Big Boss Marathi Season 4- बिग बॉस मराठी सीजन ४

Submitted by तुरू on 27 September, 2022 - 08:44

Big Boss Marathi Season 4- बिग बॉस मराठी सीजन ४ लवकरच २ ऑक्टोबर ला सुरू होतंय.. त्याविषयी ,घरातील सदस्य कोण असतील, रोजच्या एपिसोड वर चर्चा करण्यासाठी नवीन धागा

20221006_181802.jpg

20221006_181816.jpg

20221006_181905.jpg

20221006_181918.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

योगेशला काढलं अशा न्युज येतायेत. एअरटेल बॉय लवकर जात नाही असं म्हणतायेत, एअरटेल स्पॉन्सरर आहे.

म मां च्या मते पहिला टास्क अक्षय टीम जिंकली, दूसरा विकास टीम आणि तिसरा परत अक्षय टीम. त्यामुळे अक्षय कॅप्टन झाला ते योग्य होतं पण पहिले दोन निर्णय चुकीचे दिले अमृताने.

धोंगडेचा आरडाओरडा यावेळी मला कमी वाटला, मागच्यावेळी जास्त. म मां यावेळी असह्य होता म्हणाले. मे बी मी कमी बघते म्हणून माझं चुकत असेल.

वाईल्ड कार्ड कोण आहे,काही कळल का.सोमिवर पण काही न्यूज नाही. >>> नाही समजलं.

अक्षयला काय कोणत्याही मुलीबरोबर नाव जोडलं तरी एंजॉय करतो. सध्या सल्लागार म्हणून अ दे ला निवडले आहे. अपूर्वाला भारी राग आला पण अक्षयने योग्य केलं नाहीतर त्याला अपूर्वाचा पेट म्हटलं असतं.

voot extra व्हिडिओ बघितले तर दोन्ही अमृता, यशश्री अक्षयशी फार खेळीमेळीने असतात जाणवतं.

इतके आठवडे झाले तरी मराठी बिग बॉस मध्ये, जिंकण्यासाठी अमुक योग्य सांगता येत नाहीये.

प्रसादला बाहेर सपोर्ट आहे, वोट्स मिळतात पण तो फार काही करतो असं वाटत नाहीये.

अपूर्वाने स्वत:च्यात खूप बदल केलाय पण ती ही ट्रॉफी घ्यायला योग्य वाटत नाहीये.

समृद्धी कधी खेळते, कधी दिसते. यावेळी तू दिसली नाहीस, असं म मां का म्हणाले. ती आवडते मला पण स्पार्क काहीच नाहीये.

अक्षयपण फार काही करतोय असंही वाटत नाहीये.

सगळेच पिकनिक आणि विविध गुणदर्शन गॅदरींगला आलेत. तेही धड करेनात, हाहाहा.

बाकी अभिनय म्हणाल तर प्रसाद, दोन्ही अमृता, अक्षय, अपूर्वा यांच्या पहिल्या नवीन सिरियल्स आल्या ते काम बघितलेलं, चांगला अभिनय करतात पण अक्षयला नावाने ओळखत नव्हते. माने यांचं फार नाही बघितलं पण सुरुवातीला माझ्या नवऱ्याची बायकोत चांगलं केलेलं त्यांनी. लोणारीचे काम नाही बघितलं कधी, समृद्धी कोण माहिती नव्हतं.

किरण माने लेखन पण खूप मस्तं करतात, खूप फॉलॉइंग आहे त्यांना फेसबुक वर !
बिगबॉस विषयी सुद्धा खूप छान लिहायचे.
तेजस्विनी लोणारे मराठी आहे हे माहितच नव्हतं बरेच दिवस, ‘महारानी पद्मिनी का जौहार‘ नावाच्या नितिन देसाइच्या बिग बजेट सिरीयल मधे ती पद्मिनी झाली होती, खूप सुंदर दिसायची !
C652B387-80DE-4B45-889C-352EA1FDF079.jpeg

बिगबॉस विषयी सुद्धा खूप छान लिहायचे. >>> मेघा धाडेला सपोर्ट करताना छान लिहिलेलं ते वाचले होतं. बाकी मध्ये काही एका सिरियलमधून काढल्यावर रणकंदन झालेलं ते फार फॉलो नव्हतं केलं, त्यांच्या बाजूने आणि विरुद्ध बोलणारे त्याच सिरियलमधले काही कलाकार होते तो बाईट बघितलेला कुठेतरी.

तेजस्विनी अजूनही छान दिसते, नावाप्रमाणे तेजस्वी आहे . नितीन देसाई यांची अशी हिंदी सिरियल होती हे माहिती नव्हतं.

मला वाटतं त्यांनी जोधा अकबर कि हम दिल दे चुके सिनेमाचे त्यांचे सेट्स रिसायकल करून बनवली होती ती सिरीज !

माझ्यामते, चार सिझन नंतर बिगबॉस मराठीची क्रिएटिविटी इज काइंडा ड्राय्ड अप. साला याच्यापेक्षा आमच्या इथे पॉटलक, गेटटुगेदर्सना इनोवेटिव गेम्स होतात. जमत नसेल तर यापुढे सरळ कॅप्टंसी टास्क करता हुतुतु किंवा कुस्तीची स्पर्धा ठेवावी...

मांजरेकरांनी 'किरण माने' प्रकरण बऱ्यापैकी हाताळले..... त्यातही माने गुंडाळायला बघत होते 'जोकर' वगैरे मुद्दे काढून पण मांजरेकरांच्या दोन तीन गोष्टी आवडल्या जसे की 'कोण तू?' 'कोण किरण माने?' वगैरे बोलून त्यांनी त्यांच्याबद्दल बोललेल्या गोष्टींचा वचपा काढला, स्वतावर फार जास्त न घेता तू आतल्यांची लायकी काढलीस म्हणून वात पेटवून दिली; ज्याचा आता भडका उडेलच असे वाटते.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे मी एखाद्याला काम देतो म्हणजे त्याच्यावर फेव्हर करत नाही तर ते माझ्या पिक्चरमध्ये काम करुन माझ्यावर फेव्हर करतात हा जो काही डायलॉग मारलाय ना त्यांनी तो एकच नंबर!
आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे पहील्या पाच दहा मिनिटात माने हा विषय निपटून टाकला आणि ते प्रकरण उगाच वाढवत नाही नेले Happy
पण मला फारदा वाटते की मांजरेकरांनी फायरींग सुरु करण्याआधी समोरच्याकडून गोडगोड बोलून त्याचे मुद्दे काढून घ्यावेत; त्याबद्दल आतल्या लोकांना बोलते करावे आणि मग काय असेल ते फायरींग करावे...... समोरच्याचा दारुगोळा आधी संपवला की मग लोकांना गोल गोल फिरायला वावच राहणार नाही!
अपेक्षेप्रमाणे मॉलच्या टास्कच्या संचालनाबद्द्ल बोलले.
पण बिग बॉसच्या टीमची संचालक आणि परिक्षक या भुमिकांबद्दल गडबड होतीय.... नाव दिलेय संचालक पण अपेक्षा अशी आहे की त्यांनी कार्य चालू असताना फक्त निरीक्षण करावे आणि कार्य संपल्यावर निकाल देऊन त्यामागची कारणमीमांसा करावी Happy
अपूर्वाचा खेळ सुधारलाय हे बोलून दाखवले; अमृता देशमुख स्मार्ट खेळतीय म्हणून तिचे कौतुक केले; प्रसाद गोंधळलेला असतो, त्याला काय सांगायचेय ते तो समोरच्यापर्यंत पोहचवू शकत नाही हा अतिशय योग्य फीडबॅक दिला.
समृद्धी दिसली नाही त्याबद्दल पण बोलले आणि तिनेही ते मान्य केले.
अक्षय आणि अमृता देशमुखचे हेल्दी फ्लर्टींग त्यांना (आणि लोकांनाही) आवडतेय..... फक्त प्रसादचे सो कॉल्ड फॅन्स नाराज दिसतायत!!
आता नवीन आलेल्या वाइल्ड कार्डला प्रसादसाठी पाठवत असतील तर काय माहित!! मग अमृता देशमुखची रिॲक्शन बघायला मजा येईल कारण अमृता आणि प्रसाद दोघांनाही एकमेकांबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे हे जाणवत राहते.
योगेशलाही अपेक्षेप्रमाणे बोलणी बसली आणि तेजस्विनी 'जे काही आहे ते त्याच्याकडून आहे, तो त्याचा गेम आहे' म्हणत सुमडीत बाजुला राहिली.
धोंगडेला तुला आवडत नसेल तर उठुन जा म्हणून सल्ला दिला खरा पण तिला योगेश फ्लर्टींग करतो याच्यापेक्ष्या योगेशमुळे तेजस्विनी तिच्यापासून दुरावते आणि योगेश तिची तुलना इतरांबरोबर करतो हा प्रॉब्लेम होता जो तिने मांडलाच नाही.
रोहितने आवडण्यासारखे या आठवड्यात काय केलेले काही कळले नाही.... त्याचे जरा जास्तच कौतुक होते तिकडे..... रुचिरा मला मुद्दे मांडण्याच्या बाबतीत आवडते..... कालही अमृता देशमुख बरोबरच्या भांडणात तिचा सुरुवातीचा मुद्दा बरोबर होता पण अमृताने 'फेअर-अनफेअर' वगैरेवर गाडी नेऊन मुद्दा भरकटवला Happy
मुलींच्यात अपूर्वाच्या खालोखाल जर कुणी अगदी मुद्देसूद बोलत असेल तर ती रुचिरा आहे!

काल मांजरेकर आल्याआल्या म्हणाले की पुढच्या आठवड्यातही १४च स्पर्धक घरात असतील तेंव्हा मला वाटलेले की दिवाळीमुळे कुणाला काढणार नाहीत पण मग अचानक शेवटी कोण सेफ- अनसेफ बोलायला लागले तेंव्हा काही कळेना की मी सुरुवातीला चुकीचे ऐकले की काय पण मग पहील्या वाईल्ड कार्ड एंट्रीचा उल्लेख झाल्यावर सगळा उलगडा झाला Happy

स्वरूप छान मुद्देसुद पोस्ट.

रोहितने आवडण्यासारखे या आठवड्यात काय केलेले काही कळले नाही.... त्याचे जरा जास्तच कौतुक होते तिकडे..... रुचिरा मला मुद्दे मांडण्याच्या बाबतीत आवडते..... कालही अमृता देशमुख बरोबरच्या भांडणात तिचा सुरुवातीचा मुद्दा बरोबर होता पण अमृताने 'फेअर-अनफेअर' वगैरेवर गाडी नेऊन मुद्दा भरकटवला >>> अगदी अगदी. म मां तिलाच फुसका बार म्हणाले ते पटलं नाही.

>>इतके आठवडे झाले तरी मराठी बिग बॉस मध्ये, जिंकण्यासाठी अमुक योग्य सांगता येत नाहीये.
खरय..... पण सध्यातरी अपूर्वा आणि तेजस्विनी शेवटपर्यंत जातील असे वाटतेय..... प्रसाद पहिल्या आठवड्यात आवडला होता पण त्यानंतर फारच गोंधळलेला आणि समोरच्यालाही गोंधळात पाडणारा वाटतोय तो!

>>माझ्यामते, चार सिझन नंतर बिगबॉस मराठीची क्रिएटिविटी इज काइंडा ड्राय्ड अप. साला याच्यापेक्षा आमच्या इथे पॉटलक, गेटटुगेदर्सना इनोवेटिव गेम्स होतात
हो.... फार तेचतेच आणि जरा प्रॉपर्टी बदलून तसेचतसेच टास्क असतात.... खरी स्ट्रेंथ टेस्ट करायची असेल तर मागच्या बहुतेक हिंदीच्या काही सीझन्सना बघितले होते की वरती एका रोपला धरुन जास्तीत जास्त वेळ कोण उभे राहतेय किंवा एखाद्या छोट्याश्या बॉक्समध्ये कोण जास्त वेळ बसतेय मग कळेल कुणाच्यात नुसता रानटीपणा आहे आणि कुणाच्यात खरी ताकद आहे!!
ते डिटेक्टिव्ह वगैरे टाईपचे टास्क पण जरा बरे असतात.... डोके चालवायला जरा स्कोप असतो..... डिसिजन मेकींग वगैरे टेस्ट करणारे टास्क पण बघायला आवडतील नुसत्या नाचगाण्यांपेक्षा!!

मानेंना चांगलं हॅन्डल केलं मांजरेकरांनी, योगेशलाही योग्य समज दिली, अमृताला मात्रं २ मुलांशी फ्लर्ट केल्या बद्दल स्मार्ट म्हंटले गेले Uhoh
माने आणि अप्पूर्वा अ‍ॅट लिस्ट स्वतःची पर्सनॅलिटी तरी दाखवतात, बाकी सगळे नक्की काय आहेत कसे आहेत काहीच इंप्रेशन नाही !
त्या दगडोबा रोहितने नक्की काय केले आठवडाभर ? मला तर तो लक्षातही नाही राहिला !

यावेळी सामना माने व्हर्सेस नेमळेकर झाला. प्रसाद मागे पडला.

वसईकरला का आणलं. सगळं पढवून पाठवलेलं. अक्षय तिचा लाडका, झालं प्रसाद परत सिंपथी घ्यायला मोकळा. विशिष्ट लोकांनाच पाण्यात फेकले तिने.

मला म मां चे एक समजत नाही, मागे अक्षयला तू दिसत नाहीस अजिबात म्हणत होते, आज तू बॅकफुटला जा म्हणत होते.

बाकी समृद्धी मराठेमुळे वाया जाणार. काहीच करत नाही, फक्त त्याच्याबरोबर. नाहीतर अपूर्वाताई करते.

तेजू आज पहिल्यांदा चांगली दिसत नव्हती. योगेश गेला त्यामुळे तिचा खेळ अजून बहरेल. अमृता धोंगडे, तेजु, रुचिरा, यशश्री यांनी वेगळा grp करावा.

रोहितला चान्स मिळतो, कॅप्टनही झाला आहे.

तो प्रसाद युसलेस प्लेयर आहे. काहीही आवडण्याचा फॅक्टर त्याच्यात नाहीये (माझ्यासाठी तरी). अमृता देशमुख ला ममां स्मार्ट म्हणाले पण तिचा स्मार्टनेस मला तरी दिसला नाही. ती अक्षय मुळे जे मिळतंय ते अटेन्शन एन्जॉय करते आहे. खेळात दिसत नाही, संचालक म्हणून कन्फ्युज्ड किंवा पार्शल होती.
योगेशची गलिच्छ भाषा, अँगर , मुलींशी क्रीपी फ्लर्टींग मुळे तो गेल्याचे ऐकून बरेच वाटले.
माने, अपूर्वा आणि काही प्रमाणात तेजस्विनी हे जे आहेत ते कन्सिटन्ट आहेत.बाकीचे सगळेच इतके फेक वागतात की त्यांच्यशी प्रेक्षक म्हणुन काही बाँडिंग होतच नाहीये. आता ती वाइल्ड कार्ड कोण आलीये ती इतर आधीच तिथे असलेल्या आणि तेच तेच तसेच वागणार्‍या ४-५ मुलींपेक्षा कशी वेगळी असणार आहे ते कळत नाहीये.

योगेश कसाही असला तरी त्या डुइ़ग नथिंग त्रिशुल आणि अमृता देशमुख पेक्षा बरा होता टास्क्स मधे.
ती कोण वाइल्ड्कार्ड एंट्री आली आहे , नो स्पार्क.. वेस्ट ऑफ टाइम !

योगेश त्रिशूल दोघांना बाहेर काढायला हवं होतं आणि वसईकर ला आणण्यापेक्षा कोणीच न आणलेलं बरं होतं की.

स्नेहलता वसईकर म्हणजे बहुतेक अपूर्वाला पण सीनियर, सगळीकडे व्हिलन रोल करते म्हणून इथेही व्हिलन म्हणून पढवून पाठवले की काय ते कळेलच लवकर. मलाही बोअर पर्सन वाटली.

दुसरं असं की मराठी bb मध्ये कोणी वाईल्ड कार्ड म्हणून यायला तयार नाहीये, असं वाटायला लागलं.

या वेळेस मुळात खरे टास्क असे अजूनपर्यंत तरी झाले नाहीत.टास्कच्या नावाखाली डान्स ,मिमिक्री, विडंबन,पाककला,सूत्रसंचालन हे प्रकार झाले.ज्यामध्ये सम्रुध्दी, योगेश,विकास,त्रिशुल, रोहित यांचा दुरूनही संबंध नव्हता अँक्टिंगशी संबंध नसल्याने,पण जे या फिल्डमधले आहेत,त्यांच्यातही काही दम निही,त्यामुळे सतत तेच तेच बघून कंटाळा आला.बाकीच्या टास्कमध्ये जवळजव. कोणीच डोक लावल नाही ,त्यामुळे फक्त आरडाओरडा, भांडण झाली आणि खरतर त्या त्या टास्कमधल्या संचालकाने ते टास्क जिंकवून दिले.
जिंकण्यासाठी आले आहेत अस वाटतच नाही ,अजूनही.
बिबॉस तरी काय टास्क देत आहे.
आणखी फारफारतर एक आठवडा,आता जर बिबॉसनेच काही केल नाही.तर काही खर नाही.

काल एव्हिक्शनच्या घोषणेनंतर केवढा गळा काढला दोघीतिघींनी!
मी फक्त शनिवार रविवार पाहतोय आणि इथे वाचतोय. मेघा घाडगेने बाहेर येऊन दिलेल्या मुलाखतींमुळे लोक योगेश जाधव विरोधात गेले का?
किरण मानेच्या भाषेबद्दल सदस्यांना जेवढे आक्षेप होते तेवढे योगेशच्या भाषेबद्दल नव्हते ना?

मांजरेकरांचं जोड्या जुळवणं, गाणी म्हणणं बोअरिंग आणि चीप वाटायला लागलंय.

नाही, माने कुरापती, लावालाव्या करत असले तरी भाषा वाईट नसते त्यांची. उलट या फालतू अ‍ॅक्टर्स पेक्षा खूप चांगलं प्रभुत्व आहे त्यांचं भाषेवर. टॅलेन्ट च्या बाबतीत तेच चांगले वाटतात. पण मानेचा प्रॉब्लेम म्हणजे सतत व्हिक्टीम प्ले करतात अन आपण काही पुढे येऊन न करता जे चाललेय त्याबद्दल कंप्लेन्ट करतात. त्या विकास शी इतर सदस्यांबद्दल, ममांबद्दल कागाळ्या करत बसतात.
योगेश ची भाषा घाण शिवीगाळ , अंगावर धावून जाणे, हे होते पण बहुतेक त्या मेघाला मात्र प्रॉब्लेम त्या मानेशी जास्त होता.
योगेश पेक्षा त्या त्रिशुल ला घालवायला पाहिजे होते आत्ता.

माने मय झाला सगळा वीकेंड चा एपिसोड.
माने ना भरपुर दिवस ठेवुन चांगलं वसुन करुन घेणारे बिबॉ कारण तेच एक आहेत जे तिकडे मस्त काड्या टाकुन घर हालतं ठेवत आहेत.
जिंकवणार नाहीत हे मात्र नक्की.
सगळ्या चुगल्या मानेंच्याच होत्या. भरपुर पेटवुन दिलं आहे रान बिबॉ साठी.
काल पहिल्यांदाच अमृता देशमुख चुगली ला उत्तर देताना बोलताना दिसली आणि स्मार्ट वाटली. चांगली खेळु शकेल ती पण झोकुन देउन नाही खेळत अजुनही. अपुर्वा कुठेतरी आवडते आहे मनातुन हळुहळु. तोरा आहे तिला थोडा पण तरी बरीच पॉझिटीव्ह वाटते आहे आता.
अक्षय पण आवडायला लागलाय.
यश, अ धोंगडे नाहीच आवडत अजुनही.
तेजु पण चुकिच्या ग्रुप मधे आहे असं वाटतं बरेचदा.
रुचिरा पण थंड आहे. रोहीत कुठेच दिसत नाही.
योगेश गेला ते बरं वाटलं. मला तो इथे खुप मिसफिट वाटायचा पहिल्या दिवसापासुन. काय गळे काढुन रडत होत्या धोंगडे आणि यश अगागागागा...
स्नेहलता काय करते बघु आता आजपासुन पण ती अपुर्वा आणि अक्षय लाच चिकटणार.
माने अजिबातच आवडत नाहित मला. कुचकट पणा करतात खुप असं वाटतं. सतत कुत्सित हसत असतात. सतत दुसर्‍याला पाण्यात बघतात असं वाटतं. त्यांची इमेज बाहेर खराब आहे म्हणजे नक्की काय आहे कळलं नाही. "बायकांबद्दलची मतं" बदला असं काल वसईकर का म्हणाली ? काय इतिहास आहे कळला नाही.

मला माने खरच आवडतायेत इतरांपेक्षा , बिगबॉस मधे असं कॅरॅक्टर हवच, कॉन्टेस्टन्ट्स्/होस्ट् कोणाबद्दल बोलायला घाबरत नाहीत Happy
काल ते म्हंटले ते आवडलं ‘सर, इमेज क्लिन करायला माझी इमेज काय वाइट आहे का‘?
अक्षयला मांजरेकरां समोर झापलं , तेही आवडलं, मला तो अक्षय नाही आवडत अजिबात !

त्या अमृता आणि प्रसाद मधे काहीच चाललेले नव्हते.र्तो प्रसाद असा कुणाशी बाँडींग होण्याइतका मनाने स्टेबलच वाटत नाही मला. ममां कशाला इस प्यार को .... वगैरे गात असायचे तेच कळत नवह्तं. आता बळेच त्याला देवदास म्हणताहेत. अरे जे नव्हतेच ते संपल्याचे कसले कौतुक. प्रसाद सध्या शांत किंवा सॅड दिसत आहे पण त्याचे ते कारण नाही वाटत.
अक्षयचेही तसेच, तो सगळ्याच मुलींशी फ्लर्ट करतो. तसे उगीच अमृता दे. ला धरले आहे सध्या. अपूर्वा ऐवजी तिला कप्टन ची सल्लागार नेमून जरा बझ क्रिएट करण्याचा प्रयत्न असावा. अपूर्वा ला ते फारसे आवडलेले दिसले नाही. ममां तिला त्यावरून उचकवतील असे वाटले होते पण नाही केले ममांनी.

मला पण मानेच आवडतात. सडेतोड आणि लॉजिक सांगून बोलतात, लेव्हल हेडेड आहेत. कुणाचे मिंधे नाहीत, कसालाही कॉम्प्लेक्स नाही की काही प्रूव्ह करायचा आटोकाट प्रयत्न नाही. मजेत रहातात, तब्येतीत जो स्वभाव आहे तसं वागतात. क्रिटिसिझम पटलं तर मजेत स्वीकारतात. त्यात पण दोन चार जोक मारतात. मिश्किल आहेत त्यामुळे खवचट बोलले तरी ते ही प्रसन्न वाटतं. गेल्या आठवड्यात एक दोन भागात अपूर्वा पण आवडलेली.
वीकेंड काही मिनिटेच बघितला. त्यामुळे नवं काय झालं काही कल्पना नाही.

काल मांजरेकरांनी फ्रंटफूट-बॅकफूट करुन सगळ्यांना कंफ्यूज करुन टाकल Wink
अरे केहना क्या चाहते हो?? असे झालेले!!
त्यातून एकाही सदस्याला तोंड उचकटून सांगता आले नाही की सगळ्यांना सगळ्या आठवड्यात खेळता नाही येणार.... आम्ही मागच्या आठवड्यात खेळलो होतो, या आठवड्यात इतरांना चान्स दिला आता परत पुढच्या आठवड्यात खेळू..... आम्हीच दरवेळी खेळू लागलो तर मग तुम्ही प्रेक्षकांना बोलावून सॉरी सॉरी गाण्यावर नाचायला लावता Wink

मांजरेकरांनी "गिव्ह इट बॅक" म्हणून मानेंना चांगले पेटवून दिलेले आहे..... चावडीवर सगळ्यांनसमोर कोंबडी आणि तिची पिल्ले म्हणणे म्हणजे जरा अति होते!!
बाकी "सातारचा माज" वगैरे म्हणून आमच्या साताऱ्याला बदनाम नका करु ..... इतकेच म्हणावेसे वाटते

प्रसादला अमृता अवतीभवती नसण्याचा त्रास नक्कीच होतोय आणि त्यातून ती अक्षयबरोबर असल्यामुळेच अजुनच 'जले पे नमक' ..... अमृता त्या ग्रूपमधून बाहेर पडल्यावर खरेच चमकली Happy

बाकी त्या चुगल्या म्हणजे आगीत तेल प्रकार होता!!

ती कोण आलीय वसईकर तिने काय एकेक कारणे दिली..... अक्षय आणि अपूर्वाची मैत्रिण असल्यामुळे तिने प्रसादला पाण्यात टाकले बहुतेक ..... वचावचा भांडणारी वाटतीय ही Wink

तो सुंदरा मधला अभ्या येणार होता त्याचे काय झाले?

ती उगाच हवा अभ्याची केली बहुतेक.

एका शॉटमध्ये धोंगडे समृद्धीला अपूर्वा अक्षय बद्दल सांगत होती ते दोघेच दिसतात, तू विचार कर तर समृद्धी म्हणाली टास्कमध्ये माझंही मत घेतलं जातं पण त्या दोघांचं भाषेवर प्रभुत्व असल्याने, भाषा त्यांची दिसते म्हणजे सध्यातरी समृद्धी त्या grp ला सोडायचा विचार करत नाहीये.

परवा स्नेहलता तावडे - वसईकरने बिगबॉसमध्ये वाईल्डकार्ड एन्ट्री घेतल्यापासून सारखं वाटत होते की ती, प्रसाद व किरण ह्यांची एक मालिका स्टार प्रवाहवर यायची. मग आठवले की जवळपास दहा वर्षांपूर्वी स्टार प्रवाहवरच्या 'लक्ष्मी वर्चेस सरस्वती' मालिकेत प्रसाद नायक तर किरण व स्नेहलता, थोरल्या भाऊ व वहीनीच्या भूमीकेत होते. ह्याशिवाय स्वाती लिमये (नायिका), सविता मालपेकर (पुढे संजीवनी जाधव) ह्यांच्यासह अनेक कलाकारांचा लवाजमा होता. तेव्हाच मी किरण मानेंना पहील्यांदा बघीतले होते, त्यानंतर त्याने 'माझ्या नवर्याची बायको' मध्ये राधिका सुभेदारच्या भावाची भूमिका केली होती.

ही मालिका मला आठवत नव्हती आणि आत्ता तुम्ही लिहिल्यावर मला फक्त लिमये, स्नेहलता आणि मालपेकर आठवतायेत.

प्रसाद मला दिल्या घरी तू सुखी रहा मधला जास्त आठवतोय, त्यात भाचेजावई काम करत होते. तरीही मी जास्त बघितली नव्हती.

त्या अक्षयला म मां कधी कधी जास्त टिप्स देतात, कारण तो कलर्स हिंदीवर हीरो म्हणून होता असा हल्लीच मला शोध लागला आहे, त्याचे vlogs काही बघितले.

अन्जूताई >>> 'दिल्या घरी तू सुखी रहा' मध्ये प्रसाद नव्हताच. तुमचे भाचेजावई योगेश सोमण व आतिशा नाईकच्या मुलाच्या (नायकाच्या) भूमिकेत दुसराच कुणीतरी होता. तो दिल्या घरी नंतर लक्ष्य व अस्मितामध्ये एपिसोडीक रोलमध्ये दिसायचा. प्रसाद हा झी मराठीवरील 'असे हे कन्यादान' ह्या वारेमाप प्रसिद्धी करूनही लवकरच बंद झालेल्या मालिकेत होता. त्यात शरद पोंक्षे, अविनाश नारकर, मधुरा देशपांडे (नायिका), सुलेखा तळवलकर, व गायत्री सोहम (देशमुख) होते.

Pages