पेट पीव्हज ( डोक्यात जाणार्‍या - लहान सहान गोष्टी)

Submitted by सामो on 19 January, 2024 - 09:21

लोक हो आपापल्या पेट पीव्हज (लहान सहान डोक्यात जाणार्‍या गोष्टी) लिहा. कदाचित काहीतरी शिकायला मिळेल की कसे असू नये. नकळत आपण त्या कॅटॅगरीत मोडतही असू.

माझ्या काही पेट पिव्हज -

- आय अ‍ॅम सॉरी पण मला हॉटेलात भात हाताने खाणारी माणसे आवडत नाहीत. याईक्स होते. माझी जेवायची इच्छाच मरते. आणि अशी माणसे आहेत.

- चौकशीखोर लोकं आवडत नाहीत. फार वैयक्तिक प्रश्नं विचारणारी. अरे जनरल बोला ना. हवापाणी, चालू घडामोडी, सिनेमे, पुस्तके.

- गॉसिपी लोकंसुद्धा आवडत नाहीत. गोंदवलेकर महाराज म्हणतात - परनिंदा ही विष्ठेसमान माना. मला ते पटते.

- माझ्या घरात चपला न काढता येणारी माणसे तर तिडीकच जाते डोक्यात. बहुसंख्य लोक अशातच मोडतात. नो कन्सिडरेशन. अरे स्वतःच्या घरात चपला काढता अन आमचं घर काय कचरापट्टी आहे का? आपण नम्रपणे सांगतो की तुम्हाला काय सोयीस्कर आहे ते करा आणि अचूकपणे लोक चपला पायात ठेवतात. तुमच्या नानाची टांग.

अजुन एक वैश्विक पेट पीव्ह म्हणजे बायकांची पंगत वेगळी पुरुषांची वेगळी , घरातच कार्यक्रमात, बायकांचा ग्रुप वेगळा व पुरुषांचा वेगळा. हे अमेरिकेत नाही पाहीले फारसे. पण क्वचित पाहीलेले आहे.

मला तर आँटी म्हणणारे लोकही डोक्यात जातात Wink तुम्ही स्वतः २५ शीचे घोडे आहात, आंटी कसलं म्हणताय? आणि तेही अमेरीकेतील दुसरी जनरेशन हमखास म्हणतेच.

अरे हां अजुन एक आपण चुकून कोणाच्या अध्यात्मध्यात कडमडलो चुकून तर - 'EXCUSE ME' असे जोरात व अ‍ॅग्रेसिव्हली बोलणारी लोकं. मला फार राग येतो यांचा. अरे मुद्दाम पायात आलो का?

अजुन एक डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे मुलीला काही शिकवायला गेलं की आधी आपल्यात तो गुण कसा नाही हे नवर्‍याने त्याच वेळी तिथेच सांगणं.
उदा मुलीला "ईट युअर ग्रीन्स." वगैरे शहाणपणा तेही कॉलर ताठ करुन इंग्रजी वाक्प्रचार वापरत सांगताना, तेव्हाच नवर्‍याने "तू तरी तुझं सॅलड खाल्लस का?" वगैरे विचारणे Happy
मुलीला आपण ठामपणे , फेमिनिस्ट रोल घेउन "आपल्याकडे ते तसलं बार्बी कल्चर नाही!!" वगैरे सांगतेवेळी. नवर्‍याने कुत्सितपणे हसत आपल्याकडे पाहून म्हणणे "नाही गं! आपल्याकडे नाही ते कल्चर." म्हणजे नको तिथे जोक करुन हवा फुस्स करुन टाकणे. Happy

आठवेल तसे संपादित करत जाइन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Fair point,ध. आणि अनेक दुकानांच्या/रेस्टॉ च्या बाबतीत त्यांचे प्राधान्य, मोबाईल ऑर्डर्स, ड्राइव्ह थ्रू आणि मग शेवटी प्रत्यक्षात तेथे आलेले कस्टमर्स असेच दिसते. त्यांना ब्रॅण्ड लॉयल्टी त्यातून वाढवायची असते.

मला अ‍ॅपचा कन्विनियन्स महत्त्वाचा वाटतो. तेथे आधीच आलेल्या लोकांच्याही आधी मला द्यावे असे नाही. स्टारबक्सने मोबाईल व प्रत्यक्षात आलेले लोक यांच्यात एकच first in first out क्यू वापरावा. त्याला काही अडचण नाही. पण बहुधा त्यांना अ‍ॅप प्रमोट करायचे असल्याने तसे होणार नाही.

किरकिरे रडतराऊ माबोकर >>> Lol एखाद्या गटगला गेलेले वेगवेगळे माबोकर तीन चार पद्धतीने स्टारबक्स मधे ऑर्डर करून एकमेकांना वैतागतात व गटग न करताच निघून जातात असा काहीतरी फेक गटग वृ कोणीतरी लिहायला हवा Happy

एखाद्या गटगला गेलेले वेगवेगळे माबोकर तीन चार पद्धतीने स्टारबक्स मधे ऑर्डर करून एकमेकांना वैतागतात व गटग न करताच निघून जातात >>> Rofl

Lol

--
पेट पीव्ह्ज धाग्यातच आता नवीन पेट पीव्ह्ज सापडायला लागलेत लोकांना.
आठवुन आठवुन, इकडे तिकडे जाऊन नवे पेट पिव्ह्ज शोधायची गरज नाही. Wink Light 1

सतत उपदेशाचे डोस देणारे>>> असा १ मित्र आहे, म्हणजे काही आनंदाची बातमी सांगितली तरी ह्यात काय, मी तर तमुक केलं कधी माज नाही केला वगैरे. आपं आपल्या ऐपती प्रमाणे हजार रु. दान केले की उगा खिजवायचे की मी तमुक ठिकाणी तिप्पट दिले. Sad
म्हणजेतुम्ही काहीही केले तरी उपदेश कायमच याहून जास्त करणे शक्य होते, तू ट्राय नसशिल केला वगैरे. मग संवादा चा पॅटर्न लक्षात आला आणि यु टर्न घेण्यात आला. Wink
काही लोकांना इतर लोक खुश असलेले पण बघवत नाहीत.. लग्गेच खुसपट काढतात. हे पण पेट पिव्ह आहे माझे.

फारेंड-- तुम्ही अ‍ॅप वर ऑर्डर करून १०-१५ मिन वाचवाल हो, पण धनी सारखं कुणी नाराज होणारच Lol
असा काहीतरी फेक गटग वृ कोणीतरी लिहायला हवा >>>. नेकी और पुछ पुछ आवो लिवा की राव तुमीच!

आपण आपलं काहीतरी सांगत असतो ते हि चार पाच जणांच्या घोळक्यात पण त्यात एक हमखास असा/अशी व्यक्ती असते जी आपलं वाक्य तोडून स्वतःचं सुरु करते.
उदा. मी सांगत असते की माझी आई काविळीने गेली. तिच्या पित्ताशयात खडे .... तोवर ते तोडून ती व्यक्ती म्हणते मला पण कावीळ आहे खूप दिवस झाले, माझे डोळे नाही का बघितले तू?
मी :- ऑ ???

आजकाल विवाहबाह्य संबंधांचे प्रमाण खूप वाढले आहे. पण सतत अशा संबंधांना नावे ठेवणे. त्या लोकांना उघड उघड जज्ज करणे...
मान्य आहे हि गोष्ट मोरालिटी च्या विरुद्ध आहे, संस्कृतीच्या विरुद्ध आहे. पण सतत त्याला नावं ठेवणारे लोक निदान मला तरी आवडत नाही.
ज्यांना जे करायचं आहे ते करत असतात, घरी दारी सगळीकडे manage करतात. त्याचे फायदे तोटे सहन करतात. आपलं त्यात काही जात नसून सतत यांची ती बडबड... मी असते तर त्या दुसऱ्या बाईच्या झिंजा उपटल्या असत्या..... वगैरे. अरे ते कसं काय? तुमचा नवरा सामील आहे ना त्यात? मग त्याच्या झिंज्या उपटायला हव्यात कि बाहेरच्या स्त्रीच्या?

तो पण वाद दूरच आहे खरंतर.. पण अशी नावे ठेवताना माझा नवरा कसा देव माणूस आहे... माझा कसा त्याच्यावर आणि त्याचा माझ्यावर विश्वास आहे हे सतत सांगणे.... हे नक्की काय असतं?
१. आपण कसे मोरालिस्टिक आहोत, संस्कृती रक्षक आहोत हे ठसवायचे असते का समोरच्यावर?
२. आणि माझा नवरा देवमाणूस आहे हे सतत बोलून स्वतःला समजावत असतात का? (मनात शंका असावी म्हणून?)

अशी व्यक्ती असते जी आपलं वाक्य तोडून स्वतःचं सुरु करते >> +१ अश्या वेळी माझा मुद्दा बोलायचा राहून जातो. मग मला या व्यक्तीला कुठे तोडावं कळत नाही आणि मी अंतर्मुख होतो.

बाकी वरती इंग्लिशबद्दल बरेच जण सांगत आहेत. आता माझं स्वतःचंच इंग्लिश महान असल्यामुळे मी कुणाच्या चुकांना फार मनावर घेत नाही. पण जर कुणाला ते 'लेस' वापरणं खटकत असेल तर तसंच 'लेस'च्या जागी 'लेसर' वापरणं पण खटकत असेल असा माझा अंदाज आहे. लो-लेस च्या ऐवजी लेस-लेसर

मस्तच..!

डोळ्यात लेसर खुपत असेल तर लेसर ट्रीटमेंट उपलब्ध आहे >>>
लेसर ट्रीटमेंट केली तर ती पुरेशी ठरणार नाही >>> Lol

aashu29 >>> Happy Happy

एखाद्या गटगला गेलेले वेगवेगळे माबोकर तीन चार पद्धतीने स्टारबक्स मधे ऑर्डर करून एकमेकांना वैतागतात व गटग न करताच निघून जातात >:हाहा:

पेट पीव्ह्ज धाग्यातच आता नवीन पेट पीव्ह्ज सापडायला लागलेत लोकांना.
आठवुन आठवुन, इकडे तिकडे जाऊन नवे पेट पिव्ह्ज शोधायची गरज नाही. Wink Light 1>>:P Proud

हो खरं आहे.लिंकडीन वर cfbr किंवा फेसबुकवर bump लिहितात तेही फार डोक्यात जातां.एकदा बावळट सारखं मी कोणाला तरी विचारलं होतं की 'पोस्ट प्रेग्नन्सी गाऊन्स बद्दल आहे म्हणून त्यावर सगळे बम्प लिहितायत का?' मग ते 'bring up my Post's आहे असं ज्ञान मिळालं.

मेन धागा कर्तीने लिहिल्या प्रमाणे मच्या मच्या आवाज करत खाणा रे व त्याचे शॉट्स रील्स मध्ये टा कणारे गलीज लोक.

इन्स्टा रील्स जरा तरी सोफिस्टिकेटेड असतात. खरा क्रिंज कंटेंट फेसबुक रील्स वर अचानक येतो.

प्रकाश खत्री: जमिनीवर बसुन पोळी भाकरी काय असेल ते फारच कुस्करुन त्याची जान काढणे व मग त्यात डा ळ नाहीत्र रोजच गवारची भाजी मिसळून परत कुस्करा. मग ते बायकोला भरवणे आपण खाणे. मिडलाइफ क्रायसिस वाला बाप्या आहे. घट्ट जीन्स झगामगा घड्याळ व ज्वेलरी, रुद्राक्ष माळा , व मी किती महान जिम जातो हे ते. बायको ढेरपोटी व निरुत्साही दिसते पण हा तिच्या मागे भारती मेरी जान खिलादू तुझे पान असे रोमांटिक बोलत मुलांसमोरच फेर्‍या मारतो. मी मुद्दाम बघत नाही पण सारखे च समोर येत. सहा मुलींवर झालेला लाडाचा मुलगा आहे असे वाटते. क्रिंज मॅक्स.

गाउन घातलेल्या भाताचे डोंगर रिचवणार्‍या बंगाली गृहिणी.

एक सुधीर कदम आहे तो कोकणात राहतो. फाटके व्यक्तिमत्व पण अगदी जीभ बाहेर काढून खायचे शॉट्स टाकतो. नुस ते आज हा नाश्ता अशी फ्रेम टाकली तर बास आहे ना. बाकी कंटें ट बरा असतो. पण सर्व कोकणे आईने फ णस कापला करुन फण साचे विनाकारण कौतूक करत अस तात ते ही डोक्यात जाते.

सर्टन फीड्स न येण्या साठी अल्गॉ कसा सेट करावा? मला ते हिरामण्डी वाले गजगामिनी चाल फीड खूप येतात, १ दा तर कुत्र्याला स्कर्ट घालून ते म्युजिक लावलेले Angry

माझा पण पेट पिव्ह आहे कि फेसबुक वर मला सगळे व्हिडीओ असे दिसतात कि कोणी एक साधी सुधी मुलगी आहे आणि तिला येऊन कमी कपडे घातलेली मुलगी आणि तिचे मित्र मैत्रिणी त्रास देतात, तिची मापे काढतात. तिला फडाफड मुस्काडात मारतात अपमान करतात. मग नंतर ती कोणीतरी एक मोठी सायबीण तरी निघते किंवा आय ए एस हापिसर तरी निघते. लोकांना असे व्हिडीओ करून टाकावे का वाटत असतील? तोंडावर आपमान अगदी सहज करतात.
इतक्यांदा रिपोर्ट केले मी ते व्हिडीओ पण मला अजूनही तसलेच दिसतात.

शुभम म्हणुन १ छपरी मुलगा आहे, त्याचे ही फीड्स मला येतात, नितांत इल्लॉजिकल असे. मला मग कॉम्प्लेक्स येतो... की काय वाटून मला असे अल्गॉ वाले फीड येत असावेत? Lol

मला मग कॉम्प्लेक्स येतो... की काय वाटून मला असे अल्गॉ वाले फीड येत असावेत?
Lol Lol
मला पण एका अत्यंत तेलकट दिसणाऱ्या आणि चीप, भडक मेकअप करणाऱ्या बाईचे रील्स येत राहतात. वैषम्य येतं की फेबूला माझी चॉईस इतकी टूकार का वाटावी.

लिफ्ट वर येण्यासाठी बटन दाबले आहे, दिसत ही आहे कि बटन दाबले आहे, दुसरा माणुस येतो आणि बटन दाबले आहे दिसत असताना सुद्धा परत बटन दाबतो, ईंडिकेटर वर दिसत आहे लिफ्ट दुसर्‍या मजल्यावर आहे, लिफ्ट तिसर्‍या मजल्या वर आल्यावर परत हा बटन दाबतोय, ४थ्या मजल्यावर परत, आय मीन, सर्व मजल्या वर चढणारे आणि उतरणारे लोक असतात , Lift will take its programmed time in the plc As to when to open the door and close the door after last person is in / out, तुम्ही किती ही वेळा बटन दाबा, ते काय लवकर येणार आहे का.
*****
लिफ्ट ने जरी चेतावनी दिली फुल कपॅसिटी , तरी काही लोक आत जातात, नाही तर कोण शेवट आलं आहे तो बाहेर जात नाही, उलट मस्करी करतात, कोण सर्वात जाड आहे त्या व्यक्ति ने बाहेर जावे, आणि टाईम पास करत राहतात.

*******
लिफ्ट मधुन बाहेर पडताना सर्व फ्लोअर्स चे बटन दाबुन बाहेर निघणे, म्हणजे जे नवीन लोक ग्राऊंड फ्लोर ला आत॑ येतील त्यांना सर्व फ्लोअर वर थांबायला लागतं, आणि जे टॉप फ्लोअर वर वाट बघत असतात त्यांना विनाकारण उशीर होतं.

असले लोक फार इरिटेट करतात.

अर्धे इंग्रजी आणि अर्धे मराठी लिहिल्या / बोलल्या बद्द्ल क्षमस्व

मी पूर्ण सहमत आहे या लिफ्ट च्या इश्यू बद्दल. आमच्या सोसायटीत पहिल्या मजल्यावर एक मारवाडी कुटुंब रहायचं. त्यांना ३ मुले प्रत्येकाची शाळेची वेळ निराळी निराळी. पहिल्या मजल्यावर रहात असूनही आई लिफ्ट थांबवून ठेवायची... मुलगी अजून सॉक्स घालतेय, बूट चढवतेय. तोपर्यंत आतल्या लोकांनी टाळ कुटायचे वाट बघत. संताप यायचा मला. पण गेले बाबा बिल्डिंगीतून

दक्षिणाच्या पोस्टवरून आठवलं. पेट पीव्ह नाही, गंमत.
आमच्या मुलांची स्कूलबस कधीकधी चुकायची. पण नंतर कुठल्या तरी स्टॉपवर ती पकडता यायची. पुढच्या एका स्टॉपवर दोन भाऊ-भाऊ बसमध्ये बसायचे. तिथे आम्ही कधीकधी जाऊन थांबायचो. त्यांचं घर पहिल्या मजल्यावर होतं. गॅलरी रस्त्याकडे होती. एकदा मुलं बसमध्ये चढल्यावर मी मागे वळले तर त्या मुलांचे बाबा माझ्यासमोर उभे होते आणि आई गॅलरीतून एकेका मुलाचं दप्तर फेकत होती आणि बाबा झेलत होते Rofl मुलं जिन्यावरून धावत येत होती!

आमच्या इथे पण सकाळच्या बस ला बऱ्याच आया दप्तर घेऊन पुढे धावतात.मग नंतर मूल दूध पिऊन धावत येतं.वावे, तुझ्या उदाहरणात बाबा चा कॅच आणि खांद्याचं हाताचं वेट बेअरिंग दोन्ही एकदम मजबूत हवं. अगदी कितीही पुस्तकं लॉकर मध्ये ठेवली तरी रेनकोट अमक्या क्लास चे कपडे मिळून 5 किलो ची बॅग होते Happy

Pages