सण सार्वजनिक साजरे करावेत किंवा नाही?

Submitted by छन्दिफन्दि on 15 September, 2023 - 03:22

काही महिन्यांपूर्वी मी बे एरियातील वारी विषयी एक लेख लिहिला होता. त्याला संमिश्र प्रतिसाद होता. काही जणांचा सूर होता वारी म्हंटल की ती सार्वजनिक ठिकाणी ( मुख्यत्वे रस्त्यांवरून) होते.
अर्थात त्या वेळी ही वारी सर्व नियमाचे पालन करून आणि अतिशय शांतता पूर्ण आणि पवित्र वातावरणात काढल्याने मला तो मुद्दा अत्यंत गौण वाटला किंबहुना उगाच खोड काढल्यासारखंही वाटलं.
पण नंतर काही काळाने गोपाळकाला निमित्ताने उठवणाऱ्या कित्येक मजली दही हंडया, सार्वजनिक गणेशोत्सवा पायी, दांडिया पायी अडविलेले, उखडलेले रस्ते, लाऊड स्पीकर्स मुळे विद्यार्थी, आजारी व्यक्ती ह्यांना होणारा त्रास, (काळ्या?)पैशांची होणारी बेसुमार उधळपट्टी आणि ह्या सर्वांच्या मागे असलेल्या राजकीय शक्ती आणि त्यांचे सत्ता संघर्ष हे बघितलं की मात्र मग मलाही प्रश्न पडला,
उत्सवाचे असे सार्वजनिकत्व असावे किंवा नाही? किंवा उत्सव आपापले स्वतःच्या घरापुरते ठेवावेत की सार्वजनिकरीत्या साजरे करावेत?
पंढरपूर वारी विषयी खोलात जाऊन बघितलं असता, ज्ञानेश्वर महाराज आणि तुकोबांनी अनुक्रमे आळंदी आणि देहू येथून पंढरपूरला चालत जायला सुरुवात केली. तुकारामांच्या देहवासानंतर त्यांचे वंशज नारायणबाबा ह्यांनी त्यांच्या पादुका पालखीतून न्यायला सुरुवात केली. १८२० मध्ये हैबतराव ह्या सरदारांनी पालखीतून पादुका नेवून त्याला वारी / दिंडी स्वरूप दिले. त्यानंतर त्याचे आताचे वारीचे विराट स्वरूप दिसते ज्यात कित्येक लाख लोक चालतात.
गणपतीचा उल्लेख वेदकालीन साहित्यातही आढळतो पण गणेश चतुर्थी कधी पासून आणि कुणी पहिल्यांदा साजरी केली ह्याचा उल्लेख मिळत नाही.
परंतु शिवाजी महाराजांच्या काळात गणेश उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे करायला सुरुवात केली. नंतर पेशव्यांच्या काळातही ही परंपरा कायम राहिली.
नंतर ब्रिटिश राज आले तेव्हा त्यात खंड पडला. लोकं गणेश चतुर्थी आपापल्या घरी करू लागले.
परंतु लोकांना एकत्र आणण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव (आणि शिवजयंती उत्सव ) सुरु केले.
त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात त्याचे बदलत गेलेले स्वरूप तर सर्वाना परिचित आहेच. कदाचित गावांमध्ये अजूनही त्याचे सार्वजनिक रूप अक्राळ विक्राळ झाले नसावे जेव्हढे शहरात झालेले आढळते.
पूर्वी (वीसेक वर्षांपूर्वी किंवा कित्येक अंशी आजही ) गावांमधून केले जाणारे उत्सव सर्व गावाला एकत्र आणणारे होते किंवा आहेत, सर्वांचा सहभाग असल्यामुळे सहाजिकच ते निरुपद्रवी व आनंददायी होतात.
समजायला लागल्यापासून बघतेय ते बदलत जाणारे दहीहंडीचे स्वरूप, गणेशोत्सवाचे स्वरूप, हळू हळू नवरात्रीच्या देवीच्या जत्रेपासून तिचे दांडिया-डिस्को दांडियात होणारे रूपांतर. २००० च्या दशकापासून (?) नव्याने सुरु झालेल्या हिंदू नवंवर्ष यात्रा, सार्वजनिक संक्रातीचे हळदीकुंकू समारंभ, मंगळा गौर कार्यक्रम ( बहुदा यंदाच हे चालू झाले असावेत).
ह्यात ते जिथपर्यंत सोसायटी, गल्लीत सगळ्यांच्या हातभराने साजरे केले जातात तेव्हा कदाचित सार्वजनिक उत्सव सुरु करण्यामागील उद्देश सफल होत असावा असे वाटते.
पण जेव्हा त्यात (अ) राजकीय शक्ती उतरतात, मग खंडण्या, वर्गण्या, सेलिब्रिट, त्यांच्या लाखोंच्या बिदाग्या, आपले वर्चस्व प्रस्थापित करायला लावलेले ध्वनिक्षेपक, ज्याच्या नावाने उत्सवाची देणगी मागता त्याला बघवणार, ऐकवणार नाहीत अस ओंगळवाणं, हिडीस नृत्य, गायन-वादन, रस्ते बंद केल्यामुळे होणारी गैरसोय ... ही न संपणारी यादी समोर येते.
आणि मग प्रश्न पडतो की उत्सव सार्वजनिकरीत्या साजरे करावेत का?
म्हणजे मूळ चांगला उद्देश बाजूला सारून त्याचा आपमतलबासाठी वापर करून त्याचे स्वरूप इतके बिभित्स केले जाते की प्रश्न पडावा मुळात हे सुरूच कधी, कोणी आणि कशासाठी केले. त्यामुळे खरा प्रश्न सार्वजनिकरित्या कशाप्रकारे करावेत आणि त्यावर काही निर्बंध घालून त्याचा मूळ उद्देश सफल करता येईल का असा असायला हवा.

तुमचे मत काय आहे जरूर लिहा.

तळटीप- मते कितीही विरोधात किंवा न पटणारी असतील तरी असभ्य भाषा वापरू नये. आणि वैयक्तीक पातळीवर घसरू नये.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे अर्ध्या मायबोलीला माहीत आहे एव्हाना की मी तो ह हजारातला लिहीतो. >>> हो का ?
कुणालाच खबर नाही पण. नावे लिहा बरं पट दिशी अर्ध्या मायबोलीच्या दहा टक्के मायबोलीकरांची. Proud

माझी आई गेलेली हैद्राबादला अहमदनगरला सॉरी सॉरी, तिच्या शाळेच्या सहली बरोबर. ती शिक्षिका होती ना. माझ्याकरता इतके दगडाचे माळा, कानातले, डूल, आणलेले. आईबरोबर तुळशीबागेत जाणं एक सुंदर अनुभव असायचा.

अहो तुम्हीच आधी हे लिहिले ना - थोडे कष्ट घ्या आणि वाचा

हो कारण इथे तरी किमान नॉर्मल असाल असा माझा भ्रम झाला.

>>>

बरं जाऊ द्या आता.
तुम्हीच वाचायला सांगितले ना. ईथे विषय संपला.
पण यापुढे कोणाला स्वताकडे असलेली लिंक द्यायची नसेल तर त्यांना कष्ट घ्या आणि वाचा असेही सांगू नका.

बाई दवे, मला ती गणेशोत्सवाची लिंक सापडली.
पण आता तुम्हीही कष्ट घ्या आणि ती शोधा. मी जातो आरतीला. खुदा हाफिज Happy

हे अर्ध्या मायबोलीला माहीत आहे एव्हाना की मी तो ह हजारातला लिहीतो. >>> हो का ?
कुणालाच खबर नाही पण. नावे लिहा बरं पट दिशी अर्ध्या मायबोलीच्या दहा टक्के मायबोलीकरांची. Proud
>>>>>

अर्ध्या मायबोलीला म्हणालो,
अर्ध्या मायबोलीकरांना नाही म्हणालो
फसलात ना...
चला तुम्हाला सुद्धा खुदा हाफिज Happy

मला ती गणेशोत्सवाची लिंक सापडली.>> डोंबल Happy
खोटं बोला पण रेटून बोला
तुम्हीच वाचत बसा ती लिंक

असले ब्लफ कॉल्स तुम्हालाच लखलाभ

आपण या धाग्यावर प्रदूषण , शिस्त अशा विषयावर चर्चा करतोय. पण अजून एक वेगळी बाजू मी मांडण्याचा प्रयत्न करतो ती म्हणजे अचानक भाववाढ.
गणपती, नवरात्र , दिवाळी इ. सणामध्ये बाजारात फुलांचे दर १०० -२००% अचानक वाढतात. गणपती मध्ये तर केवडा ५००-१००० ला मिळतो. किराणा , तेल, पूजा / सजावट साहित्य यांची भाववाढ तर आहेतच.
यामध्ये मरण केवळ मध्यम वर्गीयांचे होते , मन मारून सण साजरे करणे. देवाला काही स्पेसिफिक गोष्टी आवडतात आणि त्या खिशाला परवडत नाही.
इतर धर्मीयांमध्ये पण असे असून शकते (मला नक्की माहित नाही , जाणकारांनी प्रकाश टाकावा).
पूर्वी सणामध्ये स्पर्धा नव्हती , प्रत्येक कुटुंबाचा एक गणपती, सर्वांची मिळून एक दहीहंडी , नवरात्र तर केवळ काही ठिकाणी होत होता. आता गणपती हा वैयक्तीत झाला आहे (बऱ्याच कुटूंबात एकापेक्षा जास्त गणपती असतात. तसेच अन्य भाषीय लोकांमध्ये गणपती आणणे प्रेस्टिज झाले आहे , अशामुळे मालाची मागणी वाढते आणि भाववाढ होते )
आपल्याला आता आपले सण साजरे करायचे सक्षम पर्याय शोधायला हवेत.

सण आले की काही गोष्टी न भाव वाढतात.
फुल,पूजेचे साहित्य इत्यादी.

हे खरे आहे.भारतीय लोकांची ती प्रवृत्ती च आहे.अडवणूक करून पैसे उकळणे .
१) पावूस जोरात पडला की रिक्षा,टॅक्सी वाले मीटर बंद करून हवं तितके भाडे वसूल करतात.
ओला,उबर वाले भाव दुप्पट,तिप्पट किती ही करतात.
अशी खूप उदाहरणे आहेत आणि फक्त सण च नाहीत तर अनेक प्रसंगी अशी aadavnuk करून पैसे उकळले जातात.
त्या मुळे ही प्रवूर्ती फक्त गणपती ustavat च दिसते बाकी वेळी असे भाव वाढीचे प्रकार होत च नाहीत.
असे काही नाही.
भारतीय लोकांची ती प्रवृत्ती आहे ते जगाच्या कोपऱ्यात कुठे ही गेले तरी सुधारणार नाहीत

पैके वाचवायला मग ४ दिवस आधी फुलं घेऊन फ्रीजमध्ये ठेवायला लागतील. टिकतात म्हणे आठवडाभर ..

(भाववाढ दिसते पण अतिवृष्टीने नाशिवंत मालाचं नुकसान कधी दिसत नाही हे नेहमीच घडत असते.)

सणांमध्ये व्यवसाय वाढतो हे खरे तर चांगले आहे. ईथे मग आपल्या माणसांनीच व्यवसायात ऊतरणे गरजेचे आहे.
या ऊपर ज्यांना खरेच नाही परवडत अमुक तमुक महागलेल्या वस्तू देवासाठी म्हणून घेणे त्यांनी देवाला यातले काहीच नको असते यावर श्रद्धा ठेवावी. अर्थात मी नास्तिक असल्याने मला हे सांगणे सोपे असावे, आस्तिकांना अवघड जात असावे.

हैदराबाद चारमिनारजवळ बांगड्या आणि मोत्यांचे दागिने फार मस्त मिळतात..तुळशीबाग स्वस्त आणी मस्त..

असले विषय चाघळण्यासाठी वेगळा धागा काढा.
विषयाचे गांभीर्य समजत नसेल तर वाचा आणि स्वस्थ बसा.
गुण दाखवू नका.

ओह सॉरी..
वरच्या चर्चेच्या अनुषंगाने लिहिलं होतं...तरी काढून टाकते प्रतिसाद..

नास्तिक लोकांनी आस्तिक लोकांच्या भावना पहिल्या समजून घ्याव्यात नंतर व्यक्त व्हावे.
मत व्यक्त च करायचे असेल तर भावना दुखवणार नाहीत अशा रीती नी व्यक्त व्हावे.
पूजेला ठराविक वस्तू च लागतात ऋनमेष. हे तुम्हाला माहीत असेल अशी आशा आहे.

गणपती ह्या देवाला पेशव्यांच्या काळात जास्त महत्व आले असे वाटते. नानासाहेब पेशवे हे गणपतीचे फार मोठे भक्त होते ( हो नानासाहेब म्हणजे तेच जेंव्हा मराठा सैन्य पानिपतात लढत होते तेंव्हा हे महाशय ताटामध्ये कोशिंबीर कुठे वाढावी आणि मीठ चटणी कुठे ठेवावी ह्याचा अभ्यास आणि ग्रंथ लिहीत होते. ह्यांच्या बाकीच्या आवडीच्या विषयांची माहिती इथे नको).पुण्यातली बहुतेक गणपती मंदिरे (सारसबाग) नानासाहेबांनीच बांधली आहेत. रघुनाथराव पेशवे ( काका मला वाचवा फेम) तर उजव्या सोंडेचा गणपती पूजत. उजव्या सोंडेचा म्हणे फार कडक असतो आणि शत्रूचा नाश (करणी) कसण्यासाठी पुजला जातो. त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये जेंव्हा ते कोपरगावला कैदेत होते तेंव्हा ते असले अघोरी उपाय करत..
बाकी पुण्यात देवाच्या मंडळांमध्ये पण मानपान असतो आणि कोणी कधी मूर्ती विसर्जित करायची ह्यावरून दरवर्षी होणाऱ्या वादांमुळे आमच्या सारख्या लोकांची प्रचंड करमणूक होते. तसेच इकडे मुंबईमध्ये इकडचा राजा तिकडचा राजा असले glamorized and glorified देव बघून तर अचंबित व्हायला होते. दरवर्षी तिथल्या सेवकांनी आलेल्या भक्तांना कसे बुकलून काढले , महिलांशी कसे असभ्य भाषेत बोलले तरी लोकांना तिथेच डोकं (माथा) टेकवायला जायचे असते हे पाहून तर हसू येते. बरं कोरोना काळात ह्यातल्या कोणत्या राजा नी कोविड सेंटर्स उभे करून लोकांना मदत केली? आता तर म्हणे भक्तांची भक्ती इतकी पेटलीये की महाराजांची राजमुद्रा ह्यांनी राजाच्या पायावर छापली
https://zeenews.india.com/marathi/mumbai/mumbai-news-police-complaint-against-lalbaugcha-raja-mandal-accused-of-insulting-rajmudra/746716. असो...
हिंदू लोकांमध्ये संतांप्रमाणे इष्ट देवता पण जातीनिहाय वाटून घेतल्या आहेत हे खरे आहे काय? जसे की गणपती पूजणारे फार काही ज्योतिबा, खंडोबा किंवा म्हसोबा अशा देवांच्या वाटेला जात नाही. हे मी नाही म्हणत. हे हवामान खात्याच्या संचालक मेधा खोले बाई म्हणतात. त्यांच्याच भाषेत संगायचे तर -
तू मराठा आहेस, खंडोबा, म्हसोबा असे तुझे रस्त्यावरचे देव आहेत. तू माझे घरातले देव बाटवले, असं म्हणत हातातली पर्स डॉ. मेधा खोले यांनी डोक्यात मारल्याचा आरोपही निर्मला यादव यांनी केला आहे.
https://www.esakal.com/pune/pune-news-dr-medha-khole-controversy-nirmala-yadav-70933
तर मित्रांनो तुमचे इष्टदेव निवडतानी पण काळजी घ्या. तुम्ही जो देव निवडाल तो तथाकथित हूच्च जातीचा फेवरेट निघाला आणि तुम्ही जर तथाकथित हूहूच्च नसाल तर तुमच्या डोक्यावर पण कोणाची तरी पर्स पडायची

भारतीय मीडिया आणि भारतीय विचारवंत ह्यान ची कोणतीच लिंक कोणत्याच विषयात विषयात दामलू जी देवू नका.
भारतीय विचारवंत आणि भारतीय मीडिया बदनाम आहे.
त्यांचा स्वार्थ बघूनच व्यक्त होतात.
निःपक्ष विचारवंत भारतात जन्म च घेवु शकत नाही.
आणि जगातील सर्वात बकवास मीडिया म्हणून भारतीय मीडिया एक नंबर ल आहे.
पेशव्यांनी काय केले सोडून ध्या.
आता ची जी स्थिती आहे त्या वर बोला
ह्या विषयात जागतिक विचारवंत काय म्हणतात ह्याची काही माहिती असेल तर पोस्ट करा..भारतीय विचारवंत ची नको

छत्रपती सोडले तर भारतातील एका पण व्यक्ती ला महापुरुष म्हणून मी तरी स्वीकारत नाही.
मला सर्व च बोगस वाटतात.
भारतीय मीडिया मध्ये एक पण दर्जा राखून नाही
छत्रपती च का?
तर त्यांनी त्यांनी समता,बंधुभाव फक्त लोकांस सांगितला नाही तर अमलात आणला.
सर्व धर्म समभाव,आस्तिक ,नास्तिक ह्यांच्या वर अमल केला .
अमलात आणला त्याचे बरे वाईट परिणाम त्यांनी अनुभवले.
आणि बाकी.
हजारो पुस्तक लीहळी, बुध्दी चे तारे तोडले पण त्या विचाराची अमलबजानी दुसऱ्याच्या डोक्यावर टाकली.
स्वतः विचार व्यक्त करण्या शिवाय बाकी काही काडी च काम केले नाही
आसाराम बापू आणि आदर्श विचारवंत ह्यांच्या मध्ये काहीच फरक नाही

पूजेला ठराविक वस्तू च लागतात ऋनमेष. हे तुम्हाला माहीत असेल अशी आशा आहे.
Submitted by Hemant 333 on 19 September, 2023 - 22:15
>>>>>

तुमच्या बजेट नुसार अ‍ॅडजस्ट करून देणारे भटजी असतात.
प्रत्येक प्रकारच्या पूजेला एक स्वस्तातला पर्याय असतो.
बहुधा आपण आजवर कधी या बाबतीत बार्गेनिंग केली नसावी Happy

ऋन्मेष - छंदीफंदी यांना उत्तरे देऊ दे कि.. तुम्ही कशाला त्यांच्या वतीने गाडा रेटताय...

बादवे - खूप दिवसांनी ऋन्मेष आशु जुगलबंदी पाहायला मिळाली... झुकरबर्ग आणि मस्क फाईट केज फाईट होणार आहे त्यापेक्षा भारी ....

मी उत्तर द्यायचं बंद केलं...

दोन दिवसांनी कधीतरी बघितलं तर
महागाई, नानासाहेब पेशवे, तुळशी बाग आणि बरच वेगळाच काही चाललेलं, म्हणून वाटलं आता भरकटला आहे...
सगळं वाचायला नाही जमलं...

<< काही महिन्यांपूर्वी मी बे एरियातील वारी विषयी एक लेख लिहिला होता. त्याला संमिश्र प्रतिसाद होता. काही जणांचा सूर होता वारी म्हंटल की ती सार्वजनिक ठिकाणी ( मुख्यत्वे रस्त्यांवरून) होते.
अर्थात त्या वेळी ही वारी सर्व नियमाचे पालन करून आणि अतिशय शांतता पूर्ण आणि पवित्र वातावरणात काढल्याने मला तो मुद्दा अत्यंत गौण वाटला किंबहुना उगाच खोड काढल्यासारखंही वाटलं.
पण नंतर काही काळाने गोपाळकाला निमित्ताने उठवणाऱ्या कित्येक मजली दही हंडया, सार्वजनिक गणेशोत्सवा पायी, दांडिया पायी अडविलेले, उखडलेले रस्ते, लाऊड स्पीकर्स मुळे विद्यार्थी, आजारी व्यक्ती ह्यांना होणारा त्रास, (काळ्या?)पैशांची होणारी बेसुमार उधळपट्टी आणि ह्या सर्वांच्या मागे असलेल्या राजकीय शक्ती आणि त्यांचे सत्ता संघर्ष हे बघितलं की मात्र मग मलाही प्रश्न पडला,
उत्सवाचे असे सार्वजनिकत्व असावे किंवा नाही? किंवा उत्सव आपापले स्वतःच्या घरापुरते ठेवावेत की सार्वजनिकरीत्या साजरे करावेत?>>

-------- बे एरियातला धागा आठवतो...

तो धागा येण्याच्या अगोदर, अनेक दशकांपासून, विविध कारणांनी लोक एकत्र येत असतात आणि आपल्या परिने उत्सव / सण साजरे करतात.शांतताप्रिय उपक्रम>>>" त्रास" वाटणारा हिडीस उपक्रम असा बदल तिन महिन्यांत झालेला नाही. प्रत्येक पिढी काही तरी कल्पकता आणायचा प्रयत्न करते...

इतरांना (आर्थिक, शारिरीक) त्रास न देता सण/ उत्सव साजरे करायला काहीच हरकत नाही. आवश्य करावे. उत्सव साजरा करतांना गणपतीच्या जन्माच्या कथा एकायच्या.
(अ) पार्वती यांनी शरिराच्या मळातून गणपती मुर्ती तयार केली, त्यांत प्राण फुंकले आणि बाप्पा जन्माला आले.
(ब) पार्वतीने गणपतीला रखवालदारीचे काम दिले होते. दारावर साक्षात भगवान शंकर आले , प्रवेश नाकारला गेला. शंकर देवाच्या क्रोधामुळे गणपतीला आपले नाक गमवावे लागले. नंतर चूक कळाली. आता काय ? मग पहिल्या दिसणार्‍या प्राण्याचे नाक बसविण्याचा उपाय सुचला आणि जगातल्या पहिल्या प्लॅस्टिक सर्जरी चा जन्म झाला.

अंगावरच्या मळापासून गणपती जिव कसा निर्माण करता येतो याला stem cell विज्ञान म्हणायचे का? प्लॅस्टिक सर्जरी साठी, गणपतीचे original कापलेले नाकच का नाही बसविले? असे प्रश्न बुद्धीमान देवाच्या नावाने उत्सव साजरा करणार्‍यांना पडावा अशी गणपती चरणी प्रार्थना. Happy

महागाई, नानासाहेब पेशवे, तुळशी बाग आणि बरच वेगळाच काही चाललेलं, म्हणून वाटलं आता भरकटला आहे>>>
धागा तेंव्हाच भरकटला जेंव्हा दबावाला बळी पडून धाग्यावरचे छायाचित्रे काढून टाकले. धाग्याच्या शिर्षकातच प्रश्न चिन्ह आहे म्हणल्यावर सगळ्या बाजूंनी उहापोह होणारच.

<< महागाई, नानासाहेब पेशवे, तुळशी बाग आणि बरच वेगळाच काही चाललेलं, म्हणून वाटलं आता भरकटला आहे>>>
धागा तेंव्हाच भरकटला जेंव्हा दबावाला बळी पडून धाग्यावरचे छायाचित्रे काढून टाकले. धाग्याच्या शिर्षकातच प्रश्न चिन्ह आहे म्हणल्यावर सगळ्या बाजूंनी उहापोह होणारच. >>

------ भरकटला आहे असे म्हणता येणार नाही.
महागाई - उत्सव साजरा करण्यासाठी वर्गणी गोळा करावी लागते. सर्व सोंग आणता येतात पण पैशाचे नाही. गॅस सिलेंडर / टमाट्याचे भाव आकाशाला भिडले आहेत, अशा आकाशाला भिडणार्‍या महागाईचा गोळा होणार्‍या वर्गणीवर विपरीत परिणाम होणार नाही का?

हिंदू लोकांमध्ये संतांप्रमाणे इष्ट देवता पण जातीनिहाय वाटून घेतल्या आहेत हे खरे आहे काय? जसे की गणपती पूजणारे फार काही ज्योतिबा, खंडोबा किंवा म्हसोबा अशा देवांच्या वाटेला जात नाही. हे मी नाही म्हणत. हे हवामान खात्याच्या संचालक मेधा खोले बाई म्हणतात. त्यांच्याच भाषेत संगायचे तर ->>>>>>> Rofl माझ्या सासरचे कुलदैवत खंडोबा आहे तर माहेरचे ज्योतिबा. जातो बरं का आम्ही तेथे. आणी देवात कशाला आलाय भेदभाव. प्रत्येकाची श्रद्धा असते, कुलदैवत असते. माझ्या आईच्या माहेरचे देवी श्री तुळजा भवानी ( जिचे पुजारी मराठा आहेत. )

खोले बाई मुर्ख आहे म्हणून बाकी हिंदु किंवा किंवा ब्राह्मण पण तसलेच आहेत किंवा असावे हे वाचुन मनोरंजन झाले. आता म्हणतील यात ब्राह्मण कुठुन ? तर पेशवेंचा उल्लेख झाला तिथेच समजले.

बाकी इंडोनेशिया, मलेशिया या मुस्लिम राष्ट्रात पण गणपती पुजला जातो. नानासाहेब तिकडे पण जाऊन आले का?

बाकी दहीहंडी हा प्रकार मला वै रित्या आवडत नाही. प्रचंड थर, बक्षिसे, स्पर्धा, राजकीय उतमात यातुन ते गोविंदा जायबंदी होऊन कायमचे पॅरालाईज होणे हे मोठे दुर्दैव आहे.

गोविंदा सण वा दहीहंडीची मूळ कल्पना वाईट नव्हती. आम्ही लहानपणी तीन ते चार थर लावायला महिनाभर रोज रात्री प्रॅक्टीस करायचो, प्रॅक्टीसच्या नावावर धमाल करायचो. आणि गोविंद्याच्या दिवशी तर आम्हाला बघायला सगळी बाल्कनी हाऊसफुल, आणि वरतून पाणी, फुगे, धमाल मस्ती, एकमेकांचे पाय खेचणे पण कधी कोणाला काही लागले नाही.. पण सार्वजनिक मंडळात थरांची जी स्पर्धा सुरू झाली तिने वाट लावली. त्यात राजकारणी उतरल्यापासून तर सत्यानाश झाला...

प्रत्येकाची श्रद्धा असते, कुलदैवत असते. माझ्या आईच्या माहेरचे देवी श्री तुळजा भवानी ( जिचे पुजारी मराठा आहेत. )>>>
पुजारी मराठा आहे हा उल्लेख कशासाठी? पुजारी हिंदू आहे किंवा त्याही पुढे पुजारी माणूस आहे एवढा उल्लेख पुरेसा नाही का? हेच चुकतं वैनी तुमचं

Pages