"बायकांना सुंदर करायचं कार्य भवानी माता करते हे लहानपणी आमच्या मनावर इतकं ठसल होत की त्यानंतर कितीतरी वर्ष सुंदर स्त्री दिसली की हीचा मेकअप वर भवानी मातेनेच केलाय असच वाटायचं." हरी तात्या मधलं हे वाक्य ओठावर हसू तर आणतच पण बालपणीच्या भाबडेपणाची सैरच करून आणत.
ह्या त्यातल्याच काही समजुती !
***
शेजारची आजी "देवाघरी गेली" असं ऐकलं आणि तिला उचलून नेताना बघितलं.
माणूस देवाघरी कसा जातो ह्याच एक चित्र बाल मनात तयार झालं, माणसं त्या व्यक्तीला देवळात घेऊन जातात आणि देवळात ठेवून परत येतात. नंतर रात्री (दुसरा तिसरा कोणी नाही तर एकमेव) मारुतीबाप्पा येऊन हातावरून (जसा द्रोणगिरी पर्वत नेला होता तसा) देवाघरी घेऊन जातो.
***
नाटकामध्ये जेव्हा एखादं पात्र म्हणतं " चहा घेऊन येते.." तेव्हा वाटायच आत (विंगेत) एकदम मस्तपैकी स्वयंपाक घर आहे, तिकडेच चहा बनवून घेऊन येतात. पण तरी प्रश्न असेच " ह्यांचा चहा इतक्या पटकन कसा बनतो?
***
मराठी हिंदी सिनेमे बघून तर पक्की ठाम समजूत होती, प्रेमात पडलं की गाणी गायची, नव्हे नव्हे फुला- झाडाभोवती नाच पण करायचा.
एका मामाचा प्रेम विवाह ठरला, म्हणजे त्याने तसं जाहीर केलं. मग पहिला महत्वाचा पडलेला प्रश्न "हा मामा आणि होणारी मामी कोणत्या बरं बागेत नाच करत असतील, कुठलं गाणं म्हणत असतील ? "
***
" चलो भागके शादी करते है!" हा हिंदी सिनेमातला डायलॉग ऐकून तर पाठ झालेला. कोणी पळून जाऊन लग्न केलं म्हणजे बॅगा आधीच भरून ठेवलेल्या असतात. आणि अक्षरशः त्या भरलेल्या बॅगा घेऊन दोघं(आपापल्या घरून) पळत सुटतात आणि पळताना लग्न करतात अशी एक आपली भाबडी समजूत.
***
सुहाग रातचा सिन बघुन तर पक्की खात्री होती की
लाल साडीचा घुंगट उचलला आणि लाईट बंद केला की थोड्या दिवसांनी बाळ होत/ येतं.
***
ह्या वाचताना तुम्हाला पण नक्कीच तुमच्या लहानपणच्या भाबड्या समजुती आठवल्या असतील आणि हसू आवरले नसेल तर नक्की शेअर करा .
मंगळसूत्र किंवा दुकानाबद्दलही
मंगळसूत्र किंवा दुकानाबद्दलही ‘वाढवणे’ हाच शब्दप्रयोग करतात. म्हणजे ‘काल मंगळसूत्र वाढवलं होतं, म्हणून आज घाईने सोनाराकडे गेले’ किंवा ‘आज पाऊस अगदी जोरात कोसळत होता, म्हणून मग दुकान लवकर वाढवलं’ असं म्हणायची पद्धत आहे.
केरसुणी/झाडूला 'वाढवण'/वारवण
केरसुणी/झाडूला 'वाढवण'/वारवण म्हणतात असं वाटतंय.
आमच्या शाळेचं गॅदरींग म्हणजे
आमच्या शाळेचं गॅदरींग म्हणजे दोन दिवसांचा शारदोत्सव....त्यात जे समूहनृत्य रहायचे त्याची announcement करताना वेळेच्या अभावामुळे त्या नृत्यातील एखाद्या मुलीचे नाव आणि चमू आता मंचावर येत आहे असे सांगायचे...त्यावेळी मला वाटायचं की 'चमू 'कोणाचं तरी आडनाव आहे आणि तिने सगळ्याच नृत्यात भाग घेतलाय त्यामुळे माझा न पाहिलेल्या 'चमू' नावाच्या मुलीबद्दलचा आदर एकदम द्विगुणित झाला...माझी आई त्याच शाळेत शिक्षिका होती...मी घरी आल्यावर आईला विचारलं, " आई, ती चमू नावाची मुलगी किती हुशार आहे गं...सगळ्या डान्समधे भाग घेतला तिने." तेव्हा आई खूप हसली आणि म्हणाली अगं चमू म्हणजे समूह..
चमू
चमू
किती चम्या असायचो आपण लहानपणी
लहानपणी एक जळगाव ल राहणारा
लहानपणी एक जळगाव ल राहणारा मित्र होता तो सुट्टीत आजोळी म्हणजे आमच्या गावी यायचा तेव्हा सोबत खेळत असू. तो म्हणायचा आमच्या जळगांवला खूप म्हणजे खूपच ऊन असतं कारण तिथे २ सूर्य आहेत. आणि यावर चक्क विश्वास बसला होता.
बस किंवा ट्रेन ने जाताना आपली गाडी सावकाश जाते आणि पलीकडून येणारी खूप वेगवान आहे असे अजूनही वाटते.
तेव्हा गरीब श्रीमंत असा सामाजिक भेद खूप अस्वस्थ करायचा, तेव्हा मी बाबांना म्हणायचे की सरकारने सगळ्यांकडचे पैसे घेऊन टाकावे आणि मग सगळ्यांना समान वाटून टाकावे.
लहानपणी पहिल्यांदा पृथ्वीचा
लहानपणी पहिल्यांदा पृथ्वीचा ग्लोब पाहिल्यानंतर खालच्या बाजूला जे देश आहेत ती लोक पृथ्वीवरून खाली कशी पडत नाहीत याचं मला भयंकर आश्चर्य वाटलं होत...नंतर आईनी गुरुत्वाकर्षण वगैरे समजावून सांगितलं.... > हो हो.... हे वाचून आठवलं जेव्हा पृथ्वी फिरते असे शिकवले होते तेव्हा रात्री मला पायच्या जागी डोकं येत असं वाटायच . रात्री कित्येक वेळा उठून मी झोपेत गोल फिरले नाही ना हे बघायचे
तेव्हा गरीब श्रीमंत असा
तेव्हा गरीब श्रीमंत असा सामाजिक भेद खूप अस्वस्थ करायचा, तेव्हा मी बाबांना म्हणायचे की सरकारने सगळ्यांकडचे पैसे घेऊन टाकावे आणि मग सगळ्यांना समान वाटून टाकावे.
<< हे मलाही वाटायचे. सरकारकडे जर पैसे छापायचं मशीन आहे तर ते सगळ्यांना पैसे का वाटत नाहीत
आम्हाला तिसरीत असताना एक
आम्हाला तिसरीत असताना एक बाईंनी काही प्रयोग करून दाखवले त्यात पृथ्वी गोल आहे सांगताना नक्की कशासाठी माहीत नाही पण एक चेंडु टेबलावर ठेवुन त्यावर पाच पैशाचे नाणे ठेवले. ते स्थिर राहिले तिथे.
त्यावरून माझा असा समज झाला होता की पृथ्वी गोल परंतु एवढी प्रचंड मोठी आहे तिच्या वरचा भाग सपाट असल्या सारखा वाटतो आणि केवळ तेवढया भागातच सगळी गावे आहेत. शेवटलीची गावे आहेत त्यातील कोणी गावा बाहेर लांब गेले तर मग गोलाकार भाग लागून ते घसरत जाऊन पृथ्वीच्या खाली पडतील. त्या लोकांना पृथ्वी गोल आहे हे माहीत नसेल तर खरंच कोणी खूप लांब जाऊ शकतील, त्यांना कुणीतरी जाऊन हे सांगायला पाहिजे असे वाटले.
भूगोल शिकताना पुण्यातून
भूगोल शिकताना पुण्यातून रशियामार्गे उत्तर ध्रुवावर जायचे, तिकडून घसरगुंडी सारखे कोणत्याही देशात घसरत जायचे असे वाटायचे.
पुणे हा एक देश आहे आणि बाकीचे
पुणे हा एक देश आहे आणि बाकीचे सगळे देश त्याचे मांडलिक आहेत असा समज इतिहासाच्या बाईंनी करुन दिला होता. पुणेरी कि नारायणी कुठल्या तरी साडीची सर बनारसी शालूला सुद्धा नाही म्हणून बादशहाच्या बेगमा जळायच्या हे चौकटीतले ज्ञान त्यांनी दिले होते.
शिक्षकांनी दिलेले चौकटीतले ज्ञान यावर वेगळा धागा आला तर खूप किस्से आहेत.
मस्त धागा आहे हा! बऱ्याच
मस्त धागा आहे हा! बरेच किस्से रिलेट झाले.
माझा लहानपणी असा समज होता की परदेशातली माणसं पाणी अजिबात पीत नाहीत. सगळे कायम दारूच पितात. आपण कुठे हॉटेलमध्ये जेवायला गेलो तर पाणी मिळतंच नाही. त्यामुळे आपण कधी परदेशात गेलो आणि आपल्याला खूप तहान लागली तर आपलं कसं होणार असं वाटायचं
माझ्या लहानपणी हाकामारीची खूप
माझ्या लहानपणी हाकामारीची खूप अफवा पसरली होती..ती रात्री दरवाज्यावर येऊन फुली मारते..ज्या दारावर फुली असेल त्या घरातल्या कोणालातरी तींघेऊन जाते असा सगळे म्हणायचे...
आम्ही राहत होतो तो वाडा प्लस चाळ अस होत...सकाळी सकाळी आमचा १० -१२ जणांचा ग्रुप एकत्र जमून कुठल्या घरावर फुली आहे का बघायचो...शाळेत जायची तयारी करायची सोडून हे असं भटकल्यामुळे आईचे धपाटे पण खाल्ले आहेत...तिला आमच्यामुळे ऑफिसला जायला उशीर व्हायचा.
चमू किस्सा
चमू किस्सा
केरसुणीला लक्ष्मी पण म्हणतात.
केरसुणीला लक्ष्मी पण म्हणतात. बायकोने घरच्या roomba चं नाव पण लक्ष्मी ठेवलं आहे.
*विमान आणि काही
विमान प्रवासाबाबतचे समज
विमानाविषयी एक भलतेच समज होते लहानपणी. एक तर ते नेहमी तीस हजार फुट उंचीवरूनच उडताना पहायला मिळायचे. प्रत्यक्षात जवळून पहायला मिळण्याची कधी शक्यतासुद्धा नव्हती. त्यामुळे किती मोठे काय हे कसे कळणार? वाटायचे कि ते उंचीला फार कमी असेल (नाहीतर उडणार कसे?). इतके कमी कि प्रवाश्यांना कसेबसे बसता येत असावे किंवा कदाचित आत आडवे झोपावेच लागत असेल. विमान किती अवाढव्य असते हे पुढे मोठेपणी थेट विमानात प्रवेश करतानाच पाहायला मिळाले. बरं, तिथे सुद्धा गंमत. लहानपणी कधीतरी पेपरला फोटो बघायला मिळायचा. नेते मंडळी शिडीवरून जाऊन विमानाच्या दारात उभे राहून सगळ्याना टाटाबायबाय करताना. मला वाटले मी सुद्धा तसेच करेन. मला विमानतळावर निरोप द्यायला आलेल्या खाली उभारलेल्या नातेवाईकांना मी शिडीवर उभे राहून पंडीत नेहरूंसारखे टाटाबायबाय करीन पण कसचे काय. त्यांना लांबवर पहिल्या दारातच बाय बाय करून त्यानंतर विमानतळावर वेगवेगळ्या गेटमधून चेकिंग होत होत पन्नास किलोमीटर चालल्यासारखे वाटून अखेर एका बोळातून विमानाच्या दारात पोहोचलो. कुठे पंडित नेहरू अन कुठे आम्ही हो पण, युरोपात आणि सिंगापुरात नंतर काही प्रवासांत शिडीवरून चढून विमानात बसायचा अनुभव घेतला हा भाग वेगळा.
ते विमानतळावरचे सरकते जीने सुद्धा. शाळा कॉलेजात असताना त्यांच्याबाबत बरेच ऐकले होते. तेंव्हा वाटायचे रबरी पट्ट्यावर पायऱ्यांचे प्लास्टिकचे मोल्ड करून तो पट्टा फिरत असेल. बेल्टवरची पायरी फिरून सरळ झाली कि टुण्णकन त्यावर उडी मारून उभे राहायचे प्रत्यक्षात ते किती वेगळे आणि क्रियेटीव्ह डिजाईन आहे ते पाहून थक्क झालो होतो. मग लक्षात आले, मी कल्पना केलेल्या "टुण्णकन" डिजाईनमुळे दिवसाकाठी किमान शे-दोनशे तरी अपघात त्या जिन्यांवर झाले असते
टुन्नकण की टुण्णकन?
टुन्नकण की टुण्णकन?
टुण्णकन... येस्स... येतंच
टुण्णकन... येस्स... येतंच नव्हता तो शब्द माझ्या इथे. मोठ्या ण ला ण येत नव्हते. दण्ण, खण्ण सगळे ट्राय केले.थँक्स सामो.
अन्नकण
अन्नकण
माझे बालपण खेड्यात गेले.
माझे बालपण खेड्यात गेले. मुंबैहुन येणार्या लोकांच्या तोंडी रेल्वे आणि रेल्वेडब्ब्यात बसुन प्रवास हे उल्लेख ऐकायला मिळायचे. रेल्वे कशी दिसते हे माहित नव्हते, त्यामुळे ती एस्टीसारखीच दिसत असणार हे गृहित धरले होते पण डब्यात कसे बसत असावेत हा प्रश्न डोके चावायचा. माझ्या डोळ्यासमोर कायम ते चक्कीवर पिठासाठी असतात तसे डबे यायचे, एस्टीमध्ये सिटच्या जागी हे डब्बे ठेऊन त्यात माणसे कशी बसत असतील, अंगाला कुठे पत्रा लागत तर नसेल ना वगैरे प्रश्न डोक्यात यायचे. आम्ही मुम्बैत आल्याच्या दिवशीच दुपारी मामा आम्हा मुलांना रेल्वे स्टेशनवर घेऊन गेला आणि तिथे तासभर ऊभे राहुन आम्ही रेल्वे आणि तिचे डब्बे पोटभर पाहुन घेतले
सांता वगैरे प्रकरण माहित नव्हते. बेलापुरला राहायला आलो तेव्हा मुलगी चारेक वर्षांची होती. २५ डिसेंबरला समोरच्या घरातील मुले हातात गिफ्ट घेऊन सांताच्या नावाने नाचायला लागली तेव्हा मुलीचे डोके फिरले. आपल्या घरी साण्ता का आला नाही म्हणत तिने भोकाड पसरुन दिले. शेवटी ‘जा बाबा
पळत, सांता अजुन फारसा लांब गेला नसणार, बघ कोपर्यावर भेटेल, जा लवकर‘ म्हणत नवर्याला पिटाळले. सांता सुदैवाने कोपर्यावरच सापडला आणि आमचे गिफ्ट त्याच्याकडुन हस्तगत करता आले सिडकोने घर बांधताना चुक केली, ते वर धुरांडे ठेवले नाही त्याला सांता बिचारा काय करणार म्हणुन सिडकोला नावे ठेवली.
मालगाडीच्या डब्यांना 'वाघिणी'
मालगाडीच्या डब्यांना 'वाघिणी' म्हणतात मराठीत. वॅगनचं मराठीकरण असावं. मला लहानपणी हे अर्थात माहिती नव्हतं. एका गोष्टीत या वाघिणींचा उल्लेख होता. एका मुलीची शौर्यकथा होती काही तरी. मला ती गोष्ट किती तरी वेळा वाचूनही समजलं नव्हतं की वाघिणींचा इथे काय संबंध?
या धाग्यावरचे प्रतिसाद मस्त आहेत सगळे.
विमान प्रवासाबाबतचे समज
विमान प्रवासाबाबतचे समज
लहानपणी विमानाबाबत माझेही तसे खूपच गैरसमज होते. लहानपणी कोल्हापुरला रहात होतो त्यामुळे विमान फक्त आकाशातच दिसायचे. कोणी मुलांनी मारलेल्या टेपांवरून वाटायचे की विमान खूप म्हणजे खूपच मोठे असते. त्याची लांबी साधारण २० डब्यांच्या मालगाडी एवढी असते...
स्टार ट्रेक पाहून असेही वाटायचे टेलीपोर्टींग हे खरोखर अस्तित्वात असते.
तिन्ही सांजा शब्द आहे.
तिन्ही सांजा शब्द आहे.
तो बोली भाषेत तेंनीसांज / तेंनीसांजा ऐकू यायचा.
आणि नवऱ्याला बायका आमचे ह्यनी /आमचे त्येनी म्हणायच्या. मला वाटायचं कामावरून नवरा घरी यायची वेळ म्हनून त्येनीसांज
<<<एका गोष्टीत या वाघिणींचा
<<<एका गोष्टीत या वाघिणींचा उल्लेख होता. एका मुलीची शौर्यकथा होती काही तरी.>>
फायरमन चमनलाल?
मुलाची गोष्ट म्हणजे वंगथम पांचा पण त्याने खऱ्या वाघाचीच शिकार केली होती.
साधना मस्त पोस्ट !
साधना मस्त पोस्ट !
ते विमानातुन “टाटा” प्रकरण
ते विमानातुन “टाटा” प्रकरण मलाही तसेच वाटायचे. त्यामुळे बोळातुन जाऊन विमानात शिरले तरी मला कळलेच नव्हते पहिल्यांदा. वाटलेले की सीट्स पार करून पुढे जमीनीवर उतरुन चालु लागायचे. पण बरोबरची माणसे बसु लागल्यावर कळले की अर्र हेच ते विमान.
मस्त पोस्ट आहेत सर्व.
मस्त पोस्ट आहेत सर्व.
चिडकू यांच्या पोस्टीला फार हसले.
मला वाटायचं की हिंदी सिनेमात जे एकही संवाद नसलेले छान छान कपड्यातले पार्टीतले लोक असतात, त्यांना पंधरा- पंधरा रूपये आणि फुकटचे रसना व कोला मिळते. फुकटच्या रसनासाठी मी याचा सिरियसली करिअर म्हणून विचार केला होता. कारण आमच्याकडे सारखं लिंबू सरबत द्यायचे, आजोबांना रसनाने भडभडते म्हणून.
अर्र हेच ते विमान.
अर्र हेच ते विमान.
विमानात हवी तेवढी चॉकलेट्स फुकट मिळतात असंही लहानपणी ऐकलं होतं. तेव्हा मिळतही असतील.
१५-२० वर्षापुर्वीपर्यंत मिळत
१५-२० वर्षापुर्वीपर्यंत मिळत होती. विमान चढताना कानांना त्रास होतो तो कमी व्हावा म्हणुन द्यायचे. कॉस्ट कटिंगची पहिली कुर्हाड चोकलेटवरच पडली.
हो. तेव्हा चॉकलेट्स (कँडी)
हो. तेव्हा चॉकलेट्स (कँडी) मिळायची, हवी तेवढी, म्हणजे हवाई सुंदरी ट्रे मध्ये घेऊन यायची आणि काही लोक त्यावर डल्ला मारायचे आणि संपली की ती परत जाऊन ट्रे भरून यायची.
“विमानात हवी तेवढी चॉकलेट्स
“विमानात हवी तेवढी चॉकलेट्स फुकट मिळतात असंही लहानपणी ऐकलं होतं.” - अनेक (जिज्ञासूंनी अंदाज बांधावा, किती असं स्पेसिफिक विचारू नये) वर्षांपूर्वी मुंबई-गोवा विमानात हवाई-सुंदरीने ट्रे मधे आणलेल्या चॉकलेट्समधली (बाळ)मुठभर चॉकलेट्स घेतलेली आठवतं.
Pages