Big Boss Marathi Season 4- बिग बॉस मराठी सीजन ४

Submitted by तुरू on 27 September, 2022 - 08:44

Big Boss Marathi Season 4- बिग बॉस मराठी सीजन ४ लवकरच २ ऑक्टोबर ला सुरू होतंय.. त्याविषयी ,घरातील सदस्य कोण असतील, रोजच्या एपिसोड वर चर्चा करण्यासाठी नवीन धागा

20221006_181802.jpg

20221006_181816.jpg

20221006_181905.jpg

20221006_181918.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

संभाव्य नावांपैकी स्नेहा चव्हाण, मानसी नाईक यांनी ऑलरेडी आपण नसल्याच सांगितल आहे.हार्दिक जोशीचही लग्न असल्याने तोही नसावा.
यावेळी गुप्तता पाळण्यात मेकर्स बर्यापैकी सफल झाले आहेत.
पण ऑल इज वेल म्हणजे काय ते कळल नाही.
टायटल सॉंंग नाही आवडल.

मी बघणार आहे अर्थात Happy
मागच्या वेळेचे टायटल सॉंग फार मस्त होतं. ओ भाऊ जरा चावडी वर या. या वेळचे इतके खास नाही वाटले. पण छोटे प्रोमो आलेत ते फनी आहेत.
या वेळी गेम फॉर्मॅट काहीतरी वेगळा असल्याचे अन वीकेन्ड चा वार पण काहीतरी वेगळा असणार असे कुठे कुठे वाचले. खरं की नाही ते कळेलच. ममां आहेत ते वाचून हुश्श झाले. मला तो सिद्धू अज्जिबात आवडत नाही.

सुंदरा मनामध्ये भरली तला अभ्या म्हणजे समीर परांजपे ची मालिकेतून एक्झीट झाली वाटतं...तो येईल का बिग बॉस मध्ये?

केतकी चितळे येणार आहे असं कुठेकरी वाचलं. सध्याच्या घडामोडी बघता तिला खुप स्कोप आहे बिबॉ मध्ये Wink

तुमची मुलगी काय करते मधला इन्स्पेक्टर भोसले हरीश दुधाणे आला तर मजा येईल.. रिअल मध्ये कसा आहे ते बघायला आवडेल . त्याच मराठी बऱ्यापैकी शुद्ध आहे.. अशी लोक सूचना पत्र वाचायला पुढे असतात

हरीश दुधाडे रियल चांगला असावा असं वाटतं. तसा multitallented आहे, गातोही छान, त्याचे आजोबा युवा गंधर्व होते (त्यानेच सांगितलं एका मुलाखतीत), बाबा संतूर वाजवतात.

हरीश दुधाडे रियल चांगला असावा असं वाटतं. तसा multitallented आहे, गातोही छान, त्याचे आजोबा युवा गंधर्व होते (त्यानेच सांगितलं एका मुलाखतीत), बाबा संतूर वाजवतात.>> Oh .. आला तर मजा येईल.. बघुयात २ऑक्टोबर ला

हरीश दुधाडेला त्या मुलीच्या सिरियलमध्ये हीरो बनवत आहेत,ते सोडून बिबॉसच्यि घरात येऊन शेवटपर्यंत टिकायच असेल तर सॉल्लिड सेटिंग लावाव लागेल.

भोसले हिरोसारखा एकटा गेला, शेवटी केके mam आणि टीम गेलीच मदतीला, कसला पचका झाला.

सिरीयल सुरू झाली तेव्हा दुधाडे एवढा जाडा नव्हता, त्याला मुद्दाम वजन वाढवायला सांगितलं आहे की काय, मग जोक करता येतात त्याच्यावर.

Big boss premier चे दोन प्रोमो आलेत.. duet वाला तर अगदीच वाह्यात म्हणावा असा आहे... अंग लगाले गाणं...जरा जास्तच अंगचटीला आलेले आर्टिस्ट आणि कॅमेरामन .. मी तरी मोबाईल वर हा कार्यक्रम बघते..पण बरीच जनता अगदी खेडो पाडी पोरा बाळांसोबत कार्यक्रम बघते.. काय म्हणून असे डान्स performance ठेवतात

सिरीयल सुरू झाली तेव्हा दुधाडे एवढा जाडा नव्हता, त्याला मुद्दाम वजन वाढवायला सांगितलं आहे की काय, मग जोक करता येतात त्याच्यावर >> अन्जु आता गल्ली नक्कीच चुकली ..असो .. Lol kk मॅडम म्हणते पण ना की एवढा बेडका सारखा फुगलेला कसा गेला पळून

नवीन प्रोमोप्रमाणे पहिली स्पर्धक सम्रुध्दी जाधव आहे,स्प्लिट्सव्हिला मध्ये होती. यांचा आता फॉर्मँट ठरलेला आहे.
एक रोडिजमधला,एक स्प्लीट्सव्हिला,एक कलर्स मराठीच्या सिरियलमधला,एक लावणी,एक सिनियर किंवा ज्याला बकरा बनवता येईल असा,जसा लास्ट टाईम दादुस होते.बाकीचे जसे मिळतील तसे.

एक गायक
एक सिनियर पुरुष, एक सिनियर स्त्री

सो लुकिंग फॉरवर्ड Happy
ओह वॉव, समृद्धी जाधव का ?
जयच्या सिझनलाच होती ती मला आवडायची पण तिथे लवकर गेली होती बाहेर !
दिसायलाही मस्तं आहे !
इन्स्पेक्टर भोसले उर्फ हरिश दुधाडे आला तर मजा येईल. त्याची सिरीयल जोरात चालु आहे पण, ती आधी संपायला हवी. काही केल्या किल्वरचं सन्स्पेन्स फोडायचं नाव घेत नाहीये , तुमची मुलगी काय करते !
केतकी चितळेचं नाव दर वर्षी येतं, कायम काँट्रोव्हर्सी मधे असते, ती बहुदा फिटनेस टेस्ट मधे क्वालिफस्य होत नसेल .

duet वाला तर अगदीच वाह्यात म्हणावा असा आहे... अंग लगाले गाणं...जरा जास्तच अंगचटीला आलेले आर्टिस्ट आणि कॅमेरामन

>>> सोमी वर बऱ्याच जणांनी नापसंती व्यक्त केली आहे या प्रोमो बाबत

मी सोमवारी बघेन bb . रविवारी ते डान्स, intro यात बरेच तास घालवतात.

मला स्वरदा थिगळेलाही बघायला आवडेल, mmtz मध्ये हरिश बरोबर लिड होती आणि नुकतीच तिने ताराराणीची भूमिका मस्त केलेली. ती हरिशपेक्षाही multitallented आहे. उत्तम अभिनय, डान्सर, गाते छान, उर्दू शायरी खूप येते, बरेचदा ऐकली आहे मुलाखतीत, स्वीमर आहे.

फक्त कधी कधी वाटतं की आपले आवडते इथे येऊन नीट वागायला हवेत, नाहीतर मनातून उतरतात.

समीर परांजपे पण आवडतो.

बिबॉचा धागा काढल्याबद्दल तुरुचे अभिनन्दन! मी काढणार होते खरतर, पण वेळ नाही मिळाला.

हरीष दुधाडे स्टार प्रवाहच्या धिन्गाणामध्येही येतोय ह्या शनिवारी.

दुसर्या प्रोमोमधली मुलगी मानसी नाईकसारखी दिसतेय.

मागच्या वेळेचे टायटल सॉंग फार मस्त होतं. ओ भाऊ जरा चावडी वर या. या वेळचे इतके खास नाही वाटले. पण छोटे प्रोमो आलेत ते फनी आहेत. >>>>>>>> अगदी अगदी

समीर परांजपे पण आवडतो. >>>>>> मलाही

मला स्वरदा थिगळेलाही बघायला आवडेल>> तीच ना..सुबोध भावे सोबत तिची झी मराठी वर मालिका होती ..कुसुम मनोहर लेले च्याकथेवर ..चांगली acting करते ती

मराठी चॅनल्स नाहीयेत त्यामुळे वरची बरीच नावे ऐकूनही माहित नाहीत.
मानसी नाईक , हरिश दुधाडे बर्‍यापैकी ए लिस्टर मधे मोडतात, बिबॉ मधे असतील कि नाही शंकाच आहे, जर असतील तर थेट टॉप ५ मधे पोचणार नक्की !

मला तर हे दोघेही माहित नाहीत. त्यामुळे कोर्‍या पाटीनेच बघणार. मागच्या वेळि पण तसेच होते त्यामुळे मजा आली मनात कोणतीच बॅकग्राउंड नसल्यामुळे.

तीच ना..सुबोध भावे सोबत तिची झी मराठी वर मालिका होती ..कुसुम मनोहर लेले च्याकथेवर ..चांगली acting करते ती >>> नाही, नाही. ती नव्हती त्यात. तेव्हा ती हिंदी सिरीयल्स करत होती.

सावित्रीबाई कॉलेज अँड हॉस्पिटल का काहीतरी होती, त्यात ती डॉक्टर होती. त्यात निशिगंधा वाड, शिल्पा शिरोडकर वगैरे होते. त्यानंतर अजून दोन हिंदी केल्या, एक नागिन होती एकता कपुरची. मग परत मराठी केली. वेलकम होम हा परेश रावलचा पिक्चर केला, सोनी ओटीटी वर. ती फेसबुक फ्रेंड आहे, त्यामुळे माहीती. नवीन काही आलं की पोस्ट करते.

Pages