नावाजलेल्या/मोठ्या लोकांतील दोष.

Submitted by अमरेंद्र बाहुबली on 18 November, 2023 - 06:32

सध्या नाना पाटेकरांचा एक विडीओ सोमीवर फिरतोय. त्यात त्यांनी सेल्फी घेण्यासाठी आलेल्या एका चाहत्याला सानकन लगावून हाकलून लावलेय, ऐवी मायबाप प्रेक्षक म्हणणारे, साधाभोळा नाना ,आपला माणूस, जमीनीवरील माणूस वगैरे असल्या प्रतिमा ह्या विडीओने क्षणात गळून पडल्या. सोमीवर बोंबाबोंब झाल्यावर नानांचा स्पष्टीकरणयुक्त माफीनामा आला पण जे व्हायचं ते होऊन गेलं होतं.
मोठे लोकही माणसेच असतात त्यांच्यातही गुणदोष असनारच. ऐरवी आपण त्यांचे फक्त गुण पाहतो. पण दोषांसहीत माणूस स्विकारला तर मग तक्रार राहत नाही. अश्याच मोठ्या लोकांच्या दोषांवीषयी चर्चेसाठी हा धागा.
मला माहीत असेलेल्या मोठ्या लोकांच्या काही छोट्या गोष्टी.
१) सचिन तेंडूलकर ह्यांची फरारी साठी टॅक्समाफी मागणे, सत्यसाईबाबा ह्यांचे भक्त बनने.(ते जादूने हवेतून वस्तू काढायचेत म्हणे) त्यामुळे अंधश्रध्देला दुजोरा दिल्यासारखेच, कोरोना काळात खुप बोंबाबोंब झाल्यामुळे ५० लाखाची मदत करणे.
२) लता मंगेशकर- ऊड्डाणपुल घरासमोर नको म्हणून तक्रार करणे, बाबासाहेबांची गाणी गाण्यास नकार.
३) सलमान खान, जाॅन अब्राहम ह्यांचे चाहत्यांचा मोबाईल ओढणे, धक्काबूक्की करणे.
तुम्हाला असं इतर मोठ्या लोकांच्या काळ्याबाजूबद्दल माहीतीय का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्मिता तळवलकरांचा एक किस्सा वाचला होता. त्या दादरच्या बाजारात भाजी घेत होत्या. तेव्हा कोणीतरी त्यांची फॅन त्यांना खवचटपणे म्हणाली की अरे तुम्ही स्मिता तळवलकर ना? मग भाजी काय घेता? त्यावर स्मिता तळवलकरांनी लगेच उत्तर दिले की फक्त भाजी घेतच नाही तर आम्ही स्वयंपाक बनवतो आणि जेवतो सुद्धा....

कुठले कुठले (तुला न लागू होणारे) नियम लावून टॅक्स वाचवतोस तू ?
>>>>>>

माझे उदाहरण घेऊ नका यात. मी याबाबतीत वेगळाच आहे. मला पैसे पैसे करणे आवडत नाही आणि पैशाचे गणित काही समजत नाही. पैसे कसे कमवावे त्याचा मी विचार कधी करत नाही किंवा पैसे कसे वाचवावे त्याची मला अक्कल नाही. यावरून मी घरी रोज शिव्या खातो.. जो टॅक्स जसा जायचा तसा जाऊ देतो. दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न सुटला हेच मला पुरेसे असते. त्यामुळे मी काही तुलनेला आदर्श केस नाही. मला मी काय करतो हे विचारू नका. कारण मी बावळट आहे. मी काहीच करत नाही Happy

दुसरी गोष्ट म्हणजे मला सचिन टॅक्स प्रकरण डिटेल मध्ये माहित नाही. कधी ते जाणून घ्यायचा प्रयत्न केला नाही. कारण तो विषय आवडीचा नाही. तसेच मला त्यातले काही कळत नाही. तुम्ही लिंक दिल्या तरी त्या मी स्किप करणार. सांगायचा मुद्दा हा की टॅक्स वाचायला धडपड करणारे माझ्या आजूबाजूला मी हजारो बघतो. मी नोकरी करतो तर माझा पगारातूनच कटतो, व्यवसाय करणारे तर आरामात चुकवताना बघतो. ते देखील आपण काही गैर करत आहे असेही त्यांना वाटत. नाही. उलट बरेच जण ग्राहक म्हणून आपलीच मदत मागतात की असे असे पेमेंट केले तर आम्हाला टॅक्स पडणार नाही वगैरे..

तरी आपल्याला सचिन वरच चर्चा करण्यातच रस असतो कारण तो सेलेब्रिटी आहे.

बाई दवे,
सचिनने किती रुपयांचा टॅक्स बुडवला हे एवढेच कोणी सांगू शकेल का?
पूर्ण प्रकरणं जाणून घेण्यापेक्षा हा आकडा आधी समजला तर बरे.

जे लोक सचिनला नावे ठेवतात, तेसुद्धा कुठला नियम लावून टॅक्स वाचता येईल काही बघतच असतात. >> असं स्टेटमेण्ट केलेले आहे. याचा प्रमाणित विदा आहे का ? म्हणजे कि सचिनला १०० लोक नाव ठेवतात. त्या शंभरच्या शंभर लोकांनी कर बुडवला असे. त्यांनी कर बुडवला याचा विदा कुठून घेतला ?

या दोन्ही पोस्टीत सचिनने कर बुडवला तर क्षम्य आहे असा सूर आहे. तसा तो मुद्दाम आहे कारण मग लोक करचोरीवरून सचिनवर आगपाखड करतील. याला काडी लावून मजा बघणे म्हणतात.

सचिनच्या कर चुकवण्याबद्दल मत काय हे सांगायचे टाळलेले आहे. वर भरत आणि अन्य लोकांनी त्यांच्या नेहमीच्या आयडीने सचिन प्रेमींचा रोष पत्करून जे काही सत्य आहे ते सांगण्याचा धोका पत्करला आहे. एक वेळ सूज्ञ सचिन प्रेमी त्यांच्या या गोष्टीला सलाम करतील. पण परस्पर इतरांना त्याच्या कर चोरीबद्दल बोलण्यासाठी उकसवायचे हे कुणालाच मान्य होणार नाही. स्वतःचे या करचोरीबद्दल मत काय हे द्यायचे नाही पण उगीच खुसपट काढायचे. यावर कुणी बोलले कि फेक आयडी आहेतच हाताशी. किती दिवस यावर पोट भरणार ?

कुणी कितीही मोठा सेलेब्रिटी का असेना एखादा कायदा मोडणे, कर चुकवणे त्याला शोभा देत नाही हे माझे स्पष्ट मत आहे. त्याला किंमत असो नसो. सलमान एके काळी आवडत होता बर्‍यापैकी, पण त्याच्या बद्दलच्या हिट अ‍ॅण्ड रनच्या केस मधे ज्या पद्धतीने एकूणच कामकाज होत होते, कोर्टाने निरीक्षणे नोंदवली त्यानंतर तो बॅड बुक्स मधे गेला बॅड बुक्स मधे गेला नसता तरीही आपल्या आवडत्या स्टारचे चुकीचे वागणे केवळ लोक असे वागतात असा कांगावा करून समर्थनीय ठरवू नये.

सेलेब्रिटींच्या खासगी आयुष्याचा आदर करावा. पण कायदामोडीचा कशाला ?

मुळात सेलिब्रिटी चा लोकांवर, समाजावर होणारा इन्फ्लुअन्स हाही त्यांना नियमांच्या चौकटीत ठेवायला भाग पाडतो. त्यांचा हा करिश्मा असतो म्हणूनच त्यांना जाहिरातीत घेतात ना मग जर इमेज चा फायदा घेताना लाजत नाहीत तर त्याच इमेज मुळे काही बंधने पाळणे भाग पाडले तर इतका कांगावा कशाला?

आणि सेलिब्रिटी च्या नावाने वेडीपीशी झालेली लोकं असतातच, इथंच मायबोलीवरही एक आदरणीय सदस्य आहेत

{ते वेड्यात काढण्याचे धंदे आहेत असे वाटते

फॅन असण्याबद्दलच शंका आहे. लोकांना पिडायला आवडतं. ते जीवितकार्य किंवा किमान अवतारकार्य आहे. तर त्यासाठीच्या अनेक हत्यारांपैकी ठरावीक सेलिब्रिटींचा इतरांना वीट येईल असा जप करणे हे एक मोठे हत्यार.

ठरावीक आयडींनी काही लिहिलं की मुद्दाम त्याविरोधात भूमिका घेणं हाही पॅटर्न आहे.
मग आहेच यांचा फॅन/ गोपिकाबेस. - अपशब्द वापरत नाही, चिडत नाही माझं बाळ - करायला.

मुद्दाम त्याविरोधात भूमिका घेणं >>> भूमिका नाही. बेगडीपणा. दारूबंदीची मोहीम सुद्धा अशीच बेगडी आहे.

मस्त चर्चा :

समवॉट प्रसिद्ध गायिका राणी वर्मा एकदा आमच्या घरी आल्या होत्या. साबांची जुनी ओळख आहे माणीक वर्मांच्या काळापासूनची. तर मी त्या पाकिटातल्या मिक्स च्या रवा इडली केल्या होत्या व खोबर्‍याची चटणी. त र दोन इडली व चटणी वाढली. अजून एक वाढू का विचारले तर त्या एकदम उसळून " नको, मला तुझ्यासारखे ढोल व्हायचे नाही!! " असेच एकदम म्हणा ल्या. मला एकदम काही सुचेचना. मी काही तिला माझ्याबद्दल बोला यला, मदत मागायला गेले नव्हते. आपले घरी आले की कोणी आग्रह करतो इतपतच आग्रह. पुणेरी पण नाही. नवृयाचा चेहरा पण एकदम पडला होता. मग त्यांना कुठे जायचे होते तिथे ते निघून गेले. मी वयाने लहान होते त्यांच्या मानाने . वाइट वाटले. पण मग किती रिकामी सेलेब्रिटी आहे ते कळले. तिच्या बरोबर स्पर्धा जिंकलेले सुरेश वाडकर किती तरी पुढे निघून गेले.

जर इमेज चा फायदा घेताना लाजत नाहीत तर त्याच इमेज मुळे काही बंधने पाळणे भाग पाडले तर इतका कांगावा कशाला?
>>>>

कोण सेलिब्रिटी कांगावा करत इथे आले आहे?
ते तर आपणच धागा काढून त्यांच्यावर चर्चा करत आहोत. त्यांच्यातील कित्येकांना याची पर्वाही नसेल..

एक मायबोली बाहेरचे उदाहरण देतो,

शाहरुख खान सुपरस्टार आहे. तो परफॉर्म करतो.
कमाल खान त्याचा टीकाकार आहे. तो टीका करतो.

शाहरुख त्याला पलटून कधी एक उत्तरही देत नाही. ती गरजही समजत नाही.

शाहरुख खानचे करोडो चाहते असतील.
पण कमाल खानचे देखील हजारो असतील.

कारण यशस्वी लोकांवर जळणाऱ्या लोकांची ही काही कमी नाही या जगात.
तो एक मानवी स्वभाव आहे.

अर्थात इथे सेलिब्रिटीवर टीका करणे गैर आहे असे म्हणायचे नाहीये. जरूर करूया.
पण ते स्वतः काही कांगावा करत इथे आले नाहीत हे देखील ध्यानात ठेवूया.
त्यामुळे हा कांगावा मुद्दा चुकला आहे इतकेच Happy

राणी वर्मा म्हणजे हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे.
नंतर मागे उभा मंगेश..
मध्ये जवळपास काही नाही.

सगळ्यांचे पाय मातीचे असतात. हे मातीचे पाय दिसलेल्या चर्चा वाचायला तेवढ्यापुरतं अगदी चविने आवडतं. कारण मी सुद्धा आदर्श नाही हे मनाला समजतं आणि हायसं वाटतं. Wink

बाकी तो शारुक का सचिन आणि अमिताभ असेल त्यांच्या घरी... त्याने लक्स वापरला म्हणून मी काही माझा साबण बदलत नाही की त्यांच्या क्षेत्रबाहेर त्यांना काही समजतं असंही समजत नाही. चांगला माणूस असण्याचं बंधन तर अजिबात घालत नाही. जनरल पब्लिक मध्ये १% चांगली माणसे असतील तर शेलिब्रिटीही १ %च चांगल्या असणार. ते आदर्श नसतात ... तसेच सैनिक, शास्त्रज्ञ, उद्योजक... कोणी अजिबातच त्यांच्या क्षेत्राबाहेत आदर्श नसतात. नसावेतच. रादर स्वार्थी माणसेच मला आवडतात. कारण स्वार्थ नाही सांगणारी माणसे चक्क खोटं बोलत असतात.

के आर के या माणसाचं विशेष कौतुक यासाठी वाटतं कि त्याला जे वाटतं तो स्वतःच्या नावानिशी, खर्‍या ओळखीनिशी बोलत राहतो. फेक आयडी काढून शिवीगाळ करत नाही. ना मूर्खांचा ग्रुप बनवून वेडे चाळे करत राहतो. भले मतं चुकीची असतील किंवा बरोबर.

त्याने एक सिनेमाही बनवला आहे. किमान एव्हढी तरी योग्यता आहे त्याची. त्याच्या मतांना मीडीया प्रसिद्धीही देतो. तो स्वतःच सुपरस्टार असल्याचा किंवा एखाद्या सेलेब्रिटीचा स्वयंघोषित एजंट असल्याचा दावा करून लोकांना वात आणत नाही. ही माझी मतं आहेत, मग मला तुम्ही त्याच्यावर जळतो असं म्हणालात तरी चालेल हा अ‍ॅटीट्यूड आवडतो.

अमितव - +१

“ रादर स्वार्थी माणसेच मला आवडतात. कारण स्वार्थ नाही सांगणारी माणसे चक्क खोटं बोलत असतात.” - प्रत्यक्ष किंवा आभासी जगात, जिथे ‘घेणं नास्ति, देणं नास्ति‘ परिस्थितीत लोकं आदर्शवाद मांडतात, किंवा आपल्या समजूतीबाहेर सुद्धा जग अस्तित्वात आहे हे अमान्य करून स्वतःच्या लेन्समधून जगाला जज करतात, ‘तों हँस लेता हूँ’

किंवा आपल्या समजूतीबाहेर सुद्धा जग अस्तित्वात आहे हे अमान्य करून स्वतःच्या लेन्समधून जगाला जज करता >> फेफ +१

किंवा आपल्या समजूतीबाहेर सुद्धा जग अस्तित्वात आहे हे अमान्य करून स्वतःच्या लेन्समधून जगाला जज करता >>> + 100

ठरावीक आयडींनी काही लिहिलं की मुद्दाम त्याविरोधात भूमिका घेणं हाही पॅटर्न आहे.
मग आहेच यांचा फॅन/ गोपिकाबेस. - अपशब्द वापरत नाही, चिडत नाही माझं बाळ - करायला. >>>> Happy Happy अगदी अगदी

सर तुम्ही सचिनच्या का मागे लागला आहात?
मागे तुम्ही महागुरुंची सुपारी घेतली होती.
लोकहो सर एखाद्याचं वकीलपत्र घेतल्याचा आव आणतात आणि त्याला इतरांकडून तुडवुन घेतात. काय आनंद मिळतो सरांना देवजाणे .
सर ह्या धाग्यावर सचिनला निशाणा बनवत आहेत. सरांच्या जाळ्यात सापडू नका.

तुम्हीसुद्धा मायबोलीचे सेलिब्रिटी आहात सर.
>>>>

मी सोशल मीडियावर लॉगिन करताच सेलिब्रिटी मोड मध्ये जातो हे खरे आहे. पण ते एवढ्यासाठीच की त्यामुळे आपल्या बद्दल कोण काय मत बनवते याची पर्वा केली जात नाही. बाकी मला माझ्या मर्यादांची जाणीव आहे.

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड चार वर्ष एकत्र फिरतात, त्यानंतर लग्न झाल्यावर चार महिन्यात त्यांना कळतं की ही व्यक्ती कोणीतरी वेगळीच आहे, त्यांचे एकमेकांबद्दलचे मत बदलते...

तर सेलिब्रिटी म्हणा किंवा मायबोलीवरचा एखादा आयडी म्हणा, आपण त्यांच्याबद्दल जे मत बनवतो ते कितपत माहितीवर बनते आणि कितपत खरे आणि कितपत खोटे असेल हे तुम्हीच ठरवा.

त्यामुळे लोकं तावातावाने जेव्हा आपल्याला एखादी व्यक्ती कळली असा दावा करते तेव्हा खरे तर मला गंमत वाटते. कारण तुम्ही एखाद्याला असे ओळखूच शकत नाही. त्यामुळे असा एखादा दावा जर कोणी माझ्याबद्दल करत असेल, तर मला त्यांना कन्फ्युज करायला मजा येते Happy

असो.
चर्चा सेलेब्रिटी वर करा. माझ्यावर नको.
राहिला विषय सचिनचा तर त्याचे नाव मी नाही घेतले, तर ते मूळ लेखातच आले आहे. आणि मी धाग्यावर पहिला प्रतिसाद लिहायच्या आधी सचिनवर बरीच चर्चा झाली होती. पण ती सगळी चर्चा गाळून मी काय म्हणालो याचेच काही लोकांना जास्त कौतुक. गॉसिप गॉसिप म्हणतात ते हेच Happy

<< असो.
चर्चा सेलेब्रिटी वर करा. माझ्यावर नको.>>>

------- आमचा सेलेब्रिटी विनम्र आहे.

माझ्यावर चर्चा नको असे खरोखर वाटत असेल तर परिणामकारक उपाय म्हणजे " माझ्यावर चर्चा नको... " असे नावाजलेल्या सेलेब्रिटी आयडी ने सांगायचेच नाही. चर्चा होणार नाही. Happy

अहो इग्नोर केल्या वर आधी काही पोस्टी.. पण तरीही तेच दळण.. याने धागे भरकटतात.. त्याचेही बिल मग माझ्यावर फाटते.. ते हे ठीक. ते बिल फाडण्याची पर्वा नाही. पण मला ते धागे भरकटने नको असते. कारण प्रामाणिकपणे सांगायचे तर आपल्यावर इतकी चर्चा बघून आता संकोचायला होते.

असो, या विषयावर हे मा शे पो
धाग्याच्या विषयावर उद्या अजून लिहितो..
शुभ रात्री शब्बा खैर खुदा हाफिज !!

<< अहो इग्नोर केल्या वर आधी काही पोस्टी.. पण तरीही तेच दळण.. याने धागे भरकटतात.. त्याचेही बिल मग माझ्यावर फाटते.. ते हे ठीक. ते बिल फाडण्याची पर्वा नाही. पण मला ते धागे भरकटने नको असते. कारण प्रामाणिकपणे सांगायचे तर आपल्यावर इतकी चर्चा बघून आता संकोचायला होते. >>
------ जेव्हढे संकोचणे जास्त तेव्हढा सेलेब्रिटीचा ब्रँड मोठा... Happy
तुमच्याही नकळत तुम्ही संकोचण्याला आमंत्रण दिले होते का?

" माझ्यावर चर्चा नको... " असा घागा येउद्या.
ऋन्मेऽऽष माझे नाव आहे आणि मी सेलेब्रिटी नाहीये.

सिलीब्रेटी हा जोक आधी होऊन गेलाय का?
सिलिब्रेटी होण्यास डोक्याने सिली असणे अजिबात गरजेचे नाही. वावर, लिहिणे, बोलणे यामध्ये सर्वत्र सिलीनेस असला/आणला की झाले. मग बरेच लोक अशा सिलिब्रिटी विषयी बोलणार आणि सर्दी मे गर्मी का एहसास प्रमाणे सिलिब्रिटी सिलिब्रिटी मे सेलिब्रिटी का एहसास मिळवणार.

मुझे गाली दी गई, मुझे नीच कहा गया. बददिमाग कहा,

पचपन करोड कि गर्लफ्रेंड असा एकाच्या बायकोचा जाहीर उल्लेख केलेल्या एका सभ्य माणसाने डेव्हिल्स एडव्होकेट च्या मुलाखतीत घाम पुसत पाणी मागितले आणि नंतर पळून गेला. तो आज डेव्हिल्स एडव्लाहोकेटला इग्नोर करतो. अशा एडव्होकेटासना इग्नोर केल्याने आपण महान आहोत असे वाटते. त्यांचं मै मै मै मै मै बकरीच्या सूरात सुरू असते. ही लक्षणे दिसली कि...

विषय असा आहे कि, धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय ही म्हण पायल रोहतगी. केतकी चितळे, रंगोली राणावत अशा शिळेब्रिटींना लागू पडते.

मध्यंतरी मै मै मै मै मुळे भरकटलेल्या धाग्याचा विषय चालू होता कि..
वर भरत,उदय यांनी संदर्भासहीत थेट आणि सुस्पष्ट टीका केली आहे. त्यांनी वकीलपत्र घेतोय असे दाखवून आपल्या अशिलाला फासावर चढवलेले नाही.

मनाचा मोठेपणा दाखवत जनमताचा आदर करीत टॅक्स भरला हे वाचलं तेव्हा मीही हसून घेतलं .

पण मग पुढे मला याच्यावर टॅक्स नको, त्याच्यावर नको असं सारखं सारखं करणं हाही मनाचाच मोठेपणाच का?

मॉडेलिंग, अभिनय हे माझ्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहेत , मी हौशी क्रिकेटपटू आहे असं वाचलं तेव्हाही हसून घेतलं. हे सगळं कायद्याच्या चौकटीत बसवता येतं. ते तो सेलिब्रिटी आहे, the powers that be च्या विरोधात जात नाही, रादर त्यांच्या आदेशापुढे मान तुकवतो म्हणून.

असो.

Pages