नावाजलेल्या/मोठ्या लोकांतील दोष.

Submitted by अमरेंद्र बाहुबली on 18 November, 2023 - 06:32

सध्या नाना पाटेकरांचा एक विडीओ सोमीवर फिरतोय. त्यात त्यांनी सेल्फी घेण्यासाठी आलेल्या एका चाहत्याला सानकन लगावून हाकलून लावलेय, ऐवी मायबाप प्रेक्षक म्हणणारे, साधाभोळा नाना ,आपला माणूस, जमीनीवरील माणूस वगैरे असल्या प्रतिमा ह्या विडीओने क्षणात गळून पडल्या. सोमीवर बोंबाबोंब झाल्यावर नानांचा स्पष्टीकरणयुक्त माफीनामा आला पण जे व्हायचं ते होऊन गेलं होतं.
मोठे लोकही माणसेच असतात त्यांच्यातही गुणदोष असनारच. ऐरवी आपण त्यांचे फक्त गुण पाहतो. पण दोषांसहीत माणूस स्विकारला तर मग तक्रार राहत नाही. अश्याच मोठ्या लोकांच्या दोषांवीषयी चर्चेसाठी हा धागा.
मला माहीत असेलेल्या मोठ्या लोकांच्या काही छोट्या गोष्टी.
१) सचिन तेंडूलकर ह्यांची फरारी साठी टॅक्समाफी मागणे, सत्यसाईबाबा ह्यांचे भक्त बनने.(ते जादूने हवेतून वस्तू काढायचेत म्हणे) त्यामुळे अंधश्रध्देला दुजोरा दिल्यासारखेच, कोरोना काळात खुप बोंबाबोंब झाल्यामुळे ५० लाखाची मदत करणे.
२) लता मंगेशकर- ऊड्डाणपुल घरासमोर नको म्हणून तक्रार करणे, बाबासाहेबांची गाणी गाण्यास नकार.
३) सलमान खान, जाॅन अब्राहम ह्यांचे चाहत्यांचा मोबाईल ओढणे, धक्काबूक्की करणे.
तुम्हाला असं इतर मोठ्या लोकांच्या काळ्याबाजूबद्दल माहीतीय का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो. अनिरुद्ध. तो प्रतिसाद लिहिताना माझ्या डोळ्यांसमोर पहिली कॅटेगरीतच होती. हा खेळ काहच ठरावीक धाग्यांवर सातत्याने सुरू असतो. या धाग्यावरही झालाय.
रघू आचार्य यांनी नाडी अचूक पकडली आहे, असं मीही त्यांचं कौतुक केलं आहे्. त्या प्रतिसादांमुळे पुढचं लिहायचं धाडस झालं.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रचंड आदर आणि अभिमान आहे. इतिहास वाचल्यावर काही प्रसंग प्रचंड प्रेरित करतात तसेच काही खटकतात देखील.
१. महाराजांनी हिंदवी स्वराज स्थापन करण्यासाठी आदिलशाही आणि मोगलांशी लढले. पण चंद्रराव मोरे पण हिंदूच होते आणि त्यांच्या आधी पासून एक स्वतंत्र राज्य चालवीत होते. मग महाराजांनी त्यांच्याशी जुळवून घेण्याऐवजी त्यांच्यावर आक्रमण का केले असेल. त्यांच्या दोन लहान मुलांना पकडून (१० आणि १२ वर्षे - एक दोन वर्षे मागे पुढे असू शकतील) त्यांना देहदंडाची शिक्षा का ठोठावली असेल? कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा मान राखणारे महाराज मोरेंच्या लहान मुलांबाबतीत फार क्रूरतेने वागले असे वाटते. जिजाऊ सारखी आई लाभलेले महाराज लहान मुलांच्या बाबतीत एवढ्या टोकाचे पाऊल कसे उचलू शकतात?
२. स्वराज्याशी गद्दारी करणाऱ्यांना कडक शासन (प्रसंगी देहदंड) करणारे महाराज स्वतःचा मुलगा मात्र दिलेरशहा जाऊन मिळाला तेंव्हा त्याला फक्त नजरकैदेत ठेवण्याची शिक्षा देतात.
३. सुरत दोनदा लुटली हे आपल्याकडच्या इतिहासात फार अभिमानानाने सांगितले/लिहले जाते. वर असे ही सांगीतले जाते की फक्त इंग्रजांच्या वखारी लुटल्या. असे खरेच झाले असेल का? महाराजांनी सुरत नुसती लुटण्या ऐवजी राज्यात समाविष्ट का केले नसेल? स्थानिक लोकांना तेंव्हा काय वाटले असेल? लूट म्हणले की ती फार प्रेमाने गोडीगुलाबीत झाली नसेलच. त्या वेळचे स्थानिक हिंदू लोकांना काय वाटले असेल?

सर्वप्रथम: शिवरायांचे स्वराज्य फक्त हिंदू म्हणून नव्हते हे सगळ्यात आधी लक्षात घ्या. हिंदुत्वाचा रंग शिवरायांच्या पश्चात इतिहासकारांनी अधिक चढवला.

मुळात, हा जो मोरे गादीवर होता त्याला खुद्द शिवरायांनी गादीवर बसवले होते. दौलतराव मोरे निपुत्रिक वारला, त्याची पत्नी मानकाईने कृष्णाजी नामक नात्यातल्या मुलाला दत्तक घेतले ते आणि शिवरायांच्या मदतीने गादीवर बसवले. पुढे स्वराज्यविरोधात अनेक कुरघोड्या या चंद्ररावने केल्या. विधवेशी बदफैल करणारा गावकुलकर्णी रंगो वाकडेला आश्रय दिला.
चंद्रराव मोऱ्याला राजांनी पत्र पाठवले होते, ज्यावर मोरे उर्मट उत्तर देता झाला. परिणामी राजांनी जावळी काबीज केली. लहान वय: ज्यावेळी राजांनी स्वराज्याचा पाया रोवला तेव्हा ते सुद्धा 13-14 वर्षांचे होते. तुमच्या आरोपाचे संदर्भ शोधतोय, पण जेवढे आठवतंय त्यावरून मोरे खंदानातून कुणीतरी राजांकडे सरदार होतं.

संभाजीराजांनी दिलेरसोबत केलेली हात मिळवणी एक राजकारणी डाव होता.

संभाजीराजांबबत असलेल्या द्वेषापोटी विशिष्ट जातीच्या कादंबरीकरांनी त्यांचे चरित्र मलिन केले. एक नाशिकजवळकची गढी वगळता इतर कोणतेही नुकसान संभाजीराजे दिलेरकड असता झाले नाही.

सुरत: हो लुटली सुरत. सुरत परगणा खुद्द औरंगजेभाच्या बहिणीच्या मालकीचा होता. मुघलांनी स्वराज्यावर केलेली आक्रमणे, लुटीचा बदला म्हणून लुटली सुरत. जिथे दहशत बसवणे आवश्यक असते तिथे अश्या कारवाया कराव्याच लागल्या असतील.

संभाजीराजांनी दिलेरसोबत केलेली हात मिळवणी एक राजकारणी डाव होता.>>>
छान!
मला का कुणास ठाव अजित पवार आठवला.
मोगलांनी का बरे शाहू महाराजांचा सांभाळ केला?

अजिंक्यराव ज्ञानात भर घातल्या बद्दल आभार. ते १०-१२ वय वर्षे असलेल्यांना मृत्युदंड देण्याबद्दल पण काय वाटते ते लिहावे.

अजित पवार वगैरेंसोबत शिव शंभुची तुलना करण्याची गफलत करू नका.

दिलेर एखाद्या हत्तीगत चालून आलेला, स्वराज्य संकटात होतं. पलीकडून आदिलशाही. मराठा फौज दक्षिण दिग्विजय करून आलेली. संभाजीराजांना दिलेरकडे पाठवून राजकारणाची एक जबरदस्त चाल शिवरायांनी केली. मुघलांच्या भीतीने आदिलशाही गप बसले.

छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा वर्ग आहे. ऐकीव माहितीवर आरोप करू नयेत. हल्ली सोशल मीडीयात तुम्ही कुणावर आरोप करताना कुणावर करत नाहीत यावरून जज्ज केले जाते. किमान आपापल्या पुरते तरी सर्वांचा आदर करूयात. जिथे टीका करायची तिथे निर्भीडपणे करूयात पण ती वस्तुनिष्ठ असायला हवी.

आता हा विषय पुरे यावर सहमती असेल असे गृहीत धरतो.

chronology समजून घ्या. एक विशिष्ट पक्षाच्या आदरणीय लोकांवर एखाद्याने राळ उठवली की अडनावावरून जात ओळखावी, त्या त्या जातीच्या पूजनीय व्यक्तींवर काहीतरी लिहायचं. बाकी बघा

आचार्य - वेल सेड!! (बरंच लिहावंसं वाटतंय, पण शोलेतल्या सचिन च्या मामूच्या पत्रासारखं ‘थोड़े कों बहुत और ख़त कों तार’ म्हणत थांबतो).

महेश काळेने एका गाण्याची शब्दशः वाट लावली. त्यावरून त्याच्यावर टीका झाली तर तिथेही ऑब्जेक्शन माय लॉर्ड आहेच.
>>>>>>

महेश काळेवर झालेली टीका त्याच्या खाजगी जीवनावर नसून त्याच्या कलेवर असली तरी तिची पातळी खालची होती. सोशल मीडियावर हल्ली जो ट्रोलिंग प्रकार बोकाळला आहे ते त्याच्या वाट्याला आलेले. माझा आक्षेप त्यावर होता.
त्यावर लोक म्हणत होते की आम्ही कौतुक करतो तर आम्हाला टीका करायचा सुद्धा हक्क आहे.
भारतीय क्रिकेट संघ जिंकला की त्यांना डोक्यावर घेऊन नाचा आणि हरल्यावर त्यांच्या घरावर दगडफेक करा, जाळपोळ करा..
वाह काय हक्क आहे..
कोणी दिला हा तुम्हाला?

Memes म्हणून जो हल्ली वाह्यात प्रकार सुरू झाला आहे त्याची झळ तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला लागल्याशिवाय तुम्हाला त्याचे गांभीर्य कळणार नाही..

असो,
तूर्तास आपण सेलिब्रिटी नाही यातच खुश राहू या !

भारताच्या टीमवर या पराभवानंतर दगडफेक झाल्याचं मला कसं समजलं नाही ?
२००३ साली झालेली का दगडफेक ? (एखादा दगड नाही म्हणत. ठिकठिकाणी लोकांनी जमून केलेली दगडफेक ).
गेल्या काही वर्षात भारतात नाही दिसलेलं हे दृश्य. कोणे एके काळी झाली असेल.

एखाद्याचा unsolicited solicitor कुणी तरी बनून सोशल मीडीयात त्या व्यक्तीला परस्पर जोडे मारायचा कार्यक्रम घडवून आणत असेल तर त्याचं दु:ख जोपर्यंत तुमच्या किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींच्या बाबतीत कुणी असा unsolicited solicitor बनून तुम्हाला तेच बक्षीस मिळवून देत नाही तोपर्यंत नाही समजणार. Happy

महेश काळेवर काय खालच्या पातळीची टीका झालेली? लिंक प्लीज!
खालच्या पातळीची म्हणजे नक्की काय ते वाचयचं आहे.

महेश काळेवर काय खालच्या पातळीची टीका झालेली? लिंक प्लीज!
>>>>>

त्या धाग्यावर कोणी मायबोलीकराने केली असे नाही तर एकूणच सोशल मीडियावर त्यांची ट्रोलिंग चालू होती. त्या धाग्यावर त्याचे समर्थन चालू होते. आता ती सोशल मीडिया टीका हवे असल्यास शोधून देतो. पण शोधल्यावर असे नको म्हणायला की आम्ही मायबोलीवर कोणी केली का असे विचारत होतो म्हणून आधी क्लिअर केले. आता बोला, देऊ का शोधून?

2007 क्रिकेट विश्वचषक
धोनी चित्रपट एकदा बघून घ्या.
चित्रपटावर विश्वास नसल्यास बातमीच्या लिंक सहज शोधून मिळतील.
गंमत बघा, जो खेळाडू भारताची शान आहे. त्याच्याच नशीबी हे...

धोनी चित्रपट एकदा बघून घ्या.
चित्रपटावर विश्वास नसल्यास बातमीच्या लिंक सहज शोधून मिळतील. >> येडपट आहेस का रे ? लिंक स्वतः द्यायची असते. चित्रपटावर विश्वास ठेवून इथे आक्रोश कशाला करतोस ? तुलाच गरज आहे त्या बातम्यांची. मी त्या प्रतिसादात जे लिहीलंय ते बातमी वाचूनच लिहीले आहे. तुझ्यासारख्या हवेत गोळ्या झाडायची सवय आणि आवड दोन्हीही नाही. बाकि तुझ्याशी वैयक्तिक वैर अजिबात नाही.

पण खूप भारी मुद्दा मांडतोय असा आव आणण्याआधी स्वतः चेक करावं. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही.

माबोवर नक्की कशाचे समर्थन होते?
टीका कुठली, ट्रोलिंग कुठलं, पासिंग कमेंट कुठली, आणि समर्थन हे नक्की कशाचं, केव्हा आणि किती प्रमाणात होतं हे डीटेल हवे आहेत. परत एक दोन ट्रोलिंगच्या पोस्ट नको.व्यवस्थित मॉब ट्रोलिंग हवं. आणि त्याचे समर्थन माबोवर केलेले हवे.
स्नोफ्लेक प्रकार असेल तर तो देऊ नका. स्नोफ्लेकचा अर्थ माहीत नसेल तर गूगल करुन समजुन घ्या. इथे विचारू नका.

ज्यांना महेश काळे ट्रोलिंग प्रकरण जाणून घ्यायचे असेल आणि चर्चेत भाग घ्यायचा असेल त्यांनी या धाग्यावर या.
दिवाळी सुट्टी खराब करत पुन्हा तेच मुद्दे रिपीट करण्यात अर्थ नाही. नवीन धाग्यात सुरुवातीपासून तेच तेच ऊगाळण्यापेक्षा चर्चा मागच्या पानावरून पुढे जाऊ दे.

https://www.maayboli.com/node/79239?page=9

Pages