लोक हो आपापल्या पेट पीव्हज (लहान सहान डोक्यात जाणार्या गोष्टी) लिहा. कदाचित काहीतरी शिकायला मिळेल की कसे असू नये. नकळत आपण त्या कॅटॅगरीत मोडतही असू.
माझ्या काही पेट पिव्हज -
- आय अॅम सॉरी पण मला हॉटेलात भात हाताने खाणारी माणसे आवडत नाहीत. याईक्स होते. माझी जेवायची इच्छाच मरते. आणि अशी माणसे आहेत.
- चौकशीखोर लोकं आवडत नाहीत. फार वैयक्तिक प्रश्नं विचारणारी. अरे जनरल बोला ना. हवापाणी, चालू घडामोडी, सिनेमे, पुस्तके.
- गॉसिपी लोकंसुद्धा आवडत नाहीत. गोंदवलेकर महाराज म्हणतात - परनिंदा ही विष्ठेसमान माना. मला ते पटते.
- माझ्या घरात चपला न काढता येणारी माणसे तर तिडीकच जाते डोक्यात. बहुसंख्य लोक अशातच मोडतात. नो कन्सिडरेशन. अरे स्वतःच्या घरात चपला काढता अन आमचं घर काय कचरापट्टी आहे का? आपण नम्रपणे सांगतो की तुम्हाला काय सोयीस्कर आहे ते करा आणि अचूकपणे लोक चपला पायात ठेवतात. तुमच्या नानाची टांग.
अजुन एक वैश्विक पेट पीव्ह म्हणजे बायकांची पंगत वेगळी पुरुषांची वेगळी , घरातच कार्यक्रमात, बायकांचा ग्रुप वेगळा व पुरुषांचा वेगळा. हे अमेरिकेत नाही पाहीले फारसे. पण क्वचित पाहीलेले आहे.
मला तर आँटी म्हणणारे लोकही डोक्यात जातात
तुम्ही स्वतः २५ शीचे घोडे आहात, आंटी कसलं म्हणताय? आणि तेही अमेरीकेतील दुसरी जनरेशन हमखास म्हणतेच.
अरे हां अजुन एक आपण चुकून कोणाच्या अध्यात्मध्यात कडमडलो चुकून तर - 'EXCUSE ME' असे जोरात व अॅग्रेसिव्हली बोलणारी लोकं. मला फार राग येतो यांचा. अरे मुद्दाम पायात आलो का?
अजुन एक डोक्यात जाणारी गोष्ट म्हणजे मुलीला काही शिकवायला गेलं की आधी आपल्यात तो गुण कसा नाही हे नवर्याने त्याच वेळी तिथेच सांगणं.
उदा मुलीला "ईट युअर ग्रीन्स." वगैरे शहाणपणा तेही कॉलर ताठ करुन इंग्रजी वाक्प्रचार वापरत सांगताना, तेव्हाच नवर्याने "तू तरी तुझं सॅलड खाल्लस का?" वगैरे विचारणे 
मुलीला आपण ठामपणे , फेमिनिस्ट रोल घेउन "आपल्याकडे ते तसलं बार्बी कल्चर नाही!!" वगैरे सांगतेवेळी. नवर्याने कुत्सितपणे हसत आपल्याकडे पाहून म्हणणे "नाही गं! आपल्याकडे नाही ते कल्चर." म्हणजे नको तिथे जोक करुन हवा फुस्स करुन टाकणे. 
आठवेल तसे संपादित करत जाइन.
Land line फोन वरुन एक आठवलं..
Land line फोन वरुन एक आठवलं.. मला त्या गोष्टीचा भयंकर वैताग यायचा...
काहीजण फोन करून स्वतः च नाव सांगायच्या ऐवजी, "ओळख कोण बोलतय..? " असे प्रश्न विचारायचे. बरं ते आवाज मला काही ओळखता यायचे नाहीत.. तस सांगितलं तरी ह्यांचं आपलं तेच पालुपद, "ओळख.. ओळख.." २ -३ चुकीची नाव घेतल्यावर शेवटी सांगणार त्यांचं नाव ..
अरे ह्यांचा आवाज म्हणजे काय जगप्रसिद्ध आहे का.. की आपण रोज गप्पा मारतो.. ?? उगाच काहीतरी..
एकेरी हाक मारणे तर जाऊ द्या..
एकेरी हाक मारणे तर जाऊ द्या..
माझ्या ओळखीत एक मोठं कुटुंब होत.. एकत्र कुटुंब. .. १०- १५ चलात भावंडं वगैरे.. ते लहानपणी एकत्र वाढल्यामुळे साहजिकच त्यांच्या त्यांच्यात चिडवा चिडवी होई आणि तशी नाव ठेवलेली जसं कुणाला म्हातारे, दगडू, धब्या वगैरे..
पण कित्येक वर्षांनी मोठा होऊन मुलं बाळ झाली, आणि एकत्र यायचा प्रसंग आला तरी त्यातील एक दोन व्यक्तींना इतरांना त्याच टोपण नावाने मुद्दाम हाक मारायची सवय होती.. ते मला खूप विचित्र वाटे.. किंवा प्रसंगी अयोग्य किंवा अपमानास्पद ही वाटू शकेल असे वाटे..
पण मी त्यांच्यात अगदीच लहान (बाहेरची ) असल्याने काही बोलू शकले नाही कधी..
अतुल अगदीच कळू शकते पण काही
अतुल अगदीच कळू शकते पण काही वयाने मोठ्या लोकांना सुद्धा आपली आपल्या मित्राशी किती घस्टिंग आहे हे त्यांच्या मुलांना दाखवण्याची उगीचच हौस असते . त्या भारत एकेरी बोलणे तर होतेच पण शाळेत असताना हा नापास व्हायचा , किंवा मार खायचा . . वगैरे अशा मुलांना सांगू नयेत त्या गोष्टी पण सांगून जातात . त्यात त्यांना कसली प्रौढी वाटते कोण जाणे .
“किती जाड झालास/ झालीस” हे
“किती जाड झालास/ झालीस” हे नॉर्मल way of greeting नाहीए ह्याची अजीब्बात जाण नसलेली हजारो लोकं आहेत.
दिसताक्षणी “हाय/हलो” ऐवजी हे वाक्य !!!
अगदी अगदी अनिंद्य
अगदी अगदी अनिंद्य
माझी एक साठी उलटलेली मैत्रीण आहे ती स्वतः नुकतं वजन कमी करून बारीक झाली आहे . प्रत्येक वेळी मला फोनवर विचारते काही बारीक वगैरे झालीयेस कि नाही ? माझे फोटो पाठवते बघ मी किती मस्त बारीक झालीये . मला इतका वैताग येतो कि बस . वय कितीही वाढलं तरी काही लोकांना संवेदनशीलता नामक प्रकार नसतो . .
दिसताक्षणी "अय्या एवढा का
दिसताक्षणी "अय्या एवढा का काळा पडलायस/पडलीयस?"
आणि नंतर कोणी खुणेने जाणीव करून दिल्यावर
"तसं नाही मध्यंतरी छान गोरा/गोरी दिसत होता/होती.
उन्हाने काळवंडला/ली असेल म्हणा" असे म्हणुन तीचं/त्याचंही असंच होतं पाल्हाळ लावुन न काळवंडण्यासाठीच्या टिपा देणे.
अगदी बरोबर आहे!
अगदी बरोबर आहे!
कुणीही बर्याच दिवसांनंतर भेटल्यावर किती जाड / बारीक झालीस...असे म्हणावेच का? किंवा किती काळवंडलीस.... !
तुमचा सूर कितीही काळजीचा दाखविलात तरी समोरच्या व्यक्तीला कळतोच ना...अंतःस्थ हेतू!
भयंकर संताप येतो. म्हणजे, माझ्यासमोर अ ने ब ला म्हटले..तरी मलाच भयंकर राग येतो!
एकदा तर माझ्या एका
एकदा तर माझ्या एका प्रेझेंटेशन च्या आधीच एकीने ‘काय गं.. अशी काय दिसतेय..? बरं नाही का..?’ असं विचारून माझी वाट लावली होती.
जाड , काळवंडलीस च्या यादीत
जाड , काळवंडलीस च्या यादीत अजून एक- केस किती पातळ झालेत..

अर्रे वयानुसार होतात काहींचे.. मी धुते, विंचरते मला माहित आहे की..कमाल च आहे..
उंची वरचे जोक्स पण कधीतरी ठिके पण कायम उंच बाई ला ए तू मागे रहा गं, किंवा माझ्या बाजूला नको, मी बुटकी वाटेन..
एकदा तर माझ्या एका
एकदा तर माझ्या एका प्रेझेंटेशन च्या आधीच<<< काय एक एक नमुने असतात.
सगळ्यात संतापजनक म्हणजे लग्न
सगळ्यात संतापजनक म्हणजे लग्न होऊन एक वर्षही न झालेल्या जोडप्यास , "मग आता केव्हा?" आणि वर मिस्कील हसणे.
हे एकदम कॉमन पेट पीव्हज आहेत
हे एकदम कॉमन पेट पीव्हज आहेत.संताप तर येतोच.पण फेसबुकवर या वागण्याची वकिली करणारे एक गृहस्थ एका धाग्यावर दिसले(वाचण्यात आले.)त्यांचं म्हणणं होतं तो अमका ढमका जाड झाला ही त्याची चूक आहे.मी त्याला ठणकावून परत परत सांगितलंच पाहिजे कान धरून, त्याशिवाय तो सुधारणार नाही.' अश्या मोड मध्ये होते.
अपुरी झोप, कामाचे स्ट्रेस,कामाच्या जागी योग्य खाणे न मिळणे किंवा एकटे राहणे, घरी किचन नसणे यातून वजन वाढणारे सॉफ्टवेअर इंजिनियर्स, अतिशय यावेळी ड्युटीज, पाणी प्यायल्यावर 'जायची' सोय नसल्याने कमी पाणी पिणाऱ्या पोलीस आणि फिरतीच्या नोकरीवरील बाया,बऱ्याच चालण्याची कामं करून पण खायला पोषक नसणे, तेलकट वडापाव खावा लागणे यामुळे सुटलेले पुरुष हे सर्व डोळ्यासमोर आले.
फेसबुकवर ती कमेंट लिहिणारे गृहस्थ आयुष्याच्या 100 वर्षांपर्यंत जगोत.त्यांचा चेहरा तसाच राहो,शरीर ह्रितिक किंवा जॉन सारखे 5% फॅट वाले राहो, 100 वयातही केस, त्वचा आहे तशी राहो ही सदिच्छा.(त्यांचा सध्याचा फुल साईझ फोटो बघायला मागण्याचा आणि 'तेव्हा कुठे गेला राधासुता तुझा धर्म' करण्याचा मोह आवरलेला आहे
)
मी_अनु शेवटला परिच्छेद
मी_अनु शेवटला परिच्छेद
----
याच दिशेने अजुन एक भर: "अरे/अगं किती बारीक आहेस अजूनही? आई खाऊ पिऊ घालत नाही का नीट?" असे मुलांना आई - बापा मागे/समोर म्हणणे.
अरे/अगं किती बारीक आहेस
अरे/अगं किती बारीक आहेस अजूनही? आई खाऊ पिऊ घालत नाही का नीट?">>>> असं आमच्या मुलांना म्हणतात आमच्या देखत
जळ्ळं मेलं लक्षण
नवर्यालाही काही जण म्हणतात, किती बारीक. बायको खाऊ नाही घालत का?
मी_अनु >> अगदी अगदी
मी_अनु >> अगदी अगदी
कुठल्या माणसाला सुडौल, प्रमाणबद्ध दिसू नये अशी इच्छा असेल? वर सांगितलेली कारणे + पीकॉस, हायपोथायरॉईड, स्पॉन्डिलायसिस, गुढघ्याचे त्रास, स्टिरॉईड्सची औषधे असे १०० प्रकारचे मेडिकल इश्यूज असू शकतात. मिळालेल्या वेळात शरीर सुडौल करण्यापेक्षा मन शांत ठेवणे, कुटुंबाला जास्त वेळ देणे, आवडीचा छंद जोपासणे अश्याही प्रायोरिटी असू शकतात. तुम्ही जाहीर अपमान केल्यामुळे यातले काहीही बदलत नाही. उलट तुमच्याबद्दल आणि एकंदर वजन कमी करण्याबद्दल चीड निर्माण होऊ शकते. कुणाकडून कान धरून घ्यायचे हे प्रत्येकाने ठरवायचे ना?
अरे/अगं किती बारीक आहेस अजूनही? >>> असे काही कुणी म्हटले की मीच सांगते "नाही, तिला घालत नाही खायला. मीच खाते. दिसत नाही का?"
त्या ओळखा पाहू वाल्या पेट
त्या ओळखा पाहू वाल्या पेट पिव्ह वर पुलंचा एक लेख आहे. त्याचं त्यांनी आकाशवाणीवर एकदा वाचन केलं होतं. धमाल होता तो लेख.
पेट पिव्ह्ज नाही पण आचपेच
पेट पिव्ह्ज नाही पण आचपेच नसलेली माणसे कशी बोलतात याचा अनुभव , मुंबईत असताना माझ्या घराच्या वास्तुशांतीचे आमंत्रण द्यायला एका मामांकडे ठाण्याला गेले, गेल्या गेल्याच मामानी अग किती बेढब झालीय , अगदी बेढब शब्द ऐकून . मला अगदी मेल्याहून मेल्यासारखे झाले. मामाच्या सुनेला ते लक्ष्यात आले आणि मग तिने सरावा सराव केली . पण परत गेले नाही त्यांच्याकडे ..
हे - " अगं अशी का दिसतियेस
हे - " अगं अशी का दिसतियेस बरं नाही का" लोकं तर डोक्यातच जातात.
माझ्या मैत्रिणींच्या ग्रुप
माझ्या मैत्रिणींच्या ग्रुप मध्ये मी त्यातल्या त्यात बारिक आहे . एक माझ्यापेक्शा बरीच maintained आहे पण तीही नेहमी "मै कितनी मोटी हो रही हून" मोड मध्ये असते.
सगळ्याना वारंवार बाहेर खायची हौस आहे.
पण आम्ही कधी एकत्र जेवायला बसलो की बरेचदा काही गोड्धोड असेल की या सगळ्यांच "नही रे बाबा बस हो गया " चालू होतं .
मी आवडीने खात असेन तर मग , " हा , तु खाले . you can afford it ( म्हणजे वजन वाढत नाही या हिशोबाने) . तुम खा सकते हो . कितना सही है , तुम्हे कोई फरक नही पडेगा . तुम्हे डाएटींग की जरूरत नही , कुछ भी खा सकती है"
एक दोन वेळा मी वैतागून सांगितलं , " don't keep watch on my food. I eat because I like it , not because I can afford "
मेरा खाना मत गिनो, मुझे अच्छा नही लगता .
तरीही कधी कधी परत तेच.
आमच्याकडे खाण्याआधीच साबांचे
आमच्याकडे खाण्याआधीच साबांचे सुरु होइ - उरलं तर फ्रीजमध्ये ठेऊ, उद्या खाता येइल.
मला इतका वैताग येइ. अहो आधी खाऊ तर द्या, आग्रह करा, पोटभर जेवा. ते उरलेल्याचे मग बघू.
-------------------------
@स्वस्ति - मलाही या श्या किरकिर्या लोकांचा मनस्वी संताप आहे. त्यांना खाणं एन्जॉय करता येत नाही आणि दुसरा करतोय ते बघवत नाही असं नाही पण पाचपोच नसतो.
सामो
सॉरी. डिलीटेड.
केकु पास्ड अवे
.
आमच्याकडे खाण्याआधीच साबांचे
आमच्याकडे खाण्याआधीच साबांचे सुरु होइ - उरलं तर फ्रीजमध्ये ठेऊ, उद्या खाता येइल.
मला इतका वैताग येइ. अहो आधी खाऊ तर द्या, आग्रह करा, पोटभर जेवा. ते उरलेल्याचे मग बघू.>>>>> याचं उलटं व्हर्जन आमच्याकडे होतं. एखादा पदार्थ कमी असला तर साबा म्हणत " साबू आणि अमुक तमुकला पुरेल, आपल्याला नसलं तरी चालतंय ".
>>>>>आपल्याला नसलं तरी चालतंय
>>>>>आपल्याला नसलं तरी चालतंय
अर्र्र्र तो प्रकारही वाईट
'आपल्याला नसलं तरी चालतंय' या
'आपल्याला नसलं तरी चालतंय' या त्यागाने किती जुन्या पिढीतल्या बायकांनी अगदी वेल टू डु घरातलं असूनही स्वतःचं व्हिटामिन प्रोटीन कुपोषण करून घेतलं असेल याचा डाटा जमा करायला हवा कोणीतरी.
खरंय मी अनु
खरंय मी अनु
पदार्थ कमी बनवुन 'मला नसला
पदार्थ कमी बनवुन 'मला नसला तरी चालेल म्हणून थोडाच खाणे' हा माझा वजन न वाढवण्याचा, उगाच स्टफिंग न करण्याचा मार्ग आहे.
डोक्यात जाणार्या गोष्टी
डोक्यात जाणार्या गोष्टी
अगदीच अनु.
अगदीच अनु.
आणि असा सो कॉल्ड त्याग सुनेनेही करावा ही अपेक्षा.
अजून एक म्हणजे समजा एखादा पदार्थ थोडासाच उरलाय पातेल्यात तर पटकन "देऊन टाक तो अमुक तमुकला " म्हणायचं. पहिल्यांदा हे ऐकल्यावर माला फार विचित्र फिलिंग आलेलं, की अरे हो, मी काय एकटीच संपवणार नाहीये तो. आणि मुळात कोणाला हवं नको ते ज्याचं त्याला ठरवू द्या ना.
अजून एक सवय खाण्याबाबत डोक्यात जाते ती म्हणजे किती लोक जेवणार याचा अंदाज न घेता कमी किंवा अति स्वयंपाक करणे. आणि स्वतःच स्वतःच्या स्वयंपाकच कौतुक करणें
करायची ऐपत व एखाद्याला खायची
करायची ऐपत व एखाद्याला खायची इच्छा असताना अशी माणसे बघितली आहेत की मोजका असलेला पदार्थ एखाद्याला भरपूर वाढून ठेवायचा मग त्याने तो पदार्थ टाकला तरी चालेल आणि इतरांना जास्त हवे असले तरी मिळत नाही.
किंवा दुसऱ्या, तिसऱ्या सर्विंगला थोडा अंदाज घेऊन वाढायचे नाही. भसकन वाढायचे. पाहुणेही संपवायचे म्हणून संपवतात. मागच्यांना हवा असला तरी मिळत नाही.
किंवा मग एखादा पदार्थ उरतोय म्हणून एखाद्याच्या ताटात इतका वाढायचा की बघून इच्छा मरेल.
किंवा मग ४च घास उरलेत पदार्थ टाकायचा नाही म्हणून वाढला जातो
हे सगळे प्रकार डोक्यात जातात माझ्या. एकंदरीत अति आग्रह प्रकार मला फारसा झेपत नाही. मनापासून वाढत असताना समोरचा नको म्हणत असेल तर मी एखाददोन वेळा विचारेन पण त्यापलीकडे नाही.
Pages