सण सार्वजनिक साजरे करावेत किंवा नाही?

Submitted by छन्दिफन्दि on 15 September, 2023 - 03:22

काही महिन्यांपूर्वी मी बे एरियातील वारी विषयी एक लेख लिहिला होता. त्याला संमिश्र प्रतिसाद होता. काही जणांचा सूर होता वारी म्हंटल की ती सार्वजनिक ठिकाणी ( मुख्यत्वे रस्त्यांवरून) होते.
अर्थात त्या वेळी ही वारी सर्व नियमाचे पालन करून आणि अतिशय शांतता पूर्ण आणि पवित्र वातावरणात काढल्याने मला तो मुद्दा अत्यंत गौण वाटला किंबहुना उगाच खोड काढल्यासारखंही वाटलं.
पण नंतर काही काळाने गोपाळकाला निमित्ताने उठवणाऱ्या कित्येक मजली दही हंडया, सार्वजनिक गणेशोत्सवा पायी, दांडिया पायी अडविलेले, उखडलेले रस्ते, लाऊड स्पीकर्स मुळे विद्यार्थी, आजारी व्यक्ती ह्यांना होणारा त्रास, (काळ्या?)पैशांची होणारी बेसुमार उधळपट्टी आणि ह्या सर्वांच्या मागे असलेल्या राजकीय शक्ती आणि त्यांचे सत्ता संघर्ष हे बघितलं की मात्र मग मलाही प्रश्न पडला,
उत्सवाचे असे सार्वजनिकत्व असावे किंवा नाही? किंवा उत्सव आपापले स्वतःच्या घरापुरते ठेवावेत की सार्वजनिकरीत्या साजरे करावेत?
पंढरपूर वारी विषयी खोलात जाऊन बघितलं असता, ज्ञानेश्वर महाराज आणि तुकोबांनी अनुक्रमे आळंदी आणि देहू येथून पंढरपूरला चालत जायला सुरुवात केली. तुकारामांच्या देहवासानंतर त्यांचे वंशज नारायणबाबा ह्यांनी त्यांच्या पादुका पालखीतून न्यायला सुरुवात केली. १८२० मध्ये हैबतराव ह्या सरदारांनी पालखीतून पादुका नेवून त्याला वारी / दिंडी स्वरूप दिले. त्यानंतर त्याचे आताचे वारीचे विराट स्वरूप दिसते ज्यात कित्येक लाख लोक चालतात.
गणपतीचा उल्लेख वेदकालीन साहित्यातही आढळतो पण गणेश चतुर्थी कधी पासून आणि कुणी पहिल्यांदा साजरी केली ह्याचा उल्लेख मिळत नाही.
परंतु शिवाजी महाराजांच्या काळात गणेश उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे करायला सुरुवात केली. नंतर पेशव्यांच्या काळातही ही परंपरा कायम राहिली.
नंतर ब्रिटिश राज आले तेव्हा त्यात खंड पडला. लोकं गणेश चतुर्थी आपापल्या घरी करू लागले.
परंतु लोकांना एकत्र आणण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव (आणि शिवजयंती उत्सव ) सुरु केले.
त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात त्याचे बदलत गेलेले स्वरूप तर सर्वाना परिचित आहेच. कदाचित गावांमध्ये अजूनही त्याचे सार्वजनिक रूप अक्राळ विक्राळ झाले नसावे जेव्हढे शहरात झालेले आढळते.
पूर्वी (वीसेक वर्षांपूर्वी किंवा कित्येक अंशी आजही ) गावांमधून केले जाणारे उत्सव सर्व गावाला एकत्र आणणारे होते किंवा आहेत, सर्वांचा सहभाग असल्यामुळे सहाजिकच ते निरुपद्रवी व आनंददायी होतात.
समजायला लागल्यापासून बघतेय ते बदलत जाणारे दहीहंडीचे स्वरूप, गणेशोत्सवाचे स्वरूप, हळू हळू नवरात्रीच्या देवीच्या जत्रेपासून तिचे दांडिया-डिस्को दांडियात होणारे रूपांतर. २००० च्या दशकापासून (?) नव्याने सुरु झालेल्या हिंदू नवंवर्ष यात्रा, सार्वजनिक संक्रातीचे हळदीकुंकू समारंभ, मंगळा गौर कार्यक्रम ( बहुदा यंदाच हे चालू झाले असावेत).
ह्यात ते जिथपर्यंत सोसायटी, गल्लीत सगळ्यांच्या हातभराने साजरे केले जातात तेव्हा कदाचित सार्वजनिक उत्सव सुरु करण्यामागील उद्देश सफल होत असावा असे वाटते.
पण जेव्हा त्यात (अ) राजकीय शक्ती उतरतात, मग खंडण्या, वर्गण्या, सेलिब्रिट, त्यांच्या लाखोंच्या बिदाग्या, आपले वर्चस्व प्रस्थापित करायला लावलेले ध्वनिक्षेपक, ज्याच्या नावाने उत्सवाची देणगी मागता त्याला बघवणार, ऐकवणार नाहीत अस ओंगळवाणं, हिडीस नृत्य, गायन-वादन, रस्ते बंद केल्यामुळे होणारी गैरसोय ... ही न संपणारी यादी समोर येते.
आणि मग प्रश्न पडतो की उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे करावेत का?
म्हणजे मूळ चांगला उद्देश बाजूला सारून त्याचा आपमतलबासाठी वापर करून त्याचे स्वरूप इतके बिभित्स केले जाते की प्रश्न पडावा मुळात हे सुरूच कधी, कोणी आणि कशासाठी केले. त्यामुळे खरा प्रश्न सार्वजनिकरित्या कशाप्रकारे करावेत आणि त्यावर काही निर्बंध घालून त्याचा मूळ उद्देश सफल करता येईल का असा असायला हवा.

तुमचे मत काय आहे जरूर लिहा.

तळटीप- मते कितीही विरोधात किंवा न पटणारी असतील तरी असभ्य भाषा वापरू नये. आणि वैयक्तीक पातळीवर घसरू नये.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जाऊ द्या भांडू नका. आपल्याला dj चे होणारे फायदे तोटे लिहा म्हणजे चर्चा करायला सोप्पे जाईल.

Dj चे तोटे.
1. लोकांना त्रास होतो.

Dj चे फायदे
1. देवाला वेगळी वेगळी गाणी ऐकून आनंद होतो आणि नवसाला पावतो.
2. मोठ्या आवाजाने घरातील उपद्रवी कीटक जसे की डास,मुंग्या यांचा नायनाट होतो.
3. हृदयाचे ठोके वाढून रक्ताभिसरण प्रक्रिया सुरळीत होते आणि हृदयविकाराचा धोका टळतो.
4. उपद्रवी पक्षी कावळे कबुतरं काही काळासाठी मनुष्य वस्तीपासून दूर जातात.
5. भिंतीवर लावलेले फ्रेम थरथरतात त्यामुळे त्यांच्याआड लपलेले पाली कोळी बाहेर येतात आणि घर स्वच्छ होते.
6. बहिऱ्या माणसांना पुन्हा ऐकू यायला लागते.

अजून बरेच फायदे आहेत. ऑफिसमध्ये आहे त्यामुळे एव्हड्यावर रजा घेतो.

सरांनी लॉजिकला सोडचिठ्ठी देऊन जे काही तांडव सुरु केले आहे, ते विलोभनीय आहे.....

त्या दुसऱ्या दारुबंदी वाल्या सरांना हे दाखवयाला पाहिजे....की दारु न पिताही लोकं ताळतंत्र सोडून बरळू शकतात >>>> Rofl Lol
फार च अ‍ॅप्ट कॉमेंट!

दारु न पिताही लोकं ताळतंत्र सोडून बरळू शकतात
>>>>

याचाच अर्थ दारू पिणारे ताळतंत्र सोडून बरळतात Happy
या विधानाबद्दल धन्यवाद
लोकांचे असे होऊ नये इतकीच इच्छा आहे.

ह्या विषयावर कोणत्या ही प्लॅटफॉर्म वर झालेली चर्चा बघितली तर लक्षात येईल गणपती ustavat डॉल्बी किंवा dj नको असेच 99.99% लोकांची मत असतात.
पण तरी सुध्धा Dj डॉल्बी असतोच.
कोण आणतात Dj/डॉल्बी.
1 % लोक.
मिरवणुकीत लाखो लोक सहभागी असतात dj/डॉल्बी असून पण.
कोण असतात मग ही लोक.
खरे लोक दो तोंडी असतात.
सार्वजनिक platforms वर जाऊन बसले मोठे समाज सुधारक बनतात पण स्वतःच्या घरच्या कार्यक्रमात मात्र dj/डॉल्बी आणतात.
( मावूली च dj वर्जन ह्यांच्या घरच्या पूजेला अशी अवस्था असते)
Dj/डॉल्बी चा आवाज कायद्यात बसतो का ..
तर त्याचे उत्तर आहे नाही.
ह्याच्या वर पोलिस ना कारवाई करण्याचा अधिकार आहे का?
तर आहे.
तसे कायदे आहेत का?
तर आहेत.

मग गणपती ustav चालू होण्या अगोदर शहरातील तमाम dj/ डॉल्बी पोलिस जप्त का करत नाहीत

म्हणजे आतून खूप लोकांचा dj/ डॉल्बी ला पाठिंबा असतो.
सरकार ९९.९९% लोकांच्या भावना दुखवण्याचा अव्यवहारी निर्णय कसा घेईल.1% dj/डॉल्बी प्रेमी लोकांसाठी.
पण सरकार तसा निर्णय घेते ..
म्हणजे दिसते तसे नाही.

Car मध्ये असलेली sound सिस्टीम किती decible चा आवाज करते.
नक्कीच कायद्याच्या पलीकडे तो आवाज असतो.
पण लोक आवडीने मोठा आवाज,bass असणारी सिस्टीम च पसंत करतात.
पहिले घरात होणे थिएटर लावणे ही फॅशन होती..
किती तरी मोठा आवाज त्या मुळे घरात निर्माण होत असे.
बाजूची लोक हैराण.
पार्टी मध्ये काय अवस्था असते.
आणि हे सर्व शोक पाळणारे च गणपती ustavatil dj/डॉल्बी ला समाज माध्यमावर कॉमेंट मध्ये विरोध करत असतात.
प्रत्येकाने अपल्या कार ची sound system बघावी,आपल्या घरातील music system बघावी.
किती कायद्यात बसते ती.

म्हणजे कळेल आपण पण सोयी नुसार व्यक्त होतो ते

दारु न पिताही लोकं ताळतंत्र सोडून बरळू शकतात
>>>>
याचाच अर्थ दारू पिणारे ताळतंत्र सोडून बरळतात Happy
-----------------------------
लॉजिक चुकले आहे सर.
"पोस्ट ग्रॅज्युएट न होताही नोकरी लागू शकते"
ह्यातून "सगळ्या पोस्ट ग्रॅज्युएशन झालेल्या लोकांना नोकरी लागते" असा इन्फरन्स चुकीचा आहे.

सगळ्या पोस्ट ग्रॅज्युएशन झालेल्या लोकांना नोकरी लागते" असा इन्फरन्सस चुकीचा आहे.
>>>>
अगदीच सगळ्या कुठे म्हटले आहे.
पण शक्यता दोन्हीमध्ये कोणाची जास्त आहे. आणि त्याही पेक्षा किती जास्त आहे Happy

अर्थात अशी नोकरी जिथे शिक्षणाची गरज आहे हा. नाहीतर पोस्ट ग्रॅज्युएशन ना होताही डान्स टीचरची नोकरी लागली या मुद्द्याला अर्थ नाही.
आता आम्हाला डिजाइन करायला एका इजिनियाराची गरज आहे तर आम्ही डिग्री वाला घेऊ की दहावी पास?

दहावी पास डिझाईन का करू शकत नाही>> एकदा सरांनी सांगितलं ना, नाही म्हणजे नाही
विरोध केला तर ते उभ्या कॉलमात अजून 786 पोस्ट लिहितील आणि त्यातील वाक्यांचा आणि मुद्द्यांचा एकमेकांशी काही ताळमेळ असेलच असे नाही
Happy

बाकी गळ टाकला आणि दारूबंदी वाले सर त्याला अडकले हे बघून मज्जा आली, दर वेळी त्यांनीच क्लिकबेट केलं पाहिजे असं थोडीच आहे Happy

याचाच अर्थ दारू पिणारे ताळतंत्र सोडून बरळतात>>> राँग. बरळायचेच असले तर दारू असली नसली दोन्ही सारखेच. त्यांना स्वतःचीच धुंदी "चढलेली" असते Wink

त्यांना स्वतःचीच धुंदी "चढलेली" असते>>>> अगदीच
आणि काही केलं तरी ही धुंदी उतरत नाही त्यांची Happy


आशू तुम्हाला ही सरां शिवाय करमत नाही
>>> Happy Happy
सर आहेतच तसे लोभसवाणे Happy

बाकी गळ टाकला आणि दारूबंदी वाले सर त्याला अडकले हे बघून मज्जा आली
>>>

तुम्ही किंवा कोणीही जेव्हा जेव्हा दारूचे समर्थन किंवा उदात्तीकरण कराल तेव्हा तेव्हा मी असाच अडकेन याची खात्री बाळगा. हे अडकणे मला मंजूर आहे Happy

सगळेच शाहरूख नसतात >>>
आता शाहरुख पण आला. ह्या आधी टिळक, पेशवे, महाराज, ब्राह्मण- अब्राह्माण, हिंदू-अहिंदू, शिंदे-फडणवीस हे सर्व इथे येऊन गेले आहेतच. आता फक्त मोदी-राहुल राहिले आहेत. ते आले की धागा परिपूर्ण होईल

नशीब, मायबोलीवर प्रत्येक नवीन पानावर गेल्यावर कर्सर वरती जातो आणि खालपर्यंत स्क्रोल करत यावं लागतं. आधी या प्रकाराबद्दल मी तक्रार करायचो. पण आता त्याचा उपयोग लक्षात येतो आहे. डायरेक्ट प्रतिसाद वाचले तर कळतच नाही की विषय नक्की कुठला चालू आहे.

अरे काय हे
कुठे नेउन ठेवलंय लॉजिक

पहिल्या पानापासून आहे >>> शाहरुख नेच सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्याची प्रेरणा दिली असणार
आणि मग त्याची रॉयल स्टॅग ची जाहिरात बघून लोकं मिरवणुकीत दारू पिऊन नाचायला लागले
नुसतं नाचायला बोर झालं म्हणून डीजे लावला
आणि मग लोकं तावातावाने त्याच्यावर बोलायला लागली

बिचारा, काय करायला गेला आणि काय होऊन बसलं

सर हसून झालं की टाळा लावून टाका धाग्याला
त्वमेव धागाकर्ता: त्वमेव अडमीन:

आता एकदम दिवाळीत सुरू होऊन जाऊदे आतिषबाजी सरांची Happy

7. Dj चा जिथपर्यंत जातो तो सगळा परिसर वाईट अमानवीय शक्तींपासून मुक्त होतो.
8. Dj च्या आवाजाने ओझोन थर अधिक दाट होतो.
9. दक्षिण उत्तर ध्रुवीय बर्फ वाढीस मदत होते.

Pages