आयपीएल २०२४

Submitted by स्वरुप on 19 March, 2024 - 14:01

सालाबादप्रमाणे स्पर्धा सुरु होतेय आणि धम्माल करण्यासाठी धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-२०२४ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

तुषार देशपांडेने एका ओवरमधे ३ वाइड बॉल्स टाकले? हे मुद्दामून की त्याला सरळ टाकताच येत नाही? >> धोनी बीहाईंड द सीन कॅप्टन आहे. त्याने सांगितले असेल झक्की Wink

Long weekend असल्यामुळे फिरायला बाहेर पडलोय; त्यामुळे शांतपणे बसून मॅच बघता आली नाही

पण जेव्ह्ढी बघितली त्यामध्ये अनुज रावत, रचिन रवींद्र आणि दुबेने इंप्रेस केले.
रचिन रवींद्रचा वावर एकदम कॉंफीडंट वाटला.... लंबी रेस का घोडा है!!
त्याच्याबरोबर खेळताना ऋतूराजच उलट कॅप्टन्सीच्या दडपणाखाली वाटला.
मी जेव्हढी मॅच बघितली त्यात धोनी स्टंपमागून फिल्डींग सेट करताना दिसला.... पण तेव्हढे चालायचेच Wink

अंपायरला ते कसले कपडे दिलेयत?

तुषार देशपांडेने एका ओवरमधे ३ वाइड बॉल्स टाकले? हे मुद्दामून की त्याला सरळ टाकताच येत नाही? >> धोनी बीहाईंड द सीन कॅप्टन आहे. त्याने सांगितले असेल झक्की Wink
>>>>>>>>>

तुम्ही चेन्नईच्या मागच्या एक-दोन सीजन मॅच बघा. त्यांचा हाच डावपेच असतो. त्या नादात बरेच वाईड सुद्धा देतात. तो लंकेचा गरिबांचा मलिंगा, पथिराना होता तो सुद्धा दहा ओवर नंतर बॉलिंग ला यायचा आणि ठरल्याप्रमाणे गोलंदाजी करायचा. कालचा तुम्ही चेस सुद्धा नीट पाहिला तर लक्षात येईल की चेस करायचा पॅटर्न सुद्धा टिपिकल चेन्नईचा होता. त्यांचे टेम्प्लेट सेट आहे. ते बदलले गेले नाहीये. अगदी रणजीत फ्लॉप असलेला रहाणे सुद्धा त्याची ठरलेली भूमिका खेळून गेला. फिल्डिंग सुद्धा मागून धोनी लावत होता. मला काही ऋतुराजला हलके लेखायचे नाही. पण त्याच्या कप्तानीचे योग्य मूल्यमापन या संघासोबत तरी होणार नाही हे आपण समजून घ्यायला हवे. यावर एकमत असो वां नसो.. थांबतो Happy

पंजाब जिंकले

कुलदीप - अक्सर बोलिंग करत होते तेंव्हा वाटलं होतं की दिल्ली ला चान्स आहे, पण करन अन् लिव्हिंगस्टोन नी मस्त फिनिश केली गेम

पंत कीपर म्हणून क्विक होता बॅटर म्हणून अजून बेटर व्हायला हवा.
>>>>>>

+786
जर कीपिंग करताना कविक आणि कंफर्टेबल असेल तर रिफ्लेक्सेस शाबूत आहेत म्हणू शकतो. त्यामुळे फलंदाजी सुद्धा लवकरच पूर्ण भरात येईल अशी आशा आहे. चार पाच सामने झाल्यावर अंदाज येईल.

कुलदीप लास्ट ओवरला करनचा झेला सुटला तो महागात पडला. इशांतचे जाणे सुद्धा नडले. तोच सुरुवातीला चांगला आणि विकेट टेकर वाटत होता. शेवटी गोलंदाज कमी पडले.

पण ओवरऑल दिल्ली आणि पंजाब दोन्ही कमजोर संघ वाटत आहेत. टेबलच्या तळाला राहतील असे वाटते. दिल्ली तर वॉर्नर किती सातत्याने धावा बनवतो यावरच अवलंबून आहे. आज पृथ्वी शो नव्हता. ते फिट नव्हता की त्याला बसवले होते? अन्यथा तो हवा होता. आणि त्या स्टब जागी बोलिंगला नोरकिया..

तो रियान पराग फायनली या सीजनला चालेल असे वाटतेय. फटक्यात ताकद जाणवत आहे आता त्याच्या..

संजू सॅमसनने सालाबादप्रमाणे सुरुवात धडाकेबाज केली.. नंतर पीच स्लो होत जातात तसे तो गंडतो वाटते.

जिंकले.... राजस्थान जिंकले!!
तुलनेने दुबळ्या लखनौसमोर जास्त सफाईने जिंकायला हवे होते.... राहुल आणि पूरन खेळत होते तेंव्हा मॅच जवळजवळ हातातून निसटत चालली होती पण पॉवरप्ले नंतर दोन विकेट्स गेल्या लखनौच्या म्हणून वाचले!!

रियान पराग चांगला खेळला पण तो आउट व्हायच्या आधी जस्ट दोन बॉल सॅमसन त्याला गिअर बदलायला सांगत होता..... त्यानंतर त्याचा एक सिक्स बसला आणि पुढच्या बॉलवर कॅरीड अवे होऊन कॅच देऊन बसला!!
या पीचवर नवीन येणाऱ्या फलंदाजाल लगेच जम बसवता येत नव्हता.... त्यामुळे हॅटमायर गेल्यावर दोनसे पार जाईल असे वाटलेला स्कोअर १९३ वर अडकला.

दोन बाउनसर्सचा नियम बॉलर्स चांगला वापरतायत!!

“ जिंकले.... राजस्थान जिंकले!!” - येस्स!! संजू - पराग मस्त खेळले. नंतर बॉलर्स (संदिप शर्माच्या डेथ ओव्हर्स) नी छान बॉलिंग केली. संजूची कॅप्टन्सीं सीझनगणिक परिपक्व होतीय.

पांड्या चा attitude वाईट होता.
Especially शर्मा सोबत interact करताना...

तो उपयोगी ठरतो की नाही ते काळ ठरवेल
But it was far from gentleman's game...

>> मी जेव्हढी मॅच बघितली त्यात धोनी स्टंपमागून फिल्डींग सेट करताना दिसला.... पण तेव्हढे चालायचेच
धोनी नेहमीच तसं करतो. कॅप्टन कोणीही असो.

कालच्या सामन्याबद्दल वाचनात आलेली पोस्ट
----

बुमराहची भेदक गोलंदाजी, रोहितचा तड़ाखेबंद अंदाज आणि हार्दीकच्या नेतृत्वात हाताशी आलेला विजय गमावने…
एका MI fan ला अजून काय पाहिजे?
रोहित आणि बुमराह चालला पाहिजे आणि हार्पिकचा संघ हारला पाहिजे
आज रोहितला हार्दिक मुद्दाम फ़ील्ड पोजिशनला इकड तिकड पळवत होता T20 ला याचा वॉटरबॉय करा.

---------

आणि या पोस्टला मिळालेला प्रतिसाद पाहता बरेच मुंबई समर्थकांच्या भावना अशाच असाव्यात हे जाणवले.

काहीही, मुंबई समर्थकांना मुंबई हरावी अशा भावना नाहीत. आणि रोहित काय क्रिकेट पेक्षा मोठा नाही. गेल्या दोन्हीही सीझनला पंड्याची टीम फायनल ला जाऊन एकदा जिंकलेही आहेत. रोहित च वय बघता निर्णय योग्यच आहे. मी तर म्हणतो रोहित कडून भारतीय T२० टीम चे captain पद पण काढून घ्यायला पाहिजे.

ऋ, येस माझ्या भावना सेम आहेत. मी तर आयपीएल एवढी फॉलो करत नाही तरी रोहित बद्दल खूप वाटतेय. जे हार्ड कोर followers आहेत त्यांना किती लागले असेल.

आणि या पोस्टला मिळालेला प्रतिसाद पाहता बरेच मुंबई समर्थकांच्या भावना अशाच असाव्यात हे जाणवले. >> तुझ्या भावना काय आहेत ? Wink

"आज रोहितला हार्दिक मुद्दाम फ़ील्ड पोजिशनला इकड तिकड पळवत होता" मी मॅच बघितली नाही - फक्त पांड्या रोहित ला बांडरी वर हलवत होता नि रोहित हलताना पांड्या वैतागून काही तरी बोलला असे काही तरी पाहिले. कप्तानाने फिल्ड लावताना माजी कप्तानाला हलवायचे नाही असा काही अनरिटन रूल वगैरे पण आहे का ?

खरा समर्थक संघाला खेळाडू पुढे प्राधान्य देणार.

मध्यंतरी रोहित, विराट T 20 खेळत नव्हते आणि विश्वचशकासाठी हार्दिक च कप्तान असेल असे वाटत होते, पण 50 ओव्हर्स चा विश्वकरंडक हरल्यावर रोहित ला T20 खेळावे असे वाटू लागले. माझ्या मते रोहित आणि विराट दोघांनाही खेळवू नये विश्वकरंडक मध्ये

रोहित आणि विराटच्या टी२० वर्ल्डकपमधल्या समावेशाविषयी बरीच चर्चा होते. मागच्या वर्ल्डकपमधला पाकिस्तानविरूद्ध चा सामना कोहलीने जवळजवळ एकहाती जिंकून दिला होता. त्यानंतरच्या गेल्या दोन वर्षात कोहलीच्या खेळात, फिटनेसमधे न्यूनत्व आल्याचं मला तरी जाणवलं नाहीये. त्यामुळे त्याला वगळण्याचं कारण नाही असं मला वाटतं. शर्मा सुद्धा वनडे वर्ल्डकपला जसा खेळला तसा खेळत असेल आणि दुसर्या बाजूने यशस्वी जैस्वाल असणार असेल तर त्याच्याही निवडीविषयी आक्षेप नसावा. क्षमता आणि अनुभव ह्या निकषांवर असे कुणी प्रबळ दावेदार आहेत का? (हा जेन्युइन प्रश्न आहे).

फक्त पांड्या रोहित ला बांडरी वर हलवत होता नि रोहित हलताना पांड्या वैतागून काही तरी बोलला असे काही तरी पाहिले.>>>> कॅप्टन असो वा नसो. वडापाव कधी बौंडरी वर फिल्डिंग करतो का? Lol
रोहित ला निस्तं क्रिज मधून शॉट टोलवायला पाहिजेत. Happy

रोहित आणि विराट ला खेळवले तर टीम अशी राहील
1 रोहित
2 जयस्वाल
3 विराट
4 सूर्या
5 हार्दिक
6 पंत / संजू / जितेश
7 जडेजा
8 कुलदीप
9 बुमराह
10 विषनोई
11 अर्षदीप
म्हणजे रिंकू किंवा सुर्या यापैकी एकालाच खेळवतील जे चुकीचे ठरेल, रोहित आणि विराट नसतील तर पहिल्या 6 खेळाडू मध्ये
1 गिल
2 जैस्वाल
3 सूर्या
4 हार्दिक
5 पंत / संजू
6 रिंकू
हे राहतील, मी तर दुसरी टीम prefer करेल

सामा, गूड पॉइंट. पण हार्दिक असताना, कदाचित तीन स्पिनर्स आणि दोन पेसर्स ऐवजी दोन स्पिनर्स खेळवून हार्दिक पाचवा बॉलर म्हणून खेळला तर सूर्या आणि रिंकू, दोघांनाही खेळवता येईल. पीचेस कशी असतील त्याविषयी काहीच कल्पना नाही पण स्लो असू शकतील असा अंदाज आहे.

अरे! गेला कोहली. सुपर फॉर्म मध्ये होता आणि मला वाटलं आता जिंकल्यावरच दम खाईल पठ्ठ्या! टू बॅड!
अब मुश्किल है भाई.
ओह सॉरी. अजून आशा आहे.....

असं लिहे पर्यंत तिकडे फिंगर आकाशातं गेलं की ओ अंपायरचं! Sad

“ कप्तानाने फिल्ड लावताना माजी कप्तानाला हलवायचे नाही असा काही अनरिटन रूल वगैरे पण आहे का ?” - तुझा मुद्दा बरोबर आहे. पण काल मॅच बघताना, ऑल इज नॉट वेल असं जाणवत होतं. पंड्याचं मिलरचा कॅच घेतल्यानंतरचं सेलिब्रेशन वगैरे अनैसर्गिक वाटलं. कदाचित हा लीडरशिप बदल नीट हाताळला गेला नसावा. (इंटरकल्चरल कम्युनिकेशन १०१)

तुझा मुद्दा बरोबर आहे. पण काल मॅच बघताना, ऑल इज नॉट वेल असं जाणवत होतं. >> अच्छा ! मॅच सुरू होण्या अगोदरपासून पांड्याच्या नावाची रड लागली होती म्हणून मला वाटले कि जाणून बुजून काढलेली कुरापत असेल नि नसेल ते वाचत असतील.

लोमरोर! मस्त!

१२ बॉल २३

हर्षललाच घ्या म्हणा पट्ट्यात. हर्षदिपचा बॉल हवेत स्विंग होतो. माझ्यामते मच मोअर डेंजरस दॅन पटेल.

Pages