"बायकांना सुंदर करायचं कार्य भवानी माता करते हे लहानपणी आमच्या मनावर इतकं ठसल होत की त्यानंतर कितीतरी वर्ष सुंदर स्त्री दिसली की हीचा मेकअप वर भवानी मातेनेच केलाय असच वाटायचं." हरी तात्या मधलं हे वाक्य ओठावर हसू तर आणतच पण बालपणीच्या भाबडेपणाची सैरच करून आणत.
ह्या त्यातल्याच काही समजुती !
***
शेजारची आजी "देवाघरी गेली" असं ऐकलं आणि तिला उचलून नेताना बघितलं.
मुलांना गोष्ट सांगत झोपवून ती बाहेरच्या खोलीत आली. घड्याळात बघितलं तर साडेदहा वाजून गेलेले. नवऱ्याचं प्रोजेक्ट रिलीज आलेली त्यामुळे आजकाल त्याला यायला तर उशिरच होत होता. खिडकी बंद करायला म्हणून गेली तर क्षणभर तिथेच थबकली. खडकीतून छान शुभ्र चंद्र तिच्याकडे बघून जणू हसत होता. वाऱ्याच्या मंद झुळुकीन अंगालाच नाहीतर मनाला पण छान गारवा मिळाला, आणि कुंडीतल्या मोगऱ्यानेही स्वतः ची जाणीव करून दिली. शुभ्र शीतल चांदणं, हळुवार वाऱ्याची झुळूक आणि त्याबरोबर येणारा मोगऱ्याचा मंद सुवास ! हेच तर स्वर्गसुख नव्हे !