"ए मेरे बचपन .. !" - लहानपणीच्या निरागस समजुती

Submitted by छन्दिफन्दि on 27 November, 2022 - 20:07
bachpan

"बायकांना सुंदर करायचं कार्य भवानी माता करते हे लहानपणी आमच्या मनावर इतकं ठसल होत की त्यानंतर कितीतरी वर्ष सुंदर स्त्री दिसली की हीचा मेकअप वर भवानी मातेनेच केलाय असच वाटायचं." हरी तात्या मधलं हे वाक्य ओठावर हसू तर आणतच पण बालपणीच्या भाबडेपणाची सैरच करून आणत.

ह्या त्यातल्याच काही समजुती !

***

शेजारची आजी "देवाघरी गेली" असं ऐकलं आणि तिला उचलून नेताना बघितलं.

माणूस देवाघरी कसा जातो ह्याच एक चित्र बाल मनात तयार झालं, माणसं त्या व्यक्तीला देवळात घेऊन जातात आणि देवळात ठेवून परत येतात. नंतर रात्री (दुसरा तिसरा कोणी नाही तर एकमेव) मारुतीबाप्पा येऊन हातावरून (जसा द्रोणगिरी पर्वत नेला होता तसा) देवाघरी घेऊन जातो.

***

नाटकामध्ये जेव्हा एखादं पात्र म्हणतं " चहा घेऊन येते.." तेव्हा वाटायच आत (विंगेत) एकदम मस्तपैकी स्वयंपाक घर आहे, तिकडेच चहा बनवून घेऊन येतात. पण तरी प्रश्न असेच " ह्यांचा चहा इतक्या पटकन कसा बनतो?

***

मराठी हिंदी सिनेमे बघून तर पक्की ठाम समजूत होती, प्रेमात पडलं की गाणी गायची, नव्हे नव्हे फुला- झाडाभोवती नाच पण करायचा.

एका मामाचा प्रेम विवाह ठरला, म्हणजे त्याने तसं जाहीर केलं. मग पहिला महत्वाचा पडलेला प्रश्न "हा मामा आणि होणारी मामी कोणत्या बरं बागेत नाच करत असतील, कुठलं गाणं म्हणत असतील ? "

***

" चलो भागके शादी करते है!" हा हिंदी सिनेमातला डायलॉग ऐकून तर पाठ झालेला. कोणी पळून जाऊन लग्न केलं म्हणजे बॅगा आधीच भरून ठेवलेल्या असतात. आणि अक्षरशः त्या भरलेल्या बॅगा घेऊन दोघं(आपापल्या घरून) पळत सुटतात आणि पळताना लग्न करतात अशी एक आपली भाबडी समजूत.

***

सुहाग रातचा सिन बघुन तर पक्की खात्री होती की

लाल साडीचा घुंगट उचलला आणि लाईट बंद केला की थोड्या दिवसांनी बाळ होत/ येतं.

***

ह्या वाचताना तुम्हाला पण नक्कीच तुमच्या लहानपणच्या भाबड्या समजुती आठवल्या असतील आणि हसू आवरले नसेल तर नक्की शेअर करा .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> सडासंमार्जन
>> पकडणाऱ्या माणसाचं नाव कालभैरव

Lol
आमच्या इकडे आस्तिक दुराई असे लिहीत दारावर ते आठवलं. आणि हि खूप खूप जुनी आठवण आहे. तसे लिहिल्याने साप दूर जातात ही आपल्या लहानपणीची आणि तेंव्हाच्या (काही) मोठ्या माणसांची सुद्धा समजूत होती Proud

लहानपणी वर्षा दोनवर्षांनंतर उन्हाळ्याच्या सुट्टीत मामा, मावशीच्या गावाला जायचो..जाताच आई-मावश्या एकमेकींना बघूनच रडायला लागायच्या..मला कळायचं नाही आपण मस्त सुट्टी एन्जॉय करायला आलोत आणि या का रडतात नेहमी...
होसुरला आल्यावर कळलं माहेर आणि माहेरची माणसं भेटल्यावरचं इमोशनल होणं..

लहान असताना पळून जाऊन लग्न केलेल्या ओळखीच्या, लांबच्या ओळखीच्या तायान बद्दल स्टोर्या ऐकल्या होत्या.अमुक तमुक घराबाहेर भांड्याचा हा ढीग घासताना दिसली, अमुक तमुक दिसली होती दळणाचा डबा घेऊन इतकी रोड झाली आहे, ही ती आहे तिच्या घरात साडीच नेसावी लागते म्हणे. या स्टोर्या इतक्या दुःखद वाटायच्या मला की मला लव्ह marraige म्हणजे छळ छावणी च नवीन रूप वाटायचं. म्हणजे जे लव्ह marraige करतात त्यांचे हाल हाल होतात अस वाटायचं :), त्यामुळे लहानपणीच भीष्मा सारखी प्रतिज्ञा घेतली मनात की लव्ह marraige करायचे नाही Lol

जे लव्ह marraige करतात त्यांचे हाल हाल होतात. >> मला आता कळलंय की जे लव्ह मॅरेज करत नाहीत त्यांचे पण हाल होतात. Light 1

हे म्हणजे भेटणे अशी लहानपणी समजूत होती. त्यामुळे मोठी माणसं "कुणालातरी भेटून आलो" किंवा "भेट घेऊन आलो" असे म्हणाली कि, ते असे गळ्यात गळा घालून मिठी मारून आले असतील आले असतील असे वाटायचे Lol

त्याला गळाभेट असे म्हणतात हे नंतर कधीतरी कळले. मृणालीने वरती आनंदाच्या क्षणी रडणाऱ्या मोठ्या माणसांची आठवण लिहिली आहे. ती खूप भिडली. लहानपणी लग्नसमारंभात किंवा कोणताही चांगला कार्यक्रम असेल तर मोठ्या स्त्रिया एकमेकींची अशी गळाभेट घेऊन रडताना दिसायच्या (विशेषतः आई-मुलगी किंवा बहिणी बहिणी वगैरे) क्वचित प्रसंगी पुरुष सुद्धा सद्गदित होत असंत. का ते तेंव्हा कळत नसे पण आज कळतंय Happy

आजकाल फक्त माणसंच नाही तर वस्तू देखील "भेटतात" असे सर्वत्र ऐकू येते.
काळाचा महिमा दुसरे काय?

वा function at() { [native code] }ल! संत गोरा कुंभाराचा एक अभंग आहे - निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे, त्यात अशी ओळ आहे - " म्हणे गोरा कुंभार | नाम्या तुझी भेटी | सुखासुखी मिठी | पडली कैसी". तुमची समजूत ह्यानुरूप आहे. Happy

१. लहानपणी श्रीदेवी आणि ऋषी कपूरचा नगिना चित्रपट आला होता, त्यावेळी चित्रपटगृहात नाग-नागीण येतात अशी अफवा होती.
२. वावटळीत मीठ हातात असेल तर तर भूत दिसते.
३. शाळेत असताना एकदा बरेच दिवस सर्व झाडांच्या पानांवर एक प्रकारची कीड पडलेली होती, त्यामुळे पानांवर सर्पाकृती होती. त्याचाही भरपूर अफवा पसरल्या होत्या.

मला कळायचं नाही आपण मस्त सुट्टी एन्जॉय करायला आलोत आणि या का रडतात नेहमी... >> हा सेम प्रश्न गेल्या आठवड्यात माझ्या 3 वर्षीय मुलाला पडला.. आज्जी आजोबांना बाय म्हणताना मला रडू आलं .. आज्जी त्याला मांडीवर घेऊन भावूक झाली.. मग गाडीत बसल्यावर त्याने विचारलं.. उत्तर देताना मलाच अवघड झालं - त्यांना आपली आठवण येईल ना म्हणून रडू येतं असं सांगितलं

माझी नाही पण माझ्या बद्दल एक समजूत होती लहानपणी एका मुलीची. माझे केस भुऱ्या कलर चे आणि कुरळे होते. मी आठवी नववी त असेन आणि ती मुलगी माझ्याच शाळेत पाचवीत होती. एके दिवशी धावत येऊन तिने मला विचारले ताई आमच्या इथल्या एका दादाने सांगितलं मला की तू दरवर्षी भुऱ्या आणि कुरळ्या केसांचा विग आणतेस नवीन आणि तो लावतेस, मला पण सांग ना कुठून आणतेस मला पण आणायचा आहे असला Sad मला इतका राग आलेला पण ती पोरगी इतक्या इनोसंट पणे विचारत होती कि मी राग कंट्रोल केला म्हनल तो कोण दादा आहे तो खोटारडा आहे त्याच ऐकू नको. मनात आलेलं त्या पोरीचा कोण तो दादा त्या दादाचे जाऊन केस उपटून त्याला विग घालायच्या लायकीच बनवाव आणि विचारावं का बाबा माझ्या बद्दल अफवा पसरवतोस

लहानपणी वाचायला यायला लागल्यावर आमच्या घरी असलेलं श्रीकांत गोवंडे यांचं '१२० गोष्टी' पुस्तक मी वाचत असे. त्यातल्या एका गोष्टीत 'त्याच्या हातात दुधारी तलवार होती' असा काहीतरी उल्लेख होता. तेव्हा 'दुधारी' म्हणजे त्यातून दूध येतं अशी माझी समजूत झाली होती.

Lol

मी लहानपणी बर्याचशा रिटेल स्टोर मध्ये गेल्यावर एक पाटी नजरेस पडत असे ती म्हणजे ' एकच भाव'. त्या वयात भाव म्हण्जे भाऊ हा एकच अर्थ माहित होता. मला कळत नसे कि हे दुकान वाले आपल्याला एकच भाऊ आहे हे दुकानात लिहून सर्व ग्राहकांना का सांगत असावेत. त्यामुळे कदाचित एकापेक्षा जास्त भाऊ असतील तर सरकार रिटेल स्टोर ओपन करू देत नसावेत असे मला बरीच वर्षे वाटत असे.

सोसायट्यांच्या गेटवर पाटी असते 'बाहेरील वाहनांना आत येण्यास मनाई आहे'. मुळात आधी तेव्हा मनाई या शब्दाचा अर्थ माहित नव्हता. मग आईला विचारल्यावर तिने अर्थ तर सांगितला, पण मग मला प्रश्न पडायचा. जर बाहेरील वाहने आत येऊ शकत नाहीत तर मग या ज्या (सोसायटीत पार्क केलेल्या) गाड्या आहेत त्या कशा काय आत गेल्या? आणि आता जर त्या गाड्या बाहेर आल्या तर परत आत कशा जाणार?

Pages