हैद्राबादमधली खादाडी

Submitted by admin on 11 June, 2009 - 00:23

हैद्राबादमधल्या खादाडीचं हितगुज

हैद्राबादमधल्या खादाडीचं हितगुज
हैद्राबादमधल्या खादाडीचं हितगुज
हैद्राबादमधल्या खादाडीचं हितगुज
हैद्राबादमधल्या खादाडीचं हितगुज

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

अलीकडेच लाइफ-स्टाईल मधल्या हंडी मध्ये गेलो होतो. ठीक वाटलं ते पण.

@अ.मामी
है.च ट्रॅफिक इतक बकाल (गचाळ) अाहे असं वाटलं नव्हत मला पण. अाता मात्र रोज अनुभव येताहेत. खराय् तुमचं तोंडात खडी-साखर जरी ठेवली तरी...त्यात अाम्ही कोल्हापूरीच. मंग काय...

असो. पुढील कार्यक्रमाला, अशाच एका छान ठिकाणी जाउ.

मिनर्व्हा कॅफे, सोमाजी-गुडा सर्कल मधली कॉफी छान असते.
अाणि चहा-बाजांनी चहा प्यावा तो ईराणी हॉटेलातच, समोश्या बरोबर.

बाहेर असा पाऊस पडत असावा, अाणि गरम समोसे + उकडलेली मिरची, बरोबर ईराणी चहा...हैद्राबादच्या प्रेमात मी या मुळेच पडलो.

उस्मानिया बिस्कूट पण हवेच. करी पफ नावाचे तेलकट पाटीस पन कधि कधी नड भागविते.

.

अ..ब..ब..ब..ब.......!!

बाप रे!! हैद्राबादी..अगदी काय च्या काय मोकाट सुटलेत!! (खादीची चळवळ म्हणजे..सगळे जातीने हजर आहेत!..:-))

मी गायबंच होतो इतके दिवस!!

आमच्या दुष्ट अ‍ॅडम ने ऑफिसमधुन मायबोलीचा अ‍ॅक्सेस काढुन टाकला आहे..:-( आणि घरी गेल्यावर वेळंच मिळत नाही..

लय भारी वाटले बाबा ईतके वाचुन्..आता यातले एक्-एक हॉटेल अधे-मधे विकेंडला ट्राय केले तरी भरपूर महीने निवांत जातील!!

आश्विनीमामी...मला सुके मटन वगैरे नाही येत हो!! चिकन करायचो..ते पण परंपराचा रेडिमेड मसाला वापरून!!

चालु दे....!!

--------------------------------------------------------------------------------
If you follow all the rules, you miss all the fun!
http://www.mokaat.blogspot.com/

आज कामात आगदी डोक्याचा भुगा झाला.
खूप खपून एक एक्सेल शीट बनविला मग करंट गेला.
घरी येवून परत काम केले.
पाउस पडला मस्त पैकी.
फक्त उन उन सांजा केला आणी खाल्ला.
आता शुभ रात्री व वीकान्त.
टण्या भौ ने पोस्टलेला फोटो डेस्कटॉप वर लाविला आहे.
वि सु : ही कविता नव्हे. यात माझ्या जीवनाचे व जेवणाचे आरस्पानी दर्शन आहे.

इकडे बंजारा-हिल्सला T.D.P. च्या अॉफीस जवळ कुठेसे ईटालियन / स्पॅनिश मिळते असे ऐकले. कुणास ठाऊक असल्यास कळवणे.

तुम्हाला लिटिल इटली म्हणायचे आहे का?

बहुतेक...मला नाव माहिती नव्हत। पण अाता या नावाने शोधीन.

तेच ते. बालाजी ग्रांड बाझार मसब टँक येथे २० रु. मधे पाणीपूरी चा हिरवा मसाला वाट्ण मिळते. घरी येवुन एक बाटली पाण्यात मिसळायचे. व पूरी बरोबर खायचे.

मी कुठला फोटो पोस्टला होता?

बीरवाला. इथे गावाकडे कोणी chiled beer अशी पाटी वाचली आहे का? lol

मी तर हैदराबाद मध्ये Y2K चिकन, Silicon चिकन असे बोर्डस् बघितलेत.

कालच अोहरी'ज् (नविन) नेकलेस-रोड ला जाउन अालो.
सर्व्हिस एकदम बकवास, जेवण तर एकदमच बेकार अाहे.
अाम्ही त्या १८५७ ला बसलो होतो. एक तर तिथे म्हणे जेवण मिळत नाही, ( त्या १८५७ ला फक्त १-२ छोट्या रोटी, दाल, करी वाटी...) खालच्या मजल्यावर मिळते, हे कधी सांगायचे बिल दिल्यावर जाताना तक्रार करतेवेळी?

तुम्हाला खरे सान्गू का ओहरीज केवळ बशीरबाग चे चान्ग्ले आहे चवीसाठी. आम्च्या बारा नं वरचे पण एकदम बेकार. आणी उगिचच महाग. ८० र. ला एक आलू पराठा. १८५७ काय आहे? इतका शिळा स्वैपाक वाढतात?
हात कापले पाहिजेत. त्या लोकानी खाण्याची फॅक्टरी करून टाकली आहे. ओरिसातील गरीब वेटर व स्वैपाकी आणतात. केवळ नफा कमविण्यावर लक्ष अस्ते.

आमच्या इथे ४० रू ला पाणी पूरी, भेळ विकतात. श्रीमन्त मारवाड्याना ठीक आहे.

अ.मामी
अहो खरं अाहे.फक्त नफा मिळवणे हा एक उद्देश.
अाणि १८५७ हे त्या रेस्टो-बार चे नाव अाहे. १८५७ ची राजे-महाराजे थीम अाहे.

.

बशीरबागवाले ओहरीज ठिक आहे.. संगीत जवळचे ओहरीज पण चांगले आहे.. रात्री १२ नंतर जेवायचे असेल तर हमखास मिळेल असे ठिकाण Happy (पिकल्स आणि मेहफिल वगैरे ओहरीज वाल्याचेच आहे ना?)

हो. पिकल्स ठीक. ते बसेरामधले ना? अरे ओहरी मधे विकतात महाग पापू. बाकी १० रू. प्लेट. सी़कंद्राबाद्ला आता जाणे होत नाही नेमाने. मी ८६ साली युरेका फोरब्स मधे जल्शुद्धीकरण यंत्र विकत असे तेन्वा सिक बाद मधे
रोज पायपीटी केली आहे व कामत मधे मीटिंग्स असायच्या. ९१ साली रंग विकत असताना साउथ सेंट्र्ल रेलवे मधे
जात असे. व युनिवर्सल बेकरीत पिझ्झा आणी बर्गर खात असे. ( एकावेळी! ) काम कमी खादडी जास्त. ९५ मधे
ओडेसीमधे सिनेमाच्या स्क्रिप्ट्स लिहित असताना पराठा बझार आणी हॉट ब्रेड्स मधे दुपार निभत असे. कधी तरी
चायनीज. तिथे कोपर्यावर भैया कडे भेळ दहीपुरी. स्व्स्त आणी मस्त. लेकिन वो किस्स फिर कभी!

९१ साली जुबीली हिल्स भागात फक्त दोनच प्रकार चे लोक स्कूटरवरून हिंड्त. मी व घरे रंगवणारे कंत्राटदार. बाकी सर्व गाडी वाले. तिथे तेन्वा कचेर्या )( कचोर्या नव्हे!) बिल्डींगा याना परवान्गी नवती.

ओहरी बंजारा अग्दी लूट्तात श्रीमन्तांना. असे माझे मत आहे.

कुठे गायब झाले सगळे??

राणीगंज मधले 'शाम-निवास' चे नाव खुप ऐकले. पण ते नक्की कुठे अाहे?

राणी गंज मधे. Proud अशोक माल मधे एक स्पॅनिश जेवणाचे हाटेल आहे म्हन्तात. टापास स्टैल.

@गिरीष व्हीजी,

तुम्हाला पॅराडाइज माहिती आहे का? तिथून सरळ टँकबंड/सेक्रेटिएटकडे यायला लागायचे. हा एमजी रोड. पॅराडाइजपासून साधारण अर्ध्या किमीवर डावीकडे आत वळायचे आहे. मला नेमके कितव्या नंबरचे वळण आहे ते लक्षात नाही (२ वर्षे झाली तिकडे जाउन). अनेक रस्ते डावीकडे वळतात. त्यामुळे विचारुनच वळा. समजा तसेच सरळ गेलात आणि जर सिग्नल लागला तर तुम्ही वळण चुकलेले आहात. Happy तेव्हा यु-टर्न मारा. सिग्नलच्या अलीकडे दुसरे डावे वळण आहे. एमजी रोडवरुन शामनिवास दिसणार नाही. तेव्हा लोकान्ना विचारा.

paradise एरिया मधे एक महार्ष्ट्रियन होटल आहे .. जेवण छान मिलते
बंजारा हिल्स मधले chutteneys पण छान आहे ..

माझे आवडते ठिकाण

१. पंचरतन ( काचीगुडा )
२. श्री ढाबा ( पैरेडाइज समोर )
३. बाँबे चाट ( ५ वा एवेन्यू, सैनिकपुरी )
४. वॉयसराय ( शामिरपेट रोड )

तूर्त एवढे ... बाकी पुढे कधी लिहीन

शुभ्या, बरोबर. हैद्राबादेत तुम्ही एका जागी खाल्लत तर त्याची वेळ नंतर परत एका वरषानेच येइल.
फिफ्थ अवेन्यु मध्ये चिकन ६५ कपात चान्गले मिळते.

पंचरतनची लस्सी सहीच. बार मधले मन्चुरिया, चिकन ६५ एकदम चवदार. ब्ल्यु-फाक्स आहे का अजुन.
वरचे मेसेजस वाचत होते, जोशी मसाले - खिचडी मसाला खुप मस्त असतो.

Pages