हैद्राबादमधली खादाडी

Submitted by admin on 11 June, 2009 - 00:23

हैद्राबादमधल्या खादाडीचं हितगुज

हैद्राबादमधल्या खादाडीचं हितगुज
हैद्राबादमधल्या खादाडीचं हितगुज
हैद्राबादमधल्या खादाडीचं हितगुज
हैद्राबादमधल्या खादाडीचं हितगुज

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सूदुपार हवेलिकर्स. येथील चान्ग्ले पदार्थ. बहार मधील बीर्यानी. शानभाग बशीरबाग मधील सेट डॉसा. रवा इड्ली.
आनन्द भेलपुरी मधील चाट. बालाजी ग्रन्द बझार समोरील आलु toast . नवीन विमानतळावर मिळणारे फ्रूट कसटरड. ओहरीज मधील चाय्नीज. City center mall मधील साहिब सिन्ग सुल्तान मधील सुल्तान शर्बत. The chocolate room मधे मिळणार cuddle cup hot chocolate. Marriot चे बूफे लन्च.

- लाइफ-स्टाईल मधील तंदूर
- मिनर्व्हा मधली कॉफी
- लकडी-का-पूल जवळचं रायलसीमा-रचलू*
- बंजारा हिल्स फ्यूजन-९
- सिटी सेंटर मधलं चायनीज्
- बंजारा अंगेठी
...
कधीतरी चटणी'ज् ज्युबीली हिल्स...

अरे वाह! एवढे options आहेत..भारी वाटलं बघा वाचुन!..:-)
सिटी सेंटर मधे कुठे मिळते चायनीज?..आम्ही तिथे फिरण्या व्यतिरीक्त काही केल्याचे आठवत नाही!

--------------------------------------------------------------------------------
If you follow all the rules, you miss all the fun!
http://www.mokaat.blogspot.com/

वर. ५ वे मालेपे. बडी चावडी भागात अरुण जोशी यान्चे दुकान आहे सर्व आपले पदार्थ मिळ्तात.
घरी बनविलेला हलीम मस्त. पाया नाहरी प्रकार मला कळत नाहीत. रम्जान च्या काळात इथे उन्टाचे मास पण
मिळते.

रामकृष्ण थिएटर मध्ये कामत आहे तेथे भाकरीचे जेवण मिळते.

होय मी जेवलो आहे एकदा महाराष्ट्रियन जेवण तिथे..मस्त असते एकदम..
विजय तुम्हीपण सध्या हैद्राबादमधे असता काय?

--------------------------------------------------------------------------------
If you follow all the rules, you miss all the fun!
http://www.mokaat.blogspot.com/

नाही, मी चार वर्षे होतो १९९५-१९९९

.

अरे हे पान वाहते आहे काय? मागच्या पोस्ट कशा दिसणार?

सिटी सेंटर मधे चायनिज कुठे मिळते?

--------------------------------------------------------------------------------
If you follow all the rules, you miss all the fun!
http://www.mokaat.blogspot.com/

मोक्या, तुमच्या मेह्दीपट्नम ला अरेबिक खाणं मस्त मिळतं हे आज कळले. पेप्रात वाच्ले. मला शावरमा रोल आवडतो. पूर्वी Shoppers stop मध्ये मिळत असे.

ते चायनीज् सिटी सेंटर च्या रेस्टॉरंट फ्लोरला अाहे*.

* टॉयलेट ला जाताना, दिसेल.

ओके..एकदा जायलाच पाहीजे..चायनिज खायला..:-)

मेहदीपट्टनम ला नक्की कुठे मिळते अरेबिक?

--------------------------------------------------------------------------------
If you follow all the rules, you miss all the fun!
http://www.mokaat.blogspot.com/

.

सुसकाळ हवेलीके नवाबों,
योगेश, एक मनुष्य घरपोच किन्वा कार्यालयात डबा पोचवितो. पाच पोळ्या, दही, भात, भाजी, लोणचे. आपल्या
मराठी चवीचे. त्याचा न ९२४६८०७०३४/६५९७१७६७ रोज चे ४० रु. आपल्या ह्या भागातच. एका वेळचे रे.
त्याचे नाव गुजराती फूड्स.

फणसाळकर ची एक खाणावळ आहे इथे ब. चौ. ला.

शिवाय बडीचौडी ला पोलिस स्टे. समोरील गल्लीत अरुण जोशीचे दुकान आहे. तिथे चिवडा चकली, लाडू, आणी
सर्व मराठी पदार्थ मिळतात. काही खास खावेसे वाटले तर मला सान्गा रे. वडा पाव. मसाले भात, भरली वांगी,
बटाटा भाजी मी पण करुन आणीन. गट्ग मिसले तर काय झाले.

येथे एक बाइ आहेत त्या पुपो वगैरे करतात.

मोक्या, तुला कोल्हापुरी सुके मट्ण कसे करतात माहित आहे का?

<फणसाळकर ची एक खाणावळ आहे इथे ब. चौ. ला.>

नक्की कुठे?

शिवाय हे अरूण जोशींच्या दुकानाचे नाव काय?

विचारून सांगते. अरुण च्या दुकानाचे नाव जोशी मसालेवाले. तू कार्यालयात डबा मागव ना नाही तर. एकदा दुपारचे नीट जेवले की रात्री चरायला मोकळे.

अरे पॅराडाईजचे नाव इथे नाही?

खरं सांगु मला डब्यातले जेवण अावडत नाही. त्यात हॉटेलचे (बाहेरचे) असेल तर मुळीच नाही. त्यात मजा नाही.

मी इथे अाल्यावर पहिले काम काय केले असेल तर, लोकल रेस्टॉरंट्सची लिस्ट असणारा पुस्तक खरेदी केलं. शोध चालु अाहे...अापण चवीने खाणार, भोजन-(बाहू / भाउ ??) असा काहिसा शब्द मला अाठवतो अाहे...

हो मी पण त्याचा ड्बा म्हनूनच बंद केला. कंटाळून.

या चर्चेचं नाव 'खादिची चळवळ' अस ठेवलं पाहिजे.
खादाडी काय...अंगावार झुरळ पडलेली पोरगी डोळ्यासमोर येते...

इइइइइइइइइइइइइइइइइइइइइइइ म्हणणारी ना.

अगदी बरोब्बर...पण हल्ली तस्स् म्हणतात कि नाही काही कल्पना नाही. Happy

बावर्ची
===================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा

केदार, पॅराडाइजची बिर्याणी मला तरी कधी आवडली नाही (पण मी खाल्ली अनेकदा कारण त्याच्याच मागे सिंधी कॉलनीत राहायचो).. बिर्याणीत बावर्ची बेष्ट..

कामतचे जेवण अफलातूनच. त्याचं आंध्रा मील्स पण बेस्ट असतं (जवार रोटी सेक्शनच्या खालीच आहे).. आरपी/एमजी रोडच्या आसपास गुजराती थाळी हॉटेलं आहेत. ती छान आहेत रोजचे किंवा रविवारी वगैरे जेवायला. एमजी रोडवरच एक शामनिवास नावाचे हॉटेल आहे. एकदम बोळात पहिल्या मजल्यावर आहे. तिथले वेटर एकदम आग्रह करुन वाढतात. भाकरी, बाजरीची भाकरी वगैरे वेगवेगळ्या प्रकारच्या भाकर्‍या असतात. सोलापुरी आहे मालक आणि वेटर्स. आमरस पण चांगला देतो हा.

लाइफस्टाइलच्या बिल्डींग मधलं 'मालगुडी' ऑफिशिअल पार्टी वगैरे देण्यासाठी साउद इन्डियन मधे चांगले हॉटेल आहे.

पुर्वी (सध्याचे माहिती नाही) बॉटल्स अँड चिमनीज मध्ये १००-११० रुपयात दुपारी जेवण (प्लॅटर) मिळायचे. केवळ अप्रतिम. इन्डियन, कॉन्टिनेन्टल, चायनीज वगैरे प्लॅटर्स होत्या. मोजकेच जेवण असायचे पण चव बेस्ट. आणि बरोबर एक ग्लास बीअर Happy
इझी रायडर नावाचा ताज बंजाराच्या समोर एक पब होता. तिथे रॉक वाजवले जायचे फक्त. पुढे तो बंद पडला. १०डाउनिंङ स्ट्रीट मध्ये पहिल्या गुरुवारी (किंवा मंगळवारी. त्यांच्या वेबसाइटवर असेल) एक टकला-मध्यमवयीन डीजे लै भारी रॉक, सायकेडेलीक रॉक, मेटल वगैरे वाजवतो.

मलापण पॅराडाइज फारशी आवडली नाही.
बावर्ची म्हणजे आरटीसी क्रॉस रोड वरचे ना ? दर रविवारी तिथे सिनेमा बघून मग बिर्याणी खायचा नेम होता. त्यामुळे तीन वर्षात तेलुगु शिकून झाले.
शामनिवास तर प्रत्येकाने निदान एकदा तरी नक्कीच चाखून पाहिले पाहिजे.
रमजान च्या दिवसात जुन्या हैदराबादेत खाण्याचे स्टॉल लागतात.

.

टण्याला अनुमोदन. बहारची बिरयाणी मस्त. शिवाय ओफिस जवळ आहे त्यामुळे घरी जाताना नेता येते.
Hot chips chya चिप्स मस्त. चकणा म्हणून ही.( खंडयाबरोबर हो!)

मिर्ची भजी खाणारे आहेत का कोणी? बन्जारा हिल्स रोड न. १ ला बालाजी राम रत्न मधे मिळतात. साडेपाच नन्तर ताजी. सूपर!! बंगाली मिठाई पण मस्त असते तिथे. अगदी सजविलेली असते. ओहरीज बशीरबाग मधे मस्त चायनीज मिळते. सरविस पण चान्ग्ली आहे. तिथे कोथिंबिरीच्या sauce मधले भाज्या मस्त मिळतात. भरपूर असते सर्व. एक गार्लिक sauce देतात तो अल्लौद्दिन च्या दिव्यासार्ख्या भांड्यातून. आम्ही पीतोच तो. ( ?) खाली तळ घरात आग गाडी सारखे केले आहे तिथे sizzler मस्त असतो. go without breakfast.

शान्भाग बशीरबाग मधे सेट डोसा खावा. अगदी माउ माउ. विथ वेज स्टू.Best stress reducer lunch. रवा इडली ही. I take the days deccan chronicle and eat for an hour sometimes. quietly. in the ac hall
of course while reading the paper.

थोडे विषयांतर.
टण्या, ते तुमचे two wheelers वरचे वाचले खूप nostalgic वाटले. जावा, प्रिया चेतक लूना होंडा हा प्रवास आमचा पण झाला आहे. माझ्या नवर्या ने ७५ मधे सान्ग्लीत एकदा तीन गाद्या व जवऴ जवळ तेवढीच काकू चेतक वरून वाहुन नेली होती ते आठवले. मी ही दोन वर्शामागे चेतक वर एक गिटार एक कुत्रे व मागे मुलगी असे नेले होते. मला चेतक आवड्त असे. आता honda aviator! गाडी विकून ते सुध्हा. सान्गलीत अजून ही सासरी AJS नावाची जुनी बाइक आहे.चुलत सासरे नामांकित mechanic होते.

योगेश रोज चे जेवायचे कसे काय? लंच मिळते का?

गिरिश मी कधी तरी तरूण असताना ही कधी ईईईईईईईईईईईईईईईई केले नाही. झुर्ळे गरीब असतात. वाली चा
पेट आठवा.!!! आता तर काय कुम्पणी चालविताना कधी कधी इतका राग येतो की अगदी कोल्हापुरी नाही तर पंजाबी अपशब्द मनात येतात!! काय करणार. घरी येताना स्कूटर चाल्विताना मन मोकळे करते. लोके आपण्हून च साइड देतात. LOL

Pages