पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक समर्थ रामदास

Submitted by Kadamahesh on 11 September, 2021 - 15:45

पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक समर्थ रामदास
"वार्ता विघ्नाची" म्हणजे अफजल खान विजापूरहुन निघाला. सुखकर्ता दुःखहर्ता......ही गणपतीची आरती संपूर्ण महाराष्ट्रात म्हंटली जाते.हि आरती समर्थ रामदास स्वामी यांनी रचली आहे.गणपतीची संकष्टी चतुर्थी करणारा गणेशभक्त प्रत्येक घराघरांत असणारच. देवादिकांसह संतांनी देखील सर्व कार्यात गणपती प्रथम पूजला आहे.भाद्रपद शु. ४ ते भाद्रपद शु.१४ हा गणेशोत्सवाचा कालावधी आहे.प्रचलीत गणेशोत्सवाच्या पूर्वी श्री समर्थ रामदास स्वामींनी हा उत्सव सुरू केल्याची नोंद इतिहासात आहे. ह्या गणेशोत्वाला इ.स.२०२० साली ३४४ वर्ष पूर्ण होतं आहेत.
समर्थे सुंदरमठी गणपती केला ! दोनी पुरुष सिंदूर वर्ण अर्चिला !!
सकळ प्रांन्तासी मोहछाव दावीला ! भाद्रपद माघ पर्यंत !!
समर्थ रामदास स्वामी हे दासबोधाचे लिखाण करण्याकरिता शिवथरच्या घळीत आले.दहा वर्षाचे शिवथर घळीचे वास्तव्य पूर्ण झाले तेव्हा १६५८ साली समर्थ नाशिकला कुंभमेळ्याला जाण्याकरिता शिवथरच्या घळीतून बाहेर पडले. त्यावेळी आनंद संवत्सर सुरू होते. घळीत असताना त्या॑नी महाराष्ट्रावर अफजलखान नावाचे एक विघ्न चालुन येत आहे हि बातमी ऐकली. महाराष्ट्रभर संचार करणाऱ्या समर्थांच्या शिष्यांनी हि वार्ता त्यांच्या कानावर टाकली.त्यावेळी अष्टविनायकांतला पहिला गणपती ज्याचे नाव वक्रतुंड आहे. गणपतीच्या विषयात ज्यांचे अज्ञानी विचार आहेत त्यांकरिता हा वक्रतुंड आहे.(ज्ञा .) लंबोदर सर्व चराचर सृष्टी तुझ्या उदरात आहे (ए. म.) श्री समर्थांचा गणपती हा सरळ सोंडेचा आहे. त्याची स्तुति करून हि प्रार्थना केली.तीच हि गणपतीची सुप्रसिद्ध असणारी आरती. या आरतीच्या पहिल्या चरणात अफजलखानाच्या स्वारीचा उल्लेख "वार्ता विघ्नाची" ह्या शब्दात आपणांस स्पष्ट आढळतो.
वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची !
हा सुंदरमठ शिवकालीन शिवथर प्रांतात आहे.याचा उल्लेख छ्त्रपती शिवाजी महराजांच्या अस्सल मोडी पत्रात आढळतो.त्याच प्रमाणे श्री समर्थ सेवक कल्याण स्वामी यांच्या पत्रात तसेच श्री समर्थ रामदास स्वामी आणि शिवराय यांच्या मध्ये असणारा दुवा समर्थ शिष्य महाबळेश्वरकर भट यांच्या ही पत्रात आढळतो.तोच हा सुंदरमठ ज्याचे हल्लीचे प्रचलित नाव रामदास पठार असे आहे.सुंदरमठ शिवथर घळ (रामदास पठार) ही दासबोधाची जन्मभूमी आहे. शिवकालीन सुंदरमठाशी असणारी सर्व ऐतिहासिक कागद पत्रांचे पुरावे हया स्थानाशी तंतोतंत जुळून येतात. इथेच सन १६७५ साली छ. शिवाजी राजे आणि समर्थ रामदास स्वामी दोघांनी मिळून हा गणेशोत्सव भाद्रपद शु. !!४ ते माघ शु.!! ५ गणेश जयंती पर्यंत पाच महीने साजरा केला. हा गणपती कोणत्याही मंडळाचा राजा नाही तर हा हिंदवी स्वराज्य संस्थापक छ. शिवाजी राजांचा गणपती आहे. या गणेशोत्सवाचे पहिले वर्गणीदार राजे शिवछत्रपती आहेत. ज्यांनी त्या साली १२१ खंडी धान्य हया उत्सवाला देणगी दिली. त्याचा उल्लेख इतिहासात खाली दिलेल्या लेखात सापडतो
समर्थे शिवराजासी आकारामुष्ठी भिक्षा मागो धाडिली ! शिवराज म्हणे समर्थे माझी परीक्षा मांडली !!
आकारा आकरी खंडी कोठी पाठविली ! हनुमान स्वामी मुष्ठी लक्षुनिया !!
११ x ११ म्हणजे १२१ एवढे खंडी धान्य राजांनी या उत्सवाला दान दिले. या पाच महीने सुरू असणाऱ्या उत्सवाला भेट देऊन गणपतीचे दर्शन विजयादशमीच्या दिवशी घेतले असे आनंदवनभुवन या समर्थ रचित काव्यात उल्लेखले आहे. हा गणेशोत्सव श्री समर्थ रामदास स्वामींच्या साक्षात्काराचा अनुभव आहे. श्री गणपतीच्या आरतीच्या शेवटच्या चरणात रामदास स्वामींनी गणपतीला अफजलखानाच्या या स्वराज्यावर आलेल्या संकटांपासून शिवाजी राजांना सहीसलामत सोडवावे अशी प्रार्थना केलीली आहे ...
दास रामाचा वाट पाहे सदना ! संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सूरवरवंदना !!
छत्रपती शिवाजी राजांनी दक्षिण दिग्विजयाला जाण्यापूर्वी जेव्हा समर्थाना भेट दिली तेव्हा १८ वेगवेगळ्या प्रकारची शस्त्रे आणि एक पांढरा घोडा अर्पण केले .त्यातील फक्त घोडा ठेऊन इतर अठरा शस्त्रे समर्थानी महाराजांना परत केली अशी नोंद ऐतिहासिक पत्रात मिळते. गणपतीची आरती १६५८ ला समर्थांनी प्रार्थनापूर्वक लिहिल्यानंतर समर्थ शिवाजी राजांना राज्याभिषेक होई पर्यंत सन १६७४ पर्यंत थांबले, नंतर १६७५ ला गणेशोत्सव केला आणि १६ सप्टेंबर १६७६ ला सज्जनगडावर वास्तव्यकरिता गेले. हाच महाराष्ट्रातील पहिला गणेशोत्सव जो स्वराज्य निर्माण झाल्यानंतर छ. शिवाजी राजे, कल्याणस्वामी आणि समर्थ रामदास स्वामी यांनी सुरू केला.
आज महाराष्ट्रात ऐतिहासिक सार्वजनिक गणेशोत्सवाचे जे पुरावे सापडतात ते हया उत्सवानंतरचे आहेत. ह्या उत्सवाची प्रेरणा घेऊन श्री क्षेत्र शेंदूरमळई गुरुकुल येथे २००९ ला गणेशोत्सव सुरू केला. व २०१० ला सुंदरमठ रामदास पठारावर पुन्हा नव्याने पाच दिवसाचा सुरू झाला आहे. आपण आपल्या सार्वजनिक गणेशोत्सवात ही माहिती जरूर पुरवावी. या माहितीचा संबंध कोणत्याही जात, धर्म ,पंथ ,सांप्रदाय,पक्ष ,संघटना यांच्याशी नसून ऐतिहासिक घटनांवर आधारित आहे
रामदास पठार - सुंदरमठावर येण्याकरीता महाड-पुणे रस्त्यावर वरंधाघाटात माझेरी जवळ कमानी खालून डाव्या हाताने सरळ पुढे ५ कि.मी. मठाच्या माळावर शेवट पर्यंत डांबरी रस्त्याने यावे.निवास, भोजन व्यवस्था विनामूल्य होऊ शकते. हे ठिकाण कोकणात महाड तालुक्यात असून येथूनच कोकणातील गणेशोत्सवाला बहर आला आहे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख. नवीन माहिती मिळाली.

प्रश्न विचारलेले चालत असतील असे समजुन नम्रपणे मला पडलेले काही प्रश्न इथे विचारत आहे. त्यांची उत्तरे मिळतील अशी आशा.

या पहिल्या "सार्वजनीक" उत्सवाची प्रेरणा घेऊन किती इतर मठांनी/ संस्थांनी/ वगैरे "सार्वजनीक" गणेशोत्सव चालू केला?
या पहिल्या "सार्वजनीक" उत्सवाची प्रेरणा घेऊन किती जनजागृती झाली? मग ती शत्रुविरुद्ध असेल किंवा अन्याअयाविरुद्ध असेल.
या पहिल्या "सार्वजनीक" उत्सवामुळे, एखाद्य ठिकाणी हिंदु लोक एकत्र जमु शकत नव्हते ते जमु लागले व त्यांनी एखादी क्रांतीकारक गोष्ट केली याबद्दल आणखी वाचायला नक्कीच आवडेल.

१२१ खंडी धान्य दिले हे वाक्य आधी नुसते १२१ व परत ११ गुणिले ११= १२१ असे दोनदा का आहे? म्हणजे ११ गुणिले ११ वाले १२१ या व्यतिरिक्त आणखी कुठले दुसरे १२१ वाचकाने समजु नये असे आहे का? म्हणजे नक्की कारण कळले तर बरे होईल.

ह्या उत्सवाची प्रेरणा घेऊन श्री क्षेत्र शेंदूरमळई गुरुकुल येथे २००९ ला गणेशोत्सव सुरू केला. व २०१० ला सुंदरमठ रामदास पठारावर पुन्हा नव्याने पाच दिवसाचा सुरू झाला आहे.
>>
तर असा हा "पहिला" - "सार्वजनीक" उत्सव जो तुमच्या लेखाप्रमाणे १६७५ ला सुरु झाला, त्यानंतर थेट २००९/२०१० मधे "नव्याने" कसा काय परत सुरु झाला?
या पहिल्या सार्वजनीक उत्सवात सामान्य जनतेतले कुणी सहभागी नव्हते का? पहिले वर्ष सोडता पुढच्या वर्षाची देणगी मिळाली नाही का? नक्की काय कारण होते फक्त एकदाच होऊन नंतर बंद पडण्यात?

<< श्री गणपतीच्या आरतीच्या शेवटच्या चरणात रामदास स्वामींनी गणपतीला अफजलखानाच्या या स्वराज्यावर आलेल्या संकटांपासून शिवाजी राजांना सहीसलामत सोडवावे अशी प्रार्थना केलीली आहे ... >>

------ अशी कुठलिही प्रार्थना केली नसती तरी शिवाजीराजांनी अफझलाचा पराभव केलाच असता. रामदासांनी प्रार्थना केली काय आणि नाही काय याने काहीही फरक पडणार नव्हता.

कथा रचणार्‍यांची कमतरता नाही आहे. शिवाजी महाराजांचे महत्व कमी करण्यासाठी आणि त्यांच्या दैदिप्यमान कारकीर्देत उगाचच टिनपाट/ पांचट / अर्थ नसलेल्या कथा घुसडवून त्यांच्या कामाला कमीपणा आणायच्या प्रयत्नांच्या सुनियोजित कटाचा हा भाग आहे. मग पुढचा थापाड्या कथेला पुढे सरकत हळूच रामदासांना शिवाजीमहाराजांचे गुरु बनवतो...

<< हाच महाराष्ट्रातील पहिला गणेशोत्सव जो स्वराज्य निर्माण झाल्यानंतर छ. शिवाजी राजे, कल्याणस्वामी आणि समर्थ रामदास स्वामी यांनी सुरू केला. >>
----- याला काही आधार आहे का ?

<< दासबोधाचे लिखाण करण्याकरिता शिवथरच्या घळीत आले. >>
------ तो शिवथर घळीचा घोळ संपला का?
खरी (जिथे दासबोध लिहीला गेला असे आपण मानतो ) आणि खोटी कुठली ? मायबोलीवर एक लेख आलेला आहे त्यावर... खर्‍या खोट्याची चर्चा /वाद पण झाले आहेत. वादाच्या मुळाशी अर्थकरण आहे का?

नमस्कार, तुम्ही संपूर्ण लेख वाचल्याबद्दल धन्यवाद.तुम्ही विचारलेल्या प्रश्नांचा मी आदर करतो. त्याच समाधान खाली देत आहे.
समर्थानी गणेशाला नवस केला होता तो नवस म्हणजे सुखकर्ता दुखहर्ता आरती. ह्यामागील कारण म्हणजे अफजलखान नावाचं विघ्न स्वराज्यावर चालून आलं होतं. ह्या संकटातून शिवाजी राजांच रक्षण कर. अफजलखानचा वध सन १६५९ साली झाला. त्यावेळी मुघल राजवट असल्याने हिंदूंनी जास्त संख्येने जमाव करून उत्सव करणं शक्य नव्हतं समर्थांची राहण्याची जागा सुद्धा गुप्त होती. म्हणून ह्या नवसाची पूर्तता करण्यासाठी समर्थाना शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापर्यंत थांबाव लागलं.

हा गणेशोत्सव राज्यशके म्हणजे राज्याभिषेकानंतर झाला.
ह्या गणेशोत्सवाला सार्वजनिक का म्हणायचं तर हा
"सकल प्रांतासी मोहछव दावीला! भाद्रपदमाघ पर्यंत" ह्यात सर्व सामान्य लोकांचा समावेश होता. हा उत्सव पाच महिन्यापर्यंत चालत होता. समर्थाना राजश्रय असल्याने ह्या उत्सवाचे देणगीदार स्वतः शिवाजी महाराज होते. हा उत्सव महाराष्ट्रात विशेषतः कोकणप्रांतात रुजला आहे हे वास्तव आहे.आजही महाराष्ट्रभर सुखकर्ता दुखहर्ता ही आरती म्हटली जाते म्हणजेच त्याचा मूळ स्रोत हा समर्थ व शिवाजी महाराजांनी केलेला हा गणेशोत्सव आहे. म्हणून हा गणेशोत्सव बंद झाल्यापेक्षा लोकांच्या घराघरात, गल्लीत पोहचला असं म्हणणं योग्य राहील.

समर्थ ह्या मठावर वास्तव्यास चाफळ ह्या ठिकाणी श्रीरामाच्या मूर्ती स्थापन केल्यानंतर (सन १६४८) आले.ह्या ठिकाणी समर्थांचं वास्तव्य २८ वर्षे झालं.समर्थानी हा गणेशोत्सव सन १६७५ साली सुंदरमठावर केला. त्यानंतर शिवाजी महाराज दक्षिणदिग्विजयाला सुंदरमठावर भेट घेऊन निघून गेले. शिवाजी महाराज नसताना समर्थ शिष्य दिवाकर गोसावी याचं राजकारण व कलह यावरून समर्थानी ही जागा सोडण्याचा निर्णय केला. महाराजांनी समर्थांची व्यवस्था सज्जनगडला केली. समर्थ सज्जनगडला सन १६७६ ला गेल्याने सुंदरमठावर गणेशोत्सव मर्यादित न राहता स्वराज्याचा प्रांतात घराघरात पोहचला.
समर्थांच्या पश्च्यात सुंदरमठ ही जागा समर्थ संप्रदायमध्ये अपरिचित होती. तिचं संशोधन इतिहास अभ्यासक श्री अरविंदनाथ गोस्वामी यांनी सन २००७ साली आपल्या ३६ वर्षांच्या अभ्यासानंतर ऐतिहासिक पुराव्यानिशी सिद्ध केलं
ह्या जागेचं संशोधन करीत असताना, समर्थानी केलेल्या गणेशोत्सवाची नोंद मिळाली. ह्या उत्सवाची प्रेरणा घेऊन श्री क्षेत्र शेंदूरमळई गुरुकुल येथे २००९ ला गणेशोत्सव सुरू केला. व २०१० ला सुंदरमठ रामदास पठारावर पुन्हा नव्याने पाच दिवसाचा सुरू झाला आहे.

१२१ खंडी धान्य हे एका वेळेस दिलं आहे. दुसरा उल्लेख हा खालील ओवीचा अर्थ म्हणून दिला आहे.
शिवराजासी अकरा मुष्टी भिक्षा मागो धाडीली! शिवराज म्हणे माझी परिक्षा! समर्थे मांडिली!अकरा अकरी खंड्या कोठी पाठविली! हनुमान स्वामी मुष्टी लक्षूनिया!!

"उदय" सर्व सांगितलेल्या माहितीला ऐतिहासिक आधार आहे. अभ्यास समजून न घेता आपलं मत पूर्वीच बनवलं असेल तर त्यावर काही करता येत नाही.

समर्थे सुंदर मठीं गणपती केला! दोन्ही पुरुष सिंधुरवर्ण अर्चिला!
सकल प्रांतासी मोहछव दावीला! भाद्रपदमाघ पर्यंत!! (समर्थ प्रताप ८ x २).
शिवराजासी अकरा मुष्टी भिक्षा मागो धाडीली! शिवराज म्हणे माझी परिक्षा!
समर्थे मांडिली!अकरा अकरी खंड्या कोठी पाठविली! हनुमान स्वामी मुष्टी लक्षूनिया!!
(संदर्भ समर्थ प्रताप ८ x ३)

कोड नलवडा मौजे पारमाची ता।सिवतर येथे श्री येऊन राहिलियाउपवरी रामनगर पेठ वसवावयाची आज्ञा केली आणि बारा वर्षे पावेतो दिवाणास हासील माफ म्हणून कौल देवीला (संदर्भ श्रीसंप्रदायाची कागदपत्रे लेखांक १३)

श्री च्या दर्शनास पारमाचीस सिवथरप्रांती नवलवाडियाचा कोड तेथे जाभंळीच्या चउथरीयावर श्री संतोषरूप बैसले होते. (संदर्भ श्रीसंप्रदायाची कागदपत्रे लेखांक ५०)

तुम्ही आम्हांस येण्याविषयी लिहीले तर श्री समर्थ दहा संवत्सरपर्यंत कोठे न जाता सर्व ग्रंथास आरंम्भ केला. आणि सांगितले की श्रीकडील हरयेकविशी बोभाट येऊ नये म्हणून आम्हा सांगितले.आणि सर्व मंडळीस आज्ञा की तुम्ही श्री चे उत्सवाची (भिक्षा) करून आमचे स्वाधीन करावी. म्हणून सर्वांस सांगितल्या प्रमाणे सर्व मंडळी निघून गेली आणि आपण व कल्याण गोा व चिमणाबाईअक्का व अनंतकवी यांस बरोबर घेऊन एकांत स्थानी शिवथरचे घळीत जाऊन बसले. तुम्ही श्री महाबळेश्वराचे देवालयाचे काम चांगले रितीने करवावे.भास्कर गोा आले म्हणजे मी येक दिवसाचे अवकाशे येतो हे आशीर्वाद.
(शिवकालीन पत्रसार संग्रह पान नंबर २७७)

श्री रामदास गोसावी सिवतरी राहतात सांप्रतकाही दिवस गडावरी राहावया किलेयास येतील त्यांस तुम्ही गडावरी घेणे घर जागा बारा करून देणे जे लोक याचे सेवेचे बा। असतील ते देखील गडावर घेणे असतील तोवरी हरयेकविसी खबर घेत जाणे यास सेवेसी अंतर पडो नेदणे उतरू म्हणतील तेव्हा उतरून देणे. (संदर्भ श्रीसंप्रदायाची कागदपत्रे लेखांक १५ व १६)

राजश्रीं छत्रपती यजमान कर्नाटकातुन स्वारी करून श्री च्या दर्शनास सज्जनगडासी आले ते समई श्री स प्रार्थनायुक्त विनंती केली की श्री नी पूर्वी बिरवाडीचे मुकामी श्री सिवथरी प्रांती असता मधे माहानदी माहापूर आणि अकस्मात रात्री पलंगापासी येऊन चमत्काररूपे दर्शन दिल्हे कितेक चित्ती होतें ते चि आसीर्वाद दिल्हे. दुसरे दिवसी सिवथर प्रांती सुंदर मठी भेट जालीं तेथे………………... . (संदर्भ श्रीसंप्रदायाची कागदपत्रे लेखांक २६).

समर्थे चाफळ आधिष्ठानीं श्रीराम संस्थापिले । मग सुंदरमठी समर्थांचे रहवे जालें ।
नाना गिरीकंधरी दास विहरे निर्मिले । नाना मठ करविले लोकोद्धारा ।।२ ।। (समर्थ प्रताप समास ७ )

श्री चे पेठेचे पत्र दुश्य करावे कार्येकर्ते नीती वंदावी । श्री कार्याशी अति तत्पर ऐशा पुरुषाच्या योगे धर्मवृद्धी आहे । धर्म वृद्धीने राज्यवृद्धी आहे. ।।११।। (संदर्भ श्रीसंप्रदायाची कागदपत्रे लेखांक ४३)

खणाळा मध्ये जाउनी राहे। तेथे कोणीच नाही पाहे।। सर्वत्रांची चिंता वाहे। सर्वकाळ।।
(संदर्भ दासबोध १५ x २ x २३) किंवा
समर्थे पर्वती केले एक गुप्त सदन। प्रसंगे ठेवावया देवार्चन।।
सूर्य प्रकाश उदक सन्निध उर्ध्व गमन। मार्ग सोपान करून जावे।।
(संदर्भ समर्थ प्रताप ग्रंथात (७ x ४))

गणपतीचे स्त्रोत्र नारायण सुर्याजी ठोसर (ते आपले रामाचे दास) यांनी लिहीले आहे हे मला माहित आहे . पहिला सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक कोण ? हे अनुत्तरितच रहाते.

थोडे वाचल्यावर बाळ गंगाधर टिळक यांचेच नाव मिळते... आणि गुगलल्यावर भाऊ रंगारी यांचे नाव पुढे येते (त्यावरुन पुण्यात महापालिकेत वादही झाला होता १२५ वे वर्ष ). आता पुण्यात पहिला सार्वजनिक , कोल्हापुरांत पहिला सार्वजनिक, साकेगावी पहिला सार्वजनिक असे काही असेल तर माहित नाही.

<< आजही महाराष्ट्रभर सुखकर्ता दुखहर्ता ही आरती म्हटली जाते म्हणजेच त्याचा मूळ स्रोत हा समर्थ व शिवाजी महाराजांनी केलेला हा गणेशोत्सव आहे. >>

------ सुखकर्ता आरती म्हटल्या जाते याचा संबंध थेट रामदास (व शिवाजी महाराज) हे स्रोत आहे हे बादरायण नसले तरी अगदीच ठिसाळ स्पष्टीकरण आहे. गणपतीच्या अनेक आरत्या म्हटल्या जातात, किमान ८ - १० तर होतातच... लहान मुले तर कधी हे थांबेल आणि प्रसाद मिळेल याचीच वाट पहात असतात.... अचानक मग हिंदीमधून पण आरत्यांना सुरवात होते. अनेक लोक स्वत:ची कल्पकता वापरून काहीतरी नाविन्य आणतात.

आता हिंदी मधे संत कबिर यांचे भजन गायले म्हणजे कबिर हा स्रोत होत नाही. Happy

उदयजी तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं समाधान झालं का? समर्थानी गणेशोत्सव केला. तो कौटुंबिक नव्हता, प्रांतातील सर्व माणसं त्यात सहभागी होते. त्यावेळी तो भाग छत्रपती यांच्या ताब्यात होता.
हा उत्सव शिवाजी महाराजांना मान्य होता. त्यांनी त्या उत्सवासाठी देणगी दिली होती. ह्या उत्सवाला तुमच्या व्याखेनुसार सार्वजनिक आत्ता म्हणता येईल का? आपल्या राजाच्या ह्या कृतीने व समर्थ रामदास याचा समाजावर काहीच परिणाम नसेल झाला का?
महाराष्ट्रात सुखकर्ता दुखहर्ता आरती सर्व ठिकाणी म्हटली जाते. ती समर्थानी लिहिली आहे आणि कोकणात गणेशोत्सव इतर भागापेक्षा जास्त प्रमाणात आढळतो ह्या वास्तविकतेला तुम्ही स्वीकारता का?

इतिहास या सदराखाली लिहिले आहे म्हणून लिहितेय; अन्यथा चालू द्यात म्हणून गप्प बसले असते.
येथे दिलेले पुरावे ऐतिकासिक पुराव्यात मोडत नाहीत.
एका व्यक्ती/ संस्थेचा इतिहास लिहिण्यासाठी त्याच व्यक्तीच्या / संस्थेच्या कागदपत्रांचा पुरावा सादर करणे हे फारच मजेशीर आहे.
कृपया योग्य पुरावे द्या.
संबंधित लेखकाने काही वर्षांपूर्वी हेच सगळे माबो वर लिहिलेले. आता इथे तिथे चार शब्द बदलून पुन्हा.

"अवल" शिवकालीन पत्रसार संग्रह , श्री संप्रदायचे कागदपत्रे आणि गिरीधर स्वामी यांचा समर्थ प्रताप, समर्थकृत आनंदवनभुवनी हे ऐतिहासिक कागदपत्रात मोडत नाही का? हे कोणी व्यक्तीने वा संस्थानी घरी बनवली आहेत का? शिवाजी महाराजांनी समर्थ तेथे राहिल्याकारणाने दिलेला कौलनामा ज्यावर सर्व शिक्के आहेत हा खोटा आहे का? इतिहासकार गजानन मेहेंदळे यांनी त्या कौलंनाम्याची कागदपत्रे तपासली आहेत. हे सर्व पत्र इतिहास संशोधन मंडळात असतात व आहेत माझ्या जन्माच्या अगोदर पासून. त्याचा संदर्भ दिला की ते अचानक ऐतिहासिक पुराव्यात मोडत नाहीत का? समर्थांचे वंशज श्री सु. ग. स्वामी यांनी सुद्धा हे सत्य मान्य केलं आहे. ते सुद्धा वरती जोडलेलं आहे.

एखाद्याला कुठल्याही गोष्टीबद्दल जिव्हाळा असेल तर ती जरुर लिहा. माहिती इतरांना द्या. पण ते करताना हेच पहिले, यांनीच सुरवात केली हा आग्रह का?

विघ्नाची वार्ता स्वामींनाही मिळाली असणार, प्रार्थानाही केली असेल पण ती केली नसती तर राजांना कळले नसते का? यश मिळाले नसते का?

आपले मोठेपण ठसवायचे असले प्रयत्न केविलवाणे वाटतात. तुम्ही मोठे असालही पण ते इतरांना सिद्ध करु द्या. तुम्ही तुमच्या कामातुन मोठे व्हा.

ह्यापूर्वीची सार्वजनिक गणेशोत्सवाची ऐतिहासिक नोंद तुम्हाला माहिती आहे का? आम्ही ही माहिती दिली आहे तुम्ही त्या जागेला भेट देऊन व कागदपत्र तपासून आपलं मत सांगा.
समर्थ आणि शिवाजी राजे यांची बेरीज करू नका. हा विषय समर्थ यांच्या जीवनात घडला तो त्यांच्याशीच जोडायचा.शिवाजी राजांचा पराक्रम हा त्यांचा स्वतंत्र विषय आहे .येथे गणेशोत्सव सुरु केला हे निश्चित आणि आरती चा सम्बंध अफजलखान याच्या स्वारीशी आहे.याला समर्थ यांच्या जीवनातील सनावली आणि घटना यांचा सम्बंध पाहिला असता लक्षात येते. शिवाजी महाराज आणि समर्थांची भेट खूप उशिरा झाली हे निश्चयचा महामेरू ह्या समर्थ पत्रातून समजतं.
आम्ही वारकरी आहोत त्यामुळे संत आम्हाला मान्य आहेत.डोळे झाकून दुर्लक्ष होणार नाही. पण जे दिसले ते मांडले. हे सत्य कोण स्वीकारेल हे सांगता येणार नाही.

ठिक आहे. माहिती मिळाली. कधी त्या भागात जाणे झाले तर मठाला भेटही देता येईल. बाकी कागदपत्र् वगैरे तपासुन बघण्याइतपत रस नाही.. आजवर खुप स्थळांना भेटी दिल्यात. भारताचे शेवटचे गाव वगैरे बोर्ड बघुन तिथे चहाही घेतला
पण कुठेही कागदपत्रे वगैरे भानगडी केल्या नाहीत...

विघ्नाची वार्ता स्वामींनाही मिळाली असणार, प्रार्थानाही केली असेल पण ती केली नसती तर राजांना कळले नसते का? यश मिळाले नसते का?

आपले मोठेपण ठसवायचे असले प्रयत्न केविलवाणे वाटतात. तुम्ही मोठे असालही पण ते इतरांना सिद्ध करु द्या. तुम्ही तुमच्या कामातुन मोठे व्हा.
नवीन Submitted by साधना on 13 September, 2021 - 08:05
>>
+१११११११

महेश कदम असूनही इतके आहारी जाऊन नारायण ठोसरची तळी उचलत आहेत यावरून किती ब्रेन वॉश झाला असेल याची कल्पना येते. त्यांच्याच संस्थेचे लिखाण ग्राह्य मानून हेच पाहिले दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत.

स्वराज्यावर अफजल खान चालून आला म्हणून आरत्या लिहून हिंदूंना एकत्र करण्यासाठी वापर झाला म्हणता? (अशाच ओम फट स्वाहा समुदायाच्या पऊचाट कल्पनेने एक मफिविर थेट स्वातंत्र्यवीर झाला Biggrin )
- मग हिंदूंना आरत्या फॉरवर्ड करण्यासाठी फेसबुक, व्हॉट्सॲप, ट्विटर वगैरे पद्धत वापरत होते का ठोसर..?
- की त्याकाळी सुद्धा कुजबुज मोहीम अस्तित्वात होती Biggrin ?
- अफजल खान स्वराज्यावर चालून येतोय हे स्वप्नात दिसलं की भविष्य पण कळत होते की तिकडचेच हेर होते..?

या आरतीच्या पहिल्या चरणात अफजलखानाच्या स्वारीचा उल्लेख "वार्ता विघ्नाची" ह्या शब्दात आपणांस स्पष्ट आढळतो.
वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची !

तू सुखकर्ता आहेस दुःख हरता आहेस, विघ्नाची वार्ता सुद्धा कानी पडू देत नाहीस. हा त्याचा अर्थ.

आता केवळ वार्ता विघ्नाची या दोन शब्दांवरून अफजलखानाची स्वारी अथवा कुठलेही स्पेसिफिक संकट येत आहे असा अर्थ निघत नाही. हा फारच त्रोटक संदेश होतो.
त्यासाठी आधी जी व्यक्ती हा संदेश देत आहे आणि ज्या व्यक्तीला तो द्यायचा आहे यांच्यात आधी ठरलेले असावे की अमुक एका स्पेसिफिक संकटाची (जसे अफजल खान चाल करून येण्याची) शक्यता आहे. त्यावर ही व्यक्ती नजर ठेऊन असेल. त्यासाठी ती योग्य स्थळी असायला हवी. आणि मग तसे घडताना दिसत असेल तेव्हा वर वर दिसणाऱ्या साध्या संदेशामध्ये ठराविक ठिकाणी ठराविक शब्द लिहुन संकटाची चाहुल देण्यात येईल.

अफजल खान किंवा विजापुरहुन कुणी चाल करून येण्याची शक्यता असेल तिथे शिवाजी राजांनी आपल्या सैन्यातील गुप्तहेर नेमले असतील जे कोण येत आहे, किती माणसांसकट येत आहेत, केव्हा निघाले इत्यादी माहिती देतील. एवढ्या त्रोटक संदेशावर विसंबून राहणार नाही कोणी.

१६५८ साली समर्थ नाशिकला कुंभमेळ्याला जाण्याकरिता शिवथरच्या घळीतून बाहेर पडले. त्यावेळी आनंद संवत्सर सुरू होते. घळीत असताना त्या॑नी महाराष्ट्रावर अफजलखान नावाचे एक विघ्न चालुन येत आहे हि बातमी ऐकली. महाराष्ट्रभर संचार करणाऱ्या समर्थांच्या शिष्यांनी हि वार्ता त्यांच्या कानावर टाकली.

अफजलखान विजापूरहून निघाला तेव्हा आलेलं स्वराज्यावरील संकट या घटनेचा समर्थ आनंदवनभुवनी या काव्यात सुद्धा उल्लेख करतात

विजापूरहून प्रतापगड पर्यंत येताना हिंदवी स्वराज्यावर केलेला अत्याचार

स्वधर्मा आड जे विघ्ने |ते ते सर्वत्र उठिली | लाटीलीं कुटीली देवी | दापिली कापिली बहु ||९ ||
विघ्नांच्या उठिल्या फौजा | भीम त्यावरी लोटला | धर्डीली चिरडीली रागे |रडवीली बडविली बळे ||१०||
हाकीली टाकिली तेणे | आनंदवनभुवनी |हांक बोंब बहु झाली | पुढे खतल मांडिले ||११ ||

तो थांबवण्यासाठी खुद्द शिवाजी महाराज सज्ज झाले :

खोळले लोक देवाचे | मुख्य देवची उठिला |कळेना काय होते रे | आनंदवन भुवनी ||१२ ||

स्वराज्यावरील म्हणजेच शिवाजी महाराजांवर आलेलं संकट. आणि या निर्वाणाच्या प्रसंगातून राजांच रक्षण कर. हे संकट पाहून गणपतीस प्रार्थना केली ती म्हणजे सुखकर्ता दुःखहर्ता हि समर्थकृत आरती.

जे साक्ष देखिली दृष्टी |किती कल्लोळ उठीले|विघ्नांना प्रार्थिले गेलो | आनंदवनभुवना ||८ ||

पुढे अफजलखान याला प्रतापगडाच्या पायथ्याशी मारला त्याच वर्णन

रामवरदायीनी माता |गर्द घेउनी उठिली | मर्दिले पूर्वीचे पापी | आनंदवनभुवनी ||४१||
प्रतेक्ष चालिली राया | मूळमाया समागमे |नष्ट चांडाळ ते खाया | आनंदवनभुवनी || ४२ ||
भक्तांसी रक्षिले मागे | आतां ही रक्षिते पहा | भक्तांसी दिधले सर्वै | आनंदवनभुवनी ||४३ ||
स्वराज्यावर आलेले संकट म्हणून समर्थानी आरती केली आहे. अफजल खान वधाच्या वेळी समर्थ आणि शिवाजी महाराजांची भेट झाली नव्हती. अफजल खानाचा वध हा शिवाजी राजे यांचाच पराक्रम आहे. त्याला मारण्याकरिता महाराजांनी युक्तीने त्याचा वध केला. समर्थ आणि शिवाजी महाराज एकाच काळात असल्याने घटना एक असून समर्थांच्य आणि शिवाजी महाराजांच्या जीवनात त्या घटनेचा उल्लेख आहे.

कदमसाहेब, एवढा अगाध अभ्यास छत्रपतिंच्या सामर्थ्यावर केला असता तर असं छत्रपतिंच्या कर्तृत्त्वाचे दाखले देत एका पळपुट्या माणसाला पर्यावरणास घातक ठरणार्‍या उत्सवाचा आद्य पुरुष(?) ठरवण्याची वेळ आली नसती. बरं एवढं करुन त्याचा उपयोग काय...? या उपद्व्यापामुळे नक्की रंगारींचं नाव पुसलं जाणार आहे की टिळकांचं..??

ता.क. काल पासुन मित्रपरिवारातील त्या तसल्या बैठकांना हजेरी लावणार्‍या काहींनी व्हाटसप वर याच आशयाचे फॉर्वर्ड्स पाठवणं सुरु केलं आहे... हा योगायोग नसावा Wink

महाराष्ट्रभर संचार करणाऱ्या समर्थांच्या शिष्यांनी हि वार्ता त्यांच्या कानावर टाकली >>> त्यांच्या शिष्यांनाही जसे कळले अफजलखान निघालाय तसे महाराज्यांच्या हस्तकांना कळले नसेल का? केव्हा निघाला, किंवा पाहिले त्यावेळी कुठल्या ठिकाणी होता, सोबत अजून कोण मुख्य लोक आहेत, किती सैन्यबळ आहे, काय काय शस्त्रास्त्र दारूगोळा आहे ही माहिती मिळाली नसेल का? त्यानुसार आपल्याला तयारी करायला किती वेळ आहे हे त्यांना कळाले नसेल का?
की मागचा पुढचा संदर्भ नसताना केवळ "वार्ता विघ्नाची" एवढी अत्यंत त्रोटक माहिती पुरेशी होते?

बाकी जे घडले, त्यावर अनेकांनी लिहिले आहे. समर्थांनीही स्वतः पाहून नव्हे तर ऐकून ते लिहिले.
अफजलखान स्वारी आणि वध आपण इतिहासात शिकलो ते समर्थांनी लिहिले त्या पेक्षा खुप तपशीलवार आहे.

समर्थांनी अफजल क्रौर्याचे, त्याच्या वधाचे वर्णन लिहिले याचा अर्थ "वार्ता विघ्नाची" ही महाराजांना अफजलखान स्वारीची सूचना आहे असा निघत नाही. अत्यंत त्रोटक आहे ते.

स्वराज्यावर आलेले संकट म्हणून समर्थानी आरती केली आहे. अफजल खान वधाच्या वेळी समर्थ आणि शिवाजी महाराजांची भेट झाली नव्हती. अफजल खानाचा वध हा शिवाजी राजे यांचाच पराक्रम आहे. त्याला मारण्याकरिता महाराजांनी युक्तीने त्याचा वध केला. समर्थ आणि शिवाजी महाराज एकाच काळात असल्याने घटना एक असून समर्थांच्य आणि शिवाजी महाराजांच्या जीवनात त्या घटनेचा उल्लेख आहे

<< उदयजी तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं समाधान झालं का? >>

------- तुमच्या कडे अफाट माहिती आहे, आणि माहिती पुरविण्याचा उत्साह वाखाणण्यासारखा आहे. अत्यंत खेदाने करावे लागत आहे- तुम्ही पुरवित असलेल्या अफाट माहिती मधून पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक समर्थ रामदास होते हे दुरान्वयेही सिद्ध होत नाही. तसा संबंध लावणे अतिशयोक्ती ठरेल.

बहिर्जी नाईक यांचे हेरांचे जाळे सर्वत्र फैलले होते आणि ते जास्त घट्ट होते. रामदासींच्या कानावर आलेल्या बातम्यांवर शिवाजी महाराजांचे आडाखे / मोहिमा/ युद्धाच्या योजना याला कुठलाही आधार नाही.

मला उदय म्हटले तरी चालेल. समर्थ भक्तांच्या समोर तर अगदीच लहान व्यक्ती आहे. Happy

डिजे - नारायण सूर्याजी ठोसर असे पुर्वीचे नाव आहे असे विकीपीडिया सांगतो. सूर्याजी ठोसर त्यांच्या पित्याचे नाव.

Pages