Big Boss Marathi Season 4- बिग बॉस मराठी सीजन ४

Submitted by तुरू on 27 September, 2022 - 08:44

Big Boss Marathi Season 4- बिग बॉस मराठी सीजन ४ लवकरच २ ऑक्टोबर ला सुरू होतंय.. त्याविषयी ,घरातील सदस्य कोण असतील, रोजच्या एपिसोड वर चर्चा करण्यासाठी नवीन धागा

20221006_181802.jpg

20221006_181816.jpg

20221006_181905.jpg

20221006_181918.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्रिशुल गेल्यानी ममांसकट इतके का इमोशनल झाले म्हणे ?
अक्षय आणि प्रसादची तर नौटंकी चालु होती !
यशश्रीशी का आणि काय वाजलं ममांचं ? टु मच बोलले असतील म्हणून एडिट केलं का ?
बोरींगच होता एपिसोड, मानेंनी खूप सुधारलाय स्वतःचा अ‍ॅटिट्युड !

शनिवारची चावडी आवडली मला. चांगले बोलले ममां. बाकी रविवार चा पार्ट मात्र बोअर झाला.
त्रिशूल ने घरात असे काय केले की लोक इतके रडत होते ते कळले नाही मलाही. इन जनरल हे लोक आत्ताच तर आलेत घरात ३-४ आठवडे झाले मग त्यातला एक जण घरी गेला तर इतके गळे काढायला काय झाले? इतके अनपेक्षित असते का कुणी जाणे ? Happy

मला यावेळी चावडी अजिबात आवडली नाही. चावडी म्हणजे ममां चं स्वगत होतं. कोणाला बोलुच देत नव्हते.
"तु बोलुच नको.मला नाही ऐकायचंय तुझं जस्टीफिकेशन , किंवा मला माहिती आहे तु काय बोलणार" असं म्हणण्यात काय अर्थ.
सिसॉ टास्क चं त्यांचं अ‍ॅनालिसिस तरी जरा बरं पण फुग्याच्या टास्क बद्दल अर्ध्याच गोष्टी माहित होत्या त्यांना बहुतेक.
माझ्या आठवणीप्रमाणे, अम्रुता धोंगडे जेव्हा अपुर्वा आणी यश ला सांगायली आली तेव्हा "मी सगळं केलं माझ्यामुळे टास्क चांगला झाला असं म्हणाली" या गोष्टी चा यश ला राग आला होता. धोंगडे गेल्यावर तिने तो अपुर्वा कडे व्यक्त पण केला त्यावर अपुर्वा ने बाहेर जाता आता , तुला तुझं मत तसंच ठेवायचं आहे की काही बदलायचंय असं विचारलं तेव्हा यश ने विकास चं नाव बदलुन धोंगडे केलं. असं असताना सुद्धा ममां अपुर्वा ला थेट म्हणाले की तुच धोंगडे चं नाव घेतलंस. एकमत झालं नाही तर बझर वाजणार्‍याचा फुगा फुटणार हे तर बहुतेक ममां ना माहितिच नव्हतं. यश आणि अपुर्वा दोघींना पण नीट बोलु दिलं नाही की नक्की काय झालेलं. आणि जर अपुर्वा ला विकास ला वाचवायचं होतं त्यामुळे स्वतः च्या बचावासाठी जरी यश ने धोंगडे चं नाव घेतलं असेल तर त्यात कुठे चुकलं ? मागे कोणाला तरी ओरड्त होते की तुला स्वत: ला कॅप्टन व्हायची ईच्छा नाही का ? मग आता यश ने कॅप्ट्न होण्यासाठी तिला हवं ते केलं तर ओरडायचं काय कारणं.
ममां चा अभ्यास कमी पडतोय जरा. त्यांनी समोरच्या माणसाला बोलु दिलं आणि मग शब्दात पकडुन त्याच्या चुका दाखवल्या तर ते स्मार्ट ठरतील. आता ते स्मार्ट नाही तर जास्त बायस्ड वाटत आहेत.
माने आणि विकास चं कौतुक केलं ते आवडलं.
त्रिशुल काल गेला तेव्हा असं वाटलं की त्याची चांगली बाजु दाखवलीच नाही बिबॉ ने. घरचे सगळे त्याचं इतकं कौतुक करत होते. तो टास्क मधे खेळत पण होता चांगला. जस्ट तो भांडत नाही म्हणुन त्याला तु दिसतच नाहीस असं सतत म्हणुन म्हणून त्याला बाहेर काढुन टाकला असं वाटलं.
अजुनही कोणीच मनापासुन आवडत नाहिये या बिबॉ मधे.

मांजरेकरांना कुणास ठाऊक, कशाचा माज आहे? दिग्दर्शक म्हणून आई, व काकस्पर्श (मराठी) (नटसम्राट मुळातच अजरामर नाटक आहे), व वास्तव व अस्तित्व (हिंदी) सोडले तर इतर कोणतेही उल्लेखनीय चित्रपट नाहीतच. मला त्यांनी दिग्दर्शित केलेली मराठी नाटक तर मुळीच आठवत नाहीत (कदाचित मी अनभिज्ञ असेल). म्हणजे एकूणच मांजरेकरांची खूप दैदिप्यमान वा उल्लेखनीय कामगिरी नाही.

मी बिगबॉस मुळीच बघत नाही. सोशल मीडिया किंवा मायबोलीवरच्या ह्या धाग्यावरूनच माहिती घेत असतो. पण जेव्हा केव्हा बिगबॉसच्या चावडीचे विडिओ सोशल मीडियावर बघण्यात येतात तेव्हा मांजरेकर कायमच आक्रस्तळे व उद्दामपणे बोलताना दिसतात (कधी कधी त्यांचं सडन बीपी वाढून ते कॉलॅप्स वगैरे तर होणार नाही अशी भीती वाटते). होस्ट म्हणून समोरच्याचे ऐकून घेण्याचीही, त्यांची बाजूही मांडू देण्याची गरज असते. मग अलगदपणे स्पर्धकांना गुंडाळून त्यांचेच धाबे दणाणून सोडायला हवे. पण ते न करता मी म्हणतो तेच खरे असे वागताना दिसतात.

हेही तेवढेच खरे आहे की बिगबॉस मराठी होस्ट करायला सध्या तरी मांजरेकरांना पर्याय नाही. ते उत्तम होस्ट नसले तरी सर्व स्पर्धकांना काबूत ठेवायला तश्याच व्यक्तीची गरज आहे.

>>हेही तेवढेच खरे आहे की बिगबॉस मराठी होस्ट करायला सध्या तरी मांजरेकरांना पर्याय नाही. ते उत्तम होस्ट नसले तरी सर्व स्पर्धकांना काबूत ठेवायला तश्याच व्यक्तीची गरज आहे.

हो म्हणजे जर चुकून मांजरेकरांनी सोडलेच होस्टींग तर या कार्यक्रमाची लोकप्रियता बघता तिथे महागुरु (किंवा स्वप्नील जोशी) नंबर लावायचे Wink
मग काय कराल? Rofl

माझे स्टंप, माझी बॅट .... असं त्यांचं आवडतं वाक्य आहे.
समजा या लोकांनी सांगितलं, जा तुमच्याशी नाही खेळत, तर काय होईल?
हे काही बिग बॉसच्या नियमांचे उल्लंघन व्हायचे नाही . Wink

मानेंनी खूप सुधारलाय स्वतःचा अ‍ॅटिट्युड ! >>> हो हो आणि तसाच ठेवावा. त्यामुळे स्नेहलता त्यांच्याशी गुडी गुडी दिसली. मानेंनी मात्र बायकांबाबत बोललेलं खरं नसेल तर तीव्र शब्दात निषेध करायला हवा होता, तिथे जरा मुळमुळीत म्हणणं मांडायला नको होतं.

स्मिता छान पोस्ट.

खरंतर अपुर्वाचं काहीच चुकलं नाही, यशच्या मनात धोंगडे होतीच त्यामुळे तिने मत बदलायला लावलं ते, धोंगडेपेक्षा विकास चांगलाच खेळला.

एकीकडे स्वतःसाठी खेळा सांगायचं आणि एकीकडे यश, समुने स्वत: पुढे जाण्यासाठी दुसऱ्याचे ऐकलं तर त्यांना सूनवा यचे. समु याबाबत क्लियर म्हणाली मला पुढे जाण्यासाठी हे करावे लागलं तर मी करणार.

कोणाच्यात ही हिम्मत झाली नाही मात्र की बिग बॉस ने जेव्हा त्यांच्या हातात सूत्र दिली तेव्हाच क्लियर झालं (त्यांच्या हातात गेलं तेव्हाच ठरलं हे म्हणाले पण बिग बॉसचे नाव कोणी घेतलं नाही) पण हे सर्व बझर दाबण्यातही कमी पडले.

सध्यातरी म मां anchor म्हणून चांगले वाटतायेत, काही गोष्टी वगळल्या तर. दुसरं कोणी नाना पाटेकर शिवाय चांगलं करू शकणार नाही.

हो म्हणजे जर चुकून मांजरेकरांनी सोडलेच होस्टींग तर या कार्यक्रमाची लोकप्रियता बघता तिथे महागुरु (किंवा स्वप्नील जोशी) नंबर लावायचे >>> हाहाहा, नको नको. इमॅजिनही करवत नाहीये. तो सिद्धुही नीट करणार नाही.

नाहीतर तो सिध्दार्थ जाधव किंवा जितेंद्र जोशीच यायचा .ते दोघही नकोत.
सचिन खेडेकर ,सुबोध भावे यांना ममांना जरा विश्रांती देऊन एक दोन चावड्या संधी द्यायला हरकत नाही.
आता विनय आपटेंची आठवण झाली.त्यांनीपण छान केल असत.

हो म्हणजे जर चुकून मांजरेकरांनी सोडलेच होस्टींग तर या कार्यक्रमाची लोकप्रियता बघता तिथे महागुरु (किंवा स्वप्नील जोशी) नंबर लावायचे >>> लिहितांना अगदी हाच विचार आला होता. अंजुताईने म्हणाल्याप्रमाणे कदाचित नाना पाटेकर चालतीलही, पण तेही कधीतरी उगीच प्रेमाचे भाषण द्यायला लागतील अशी भीती आहेच. तथापि कितीही माज व गुर्मी असली तरी बिगबॉस होस्ट करायला अनुक्रमे, मांजरेकर (मराठी) व सलमानच (हिंदी) योग्य आहेत. ह्याची कलर्सला पूर्ण कल्पना आहे म्हणूनच मागच्या वर्षी मांजरेकरांची केमोथेरपी पूर्ण होईस्तोवर कलर्स मराठीने सिझन सुरु केला नव्हता.

सुबोध भावे व सचिन खेडेकर दोघेही नको. भाव्यांना तर लगेच कंटाळा व ब्लॉक येतो म्हणे (नुकतेच सुलेखा तळवलकरांच्या यूट्यूब चॅनेल वर येऊन गेले). खेडेकर तर कोण होणार मराठी करोडपती होस्ट करतात, तेवढेच पुरे आहे. सगळा आनंदी-आनंदच असतो. असेच काहीसे संजय मोनेंचे झाले होते, ते जरी उत्तम नट असले तरी, त्यांना झी मराठीवरील 'कानाला खडा' ह्या कार्यक्रमाचे होस्टिंग अजिबात जमले नव्हते (त्यांनीही हे कबुल केलं आहे).

माझ्या मनातही मांजरेकरांचा पर्याय म्हणून विनय आपटेंच नाव होत. But I am doubtful if he would have agreed to host Bigg Boss.

काल तो केळकर सगळ्यांनाच विष का देत होता, त्रिशूल सोडून. समृद्धीला ही दिलं.

यावेळी म मां नी कौतुक केलेलं बघून निदान माने ना तरी अमृत द्यायचं. अपूर्वा उखडली तर उखडूदे. अर्थात तो खार खातोच म्हणा मानेनवर .

या तेजुने आता खरंच धोंगडेच्या नादाला न लागता आपला indivisual game दाखवावा. तिचा स्वभाव छान असल्याने तीच आवडतेय जास्त.

>>यावेळी म मां नी कौतुक केलेलं बघून निदान माने ना तरी अमृत द्यायचं

विष किंवा अमृत द्यायचा निकष वेगळा होता.... कोण कसे बोलते हा निकष होता ..... कोण सरळ बोलते, गोड बोलते त्यांना अमृत आणि टोचून, टाकून बोलणाऱ्यांना, टोमणे मारणाऱ्यांना विष असे काहीसे होते!!

काल ममां आणि यशश्री मधे मोठा वाद झाला म्हणे तिने बरीच उलट उत्तरं दिली आणि ममांनी भडकून तिला बॅग घे आणि घराबाहेर जा म्हणाले! हे आता मी सोमि वर पाहिले. शूटिंग थांबले होते म्हणे काही काळ . नंतर काय सेटलमेन्ट झाली माहित नाही कुणाला, पण आपल्याला एपिसोड एडिट करून दाखवला. आता चावडि बघायला प्रेक्षकांना अलाउ केले आहे आणि प्रेक्षकांच्या समोर हे झाल्याने सगळीकडे पसरले. आता चर्चा ही चाललेली दिसते की कन्टेस्टन्ट ने ममांचा इन्सल्ट केला तर त्यांना असा अधिकार आहे का कोणाला एलिमिनेट करण्याचा? हिंदीत सलमान ने हे पूर्वी केले आहे. पण इथे त्यांना तसे करू दिलेले नाही हे उघड आहे.

स्वरूप असा निकष होता का, थँक्स.

म मां यश वाद का दाखवला नाही, असं youtuber विचारत होते, काही कारण असेल ना. बाकी तर दाखवतात. तिथे असंही म्हणत होते की हिंदीत बाहेर काढायचा अधिकार होस्टला आहे, इथे असा दिसत नाही.

म मां यश वाद का दाखवला नाही, असं youtuber विचारत होते, काही कारण असेल ना. बाकी तर दाखवतात. >>> अरे नाहिच दाखवणार, ममाचा दरारा काय राहिल मग?
मी सिझन आणि चावडी दोन्हीही बघत नाहिये, इथे वाचुन थोडफार कळतय, इथल्या चर्चा वाचुन तरी यन्दा ममाना कुणी जुमानत नाहिये अस दिसतय.

एखाद्या ऑडियन्स मेंबरला विचारून युट्युबर्सनी आणावे डिटेल्स लोकांपुढे त्या भांडणाबद्दल !
माझा अंदाज :ममा निष्कारण आउट ऑफ कंट्रोल झाले असतील तर त्यांची इमेज जपायला दाखवले नसेल !

हो, यश जाईल.

काही म्हणा ए टीम नेहेमी चांगली खेळते, कोणीही असो मेंबर (अपवाद राडा टास्क, तो बी टीमने एक्सलंट केला) .

अपूर्वा विकासमध्ये टक्कर झाली की नेहेमीच विकास जिंकतो, मस्तच.

धोंगडे, तेजु आधी जिंकल्या नंतर हरल्या. अपूर्वा अक्षय बरोबर उलट, आधी हरले नंतर जिंकले .

रुचिरा अगदीच स्लो आहे. स्नेहलता दोन्ही वेळा चांगली खेळली. अमृता देशमुख चांगली खेळली. मानेही चांगले खेळले.

प्रसाद, माने यांचा कॉलेज किस्सा मस्त होता.

टीम पडायच्या आधी जे ए टीम आणि बी टीम चे मेंबर होते त्यात विरुद्ध टीमसाठी गाणं म्हणण्यात पण ए टीम बेस्ट होती त्यांनी नुसतं गाणं नाही तर डान्स करून धमाल आणली.

समृद्धीने संचालन योग्य प्रकारे केलं, फेअर होती.

किरण माने काय भारी खेळले ऑपोझिट टिम मधे जाऊनही , ५०+ असून फिजिकल टास्क्स चांगले खेळतात , रोहितला मस्तं पकडून ठेवलं होतं !
अपूर्वा ओव्हर अ‍ॅक्टिंग कि दुकान , वेड्या सारखी रडायचं नाटक करत होती त्रिशुलच्या आठवणीत , नंतर विकास बरोबर उगीच जबरदस्तीचे फ्लर्टिंग !

काल टीम ए जरी जिंकली,तरी एव्हिक्शनच्या रेसमध्ये सपशेल हरले.
नॉमिनेशन मध्ये तो प्रसाद आणि धोंगडे हे सतत येऊनही सेफ होत आहेत,हे या अति स्मार्ट लोकांना कळत नाही का,बाहेरच्या वोटिंगबद्दल माहिती नसेलही पण एका माणसाला सतत नॉमिनेट करून तो बाहेर जात नसेल तर अशा माणसासमोर स्व:त: नॉमिनेशन मध्ये असतिना स्ट्रॉंग माणसाला का नॉमिनेट कराव.
प्रसाद आणि धोंगडे पहिल्या दोन राऊंड्सला एकदम शांत होते.अपूर्वा चक्क म्हणालीही की आज यांचा ग्रुप शांत आहे.त्यांच एकमतही लगेच झाल.
आणि पहिल्याच दोन राऊंड्समध्ये टीम बीच्या वीक कंटेस्टंट्स्ंना त्यांनी नॉमिनेट केल.आणि मग प्रसादचे अर्ग्युमेंट्स चालू झाले,धोंगडेला तर जणूकाही यशलाच नॉमिनेट करियच होत.यश आता टीम ए कडे गेली आहे.
त्यामुळे धोंगडे वोटिंगमध्ये सेफ असू शकते,प्रसाद ,तेजू तर बाहेर जाणार नाहीत.मग राहिल कोण,स्नेहलता,रुचिरा आणि यश.

अमृता देशमुख इतक्या आठवड्यात बहुतेक पहील्यांदाच नॉमिनेशनपासून सेफ आहे नाहीतर दरवेळी नॉमिनेट होत आलीय..... तेजस्विनी नॉमिनेशनमध्ये आली ते बरे झाले; पब्लिक सपोर्टचा अंदाज तरी येईल!!
यशश्रीच्या कालच्या एपिसोडमधल्या वागण्यावरुन अशी पुसटशी शंका पण येत नाही की चावडीवर मोठा काही तमाशा झाला असेल..... कितीही नाही म्हंटले तर असे काही झाले असते तर ती आणि तिच्याबरोबर बाकीच्यांचे वागणेही बदललेले दिसले असते..... तसे काहीच जाणवले नाही!!
या युट्यूबर्सचे काही सांगता येत नाही..... निम्म्या गोष्टी माहिती नसतात त्यांना पण आव तर असा आणतात की एखादा सीझनभर राहून/खेळून आलेत आत Wink
सॅमने चांगले फेअर संचालन केले Happy

अक्षय अपूर्वा तिकडे नॉमिनेशन वगैरे ठरवताना बाकीच्यांचे अज्जिबात ऐकून घेत नाहीत..... त्या दोघांनी ठरवून टाकले होते की प्रसादला नॉमिनेट करायचे; स्नेहलता तर हो ला हो करतेच; मानेंना असेही प्रसाद पटत नाही त्यामुळे चौघांचा होकार आल्यावर majority wins म्हणून यशश्री आणि अमृताला विचारले पण नाही..... आणि त्या दोघीही उगाच पाण्यात राहून माश्याशी वैर करायला जात नाहीत!!
आणि इकडे त्या रुचिराचे पहील्या फेरीपासून अमृता देशमुख एव्हढे एकच नाव होते पण तेजस्विनी आणि प्रसादने निदान पहिल्या काही फेऱ्यात तर हाणून पाडले ते Happy

बाकी सुरुवातीला टोपणनावे काय आणि कॉलेजचे किस्से काय?? बिग बॉस अगदीच लाडात आलेले होते Happy

माने, दोन अ चं विकासला नॉमीनेट न करण्याबद्दल मात्र एकमत होतं.

माने प्रसाद आणि रुचिरा नावावर ठाम दिसले, धोंगडेला करायचं नव्हतं त्याना.

अजूनही मी तेजु चीच फॅन, तो प्रसाद नको बाबा वोटिंग वर जिंकायला.

दोन अ आणि तिथली धोंगडे, प्रसाद हे चौघे मला आवडत नाहीत.

अन्जु,
जिंकणे वगैरे खूपच दूर आहे अजुन, काहीही होऊ शकतं तोपर्यन्त.
पब्लिक सपोर्ट असेल त्याला जिंकवतात अजुन तरी मराठी बिबॉ आणि मेन व्हिलन दुसरा येतो !

मानेंना प्रसाद्ला करायचेच होते नॉमिनेट.रुचिराचे नॉमिनेशन अक्षय ने केले त्याचे मला तरी आश्चर्य वाटले.
प्रसाद काल किंचित सुधारल्यासारखा जरा शांतपणे मतं मांडताना दिसला. धोंगडे मधे फायटिंग स्पिरिट आहे. तेजा फार मिळमिळीत वाटते त्या मानाने. अपूर्वाचे काय ते रडणे सुरु होते, त्रिशूल गेल्यावर एकटे वाटतेय म्हणे. कधी दिसली पण नाही त्याच्यासोबत काही क्वालिटि गप्पा मारताना.
विकास टास्क्स मधे अ‍ॅज युज्वल मस्त. समृद्धीने चांगले संचालन केले. मला ती स्नेहलता अजिबात म्हणजे अजिबात आवडत नाहीये. उगीच अ‍ॅटिट्यूड आहे.

मोस्टली, यश किंवा स्नेह बाहेर यावेळी.

सध्यातरी पब्लिक सपोर्ट मध्ये प्रसाद पुढे दिसतोय आणि व्हिलनगिरी करण्यात अपूर्वा.

बाय द वे नॉमीनेट झालेले एवढे किरकिर, कटकट, चिडचिड का करतात, गेमचा फॉरमॅट आहे आणि b b ज्यांना ठेवायचं त्यांना ठेवणारच.

बी टीम धन्य आहे, त्यांचे वाद संपता संपेना.

उद्या अपूर्वा अक्षय प्रसाद एकत्र आले तरी शॉक बसणार नाही, अशी परिस्थिती आज होती.

धोंगडे, तेजस्विनी आणि प्रसाद भांडण सुरू असताना त्या दोघी एकदम बोलत असताना, काही समजत नव्हतं, मी म्हणाले एकेकीने बोला ग, काही समजत नाही, सेम प्रसाद बोलला तिथून Lol .

प्रसाद हुशार आहे, स्वतः चा indivisual गेम खेळतोय, आज अक्षय, अपूर्वा, प्रसाद तिघांना स्नेहलताला वाचवायचे होतं, त्या दोघींना मानेंना.

आज जे काही प्रसादने केले ते जर उद्याच्या गेममध्ये अक्षय आणि अपुर्वा टीमचा सपोर्ट मिळवण्यासाठी असेल तर its a good stratagy; otherwise 'धन्यवाद' आहे तो!!

Pages