मणिपूर : केंद्र सरकारने उचलले कडक पाऊल. धन्यवाद मोदीजी.

Submitted by अलीबाबा on 20 July, 2023 - 01:16

sls.jpg

डबल इंजिन सरकार असलेल्या मणीपुरातला कुकी महिलांवरील अघोरी अत्याचारांचा व्हिडिओ आल्यानंतर मोदी सरकार खडबडून जागे झाले असून कडक पाऊले उचलली आहेत.

१. मणिपूरी महिलांच्या परिस्थितींवर भाष्य करणार्‍या सोशल मिडियावर होणार कारवाई.
२. सोशल मिडियावरून व्हिडीओ हटवण्याची कारवाई सुरू.

यापूर्वीही या प्रकारची कठोर पाऊल केंद्राने उचलली आहेत जसे:

जोशीमठाबद्दलच्या बातम्या बंद करणे.

चीनच्या आक्रमणाचा उल्लेख बंद करणे.

***

सरकारच्या धाडसी निर्णयाचे अभिनंदन

तुम्हा सर्वांच्या शिखंडीकरणाबदल तुमचे ही अभिनंदन!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्यांना लाज कशी वाटत नाही त्याचे आश्चर्य वाटते >>> कारण त्यांची कातडी गेंड्याची बनवण्यात आपल्या मधलेच असे बहूसंख्येने असलेले लोक आहेत जे, कोणत्या तरी personal insecurity चे निराकरण आपल्या मनावर उपचार करुन घेण्या ऐवजी बाहेर आपल्या सारख्याच इतर insecured मनाच्या लोकांच्या झुंडीत सामील होतात, असे केले म्हणजे निदान समूहसोबतीने(समूहाच्या बळाच्या आभासाने) आपल्या मनातील insecurity निघून जाईल अशा भ्रमात राहून झूंडशाहीने प्रश्नांची वासलात लावणाऱ्या नेत्यांना मतदान करुन निवडून देतात...अशी झुंडशाही जोवर त्या मुर्खांना चिरडायला उठत नाही तो पर्यंत प्रसंगी नैतीकता खुंटीला टांगून ते त्या समूहाच्या कृत्यांचे, व त्यांच्या झुंडशाहीचीच भलामण करत रहातात.

इतकी कशी गेंड्याची कातडी आहे या लोकाची. सगळा देश संतप्त झाला आहे आणि हे तोंडाला पट्टी बांधून निगरगट्टा सारखे बसलेत.

मणिपूरमध्ये जे झालं ते अजिबात समर्थनीय नाही! भारतात कुठेही झालं, कोणीही केलं तरी समर्थनीय नाही. आरोपींना कडक शिक्षा झालीच पाहिजे!
पण झाल्या प्रकारावर भारतासकट पार जर्मनी जपान मलेशिया सिंगापूरवरून नरडे ताणणाऱ्या पुरोगामी लोकांनी "मणिपूरवर का बोलत नाहीत" वगैरे जो आटापिटा मांडलाय तो गमतीशीर आहे. विचित्र आहे. आणि नेहमीप्रमाणे सोयीस्कर आहे. तुम्हाला काय वाटतं ह्या लोकांना त्या स्त्रियांचा पुळका आहे? ह्यांना फार काळजी आहे? हाड! ह्यांना फक्त नॅरॅटीव्हशी घेणं देणं आहे. ह्यांना घंटा कसला कळवळा नाही. तो असता तर प्रत्येक घटनेवर बोलले असते.
बंगालबद्दल हे गप्प असतात. राजस्थानात साडे-सहा हजार बलात्कार झालेत ह्या वर्षी त्यावर हे बोलत नाहीत. काश्मीर फाईल्स ह्यांना प्रॉपगंडा वाटतो. केरळात झालेल्या घटनेवर बोलायला गेलं ह्यांना केरळची बदनामी वाटते. "अटर बुलशीट" म्हणतात! का? तिकडे स्त्रिया नाहीत? का तिकडच्या स्त्रियांना अब्रू नाही? तिकडे भाजप नाही खापर फोडायला. ह्यांच्या नॅरॅटिव्हला सूट होत नाही त्यावर बोलणं!
बंगालमध्ये निवडणूक निकालानंतर सर्रास खून पडले. भाजपचा केवळ समर्थक आहे असं कळताच लोक झाडावर टांगले गेले. दाखवा ह्यांचे लेख किंवा कळकळ! शोधून सापडणार नाही. तितकं लांब कशाला? आत्ता परवा पंचायत निवडणुकीत काय गदारोळ झालाय पहा. त्यावर हे बोलतात? नाही. त्याच ममताला घेऊन केलेल्या युतीला "I.N.D.I.A" नाव देऊन मोदी विरुद्ध INDIAवर हे बौद्धिक मैथुन करत बसलेत!
केरळात संघाच्या कार्यकर्त्यांना कोयत्याने कापून फेकून देतात तेंव्हा हे काही बोलतात? छे! छत्तीसगडमध्ये काल परवा 20 दलित पुरुषांनी नग्न होऊन मोर्चा काढला. काँग्रेसच्या कोणा समर्थकाने एक अक्षर लिहिलंय? ज्या राज्यात भाजपची सत्ता आहे तिकडे फक्त ह्यांची माणुसकी न् कळकळ वर येते. एरवी?
शाहीनबागच्या वेळेला खोटा नॅरॅटीव्ह रेटून लोकांना भडकवणारे हे पुरोगामी नंतर हिंसाचार झाल्यावर मोदींना धारेवर धरते झाले आठवतंय? जाणून बुजून ह्यांनी CAA बद्दल अत्यंत खोटारडे दावे केले होते. दंगल भडकल्यावर साळसूदपणाचा आव आणून सरकारच कसं दमनकारी आहे वगैरे प्रॉपगंडा सुरू. ह्यांची मोडस ऑपरेंडी झालीय ही!
ह्या लोकांना कशाशी काही एक घेणं देणं नाही बॉस. ह्यांची माणुसकी, सामाजिक कळकळ, संवेदना "अटी लागू"च्या धडधडीत स्टॅम्प सकट उमटतात! अट एकच असते. झालेल्या घटनेचा उपयोग आपल्या नावडत्या सरकार किंवा राजकीय पक्षाविरुद्ध करता येतो का नाही! बास. तोंड वॉर करून हे लोक इतरांना भक्त वगैरे लेबलं वाटत हिंडतात. हे मारे विचारवंत, सेक्युलर, लिबरल, बुद्धिवादी, संविधानवादी म्हणवतात आणि ह्यांचे धंदे मात्र हे असे!
बाकी कुकी-नागा-मैतेयी-ST आरक्षण-हिंदू-ख्रिश्चन वगैरे पसारा खूप मोठाय. तो आता तुमच्या आमच्यातला प्रत्येकजण गूगल करून, वाचून, पाहून, ऐकून समजून घेईलच. त्यावर विस्ताराने लिहिता येईल. पण झाल्या प्रकारावर "आम्ही कित्ती कित्ती कित्ती मानवतावादी आणि मोदी न् त्यांचे भक्त कस्से बदमाश" वगैरे लोचटपणा करून उजव्या लोकांना जो गिल्ट देण्याचा प्रकार सुरू आहे, नॅरॅटिव्ह रेटण्याचा प्रकार सुरू आहे तो फार प्रेडिक्टेबल आहे! कोणाला सावरकरांवर, कोणाला मनुस्मृतीवर, कोणाला हिंदू संस्कृतीवर दोष ढकलायचा आहे. कोणाला संघावर, कोणाला मोदींवर, कोणाला ह्या देशावरच दोष ढकलायचाय! राजकीय आणि वैचारिक स्कोर सेटल करता येत असेल तर अश्या घटना फक्त इष्टापत्ती म्हणून घेतल्या जातात!
पुढचं मत पुढे! तूर्तास तात्पर्य इतकंच की गिधाडं गोळा झाली आहेत. आणि माणूस मेला की गोळा होणारी गिधाडं संवेदना दाखवायचा फक्त आव आणू शकतात. त्यांचा हेतू मात्र वेगळा असतो!
सूरज उदगीरकर

<< अवघड आहे. मिडिया वर कारवाई आणि इंटरनेट बंद हे आजकाल कॉमन झालय. हा कुठला उपाय आहे काय माहित. >>
------ किती नालायक / भ्रष्टाचारी आहोत हे जगाला कळायला नको...

<< तथापि, संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या अवघ्या एक दिवस अगोदर या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करणे हे “अनेक गूढतेने वेढलेले” असल्याचे त्यांनी सांगितले. >>
------- सोशल मिडियावर प्रसारित झाली नसती तरी तेव्हढीच निंदनीय घटना आहे. चौकशी करा आणि दोषींना शिक्षा द्या.

मी ज्याची वाट पाहत होतो तो आयडी आणि प्रतिसाद आला. प्रतिसादातला पण हा शब्द पाहताच ओळखलं होतं. पुढचा प्रतिसाद वाचला नाही. फक्त नाव वाचलं. अंदाज चुकला नाही.
ट्विटरवर नेशन फर्स्ट, प्राउड हिंदू, सनातनी म्हणवणार्‍या अनेक जणांना घडलेल्या प्रसंगाऐवजी व्हिडियो आता बाहेर येणं जास्त खटकतंय.
प्रसंग घडून अडीच महिने होऊन गेले. तिथे पोलिस हजर होते. त्या मुलींनी एफ आय आर नोंदवला होता. तरीही आरोपींना अटक करण्यासाठी व्हिडियो बाहेर येण्याचा मुहूर्त लागला. वांशिक दंगे सुरू झाले आणि कुकी जमातीचा आहे म्हणून मणिपूरच्या डीजीपीला अधिकारमुक्त केलं. त्याच्या जागी बाहेरून नवा माणूस बसवला. आता पोलिस दलाताच कुकी आणि मैतेई अशी फूट पडली आहे. मग राज्याचं नेतृत्व काय करतंय? गृहमंत्र्याने तिथे भेट देऊन काय केलं? सगळं आपल्या मनासारखं होतंय ना हे पाहिलं?
मणिपूरचा मुख्यमंत्री म्हणतो असे हजारो प्रकार घडलेत म्हणून मी इंटरनेट बंद ठेवलं. म्हणजे त्याला हे माहीत होतं. भाजप नेत्याचं घर जाळलं गेलं. भाजप आमदारच मुख्यमंत्र्याविरोधात दिल्लीला गेले. शेजारच्या राज्यातल्या भाजप नेत्याने या प्रकाराने व्यथित होऊन पक्ष सोडला.
मग देशाच्या गृहमंत्र्याला आणि पंतप्रधानाला माहीत नसेल?
मणिपूरच्या राज्यपाल विचारताहेत की लोक मला विचारताहेत हिंसाचार कधी थांबेल ? वातावरण शांत कधी होईल? ५००० घरं जाळली गेली. ३०००० लोक निर्वासित शिबिरांत आहेत. माझ्या आयुष्यात मी इतका हिंसाचार कधी पाहिला नव्हता. मी हे सगळं वर कळवलं होतं.
मणिपूरच्या ऑलिंपिक पदक विजेत्या महिला खेळाडूंनी पंतप्रधानांना अपील केलं. युरोपियन पार्लमेंटला यावर चर्चा करावी आणि ठराव मांडावा असं वाटलं. पण देशाच्या पंतप्रधानाला त्यात लक्ष घालायची गरज वाटली नाही.

मग या सगळ्यावर उपाय का केले नाहीत? आता तरी उपाय केले जातील याची काय खात्री?
मला भीती आहे की भाजपायींना आवडणार्‍या २००२ च्या गुजरात मॉडेलची ही सुधारित आवृत्ती आहे आणि ती उद्या देशभर आजमावली जाईल.

गुजरात दंगल आणि ही मणिपूर मधील दंगल दोन्ही एकसारख्या आहेत.
सरकारला च दंगल थांबावी,हिंसाचार होवू नये असे वाटत नाही.
सरकार पुरस्कृत हिंसाचार आहे हा.

मोदी मॉडेल.

भरत, जळजळीत वास्तव लिहिलंय तुम्ही. काय बोलावं यावर!
'पण' शब्द वाचून तुमच्या सारखेच विचार मनात आले

>>>>>> +100000000

भरत, जळजळीत वास्तव लिहिलंय तुम्ही. > +१.

----
सच्चा यांनी दिलेल्या लिंक्स उघडुन केवळ सुरवात ऐकली. गेंड्यांपेक्षाही भयंकर कातडी आहे. Sad

भाजपायींना आवडणार्‍या २००२ च्या गुजरात मॉडेलची ही सुधारित आवृत्ती आहे आणि ती उद्या देशभर आजमावली जाईल.## जनमताचा रेटा असाच मोदी विरोधात राहिला (टक्का वाढतो आहे हे नक्की) तर हे घडवून आणलं जाईलच

मणिपूरमध्ये पोलिस आणि इतर सशस्त्र दलांकडची ४००० हून अधिक रायफल्स, मशीनगन्स इ. शस्त्र आणि इतर सामग्री लुटली गेली आहे. याची सुरुवात ४ मे या दिवशी झाली. वरचा प्रकार ५ मे रोजी घडला.

बंगालबद्दल हे गप्प असतात. राजस्थानात साडे-सहा हजार बलात्कार झालेत ह्या वर्षी त्यावर हे बोलत नाहीत. काश्मीर फाईल्स ह्यांना प्रॉपगंडा वाटतो. केरळात झालेल्या घटनेवर बोलायला गेलं ह्यांना केरळची बदनामी वाटते. >>>>>>>>>>>
मणिपूर किंवा इतर कोणत्याही बलात्काराच्या घटना असू द्या त्या निंदनीय च आहेत . त्या दोन महिलांना निर्वस्त्र करून फिर्वणाऱ्या त्या जमावाला शोधून शोधून फासावर लटकवले पाहिजे हे नक्की.
पण मला एक गोष्ट नाही समजली मणिपूर मधील घटनेसाठी संपूर्ण भाजप , मोदी ला दोषी धरण्याचे कारण काय ?
भाजपच्या लोकांची मानसिकता तशीच असते असे उथळ आरोप करण्याचे कारण काय ?
शिवाय भाजप राज्यांशी संबंधित घटना असल्या की काही लोकांना जरा जास्तच चेव येतो , या प्रकारचे सिलेक्टिवली ढोंगी कनवाळू पण काय कामाचे ?

आसाम मधील महिला नेती अंगकिता दत्ता ने बी व्ही श्रीनिवास वर यौन शोषण चे आरोप केले तेंव्हा या सगळ्यांची आणि यांच्या मतीमंद राहुल ची देखील दातखिळी बसली होती . या वर भर म्हणजे त्या नेत्या विरोधात कारवाई करण्या ऐवजी त्या महिलेला काँग्रेस मधून हाकलून दिले .
इथे राहुल विरोधात बोलण्याचे धाडस ढोंगी फेमिनिस्ट शकले नाही .
कर्नाटक काँग्रेस चा सध्याचा मुख्यमंत्री सिद्धारामया भर सभेत महिला नेत्यांचे गाल गुच्चे घेतो , भाषण करत असलेल्या महीलंचे वरून खाल पर्यंत एक्स रे ने निरक्षण करतो यात त्या महिलांचा अपमान नाही का ?
पण ते या ढोंगी फेमिनिस्ट ना आणि त्यांच्या मतीमंद ला देखील गोड वाटत म्हणून त्याला मुख्यमंत्री पदाचे बक्षीस दिले गेले असणार ......

या. तुमचीच वाट बघत होतो. काल धीर झाला नाही ना हे लिहायला? आता दुसरे चीअरलीडर्स ऑफ गँग रेपिस्ट मैदानात उतरल्यावर आलात. चालू द्या.

सच्चा ह्यांनी दिलेल्या लिंक्स , ज्या हिंदी भाषेत आहेत, ही अशी चॅनेल युपी -बिहार मधील लोकं रेल्वेमध्ये आपल्या मोबाईल वर बघताना।पाहिलं आहे. ह्या लोकांना सतत तेच ऐकवलं गेलं की मेंदू धुतला जातोच त्यांचा.

मणिपूर मधील घटनेसाठी संपूर्ण भाजप , मोदी ला दोषी धरण्याचे कारण काय ? ## डबल।इंजिनाचा ढोल वाजवत कोण फिरतो?? मोदी पंतप्रधान आहे ना की भाजपचा नेता?हा प्रश्न विचारायला लाज वाटत नसेलच कारण ती डोक्याला गुंडाळून तुम्ही भाजपिग्ज फिरत असता, पण किमान मेंदूत शिंपला भर अक्कल तरी असेल ना?

ट्विटरवर काल भाजपचे बोलके पोपट त्या मुलींवर अन्याय करण्यासाठी एका मुसलमान माणसाला अटक झाली असे हर्षारवे सांगत होते. बातमी अर्थात चुकीची होती.

मुद्दा हा नाही की तो गुन्हेगार मुसलमान नाहीच, असेल तर होईलच अटक, तर हा की अश्या वेळेस सुद्धा आपला अजेंडा पसरवण्याचे काम थांबवत नाहीत ही लोकं. कुकी लोक ख्रिश्चन आहेत ह्यावरून सुद्धा प्रचार सुरू आहे.

कारण ती डोक्याला गुंडाळून तुम्ही भाजपिग्ज फिरत असता, पण किमान मेंदूत शिंपला भर अक्कल तरी असेल ना?>>>>>>>>
फक्त भाजप संबंधित घटना वर बोलण्याचा मक्ता तुम्हा खांग्रिपिग्स नी घेतलाय का ?
असा भेदभाव करायचाच आहे तर मग फेमिनिस्ट असल्याचे ढोल का वाजवता ?
दलीत मुलींवरील मुस्लिम नी केलेल्या अत्याचार नंतरच्या तुमच्या गँग च्या मौन ने तुम्हां लोकांचे डबल चेहरे खूप वेळा दिसून आले आहेत .

The state government has initiated an investigation to bring the culprits to book. Would this investigation be fair?
What (law and order) machinery and criminal justice system would carry out a fair investigation when the state (government) is party to the violence?
Don't you understand that you are being childish when you ask such questions!
------BJP MLA Paolienlal Haokip from Manipur's Saikot constituency ह्यांच्या मुलाखातील अंश.

भाजप संबंधित नाहके, निष्क्तीय केण्द्र सरकार आणि अकार्यक्षम पंतप्रधान!!

हल्ली स्वतःला प्रधान सेवक म्हण्वुन घेणं बंद केलं का?

*'मणिपूरच्या त्या महिलांसाठी बोला.'*
*-रविष कुमार*
*सर्व भारतीय प्रेक्षक आणि वाचक,*
शक्य आहे की आपल्यापैकी अनेकांनी मणिपूरचा तो व्हिडीओ पाहिला नसेल,ज्यात खूप सारे पुरुष काही महिलांना नग्न करून तिचं शरीर दाबत आहेत. पुरुषांचा जमाव निर्वस्त्र केलेल्या महिलांना पकडून घेऊन जात आहे. जमावाचे खुनी हात त्या महिलांच्या शरीरासोबत खेळत आहेत. असहाय्य आणि लाचार महिला रडताहेत. पुरुषांची गर्दी आनंद घेत आहे.
सभ्यतेच्या सामाजिक नियमांनुसार सोशल मीडिया साईट्स लवकरच या व्हिडीओचे प्रदर्शन थांबवतील. परंतु घडलेली घटना वास्तव आहे. घटनेचे तपशील तेच आहेत जे लिहिले आहेत.आपल्याला माहीत नाही की या व्हिडीओ नंतर त्या महिलांच्या सोबत काय झालं? जमावाची गर्दी त्यांना कुठून घेऊन येत होती? कुठे घेऊन जात होती? त्या व्हिडीओला सुरवात आणि शेवट नाहीये,फक्त मधला थोडा भाग आहे. कोणीही त्या व्हिडीओ कडे दुर्लक्ष करू शकत नाही. आज तुम्ही शांत राहू शकत नाही.
पुरुषांच्या जमावाने वेढलेल्या त्या निर्वस्त्र महिलांसाठी आज बोलावं लागेल. तुम्ही जिथे कुठेही असाल,बोला. बाजारात गेलात तर तिथे दुकानदाराशी बोला. रिक्षावाल्याशी बोला. ओला उबर कॅबच्या ड्रायव्हरशी बोला. वडिलांना फोन केला तर त्यांना सगळ्यात आधी हे सांगा. प्रेयसीचा फोन आला तर सगळ्यात आधी हे सांगा. वर्गात असाल तर उभं राहून तुमच्या शिक्षकांशी बोला. कोणत्या रेस्टॉरंट मध्ये मित्र मैत्रिणींसोबत मस्ती करत असाल तर खाणं थांबवून या महिलांसाठी बोला. बसमध्ये असाल, रेल्वेत असाल,विमानतळावर असाल तर तिथे सांगा की मणिपूर मध्ये असा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यात जमाव महिलांना निर्वस्त्र करून त्यांच्या शरीराशी खेळत आहे. ही घटना अशा देशात घडली आहे जिथे 'आमच्या इथे महिलांना देवी समान वागणूक देऊन तिची पूजा केली जाते.' हे खोटं वारंवार पसरवलं जातं.
आज जर या जमावाच्या विरोधात तुम्ही बोलला नाहीत तर त्या महिलांचं शरीर आणि मन नेहमी करता नागडं होईल. तुमचं न बोलणं, याचा अर्थ तुम्ही त्या गर्दीत सामील होणं आहे. तुमचं बोलण्याने तुम्ही महिलांना नग्न करून त्यांच्या शरीराशी खेळणाऱ्या पशूंच्या जमावात सामील होता. म्हणून फोन उचला, लिहा, सर्वाना सांगा की मणिपूरच्या महिलांच्या सोबत असं झालं. आम्ही याचा विरोध करतो.आमची मान शरमेने खाली जाते. मणिपूर मधील घटनेच्या विरोधात बोला.कोणी ऐकत नसेल तर बंद खोलीत त्या महिलांसाठी एकट्याने रडून घ्या.
मला माहितीये की मणिपूर मधील त्या महिलांची असहाय्यता आणि लाचारी तुमच्या पर्यंत पोहचणार नाही, कारण तुम्ही त्यांची हाक ऐकण्याच्या लायक राहिलेले नाही आहात. तुम्ही जे वर्तमानपत्र वाचता,जे चॅनेल पाहता, त्यांनी तुमची संवेदनशीलता मारून टाकली आहे. तुमच्या आतला चांगुलपणा त्यांनी संपवून टाकला आहे.
गोदी मीडिया मध्ये त्या महिलांचा आवाज उठेल की नाही मला माहित नाही. मला नाही माहीत की हे दृश्य पाहून आपले पंतप्रधान विव्हळ होऊन रडतील किंवा नाही? मला नाही माहीत की महिला विकास मंत्री स्मृती इराणी दिखाव्यासाठी तरी का होईना पण रडतील किंवा नाही? पण मला हे माहीत आहे की हा जमाव कोणी बनवला आहे. कोणत्या प्रकारच्या राजकारणाने बनवला आहे. या राजकारणाने तुम्हाला पशु बनवलं आहे.गोदी मीडिया ने त्यांच्या प्रेक्षक आणि वाचकांना माणूसघाणं बनवलं आहे.
जात,धर्म,भाषा,प्रदेशाच्या अस्मितेच्या राजकारणाने माणसालाच माणुसघानं बनवलं आहे. मणिपूरच्या महिलांना घेरून नाचणारा पुरुषांचा जमाव तुमच्या आजूबाजूला सुद्धा तयार झाला आहे. सोसायटीतील काका लोकांपासून सावधान रहा. आपल्या घरात दिवस रात्र विष पेरणाऱ्या नातेवाईकांपासून सावधान रहा. त्या सर्वांना जाऊन सांगा की की अस्मिता आणि द्वेषाच्या राजकारणाने देशाच्या जनतेला कशाप्रकारे या जमावात सामील केलं आहे. त्या 'मणिपूर'च्या महिला नाहीयेत.त्या कुकी महिला नाहीयेत. त्या फक्त महिला आहेत. जर ही घटना तुम्हाला अस्वस्थ करत नसेल,याने तुमचं शरीर कंप पावत नसेल तर तुम्ही स्वतःला मृत घोषित करून टाका.
पण शेवटचा श्वास घेण्यापूर्वी त्या महिलांसाठी बोलून टाका. लिहून टाका. कोणाला तरी सांगा की असं झालं आहे. या देशाच्या पंतप्रधानांनी मणिपूर मध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर गेल्या अडीच महिन्यात शांततेचे आवाहन केलेलं नाही. तिथे जाऊन द्वेष आणि हिंसा रोखण्याचे आवाहन केलेलं नाही. सरकारने त्याचं कर्तव्य पार पाडलं नाही. त्यांच्या जाण्याने किंवा आवाहनाने हिंसा थांबलीच असती याची काही गॅरंटी नाही. पण या चुप्पीचा काय अर्थ आहे? या चुप्पीचं समर्थन केलं जाऊ शकतं?
पंतप्रधानांची चुप्पी असू द्या.
*तुम्ही तुमची चुप्पी तोडा.*
*बोला.*
तुमचा,
रविष कुमार.
मराठी भाषांतर : कृतार्थ शेवगावकर
-20 जुलै 2023.

<< हल्ली स्वतःला प्रधान सेवक म्हण्वुन घेणं बंद केलं का? >>

------ कुणाचा सेवक? जनतेकडे तर पाठ करुन बसलेले आहेत.

अडाणी वर चर्चा नको म्हणून संसदेचे महत्वपूर्ण अर्थसंल्पिय अधिवेशन वाया घालविले ( < ३३ % संसदेचे कामकाज ) आणि प्रधानाने त्यांचे प्राधान्य कोणाच्या सेवेला आहे हे दाखवून दिले.

. तुमचीच वाट बघत होतो. काल धीर झाला नाही ना हे लिहायला? आता दुसरे चीअरलीडर्स ऑफ गँग रेपिस्ट मैदानात उतरल्यावर आलात. चालू द्या.>>>>>
चिअर लीडर्स ऑफ गँग रेपिस्ट ? ऑ ?
तुमच्या मगरीच्या अश्रूंचा पुर ओसरू द्यावा मग नंतर उतरू या असा विचार केला होता हो .
बाय द वे !
ते कुप्रसिद्ध फेमिनिस्ट तुम्हीच का शेफाली वैद्य च्या डोळ्यात लैंगिक भावना शोधणारे ?
कुठे शाब्दिक घाण करून ठेवली आहे ते जरा लक्षात ठेवून दुसऱ्यावर आरोप करत जा !

He is becoming sooo predictable .. like his topmost leader

जे काही सोशल मिडियावर चालू आहे, ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत त्या प्रातिनिधिक स्वरूपाच्या मानल्या तर हे जबाबदारी पुर्वक खात्रीने विधान करु शकतो की, अंधभक्त हे पुर्णपणे Gestapo's च्या मानसिकतेत पोहचले आहेत....मोदी आणि भाजपाच्या प्रचारतंत्राने त्यांना वैचारिक हीनतेच्या (आणि शक्य होईल तिथे ही कृतीतही उतरते) ज्या पातळीवर नेउन ठेवले आहे, त्याचा थांगपत्ताही त्यांना लागू नये अशा प्रकारे त्यांचा consciousness numb करुन ठेवला आहे.... it's really horrific when you think about coexistence with vast number of people with such minds. It's just matter of time, or an incedence that could trigger such minds in utter demons. :'(

Pages