मणिपूर : केंद्र सरकारने उचलले कडक पाऊल. धन्यवाद मोदीजी.

Submitted by अलीबाबा on 20 July, 2023 - 01:16

sls.jpg

डबल इंजिन सरकार असलेल्या मणीपुरातला कुकी महिलांवरील अघोरी अत्याचारांचा व्हिडिओ आल्यानंतर मोदी सरकार खडबडून जागे झाले असून कडक पाऊले उचलली आहेत.

१. मणिपूरी महिलांच्या परिस्थितींवर भाष्य करणार्‍या सोशल मिडियावर होणार कारवाई.
२. सोशल मिडियावरून व्हिडीओ हटवण्याची कारवाई सुरू.

यापूर्वीही या प्रकारची कठोर पाऊल केंद्राने उचलली आहेत जसे:

जोशीमठाबद्दलच्या बातम्या बंद करणे.

चीनच्या आक्रमणाचा उल्लेख बंद करणे.

***

सरकारच्या धाडसी निर्णयाचे अभिनंदन

तुम्हा सर्वांच्या शिखंडीकरणाबदल तुमचे ही अभिनंदन!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फार्स विथ द डिफरन्स , प्रत्येक ठिकाणी निव्वळ व्हॉट अबाउट्री करणार्‍याला त्याच भाषेत दिलेलं उत्तर कळतं. आणि ती व्हॉट अबाउट्री नाही कारण इतर राज्यांत प्रशासन- पोलिस यंत्रणेने आरोपींच्या विरोधात कारवाई केली आहे.

. या राज्यांत आरोपींच्या समर्थनार्थ कोणी उभे राहिलेले नाही. , मोर्चे काढलेले नाहीत .कोणी व्हॉट अबाउट्री केलेली नाही. पोल्सिआंनी पीडित स्त्रीच्या कुटुंबालाच डांबून ठेवलेले नाही. (राजस्थानमध्ये भाजपनेत्यांनीच पीडित स्त्रीच्या कुटुंबाला आपल्या ताब्यात ठेवले) आरोपींना शिक्षा झाल्यावर ती माफ करून त्यांचे हारतुरे देऊन आणि आरती ओवाळून स्वागत केले जाण्याची आणि त्यांना पक्ष कार्यक्रमात व्यासपीठावर बसवले जाण्याची शक्यता नाही.

मणिपूरमध्ये सध्या जे चाललंय ते इतर राज्यांसारखे सुटे सुटे इन्सिडन्सेस नाहीत. इथे तीन महिने वांशिक दंगे चालू आहेत. आणि सरकार निष्क्रिय आहे किंवा एका समूहाच्या बाजूने आहे. याची तुलना इतर राज्यातील घटनांशी होऊ शकत नाही.
--------
बलात्काराच्या आरोपींच्या समर्थनार्थ मोर्चे काढणारे आणि त्यांची आरती ओवाळणारे लोक इतरांना सर्टिफिकेट देतात. याला उत्तरही द्यायची गरज मला वाटत नाही.

बिल्किस बानोचा मुद्दा कोणत्याही धाग्यावर रेलेव्हंट आहे कारण बलात्कार्‍यांचे समर्थन आणि पीडितेचे आणखी दमन ही भाजपनीती आहे.
काल यासाठीच मणिपूरम धल्या घटनेबद्दल बोलायला त्यांनी ब्रिजभू षण शरण सिंगला निवडलं. असं करून भाजपने आपला उद्दामपणा दाखवला आणि त्या कुकी स्त्रियांची टर उडवली.

पंतप्रधानाने संसदे समोर केलेल्या वक्तव्यातही व्हॉट अबाउट्री केली. टेलिग्राफने याचं रिपोर्टिंग करताना मोठ्या अक्षरांत ७५ दिवस आणि मगरीचे फोटो वापरले.

बिल्कीस बानोच्या बलात्कारी लोकांना पक्षाचे स्टेज देणे हा अक्षम्य गुन्हा केला आहे भाजपने. कधीही रिलेव्हंट आहे. असल्या नीच पक्षाची लायकी दाखवण्याचा कायम प्रयत्न करणार. इतर पक्ष काही धुतल्या तांदळासारखे नाहीत. पण जाहीररीत्या वारंवार बलात्कारांच्या सत्कार करण्याइतके हरामखोर तर नाहीत.

भाजप बलात्कारी आरोपींना हार तुरे घालतो ना ?

मग राजस्थान मधील बलात्कार पीडित महिलांसाठी आवाज उठवणाऱ्या मंत्र्याला हकालनारा गेहलोत आणि त्याची काँग्रेस दिसत नाही का ?
इतरांची ती व्हॉटअबाऊट्री आणि तुमची खाली मुंडी पातळ धुंडी का ?

तो हाकललेला माणूस ब लात्कार्‍यांना हारतुरे घालणार्‍या पक्षात जाण्यासाठी उत्सुक असेल बघा. म्हणूनच त्याने हे विधान केलं असणार. पुढे कळेलच.

Freedom fighter's wife burnt alive in Manipur's Kakching district; house was set on fire after the elderly woman was locked inside

गुजरात नरोदा पाटिया एहसान जाफरी.

मणिपूरमध्ये जे चाललंय त्याचे प्रतिसाद शेजारच्या मिझोराममध्ये उमटले. तिथे मैतेईंना इथून निघून जा अशा धमक्या मिळाल्यात.
तिथला सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंट हा पक्ष भाजपप्रणित North East Democratic Alliance (NEDA), आणि NDA चा सदस्य आहे.

आपले प्रश्न आपल्याला च सोडवले पाहिजेत .सरकार नावाची यंत्रणा अस्तित्वात नाही हे तेथील लोकांना समजले आहे.
चीन, म्यानमार,बांगलादेश सारखे देश बाजू ला आहेत.
पूर्वोत्तर राज्य अशांत होणे म्हणजे चीन साठी सुवर्ण संधी आहे.

पण केंद्रात बसलेल्या सरकार ला त्याचे गांभीर्य नाही
त्यासाठी शिक्षित प्रधानमंत्री असावा लागतो लागतो.
नेमके तेच आपल्या कडे नाही

बलात्कार किंवा एकूणच सर्व थरातील स्त्रियांवर झालेल्या अत्याचाराबद्दल रोजच वाचत,ऐकत असतो, पण बऱ्याचदा मन इतके बोथट झालेले असते किंवा रोजच्या जगण्यात कुठलेही additional टेन्शन घ्यावेसे वाटत नसल्याने फक्त वाचून हळहळणे किंवा वाईट वाटणे इतकेच होते. पण काही घटना अशा असतात की तुमच्या मनाला प्रचंड डिस्टर्ब करतात . मणिपूरचा व्हिडिओ फोटो पहिल्यापासून मन प्रचंड अस्वस्थ आहे, दोन दिवस रात्रीची झोप पण नीट लागत नाही. सोमी बघत आहे, बातम्या, अपडेट्स घेत आहे, काहीतरी करावेसे वाटते पण काय ते कळत नाही. मन शांत होत नाही. आता टीव्हीवर काहीतरी डान्स रिऍलिटी शो चालू होता आणि त्यातील लोक हास्यविनोद करत असताना पहिले, पण हे प्रचंड गिल्ट देऊन गेले. आपल्या देशात दोन (आणि अशा अनेक)महिला याक्षणी कुठल्या मनस्थितीत असतील आणि आपण हसतोय !

यापूर्वी निर्भया केसच्या वेळीही माझ्यावर असाच परिणाम झाला होता. पण त्यावेळी लोक घराबाहेर पडले होते, आंदोलन करत होते, दोषींना पकडा, सजा द्या म्हणून मागण्या करण्यासाठी मोर्चे निघाले, कॅन्डलमार्च निघाले. दोषींना लगेच अटकही झाली होती. यावेळी सगळे कसे शांत? इतका सन्नाटा ? विरोधक पक्ष थोडाफार आरडाओरडा करत आहेत, पण सामान्य लोक, विशेषतः स्त्रियांना काहीच वाटले नाही का ? का मणिपूरमध्ये आहे आपला काय संबंध अशी मनोवृत्ती आहे ? का त्या स्त्रिया आपल्या जाती,धर्मातल्या नाहीत म्हणून जाऊदे? .. कमीतकमी एक स्त्री म्हणून तरी किमान प्रकरणाचा निषेध करावा असेही वाटत नाही.

बाहेरही लोक साधा निषेध करायलाही घाबरत आहेत व्हाटसऍप ग्रुप शांत आहेत. लोक फालतू गोष्टीबद्दल बोलत आहेत. पण याबद्दल नाहीत. नेहमीचेच जोक्सचे व्हिडिओ फॉरवर्ड होत आहेत. म्हणजे काहीच फरक पडलेला नाही. कुठपर्यंत जाणार आहे समाज ?

भाजप, मोदी फक्त राजस्थानकडेही पहा म्हणून यातून सुटू शकतात का? जर भारतातील छोट्यामोठ्या चांगल्या गोष्टीचे श्रेय तुम्ही घेत असाल तर या विकृत बीभत्स प्रकारची जबाबदारीही तुमचीच आहे.

भाजप, मोदी फक्त राजस्थानकडेही पहा म्हणून यातून सुटू शकतात का?

सुप्रीम कोर्टाने केंद्र आणि राज्य सरकारला फक्त मणिपूरमधील परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी का सांगितले? लगेच मगरीने अश्रू ढाळायला सुरुवात केली.

सौरभ कृपाल ला स्थापन करण्यासाठी सुप्रीम कोर्ट सरकारच्या प्रत्येक केस विरोधात निर्णय देत आहे ....

ह्या वरून एक कथा आठवली.
आपण सकाळी उठतो. बायकोनंं नाश्त्यासाठी उप्पीट पोहे सांजा असंं काही केलेलं असतंं. तोंडी लावायला सकाळचा ताजा पेपर वाचायला घेतो. वाचून आपल तर डोकच भडकत.
"अग ही बातमी वाचलीस? काय चाललाय काय ह्या देशात? साल्यांना फटके मारायला पाहिजेत." अस बरच काही बोलतो.
"चहा प्या तो आधी. थंड होतोय."
मग आपण ऑफिसात जातो. थोडंं काम करतो, बराच चहा पितो.
लंच टाईमाला सगळे एकत्र जेवायला बसतात.
"ऐकलस का ? सुभ्रम्हण्याला प्रमोशन मिळाले."
"मिळणारच, बॉस आणि तो, दोघे मद्रासी. मराठी माणसाला कोण विचारणार हो!" आपण.
ऑफिस संपवून आपण घरी येतो. सगळीकडे मरणाची गर्दी. ट्रेनला बसला पायी चालताना देखील. साली गर्दी.
घरी येऊन चहा. मग टीवी. तारक मेहता, हहपुवा. बाईपण भारी देवा.
आयला स्कोर काय झाला? BCCI ला शिव्या.
अस होता होता दिवस सरतो.
नंतर आपण दिवे मालवून कुणा स्वप्न सुंदरीला fornicate करतो.
असंं आपण जगणार.

https://twitter.com/ANI/status/1683016541657518082?s=19
काँग्रेसचा बंगाल मधील मोठ्ठे नेते आणि विरोधी पक्ष नेता बिरूद मिरवणारे अधीर रंजन चौधरी देखील भाजप मध्ये जाणार आहे का ?

ममता च्या विरोधात बोलतोय म्हणजे अतीच झालं !
बाकीचे बघा कसे डोळे बंद करून गुमान पडलेले आहेत , एक शब्द तरी ममता विरोधात बोलत आहेत का ?

फुरोगामी, मणिपूरच्या राज्यपाल अनसुया उइके , यांना भाजपनेच राज्यपाल पदी नेमले आहे.
त्या काय म्हणताहेत पहा. मी माझ्या आयुष्यात कधीही इतका हिंसाचार पाहिला नाही. मी वर कळवलं आहे. (राज्यपालांच्या वर कोण असतं. ते कोणाला कळवतात, हे तुम्हांला माहीत असेलच). लोक मला विचारतात की शांतता कधी होईल? ५००० घरं जाळली गेलीत. साठ हजार लोक
अडीच महिन्यांपासून निर्वासित शिबिरात राहत आहेत.
https://twitter.com/yogitabhayana/status/1682074775261450240

मोदी शहा यांना राज्यपालपदावरून कधी काढतील? तुम्हांला काय वाटतं?

फुरोगामी, मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंग म्हणातात, या एकाच घटनेचा व्हिडियो आलाय. राज्यात असे हजारो प्रकार घडले आहेत.
फक्त व्हिडियो मुळे राज्याचं नाव खराब झालं म्हणून ते राज्यभर मिरवणुका काढणार आजेत. भाजपचा शिरस्ता आणि यांचं कर्तृत्व पाहता २०३४ मध्ये बिरेन सिंग भारताचे पंतप्रधान होऊ शकतील. तुम्हांला काय वाटतं?

फुरोगामी, काल भाजपच्या वतीने या घटनेबद्दल आदरणीय ब्रिज भूषण शरण सिंग बोलले. भाजपने त्यांचीच निवड का केली असेल? तुम्हांला काय वाटतं?

फुरोगामी, या घटनेचा एफ आय आर नोंद ल्याला दोन महिने झाले. पण गुन्हेगारांना आताच व्हिडियो बाहेर आल्यावर अटक झाली ( असं सरकार म्हणतंय). व्हिडियो बाहेर आला नसता तर अटक झाली असती का? तुम्हांला काय वाटतं?

फुरोगामी आणि त्यांचे वैचारिक समपथिक -
ही नवी बातमी. पण घटना १५ मेची.
https://www.thehindu.com/news/national/18-year-old-woman-assaulted-gangr...
देशभर जसे काउ व्हिजिलांटी , अँटी लव्ह व्हिजिलांटी पु रुष असतात, तशा मणिपूरमध्ये मैतेई स्त्रियाही व्हिजिलांटी असतात. त्यांनी एका १८ वर्षांच्या कुकी मुलीला धरून चार पुरुषांच्या ताब्यात दिलं.

मी स्क्रोलची ही बातमी काल दिली होती.https://scroll.in/article/1053038/everyone-should-know-what-happened-to-... इथे पाच सहा कुकी स्त्रियांचे अनुभव आहेत. यांना मारा, यांच्यावर बलात्कार करा, ठार करा अशी चिथावणी मैतेई स्त्रिया देत होत्या. असं आणखी कोणत्या राज्यात होतं असं तुम्हांला वाटतं ?

फुरोगामी आणि त्यांचे वैचारिक समपथिक,

तुम्हांला एम सी मेरी कोम माहीत असतीलच. त्या मणिपूरच्या आहेत. त्यांनी ४ की ५ मे रोजी मोदी, शहा , राजनाथ सिंग यांना विनवलं की माझ्या राज्यातली स्थिती फार भयंकर आहे. प्लीज काहीतरी करा. https://www.youtube.com/watch?v=ZGXubgyUae0
अदाणीच्या चॅनेलवरच मणिपूर जळत असल्याचं दिसतं आहे.

फुरोगामी, आता मणिपूरची दुसरी खेळाडू भारतोलक मीराबाई चानु हिनेही पंतप्रधानांना विनवलं आहे.

फुरोगामी , या दोघीं राज्याची आणि भारताची अशी बदनामी का करताहेत? तुम्हांला काय वाटतं? यांना मिळालेली पदकं, अर्जुन , पद्म पुरस्कार काढून घ्यायला हवेत का?

फुरोगामी, या प्रसंगांना सामोरं जावं लागलेल्या मुलींना मैतेई चांगले असतात असंच वाटायला हवं असं तुम्ही म्हणताय का? त्यांना काही मैतेई पुरुषही भेटले. ज्यांना मारहाण, लैंगिक छळ , मर्डर हे प्रकार पसंत नव्हते. त्या मुली त्या मैतेईंना चांगलंच म्हणाल्या. हिंदूच्या बातमीतल्या मुलीची मैतेई पोलिसांकडे तक्रार करायचीही हिंमत झाली नाही. ती नाटक करते आहे का?

तिथे मैतेई बहुसंख्य आहेत हे खोटं आहे का? तुमच्या माहितीसाठी - भाजपच्या कुकी जमातीच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार करायला दिल्ली गाठली होती.

अजून राज्यपाल, मुख्यमंत्री, ब्रिजभूषण सिंग यांच्याबद्दलचे तसेच आणखीही प्रश्न शिल्लक आहेत. तुमच्या वैचारिक समपथिकांनी उत्तरे दिली तरी चालेल.

अर्णव गोस्वामी सुध्दा विचलित झाला आहे.
"सरकारने व्हॉटअबाऊट्री बंद करावी. मणिपूर मध्ये जर बिगर भाजप सरकार असते तर आत्तापर्यंत राष्ट्रपती राजवट लागू केली असती"

तशा मणिपूरमध्ये मैतेई स्त्रियाही व्हिजिलांटी असतात. त्यांनी एका १८ वर्षांच्या कुकी मुलीला धरून चार पुरुषांच्या ताब्यात दिलं.

मी स्क्रोलची ही बातमी काल दिली होती.https://scroll.in/article/1053038/everyone-should-know-what-happened-to-... इथे पाच सहा कुकी स्त्रियांचे अनुभव आहेत. यांना मारा, यांच्यावर बलात्कार करा, ठार करा अशी चिथावणी मैतेई स्त्रिया देत होत्या. असं आणखी कोणत्या राज्यात होतं असं तुम्हांला वाटतं ? >>>>>>>
इथे बघा तुमची गाडी मैतई वरच घसरलेली आहे , म्हणून विचारले हो की मैतईच वाईट आहेत का ?
इथे बसून कोण क्रूर आणि कोण सज्जन कसे ठरविणार ?
त्या दोन दुर्दैवी कुकी महिलांची केस सोडले तर कुकी नी देखील क्रूर पणाची हद्द घाठली असेलच की !
जे काही असेल ते थांबलेच पाहिजे .
अगोदरच नॉर्थ ईस्ट राज्यांमध्ये वेगळेपणाची भावना वर्षानुवर्षे पोसली गेली होती .
नागा , उल्फा सारख्या बंडखोर संघटना शस्रे ठेवून मुख्य प्रवाहात आल्या असताना मणिपूर मधील उच्च न्यायालयाने मैतइंच्या बाजूने निकाल देवून काडी टाकली आणि भडका उडाला .....
मुख्यमंत्र्याच्या राजीनाम्याने प्रश्न सुटत असतील तर काँग्रेस आणि त्यांच्या समर्थकांनी गेहलोत आणि ममता चा पण राजीनामा मागितला पाहिजे .
मणिपूर मध्ये दंगलीत शे दीडशे लोकं मारली गेली तर बंगाल मध्ये पंचायत निवडणुकीत , फरक इतकाच !
.....

फुरोगामी, व्हिडियो त्या बायका, स्क्रोल बातमीतल्या पाचसहा बायका, हिंदूंच्या बातमीतली मुलगी सगळ्या वेगवेगळ्या आहेत. सगळ्या कुकी आहेत.
दोन बायका सोडल्या तर म्हणजे काय?

आणि असेल म्हणजे काय? आपण गृहीत धरायचं का? हो. दोन्ही जमाती जिथे अधिक संख्येने आहेत तिथे त्यांनी दुसऱ्याला त्रास दिलाय. पण सरकार अडीच महिने काय करत़य?

मी कुठे म्हणतोय मुख्यमंत्र्यांने राजीनामा द्यावा? मी तर म्हणतोय तो २०३४ मध्ये पंतप्रधान होईल.

फुरोगामी, थोड्या वेळाने भाजप आमदारांचं म्हणण़ं तुमच्यासाठी मराठीत लिहून काढतो.
तुम्ही राज्यपालांचं म्हणण़ं ऐकलंत का? त्या हिंदीत बोलल्या.

मणिपूर मधे जे काही चालू आहे ते बुद्धीच्या पलिकडचं आहे. गुजरात मधे या पेक्षाही क्रूर हत्याकांडं घडली. त्या वेळी सुन्न झालं होतं. मुंबई बेस्ट बेकरी प्रकरण सुद्धा असंच सुन्न करणारं आहे. हा रोग जुनाच आहे. श्रीकृष्ण कमिशनने कोण कोण यात सामील आहे ते स्पष्ट म्हटलेलं आहे. आता त्यातले आरोपी गळ्यात गळे घालून सत्ता भोगत असतात.

संवेदनशीलता कंडीशनल असू नये. आपण एखाद्या पक्षाचे समर्थक आहोत म्हणून त्या राज्यातल्या घटनांबद्दल तोंडाला कुलूप लावायचं आणि विरोधक असतील तिथे सात्विक संताप जाळायचा हे काही खरं नाही. यामुळे देशातल्या प्रस्थापित पक्षांची विश्वासार्हता रसातळाला गेली आहे.

बेहरामपाड्याच्या दंगली सुधाकर नाईकांना हटवण्यासाठी झाल्या असे राजकीय वर्तुळात सर्रास म्हटले जाते. दिवसाच्या उजेडात जे विरोधक बनून एकमेकांना शिव्या घालत असत ते रात्री जेवायला एकत्र बसत. दारू पीत असत. ही मैत्री कित्येक वर्षे लपवून ठेवली. ती अचानक विशिष्ट वयाचे झाल्यावर सोहळा झाला त्या वेळेपासून उघड केली गेली. याला राजकारण म्हणायचे कि जनतेप्रती धोखाधडी ? ही फसवणूक आहे. लोकांमधे फूट पाडायची, हिंदुत्व आणि सेक्युलर असे ध्रुवीकरण करायचे, हिंदू मुस्लीम तेढ वाढवायची आणि आपण मात्र मिळून पैसे खायचे.

https://www.thehindu.com/news/national/other-states/dalit-woman-paraded-...
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असताना दलित स्त्री ची विवस्त्र धिंड काढली गेली. मायबोलीच काय कुठेही सोशल मीडीयात हुं कि चू नाही. वर्तमानपत्रात आग पाखडली गेल्याचे आठवत नाही. टीव्हीत सुद्धा डिबेट झाल्याचे आठवत नाही. या घटनेची सत्यता पडताळून बघा हवी तर. असत्य निघाले तर माफी मागेन.

पण एक घटना चांगलीच माहिती आहे. यात सहभागी झालेले लोका माहिती आहेत. विशेष म्हणजे हे गाव त्या वेळी पुण्यापासून पाच किमी दूर होते जे आता पुण्यात आलेले आहे. धानोरी हे त्या गावाचे नाव. या गावात एका बाईची नग्न धिंड काढली गेली. ती ही दलित होती. दहावी ला मुलगा होता म्हणजे प्रौढ होती. या घटनेत दलित संघटनांनी पोलीस तक्रार केली. डीआयजी दर्जाच्या अधिकार्‍याला तीन दिवसांनी आणले तेव्हां त्या बाईने तक्रार मागे घेतली. कारण तिला गावातच रहायचे होते. मुलाची दहावी व्हायची होती आणि गावातल्या लोकांनी तिला मुलाच्या शिक्षणासाठी खर्च देऊन प्रकरण मिटवले होते. पुढे हिंसाचार घडला नाही तरी पोलिसांच्या भीतीने आणि शहर जवळ असल्याने सारवा सारव झाली हे उघड आहे.

मूळ प्रश्न मानसिकतेचा आहे. बहुसंख्यांक असणे आणि हातात लोकल / राज्याची / केंद्राची सत्ता असणे या माजातून स्त्री ची नग्न धिंड काढणे हे भारतात सर्वत्र घडते.

अहमद नगर इथे एका स्त्रीला आणि तिच्या मुलाला नग्नावस्थेत आठवडाभर झाडाला बांधून ठेवण्याची शिक्षा गावाने दिली होती. ही बातमी सकाळ मधे मी वाचलेली आहे. वीस पंचवीस वर्षापूर्वीची असेल.

मणिपूरच्या घटनेत उद्रेक दिसून आला कारण पक्षीय दृष्टीकोण. दिल्लीत निर्भया प्रकरण झालं तेव्हांही देशभरात उद्रेक झाला. कारण पक्षीय दृष्टीकोण. अशा सर्वच घटनात उद्रेक होत नाही. या दोन घटनात दोन परस्परविरोधी पक्ष आहेत. सत्ता पालट झाला कि यांची भूमिका यु टर्न घेते.
अशांच्या सुरात सूर मिळवावासा वाटत नाही.

निषेध सुद्धा स्वतंत्रच बरा.
ही घाण हटवल्याशिवाय देशाचे राजकारण रूळावर येणार नाही. तसे झाले तर आणि तरच हे प्रकार थांबतील.
किती दिवस याने त्याच्यावर आणि त्याने याच्यावर आरोप केलेले जनतेने मका मका बघत रहायचे ?

पश्चिम बंगाल मधल्या मालदा मधली ही घटना
https://thedailyguardian.com/two-women-stripped-beaten-in-bengals-malda-...
विशेष म्हणजे मणिपूर मधल्या घटनेबद्दल ब्र ही न काढणार्‍या भाजप या पक्षाने या घटनेबद्दल रान उठवले
https://timesofindia.indiatimes.com/city/kolkata/bjp-alleges-two-tribal-...

नंदूरबार मधे महिलेची नग्न धिंड काढली
https://www.indiatoday.in/india/story/maharashtra-woman-stripped-paraded...

ही बीड जिल्हातली २००६ मधली घटना आहे. खैरलांजी प्रकरण ताजे असतानाची.
https://www.arabnews.com/node/282257

बीड मधलीच २०१७ सालची ही घटना. या दोन घटनात वेगवेगळी सरकारे आहेत. कधी कुठे चीड आढळली का ?
https://www.ibtimes.co.in/woman-thrashed-paraded-naked-maharashtra-suppo...

ही राजस्थान मधील २०१७ सालची घटना
https://www.ibtimes.co.in/rajasthan-couple-stripped-filmed-paraded-naked...

मुख्यमंत्री चव्हाणांच्या मतदारसंघात काढलेल्या नग्न धिंडीबाबतची सत्यता या बातमीने पटू शकेल.
https://www.bbc.com/news/world-asia-india-16523849

खैरलांजीचा उल्लेख करत नाही.
प्रश्न कार्यवाही झाली, नाही झाली याचा नसून लोक कार्यवाही होईल कि न होईल याचा विचार करत नाहीत याचा आहे. कायद्याचा धाक नाही. उद्या कायदा काहीच करत नाही हे लक्षात आले तर घराघरात जाऊन स्त्रियांच्या कपड्यांना हात घालतील.
आणि हेच लोक पक्षकारण पाहून सोयीने संताप सुद्धा व्यक्त करतील. हे जास्त चीड आणणारे आहे.

मणिपूर मधल्या ज्या घटनेचा संताप होतो, त्या घटनेत आणि महाराष्ट्रातल्या घटनेत काही फरक आहे का ?
चीड तर दोन्हीकडे यायला हवी होती.

ही उत्तर प्रदेश मधली योगीराज ची साक्ष देणारी घटना
https://www.ibtimes.co.in/dalit-women-paraded-naked-thrashed-by-villager...

अहमदनगर जिल्ह्यात एका ब्राह्मण मुलाला अन्य जातीच्या मुलीशी प्रेम प्रकरण आहे म्हणून गावकर्‍यांनी विवस्त्र करून गाढवावरून धिंड काढली.
https://www.oneindia.com/india/maharashtra-youth-paraded-naked-for-affai...

मायबोलीवर भाजपसमर्थकही आहेत ( कदाचित बहुसंख्य) . अनेकांच्या घरी संघाचे वातावरण आहे, आधीच्या पिढीतील काही लोक प्रचारकही आहेत. पण हे माबोकर बहुतांशी सूज्ञ आहेत व म्हणून बिल्किस बानो ( व मणीपूर) बद्दल मौन बाळगून आहेत. या केसेस मध्ये मोदशहानीं जे केले ते indefensible आहे हे ते जाणून आहेत, भले मोदीशहांचा निषेध करायची नैतीक हिंमत त्यांच्यात नसेल, पण निदान गप्प रहावे इतके तारतम्य आहे. पण काही आक्रस्ताळे आयडी ज्या हिरिरीने मोदीशहांचे समर्थन करत आहेत व केविलवाणी व्हॅट अबाऊटरी करत आहेत ते पाहून या भाजपसमर्थकांनीही मनातल्या मनात कपाळावर हात मारला असेल की हे आपले तथाकथित समर्थक आपल्या पक्षाची इज्जत पूर्ण विकूनच थांबणार.

निर्भया प्रकरणात मनमोहन व सोनियाजींचे वागणे ग्रेसफुल व संयत होते. इथे महामहिम ७० दिवस गप्प बसले व नंतर म्हणतात की झाले मणिपूर मध्ये रेप तर त्यात काय एवढं? राजस्थान व छत्तीसगढ मधे ही होतातच ना ?

सोलापूरात सुद्धा अशीच दलित महिलेची नग्न धिंड काढून तिच्या लहान मुलाला अमानुष मारहाण केली होती. या घटनेत नंतर काही आरोपींना पाच वर्षांची शिक्षा झाली.

https://lokmat.news18.com/maharashtra/dalit-woman-finally-gets-justice-m...

लातूरने दोन मुख्यमंत्री दिलेत. या जिल्ह्यात चाकूर तालुक्यात सुद्धा महिलेची नग्न धिंड काढली गेली.
https://maharashtratimes.com/dalit-women-road-issu/articleshow/46140891.cms
चाकूरकर आडनाव लावणारे एक नेते सुद्धा आहेत इथले.

Pages