Submitted by स्वरुप on 19 March, 2024 - 14:01

सालाबादप्रमाणे स्पर्धा सुरु होतेय आणि धम्माल करण्यासाठी धागा सुरु करतोय..... स्पर्धा सुरु होईल तशी चर्चा जोर पकडेलच!
हा धागा आयपीएल-२०२४ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी, चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी आणि फॅन्टसीलीगच्या चर्चेसाठी सुद्धा!
आता पुढचे दोन-तीन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
Watch रचिन रवींद्र!! क्लास
Watch रचिन रवींद्र!! क्लास खेळतोय गडी... कडक शॉटस >> त्याचे शास्त्रीसारखे दिसतेय. बॉलर म्हणून आधी सिलेक्ट झाला नि नंतर मेन्बॅटसमन बनला
दुबे चा एकंडर दोन वर्षांछा फॉर्म बघता वर्ल्ड कप ला किमान राखीव म्हणून तरी नेणे जरुरी आहे. होपफुली चेन्नई त्याला बॉलिंग देऊन तो पैलूपण वापरतील.
रोज ज्या माणसाची आरती ओवाळतोस
रोज ज्या माणसाची आरती ओवाळतोस (रोहित) तो ह्याबद्दल एक चक्कार शब्द बोलला नाहीये
>>>>>>
समजले नाही.
त्याने काय बोलणे, आणि कसे वागणे अपेक्षित आहे?
आणि मी त्याची रोज आरती ओवळत नाही. तर तो सातत्याने जे एकेक पराक्रम करतो त्याचे रेकॉर्ड इथे देतो. आता त्याचा धडाकाच इतका आहे त्याला मी काय करणार..
पण मॅनेजमेंट ऐवजी प्लेयर ला टारगेट करणारे लोक क्रिकेटप्रेमी असतात?
>>>>>>
मुंबई इंडियन्सचा सपोर्ट काढून घेणे, त्यांना अनफोलो करणे, हे मॅनेजमेंटला टार्गेट करनेच झाले ना?
इतकेच नाही तर ज्या हार्दिकला मॅनेजमेंटने कर्णधार केला आहे तो टॉस ऊडवायला आल्यावर रोहित रोहित ओरडणे हे सुद्धा मॅनेजमेंटच्या निर्णयाविरुद्धचा निषेध नोंदवने झाले.
प्लेअर्सला शिव्या देणारे आणि
प्लेअर्सला शिव्या देणारे आणि काहीही पुरावे नसताना त्यांच्यावर लाचखोरीचे आरोप करणारेही खरे क्रिकेट समर्थक नाहीत.
दुबेने गोलंदाजी केली पाहिजे
दुबेने गोलंदाजी केली पाहिजे आणि चांगली केली पाहिजे. त्या केसमध्ये पांड्याची जागा घेऊ शकतो. क्लीन हिटर आहे. सिक्स शिवाय काही मारत नाही..
आज सगळे धोनी बॅटींगला यायची
आज सगळे धोनी बॅटींगला यायची वाट बघत होते आणि प्रत्येक पडणाऱ्या विकेटनंतर कॅमेरा ड्रेसींग रुममधल्या धोनीला शोधत होता
रिझवी पण बरा फाइंड दिसतोय.... राशिदला दोन सिक्स मारल्या राव!!
अंबानी स्वतः इन्वॉल्वड असेलच.
अंबानी स्वतः इन्वॉल्वड असेलच. ते प्रचंड बिझनेस सॅवी आहेत (गो फिगर राईट
) आणि जरीही गेम आवडत असला तरी गेम पिक्स मध्ये बिझनेस डोकं लावलेलच आहे. 
बाकी शर्माची बायको काही गमजा नाही करु शकणार अंबानी मॅनेजमेंट समोर. त्यांच्या समोर रोहित शर्मा अॅन्ड कंपनी म्हणजे किस झाड की पत्ती. फॅन्स गदारोळ करत आहेत, ते होणारच. फ्रँचाईज ओनरना शेवटी त्यांच्या फ्रँचाईजची पडलेली आहे, जे रास्त आहे. मुव म्हणून ठीक आहे पण मला तरी पंड्याला कॅप्टन म्हणून पिक टू मच आणि थोडा सनसनीखेज म्हणतात तशी मुव वाटली. पण अलटरनेटिव कोण हा ही प्रश्न होताच.
आणि प्रत्येक पडणाऱ्या
आणि प्रत्येक पडणाऱ्या विकेटनंतर कॅमेरा ड्रेसींग रुममधल्या धोनीला शोधत होता
>>>>>>
धोनी गेले काही सीजन फलंदाजीला येणे टाळत आहे. कारण पहिल्यासारखे मोठे फटके त्याला जमत नाहीत. त्यामुळे पुढे येत स्वताला एक्सपोज करण्यापेक्षा धोनी अजून शिल्लक आहे या भरवश्यावर इतर फलंदाज पुढे येऊन बिनधास्त खेळू शकतील असा गेम प्लान असतो. नंतरच्या सामन्यात कधीतरी बॅटिंग प्रॅक्टिस म्हणून येईल तो पुढे..
What a dominating performance
What a dominating performance by CSK!!
Clean sweep
चेन्नईचे नाव पहिल्या चारात
चेन्नईचे नाव पहिल्या चारात लिहून घ्या
आता पहिल्या दोनमध्ये राहतात का हे बघायचे आहे.
आणि पहिल्या दोनमध्ये आले तर फायनलला नक्की समजा.
त्याने काय बोलणे, आणि कसे
त्याने काय बोलणे, आणि कसे वागणे अपेक्षित आहे? >> ते समजले असते तर सो कॉल्ड फॅन्सनी पांड्याच्या नावाने शिमगा केला नसता . तो मुंबई बद्दल कसा वागतो नि फॅन्स कसे वागतात हे स्वतः बघू शकता.
चेन्नईचे नाव पहिल्या चारात लिहून घ्या >> आयपील मधले फिक्सींग ते हेच का रे भाऊ
रिझवी पण बरा फाइंड दिसतोय.... राशिदला दोन सिक्स मारल्या राव!! >> तो नि रैना मधे काय साम्य आहे देव जाणे. उगाच उजवा रैना म्हणतात. रैना बर्यापैकी मेजर्ड शॉट्स खेळायचा. रिझवी प्रत्येक बॉल बाहेर गेलाच पाहिजे अशा चेवाने मारत होता. रॉ आहे अजून बराच.
बरोबर आहे रिझवी बद्दल. मी
बरोबर आहे रिझवी बद्दल. मी विचारच करत होतो.
असा कसा शॉट मारतोय हा?
कारण पहिल्यासारखे मोठे फटके
कारण पहिल्यासारखे मोठे फटके त्याला जमत नाहीत. त्यामुळे पुढे येत स्वताला एक्सपोज करण्यापेक्षा धोनी अजून शिल्लक आहे या भरवश्यावर इतर फलंदाज पुढे येऊन बिनधास्त खेळू शकतील असा गेम प्लान असतो. >>>>>> सर थांबा थोडं!
आज विजय शंकरचा कॅच बघितला का? अजूनही कडक रिफ्लेक्सेस आहेत त्याचे. शॉट मारणे प्रॉबलेम नसावा आजिबातच.
कारण पहिल्यासारखे मोठे फटके
कारण पहिल्यासारखे मोठे फटके त्याला जमत नाहीत. त्यामुळे पुढे येत स्वताला एक्सपोज करण्यापेक्षा धोनी अजून शिल्लक आहे या भरवश्यावर इतर फलंदाज पुढे येऊन बिनधास्त खेळू शकतील असा गेम प्लान असतो. >> >> मी थोडा बदल करेन - पहिल्यासारखे मोठे फटके त्याला सतत जमत नाहीत. त्यामूळे इतरांना पुढे ढकलले जाते. त्याला काय जमते किंवा नाही हे त्याच्याशिवाय आता इतरांनाही कळलेले आहे त्यामूळे तो खाली आहे हा भरवशाचा गेम प्लॅन असेल असेल वाटत नाही.
त्यामूळे तो खाली आहे हा
त्यामूळे तो खाली आहे हा भरवशाचा गेम प्लॅन असेल असेल वाटत नाही.
>>>>>
तुम्हीच वर म्हटले आहे.. सतत जमत नाही... याचाच अर्थ दोन तीन ओवर साठी जमू शकते. म्हणून तर तो गेंपलान आहे.. आठ दहा ओवर शिल्लक असताना तो येणार नाही.. कारण तिथून 60-70 धावांची फटकेबाज इनिंग तो पहिल्यासारखे खेळू शकत नाही.. त्यामुळे तेव्हा दुसरे येतील.. आणि त्यांना विश्वास असेल की शेवटी दोन तीन ओवर पुरते मारायची गरज असेल किंवा बरेच विकेट जात 20 ओवर पूर्ण खेळायची गरज पडली तर या दोन्ही रोलसाठी धोनी आजही सक्षम आहे.
बाकी त्याच्या वयानुसार ज्या मर्यादा आल्या असतील त्या प्रतिस्पर्धी संघाना एक्सपोज होऊ नये म्हणून तो कमीच उतरेल मैदानात असे वाटत आहे.
मफाकाला धूतला आणि पंड्याला पण
मफाकाला धूतला आणि पंड्याला पण मारला थोडा. एकदा कॅच सुटला आणि मग आत्ता घेतला डेविडनी परत. पंड्यानी सेट अप चांगला केला होता. रोहित आणि त्याचे इंटरॅक्शन पण पॉजिटिव वाटले. थोडक्यात नो हार्ड फिलींग्स टाईप.
बाकी बुमराहची लेंत आणि पेस बघितला का? पंड्याला पण जमत नाहीये आणि मध्ये लूज, पट्ट्यामधले बॉल पडत आहेत पण बुमराह! मॅन! सॉलिड कंट्रोल आहे. बॉल फुलर लेंत असले तरी इतके फास्ट आहेत की खेळता नाही येत नीट.
ट्रॅव्हिस हेड कुटतोय नुसता
ट्रॅव्हिस हेड कुटतोय नुसता मुंबईला
१९ बॉल्समध्ये ५८!!
डेंजर आहे हेड!
डेंजर आहे हेड!
कमिन्स आणि हेड मुळे एकदम खत्रा झाली आहे टीम. क्लासन पण आहेच.
हैद्राबाद ७ ओव्हरमध्ये १००
हैद्राबाद ७ ओव्हरमध्ये १०० पार!!
जबरी ठोकतायत. बॉलिंग
जबरी ठोकतायत. बॉलिंग डिपार्टमेंट मध्ये काय प्रगती आहे ते बघावं लागेल. पिच मध्ये दम नाही त्यामुळे मुंबईवाले पण टोलवू शकतात.
Finally!
Finally!
हेड गेला
इतक्या धावा जात होत्या तरी बुमराह ला bowling का दिली नसेल?
मजा येतेय मुंबईची धुलाई
मजा येतेय मुंबईची धुलाई बघायला
शर्मा जी का लौंडा मार रहा है
शर्मा जी का लौंडा मार रहा है
अभिषेक.. नाम तो सूना ही होगा...
अरे त्या मफाकाला काय आजच्याच
अरे त्या मफाकाला काय आजच्याच फ्लाईटनी परत पाठवायचाय का? बापरे! अवघड आहे!
बाकी बुमराह सोडून सगळ्यांनाच पातेल्यानी प्रसाद वाटप सुरु अहे.
10 ओवर 148-2
10 ओवर 148-2
बुमराह फक्त एक ओवर पाच धावा..
बुमराहला क्लासेनसाठी जपून
बुमराहला क्लासेनसाठी जपून ठेवलाय
एव्हढे वाईट कुणीही कधीही
एव्हढे वाईट कुणीही कधीही मारले नसेल.
कर्णधार बदला.
आता तर बुमराहची पण लाईन लेंत
आता तर बुमराहची पण लाईन लेंत बिघडलीये!
२५० करतायत आज हैद्राबाद. हैद्रा कसला? हादराबाद झालय आज.
Top 3
Top 3
1. Record-Breaking Brilliance: RCB's 263/5 - The Pinnacle of IPL Team Scores
2. Power Unleashed: LSG's 257/5 - Second-Highest IPL Total
3. Record Demolition: RCB's Titanic 248/3: 3rd Highest IPL Team Score
आज सर्वाधिक टोटल स्कोअर पडला
आज सर्वाधिक टोटल स्कोअर पडला पाहिजे...
आज रेकॉर्ड ब्रेक होणार, 280
आज रेकॉर्ड ब्रेक होणार, 280 च्या वर करतात हैद्राबाद
Pages