
एक पूर्ण खोवलेला नारळ.
दोन वाट्या तांदूळ, शक्यतो बासमती तुकडा किंवा सुरती कोलम.
तूप 4 चमचे
किसलेला गूळ दोन वाट्या ( फार गोड हवा असेल तर प्रमाण वाढवा).
लवंगा 2-4.
जायफळ किसून अर्धा चमचा.
सात आठ भिजवून सोलून तुकडे केलेले बदाम.
आधीच सांगते, हा जरा कष्ट घेऊन करायचा पदार्थ आहे, पण चव इतकी अफलातून लागते की कष्ट कारणी लागतात
ज्यांना स्वयंपाकाची खरच आवड आहे त्यांनी जरूर करून पहा.
तांदुळ धुवून निथळत ठेवायचे.
नारळ खवणून मिक्सरमधून एक वाटी पाणी घालून वाटून घ्यायचा. मग त्यातलं दूध पिळून काढायचं. हे जाड दूध.
मग पुन्हा चोथ्यात एक वाटी पाणी घालून पुन्हा वाटून घ्यायचं. मग पिळून दूध काढायचं. हे दुसरं दूध पांतळ दूध. दोन्ही दुधं स्वतंत्र ठेवा. अन चोथा बाजुला ठेवायचा. हा चोथा भातासाठी वापरणार नाही आहोत. त्याचा उपयोग शेवटी सांगते.
आता तुपावर 2-4 लवंगा टाकायच्या. गॅस बारीक ठेवा. त्यात बदामाचे काप घाला. बदामाचा खमंग वास आला की त्यात तांदूळ टाकायचे. छान लालसर परतून घ्यायचे. मंदाग्निवर.
आता त्यात नारळाचे पांतळ दूध टाकायचे. आणि गॅस मोठा करून छान रटरटू द्यायचं. आता गॅस बारीक करून जाड दूध टाकायचं, वर दोन वाट्या पाणी घालायचं. छान उकळी आली की, झाकण ठेऊन भात बोटमोड्या शिजवून घ्यायचा. (पाण्याचे प्रमाण तांदुळ कोणता आणि तुम्हाला कसा भात आवडतो त्यानुरुप कमी जास्त करा. पण भात अगदी नीट शिजल्याशिवाय पुढे जाऊ नका)
भात पूर्ण शिजला की,भांड्या खाली तवा ठेवा, गॅस बारीकच असू द्या. तांदळाच्या समप्रमाणात किसलेला गूळ टाकायचा, जायफळ किसून घालायचं. आणि उलथण्याच्या उलट्या बाजुने हलकेच हलवायचा. जसजसा गूळ वितळत जाईल तसतसे हे हलवणं सोपं जाईल. गूळ सगळीकडे मिसळला की पुन्हा झाकण घालून एक वाफ येऊ देत.
तयार आहे नारळी भात. यात नारळाचा चोथा नसल्याने हा भात अतिशय सुरमट होतो. दुसऱ्या दिवशी तर हा नारळीभात अफलातून लागतो
नारळाचा जो चोथा उरेल तो चेहरा धुताना स्क्रबर म्हणून वापरायचा. किंवा थोड्या पाण्यात वाटून केसांना लावायचा, 15 मिनिटांनी केस धुवायचे. चेहरा नितळ, केस चमकदार होतात.
या, ताट वाढलय
मूद फोडल्या नंतर
नारळाचे दूधच वापरायचे, ओलं खोबरं नाही.
जसा होईल तसाच होणं अपेक्षित
जसा होईल तसाच होणं अपेक्षित आहे
असं अवल म्हणालीअसं सांग घरी!कविन, स्वाती
कविन, स्वाती
)
कवे फोटो टाक इथे. मी उद्या करेन
( हुश्य
सॉरी, आधी एकेरीवर आले होते का
सॉरी, आधी एकेरीवर आले होते का? विसरले! वय झालं (माझं)!

बदललं.
अवल,
अवल,
ऑरगॅनिक ना.दु. वापरुन करता येतो पण जाड दूध, पातळ दूध प्रकार नाही त्यामुळे ते तांदूळ : पाणी + कॅन्ड ना. दु. प्रमाण अॅडजस्ट करावे लागते. त्यात बिनभरवशाचा गुळ हा अजून एक फॅक्टर. आई/मामी/सासू/ नणंद वगैरे अन्नपूर्णांसारखा होणार नाही हे गृहित धरायचे.
डोन्ट वरी, माझं जास्त झालय
डोन्ट वरी, माझं जास्त झालय
स्वाती, हो ते ही खरय. तो
स्वाती, हो ते ही खरय. तो पिवळा गूळ अज्जिबात आवडत नाही. सेम विथ ऑरगॅनिक (मारू नका मला)
बासमती अख्ख्या तांदळाला
बासमती अख्ख्या तांदळाला कुकरबाहेर पूर्ण शिजण्यास दुप्पट पाणी कित्येकदा कमी पडतं.l. अशा भातात गूळ किंवा साखर घातली तर पाणी सुटतं खरं पण ते पाणी शीत शिजण्यास उपयोगी नसतं. उलट त्यावर गूळ/ साखरेचा लेप चढून भात कडक बनतो.
मी असाच पण टेट्रा नादु वापरून
मी असाच पण टेट्रा नादु वापरून करते. सेम लागतो. झटपट होतो.
मी लवंगा आणि वेलची दोन्ही घालते. शिवाय केशरही. आईची पद्धत. वाफेला ठेवताना वरून तूप सोडते.
हीरा, बरोबर. म्हणूनच बासमती
हीरा, बरोबर. म्हणूनच बासमती तुकडा किंवा सुरती कोलम म्हटलय
तसंही पाण्याचा अंदाज आपापल्या आवडीनुरुप करायला हरकत नाही.
जसा होईल तसाच होणं अपेक्षित
जसा होईल तसाच होणं अपेक्षित आहे असं अवल म्हणाली असं सांग घरी! Proud>> हो हो. 'पानात पडलं पवित्र झालं' याची आठवण देणारच आहे मी
अवल मारो मत मी ऑर्गॅनिक गूळ पावडर वापरलेय
कारण एकच यावेळी सामान भरले तेव्हा ती ऑफरमधे होती 
अवल, सीकेपी पद्धत वा इतर
अवल, सीकेपी पद्धत वा इतर पद्धतीत काय फरक आहे?
तयारी करताना एका पदार्थासाठी
तयारी करताना एका पदार्थासाठी एक डझनहून अधिक भांडी आणि उपकरणे लागताहेत, म्हणून वैताग आला होता. पण पहिल्या घासातच worth it असंच वाटलं.
आज नाभा जरासा कच्चा राहिला.मी
आज नाभा जरासा कच्चा राहिला.मी 2 वाट्या तांदळाला 5 वाट्या नादू घालते.आज 4 वाट्या घातले.हलकीशी कणी राहिली.तूपही जास्त झाले.नंतर प्रेशरpan मध्ये दीड वाटी पाणी गरम करून त्यात गूळ विरघळून घेतला(किंचित अगोड झाला होता) आणि नाभा परत त्यात घालून एक शिटी काढली.आता मऊसूत दिसतोय.
माझा ना.भा. गुळ घातल्यावर
माझा ना.भा. गुळ घातल्यावर थोडा सुटसुटीत मोकळा झाला. वरच्या फोटोत दिसतोय तसा पोत नाही आला. मी भात बाहेरच शिजवला, कुकरमध्ये नाही. केरळी दुकानातून मागे ताडाचा गुळ आणला होता तोच वापरला.
फोटोतील नाभा चा पोत जमण्यासाठी पाण्याचे प्रमाण वाढवावे का?
बाकी नाभा चविष्ट झाला. रेसिपी साठी धन्यवाद.
आता रात्री थोड्या शिळ्या झालेल्या भाताची चव कशी लागते ते बघू.
भरत, हो भांडी जास्ती बाहेर
भरत, हो भांडी जास्ती बाहेर येतात हे खरं. पण तरी करून बघितलात हे या निरिक्षणावरून सिद्ध होतं
थँक्यु करून बघितला अन सांगितलात म्हणूनही.
देवकी, अररर. प्रत्येक तांदुळा नुसार अंदाज बदलेल हे लिहायला आधी विसरलेले. आणि भात पूर्ण शिजल्या शिवाय गूळ घालायचा नाही हेही नंतर घातलं. पण हुश्य. तुम्ही योग्य उपाय केलात. पण तूप जास्त झालं नसावं. मुळात आपण ना दू वापरतो तर खोबऱ्याचा स्निग्धपणा अॅड होतो म्हणून जास्त तूप झालं असंही वाटू शकतं. गार झाला की जास्त नीट कळेल. हाच तो सुरमट पणा
पुन्हा तुपाचं प्रमाणही आपापल्या सवयी नुरुप 2-4 चमचे 
एस, बरोबर पाणी थोडं अधिक चालेल जर तुम्हाला मऊसूत हवा तर. किंवा मग झाकण लगेच ठेवणे अन गॅस अगदी मंद ठेवणे यानेही परिणाम साधू शकतो.
कविन, भरत, देवकी, एस सर्वांना मनापासून धन्यवाद. इतकी खटखट करून ना भा पार पाडलात. एकदा ही चव आवडली की मग खटखट वाटत नाही
पण तूप जास्त झालं नसावं. ....
पण तूप जास्त झालं नसावं. ...... जास्त झालंच.काढून ठेवण्याचा आळस केला.
नंतर सुधारलेला छान झाला.मी सर्व एकत्र करून प्रेशर pan मध्ये लावते.
(No subject)
(No subject)
(No subject)
अमा वा छान झालाय नाभा
अमा वा छान झालाय नाभा
देवकी थम्स अप
चव आवडली. रंग डार्क आला कारण
चव आवडली. रंग डार्क आला कारण माझ्याकडच्या गुळाचा रंग तसा आहे. अमांच्या नारळीभाताच्या फोटोशी मॅच होतोय बराचसा.
भात शिजला आहे. म्हणजे मला व्यक्तीश: अजून थोडा जास्त शिजला असता तरी चाललं असतं. नवऱ्याला परफेक्ट वाटला.
दोन्ही पद्धतीने आलटून पालटून करत राहीन यापुढे आणि पुढल्यावेळी साधा पिवळा गुळ मुद्दाम आणायचे कष्ट घेईन.
थांकु कविन
थांकु कविन
खूपच छान. नक्की करून बघणार
खूपच छान. नक्की करून बघणार
माझ्याकडे संक्रांतीला सॉफ्ट
माझ्याकडे संक्रांतीला सॉफ्ट बाइटेबल तिळ गूळ बअनवायचा म्हणून आणलेला तो सात्विक गूळ पावडर चा डब्बा होता अजून पाव पण संपला नाहिए आणि चिकन चेट्टेनाड साठी कोकोनट मिल्क मागवले होते ते वन प्लस टू आले ते ऑक्टोबर मध्ये एक्स्पायर होईल. म्हणून काल ट्राय केले.
मी रोजाना बासमती वापरला. पण यु आर राइट दुसरा तांदूळ जास्त छान फिट होईल. बेसिकली तुपाव र परतून मग तांदूळ नादु मध्ये शिजवले व मग गूळ घालून परतले. एकदम माफक गोड होतो वर दिलेल्या प्रमाणात. गूळ घालू न मी मंद आचेवर त्या क ढईवर परात ठेवुन शिजवयला ठेवुन दिले. लाइफ मध्ये पहिल्याम्दीच बनवला व
फॅमिली ग्रूप वर पण फोटो टाकून भावांना विश केले जॉब डन.
केशर व सुका मेवा घरी ठेवत
केशर व सुका मेवा घरी ठेवत नाही. त्यामुळे नव्हते. पण बेसिक सुवासच एकदम लै भारी आहे. कोकोनट, लवंग राइस व गूळ खरपूस. सुरमट हा शब्द परफेक्त आहे.
एकदम टेम्प्टींग फोटो आहे!
एकदम टेम्प्टींग फोटो आहे!
अमा
अमा

हो मी पण केशन नाही टाकत. गुळ असतो तर रंग येतोच. अन गुळा बरोबर जायफळ जास्ती छान जातं तर त्याचा स्वादही पुरतो. वेलचीची पण गरज नाही लागत
मानव धन्यवाद
Photos कसले tempting आहेत!!
Photos कसले tempting आहेत!!
चवदार पाकृ
Pages