Big Boss Marathi Season 4- बिग बॉस मराठी सीजन ४

Submitted by तुरू on 27 September, 2022 - 08:44

Big Boss Marathi Season 4- बिग बॉस मराठी सीजन ४ लवकरच २ ऑक्टोबर ला सुरू होतंय.. त्याविषयी ,घरातील सदस्य कोण असतील, रोजच्या एपिसोड वर चर्चा करण्यासाठी नवीन धागा

20221006_181802.jpg

20221006_181816.jpg

20221006_181905.jpg

20221006_181918.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ग्लॅमरस स्मितासारखी आहे पण by facing दोन तीन जणी आठवतायेत, कॉम्बो वाटते. स्माईल मला उर्मिला कानेटकर सारखं वाटतं, चेहेरा स्मिता पाटील नाही पण कोणीतरी सिरियल actress आहे तिच्या जवळ जाणारा आहे, नक्की सांगता येत नाहीये.

बघितला कालचा एपिसोड..... अमृता देशमुखला अखेर कंठ फुटला.... hope its not too late for her कारण ती ऑलरेडी नॉमिनेशनमध्ये आलेली आहे आणि बाकीचे नॉमिनेटेड लोक पण तगडे आहेत!!
अपुर्वा आणि किरण मानेला कंटेंटसाठी ठेवतीलच, यशश्री पण काही ना काही कंटेंट देतीय तर आता राहता राहिले मेघा घाटगे आणि अमृता देशमुख त्यामुळे अमृता देशमुखने या आठवड्यात काहीतरी चमकदार करुन दाखवले पाहिजे!!
अर्थात तिला बाहेर चांगला सपोर्ट दिसतोय पण बिगबॉसचे काही सांगता येत नाही वोटींग ट्रेंड्समध्ये एक नंबरवर असुनही बिगबॉसने तिला मागच्या आठवड्यात बॉटम ३ मध्ये ठेवले होते.
अपुर्वा दिवसेंदिवस अधिकअधिक डोक्यात जायला लागलीय 'माझा ऑडियन्स बघतोय' काय अन 'माझा पाणउतारा केलास' काय आणि काय काय बोलली त्या अमृता धोंगडेला.... लायकी काय आणि बौद्धिक पातळी काय!! परत खाणार बहुतेक शिव्या या वीकेंडला Wink
त्या केळकरला पण कुठल्याही गोष्टी आपल्या अंगावर ओढवून घ्यायची खुमखुमी आहे..... अपुर्वा आणि अमृताच्या भांडणात याचे काय आपले मध्येच..... माझे नाव अपुर्वा बरोबर का घेतलेस म्हणे!! अरे तू बसला होतास ना तिच्याबरोबर मग तेच बोलली अमृता!!
रुचिराला मेघाला वाचवता आले असते पण उगाच फेअर खेळण्याचा आव आणत यशश्रीला उडवायचे ते उडवलेच पण मेघालाही वाचवले नाही; यात तिची काही स्ट्रॅटेजी असेल तर गोष्ट वेगळी पण मेघा तिच्याच ग्रूपमधली होती तर तिला वाचवणे जमले असते रुचिराला Happy

सगळेच फेअर खेळले असते तर चर्चेत नाहीत या एकमेव निकषावर अमृता देशमुख, त्रिशुल मराठे, योगेश जाधव, मेघा आणि रोहीत/रुचिरा नॉमिनेटेड असणे योग्य होते Happy
अपुर्वा, किरण माने आणि यशश्री या ना त्या कारणाने चर्चेत होतेच!!

लेटेस्ट वोटिंग ट्रेंड
1.अम्रुता
2.माने
3.अपूर्वा
4.मेघा
5.यश
(सौजन्य- अँक्ट रायडर्स)याच बर्यापैकी खरे असतात.
अम्रुता काल बोलली,तरी पहिल्या
नंबरवर येण्याइतपत ही खरच डिझर्विंग आहे,एरवी चेहर्यावर मग्ख भाव असतात.त्यापेक्षा ती दुसरी अम्रुता परवडली.हिला देशमुखसाठी पुढे जाऊन नको काढायला.
माने दुसर्या नंबरवर,हे बघून धक्काच बसला,यांना कोण वोट करत आहे की बिबॉसच करत आहे.
बाकी,त्या कँप्टन रोहितला गदागदा हलवायला हव.चेहर्यावरची माशी पण हलत नाही.
काल त्या बायका एवढ जोरजोरात भाडत होत्या ,हा मख्खपणे उभा होता.अरे बाबा,संचालक आणि कँप्टन दोन्ही आहेस ना,मग जा ना मध्ये भांडण सोडवायला.
इथे प्रसाद नक्की गेला असता कँप्टन असता तर
प्रसाद प्लेयर चांगला आहे पण भडक डोक्याचा आणि हट्टी आहे.आता बाहेर सगळ्यांना पॉझिटिव्ह वाटत आहे,पण काही चुकीच्या मूव्हमुळे निगेटिव्ह व्हायला वेळ लागणार नाही.

बाहेर प्रसादला कायम सपोर्ट मिळत राहणार. एकदा लोकांनी डोक्यावर घेतलं की फारसे उतरवत नाहीत, इथे आपण मा बो कर खेळ बघून जास्तीतजास्त फेअर लिहिण्याचा प्रयत्न करतो पण वोटिंगबाबत जास्तपणे एकाच्या बाजूने तर एकाच्या बाजूने असतात आणि grp वाईज पण प्रसादच्या बाजूला माप झुकते आहे. विरुद्ध चांगले काहीजण असून त्यांना भाव नाहीये असं दिसतंय. तरी मी फक्त यूट्यूब दोन दोन मिनिटं बघते, त्या खालचे कमेंट्स वाचते. त्यादिवशी प्रसाद चुकीचा होता पण लोकं मानायला तयार नाहीत, तो माइंडगेम खेळला म्हणे आणि निखिल बाहेर गेला ते योग्य आहे लिहिलं अनेकांनी.

मला काल अमृता धोंगडे, अक्षय आणि अपूर्वा तिघांचे पटलं नाही म्हणजे मला वाटतं अपूर्वा एकदा तिला सांगायला गेली , तिने ऐकलं नाही मग विषय संपला ना. धोंगडे कसं म्हणत राहिली मी मुद्दाम तू आणि अक्षय होते तिथून फिरत राहिले, तू परत सांगायला येशील, ते उगाच वरवरचे वाटलं. अक्षयला काहीच लक्षात आलं नाही पण फ्रेममध्ये यायचा चान्स मिळाला आणि त्याने मध्येच बोलून घेतलं. तिसरे अपूर्वा उगाच माझे fans करत बसली.

प्रसादने काही फिजिकल अटॅक केला वगैरे नाही तर तो जिंकेल बहुतेक. ह्यावेळी वासरात लंगडी गाय शोधायला लागणार, कोणाबद्दल खात्री नाही, सो सो वाटतायेत.

देशमुखला प्रसादमुळेही votes मिळतायेत.

मला वाटतंय यावेळी तेजस्विनी जिंकणार....तिच्यात winning qualities भरपूर आहेत...प्रसाद नको तिथे वाद घालून मागे पडतोय...बाकी समृद्धी पण नक्की असेल पाहिल्या पाचमध्ये... खूप हुशार आहे ती...बाकी विकास मस्त entertain करतोय...काल समृद्धीची अ‍ॅक्टींग आणि आज अपूर्वाची अ‍ॅक्टींग मस्त केली त्याने..

मला वाटतंय यावेळी तेजस्विनी जिंकणार. >>> ती आवडते मला पण आत्ता नाही सांगता येत काही. सपोर्ट असेल तिला तर बरं आहे.

येस्स मोक्षु, विकासने जाम मजा आणली, फनी आहे तो. त्याचा आणि अपूर्वाचा वाद भारी रंगला विकासमुळे. अक्षयपण जाम हसत होता. आज बघण्यासारखा तोच सीन होता. बाकी कचकच आणि भांडणे.

प्रसादला grp नकोच आहे बहुतेक, कधी कधी खूप टोकाचा वागतो.

नेमळेकर बाई आणि धोंगडे बाई यांनी फार कचकच करून फुटेज घेतलं, मी म्युट केला टीव्ही.

थांबा थांबा , किती घाई कोण जिंकणार त्याची , टु अर्ली !
कोणालाच खूप सपोर्ट नाही/कोणाची चर्चा नाही, ट्रेंड्स नाहीत , कुठले गृप धड बनले नाहीत, चर्चा होईल अशी टास्क्स सुद्धा नाही आली अजुन !
काल बायकांचाच आवाज जास्तं होता आणि माने !
या आठवड्यात मेघा गेली पाहिजे, फार अनॉयिंग आहे !
त्या अ‍ॅक्ट रस्यडर्स व्होटिंग ट्रेन्ड्स वगैरेला सिरीयसली घेऊ नका, त्याला काही अर्थ नाही !
बिगबॉस त्यांना हवे त्यांनाच काढणार !

मला तेजस्विनी बॅलन्स्ड् वाटतेय. अजून विनिंग मटेरियल कोणीच वाटत नाहीयेत मात्र. अपूर्वा आणि विकास चे भांडण एन्टरटेनिंग होते Happy तिचे अन अमृताचे मात्र ऐकवत नव्हते.
अपूर्वाताई कण्टेन्ट देतात काहीही करून.

बिबॉसची चलबिचल वाढली आहे,तिसरा आठवडा आला तरी ग्रुप्स बनत नाहीत अजून.
कसले फालतू टास्क देतात.स्टार्स बनवायचे.काय क्राफ्टचा तास आहे का?
बिबॉस ची क्रिएटिव्ह टीण पण आपटली आहे या वेळी.
बाकी अपूर्वाने प्रसादचा सांगितलेला किस्सा खरा असेल तर मात्र खरच आगाऊ आहे प्रसाद.
पण कंटेंट देत असल्याने आणि टास्कही खेळत असल्याने तो राहाणार.
यावेळी बिबॉसला सिलँबस खरच बदलाव लागेल जर पक्के ग्रुप नाही झाले तर.
पण एखादा सिझन नाही झाले पक्के ग्रुप,खेळले काही लोक स्वतंत्र किंवा बिबॉस देईल तशा ग्रुपमधून तरी चालेल की.वैयक्तिक टास्क द्या.पहिल्या सिझनला बर्यापैकी असे टास्क दिले होते की.
विनिंग मटेरिअल कोणी वापत नाही,पण मग अशा वेळी बिबॉस बाहूरून मिळणार्या सपोर्टवरून ठरवेल कोणाला घेऊन जायच किंवा नाही ते.

प्रसाद चा किस्सा त्याची इथली अ‍ॅटिट्यूड पाहून बिलिवेबल वाटला मला! असे असेल तर तो असेही समजत असेल की तोच ऑलरेडी विनर आहे.
मला अजिबात आवडत नाहीये तो. अ‍ॅरोगन्स ही वेगळी गोष्ट , तो जय मधेही होता , त्यामुळे तेव्हा तो आवडत नसला तरी तो ग्रेट प्लेयर होता खरंच. त्याने इतर अनेक शेस्ड्स दाखवल्या होत्या . प्रसाद चे फक्त भांडण सुरू असते पूर्ण वेळ, आणि त्यात पण काहीच मुद्दे ऐकू येत नाहीत नुसते ओरडणे ऐकू येते त्याचे.
कालचा सगळा भाग नो मुद्दे आणि फक्त आरडाओरडा असा होता.

अपूर्वाने सांगितले की प्रसाद ची आणि तिची भेट एका मालिकेच्या की सिनेमाच्या ऑडिशन च्या वेळी झाली. तेव्हा तिची रात्रीस खेळ चाले नुकतीच संपली होती. तर हा तिला म्हणे, तू इथे कशी? संपली ना आता सिरियल, मग आता लग्न कर आणि भाजी निवडता निवडता साडेसातच्या स्लॉट ला माझी सिरियल बघ मुलाबाळांसोबत. तिला नंतर अजून एक सिरियल मधे लीड रोल मिळाला तेव्हा तिने म्हणे त्याला फोन करून सांगितले की तूच आता मुलाबाळांसोबत माझी सिरियल बघ.

ओहह, अतीच आहे हा.

साडेसातच्या ताराराणीमध्ये तिने राणी चेन्नमाचा रोल केलेला.

थँक्स मैत्रेयी.

मला अपूर्वा आता आवडायला लागली आहे Proud
लाउड आहे /शॉर्ट टेम्पर्ड आहे पण प्रसाद सारखी नुसतीच बेसलेस , बिनडोकपणा करत नाही भांडत .
किती पॉझिटिव असेल माहित नाही पण कन्टेन्ट क्वीन आहे या सिझनची !
तिचे आणि विकासचे कॉन्व्हर्सेशन ऐकताना फार हसु येत होते, हॅन्डग्लोव्ह्जचे फुगे Biggrin
नंतर त्या टास्क मधे तिने विकासला पकडून लॉक करून ठेवले होते , त्याला म्हंटली आडवा पड , म्हणजे कम्फर्टेबली लॉक्ड रहाशील, तो विकासही आडवा पडून पाय झाडु लागला Rofl
आम्ही आमच्या डॉग्जना वापरतो आडवा पडणे टर्म Wink
मागच्या सिझनमधे सोनाली पाटिल मेकप मॅजिकने छान दिसायची, या सिझनमधे मेकपने ३६० डिग्री ट्रन्स्फॉर्मेशन होणारी कॉन्टेस्टन्ट म्हणजे अमृता धोंगडे, ओळखताही येत नाही विदाउट मेकप ! पण फार सुट होतो तिला मेकप !
तेजःस्विनी, अपूर्वा, रुचिरा या विदाउट मेकपही चांगल्या दिसतात, रुचिराचा मेकप आवडतो .
Btw , त्या योगेशला सध्याच्या मराठी सिनेमातल्या ऐतिहासिक ट्रेंड मधे अफझल खान किंवा तत्सम मुघल रोल्स शोभतील !

मी अर्धच बघितलं आज.

अपुर्वा मला आज बरी वाटली, विशेषतः विकासबरोबर मस्ती करते तेव्हा फार छान मुड असतो तिचा. फनी वाटतात दोघे.

ह्या दोघांच्या काही सीन्समुळे जरा मजा येते, वाद आणि किचकिच नसते त्यात.

बाय द वे ८० टक्के वोटस एकटी अमृता देशमुख घेतेय म्हणे. ती फार काही फ्रेममधे नसते.

माझा नाही विश्वास त्या अ‍ॅक्ट रायडर्सच्या व्होटिंग ट्रेन्ड्स वर .
बिबॉ कन्टेन्ट्+ पॉप्युलॅरीटी +चर्चा ज्याची जास्तं त्यानुसार रिझल्ट्स देत असावेत !

हो अपूर्वा हुषार आहे असे दिसते. तिच्या आणि विकास्च्या भांडणांनी करमणूक झाली या आठवड्यात. माने ही हुषार असावेत पण डोक्यात जाऊ लागलेत. स्वतःला हवे ते मिळाले नाही की सतत कुणाकुणाला दोष देऊन कंप्लेन करत असतात. त्या विकास ला तर कायम मॅनिप्युलेट करायचा प्रयत्न करतात.
बाकी ग्रुप तर जाऊ देत अजूनही कोणी कोणाचे धड मित्र नाही या घरात.

अपूर्वा नॉमिनेट आहे ,म्हणून हे करत असावी अस वाटत.
काल सेकंड राऊंडमध्ये यशश्रीने निळे कागद न कापता दुसर्या टीयशी एक्सचेंज च जे डोक लावल आणि स्टार्स पहिले तिने जाऊन जेलमध्ये लावले जे अपूर्वा आणि मेघाने मोजायच्या आतच काढले.
खरतर अपूर्वाऐवजी ती पुढे जायला हवी होती.

कालचा टास्क चांगला झाला.तेजु आणि सम्रुध्दी मध्ये तेजच पहिल्यापासूनच उजवी वाटत होती,त्यामुळे ती कँप्टन्सीपदाची पहिली उमेदविर झाली.
नंतर अप्पू आणि अम्रुता मध्ये अम्र्रुताला तिचे मुद्दे बरोबर मांडता आले नाहीत.
अपूर्वाने बिबॉसच्या निकषांवर छान मांडले ,त्यामुळे ती जिंकली.
ते माने मुद्दाम वेळ जावा म्हणून पाल्हाळ लावत होते ,जो संशय अपूर्वालाही आला,की खरच त्यांना बोलायच होत समजत नाही.
पण हा माणूस आणखी एक दोन आठवडे राहतोय की या वीकमध्येच सायोनारा करतो ते कळेल.
कँप्टन्सी टास्क पण छान होता.किती दिवसांनी जुन्या ऑडिओ कँसेट्स बघायला मिळाल्या.
तर अपूर्वाने विकास आणि रोहितला तर तेजूने प्रसाद आणि मानेला सपोर्टर्स म्हणून घेतल.माने का लागतात हिला/
अपूर्वाच्या टीमने अक्षरश: पाच मिनिटात दोन्ही रीळ बांधले.माने आणि प्रसादच काय चालल होत त्यांच त्यांनाच माहित.
मग परत राडा झाला,बिबॉसने थांबवल,मग परत सुरू झाल परत थांबवल.आता आज परत सुरू होईल.
पण सोमिच्या अपडेटनुसार अपूर्वा झाली आहे कँप्टन.
काल अपूर्वा छान खेळली पण .अशीच खेळली तर नक्की जाईल पहिल्या पाचात.तेजु, प्रसाद पण असतील.
काल परत अम्रुता देशमुख, त्रिशुल,इव्हन अक्षय ,मेघा तसे गायबच होते.
मानेवर मात्र ममां बरसतील या चावडीवर.

नक्की कोण कॅप्टन झालंय.

काल एकीकडे अपुर्वा, एकीकडे तेजस्वीनी ऐकलं.

विकास टास्क छान खेळतो मात्र. त्याला कॅप्टन व्हायचा चान्स द्यायला हवा, नुसता वापर नको आणि त्याने सारखं त्या माने मागे मागे करायला नको.

मी कालही उशीरा बघितलं, दिसत नव्हतं कलर्स मराठी खूप वेळ.

यशश्रीला वोटींग करु का विचार करतेय, मी खेळ बघितला नाही तिचा, इथे वाचलं परवाचं. माने जायला हवेत, त्यांची शाळा घेतील बहुतेक यावेळी.

अपूर्वा कॅप्टन झाली. मस्त खेळले ते लोक
फायनली असे गट पडलेत
- अपूर्वा अक्षय रोहित रुचिरा समृद्धी त्रिशुल मेघा
- प्रसाद योगेश तेजा यश अमृता अमृता
- माने विकास ( तळ्यात मळ्यात आहेत )

विकास आणि अपूर्वा मजा आणतात
या आठवड्यात अपूर्वा आवडली खरी वाटली
तेजा पण चांगली आहे पण तिचा ग्रुप आवडत नाही

धोंगडे डोक्यात जाते
देशमुख जाईल या आठवड्यात कुठेच दिसत नाही

माने शिव्या खाणार उद्या

योगेश ने तोडफोड केली आणि बिबॉ चा ओरडा खाल्ला पण भांडण का झालं त्याचा मुद्दा कळला नाही

तेजस्वीनी दुसऱ्यांदा अनलकी ठरली. तिचा आवाज छान आहे, मला आवडतो.

अपूर्वाची टीम डोकेबाज आहे मात्र. अपूर्वाने विकासला कॉन्फिडन्स दिला, मात्र त्याला कॅप्टन करण्यासाठी मदतही करायला हवी पुढे.

माने यांनी अपूर्वाचे आज वर्णन केलेलं योग्य वाटायला लागलं आहे, शार्प आहे ती. फक्त कॅप्टन झाल्यावर अति हवेत वर उडतेय असं वाटायला लागलं.

विकास माने आणि अपूर्वा यांना गुरु मानत पुढे जातोय.

तेजस्विनी अक्षयचे भांडण मी बघितलं नव्हतं पण आज त्यांची केमिस्ट्री छान होती. एक लवस्टोरी सुरू होईल की काय, आज मजेत सुरू होतं सर्व पण अक्षय म्हणाला, मला प्रेमात पडायला हरकत नाही. तू वेज आहेस, घारी आहेस असं म्हणाला तिला .

योगेशला समज दिली ती योग्य होती पण खरंतर हिंसाच हवी असते bb ना. योगेशने अति केलं मात्र. प्रत्येक सीझनमध्ये नेहेमी कोणीना कोणी कोणाचे तरी आईबाबा काढतात. सईने स्मिताचे काढलेले, अजून कोणीतरी वीणाचे काढले, आज योगेशने मराठेचे काढले.

धोंगडे आणि घाडगे आज फार निगेटिव्ह वाटल्या.

या आठवड्यात (किंवा कदाचित पुढच्या आठवड्यात) नाही काढणार बहुतेक कुणाला "दिवाळी" म्हणून >>> सेम मनात आलं माझ्या.

अक्षय केळकर vlogs करतो की काय हिंदीत. आत्ता एक दोन बघण्यात आले. आई, बहीण छान आहेत दिसायला, तो ही छान आहे म्हणा. फुलाला सुगंध मातीचा ची नायिका समृद्धी केळकर बरोबर जास्त दिसतायेत vlogs .

त्याचं, माझं आडनाव सेम असलं तरी तो नातेवाईक वगैरे नाहीये. मला तो फार माहितीही नव्हता म्हणजे बघितला होता पण नाव माहिती नव्हतं, bb त आल्यावर समजलं.

हिन्दी सारख्या इथेही लव्ह स्टोरीया /जोड्या लावा चालु झालय !
तेजस्विनी-अक्षय , समृद्धी-त्रिशुल, प्रसाद-अमृता आणि रोहित-रुचिरा तर आहेच !

Pages