नावाजलेल्या/मोठ्या लोकांतील दोष.

Submitted by अमरेंद्र बाहुबली on 18 November, 2023 - 06:32

सध्या नाना पाटेकरांचा एक विडीओ सोमीवर फिरतोय. त्यात त्यांनी सेल्फी घेण्यासाठी आलेल्या एका चाहत्याला सानकन लगावून हाकलून लावलेय, ऐवी मायबाप प्रेक्षक म्हणणारे, साधाभोळा नाना ,आपला माणूस, जमीनीवरील माणूस वगैरे असल्या प्रतिमा ह्या विडीओने क्षणात गळून पडल्या. सोमीवर बोंबाबोंब झाल्यावर नानांचा स्पष्टीकरणयुक्त माफीनामा आला पण जे व्हायचं ते होऊन गेलं होतं.
मोठे लोकही माणसेच असतात त्यांच्यातही गुणदोष असनारच. ऐरवी आपण त्यांचे फक्त गुण पाहतो. पण दोषांसहीत माणूस स्विकारला तर मग तक्रार राहत नाही. अश्याच मोठ्या लोकांच्या दोषांवीषयी चर्चेसाठी हा धागा.
मला माहीत असेलेल्या मोठ्या लोकांच्या काही छोट्या गोष्टी.
१) सचिन तेंडूलकर ह्यांची फरारी साठी टॅक्समाफी मागणे, सत्यसाईबाबा ह्यांचे भक्त बनने.(ते जादूने हवेतून वस्तू काढायचेत म्हणे) त्यामुळे अंधश्रध्देला दुजोरा दिल्यासारखेच, कोरोना काळात खुप बोंबाबोंब झाल्यामुळे ५० लाखाची मदत करणे.
२) लता मंगेशकर- ऊड्डाणपुल घरासमोर नको म्हणून तक्रार करणे, बाबासाहेबांची गाणी गाण्यास नकार.
३) सलमान खान, जाॅन अब्राहम ह्यांचे चाहत्यांचा मोबाईल ओढणे, धक्काबूक्की करणे.
तुम्हाला असं इतर मोठ्या लोकांच्या काळ्याबाजूबद्दल माहीतीय का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रघु आचार्य तुमचे कोणाशी वाद असतील तर तुम्ही मला त्यात ओढू नका, मी कोणाचा डुप्लिकेट id नाहीये, मी ओरिजिनल आहे,

या सगळ्याचा एकच अर्थ आहे
बिग बँग थिअरी !

मायबोलीवरील सर्व ओरिजिनल, फेक, डूप्लिकेट, ओळख देणारे, ओळख लपवणारे, एकूण एक आयडीचा जन्म माझ्यातून झाला आहे Happy

कितीही विनंती करा, कितीही इग्नोर करा, माझ्यावर चर्चा झालीच पाहिजे.

उचक्या लावून लावून जीव घ्याल माझा, पण धाग्यावर मला पुन्हा यायला भाग पाडालच Happy

चला मी हरलो, तुम्ही जिंकला.

मायबोलीवर घडणारा एकूण एक कांड मी घडवून आणतो याची जबाबदारी मी घेतो.

हवे तर स्क्रीन शॉट घ्या या पोस्टचा
पण आता नांदा सारे गुण्या गोविंदा मिथुन चक्रवर्तीने Happy

चला सरांनी दवंंडी पिटली.
आजाकाखेल खत्म.
सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया। सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्।।
भूतां परस्परें जडो। मैत्र जीवांचें ॥ २ ॥ दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो । जो जें वांच्छील तो तें लाहो । प्राणिजात ॥
ॐ शान्ति: शान्ति: शान्ति: ॥

ह्या धाग्याचे नाव बदलून paranoia म्हणजे काय असे ठेवा... छान उदाहरण आहे.... हा बोलला - हा फेक, तो बोलला - तो फेक, ए तू काय बघतोस तू पण फेक... इन फॅक्ट मला न आवडणारे प्रतिसाद देणारे सगळे फेक... मीच एक खरा आयडी बाकी सगळेच माझ्या आयडीवर उठलेले फेक... काय ' एक्सपोज ' केले हे ही लक्षात आले नाही... परानोईड व्यक्तीला आपला paranoia दुसऱ्यांना सुध्दा पूर्ण समजेल असे वाटत असते... पण तसे होत नाही...

हा धागा सुरूवातीपासून वाचला कि मुद्देवंचित झालेले उथळ आयडी शेवटी ठेवणीतले आयडी कसे बाहेर काढतात आणि मूळ आयडी कसा मानभावीपणे संतपदास पोहोचतो याचे एक मनोरंजक दर्शन होईल. बाकि क्रिमिनल सायकॉलॉजी थोडीफार ठाऊक असलेल्यांना तिचे दर्शन वेगवेगळ्या रूपात दिसले तर समजायचे ते समजून जातीलच. सोशल मीडीयाचं हे वाईट रूप आहे.

सॉक्स
प्लिज, आता बास झाले. हे फार होतेय. त्याना त्यांची भडास काढून टाकू द्या. त्याना बर वाटतंय ना त्यात समाधान माना.

इंटरनेट वरच्या अनोळखी लोकांना हा रोग आहे आणि तो रोग आहे असे डायग्नोस करणे हे इतके चुकीचे आहे की कितीही आव आणला मोठा सायकोलोजिस्ट असण्याचा तरी काही फायदा नाही... उगाच इंटरनेट वरच्या साध्या चर्चेत कोणताही खरा मानसोपचार तज्ञ असले रोग निदान करणार नाही... उगाच आपण मोठे तज्ञ आहे असे नाटक करणारे अर्धवट शहाणे असे करतील... मुद्दाम paranoia चे काढले आता तरी समजेल की असे करू नये... अजून चालूच... क्रिमिनल सायकॉलॉजी म्हणे...

काही वर्षांपूर्वी गावस्कर च्या लॉकर मध्ये परकीय चलन सापडल्याची बातमी होती. पुढे काय झाले ते समजले नाही.

आयडी उडण्याचा एक प्रतिसाद वाचून मज्जा वाटली. ट्रोलिंग बद्दल एका ट्रोलकडून वाचताना आणखी मज्जा वाटली. खाई त्याला खवखवे.
jh2.pngjh2.pngjh3.pngjh5.pngjhampu1.png

अ‍ॅडमिन साहेब,
हा धागा उडवावा असे मनापासून वाटते. यातून काहीही चांगले निष्पन्न होणारे नाही.
बाकी आपली मर्जी !
सुरूवात मी केली नाही. Happy

जे पटत नाही त्याच्या कडे दुर्लक्ष करून पुढे जा.
कोण फेक कोण original.
नको त्या उठा ठेवी हव्यात च कशाला

अजिंक्यराव पाटील, तुमचा मुद्दा क्रमांक एक; "समलैंगिक सावरकर आणि गोडसे ">> ह्या दाव्याला कोणताही समकालीन, ज्याला primary source म्हणतात असा पुरावा नाही.
>>फक्त कुजबुज पुरते मर्यादित नाहीये हे. 1975 साली छापून आलंय, >>
ह्याबद्दल मी आधी उल्लेख केला होता. यत्किंचितही पुराव्याशिवाय जर कोणी एखाद्या पुस्तकात मृत व्यक्तींविषयी काहीही लिहीत असेल, तर केवळ छापून आले आहे म्हणून ते लिहिलेले सत्य ठरत नाही. दावा करण्याऱ्या व्यक्तीवर burden of proof असते ह्यावर तुमचा विश्वास नसेल तर हरकत नाही. पुस्तकावर कारवाई झाली नाही म्हणून त्यात पुराव्याशिवायही लिहिलेले सर्व सत्य असे तुम्हाला वाटत असेल तर असो. तुम्ही कशावर विश्वास ठेवावा आगर ठेवू नये हा तुमच्या मर्जीचा भाग झाला. मी फक्त इथल्या लोकांच्या माहिती साठी लिहिले की ह्या दाव्याला कोणताही समकालीन, ज्याला primary source म्हणतात असा पुरावा नाही. त्याउप्पर कशावर विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न.
निराधार गोष्टींचा जनमानसात कसा प्रसार केला जाऊ शकतो ह्याचे आणखी एक उदाहरण (इतिहास संशोधक ग. भा. मेहेंदळे ह्यांनी पट्टाभि सीतारामय्या ह्यांच्याबद्दल लोकसत्ताला लिहिलेले पत्र): https://pbs.twimg.com/media/FTcF8fgVIAE5_PK?format=jpg&name=large
ह्यावर येथे चर्चा करणे म्हणजे digression ठरेल. त्यामुळे वरची लिंक फक्त ज्यांना रस असेल त्यांच्या माहितीसाठी.

Personal लाईफ हा चर्चेचा विषय होवूच शकतं नाही नाही.
कोण समलैंगिक आहे,कोणाची किती लफडी आहेत,कोण काय खाते.
कोणाची कुटुंब स्थिती कशी आहे ..
.ह्या वर चर्चा करणारे judge करणारे कोण मोठे नितीवान आहेत.
.काही गरज नाही कोणाच्याच पर्सनल लाईफ वर टीका टिप्पणी करण्याची

<< काही वर्षांपूर्वी गावस्कर च्या लॉकर मध्ये परकीय चलन सापडल्याची बातमी होती. पुढे काय झाले ते समजले नाही.
नवीन Submitted by वीरु on 26 November, 2023 - 06:42 >>

------ रेडिफ वर वाचले होते. कुठे, किती पैसे ठेवले आहेत हे लक्षातही रहात नाही. १५०००० डॉलर्स कॅश / ट्रॅवलर्स चेक म्हणजे म्हणजे मोठी रक्कम होती. पैसा त्यांचा आहे, त्या पैशांवर रितसर टॅक्स भरला असेल तर माझी तक्रार नाही.
https://www.espncricinfo.com/story/gavaskar-admits-foreign-currency-in-l...

गावस्कर यांनी हे पैसे कधी ठेवले होते? याबद्दल माहिती मिळत नाही.

सचिन तेंडूलकर आणि गावस्कर दोघांचेही नाव CAG च्या रिपोर्ट मधे आले आहे, मागे लिंक दिली होती. रेकॉर्ड करायची चटक लागल्यावर हे असे पण रेकॉर्ड होते.

मुळात कोणाचे sexual orientation हा दोष किंवा गुंन्हा कसा झाला? त्यामुळे ही चर्चाच बाद आहे.

आपल्या समाजात याला दोष समजले जाते म्हणून उगाच महापुरुषांना बदनाम करायला या वावड्या उठतात..
उगाच चर्चा वाढवत बसू नका..

अजबराव +१

तुम्हाला ज्यांच्यावर टीका करायची आहे त्यांच्याच सारखे वागून टीका केल्याने तिची धार बोथट होते हे इथेच् कुणी तरी लिहीले होते.
पट्टाभिसीतारामय्या यांनी पुरावे दिले कि नाही याबद्दल ना ग गोरे यांची साक्ष देखील गावगप्पाच म्हणावी लागेल.
पट्टाभिसीतारामय्या यांनी संदर्भासहीत केलेले दावे सुद्धा गावगप्पाच ठरतील.
पण त्यांनी संदर्भ दिले नाहीत म्हणून ना ग गोरे हयात नसताना त्यांच्या नावाने आम्ही केलेले दावे पण चालवून घ्या ही गोष्ट एक इतिहासकार म्हणत असेल तर जास्त चिंताजनक आहे.

खासदार बृजभूषण सिंह याने अनेक दशके कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केले असा अरोप महिला कुस्ती खेळाडूंनी केला आहे. खेळाडूंच्या आंदोलनाला एक वर्षापेक्षाही जास्त काळ झाला. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यावरच FIR दाखल करण्यात आला आहे. आंदोलन मोडण्याच्या उद्देशाने या खेळाडूंना रस्त्यावरुन फरफटत नेले होते.

या महिला खेळाडूंसाठी, त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी भारत रत्नाने सन्मानीत केलेल्या खेळाडूला तसेच एकेकाळी राज्यसभेच्या खासदार पदावर राहिलेल्या व्यक्तीला चार शब्दाचे ट्विट करावेसे वाटले नाही?

ह्याबद्दल मी आधी उल्लेख केला होता. यत्किंचितही पुराव्याशिवाय जर कोणी एखाद्या पुस्तकात मृत व्यक्तींविषयी काहीही लिहीत असेल, तर केवळ छापून आले आहे म्हणून ते लिहिलेले सत्य ठरत नाही. //
+१०००० एकदम बरोबर.

जेम्स लेनच्या पुस्तकात छत्रपती व त्यांच्या घराण्याबद्दल धादांत खोटा मजकूर होता. त्यावेळी राज्य सरकारने पुस्तकावर बंदी घातली. बंदी घालायची तर घाला पण मी पुस्तकातील मजकूर बदलणार किंवा उडवणार नाही अशी भूमिका जेम्स लेनने घेतली.
त्यानंतर तीन व्यक्ती पुस्तकावरील बंदी उठवण्यासाठी कोर्टात गेल्या- कट्टर मोदी विरोधक डॉक्युमेंटरी मेकर आनंद पटवर्धन, समाजवादी/ डाव्या चळवळीतील कुंदा प्रमिला नीलकंठ आणि रिपब्लिकन चळवळीतील संघराज रुपवते. कोर्टाने या तिघांच्या बाजुने निकाल देऊन पुस्तकावरील बंदी उठवली.

रंजना बाईंना अपघात झाल्यावर अशोक मामांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली होती.>>> होय. माणुसकी ला धरून नव्हते ते, पण पर्स्नल आहे ते.

झिनत अमान च्या नवर्याने तिला शारीरिक मारहाण केली होती, त्यात तिचा डोळा जख्मी झाला त्यातून ती सावरून वर आली. अर्थात हा दोष नाही पण तिचा नवरा ....खान ह्यातला पुरूषी ईगो जागृत होण्याची ती गोष्ट होती.

यत्किंचितही पुराव्याशिवाय जर कोणी एखाद्या पुस्तकात मृत व्यक्तींविषयी काहीही लिहीत असेल, तर केवळ छापून आले आहे म्हणून ते लिहिलेले सत्य ठरत नाही.
सत्य ठरत नाही पण एक शक्यता म्हणून बघता येते. काही लोक बिलकुल पुरावे मागे न ठेवण्याकसाठी काहीही करतात. पुढच्या पिढीला कोणताही मागमूस लागू नये याची काळजी घेतात. आपल्याकडे नाही का BBC च्या documentory वर बंदी आणली.

Pages