू शकत नाही.

एव्हढ्या मोठ्या मतदारसंघात पोहोचणे मीडीयाशिवाय शक्य नाही. निवडणूक हंगामात मीडीयाची चांदी असते. नव्या नव्या न्यूज एजन्सीजने (प्रादेशिक) या वेळी पन्नास ते शंभर कोटींची मिळकत खिशात घातली आहे. या परिस्थितीत निवडून यायची "क्षमता" ही नवसंस्थानिकांकडेच जास्त असते किंवा बडे उद्योगपती.

पुण्यात अतुर संगतानी हे बिल्डर उभे असताना गल्लोगल्ली गणपती मंडळांना पैसे, क्रिकेटचे कीट, स्पीकर्स, गणपती मंदीरासाठी निधी अशी मदत मिळाली होती.

नेहरू भक्त हे खरोखर आंधळे भक्त आहेत. कितीही पुरावे दिले तरी नेहरू हे लोकशाहीचे गोल्ड स्टँडर्ड हे तुणतुणे वाजतच रहाणार.
नेह्ररुनी भारताला एक समाजवादी राज्य बनवले. पूर्ण कम्युनिस्ट बनवण्याची हिंमत नव्हती नाहीतर रशिया आणि क्युबासारखे कम्युनिस्ट राज्य चालवले (आणि यथावकाश बुडवले) असते.
समाजवादी विचाराच्या राज्यात सरकार सर्वतोपरी असते. नागरिक सर्वोच्च नसतात. नागरिकांचे स्वातंत्र्य जसे सोयीचे असेल त्याप्रमाणे मर्यादित ठेवता येते. लोकांनी काय लिहावे, काय वाचावे यावर प्रचंड बंधने असतात कारण मायबाप सरकारला सग्गळे सग्गळे कळते. नागरिकांसाठी काय चांगले काय वाईट हे सग्गळे सरकार ठरवणार. नागरिक ही मेंढरे आहेत. त्यांनी सरकारने लावलेले नियम आणि बंदी गुपचूप पाळायची. हे सूत्र नेहरूंनी चालवले आणि इंदिराबाईंनी १९७५ साली ह्यावर कळस चढवला.
नेहरूंच्या काळात अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर सरकारला सहज गदा आणता येईल असे कायदे बनले. सामाजिक सौख्य बिघडेल असे लेखन/नाटक/सिनेमे असतील तर त्यावर सरकार सहज बंदी घालू शकते. ही कसोटी इतकी व्यक्तीसापेक्ष आहे की अक्षरशः कुठल्याही अभिव्यक्तीवर सरकार ही सबब शोधून बंदी घालू शकते. अभिव्यक्तीसाठी ही एक अत्यंत वाईट पळवाट ठेवलेली आहे. आजही ही वापरून कशावरही बंदी घातली जाऊ शकते. केतकी चितळे हे एक चटकन आठवणारे उदाहरण.
कुठल्याशा व्यंगचित्रकाराला डू नॉट स्पेअर मी असे सो सो क्युट वाक्य म्हटले म्हणून नेहरु भक्त आनंदातिरेकाने नाचत असतात. पण प्रत्यक्ष वागणे पाहिले तर ह्या वाक्यात आणि आचरणातील मोठा फरक सहज कळतो.
सावरकर आणि त्यांची विचारसारणी ह्याला नेहरूंनी केलेला विरोध. आपली सत्ता वापरून हवे तसे सावरकरांना तुरुंगात डांबले. पाकी पंतप्रधान आलेला असताना सुरक्षेचा उपाय म्हणून म्हातार्या सावरकरांना तुरुंगात डांबले. तो पाकी पंतप्रधान परत गेला तरी सावरकर तुरुंगात आहे हे सोयिस्कररित्या विसरून त्यांना अनेक महिने डांबून ठेवले गेले. वा रे व्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करणारा नेता!

नथुराम गोडसेचे शव अंत्यसंस्कारासाठी त्याच्या म्हातार्‍या आईबापांना न देता परस्पर जाळून आपण लोकशाही नाही तर सद्दाम, पोल्पॉट, स्टालिन ह्यांच्या रांगेत बसतो हेच नेहरुंनी अधोरेखित केले. नथुराम गोडसेला फाशी देऊन झाल्यावर त्याच्या मृतदेहाशी देखील वैर बाळगणे हे गांधीवादी, अहिंसावादी, शत्रुवरही प्रेम करा वादी माणसाला कसे शोभते नेहरू भक्तांनी समजावून द्यावे!

पुन्हा एकदा सांगतो. घटना त्यातील व्यक्ती बाजूला ठेवून पाहा. उद्या "मार ले साथी जाने ना पाये" हे कोणत्याही नेत्याबद्दल एखाद्याने जाहीर सभेत उच्चारले व नंतर तसे म्हणायचे नव्हते वगैरे खुलासा दिला नाही तर अटक होणे साहजिक आहे. त्यात काही चुकीचे नाही.

<< सकाळी सकाळीच EVM वरून एलान मस्क आणि राजीव चंद्रशेखर याच्यात वाद सुरु झाला. त्याची बातमी. >>

------ EVM (आणि कागदी बॅलेट काय कुठल्याही) यंत्रणेत दोष आहेत आणि अनेकांनी त्यावर लिहीले आहे. शेवटी माणासाच्या प्रामाणिकतेवर भर द्यायला हवा.

मतमोजणीच्या अनेक फेर्‍या घेतल्यानंतर ४८ मतांनी " निवडून " आणलेले शिंदेसेनेचे खासदार यांच्या जवळच्या माणसावर EVM शी जोडलेला मोबाईल फोन वापरल्याचा आरोप आहे. EVM शी फोन जोडलेला असणे हे कळाले नाही.
https://www.hindustantimes.com/india-news/evm-hacking-row-who-is-ravindr...

मस्क अमेरिकेतील कुठल्या तरी दुसऱ्या निवडणुकीबद्दल बोलत होता. तर इकडे लगेच भाजाप्यांना मिरची का बर लागावी? आता तर ते मस्कचे बौद्धिक घ्यायला तयार झाले आहेत.
आधी सोरोस आणि आता मस्क.

नेहेरुंच्या आर्थिक नीतीवर टीका करा (राजाजी ही करत) सोमनाथ, भाषावार प्रांतरचना, चीन वर जास्त विश्वास ई ई अनेक मुद्दे असताना गोडसेचे शव दिले नाही म्हणून ते फॅसिस्ट हे फारच विनोदी आहे.

तामिळनाडूत BJP/NDA जो टोटल बोऱ्या वाजला ते बघून विगु रडले असे वृत्त DMKच्या मुखपत्राने दिले आहे. मगर!

सत्ता मिळविण्यासाठी काय वाट्टेल ते करतील. गुजरात मॉडेल ( हिंसाचार, दंगली घडवून सत्ता मिळविणे, असलेली सत्ता टिकविणे ) तमिळनाडूत अजून पर्यंत चालले नाही...

राष्टपिता महात्मा गांधी यांच्या हत्येसाठी जबाबदार असणार्‍यांवर काय कारवाई करायची याचे सर्व अधिकार तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभ भाई पटेल यांच्याकडे होते. लोकशाहीवादी नेहरु एका समर्थ गृहमंत्र्याच्या कारभारांत दखल का घेतील ?

गांधी हत्या संबंधांत लोहपुरुष यांचे विचार, नेहरु - पटेल तसेच इतर महत्वाचे पत्रव्यावहार लिखीत स्वरुपांत प्रसिद्ध आहे.
Sardar Patel's correspondence , 1946-1950, vol 6
https://ia601002.us.archive.org/9/items/sardar_patels_correspondence_vol...

नथुराम गोडसेचे शव अंत्यसंस्कारासाठी त्याच्या म्हातार्‍या आईबापांना न देता परस्पर जाळून
>>>
'शहीद' करायचे होते नाही गोडसेला?

तुम्ही ताकाचं भांडं लपवत तरी नाही आहात, म्हणून थेट बोलायला हरकत नाही. नेहरूंच्या काळात काय काय झालं, ही तुमची खरी दुखरी नस आहे. पहिला पंतप्रधान होता तो, आणि सारी अनागोंदी होती देशभर. ट्रंपचा वारसा सांगणारे इथले निर्लज्ज सत्ताधारी लोक अक्षरशः आयत्या पीठावरचे आहेत. इतके, की चेहेर्‍यावरचं पीठ पुसायचंही भान नाही त्यांना. तुम्ही लोकांनी हायजॅक केलेल्या पटेलांचीच साक्ष काढायला हरकत नाही. कोयनानगरला जाऊन पाहा. 'ही भारताची आधुनिक तिर्थक्षेत्रे आहेत' असं नेहरू म्हणल्याचा शिलालेख आहे तिथं. तुमची तिर्थक्षेत्रे कोणती आहेत? जिथं तुमचाच उमेदवारही जिंकून येत नाहीत तिथली भ्रष्ट, श्रमिकांना देशोधडीला लावणारी, थिल्लर फाईव्ह स्टार आणि अजिबात राम नसलेली देवळं?

रानोमाळ गचाळपणे धावत सुटलेला प्रतिसाद लिहिताना जरा लाज वाटेल असं सेटींग ठेवा जरा. तुमच्याच भल्यासाठी सांगतोय. बाकी तुम्ही किंवा तुमचे विचार कुणाचं भलं करणार नाहीय, ही दगडावरची रेघ.

ते जुने जाऊ द्या.
आता नविन लोकसभेत नविन मंत्रिमंडळ झाले का? मोदी पंतप्रधान का?
आता राहुल गांधी दररोज अविश्वासाचा ठराव आणेल का?
त्याच्याजवळ पैसा चिक्कार आहे, तो देऊन मोदीचे लोक फोडता येतील. गौहति मधल्या हॉटेल्स मधे जागा असेलच!

गौहति नका लिहु. गौहत्येचं पातक लागेल.

आसामीत गुवा म्हणजे सुपारी आणि हाटी म्हणजे व्यापारपेठ.
त्यावरून मूळ प्रागज्योतिषपूर नाव जाऊन गुवाहाटी नाव पडले.
आता भलत्याच सुपाऱ्यांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध झाले.

Pages