काही महिन्यांपूर्वी मी बे एरियातील वारी विषयी एक लेख लिहिला होता. त्याला संमिश्र प्रतिसाद होता. काही जणांचा सूर होता वारी म्हंटल की ती सार्वजनिक ठिकाणी ( मुख्यत्वे रस्त्यांवरून) होते.
अर्थात त्या वेळी ही वारी सर्व नियमाचे पालन करून आणि अतिशय शांतता पूर्ण आणि पवित्र वातावरणात काढल्याने मला तो मुद्दा अत्यंत गौण वाटला किंबहुना उगाच खोड काढल्यासारखंही वाटलं.
पण नंतर काही काळाने गोपाळकाला निमित्ताने उठवणाऱ्या कित्येक मजली दही हंडया, सार्वजनिक गणेशोत्सवा पायी, दांडिया पायी अडविलेले, उखडलेले रस्ते, लाऊड स्पीकर्स मुळे विद्यार्थी, आजारी व्यक्ती ह्यांना होणारा त्रास, (काळ्या?)पैशांची होणारी बेसुमार उधळपट्टी आणि ह्या सर्वांच्या मागे असलेल्या राजकीय शक्ती आणि त्यांचे सत्ता संघर्ष हे बघितलं की मात्र मग मलाही प्रश्न पडला,
उत्सवाचे असे सार्वजनिकत्व असावे किंवा नाही? किंवा उत्सव आपापले स्वतःच्या घरापुरते ठेवावेत की सार्वजनिकरीत्या साजरे करावेत?
पंढरपूर वारी विषयी खोलात जाऊन बघितलं असता, ज्ञानेश्वर महाराज आणि तुकोबांनी अनुक्रमे आळंदी आणि देहू येथून पंढरपूरला चालत जायला सुरुवात केली. तुकारामांच्या देहवासानंतर त्यांचे वंशज नारायणबाबा ह्यांनी त्यांच्या पादुका पालखीतून न्यायला सुरुवात केली. १८२० मध्ये हैबतराव ह्या सरदारांनी पालखीतून पादुका नेवून त्याला वारी / दिंडी स्वरूप दिले. त्यानंतर त्याचे आताचे वारीचे विराट स्वरूप दिसते ज्यात कित्येक लाख लोक चालतात.
गणपतीचा उल्लेख वेदकालीन साहित्यातही आढळतो पण गणेश चतुर्थी कधी पासून आणि कुणी पहिल्यांदा साजरी केली ह्याचा उल्लेख मिळत नाही.
परंतु शिवाजी महाराजांच्या काळात गणेश उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे करायला सुरुवात केली. नंतर पेशव्यांच्या काळातही ही परंपरा कायम राहिली.
नंतर ब्रिटिश राज आले तेव्हा त्यात खंड पडला. लोकं गणेश चतुर्थी आपापल्या घरी करू लागले.
परंतु लोकांना एकत्र आणण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव (आणि शिवजयंती उत्सव ) सुरु केले.
त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात त्याचे बदलत गेलेले स्वरूप तर सर्वाना परिचित आहेच. कदाचित गावांमध्ये अजूनही त्याचे सार्वजनिक रूप अक्राळ विक्राळ झाले नसावे जेव्हढे शहरात झालेले आढळते.
पूर्वी (वीसेक वर्षांपूर्वी किंवा कित्येक अंशी आजही ) गावांमधून केले जाणारे उत्सव सर्व गावाला एकत्र आणणारे होते किंवा आहेत, सर्वांचा सहभाग असल्यामुळे सहाजिकच ते निरुपद्रवी व आनंददायी होतात.
समजायला लागल्यापासून बघतेय ते बदलत जाणारे दहीहंडीचे स्वरूप, गणेशोत्सवाचे स्वरूप, हळू हळू नवरात्रीच्या देवीच्या जत्रेपासून तिचे दांडिया-डिस्को दांडियात होणारे रूपांतर. २००० च्या दशकापासून (?) नव्याने सुरु झालेल्या हिंदू नवंवर्ष यात्रा, सार्वजनिक संक्रातीचे हळदीकुंकू समारंभ, मंगळा गौर कार्यक्रम ( बहुदा यंदाच हे चालू झाले असावेत).
ह्यात ते जिथपर्यंत सोसायटी, गल्लीत सगळ्यांच्या हातभराने साजरे केले जातात तेव्हा कदाचित सार्वजनिक उत्सव सुरु करण्यामागील उद्देश सफल होत असावा असे वाटते.
पण जेव्हा त्यात (अ) राजकीय शक्ती उतरतात, मग खंडण्या, वर्गण्या, सेलिब्रिट, त्यांच्या लाखोंच्या बिदाग्या, आपले वर्चस्व प्रस्थापित करायला लावलेले ध्वनिक्षेपक, ज्याच्या नावाने उत्सवाची देणगी मागता त्याला बघवणार, ऐकवणार नाहीत अस ओंगळवाणं, हिडीस नृत्य, गायन-वादन, रस्ते बंद केल्यामुळे होणारी गैरसोय ... ही न संपणारी यादी समोर येते.
आणि मग प्रश्न पडतो की उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे करावेत का?
म्हणजे मूळ चांगला उद्देश बाजूला सारून त्याचा आपमतलबासाठी वापर करून त्याचे स्वरूप इतके बिभित्स केले जाते की प्रश्न पडावा मुळात हे सुरूच कधी, कोणी आणि कशासाठी केले. त्यामुळे खरा प्रश्न सार्वजनिकरित्या कशाप्रकारे करावेत आणि त्यावर काही निर्बंध घालून त्याचा मूळ उद्देश सफल करता येईल का असा असायला हवा.
तुमचे मत काय आहे जरूर लिहा.
तळटीप- मते कितीही विरोधात किंवा न पटणारी असतील तरी असभ्य भाषा वापरू नये. आणि वैयक्तीक पातळीवर घसरू नये.
सुरूच आहे की ४७ पासून
सुरूच आहे की ४७ पासून आजतागायत धुलवड. कधी आझाद मैदान कधी संसद कधी रामलीला मैदान आणि बरंच काही...
वा: अडमिन वा:!
वा: अडमिन वा:!
परंतु शिवाजी महाराजांच्या काळात गणेश उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे करायला सुरुवात केली. नंतर पेशव्यांच्या काळातही ही परंपरा कायम राहिली>>>>
ब्रिटिशांनी त्यांच्या काळात जमावबंदी, संचार बंदी वगैरे आणून लोकांचे एकत्र येणे बंद करविले. तेव्हा लोक आपापल्या घरी गणपती बसवत आणि खाजगी मध्ये पूजा अर्चा चाले.
पण मुस्लिमांना शुक्रवारी सामुदायिक नमाज पढायला धार्मिक सबबीखाली परवानगी दिली.
परंतु हिंदूंना मात्र एकत्र येण्याला मज्जाव होता.>>>>
असला छद्म- इतिहास चालतो, आणि माझी व्यंगात्मक पोस्ट मात्र उडवली.
मौजा ही मौजा!!
Adminनी फेरी मारल्यानंतर पण
Adminनी फेरी मारल्यानंतर पण माझे प्रतिसाद तशेच्यातशे शाबूत आहेत हे पाहून मी माझेच अभिनंदन करतो.
बाकी चालू द्या.
सण सार्वजनिक साजरे करावेत
सण सार्वजनिक साजरे करावेत त्यामुळे लोकांच्यात उत्साह आणि एकीची भावना निर्माण होते- हेमावैम.
काही पोस्ट चांगल्या आहेत सा. सणांना साजरा करण्यात जे काही बिभत्स वळण लागू लागलय, त्याला आळा बसणे गरजेचं आहे, कर्कश संगीत, धिंगाणा ह्याला आवर बसायला हवा. आरती चा आवाज ही मर्यादित असायला हवा..ईतर धर्मिय लोकांनी का म्हणून हा गोंधळ आणि आवाज इतके दिवस सहन करावा?
गणेशोत्सव शिवाजी महाराजांच्या काळात वगैरे मनाला पटले नाही..
https://en.wikipedia.org/wiki
https://en.wikipedia.org/wiki/Ganesh_Chaturthi#cite_note-Kapoor2002-23
https://www.britannica.com/topic/Ganesh-Chaturthi
http://www.ganeshchaturthi.org/history-of-ganesh-chaturthi.html
ह्या काही लिन्क्स, अजुन खोलात जाऊन, सन्दर्भ बघायचे असतील तर तिकडे पुढ्च्या लिन्क्स मिळतील.
छन्दिफन्दि तुम्हाला उद्देशून
छन्दिफन्दि तुम्हाला उद्देशून माझ्या पोस्ट चा भाग नव्हता.
एखाद्या पोस्ट ला मूर्ख पोस्ट
एखाद्या पोस्ट ला मूर्ख पोस्ट वगैरे लिहिणे जास्त होतंय असे नाही वाटत का तुम्हाला? Let’s be kind for everyone.
https://vishwakosh.marathi
https://vishwakosh.marathi.gov.in/21292/
Britannica कधी पासून reliable
Britannica कधी पासून reliable source of information झाले?
असो वरच्याच एका सोर्स ( http://www.ganeshchaturthi.org/history-of-ganesh-chaturthi.html) मधून खालील माहिती उजेडात आली. सोर्सच्या लिंक्स द्यायच्या आधी वाचायच्या तरी.
The history of Ganesh Chaturthi dates back to the Peshwa Empire when this festival was celebrated only by the upper class but Lokmanya Tilak popularized it as a festival of the masses and people of all strata of the society joined in.
https://thinkmaharashtra.com/
https://thinkmaharashtra.com/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%...
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/79999
धागा गुंडाळा ...........
धागा गुंडाळा ........... बाप्पा चालले. पुढल्या वर्षी नवीन किंवा हाच धागा वर काढा.
च्रप्स तुमच्या स्वतःच्या
च्रप्स तुमच्या स्वतःच्या कॉमेंट्स बरेचदा (९९%) खोचक आणि वेड पांघरून टाईप्स असतात. तुम्ही काय सल्ले देताय? तुमचा काईंडनेस कधी दिसला नाही.
एनीवेज छंदीफंदी साठी पोस्ट एडिटेड.
मायबोली कधी पासून reliable
https://www.maayboli.com/node/79999
Submitted by छन्दिफन्दि on 28 September, 2023 - 10:48

>>>>≥>>>>>>>
मायबोली कधी पासून reliable source of information झाली? किती हसवाल ओ
चंदीफंदी तुम्ही सुरुवातीलाच धाग्यातले छायाचित्र तसेच ठेवले असते तर स्वतःला एवढे डिफेन्ड करावे लागले नसते.
धागा गुंडाळा ...........
धागा गुंडाळा ........... बाप्पा चालले. पुढल्या वर्षी नवीन किंवा हाच धागा वर काढा.
>>>>>>>
आजच तर धूडगूस जास्त असेल.
काल एका फेसबूक मैत्रीणीच्या वॉलवर चर्चा चालू होती ती वाचली. तेथील म्हणजे पुण्यातील गणपती मिरवणूक म्हणजे कसे दारू पिऊन धिंगाणा असतो आणि कसे कसे कोणाला वाईट अनुभव आले आहेत. स्पेशली बायकांना..
हा धिंगाणा सगळीकडेच असेल, त्या पुण्यातील आणि चर्चा तेथील होती म्हणून त्या शहराचा उल्लेख केला.
Ashu29 - तुम्ही पोस्ट एडिट
Ashu29 - तुम्ही पोस्ट एडिट केली- छान वाटले...
https://www.punekarnews.in
https://www.punekarnews.in/pune-man-and-his-family-members-assaulted-for...
गणेशनगर सोमाटणे फाटा , पुणे इथे एका मंडळाची गणेशविसर्जनाची मिरवणूक चालली होती. तिथल्या एका कुटुंबाने (नक्कीच पीसफुली जमातीचे असणार) मंडळाच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की इथे डीजेचा आवाज कमी करा. आमचा मुलगा नुकताच गेला (वारला) आहे, आम्ही सुतकात आहोत असं फालतू कारण दिलं. आता वर्षाचे ३६५ दिवस रोजच कुठे ना कुठे माणसं मरतात, तशीच गणेशोत्सवात पण मरतात. पण गणेशोत्सव वर्षातून १०-११च दिवस असतो. तो साजरा करायला सुद्धा यांची आडकाठी.
वर पोलिसांनी त्या गणेशमंडळाच्या कार्यकर्त्यांनाच अटक केली. हिंदू खतरे में म्हणतात, ते उगाच नाही.
<तेथील म्हणजे पुण्यातील गणपती मिरवणूक म्हणजे कसे दारू पिऊन धिंगाणा असतो आणि कसे कसे कोणाला वाईट अनुभव आले आहेत. स्पेशली बायकांना.> बायकांना वर्षाचे ३६५ दिवस गर्दीत वाईट अनुभव येत असता, रेल्वे स्टेशनवर - बसमध्ये, रस्त्यात , बाजारात. विसर्जन मिरवणुकीत वाईट अनुभव आले, तर त्याचे काय एवढं. या प्रकाराचं विकृत चित्रण भाऊ पाध्ये यांनी वासुनाका मध्ये केलं आहे.
खरं तर गणपती जातोय म्हणून लोक दु:खात असतात, ते दु:ख कमी करायला कोणी दारू पितात, नाचतात, त्यावरून सुद्धा टीका केली जाते.
विसर्जन मिरवणुकीतील गर्दीचा फायदा समाजकंटक घेतात याचा दोष त्या मिरवणुकीवर का?
सांगली जिल्ह्यात (Sangli News
सांगली जिल्ह्यात (Sangli News) दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन तरुणांचा अचानक मृत्यू झाला. दोन तरुणांच्या या मृत्यूला गणेश विसर्जन मिरवणुकीमधील डीजेचा दणदणाटही कारणीभूत ठरला. तासगाव तालुक्यातील कवठेएकंदमधील शेखर पावशे (वय 32, रा. कवठेएकंद) आणि वाळवा तालुक्यातील दुधारीमधील प्रवीण शिरतोडे (वय 35 रा. दुधारी) या तरुणांचा सोमवारी रात्री झाला. सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी हे दोघे गेले होते. मिरवणुकीत डीजेच्या दणदणाटाने अस्वस्थ वाटू लागल्यानंतर दोघांचा मृत्यू झाला. यामधील शेखर पावशेची 10 दिवसांपूर्वी अँजिओप्लास्टी झाली होती.
त्यांनी मिरवणुकीला जाणे टाळायला हवे होते
काहीही. मिरवणुकीत शेकड्याने
काहीही. मिरवणुकीत शेकड्याने लोक असतात. बाकीच्यांना कुठे काय झालं?
शिवाजी महाराजांच्या काळात
शिवाजी महाराजांच्या काळात गणेशोत्सव चालू झाला ही माहिती मलाही शाळेपासून नव्हती आताच कळली.
टिळकांच्या आधी गणेशोत्सव होता का ? किंवा त्याचे स्वरूप कसे होते? किंवा त्यांनी मारुती व इतरही कोणत्या देवाचा उत्सव चालू केला असू शकता...
ह्या शंकापायी थोडं शोधलं तर वरील माहिती मिळाली.
आता विकीपीडिया हे कोणीही एडिट करू शकतो हे जरी खरे असले तरी त्यांनी त्याचे संदर्भ दिले आहेत. ( जे मी आणि खोलात जाऊन बघितले नाहीत ) पण नंतर अजूनही बऱ्याच ठिकाणी ह्या संदर्भातील माहिती मिळाली.
आता ही मिस-इन्फॉर्मशन असू शकते का? माहित नाही. पण मग खरा माहिती स्रोत कोणता? आणि इकडे कोणी खात्रीशीर काही माहिती, खात्रीशीर संदर्भातून आणली की शिवाजी महाराजांनी गणेशोत्सव चालू केला नाही तर ते ग्राह्य धरता येईल.
शिवाजी आणि जिजाऊ जेव्हा पुण्यात आले त्यावेळी बऱ्याचशा मंदिरांची वाट लावून ठेवली होती. हळू हळू महाराजांनी परिस्थिती सुधारत नेली, मंदिरांचा जीर्णोद्धार केला. त्या वेळी त्यांनी सार्वजनिक ( त्या वेळी बऱ्याचशा गोष्टी सार्वजनिक च असायच्या ) गणपती उत्सव चालू केला असावा ही शक्यता नाकारता येत नाही.
टिळकांनी ती खंडित परंपरा परत चालू केली असावी आणि त्या बरोबरच शिवजयंती उत्सव चालू केला असावा. ( हा माझा तर्क )
शाळेत असताना ऐकलेली, लो. टिळकांनी लोकांना एकत्र आणण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव चालू केले. हीच माहिती होती.
आता भाऊ रंगारी ह्यांचे नाव ऐकले.
सार्वजनिक गणेशोत्सव कधी सुरू
सार्वजनिक गणेशोत्सव कधी सुरू झाला, कोणी केला याने तुमच्या लेखाच्या उत्तरार्धातील चर्चेला फरक पडतो का?
डिजे लावणाऱ्या लोकांविरुद्ध,
डिजे लावणाऱ्या लोकांविरुद्ध, त्यांना लावू देणाऱ्या लोकांविरुद्ध, नियमांचे उल्लंघन झाले तरी काहीही न करणाऱ्या पोलिसांबद्दल तीव्र तिरस्काराची भावना येते प्रत्येक गणेशोत्सवात आणि खरच सगळ्यात आवडत्या सणावर सावट येते. आनंद मिळणे दूरच, मनस्ताप मात्र मुबलक मिळतो. अत्यंत हेल्पलेस वाटते.
पुण्यातल्या विसर्जनाच्या
पुण्यातल्या विसर्जनाच्या मिरवणुका दोन- तीन दिवस चालतात.
अनेक गणेशमूर्तींचे विसर्जन अनंत चतुर्दशीला होतं नाही. हे शास्त्राला चालतं का?
यावरूनच सार्वजनिक गणेशोत्सवात गणपतीचं महत्त्व किती उरलं आहे, ते कळत नाही का? डिट्टो रामनवमी, हनुमान जयंती, आता महाशिवरात्रीच्या मिरवणुका.
आता घरगुती गणेशोत्सवात सुद्धा आरत्या आणि विसर्जनाच्या मिरवणुकीत घोषणा अक्षरशः:घसा फाडून म्हणायची पद्धत पडली आहे. यंदा मंत्रपुष्पांजली सुद्धा ओरडून ओरडून म्हटलेली ऐकू आली.
https://www.change.org/p
https://www.change.org/p/ganesh-festival-and-decibel-levels-urgent-call-...
सार्वजनिक गणेशोत्सव कधी सुरू
सार्वजनिक गणेशोत्सव कधी सुरू झाला, कोणी केला याने तुमच्या लेखाच्या उत्तरार्धातील चर्चेला फरक पडतो का? >> अजिबात नाही.
वरती लोकांनी बराच दंगा / प्रश्न केले होते म्हणून हे लिहिलं
गणपती उत्सव चालू केला असावा
गणपती उत्सव चालू केला असावा ही शक्यता नाकारता येत नाही.>>>
छंदीफंदी ह्यांचा नवीन षटकार.
खरा इतिहास परत एकदा वाचा
किती वेळा लिहिणार?
किती वेळा लिहिणार?
खरा इतिहास परत एकदा वाचा
खरा इतिहास परत एकदा वाचा
Submitted by झम्पू दामलू on 29 September, 2023 ->>>> तुम्हाला काय माहिती आहे आणि कुठून मिळवली ह्याविषयी एकही शब्द लिहीला नाहीत..
किती वेळा लिहिणार?
किती वेळा लिहिणार?
धागा सुरू केला तेंव्हा धागाकर्तीचा रोख गणपती उत्सवाच्या दिशेनेच होता. इथल्या काही माननीय आयडिंच्या आग्रहाला बळी पडून धाग्याचा रोख सर्व सणांच्या दिशेने वळवला.इथल्या सर्व सभासदांनी प्रामाणिक पणे सांगावे की कोणत्या उत्सवात जनतेला सर्वात जास्त त्रास होतो?
तसेच, गणपती उत्सवाचा संबंध शिवाजी महाराजांशी जोडला. महाराजांचे नाव आले की समाजात गोष्टी आपोआप मान्य केल्या जातात. इतिहासात जाणून बुजून गोष्टी घुसवल्या जाऊ लागल्या तर तो प्रयत्न वेळीच हाणून पाडला पाहिजे. आधीच महाराजांच्या इतिहासात कमी खाडाखोडी झाल्या आहेत का?
Whataboutry करणाऱ्यांना पळवाट
Whataboutry करणाऱ्यांना पळवाट नको म्हणून सर्व सणांबद्दल लिहायला मी सांगितले.
कारण तोवर धाग्यांचा रोख सणांच्या नावाखाली चाललेल्या अपप्रकार हा होता.
आता. आ माझा तर्क आहे, शक्यता नाकारता येत नाही असे म्हणत लेखिका इतिहास संशोधनात (!) घुसल्या, तर त्यांना आपणही हा माझा तर्क आहे, शक्यता नाकारता येत नाही, कसं उत्तर देऊच शकतो.
Pages