"ए मेरे बचपन .. !" - लहानपणीच्या निरागस समजुती

Submitted by छन्दिफन्दि on 27 November, 2022 - 20:07
bachpan

"बायकांना सुंदर करायचं कार्य भवानी माता करते हे लहानपणी आमच्या मनावर इतकं ठसल होत की त्यानंतर कितीतरी वर्ष सुंदर स्त्री दिसली की हीचा मेकअप वर भवानी मातेनेच केलाय असच वाटायचं." हरी तात्या मधलं हे वाक्य ओठावर हसू तर आणतच पण बालपणीच्या भाबडेपणाची सैरच करून आणत.

ह्या त्यातल्याच काही समजुती !

***

शेजारची आजी "देवाघरी गेली" असं ऐकलं आणि तिला उचलून नेताना बघितलं.

माणूस देवाघरी कसा जातो ह्याच एक चित्र बाल मनात तयार झालं, माणसं त्या व्यक्तीला देवळात घेऊन जातात आणि देवळात ठेवून परत येतात. नंतर रात्री (दुसरा तिसरा कोणी नाही तर एकमेव) मारुतीबाप्पा येऊन हातावरून (जसा द्रोणगिरी पर्वत नेला होता तसा) देवाघरी घेऊन जातो.

***

नाटकामध्ये जेव्हा एखादं पात्र म्हणतं " चहा घेऊन येते.." तेव्हा वाटायच आत (विंगेत) एकदम मस्तपैकी स्वयंपाक घर आहे, तिकडेच चहा बनवून घेऊन येतात. पण तरी प्रश्न असेच " ह्यांचा चहा इतक्या पटकन कसा बनतो?

***

मराठी हिंदी सिनेमे बघून तर पक्की ठाम समजूत होती, प्रेमात पडलं की गाणी गायची, नव्हे नव्हे फुला- झाडाभोवती नाच पण करायचा.

एका मामाचा प्रेम विवाह ठरला, म्हणजे त्याने तसं जाहीर केलं. मग पहिला महत्वाचा पडलेला प्रश्न "हा मामा आणि होणारी मामी कोणत्या बरं बागेत नाच करत असतील, कुठलं गाणं म्हणत असतील ? "

***

" चलो भागके शादी करते है!" हा हिंदी सिनेमातला डायलॉग ऐकून तर पाठ झालेला. कोणी पळून जाऊन लग्न केलं म्हणजे बॅगा आधीच भरून ठेवलेल्या असतात. आणि अक्षरशः त्या भरलेल्या बॅगा घेऊन दोघं(आपापल्या घरून) पळत सुटतात आणि पळताना लग्न करतात अशी एक आपली भाबडी समजूत.

***

सुहाग रातचा सिन बघुन तर पक्की खात्री होती की

लाल साडीचा घुंगट उचलला आणि लाईट बंद केला की थोड्या दिवसांनी बाळ होत/ येतं.

***

ह्या वाचताना तुम्हाला पण नक्कीच तुमच्या लहानपणच्या भाबड्या समजुती आठवल्या असतील आणि हसू आवरले नसेल तर नक्की शेअर करा .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लहानपणी रेडिओ किंवा टेपरेकॅार्डरच्या आत बसून कोणी तरी गात असणार अशी माझी समजूत होती.. मग स्पिकरच्या जाळीतून कोणी आत दिसतंय का हे बघायचा प्रयत्न करायचे. हेच लॅाजिक टिव्हीबाबत..टिव्हीच्या मागे डोकाऊन चेक करायचे.

स्पिकरच्या जाळीतून कोणी आत दिसतंय का हे बघायचा प्रयत्न करायचे. हेच लॅाजिक टिव्हीबाबत..टिव्हीच्या मागे डोकाऊन चेक करायचे. Lol Lol Lol Lol Lol Lol Lol Lol Lol Lol Lol Lol

लहानपणी सिनेमागृहात चित्रपट बघताना मलाही असंच वाटायचं की ते कलाकार प्रत्यक्ष येऊन काम करतात. ( नाटकासारखं). पण मग गाणी बघताना, ते एवढे पटापट कपडे कसे बदलतात, असा प्रश्न पडायचा.

" चलो भागके शादी करते है!" हा हिंदी सिनेमातला डायलॉग ऐकून तर पाठ झालेला. कोणी पळून जाऊन लग्न केलं म्हणजे बॅगा आधीच भरून ठेवलेल्या असतात. आणि अक्षरशः त्या भरलेल्या बॅगा घेऊन दोघं(आपापल्या घरून) पळत सुटतात आणि पळताना लग्न करतात अशी एक आपली भाबडी समजूत. >>>>> हे मला अगदी स्वतःच लग्न होईपर्यंत सुद्धा वाटायचे।

लहानपणी रेडिओ किंवा टेपरेकॅार्डरच्या आत बसून कोणी तरी गात असणार अशी माझी समजूत होती.. मग स्पिकरच्या जाळीतून कोणी आत दिसतंय का हे बघायचा प्रयत्न करायचे. हेच लॅाजिक टिव्हीबाबत..टिव्हीच्या मागे डोकाऊन चेक करायचे >>> अगदी, अगदी. मलाही टीव्हीत घुसून रेखा व श्रीदेवीची वाट बघत कोपऱ्यात लपून रहावे आणि त्या काम आटोपून घरी जायला निघाल्या की गुपचूप त्यांचा पाठलाग करून त्यांच्या घरी जायची अनावर ईच्छा होत असे. तसेच लतादीदीं व आशाताईंकडेही जाण्याची तीव्र ओढ होती.

लहानपणी सिनेमागृहात चित्रपट बघताना मलाही असंच वाटायचं की ते कलाकार प्रत्यक्ष येऊन काम करतात. ( नाटकासारखं). पण मग गाणी बघताना, ते एवढे पटापट कपडे कसे बदलतात, असा प्रश्न पडायचा. >>> अगदी, अगदी.

आमच्या कटिंगच्या दुकानात एक चहावाला येत असे. जेव्हा कटिंग चहा ही संकल्पना ऐकली तेव्हा मला वाटलं की तसलाच चहा असेल तो, जो न्हाव्याकडे घेऊन जात असतील.

रेडिओ बाबतीत + १.
आमचा जुना व्हॅक्युम ट्युबवाला मोठा रेडिओ होता, तो भिंतीतल्या कपाटातील एका कप्प्यात होता.
बाबांनी एकदा कप्पा साफ करायला रेडिओ बाहेर काढला तेव्हा मागच्या बाजूने आत पाहिले. त्यात काही पार्ट्स एका मागे एक वगैरेने जे काही दिसले मला खरंच एक इवलासा माणुस हात मागे घेऊन उभा आहे, डोक्यावर टोप आहे असा भास झाला आणि मी मला दिसला माणुस ओरडलो. रेडिओत खरंच माणुस असतो याची खात्री पटली.

चित्रपटगृहात पडद्याच्या मागच्या बाजूला कधीच जायचे नाही. गेलो तर ते (चित्रपट विश्वातले) लोक आपल्याला खूप मारतात आणि कायमचे ठेवून घेतात आणि आपणही त्यांच्यातले होऊन जातो असा समज आमच्याकडे पसरवला होता कोणी, ते खरंच वाटे.

देश विदेशच्या परीकथा वाचताना त्यात एका कथेत छडी घेउन सुरवातीला एक मंत्रासारखी ओळ आणि पुढे "आता बेटा मासा/पक्षी/माणुस हो" असे म्हणुन तो रूप बदलतो असे होते.

छडी घेऊन दूर झाडीमध्ये एकटा जाऊन पक्षी होण्याचा प्रयत्न केला. मग कुणी म्हणे छडीला कुंकू लावायला पाहिजे, कुणी म्हणे देवळात रात्रभर ठेवली पाहिजे ते सगळे करून झाले.

मग गाणी बघताना, ते एवढे पटापट कपडे कसे बदलतात, असा प्रश्न पडायचा. <<<<:D Lol Lol

कटिंग चहा ही संकल्पना ऐकली तेव्हा मला वाटलं की तसलाच चहा असेल तो, जो न्हाव्याकडे घेऊन जात असतील.<<<< Lol Lol Lol

छडी घेऊन दूर झाडीमध्ये एकटा जाऊन पक्षी होण्याचा प्रयत्न केला. मग कुणी म्हणे छडीला कुंकू लावायला पाहिजे, कुणी म्हणे देवळात रात्रभर ठेवली पाहिजे ते सगळे करून झाले.<<<< Lol Lol Lol
मानव पृथ्वीकर, एकदम गमतीशीर

मग गाणी बघताना, ते एवढे पटापट कपडे कसे बदलतात, असा प्रश्न पडायचा. <<<<:D Lol Lol

कटिंग चहा ही संकल्पना ऐकली तेव्हा मला वाटलं की तसलाच चहा असेल तो, जो न्हाव्याकडे घेऊन जात असतील.<<<< Lol Lol Lol

छडी घेऊन दूर झाडीमध्ये एकटा जाऊन पक्षी होण्याचा प्रयत्न केला. मग कुणी म्हणे छडीला कुंकू लावायला पाहिजे, कुणी म्हणे देवळात रात्रभर ठेवली पाहिजे ते सगळे करून झाले.<<<< Lol Lol Lol
मानव पृथ्वीकर, एकदम गमतीशीर

हा एक प्रचंड क्यूट धागा होईल असं पोटेन्शियल आहे. पण सध्या खूप अंडररेटेड आहे. शीर्षक 'लहानपणीच्या निरागस समजुती' अशासदृश काहीतरी केल्यास जास्त लोक वाचतील काय?

मीपहिलीत असताना २१ वा नंबर आला असताना प्रगतीपुस्तक दाखवताना सांगितलं होतं २ चुकून पडलेत प्रगतीपुस्तकात. आणि मला खरच तसं वाटलं होतं. बहिणीचा पहिला नंबर आला होता. मग माझा कसा नसेल?

आम्हाला रात्रीचं झाडांजवळ जाऊन खेळायला मनाई असायची .. का नाही खेळायचं विचारलं विचारलं तर शेजारच्या काकूंनी रात्रीची झाडं झोपतात हे सांगितलेलं.. पुढे जाऊन तिसरीत असताना शाळेत सायन्स टिचरने सगळ्यांना हाच प्रश्न विचारलेलं तेव्हा मी अगदी हात वर करून सांगितलेलं की रात्रीची झाडं झोपतात Lol

सगळेच Lol

उडत्या गालिचाची गोष्ट वाचून घरातला गालिचा का उडत नाही याचा त्रागा करून घेतल्याचं आठवतंय. मला तर तो गालिचा रात्री सिक्रेटली उडत असणार असंही वाटायचं.

उल्कावर्षाव म्हणजे 'तारे पडतात' असं कोणीतरी सांगितलं होतं. त्यामुळे आकाशात दिसणारा एक बर्‍यापैकी मोठा तारा दाखवून 'हा पण पडेल का कधीतरी' असं विचारून घरच्यांना फेफरं आणलेलं आहे Proud

हा एक प्रचंड क्यूट धागा होईल असं पोटेन्शियल आहे. पण सध्या खूप अंडररेटेड आहे. शीर्षक 'लहानपणीच्या निरागस समजुती' अशासदृश काहीतरी केल्यास जास्त लोक वाचतील काय?<<< हरचंद पालव , शीर्षक बदलते आहे. थँक यू फॉर युअर sugestion !

सायन्स टिचरने सगळ्यांना हाच प्रश्न विचारलेलं तेव्हा मी अगदी हात वर करून सांगितलेलं की रात्रीची झाडं झोपतात <<<
उडता गालिचा <<< Lol Lol Lol

Lol
भारीय धागा.
ते रेडिओत बसून गाणी , TV च्या आत बसून कलाकार हे असेच वाटायचे.

उन्हाळ्यात वावटळ यायची तेव्हा त्यात अडकलो तर उडून जातो असे वाटायचे. त्यामुळे तिथून लांब पळायचो. Lol

विमान दिसले बोटे लांब करून हात वर करून विमान विमान चिठ्ठी दर म्हणायचो." मग नखं चेक करायचो. त्यात कुणाच्या नखात पांढरट ठिपका दिसला की त्याला चिठ्ठी मिळाली असे म्हणत होतो. Lol

मांजर आडवे गेले की अशुभ अशी एक अंधश्रद्धा होती.
मांजराचा शत्रू कुत्रा, म्हणून कुत्रा आडवा गेला की शुभ अशी एक अँटी-अंधश्रद्धा आम्हा लहान मुलांमध्ये होती.
परीक्षेच्या वेळी शाळेला जाताना मुद्दाम असे कुत्रा आडवा गेलेला रस्ता क्रॉस करायचो Lol

हा हा. मस्त धागा. खुद को क्या समझती है types गाणी पाहून मला ही लहानपणी असंच वाटायचं की कॉलेजला गेलं की compulsory campus मध्ये डान्स करावा लागतो Lol
आणि बॉलीवूड movie मध्ये किस झाला की मुले होतातच असं वाटायचं. वर हिरोईन ची काळजी वाटायची की कसं बुवा manage करत असतील हे शूट करताना.

सगळे पोस्ट बॉक्स जमिनीखालून एकमेकांना जोडलेले असतात. आपण टाकलेलं पत्र तिथूनच योग्य त्या जागी पोचतं. मग तिथला पोस्टमन ते घरी नेऊन देतो.

लहानपणी कोणीतरी चाचा नेहरूंचे वाक्य ऐकवले की "आराम हराम है". मला अगदी आठवी-नववी पर्यंत वाटायचे की जसे आपण घर-दार, ऐसा-वैसा, अलाणा-फलाणा म्हणतो तसे चाचा नेहरू "आराम-हराम" म्हणाले असतील. त्यामुळे कधी आराम करत असलो तर आता जरा आराम-हराम करतोय असे म्हणायचो. पाहुण्यांना पण म्हणालो होतो की जरा आराम-हराम करा.

बॉलीवूड movie मध्ये किस झाला की मुले होतातच असं वाटायचं >>>>>> ह्यावरून आठवलं, 'क्या कहना' चित्रपट पाहून माझा लहान भाऊ आणि त्याचा मित्र बोलत होते, " चुकीचं दाखवलंय त्यात. लग्न झाल्याशिवाय बाळ होतं का कधी ?" Lol

"चुकीचं दाखवलंय त्यात. लग्न झाल्याशिवाय बाळ होतं का कधी ?" <<< Lol Lol :हाहा::D Lol Lol
कॉलेजला गेलं की compulsory campus मध्ये डान्स करावा लागतो<<<<
पाहुण्यांना पण म्हणालो होतो की जरा आराम-हराम करा.<<< Lol Lol :हाहा::D Lol Lol

कुत्रा आडवा गेला की शुभ अशी एक अँटी-अंधश्रद्धा आम्हा लहान मुलांमध्ये होती.
परीक्षेच्या वेळी शाळेला जाताना मुद्दाम असे कुत्रा आडवा गेलेला रस्ता क्रॉस करायचो <<< जबरदस्त

भारी आहेत एकेक समजुती!
मला लहानपणी वाटायचं की आपण भराभर कृती केली की काळपण भराभर पुढे जातो. म्हणजे लवकर जेवलं, लवकर शाळेत गेलं की लवकर दिवस संपून पुढचा सुरू होतो वगैरे.

अजून एक गंमत म्हणजे माझं आजोळ मुरुडला आहे. तर मला वाटायचं की मुरुडला सगळ्या लहान मुलांचं आजोळच असतं. आम्ही गणपतीला तिकडे जातो, तसे सगळेजण तिथे गणपतीलाच येतात. तिथे एरवी वर्षभर फक्त सगळ्यांचे आजीआजोबाच राहतात Lol तिथेही मुलं राहतात, रेग्युलर शाळेत जातात हे लक्षात आलं तेव्हा वेगळंच वाटलं होतं.

आमच्या घरी दर शुक्रवारी रात्रीच्या जेवणात काहीतरी खास असे. कधी पुऱ्या तर कधी वडे, कधी भजी.. तर मला वाटायचं Friday आहे म्हणून काही फ्राय करावच लागतं

भारी किस्से
मनीप्लन्ट ला पैसे लागतात असा समज होता
आमच्या कडे बाटलीत एक होतं, त्याच्या कडे रोज सकाळी निरखुन बघायचे..

माझ्या मोठ्या मावशीला बाळ होणार होतं. तर मला वाटलं की आई पेक्षा मावशी मोठी आहे तर येणारं बाळ पण माझ्यापेक्षा मोठंच येईल. त्यामुळे हे छोटेसे बाळ मावशीचेच ह्यावर मला विश्वास ठेवायला अमळं उशीर लागला होता

......लाल साडीचा घुंगट उचलला आणि लाईट बंद केला की थोड्या दिवसांनी बाळ होत....

सिनेमातील 'सुहागरात' आणि काहीवेळी ते 'तुफानी रात मी भीग गये' वाले सीन, आपटणारी फुले वगैरेबद्दल मला प्रचंड कुतूहल होतं. त्याबद्दल मी मोठ्यांच्या बैठकीत 'सहज' विचारलेले प्रश्न आर पार्ट ऑफ फॅमिली लिजेंड नाऊ Wink

लाल शालूशेले घातले की त्या बाईला काही दिवसातच मूल होणार अशी मला खात्री वाटायची.

Pages