Submitted by अलीबाबा on 20 July, 2023 - 01:16

डबल इंजिन सरकार असलेल्या मणीपुरातला कुकी महिलांवरील अघोरी अत्याचारांचा व्हिडिओ आल्यानंतर मोदी सरकार खडबडून जागे झाले असून कडक पाऊले उचलली आहेत.
१. मणिपूरी महिलांच्या परिस्थितींवर भाष्य करणार्या सोशल मिडियावर होणार कारवाई.
२. सोशल मिडियावरून व्हिडीओ हटवण्याची कारवाई सुरू.
यापूर्वीही या प्रकारची कठोर पाऊल केंद्राने उचलली आहेत जसे:
जोशीमठाबद्दलच्या बातम्या बंद करणे.
चीनच्या आक्रमणाचा उल्लेख बंद करणे.
***
सरकारच्या धाडसी निर्णयाचे अभिनंदन
तुम्हा सर्वांच्या शिखंडीकरणाबदल तुमचे ही अभिनंदन!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आकार पटेल ह्यांनी मोदींच्या
आकार पटेल ह्यांनी मोदींच्या वागणुकीचे केलेले विश्लेषण
Why Modi Avoids Acknowledging Problems
https://www.rediff.com/news/column/aakar-patel-why-modi-avoids-acknowled...
जरुर वाचा.
Feed the dog's !
.
आकार पटेल चा लेख अगदी
आकार पटेल चा लेख अगदी पटण्याजोगा आहेच
India is no more the fastest-growing large economy. Saudi Arabia is with 8.7 per cent growth in 2022, followed by Vietnam at 8 per cent. In the first quarter of 2023, the Philippines bettered India, at 6.4 per cent.'
(No subject)
असं कोण कबूल करायला लागलंय ?
असं कोण कबूल करायला लागलंय ? भाषेवरून कोण कुणाचा आयडी आहे हे कळतं की. >>> माझा आयडी कुणाचा डुआयडी आहे सांगा बरं??
असू द्या !
असू द्या !
असू द्या !!!!!
प्रतिवाद करताना पुन्हा सरकारी डेटा मागू नका .>>> असं का? व्हेरीफाईड डेटा असण्यात/ पुरवण्यात काय वाईट आहे??
Union minister RK Ranjan
Union minister RK Ranjan Singh’s house in Manipur attacked again. क्रोध आणि पिडेचे लोणचे घातले बहुधा
पंतप्रधान नी राजस्थान ,बंगाल
पंतप्रधान नी राजस्थान ,बंगाल चे नाव घेण्या पेक्षा.
मणिपूर मध्ये जितक्या पण अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत.
त्याची चोकशी करून,fir झाला नसेल तर fir करून सर्व गुन्हेगार काहीच दिवसात जेल मध्ये डांबले जातील .
असे जाहीर करायला हवे होते.
तिथे हजारो घटना ह्या प्रकारच्या नक्कीच घडल्या आहेत.
कोणी सुटला नाही पाहिजे.
इतके पंतप्रधान बोलले असते तर लोकांनी त्यांना डोक्यावर घेतले असते.
विरोधी पक्षाकडे विरोध करण्याचे कोणतेच कारण राहिले नसते
एक गोष्ट सर्वांच्या लक्षात
एक गोष्ट सर्वांच्या लक्षात आली असेल.
१) CAA कायदा किती तरी विरोध झाला सरकार वर आरोप झाले पण पंतप्रधान गप्प च .
२), UCC वर सरकार वर आरोप होत आहेत पंतप्रधान त्या वर काहीच बोलत नाहीत.
गप्प च.
३) शेतकरी कायद्या विषयी पण तेच.
४), सरकारी यंत्रणा ED, सीबीआय ह्यांचं गैर वापर होत आहे त्याचा विरोध विरोधी पक्ष करत आहेत.
पंतप्रधान गप्पच.
५) आता मणिपूर त्या वर तेच तोंड बंद.
ह्या सर्व प्रकरणाचा विरोध विरोधी पक्षांनी केला पण सरकार काहीच प्रतिक्रिया देत नसल्या मुळे.
त्या प्रकरणाची गांभीर्य च निघून गेले .
लोक अल्प बुद्धीची असतात.
नवीन काही घडले की मागचे विसरून जातात.
हया मानसिकतेचा फायदा तर bjp घेत नाही ना.
या विश्वातील सर्वात मोठे सत्य
या विश्वातील सर्वात मोठे सत्य तुम्हाला कळलेलं दिसतंय ....
लोक अल्प बुद्धीची असतात
प्रेमाचा संदेश द्या सगळ्यांना
प्रेमाचा संदेश द्या सगळ्यांना. मिळून मिसळून रहा. विनाकारण एकमेकांशी भांडत बसू नका. आयुष्य फार छोटेसे आहे. मी उद्या नसणार आहे. तुम्ही बहुतेक असाल. कदाचित नसाल पण. सांगू नाही शकत. हसत खेळत राहा.
प्रेमाचा संदेश द्या सगळ्यांना
प्रेमाचा संदेश द्या सगळ्यांना. मिळून मिसळून रहा. विनाकारण एकमेकांशी भांडत बसू नका. आयुष्य फार छोटेसे आहे. मी उद्या नसणार आहे. तुम्ही बहुतेक असाल. कदाचित नसाल पण. सांगू नाही शकत. हसत खेळत राहा.
<<
अरे बाप्रे!
का हो? काय झालं असं? असं माबो सोडून जाऊ नका.
Submitted by फुरोगामी on 24
Submitted by फुरोगामी on 24 July, 2023 - 13:38
<<
अल्प बुद्धीचा परिचय / बेंचमार्क.
आता मी विषयांतर करणारच !
आता मी विषयांतर करणारच !
विनाकारण टार्गेट करतोय ना
अली , त्या पाकिस्तान इस्लामिया कॉलेज ची न्युज वाचली का ?
वरिष्ठ प्रोफेसर , अधिकाऱ्यांच्या मोबाईल मध्ये कॉलेज मधील मुलींचे ५००० पॉर्न व्हिडिओ सापडलेत .
पास करून देण्याचे आमिष , तर महिला शिक्षिका ना बढतीचे आमिष !!!
नसानसात विकृती पसरली असेल ना रे ?
सेम अजमेर कांड , पण पाकिस्तान मध्ये कुंपणानेच कुरण खाल्ले !
https://arynews.tv/islamia-university-scandal-involving-5000-obscene-vid...
<< प्रेमाचा संदेश द्या
<< प्रेमाचा संदेश द्या सगळ्यांना. मिळून मिसळून रहा. विनाकारण एकमेकांशी भांडत बसू नका. आयुष्य फार छोटेसे आहे. मी उद्या नसणार आहे. तुम्ही बहुतेक असाल. कदाचित नसाल पण. सांगू नाही शकत. हसत खेळत राहा.
Submitted by बोकलत on 24 July, 2023 - 14:14 >>
------- बोकलत, संदेश आवडला, पाळण्याचा प्रयत्न करेन.
१ आतापर्यंत भाजपायी मणिपूर
१ आतापर्यंत भाजपायी मणिपूर मधल्या कुकर्मावर व्हॉट अबाउट्री करत होते. आता त्यांनी झाल्या प्रकाराचं समर्थन करायला सुरुवात केली आहे.
संरक्षण दलाच्या जवानांना घेराव घालणार्या , कपडे काढू अशी धमकी देणार्या स्त्रियांचे व्हिडियो फिरवताहेत. २००४ मध्ये सशस्त्र दलाकडून एका मणिपुरी स्त्रीवर अत्याचार करून तिला गोळ्या घालून मारलं गेलं. त्यावेळी काही स्त्रियांनी आसाम रायफल्स विरोधात ईंडियन आर्मी रेप असे पोस्टर घेऊन नग्न निदर्शने केली. हे दृश्यही आता वापरलं जातंय. पण यातली आयर्नी अशी आहे की हे करणार्या मैतेई स्त्रिया आहेत. आणि आता त्याच कुकी मुलींना पकडून मैतेई पुरुषांच्या हवाली करत आहेत. यांच्यावर बलात्कार करा, यांना हाणा, ठार करा अशी चिथावणी देत आहेत. अर्थात स्त्रियांची नग्न धिंड काढ ण्याच्या प्रकाराचं समर्थन करणार्यांना या गोष्टी माहीत नसतीलच असं नाही. त्यातला एक कुप्रसिद्ध मि. सिन्हा ,, ज्याचं नाव इथे आलं आहे आणि ज्याला लाखभर फॉलोअर्स आहेत.
२. ४ की ५ मे रोजी मणिपूर मधल्या एका भाजप आमदारावर जमावाने हल्ला केला. त्याचं डोकं फोडलं. तो आज व्जेजिटेटिव्ह अवस्थेत पडून आहे. त्याला धड बोलता येत नाही, अन्न खाता येत नाही. आणि हा आमदार असूनही सरकारने त्याला वार्यावर सोडलं आहे. हा आमदार कुकी जमातीचा आहे, हे सांगायला हवं का? दोन भाजप आमदार बोलले आहेत. एकाने मणिपूर सरकारसाठी complicity हा शब्द वापरलाय. दुसर्याने हे सरकारच घडवून आणतंय असं म्हटलं.
३. आद्य मोदीभक्त तवलीन सिंग या मोदीच्या ३८ सेकंदाच्या वक्तव्याने इम्प्रेस झाल्या. त्यांना त्यात नेतृत्व गुण दिसले. त्यांनी एक आठवण सांगितली. २०१६ मध्ये त्या मोदीला भेटल्या होत्या. तुम्ही अखलाखच्या मॉब लिंचिंगबद्दल का बोलला नाही, असं विचारलं.
त्यावर मोदीने सांगितलं, अशा वाईट घटना रोज कुठे न कुठे होतच असतात. मी त्यावर बोलत बसलो, तर मला दुसरं काही करायला ला वेळ मिळणार नाही.
क्रिकेटर शिखर धवनने आपण अंगठा दुखावल्याने वर्ल्ड कप मध्ये खेळू शकत नाही अशी खंत व्यक्त केली त्यावर मोदीने ट्वीट करून त्याचं सांत्वन केलं.
चीन मणिपूरमध्ये काड्या करतंय
चीन मणिपूरमध्ये काड्या करतंय . ते तिथल्या मिलिटंट्सना शस्त्रे पुरवतात असं एका साध्याभोळ्या भाजप समर्थकाने आताच्या प्रकाराबद्दल सांगितलं. बरं पण हे थांबवायचं काम कोणाचं? आणि चीन तिथे काड्या करायला टपलंय तर अशा राज्यात गडबड होऊ नये म्हणून प्रयत्न करायचे की गडबड करणार्यांना प्रोत्साहन द्यायचं?
एक चीज हमें समझना होगा की
एक चीज हमें समझना होगा की हम जिस रूप में स्त्री के शरीर को नॉर्थ इंडिया और वेस्ट इंडिया में देखते हैं उस तरीके का कल्चरल काँटेक्स्ट उधर नहीं है. थोडासा अग्रेशन वहाँ जादा है. हम बॉडी को अॅज अ साइट ऑफ स्ट्र्गल देखते हैं. कई बार मणिपूर जैसे प्रदेशों में मणिपूर को एक वेपन की तरह युज किया जाता है - शुभ्रस्था.
टीव्ही चॅनेल्सवर पोलिटिकल अॅनालिस्ट म्हणून बोलवल्या जाणार्या भाजप समर्थकांपैकी एक
आसाम रायफल ची हत्यार कुकी
आसाम रायफल ची हत्यार कुकी लोकांकडे आहेत.
ती पुरवली की चोरली हा प्रश्न आहे.
आसाम रायफल बद्दल मणिपूर मधील लोकांत अविश्वास आहे.
ती आसाम रायफल हटवून .सैन्याच्या
शीख किंवा मराठा, किंवा बिहार रेजिमेंट कडे मणिपूर ची सुरक्षा दिली पाहिजे
अगदी अगदी खरे लिहायचे झाले तर
अगदी अगदी खरे लिहायचे झाले तर.
ज्या घटनेशी आपला काहीच संबंध नसतो.
त्या घटनेची कोणतीच झळ आपल्याला बसत नसते.
तेव्हा च आपण अती उच्च दर्जा ची निती मूल्य जगाला सांगत असतो किंवा तशा भावना व्यक्त करतो.
लोकशाही म्हणजेच बहुसंख्य लोकांनी निवडून दिलेले सरकार.
ही पद्धती आदर्श तेव्हाच असते जेव्हा मतदान करणारा व्यक्ती कोणत्याच जाती,धर्म, वैयातिक स्वार्थ ह्याच्या प्रभावाखाली न येता सद्सद्ववेक बुध्दी वापरून .
मतदान करतो.
पण कोणत्या ही लोकशाही देशात इतकी उच्च दर्जा ची लोकशाही अस्तित्वात च नाही.
आणि ती कधी असणार पण नाही.
कारण माणसा कडून ही अपेक्षा ठेवणेच अनैसर्गिक आहे.
माणूस प्रचंड स्वार्थी प्राणी आहे.
हिंदू एक झाले की आरामात सत्ता मिळते हे सत्य आहे .
कारण हिंदू भारतात बहुसंख्य आहेत.
अगदी मुस्लिम,बाकी धर्मीय ,अगदी sc/st जरी नाराज झले तरी.
उच्च जाती आणि ओबीसी च्या जोरावर आरामात सत्ता मिळू शकते.
मणिपूर मध्ये पण तेच गणित आहे .
कुकी ख्रिस्त आहेत म्हणून त्यांच्या वर अन्याय होत आहे..
हे विरोधी पक्षणा बोलायला मजबूर केले जात आहे.
आणि तसेच घडतं आहे.
ह्याचा दुसरा पार्ट.
Maiti Hindu आहेत आणि हे ख्रिस्त लोक त्यांच्या वर अन्याय करत आहेत.
हा विचार पसरवणे..
Maiti न च्य मतावर आरामात मणिपूर जिंकता येते.
सदसद्विवेकबुद्धी वापरण्याची अक्कल जो पर्यंत माणसात येत नाही
तो पर्यंत लोकशाही ही राजेशाही पेक्षा जास्त धोकादायक अल्प संख्यांक लोकांसाठी
हेमंत, सही जा रहे हो.
हेमंत, सही जा रहे हो.
समाज सुधारणा करणारी पाढच्य
समाज सुधारणा करणारी लोक पाठच्य शतकात होवून गेली अगदी .निस्वार्थी.
त्यांच्या कष्टाची फळ म्हणून थोडी तरी स्थिती बरी आहे.
आज खरा समाजसुधारक व्यक्ती च नाही.
जे आहेत मुखवटे घातलेले ते सर्व कोणाचे तरी गुलाम आहेत.
न्याय व्यवस्थे ला मर्यादा आहेत.
सरकार सर्व शक्तिमान आहे.त्या मुळे न्यायालय आदर्श प्रशासन व्यवस्था कधीच आणु शकणार नाहीत.
राजसत्ता च आदर्श व्यवस्था निर्माण करू शकते
BJP ला चांगले माहीत आहे
BJP ला चांगले माहीत आहे.विरोधी पक्ष किती ओरडले,त्यांनी ओरडवे हेच अपेक्षित आहे.
Bjp ची मत कमी होणार नाहीत.
बेरोजगारी,महागाई ,gst ह्याचा सर्व समाजावर परिणाम होतो.
पण त्या विषयाला च कलाटणी दिली गेली आहे.
आणि देशाचे राजकारण परत जाती धर्मा कडे च वळवले आहे.
महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम हा मुद्धा जास्त प्रभावी ठरत नाही.
म्हणून sc St विरुद्ध हिंदू हा पॉइंट पण बरोबर असावा लागतो.
म्हणूनच बाळासाहेब आंबेडकर ह्यांना bjp ची B team म्हंटले जाते.
कोणत्या तरी गावातील कमान पाडली म्हणून सरपंच वर atrocity फडणीस ह्यांच्या आदेशाने लावली आहे.( हा सार्वजनिक विषय आहे सरळ दीन जाती ना विभगतो)
पण लोक फडणवीस ह्यांना विसरणार आणि antrocity लक्षात thevnar.
ओबीसी सहित हिंदू एक होणार
Bjp योग्य वेळी तो गुन्हा मागे घेणार.
किती की बोंबला सत्ता BJP चीच येणार
इतका विश्वास त्यांना आहे
दक्षिण भारतातील एका राज्यातील
दक्षिण भारतातील एका राज्यातील एका ही पक्षाच्या नेत्याने मणिपूर विषयी काहीच स्टेटमेंट दिले नाही.
महाराष्ट्रात .
शरद पवार ,अजित पवार, नी काहीच statement दिले नाही.
काँग्रेस शासित राज्यात एक पण मोर्चा निघाला नाही.
समाजवादी,bsp, RJD ह्यांनी पण रस्त्यावर येवून एक पण मोर्चा काढला नाही.
ह्याचा काय अर्थ आहे.
हे सर्व मुरलेले राजकारणी आहेत..
देश बुडला तरी चालेल पण आपला राजकीय फायदा झाला पाहिजे..
सेना राजकारणात मुरलेली नाही म्हणून फक्त संजय राऊत च बोलत आहेत.
जरा विचार करा
■ मणिपूर आणि गिधाडं
■ मणिपूर आणि गिधाडं
मणिपूरमध्ये जे झालं ते अजिबात समर्थनीय नाही! भारतात कुठेही झालं, कोणीही केलं तरी समर्थनीय नाही. आरोपींना कडक शिक्षा झालीच पाहिजे!
पण झाल्या प्रकारावर भारतासकट पार जर्मनी जपान मलेशिया सिंगापूरवरून नरडे ताणणाऱ्या पुरोगामी लोकांनी "मणिपूरवर का बोलत नाहीत" वगैरे जो आटापिटा मांडलाय तो गमतीशीर आहे. विचित्र आहे. आणि नेहमीप्रमाणे सोयीस्कर आहे. तुम्हाला काय वाटतं ह्या लोकांना त्या स्त्रियांचा पुळका आहे? ह्यांना फार काळजी आहे? हाड! ह्यांना फक्त नॅरॅटीव्हशी घेणं देणं आहे. ह्यांना घंटा कसला कळवळा नाही. तो असता तर प्रत्येक घटनेवर बोलले असते.
बंगालबद्दल हे गप्प असतात. राजस्थानात साडे-सहा हजार बलात्कार झालेत ह्या वर्षी त्यावर हे बोलत नाहीत. काश्मीर फाईल्स ह्यांना प्रॉपगंडा वाटतो. केरळात झालेल्या घटनेवर बोलायला गेलं ह्यांना केरळची बदनामी वाटते. "अटर बुलशीट" म्हणतात! का? तिकडे स्त्रिया नाहीत? का तिकडच्या स्त्रियांना अब्रू नाही? तिकडे भाजप नाही खापर फोडायला. ह्यांच्या नॅरॅटिव्हला सूट होत नाही त्यावर बोलणं!
बंगालमध्ये निवडणूक निकालानंतर सर्रास खून पडले. भाजपचा केवळ समर्थक आहे असं कळताच लोक झाडावर टांगले गेले. दाखवा ह्यांचे लेख किंवा कळकळ! शोधून सापडणार नाही. तितकं लांब कशाला? आत्ता परवा पंचायत निवडणुकीत काय गदारोळ झालाय पहा. त्यावर हे बोलतात? नाही. त्याच ममताला घेऊन केलेल्या युतीला "I.N.D.I.A" नाव देऊन मोदी विरुद्ध INDIAवर हे बौद्धिक मैथुन करत बसलेत!
केरळात संघाच्या कार्यकर्त्यांना कोयत्याने कापून फेकून देतात तेंव्हा हे काही बोलतात? छे! छत्तीसगडमध्ये काल परवा 20 दलित पुरुषांनी नग्न होऊन मोर्चा काढला. काँग्रेसच्या कोणा समर्थकाने एक अक्षर लिहिलंय? ज्या राज्यात भाजपची सत्ता आहे तिकडे फक्त ह्यांची माणुसकी न् कळकळ वर येते. एरवी?
शाहीनबागच्या वेळेला खोटा नॅरॅटीव्ह रेटून लोकांना भडकवणारे हे पुरोगामी नंतर हिंसाचार झाल्यावर मोदींना धारेवर धरते झाले आठवतंय? जाणून बुजून ह्यांनी CAA बद्दल अत्यंत खोटारडे दावे केले होते. दंगल भडकल्यावर साळसूदपणाचा आव आणून सरकारच कसं दमनकारी आहे वगैरे प्रॉपगंडा सुरू. ह्यांची मोडस ऑपरेंडी झालीय ही!
ह्या लोकांना कशाशी काही एक घेणं देणं नाही बॉस. ह्यांची माणुसकी, सामाजिक कळकळ, संवेदना "अटी लागू"च्या धडधडीत स्टॅम्प सकट उमटतात! अट एकच असते. झालेल्या घटनेचा उपयोग आपल्या नावडत्या सरकार किंवा राजकीय पक्षाविरुद्ध करता येतो का नाही! बास. तोंड वॉर करून हे लोक इतरांना भक्त वगैरे लेबलं वाटत हिंडतात. हे मारे विचारवंत, सेक्युलर, लिबरल, बुद्धिवादी, संविधानवादी म्हणवतात आणि ह्यांचे धंदे मात्र हे असे!
बाकी कुकी-नागा-मैतेयी-ST आरक्षण-हिंदू-ख्रिश्चन वगैरे पसारा खूप मोठाय. तो आता तुमच्या आमच्यातला प्रत्येकजण गूगल करून, वाचून, पाहून, ऐकून समजून घेईलच. त्यावर विस्ताराने लिहिता येईल. पण झाल्या प्रकारावर "आम्ही कित्ती कित्ती कित्ती मानवतावादी आणि मोदी न् त्यांचे भक्त कस्से बदमाश" वगैरे लोचटपणा करून उजव्या लोकांना जो गिल्ट देण्याचा प्रकार सुरू आहे, नॅरॅटिव्ह रेटण्याचा प्रकार सुरू आहे तो फार प्रेडिक्टेबल आहे! कोणाला सावरकरांवर, कोणाला मनुस्मृतीवर, कोणाला हिंदू संस्कृतीवर दोष ढकलायचा आहे. कोणाला संघावर, कोणाला मोदींवर, कोणाला ह्या देशावरच दोष ढकलायचाय! राजकीय आणि वैचारिक स्कोर सेटल करता येत असेल तर अश्या घटना फक्त इष्टापत्ती म्हणून घेतल्या जातात!
पुढचं मत पुढे! तूर्तास तात्पर्य इतकंच की गिधाडं गोळा झाली आहेत. आणि माणूस मेला की गोळा होणारी गिधाडं संवेदना दाखवायचा फक्त आव आणू शकतात. त्यांचा हेतू मात्र वेगळा असतो!
सुरज उदगीरकर
नाही हेमंत. भाजप सोबत
नाही हेमंत. भाजप सोबत नसलेल्या बहुतेक पक्षाच्या नेत्यांनी काही ना काही स्टेटमेंट दिलेलं आहे. महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानसभेत वॉक आउट केलं. केरळ, तमिळनाडू, बिहार , झारखंड , प बंगाल या राज्यांत मोर्चे निघाल्याच्या बातम्या दिसल्या. या सगळ्या पक्षाच्या खासदारांनी संसदेत चर्चा व्हावी आणि पंतप्रधानांनी सभागृहाला उत्तर द्यावं म्हणून आग्रह धरला आहे.
ब्रिजभूषणला महिला आणि
ब्रिजभूषणला महिला आणि बालकल्याण मंत्री करण्यात यावे
खरं तर तो "मैला कल्याण" मंत्री होण्याच्या लायकीचा आहे
माझ्या मते तमाम सत्ताकारणी
माझ्या मते तमाम सत्ताकारणी विष्टेतील किडे आहेत, फरक इतकाच कि काही गाईच्या विष्टेतील तर काही मानवी विष्टेतील
भाजपायी सांगतात तसा हा मुद्दा
भाजपायी सांगतात तसा हा मुद्दा मैतेईंना आरक्षण देण्याचा नाही आहे. इथले काही आयडी त्यांचे ठरलेले आवडते मुद्दे घेऊन प्रत्येक प्रकरण त्याभोवती फिरवतात. आदिवासींना जमिनीसंबंधी काही विशिष्ट हक्क आहेत. मैतेईंना आदिवासी घोषित केलं की आता जे आदिवासी मानले जातात त्या कुकी इ. जमातींच्या जमिनीवरच्या हक्कावर गदा येईल अशी त्यांना भीती आहे. मैतेईंना अनुसूचित जाती, ओबीसी आणि ईबीसी म्हणून सध्या आरक्षण मिळतंच आहे.
आदिवासींनी त्या निकालात मोर्चे काढल्यावर हिंसाचार उफाळाला. हा प्रकार पूर्वनियोजित वाटतो. गुजरातमध्ये उना आणि आपल्याकडे भीमा कोरेगावला गेलेल्या लोकांवर असेच हल्ले झाले होते आणि त्याची प्रतिक्रिया उमटल्यावर दलितांचेच हाल झाले. मणिपूर मध्ये याला हिंदू ख्रिश्चन हाही अँगल असल्याने आगीत आणखी तेल पडले.
मी वाचलेल्या काही फेसबुक पोस्ट्समध्ये खनिज, खाणकाम परवाने , अदाणी यांचेही उल्लेख आलेत. हे अजून पडताळून पाहिलेलं नाही.
हेमंत, तुम्ही आता काहीच्या
हेमंत, तुम्ही आता काहीच्या काही पोस्ट करत सुटताय. विषयाचा संबंध नाही, तुम्हाला नीट माहिती नाही तरी ठोकून देता.
इथे नको म्हणून लिहीले नाही. तुम्ही जो विषय आता काढला आहे तो योग्य धाग्यावर काढा. प्रत्येक धाग्यावर कुठलेही मुद्दे चिवडत बसण्याच्या सवयीने या धाग्यांना किंमत राहत नाही. जितका विषय आहे तितकंच बोला. थोडं फार विषयाला धरून अवांतर ठीक आहे. पण काहीच्या काही दर वेळेला कशाला ?
Pages