हैद्राबादमधली खादाडी

Submitted by admin on 11 June, 2009 - 00:23

हैद्राबादमधल्या खादाडीचं हितगुज

हैद्राबादमधल्या खादाडीचं हितगुज
हैद्राबादमधल्या खादाडीचं हितगुज
हैद्राबादमधल्या खादाडीचं हितगुज
हैद्राबादमधल्या खादाडीचं हितगुज

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन्ही माहित नाही. Sad
आताच जनरल बाजार फिरून आली. Happy
माझे आंबे कधी जेवण म्ह्णून तर कधी नाश्ता म्ह्णून अजून चालू आहेत. शतशः धन्यवाद पळस.
पुढच्या वर्षि तुम्हाला पायरी नक्की आणून देईन.

महाराष्ट्र मन्डळाचा आमचा अनुभव खूप चान्गला नाही.....स्वच्छता नाही......सगळ्यानी तिथे आवर्जुन जावे असे मला तरी वाटत नाही...

काही दिवसांपूर्वी राजधानी(बंजारा हील्स) गेले होते. अतिशय निराशा झाली.
आधी आमीरपेटमधील राजधानीमधल्या चांगल्या अनुभवामुळे मोठं टोळकं घेऊन गेले होते. बाटी कोरडी होती. पुणेरी मिसळच्या नावाखाली काय होतं देव जाणे. फक्त ढोकळे बरे होते. छाछ पानचट Sad कदाचित दिवस व मेनु काम्बो बरोबर नव्हते अशी समजूत काढून घेतली. भाज्या देखील बेचव. किंमत खूप वाटली जेवणाच्या मानाने. विशेष करून चव Sad
कधीतरी साहब-सिंध-सुल्तान करायचय. मुहुर्त लागेना.
बेगमपेटला एक बेकरी आहे-नाव विसरले. तिथे खस्ता कचोरी आणि गरमागर्म समोसे मस्त मिळतात.
बेगमपेटलाच द हबची बिर्यानी चांगली मिळते. मी नेहमी पार्सल मागवले आहे तेथून. सांबार राईस, व्हेज आणि एग बिर्यानीची चवपण चांगली आणि क्वांटीटीही खूप होते.
व्हाईट हाऊसमधील चौकातली चाट, टिब्स फ्रँकी आणि नानकिंगचे नान मस्तच. नान खूप ऑइली वाटले पण चव भारी.
तंदूरमध्ये खूपच अव्वाच्या सव्वा किंमती असतात. जर डीजे नाईट असेल तर आतल्या हॉलमध्ये न जाताही फुकट मनोरंजन घडते Happy ढँगढँग आवाज बाहेर येत राहतो. नाही आवडले.

बार्बेक्यु नेशन ठीक आहे. जर मीटिंग किंवा अघळपघळ गप्पा मारायच्या असतील तर जाऊन उप्योग नाही. खूप गर्दी आणि गोंगाट असतो. इतका की टेबलावर समोर बसलेल्या व्यक्तीचे म्हणणेही ऐकू येत नाही!
३६-ज्युबिली हिल्स? ठीक आहे. प्रायव्हेट/कोर्पोरेट मीटिंग्स साठी चांगली जागा. दर भरमसाठ आहेत Happy गेलात तर आईसक्रीम मात्र तिथे खाऊन नका. त्याच गल्लीतल्या कोपर्‍यातल्या शॉपमध्ये घ्या, तिथेच बाहेर पायर्‍यांवर बसून खा. स्वस्त आणि चव मस्त Happy

क्षेत्रा सोमाजीगुडा मस्त. माझी माहीती खूप वर्षांपूर्वीची आहे. पण चव आणि दरही बरे वाटले. प्युर व्हेजच मिळते मात्र. अवर प्लेसला कधी डिनरला जा. मध्यभागी मस्त लाईव्ह गझल किंवा तस्तम संगीत सुरु असते. जागाही शांत वाटली. चव ठीकठाक. पावसाळ्यात गेलात तर आत बसलेलेच बरे Happy हिवाळ्यात बाहेर डास असतात म्हणून कॉईल लावली जाते.

चिन्नु :- साहेब सिंध सुलतान -- ऑल टाईम फेवरीट आहे..नक्की जाऊन बघा...
अवर प्लेस Happy मस्त जागा आहे पण अ-ला-कार्टे असल्यामुळे खूप महाग आहे (८०० जवळ जवळ), मग त्याच रे़ज मध्ये मला सिया आणि वॉटर फ्रंट आवडला जास्त.
जाफरान एक्झॉटीका पण मस्त आहे, जवळ जवळ याच रेंजमध्ये..
जर, फक्त वेज खायचं असेल तर मला बिकानेरवालाचा बुफे आवडतो...इतके पदार्थ असतात की, आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा ४ तास खात होतो जवळ जवळ Happy
नॉ.व्हे, खायचं असेल तर खानसाब मस्त आहे.
फ्युजन खायचं असेल तर सिनेमॉन मस्त वाटलं मला, हायटेक सिटी मध्ये.
व्हिलेज पण मस्त आहे, इनॉर्बिट मध्ये.....लिस्ट खुप मोठी आहे Happy

अरे वा! थँक्स चिन्मय. हो, बिकानेरवालाबद्दल खूप ऐकलयं. जाणार! Happy
बरं, साहब-सिंधमध्ये बिर्यानी चांगली असं कळलं. अजून काय रीकमंड करशील तिथे?

बिर्याणी नाही खाल्ली कधी...पण आटा चिकन म्हणून एक भन्नाट प्रकार मिळतो, तो नक्की बघा, त्या शिवाय प्रथम अवताराबद्दल प्रेम असेल तर फिश फ्राय पण मस्त आहे.
मेन कोर्स सब घोडे बारा टक्के Happy कारण मी तिकडे स्टार्टर्ससाठीच जातो.

घोडे Happy
थँक्स सो मच चिन्मय. बाकीची लिस्ट आणि तिथे ट्राय केलेला/recommeded item बद्दलही जरूर लिही.
KFC सैनिकपुरी चांगलं आहे. वीकेंडला थोssडी गर्दी असते पण McD ला नसेल जायचे तर बच्चेकंपनीबरोबर घेऊन जायला बरा ऑप्शन.

२००९ च्या पोस्टी वाचल्या.
त्या जागा आणि हॉटेल्सबद्दल अद्ययावत माहिती कोणी देईल का?

मी सध्या ७-८ दिवस हैदेराबादेत आहे. काम आणि फिरणे. Happy

आधीची पानं वाचली नाहीत. त्यामुळे आधीही कोणी लिहिलं असेल. पण हैद्राबादेतलं माझं सर्वांत आवडतं ठिकाण म्हणजे शादाब. इतकी सुंदर, लावण्यवती कोंबडी मी इतरत्र कुठे खाल्ली नाही.

शादाब म्हणजे मदिन्यातले. चारमिनाराजवळचे. तिथे शेवटचं जेवलो चार वर्षांपूर्वी. पहिल्यांदा जेवलो होतो १९९२ साली. त्यानंतर ७-८ वेळा तिथे गेलो. तिथली बिर्याणी, हलीम मला आवडतात. पॅरडाइजच्या बिर्याणीपेक्षा.

होय सेनापती, पण व्यक्तिशः मला ते इतके खास नाही वाटले म्हणजे वेगळ्या प्रकारची मिठाई असेल असे वाटले होते, पण तसे नव्हते.

जर पॅराडाइजला गेलात तर तिथे समोरच दादूज म्हणून मिठाईचे दुकान आहे. जरा महाग आहे, पण वरायटीपण बरीच आहे.

सेना, पुल्ला रेड्डी कधीकाळचं फेमस स्वीट शॉप होतं. पण मला अजूनही त्यांचीच काजुबर्फी आणि अंजीररोल आवडतात.
कराची बेकरीला गेलास की नाही. एव्हढ्या रमजानच्या महिन्यात आहेस इथे. मज्जा करो!
Almond House, हिमायतनगर पण फेमस आहे स्वीट्सकरता.
तुपकट खाववत असेल तर मिल्कमैसुरपाक ऑफ श्रीकृष्णा स्वीट्स ट्राय करणे.
पॅरॅडाईजच्या गल्लीत झमझम बेकरी आहे का अजून? असेल तर तेही नॉट बॅड. त्याच गल्लीत मिनरल वॉटरमधली पाणीपुरीपण मिळत्येय म्हणे.
सिकंदराबादला आलात तर उत्सवची थाली ट्राय करणे. ही थाली फक्त लंच टाईममध्ये मिळते आणि लिमिटेड असते. त्यामुळे आधी जा किंवा रिझर्व्ह करा जाण्यापूर्वी. हे प्युवर व्हेज रेस्टारंट आहे मात्र.
कधी कधी फूड फेस्टिवल्सही असतात. मस्त थाली जेवून, बाजूला तिवोलीमध्ये पिच्चर बघा!

त्याच गल्लीत मिनरल वॉटरमधली पाणीपुरीपण मिळत्येय म्हणे. >>
हो, तो दादू स्वीटस वाला विकतो. ४० रु प्लेट. Sad हैद्राबादी पाणीपुर्‍यांच्या मानाने चांगली आहे.
पण मुंबईचीच्या मानाने काही खास नाही वाटली.

ओह तोच दादुज का! ४० रू. कमी आहेत हेल्थवाल्या लोकांसाठी Proud
आपली पाणीपुरी कोटीमध्ये, नायतर मोघम्जाही मार्केट!
गोकुल चॅटला सहसा बाकीचं सटरफटर भजे, बवडेच खाल्लेत
हैद्राबादमध्ये बाकी खाल्लं नाही तरी मिरचीचे भजे, कट वडा, राजस्थानी मिर्च वडा, बटाटा भरली मिर्ची वडा नक्की खाणे. त्याबरोबर कधी फ्रेश पुनगुलु आणि जांग्री मिळालेत तर अहा!
चटण्यांचं अप्रूप असेल तर चटणीज ट्राय करा. ते पण व्हेज रे. आहे. पण प्लेटभरून चटण्या मिळतील Happy त्यांची ओल्या नारळाची गोड चटणी म्हणजे माझं जेवण असतं Happy तिथं थालीपेक्षा इडली, वडा, दोसा-सेट दोसा ट्राय करणे बरं पडतं. थाली टिप्पिकल वाटते.

जर पॅराडाइजला गेलात तर तिथे समोरच दादूज म्हणून मिठाईचे दुकान आहे.
>>> कुठले पॅराडाइज? त्यांची ३-४ ठिकाणी हॉटेल्स आहेत म्हणुन विचारतोय.

कराची बेकरीला जाणार आहे. हिमायत मधले अल्मंड हाउस बघितले. जाउनही आलोय. Proud

त्या 'चटणी'वाल्याकडे पण जायचय. Wink

गेल्या २ दिवसात पॅराडाइज आणि साहेब सिंग सुलतानला जाउन आलो.

सेनापती,
तू जिवाचं रमझान करतोयेस. फेसबुकावर तू कृपया फोटो टाकू नकोस. तुझ्या हैद्राबादेतल्या मुक्कामपर्यंत तुला रिस्ट्रिक्टेड लिस्टीत टाकावं लागेल. Sad

माझा मामा राहायचा हैद्राबादला. त्याला विचारून सांगतो. तूच खरं म्हणजे आता लोकांना सांगू शकशील.

HPS शाळेसमोर एक इराणी टाइपचे पण नवीन रिनोव्हेट केलेले कॅफे बहार म्हणुन ३ मजली हॉटेल आहे..ते पण ट्राय करुन बघा.. स्पेशली नॉन व्हेज साठी

Pages