हैद्राबादमधली खादाडी

Submitted by admin on 11 June, 2009 - 00:23

हैद्राबादमधल्या खादाडीचं हितगुज

हैद्राबादमधल्या खादाडीचं हितगुज
हैद्राबादमधल्या खादाडीचं हितगुज
हैद्राबादमधल्या खादाडीचं हितगुज
हैद्राबादमधल्या खादाडीचं हितगुज

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जोशी मसाले - खिचडी मसाला खुप मस्त असतो.
???
जोशी मसाले या दुकानात हा मिळतो. खिचडीचा मसाला जो दाळ, तान्दुळाच्या खिचडीत घालतो तो खुप चान्गला असतो.

आर पी रोड वर सीझन मध्ये काय सीताफळ मिळतात ...
मराठी पद्धतीचं जेवण कुठे कुठे मिळतं इथे? कामत ची भाकरी सोडून ...

फणसळकराची खानावळ बडी चौडी.
घरी या की. मस्त वरण भात बटाटा भाजी, पोळी मसाले भात सार करते. माबो कनेक्षन फ्री.

फणसळकराची खानावळ बडी चौडी. >>>
=====================
रविवारी मुद्दाम चौकशी केल्या वर कळले की खाणावळ बंद होउन ६ वर्षे झाली
फणसळकर सध्या केटरिंग चा व्यवसाय करतात !

राजु आजरेकर चे ही केटरिन्ग चान्गले असते. महाराष्ट्र मंड्ळात चौकशी करा. जोशी मसाले वाले कडे बरेच से मराठी पदार्थ मिळून जातील. चक्क सोहम पुणे यान्चे पोह्याचे पापड देखील. आता हलवा तिळगूळ वगैरे.

.

मला वाटते त्याला अजमेरी कलाकंद म्हणतात. आम्ही घरी नेहमी हाच आणतो. पांढरा असतो तो साधा असतो.
ते महाराष्ट्र मंडळात जे जेवण देतात ते मला वाटते खेर्डेकरच देतात. आम्ही त्याना चांगले ओळखतो.

.

Happy मी रे नाही ग आहे.
त्यांची मुलगी इथे अमेरिकेत असते तिला हे सांगायला पाहिजे. हैद्राबादेत आमची आता तिसरी पिढी आहे ही. Happy

माझे खादाडी वेळापत्रक. कधी काळी होते.
सोमवारः युनिवर्सल सिकंद्राबाद : बर्गर/ पिझ्झा
मंगळवारः चाट कुठे ही
बुधवारः चायनीज - ओहरीज मध्ये किन्वा कसे.
गुरुवारः पंजाबी - धाबा फूड - पापाजी का धाबा व इतर
शुक्रवारः ताज महाल ईड्ली व खारम पुडी/ उत्तपम/ बट्न इडली/रवा दोसा/कट्लेट/
शनिवारः काहीतरी कॉन्टीनेन्ट्ल नाहीतर बिर्यानी/ तंदुरी चिकन
रविवारः घरी मटन वगैरे.

पूर्वी एक यांकी डूड्ल नावाचे आइस्क्रीम पार्लर होते ते लै ट्रेन्डी होते.
मेड्चल चे धाबे, अभिरुची तील आंधरा थाली. हॉट ब्रेड्स चा बर्गर, तेवा सीसीडी/ बरिस्ता नवते, मॅक पिज्जा हट नवते. मिरची भजी/ समोसे कधी कधी - बालाजी राम रतन चे.
बडी चौडी वर राम भरोसे आहे त्याच्या कडे पात्रा व फाफडा. इतर गुजराती सटर फटर. हे खाद्यजीवनातील मानकरी. नाहीच तर नुसतीच करी. डिनर घरी.

मामी काय आठवणी अहाहा!. बालाजी राम रतनचे कचोरी, समोसे तर आमच्याकडे प्रत्येक लहान्-मोठ्या गेट्-टुगेदरसाठी असत.

.

अरे माफी कसली त्यात Happy
प्रयोग मामी तर देतीलच उत्तर पण मी दिले तर चालेल ना? Happy
ते बहुतेक गुंत्तापांगळु असेल. आता मी हे सगळं कुठे खाउ Sad

.

अरेरे.. हैद्राबादेत येउन बिर्याणी न खाता जाणे म्हणजे आग्राला जाऊन ताज महल न पाहणे. Happy
अश्यावेळेस माझा नवरा अभ्भी आतांउ म्हणुन जातो आणि खाउन येतो. Happy

मन्जु,
खेर्डेकरच ...
संतोश प्रिंटिंग प्रेस वाल्यांनी माहिती पुरवली.
जेवण अगदी घरघुती
=================
आपल्या घरच्या चवीचा पोळी-भाजी-भात्-आमटी असा चौफुला >>
सहमत ... Happy
=================
आम्ही त्याना चांगले ओळखतो. >>>
क्षमस्व पण ...
पंचरतन (आणि इतर टिप टॉप हॉटेलां ) मध्ये जेवायची सवय झालेल्यांना कितपत झेपणार याची शंका ..
=================
प्रो० सुहास खेर्डेकर
" शिल्पा मेस "
शुद्ध शाकहारी महाराष्ट्रियन जेवण
जोशी बिल्डिन्ग, हरी मज्जीद च्या मागे,
सुल्तान बाजार है० ९५ फो० 24751320
=================

अरे वा. मी या विकेंडला त्यांच्या मुलीला फोनवर विचारणार होते त्यांचा पत्ता. मला खाणाखुणांनी माहित आहे. त्या हिरव्या मशिदीपेक्शा हरी मज्जीद म्हणजे तिथे कोणीही सांगतो.
पंचरतन (आणि इतर टिप टॉप हॉटेलां ) मध्ये जेवायची सवय झालेल्यांना कितपत झेपणार याची शंका >> अगदी बरोबर. पण ज्याना आवड आहे ते नक्कीच ट्राय करतील.
आम्हाला दरवेळेस (भारत भेटीत) त्यांच्याकडे एक दिवस आमंत्रण असतेच. Happy

.

प्रयोग,
नाही माझा तरी कुणावरही रोख नव्हता. मला वाटलं ते जनरलाइज्ड स्टेटमेंट होतं म्हणुन मी तेच कॉपी पेस्ट केलं.

>> हे वाक्य कुणाला उद्देशून आहे
=================
कोणाला ही नाही, सर्वसाधारण सूचना ( म्हणूनच आधीच क्षमस्व लिहिलं)

.

.

अगदी Happy
ते पंचरतन आधी फक्त एक छोटसं कॉर्न्अर होतं. त्यानंतर हॉटेल झालं. तिथे मुक्कामही करता येतो हे आज कळालं.

Pages