मणिपूर : केंद्र सरकारने उचलले कडक पाऊल. धन्यवाद मोदीजी.

Submitted by अलीबाबा on 20 July, 2023 - 01:16

sls.jpg

डबल इंजिन सरकार असलेल्या मणीपुरातला कुकी महिलांवरील अघोरी अत्याचारांचा व्हिडिओ आल्यानंतर मोदी सरकार खडबडून जागे झाले असून कडक पाऊले उचलली आहेत.

१. मणिपूरी महिलांच्या परिस्थितींवर भाष्य करणार्‍या सोशल मिडियावर होणार कारवाई.
२. सोशल मिडियावरून व्हिडीओ हटवण्याची कारवाई सुरू.

यापूर्वीही या प्रकारची कठोर पाऊल केंद्राने उचलली आहेत जसे:

जोशीमठाबद्दलच्या बातम्या बंद करणे.

चीनच्या आक्रमणाचा उल्लेख बंद करणे.

***

सरकारच्या धाडसी निर्णयाचे अभिनंदन

तुम्हा सर्वांच्या शिखंडीकरणाबदल तुमचे ही अभिनंदन!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राहुल कोण आहे? इथले लिबरल कोण आहेत? तर कोणीही नाही. त्यांचे दाखवायचे खायचे दात वेगळे, बुद्धीभ्रष्ट इ. इ. काय दूषणे देताहात तसेच आहेत ते असं क्षणभर मानून चालू.
मोदी कोण आहे तर पंतप्रधान. तो काय करतोय ते सांगा. इतके महिने काहीच का केलं नाही मोदीने त्यावर बोला. आणि आता काय करतोय त्यावर बोलू आपण.

Submitted by अमितव on 21 July, 2023 - 22:36
Pages
>>>>>>१००% सहमत

ब्रिजभूषण च्या बेल बद्दल दिल्ली पोलिसांनी नरो वा कुंजरो वा भूमिका घेतली.
आसाम चे मुमं नेहेमीप्रमाणे दोन रुपये ट्रोल गिरी करू लागले.
मणीपूर मुमं तर 'मणिपूर गौरव यात्रा' च्या तयारीला लागले.
पंप्र इतके क्लूलेस आहेत की राजस्थान च्या आरोपीना २४ तासात पकडले आहे व ते आपलेच भक्त आहेत हेही विसरले.

"(अग्रेषित)
हे प्रातिनीधीक चित्र आहे १९४१ साली हिटलरने जर्मनीत
पेरलेल्या #ज्यू-#द्वेषाचं...! अगदी मिसरूड फुटलेली जर्मन मुलेही ज्यू नागरिकांवर तुटून पडत...!

हिटलर त्याला जर्मन राष्ट्रवाद म्हणत जर्मन लोकांना बहकावत राहिला... आणि त्यानं जर्मनीला अखेर विनाशाप्रत नेलं !

याच विचारसरणीचं प्रतिबिंब आज आम्ही देशात होत असलेल्या मुस्लीम आणि ख्रिश्चनद्वेषात पाहतोय.
ज्यांना इतिहास नाही, ज्यांना संस्कृती नाही, ज्यांना महापुरुषांची सावली नाही, ज्यांना समता मान्य नाही, लोकशाही-बंधुत्वाला ज्यांचा नकार, ज्यांना लोकशाही अन् उदारमतवाद मानवत नाही...

अशी चिमूटभर वैचारिक विकृत लोक आज द्वेषाच्या शिकवणुकीला #राष्ट्रवादाची झूल चढवीत आहेत...!
जी या मातीची परंपरा अन् संस्कृतीही नाही...!

इतिहासातील गाडलेली मढी उकरून ज्यांचा धर्म आणि पोट अबाधित राहातं, त्यांना वेळीच रोखून देश एकसंध, एकजिनसी आणि एकात्म ठेवणं हा खरा #राष्ट्रवाद ! "

ह्या फॉरवर्ड मधला सोबतचा फोटो forward नाही होऊ शकला ते एका अर्थी बरं झालं. इतकं क्रौर्य डोळ्यांनी बघूच नये असं वाटतं.

अडीच महिने झाले. मणिपूर पूर्वस्थितीला येण्याची चिन्हं दिसत नाहीत. ह्या काळात जनावरांच्या झुंडींनी तिथे अजून काय हिडीस करून ठेवलंय माहित नाही.
आपापसातले हिशेब चुकते करण्यासाठी बायकांशी असं वागतात, हे काय असतं?
मुख्यमंत्र्याचा राजीनामा का होत नाही? राष्ट्रपती राजवट लावली तर तिथल्या झळा थेट दिल्लीला बसतील म्हणून शॉक ॲबसॉर्बर म्हणून मुख्यमंत्र्यास अजून ठेवलंय का?
पंतप्रधानांनी त्यांच्या पातळीवर जे काही प्रयत्न करायचे ते केले असतील, पण ते पुरे पडलेले दिसत नाहीत.
भाजपच्या बाजूने जी काही विधानं यासंदर्भात वाचतोय, बघतोय त्यावरून परिस्थिती गंभीरपणे हाताळली जातेय असं म्हणवत नाही.
अडचणीच्या मुद्द्यांवर/इश्यूंवर महिनोन्महिने मौन धारण करायचं,अंतर राखून वावरायचं. आणि सोयीच्या/सन्मानाच्या गोष्टी असतात तिथे श्रेय पुरेपूर घ्यायचं. ही स्ट्रॅटेजी म्हणून ठीक असेलही. पण लॉंगटर्मसाठी ते काही बरं नाही.

ह्या दोन्ही जमातीत हिंसाचार चा काही इतिहास आहे का?
कोणाला माहित असेल तर इथे लिहावे >>>>>>>>

आरक्षणात एका समाजाला एसटी मध्ये सामील केलं. त्यामुळे ऑलरेडी आरक्षण असलेल्या समाजाला आता आपल्या संधी कमी होतील असे वाटले. त्यातून ही दंगल चालू आहे. व त्यासाठी स्त्रियांचा वापर. पाश्चात्य जगात data is the new oil म्हणतात पण भारतात quota is the new oil अशी परिस्थिती दिसते.

पिडित महिलांच्या परेड च्या वेळी अनेक लोक हजर होते, पैकी कुणालाही यात चुकीचे करत असल्याची जाणिव न होणे हे धक्कादायक आहे. पोलीस हजर असतील तर गृह खात्याकडे खडानखडा बातमी होती. सबंध देशाची मान शरमेने झुकविणार्‍या घटना कळाल्यावरही तब्बल दोन महिने पंतप्रधान मौन धारण कसे करु शकतात?

व्हिडिओ व्हायरल झाला नसता तर हे प्रकरण दाबल्या गेले असते असे खिन्न मनाने म्हणावेसे वाटते. अपराध्यांविरुद्ध कडक कारवाई साठी केंद्र/ राज्य सरकार काय करणार आहेत हे माझ्यासाठी महत्वाचे आहे, जेणेकरुन अशा प्रकारच्या घटना भविष्यांत घडणार नाही.

दंगली जेव्हा होतात तेव्हा लोक हैवान झालेली असतात.
समूहाची मानसिकता ही खूप वेगळी असते.
मुंबई दंगलीत त्याचा अनुभव मुंबईकर लोकांनी घेतला आहे.
चागले,वाईट, चूक,बरोबर ह्याचा दंगली करणारा समूह विचार करत नाही.

त्या मुळे प्रसंग घडला तेव्हा तिथे अनेक लोक होती आणि त्यानं काहीच वाटले नाही.
ह्या मध्ये वेगळे काही नाही.

"असे वाटले. त्यातून ही दंगल चालू आहे. व त्यासाठी स्त्रियांचा वापर"

सुरक्षा दल जेव्हा कारवाई करायला जात तेव्हा मणिपूर मध्ये स्त्रिया च पुढे होवून त्यांना अडथळे निर्माण करत .
अशी किती उदाहरणे मणिपूर मध्ये आहेत.
अतिशय धोकादायक अतिरेकी पण तेथील बायकांनी सुरक्षा दलांच्या ताब्यातून सोडवले होते.
त्यांचा मग ब्रह्मदेश मध्टे जावून लष्कराने खात्मा केला होता
मणिपूर साठी बायकांनी पुढे होणे हे normal आहे.
आणि दंगलीत त्या मुळेच त्या टारगेट झाल्या ही शक्यता जास्त आहे.

अडचणीच्या मुद्द्यांवर/इश्यूंवर महिनोन्महिने मौन धारण करायचं,अंतर राखून वावरायचं. आणि सोयीच्या/सन्मानाच्या गोष्टी असतात तिथे श्रेय पुरेपूर घ्यायचं. ही स्ट्रॅटेजी म्हणून ठीक असेलही. पण लॉंगटर्मसाठी ते काही बरं नाही.>>>>>>>>>>>>>>>>>
इथे मात्र पूर्णपणे सहमत !
मोदीचे मौन खूपच त्रासदायक असते .
खलिस्तानी समर्थक शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावर हल्ला करून धुमाकूळ घातला तेंव्हाही मोदी गप्पच होता .

कधीकाळी तुम्ही सगळे मित्र होतात आणि आता तुम्हा सगळ्यांना असे एकमेकांशी भांडताना बघून मनाला अतीव दुःख होतंय. सौदागर पिक्चरसारखं काहीतरी घडेल आणि तुम्ही सगळे पुन्हा एमली का बुटा गाण्यावर एकमेकांच्या गळ्यात गळे घालून नाचाल अशी अपेक्षा मी ठेऊन आहे.

बोकलत यांचा हलका फुलका प्रतिसाद बऱ्याच वेळा वातावरण थंड करतो Happy
पण मोसम कट केल्या बद्दल काही लिब्रांडू त्यांच्यावर टप धरून असतात .....

अक्षरनामामधील लेखातून काही नवीन माहिती कळली. पण अन्यत्र वाचलेला बराच भाग त्यात आलेला नाही. मला हा लेख थोडा एका बाजूला झुकलेला वाटला. म्हणून या माहितीची भर घालतो. यातली काही माहिती असलेल्या बातम्या, लेखांच्या लिंका माझ्या आधीच्या प्रतिसादात आहेत.

महिलांना निर्वस्त्र करून त्यांची विटंबना करण्याला एक अफवा कारण ठरली. दिल्लीत झालेल्या एका अपराध कृत्यातील मृत स्त्रीचा फोटो मैतेई स्त्रीचा आहे आणि तिची ही अवस्था कुकींनी केली अशी अफवा पसरवली गेली आणि त्यातून हा प्रकार घडला .घडवला गेला.
त्या भागात कुकी अल्पसंख्य आहेत. एका स्त्रीच्या वडिलांना मारलं गेलं. बलात्कार होत असताना मध्ये पडलेल्या स्त्रीच्या भावाला मारलं गेलं.

कुकी ख्रिश्चन आहेत. असंख्य चर्चेस जाळली गेली. तिथे अक्षरशः जंगल राज आहे. एके ठिकाणी कुकींचा पाठलाग करून एकाचं शिरकाण केलं गेलं. त्याच्या सोबतचा माणूस दुसर्‍या जमातीचा आहे, हे मारेकर्‍यांपैकी काहींनी ओळखल्याने वाचला. मेलेल्या माणसाचं शिर कुंपणावर अडकवलं आणि धड जाळून फेकून दिलं.

संरक्षण दलाला घेराव घालून १२ दहशतवाद्यांना सोडवणार्‍या स्त्रिया मैतेई होत्या. हे आता - जूनमध्ये घडलंय.

देशाच्या अन्य भागांत , विशेषतः भाजप राज्यांत पोलिस निष्पक्षपणे काम करताना दिसत नाहीत. अनेकदा ते दंगेखोरांसोबत असल्याचं दिसलंय. मणिपूरमधूनही असे व्हिडियो येऊ लागलेत.

करण थापरला दिलेल्या मुलाखतीत एका मैतेई नेत्याने आम्ही कुकींना वाइप आउट करू असं म्हटलं.

मणिपूरच्या मुख्यमंत्र्याने राजीनामा द्यायचं नाटक केलं. त्याचं राजीनामापत्र महिलांनी हिसकावून फाडून टाकलं असं दाखवलं गेलं.
इतके दिवस तिथे इंटरनेट बंद होतं. आता सुरू झालं आहे तर आणाखी भयानक व्हिडियो समोर येऊ लागलेत.

स्त्रियांवरील हल्ल्याचे आणखी प्रसंग. या कुकी स्त्रियांना भेटलेले काही मैतेई पुरुष सहृदय होते.

मला इथे मैतेई विरुद्ध कुकी हा रंग द्यायचा नाही. शासनाचं संपूर्ण अपयश आणि / किंवा ढिलाई हा मुद्दा आहे. ७५ दिवस एक राज्य जळत आहे . मानवतेला काळीमा असे प्रकार घडताहेत आणि त्याबद्दल बोललं तर आताच का? व्हॉटबाउट्री केली जाते हे उद्विग्न करणारं आहे.

भाजपसाठी ईशान्य भारताचा जणू पंतप्रधानच अशा हिमन्त बिस्वा सर्माने अन्य राज्यांतील, अर्थातच भाजपेतर शासित राज्यांतील स्त्रियांबाबत घडलेल्या गुन्ह्यांची यादी ट्वीट केली आहे. भाजपच्या निनावी फेसलेस अ‍ॅब्युजिव्ह ट्रोल्स पासून मुख्यमंत्री , केंद्रीय मंत्री, पंतप्रधाना पर्यंत लोकांना 'गुन्हा घडल्यावर शासनाचा नाकर्तेपणा आणि वेळप्रसंगी गुन्हेगाराला पाठीशी घालणं' हा मुद्दा आहे , हे समजून घ्यायचं नसतं किंवा त्याकडे दुर्लक्ष करायचं असतं.

अवांतर - घटनेचं कलम ३७० रद्द केल्यावर काश्मीरमध्ये इंटरनेट जवळपास वर्षभर बंद होतं. तिथे तर मोठ्या प्रमाणात लष्कर ठेवून अख्खं काश्मीर खोरंच तुरुंगात टाकल्यासारखं होतं. त्याकाळात तिथल्या बातम्या बाहेर आल्या नाहीत. ज्या आल्या त्याही अशाच वेदनादायी होत्या.

दंगली होण्यात,वातावरण खराब होण्यात सोशल मीडिया हातभार लावते.
ह्याच्या कडे पण दुर्लक्ष करून चालणार.
मणिपूर मध्ये हिंसा होण्यास सोशल मीडिया चा हातभार आहे.

अशा वेळेस इंटरनेट सरसकट बंद करणे योग्य की अयोग्य .
ह्या वर चर्चा होवू शकते.
खरे तर प्रस्थापित मीडिया ची भूमिका इथे महत्वाची असते.
ग्राउंड reporting करून , खरे खोटे ह्याची खातरजमा करून संयमी शब्दात माहिती लोकांस मीडिया नी दिली पाहिजे.
पण आपली मीडिया पण खतरनाक आहे.
अतिशय बकवास आहे.
आरडाओरड करून बातम्या दिल्या जातात.
सर्रास खोट्या बातम्या दिल्या जातात.
शांतता निर्माण होण्या ऐवजी दंगल वाढण्याची च त्या मुळे शक्यता वाढते

खलिस्तानी समर्थक शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावर हल्ला करून धुमाकूळ घातला तेंव्हाही मोदी गप्पच होता . >> तो फक्त घोषणा देताना, स्वतःची लाल करताना आणि कोन्ग्रेसला शिव्या देताना तोंड उघडतो. देशाच्या मुद्द्यावर गप्पच असतो की!

https://twitter.com/SVishnuReddy/status/1682606542594646016?s=19
ममता बॅनर्जी ने काल बंगाल डि जी पी च्या तोंडून महिलांना विवस्र करून धिंड काढल्याचा घटनेचा नकार वदवून घेतला होता .
मग या दोन दलीत महिलांची कथा वेगळी आहे का ?

@फुरोगामी ट्वीट मधे असलेला व्हिडीओ हा ३-४ दिवसां आधीचा असून प्रथम दर्शनी चोरीच्या प्रकारातून झाल्याची माहीती आहे, इथे गुन्हा करणाऱ्या देखील बहूतेक महीलाच आहेत आणि त्याना ही शासन व्हायलाच हवे. व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलीसांनी पुढील तपास चालू केला कारण कुणीही तक्रार नोंदवली नव्हती...पुढे तपासावर लक्ष ठेवावे लागेल... ममता ही काही धुतल्या तांदळाची नाही आहे....जर ती सर्व समाजघटकांना समान वागणूक आणि न्याय देण्यात असमर्थ असेल, कुचराई करत असेल तर निश्चितच केंद्र सरकारने विवीध तपास आणि गुप्तहेर यंत्रणांचा वापर करुन भक्कम पुराव्यानिशी तेथे राष्ट्रपती राजवट लावल्यास कुणाचीही ही हरकत असण्याचे कारण नाही. केंद्र सरकाला हे अधिकार निश्चितच आहेत. पण भाजप या प्रकरणांचा उपयोग इतर राज्यात अनागोंदी माजवायला किंवा त्यावर निष्क्रिय रहायला सबब म्हणून करणार असेल तर ते चुकीचे आणि निंदनीयच आहे... व्हाॅटअबाउटरी मध्ये जनतेचे कधीही भले होणार नाही मग ती मांडणारा कुणी ही असो तो एकूण जनहीताच्या आणि प्रश्नांना उत्तरे शोधण्याच्या प्रक्रियेच्या/मानसिकतेच्या विरोधातच बोलत असतो हे नक्की.
https://www.google.com/amp/s/www.indiatoday.in/amp/india/story/after-manipur-women-beaten-paraded-half-naked-in-west-bengal-malda-2410197-2023-07-22

काय झालं ?
ज्वाजल्य लेखण्या बोथट झाल्या वाटतं .

जर ती सर्व समाजघटकांना समान वागणूक आणि न्याय देण्यात असमर्थ असेल, कुचराई करत असेल तर निश्चितच केंद्र सरकारने विवीध तपास आणि गुप्तहेर यंत्रणांचा वापर करुन भक्कम पुराव्यानिशी तेथे राष्ट्रपती राजवट लावल्यास कुणाचीही ही हरकत असण्याचे कारण नाही. केंद्र सरकाला हे अधिकार निश्चितच आहेत. पण भाजप या प्रकरणांचा उपयोग इतर राज्यात अनागोंदी माजवायला किंवा त्यावर निष्क्रिय रहायला सबब म्हणून करणार असेल तर ते चुकीचे आणि निंदनीयच आहे... >>+111
या घटनेत राज्य सरकार हलगर्जीपणा करत असेल तर खुशाल राष्ट्रपती राजवट लावावी. गुन्हेगाराना कठोर शिक्षा करावी. पण मणीपूर मध्ये घडलेल्या घटनेपासून पळू नये.

मणिपूर आणि बंगाल च काय इतर कोणत्याही घटनांची तुलना करूच नये .
पण ममता INDIA आघाडी मधील साथीदार आहे म्हणून त्या दलीत महिलांच्या घटनेतील तीव्रता कमी होते का ? म्हणून दिल्ली पासून गल्ली पर्यंत सगळे भाजप विरोधी गप्प बसलेत का ?
भाजप चे नेते कलंकित आहेत , बलतकर्याना हार तुरे घालतात , महिलांना दुय्यम वागणूक देतात असे आरोप करणारे आसाम मधील काँग्रेसी नेतीच्या शोषण बद्दल , राजस्थान मधील दलीत मुलींच्या अत्याचार बद्दल आणि आता बंगाल मधील घटने बद्दल गार का पडतात , हे लाजिरवाणे नाही का ?
बघा आता !
पुढील दोन चार दिवसांत indian मधील नेत्यांची बंगाल मधील ममता विरोधात एक ही शब्द येणार नाही आणि आलेच तर असे गुळगुळीत येतील की .....

जुबेर १२ ,काँग्रेसी श्रिनेत -१५ , काँग्रेस पक्ष - ७ आणि बॉलीवुड गँग -१० पेक्षा जास्त ट्विट मणिपूर बद्दल घटने संदर्भात केले गेले आहेत .
बघू या बंगाल मधील दलीत महिलांच्या घटनेतील गांभीर्य कोणकोणाला समजतंय ?
की त्या चोर होत्या म्हणून हलके घेतात......

To be honest माझे असे स्पष्ट मत आहे की भाजपाला कायदेशीर आयुधांचा आणि तरतुदींचा उपयोग करुन सुशासन करण्यात कसलेही स्वारस्य नाही आहे , आणि त्यांचा संपुर्ण भर हा व्हाॅटअबाउटरी वरच राहीला आहे....एखाद्या प्रकरणाचा सखोल तपास करुन त्यातील तथ्यांद्वारे पुर्णसत्य जनतेसमोर आणण्या ऐवजी मिडीया ट्रायल्स आणि सोशल मिडिया ट्रेंड्स चालवून आपणास हवे असलेले अर्धसत्य, आणि त्यावर आधारित पर्सेप्शन जनतेच्या मनावर जास्तीत जास्त कसे बिंबवावे याचाच प्रयत्न भाजपा आजवर करीत आलेली आहे.... कारण पुर्णसत्या मध्ये दोन्ही बाजूंच्या काही चुकीच्या गोष्टी असतात तर काही बरोबर...पण ज्याला एकांगी पणे फक्त स्वतःचीच बाजू बरोबर आणि समोरच्याची बजू फक्त चुकीचीच हे ठसवायची असेल तो पुर्णसत्य शोधण्याच्या आणि जनतेच्या समोर आणण्याचा भानगडीत पडेलच कशाला?

To be honest !
हे शब्द डिलीट करा. त्याची काही गरज नाही.
To be honest सूर्य पूर्वेला उगवतो.

बघू या बंगाल मधील दलीत महिलांच्या घटनेतील गांभीर्य कोणकोणाला समजतंय ?
की त्या चोर होत्या म्हणून हलके घेतात......>>> दोन्ही घटनांमध्ये गुन्हेगारांना आणि गुन्ह्याशी संबंधित असलेल्यांना कडक शासन लवकरात लवकर व्हायला हवे, ट्वीटरवर कुणी स्वतः च्या सोयीने व्यक्त होतात त्यावरुन एखाद्या घटनेच्या गांभीर्याचे मोजमाप लावणे हे सोशल मिडिया ट्रायल साठी उपयुक्त असेल पण नेमके प्रकरण धसास लाण्यास त्याचा कितपत उपयोग होतो हा संशोधनाचा विषय होऊ शकतो....
जर ही प्रकरणे लवकरात लवकर निकाली काढण्यात नाही आली तर मात्र हे लोण पुर्ण देशात पसरण्याची शक्यता(भिती) नाकारता येत नाही.... एकतर्फी प्रेमातून आपल्याला नाकारणाऱ्ऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर ॲसिड फेकण्याचे लोण ९० च्या दशकात असेच पसरले होते.

माझे असे स्पष्ट मत आहे की भाजपाला कायदेशीर आयुधांचा आणि तरतुदींचा उपयोग करुन सुशासन करण्यात कसलेही स्वारस्य नाही आहे , आणि त्यांचा संपुर्ण भर हा व्हाॅटअबाउटरी वरच राहीला आहे....एखाद्या प्रकरणाचा सखोल तपास करुन त्यातील तथ्यांद्वारे पुर्णसत्य जनतेसमोर आणण्या ऐवजी मिडीया ट्रायल्स आणि सोशल मिडिया ट्रेंड्स चालवून आपणास हवे असलेले अर्धसत्य, आणि त्यावर आधारित पर्सेप्शन जनतेच्या मनावर जास्तीत जास्त कसे बिंबवावे याचाच प्रयत्न भाजपा आजवर करीत आलेली आहे.... कारण पुर्णसत्या मध्ये दोन्ही बाजूंच्या काही चुकीच्या गोष्टी असतात तर काही बरोबर...पण ज्याला एकांगी पणे फक्त स्वतःचीच बाजू बरोबर आणि समोरच्याची बजू फक्त चुकीचीच हे ठसवायची असेल तो पुर्णसत्य शोधण्याच्या आणि जनतेच्या समोर आणण्याचा भानगडीत पडेलच कशाला? >> पूर्णपणे सहमत!!

भाजपीग्ज आणि त्यांचे भक्त हे नेहमीच व्हाॅटअबाउटरी करत फिरत असतात. सर्वशक्तिमान सरकार केंद्रात आहे तर विचारा जाब राजस्थान, छत्तीसगढ सरकारला, टाका ममताला आतमध्ये. पण तिथे बघा, त्याविरोधात लिहा तरच माणिपूरबद्दल बोलायचा हक्क आहे ही बोंब ठोकने बंद करा.

Pages