पेट पीव्हज ( डोक्यात जाणार्‍या - लहान सहान गोष्टी)

Submitted by सामो on 19 January, 2024 - 09:21

लोक हो आपापल्या पेट पीव्हज (लहान सहान डोक्यात जाणार्‍या गोष्टी) लिहा. कदाचित काहीतरी शिकायला मिळेल की कसे असू नये. नकळत आपण त्या कॅटॅगरीत मोडतही असू.

माझ्या काही पेट पिव्हज -

- आय अ‍ॅम सॉरी पण मला हॉटेलात भात हाताने खाणारी माणसे आवडत नाहीत. याईक्स होते. माझी जेवायची इच्छाच मरते. आणि अशी माणसे आहेत.

- चौकशीखोर लोकं आवडत नाहीत. फार वैयक्तिक प्रश्नं विचारणारी. अरे जनरल बोला ना. हवापाणी, चालू घडामोडी, सिनेमे, पुस्तके.

- गॉसिपी लोकंसुद्धा आवडत नाहीत. गोंदवलेकर महाराज म्हणतात - परनिंदा ही विष्ठेसमान माना. मला ते पटते.

- माझ्या घरात चपला न काढता येणारी माणसे तर तिडीकच जाते डोक्यात. बहुसंख्य लोक अशातच मोडतात. नो कन्सिडरेशन. अरे स्वतःच्या घरात चपला काढता अन आमचं घर काय कचरापट्टी आहे का? आपण नम्रपणे सांगतो की तुम्हाला काय सोयीस्कर आहे ते करा आणि अचूकपणे लोक चपला पायात ठेवतात. तुमच्या नानाची टांग.

अजुन एक वैश्विक पेट पीव्ह म्हणजे बायकांची पंगत वेगळी पुरुषांची वेगळी , घरातच कार्यक्रमात, बायकांचा ग्रुप वेगळा व पुरुषांचा वेगळा. हे अमेरिकेत नाही पाहीले फारसे. पण क्वचित पाहीलेले आहे.

मला तर आँटी म्हणणारे लोकही डोक्यात जातात Wink तुम्ही स्वतः २५ शीचे घोडे आहात, आंटी कसलं म्हणताय? आणि तेही अमेरीकेतील दुसरी जनरेशन हमखास म्हणतेच.

अरे हां अजुन एक आपण चुकून कोणाच्या अध्यात्मध्यात कडमडलो चुकून तर - 'EXCUSE ME' असे जोरात व अ‍ॅग्रेसिव्हली बोलणारी लोकं. मला फार राग येतो यांचा. अरे मुद्दाम पायात आलो का?

अजुन एक डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे मुलीला काही शिकवायला गेलं की आधी आपल्यात तो गुण कसा नाही हे नवर्‍याने त्याच वेळी तिथेच सांगणं.
उदा मुलीला "ईट युअर ग्रीन्स." वगैरे शहाणपणा तेही कॉलर ताठ करुन इंग्रजी वाक्प्रचार वापरत सांगताना, तेव्हाच नवर्‍याने "तू तरी तुझं सॅलड खाल्लस का?" वगैरे विचारणे Happy
मुलीला आपण ठामपणे , फेमिनिस्ट रोल घेउन "आपल्याकडे ते तसलं बार्बी कल्चर नाही!!" वगैरे सांगतेवेळी. नवर्‍याने कुत्सितपणे हसत आपल्याकडे पाहून म्हणणे "नाही गं! आपल्याकडे नाही ते कल्चर." म्हणजे नको तिथे जोक करुन हवा फुस्स करुन टाकणे. Happy

आठवेल तसे संपादित करत जाइन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पण प्रत्यक्ष नाही पाहिले.पाहिले तर reflex action ने मी सेप्टी पीन घेऊन उसवायलाच जाईन ते कदाचित. पण सोमी वर हल्ली खूप पाहिलंय. माझी classmate हेअर स्टयलिस्ट आहे. तिच्या clients च्या hairstyling चे फोटो पाहताना पाहिलंय मी हे.:(

या कलेचा योग्य उपयोग करता येईल.
उदा:
साखर - पाऊण चमचा
कांदा-लसुण: चालेल/सॉरी
नट्सची ऍलर्जी
फक्त शुगर फ्री प्लिज
पहिल्या पंक्तीत बसणार
उपवासी

मानव, ही कल्पना क्लासिक आहे! Rofl
अनिल अवचटांच्या अमेरिकेवरच्या पुस्तकात वाचलं होतं की तिथे पार्टीत वगैरे 'I am a driver' असं लिहिलेले बिल्ले ठेवतात आणि जो तो बिल्ला अडकवतो त्याला कुणी 'पिण्याचा' आग्रह करत नाही.
ब्लाऊजच्या पाठीवर तिरुपती बालाजी हेही 'ऐतेन' आहे माझ्यासाठी. अर्थात काय हरकत आहे? नगरसेवकापासून ते भगवान शंकरापर्यंतचे फोटो/ चित्र असलेले टीशर्ट्स असतातच की!

इतक्या छोट्या साईझ ज्वेलरी वर हे अस लिहायचं
>>>
अग इतक्या छोट्या नसतात त्या. मला माझ्या मावस बहिणीच्या दागिन्यांचे फोटो मिळाले तर टाकते तो पर्यंत ही लिंक बघ -
https://bbdgifts.com/products/customized-name-earrings?variant=434406481...

पूर्ण श्लोक लिहिलेली साडी/पदर असे पाहिले आहे.
>>>
मला आवडतात त्या साड्या.

मी या नावाच्या दागिन्यांबद्दल बहिणीकडून ‘कसलं मस्त ना’ आणि आईकडून ‘काय फालतूपणा आहे’ या दोन्ही प्रतिक्रिया ऐकल्या आहेत. मी न्यूट्रल आहे.

रीया तू दिलेल्या लिंकवरचे सॅंपल्स पाहिले. मज्जाच आहे. इअररिंगवर ‘नवरी’ असं लिहिलं नाही तर समारंभाला आलेल्या पाहुण्यांना समजणार नाही की काय नवरी कोण ते किंवा कुणाची नवरी ते?
असं काही केलं असतं तर माझा नवरा उलट पावली परत गेला असता लग्न न करता.

एखाद योग्य श्लोक लिहीलेली साडी/ओढणी कदाचित छान वाटेल.

माझा एक पेट पीव्ह आठवला - एकेकाळी बर्याच मुली ट्रॅडीशनल पोशाख व गॉगल्स घालायच्या निदान फोटोशुटला तरी. ‘तेणु काला चश्मा जचदा वे’ प्रुव करणं गरजेचं असल्यासारख्या.

इअररिंगवर ‘नवरी’ असं लिहिलं नाही तर समारंभाला आलेल्या पाहुण्यांना समजणार नाही की काय नवरी कोण ते किंवा कुणाची नवरी ते? >> माझी एक नातेवाईक पारदर्शी बरण्यांवर आतल्या सामनाचं स्टिकर लावायची. तेही दर महिन्याला बरण्या घासून पुसून.

एखादी बरणी पोट्ट्यांनी बकणे भरून रिकामी केली तर कोणती बरणी संपवलीय हे कळायला नको का? Wink

काही लोक किचन ओट्या मागील भिंतीवर कप-बशा, फळं, भाज्या यांची चित्रे असलेल्या टाईल्स बसवतात. त्यातही अशीच दूरदृष्टी आहे.
समजा तुम्ही अशा टाईल्स नाही बसवल्या.
नवीन सून आली, दुसऱ्या दिवशी पहाटे इतर लोक उठायच्या आत उठून सगळ्यांसाठी चहा करायचा ठरवले तर कुणाची झोपमोड न करता तिला किचन कोणते हे कसे कळणार बरे?

Lol
पण ते पारदर्शी बरण्यांवर स्टिकर लावणे समजू शकते.
कारण सर्व मसाले सारखेच दिसतात. किंवा काही काही पीठे... कुठले आहे ते समजत नाही. उदा. नाचणी सत्त्व, सातू पीठ, उपास भाजणी, राजगिरा पीठ!!!

@आंबट गोड,
तिच्याकडे पिठांचे डबे असायचे स्टीलचे.
बरण्या मधे साबुदाणा... रवा.. दाणे वैगेरे असायचे. आणि म्हणूनच जास्त लक्षात राहिले.

@मानव,
हसून हसून पुरेवाट.

मंडळी बालाजीच काय 'जो जे वांछिल तो ते लाहो' आहे ब्लाउजवर. आपणच मागे राहिलो बहुतेक
https://images.app.goo.gl/Xe8JdBa154RPKSoEA
https://images.app.goo.gl/XpoUoMAe7naHNVcN8
https://images.app.goo.gl/NcaAwECERV2yuPn17
https://images.app.goo.gl/Wu5DGaYA5JWB56r2A
https://images.app.goo.gl/a8Z9ZQm9cEbgM3bw5
मावसभावाचे लग्न जवळ येतेय. नरसिंहावतार करून घ्यावा का ब्लाउजवर विचार करतेय. एकदम युनिक..

तो पर्यंत ही लिंक बघ -https://bbdgifts.com/products/customized-name-earrings?variant=434406481... >>> एका फोटोत "सागर चि नवरी " असं लिहिलय Happy

नथिचा फोटो एक वॉअप आलेला पाहिलेला .
ते ब्लाउजच्या पाठीवर नेम्प्लेट प्रकरण मलाही फारस आवडलं नाही Happy

तरी ते देवदेवतांची embroidery शाश्वत तरी आहे....... ची नवरी हे क्षणभन्गुर आहे. कार्यालयाचा हॉल सोडला की त्या क्षणी ती नवरी ची बायको होते. सगळी embroidery वाया च की मग. नंतर कुणाच्या बारशात, डोहाळजेवणात ती साडी नेसावी तर ब्लॉउज चा प्रश्न येणार. नवरी लिहिलेलं ब्लॉउज घालणार का? (हे असले third world hypothetical प्रॉब्लेम येतात मला ते ब्लॉउज बघून ) Lol
बाकी हे लग्नात ब्लॉउज च्या पाठी लिहिणे, वर मानव आणि शर्मिला यांनी लिहिलेले बरण्यात स्टिकर आणि टाईल्स वर कपबशा या सगळ्या गोष्टी गाईचे गोमूत्र, पिवळे पितांबर आणि मुलींची कन्याशाला type आहेंत Lol

ची नवरी हे क्षणभन्गुर आहे. कार्यालयाचा हॉल सोडला की त्या क्षणी ती नवरी ची बायको होते. सगळी embroidery वाया च की मग. >>>> Lol Lol

@माझेमान तुमच्या मावस भावाच्या लग्नात ब्लॉउज वर फॅशन मिळाली, थांबा लिंक देते.

306fbed2-3a7e-432e-8188-f2e107e5eed8.jpegहे घ्या, या उशा ब्लॉउज च्या मागे लटकन सारख्या लावायच्या म्हणे :p

मी पैठणीच्या पदरावरही ‘अखंड सौभाग्यवती भव‘ असं विणलेलं पाहिलं आहे. बेक्कार दिसतं अगदी. बाकी वरची डिझाईन्स महानच आहेत. करतील वेडेपणा तितका कमीच आहे.

या उशा ब्लाउजच्यामागे लटकन सारख्या लावायच्या म्हणे
>>> Proud Proud मल्टीपर्पज दिसतात. नंतर कापून रिस्ट वॉचेससाठी वापरता येतील. वरची नथही घ्यावी म्हणते.
लग्न समारंभात बोअर होत असलेल्या जनांना नथीवरचे नाव आणि उशीवरचा मजकूर वाचण्याचा प्रयत्न करण्यात वेळ घालवता येईल. नवरा 'मी हिला ओळखत नाही' असा पवित्रा घेईल पण तो प्रॉब्लेम आपण नथ वापरून ऑलरेडी सॉल्व केलेला असेल. मुलीकडच्या मंडळींच्या मदतीने आपण नथ व उशी वाचून नाव ओळखा वगैरे गेम पण खेळू. कोण ते म्हणतंय मराठी लग्न बोअर असतात Wink

जिच्या नवऱ्याचे नाव सदाशिव, कुलभूषण किंवा शारंगधर असेल तिने नथीऐवजी चोकर वापरावा का? की पेट नेम चालतं?

अमक्या तमक्या ची सून, अमक्या तमक्या ची लेक, याची राणी, त्याची ही आणि ह्याची ती असे लिखाण आणि ते ही मोठया अक्षरांत जरी आरी वर्क करून लिहिलेलं असत + नथीत नवर्‍याचे नाव
नंतर काडीमोड झाला तर?

ब्लाऊजपाठी नेमप्लेट हे मी सुद्धा प्रत्यक्ष पाहिले नाही.
पण मागे एका मित्राने मला एक फोटो सेंड केला होता.
ज्यावर लिहिले होते - "अभिषेक की दुल्हन" Happy

ज्यांना ठाउक नाही त्यांच्यासाठी, माझे आईबाबांनी ठेवलेले नाव अभिषेक आहे Happy

IMG_20240304_184259.jpg

Photo23-08-22_41301PM.jpg @Mazeman घ्या तुमच्या सदाशिव कुलभूषण शारंगधर यांच्या बायकांचा प्रश्न सुटलाय, नथीत न मावणारे नवरे मंगळसूत्रांत बांधावे. शब्दश: मेनै तुम्हारे नाम का मंगळसूत्र पेहेना है

पण दुल्हन की बहन , दुल्हेकी भाभी अशा ओढण्या कधी कधी फायदेशीर ठरतील . विशेषतः ऑफिसमधल्या सहकार्याच्या लग्नात . जिथे नवरा किंवा नवरी याव्यतिरिक्त कोणीच तुमच्या ओळखीचे नसते

मी_बिल्वा ने टाकलेल्या फोटो सारखा प्रकार पहिला आहे. त्यावेळी डिझायनर ब्लाऊजच्या दोरीला लटकलेले ते शिशु पतंग पाहून, त्यातल्या शेवटच्या एका पतंगावर, (ट्रक च्या मागे लिहितात तसं ) बुरी नजर वाले... लिहावं असा फालतू जोक पण मारलेला :))

यावरून आठवलं. धमाल मधल्या वेणूगोपाल अय्यर च्या वेळी ही फॅशन असती तर मजाच Happy
https://youtu.be/saTxhIaatis?feature=shared
अमक्याची नवरी वगैरे लिहिणं बोअर आहे(बिल्व ने सांगितलेलं कारण..अजिबात परत वापरता येणार नाही.)
बाकी दागिन्यांत वगैरे प्रत्येकाचा चॉईस

डिव्होर्स होईतोवर रीयुज होईल की!
आता नवरी आणि बायको ह्या व्याकरणाची कोणी तमा बाळगतील असं वाटत असेल तर माणसांत या! Proud

Pages