मणिपूर : केंद्र सरकारने उचलले कडक पाऊल. धन्यवाद मोदीजी.

Submitted by अलीबाबा on 20 July, 2023 - 01:16

sls.jpg

डबल इंजिन सरकार असलेल्या मणीपुरातला कुकी महिलांवरील अघोरी अत्याचारांचा व्हिडिओ आल्यानंतर मोदी सरकार खडबडून जागे झाले असून कडक पाऊले उचलली आहेत.

१. मणिपूरी महिलांच्या परिस्थितींवर भाष्य करणार्‍या सोशल मिडियावर होणार कारवाई.
२. सोशल मिडियावरून व्हिडीओ हटवण्याची कारवाई सुरू.

यापूर्वीही या प्रकारची कठोर पाऊल केंद्राने उचलली आहेत जसे:

जोशीमठाबद्दलच्या बातम्या बंद करणे.

चीनच्या आक्रमणाचा उल्लेख बंद करणे.

***

सरकारच्या धाडसी निर्णयाचे अभिनंदन

तुम्हा सर्वांच्या शिखंडीकरणाबदल तुमचे ही अभिनंदन!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फुरोगामी यांनी मागच्या पानावर दिलेला व्हिडिओ नेहेमीप्रमाणे खोटा आहे. >>>>>>
कुलकर्णी , तो व्हिडिओ खोटा असल्याचा काही पुरावा देता का ?
बाकीचं नंतर बोलू !
किंवा ऑनलाइन भीक मागणाऱ्या LKFC जुबेर ला विचारून बघा .
लवकरच पुरावा मिळेल अशी आशा आहे .

कुलकर्णी बघ !
व्हिडिओ खरा असल्याचे मिळतील तसे अजून पुरावे टाकतो !
तो व्हिडिओ खोटा असल्याचे सिद्ध कर नाहीतर दिलगिरी व्यक्त कर ( जे तुला आयुष्यात कधीच शक्य नाहीं )
Screenshot_20230722_190745_Twitter.jpg

भारतीय मीडिया चे कोणतेच पुरावे आम्ही वाचक लोक तरी ग्राह्य धरणार नाही.

व्हिडिओ खरा आहे हे सांगणारे किंवा व्हिडिओ खोटा आहे हे सांगणारे
भारतीय मीडिया वर विश्वास ठेवण्यास ती सध्या तरी लायक नाही.

आपला स्टँड कायम क्लिअर असतो. कधीही बलात्कारी, किंवा इतर कोणत्याही गुन्हेगारांच्या सपोर्ट साठी धावलो नाही. प्रत्येक गुन्हेगार आणि गुन्ह्याचा निषेध करण्याची आवश्यकता अजिबात नाही. सगळे गुन्हे निषेधार्ह असतातच. सगळे गुन्हे दुःखद असतातच. पण जिथे न्यायव्यवस्था आपले काम चोख करते तिथे तुम्ही निषेध करा व न करा काहीही फरक पडत नाही. जिथे सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालत तिथे मात्र निषेध करावा लागतो, जाब विचारावा लागतो. आणि, जी पार्टी बलात्कारी लोकांचे हारतुरे घालून सत्कार करते, ज्यांच्या राज्यात पोलीस पिडीत महिलेचे शव मुद्दाम रातोरात जाळून टाकतात, त्यांना हा छाती ठोकून निषेध निषेध खेळ खेळावा लागतो. चोराच्या मनात चांदणे म्हणतात की, तसेच.

मणिपूरच्या एका अत्याचाराचा हा विषय नाहीच आहे. त्या व्हिडिओमध्ये जे दिसले त्यावरून पूर्ण राज्यातच काय भयंकर प्रकार चालला आहे असे समजले, त्यामुळे इतकी मोठी प्रतिक्रिया आहे. अश्या अनेक महिलांवर अत्याचार झालेत, असे cm म्हणत आहेत. मे मध्ये झालेल्या गोष्टीचा जुलै मध्ये FIR केला गेला, ते पण सगळीकडून बोंबाबोंब झाल्यावर. अनेक लोक मारले गेलेत. त्यामुळे ह्या एका घटनेचा दुसऱ्या राज्यातल्या एका घटनेशी तुलना करण्याचा हेतू पूर्ण अशुद्ध आहे.

जर, पश्चिम बंगाल मध्ये पोलिसांनी त्या दलीत महिलेवर अन्याय होऊ दिले असे असेल तर ते निषेधार्ह आहेच आहे. अर्थात, हा व्हिडिओ पूर्णपणे अमित मालवीय आदी लोकांनी टाकला आहे. बंगाल DGP नी वेगळे निष्कर्ष मांडले आहेत. वाचा : https://www.outlookindia.com/national/two-women-stripped-assaulted-in-ma...
आणि, ममता बॅनर्जी भयंकरच आहे.

ममता बॅनर्जी ना आरे ला कारे करावेच लागत आहे.
BJP hi धोकादायक पार्टी आहे त्यांना सभ्य भाषा कळत नाही.
ममता बॅनर्जी बरोबर वागत आहे.
एकदा ह्यांचं सत्ता जावू ध्या ह्यांची लाखो प्रकरण बाहेर येतील.
नीच पणाची.
मग म्हणाल ममता खूप च प्रेमळ आहे

ट्रोल कडे दुर्लक्ष करूयात का ?

फुरोगामी यांनी मागच्या पानावर दिलेला व्हिडिओ नेहेमीप्रमाणे खोटा आहे. खोटे व्हिडिओ टाकणे व नंतर दिलगिरीही न व्यक्त करणे हे त्यांची नेहेमीची विकृत सवय आहे. मा अ‍ॅड्मिन, त्यांना कृपया समज देण्यात यावी. खरे तर ही दोन वाक्ये लिहावीत इतकीही त्यंची लायकी नाही, पण मायबोली सारखे व्यासपीठ खोटारड्या बातम्यासाठी वापरले जाऊ नये ही सदिच्छा !

Submitted by vijaykulkarni on 22 July, 2023 - 07: >>>>>>
कुलकर्णी ,
बंगाल मधील आदिवासी महिलांना निर्वस्त्र करून मारहाण करण्याचा व्हिडिओ खोटा असल्याचे तुमच्या दाव्याच्या पुष्ट्यार्थ तुमच्याकडे काही आहे का ?
नसेल तरी तुम्ही वर उल्लेखलेल्या फाफटपसारा बद्दल माफी मागायची गरज नाही , तुम्ही चार पाच दिवस गायब झालात तरी आम्ही समजून घेवू .
बाय द वे , ते वारंवार Admin कडे तक्रार करण्या आगोदर स्वतःची इमेज सुधरवा म्हणजे तक्रारीला अर्थ राहिलं .

आताच गोदी अर्णबच्या चॅनेल वर माणिपूरची बातमी दाखवली. डेव्हिड नावाच्या माणसाचे शीर धडावेगळे करून ते कुंपणावर अडकवून ठेवण्यात आले. 2 का 3 जुलै ची घटना आहे

अर्णव .
जो चरसी लोकांसारख हातवारे करून बातम्या सांगतो तोच का

फु, बंगालची घटना (खरी असेल तर) निषेधार्ह आहेच. पण स्त्रिया बाबत घटना घडणे ह्या पलीकडे दोन्ही मध्ये काय साम्य आहे? बंगालमध्ये वंशवादी दंगल झाली का? 77 दिवस तिथे काही कारवाई झाली नाही का? त्याबद्दल बोलताना गुजरात हरियाणा बद्दल काही बोललं गेलं का?

खरी असेल तर असे म्हणतो कारण तो व्हिडीओ पहिल्यांदा अमित मालवीय ने टाकला, जो फेक व्हिडीओ साठी नावाजला जातो

बंगाल ची मंत्री बाई ने ती घटना मान्य करून भाजप ने यात राजकारण आणू नये चा मोलाचा सल्ला द्यायला ती विसरली नाही .
हा पण ममता ने मणिपूर बद्दल राजकारण केले तर चालते बर का !
ते मणिपूर घटने बद्दल इथे तो व्हिडिओ खरा असेल तर कोणी म्हणाले का हो ?
दलीत महिलाबद्दल घटना असून देखील बातमीच्या सत्यते बद्दल इतका संशय ? केवळ भाजप वर आसूड ओढण्यासाठी ? थोडाफार तरी सेल्फ रिस्पेक्ट ठेवा ......

Happy
हेमंत गटणे , मी कधीच स्वतःहून पर्सनल अटॅक करत नाही .
त्यामुळे तुझा आय डी सांभाळ , countdown चालू होईल बरं का !

पुरोगामी .
मी कच्चा nimbu नाही.
खरा देशप्रेमी आहे.
साफ खोटे बोलणे,ह्या बोटाची थुंकी त्या बोटावर उडवणे.
स्वार्थ काय तर द्वेष विविध जातो , धर्म विषयी.
आणि आयटी सेल कडून पक्षा कडून मिळणारे मानधन.
तुझ्या पेक्षा हे मी चांगले करेन.
पण देशाची सध्या लोकशाही च धोक्यात आहे.
त्या मुळे राजकारण,राजकीय पक्ष गेले चुलीत.
हे समजून प्रतिसाद देत आहे

मुकेश माचकर नावाच्या पुरोगामी (ह्या ह्या ह्या!) पत्रकाराचे काही लेख मायबोलीवरही admin मंडळींनी फार कौतुकाने प्रसिद्ध केले आहेत. माचकरने ही पोस्ट मणिपूरबद्दल केली. त्यावर अनेक पुरोगामी, डाव्या, स्त्रीवादी लोकांनी दात विचकत आणखी उत्साही पोस्ट केल्या. आता एफआयआर झाला आहे म्हणे.
आधीही लिहिलं असं, या लोकांना त्या मणिपूरच्या पीडितेची काहीही पडलेली नाही. फक्त राजकीय स्कोअर सेटल करायला बघत आहेत. वाढीव आरक्षण व राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रातले पुरोगामी मणिपूरपेक्षाही खालच्या लेव्हलला सहज उतरतील. वर मायबोलीवर सत्यप्रयोगनंद करतात तसं 'कुठेतरी प्रतिक्रिया येणारच ना'म्हणत समर्थनही करतात.
img_1_1690041636476.jpg

प.बंगालमधील घटना कधी घडली? त्या तारखेपासून ७५ दिवस मोजा आणि तोवर ममताने काही कारवाई केली नाही, तर इथे येऊन सांगा. मग ममतांचा निषेध करून >>>> ही पण एका प्रकारे व्हाॅटअबाउटरीच झाली... या घटनेबद्दल तसेच इतर अशा घटनेंबद्दल आणि त्यातील तथ्यांबद्दल कुचराई झाल्यास उहापोह हा व्हायलाच हवा, प्रश्न हे विचारले जायलाच हवेत... त्यासाठी स्वतंत्र धागा उघडू शकतात...., पण पश्चिम बंगाल मधील घटनेत काही होत नाही आहे म्हणून मणिपूर च्या घटनांवर प्रश्न विचारणे किंवा vice versa प्रकरणात प्रश्न विचारणे कसे दुटप्पीपणाचे आहे असा कांगावा करणे ही लबाडीच आहे. बाकीचे विषय स्वतंत्रपणे धरा पण मणिपूर चा विषय सोडून चालणार नाही. त्यावर प्रश्न विचारले जाणारच.

हेच तर राजकारणी नसणाऱ्या,आयटी सेल चे पगारी नोकर नसणाऱ्या ..
सामान्य लोकांचे मत आहे
आणि असा फक्त देशाचा विचार करणारी लोक च आता हवी आहेत

White hat
धन्यवाद
बुरखा फाडला तुम्ही

मुकेश माचकर नावाच्या पुरोगामी (ह्या ह्या ह्या!) पत्रकाराचे काही लेख मायबोलीवरही admin मंडळींनी फार कौतुकाने प्रसिद्ध केले आहेत. माचकरने ही पोस्ट >>>>>>
हा ठाकरेंच्या मार्मिकचा कार्यकारी संपादक आहे , आणि त्याच्या वरिष्ठ एक महिलाच आहे रश्मी ठाकरे !
तरीही हा असं लिहितो ?

अर्णवने सोशल मिडीयची ताकद ओळखली वाटतं. जनतेचा न्यूज चॅनलवरील विश्वास उडाल्याचा धसका घेऊन चक्क केंद्र आणि मणिपूर सरकारवर आगपाखड करतोय.

कोण हे फडतूस मुकेश माचकर ? 'अ भा पुरोगामी संघटना' चे अध्यक्ष आहेत का? त्यांनी केलेल्या कोणत्याही विधानाला सर्व पुरोगामी लोकांचा पाठिंबा असलाच पाहिजे हे काय तर्कट ? त्यांनी जे काय म्हणले आहे त्याबद्दल काय ती कारवाई होईल. पण त्यांने असे म्हणले म्हणून मोदींची सर्व पापे धुवून निघाली आहेत का?

चर्चा मणिपूर आणि महिला अत्याचार यावर केंद्रित ठेवावी. केवळ कुणीतरी म्हणाले आहे, आणि त्यात मणिपूर नाव आहे म्हणून ते status येथे डकविणे हे विषयाला बगल देण्याच्या सराईत तंत्राचा भाग आहे.

इथे झाले, तिथे झाले , याने / त्याने असे म्हटले, तेव्हा काय करत हे सर्व अर्थहिन आहे. मणिपूर येथे घडलेल्या घटनेने प्रत्येक नागरिकाची मान शरमेने झुकायला हवी.

हे फडतूस मुकेश माचकर ? 'अ भा पुरोगामी संघटना' चे अध्यक्ष आहेत का? त्यांनी केलेल्या कोणत्याही विधानाला सर्व पुरोगामी लोकांचा पाठिंबा असलाच पाहिजे हे काय तर्कट ? त्यांनी जे काय म्हणले आहे त्याबद्दल काय ती कारवाई होईल. पण त्यांने असे म्हणले म्हणून मोदींची सर्व पापे धुवून निघाली आहेत का?>>>>>>>>>>
कुलकर्णी ला ट्रॅक बदलायची गरज पडलीच शेवटी ?
दिलगिरी व्यक्त करायला कमीपणा वाटतोय का ?

बंगाल मधील दलीत महिलांचा व्हिडिओ खोटा असल्याचे पुरावे सापडले की नाही ?
फक्त भाजप विरोध करण्यासाठी याने बऱ्याच वेळा खोटेपणाची हद्द निर्लज्जपणे ओलांडली आहे .

हो ! हो !
चर्चा फक्त मणिपूर मधील घटनेवरच व्हायला हवी असे ठामपणे सांगणारा उदय ने प्रत्येक धाग्यावर बिल्कीस बानो चा मुद्दा मांडला तरी चालते , आणि त्याला बाकीच्यांचे मुक अनुमोदन असते . त्या बद्दल कोणीही आक्षेप घेणार नाही .

राजस्थान , बंगाल मध्ये काँग्रेस आणि मित्र मंडळीचे सरकार असल्यामुळे तेथील पिडितांबद्दल आम्ही या धाग्यावर एक शब्दही बोलणार नाही , कारण आम्हाला फक्त भाजपशाशित राज्यांतील घटनांवर लक्ष केंद्रित करायचे हुकूम मिळाले आहेत .
भले आमच्यावर ढोंगी फेमिनिस्ट असल्याचे आरोप झाले तरी चालतील ......

Pages